परतुरमध्ये महाराजांच्या जागेवर बांधकाम कराल तर? सबंधीत अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासु- सिध्देश्वर काकडेपरतुर: परतुर शहरातील साई बाबा मंदिर परीसरा समोरील जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात येणार आसुन मेघ इंजीनिअरिंग या बांधकाम कंपणीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विरोध दिसुन आला आहे. आपण कोणाच्या पुतळ्याला विरोध करत आहात. याचे भान मेघ इंजीनिअरिंग कंपणीला आहे का? आसा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांनी केला आहे. मंठा परतुर मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मंत्री पद आसतांना या साई बाबा मंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मागणी केली होती. या मागणीची दखल अनेकांनी घेतली होती. व तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे दैवत आहेत. यामुळे सर्वांनी या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पसंती दिली आहे. पण मेघ इंजीनिअरिंग हि बांधकाम करणारी कंपणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवित आहे. या जागेवर तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे शिवभक्तांच्या भावनांचा उद्रेक प्रशासनाला बघायला मिळेल आसा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. जर या जागेवर बांधकाम कराल तर? संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला मि आणि माझे सहकारी काळे फासु आसा खणखणीत अल्टीमेटम ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक राज्य कार्यकारणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. परतुर शहरातील साई बाबा मंदिरा समोरील जागा हि. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आहे. कुणी विनाकारण आडकाठी आणली तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत आहे. तीथे छत्रपती शिवाजी महाराज यांचाच पुतळा ऊभा राहिला पाहिजे आसी आग्रही भूमिका सिध्देश्वर काकडे यांनी घेतली आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान