Posts

Showing posts from January, 2022

हातडी येथे सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली =================

Image
परतूर / हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील हातडी येथे सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळ व सर्व महिला ग्राम संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून   ,पोलीस कॉन्स्टेबल निता नवले   निता नवले (महिला पोलीस कॉन्स्टेबल ) गंगाताई जोगदंड (महीला बचतगट सुपर वायसर)सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गाढवे,उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड  सरपंच, उपसरपंच, सर्व ग्राम पंचायत महिला सदस्या, आरोग्य सेविका  आशा कार्यकर्ती   शाळेतील विद्यार्थी व हातडी येथील ग्रामस्थ यांची उपस्तीती होती या वेळी संस्कृती झरेकर, स्वरा झरेकर, शारदा बोरकर, संस्कृती बोरकर यांनी यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरवात केली .  या नंतर पोलीस कॉनीस्टेबल निता नवले  यांनी मार्गदर्शन केले बोलतांना त्या म्हणाल्या मुलींनी शिक्षणावर भर द्यावा कोणीही बालविवाह करू नये महिलांवर कौटोंबिक अत्याचार होत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा   या नंतर समता कलामंच येनोरा यांनी लेक वाचवा ल

सेवली जालना रोडवर दोन मोटरसायकल समोरा समोर धडकल्याने एक ठार तीन जखमी ================

Image
परतूर / हनुमंत दवंडे . जालना तालुक्यातील सेवली जालना रोड वर सेवली पासून १ किमी अंतर वर अपघात झाला  गोविंद धर्मा चव्हाण राहणार वय 48 व जखमीचे नाव बळी धना राठोड वय 50. सेवली वरून आपल्या घरी  जात असताना समोरून भागडे सावरगाव येथील दोघीजणी येत असताना त्यांच्या गाडीने धडक दिल्याने हे चौघेही जखमी झाले .त्यामध्ये जखमी बळीराम राठोड, गजानन इंगळे, वय 30 व किशोर सदावर्ते वय 35 मोटर सायकल नंबर एम .एच. 21 बी. टी. 50 42 व दुसरी मोटरसायकल एम .एच. 28 3709  या दोन मोटारसायकली  व जखमींना सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता या केंद्रामध्ये एकही डॉक्टर नसल्याने दवाखान्यामध्ये दोन ते तीन तास जखमी तडपत पडले होते .नंतर जखमींच्या नातेवाइकांनी जखमींना खाजगी वाहनातून जालना येथे नेण्यात आले सेवली  येथे ॲम्बुलन्स  असताना ॲम्बुलन्स मध्ये डिझेल टा का यला सांगितले त्यामुळे नातेवाईकांनी खाजगी वाहन करून जालना येथे गोविंद धर्मा चव्हाण या जखमींना जालना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता जालना सिविल हॉस्पिटल  मधील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तीन जखमी चा उपचार जालना येथे चालू आहे.

शिवरायांचा पुतळा ऊठवला तर? प्रशासनाला धडा शिकवला जाईल -काकडे

Image
बुलढाणा(रवी पाटील) बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील लखोजी राजे राजवाड्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कुठलीही परवानगी न घेता बसवण्यात आला आहे. यावर प्रशासन हा पुतळा ऊठवण्याचा डाव आखत आसुन या सिंदखेडराजा तालुका व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात चांगलेच वातावरण तापले आहे. यात शेतकरी क्रांती सेनाने देखील ऊडी घेतली आसुन छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे, कष्टकरी कामकरी, शेतकरी व गोर गरीब जणतेचे म्हणजेच रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कुठं ऊभारायचा? हे जर प्रशासन ठरवत आसेल तर हि शोकांतिका आहे. प्रशासनाने परवानगी मंजुर करावी. पण पुतळा ऊठवण्याचे नाटकं करु नये. अन्यथा बुलढाणा जिल्हा प्रशासनाला धडा शिकवला जाईल आसा खणखणीत इशारा शेतकरी युवा नेते तथा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. शिवरायांच्या पुतळ्याला हात लावला तर बुलढाणा जिल्हाधिकारी यांना शेतकरी क्रांती सेनेचा हिसका दाखवला जाईल आसा ईशाराच शेतकरी आक्रमक युवा नेते सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.

परतुर येथील धम्मदिप विहारात नामांतर दिनी शहिदांना अभिवादन

Image
परतूर/हनूमंत दंवडे परतुर दि 14/01/2022 रोजी परतुर येथील धम्मदिप बुध्द विहारात नामांतर दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष रामचंद्रजी पानवाले हे होते,सुञसंचालन व विधी भारतीय बौध्द महासभेचे बौध्दाचार्य हेमंत पहाडे यांनी घेतले या प्रसंगी डाँ.सुनिल पडागळे यांनी नामांतरा विषय आपले मनोगत व्यक्त केले या वेळेस विशाखा महिला मंडळांनी नामंतराचे गाणे गाऊन अभिवादन केले या प्रसंगी नारायण गवई,साहेबराव मानकर,बन्सी शेळके ,बन्सी शेळके सुदामराव गवळी,सनी गायकवाड,नरेश कांबळे,सतीष गवळी,नरेश सोनवने पुष्पाबाई वाघमारे,कोंडाबाई शेजुळ,विमलबाई गवई,शांताबाई शेळके,प्रमिला पाईकराव नंदाबाई धनले, तारामती खरात,जयश्री खरात,जमदाडे ताई वंदाना साळवे,अरुणा पवार,शितल गवळी व धम्मदिप बुध्द विहाराची कमिटी उपस्थित होते

मंठा तालूक्यातील ९०% अनुदान जिल्हा बँकेकडून शेतकर्याना वाटप ,अतिवृष्टीचेअनूदान वेळेवर,मिळाल्याने शेतकर्यात समाधान

तळणी (रवी पाटील)मंठा तालूक्याती चारही जिल्हा  मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून वेगाने  वाटप .करण्यात आले असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले  खरीप हंगामाच्या शेवटी शेवटी झालेल्या अतिवृष्टी मृळे सपूर्ण तालुक्यात मोठे नुकसान झाले होते या नुकसान भरपाई पोटी शासनाने पॅकेज देऊन थोडाफार आधार दीला असुन अनुदान त्वरीत शेतकर्याच्या खात्यामध्ये जमा करून त्याना ते वाटप करण्यात जि़ल्हा मध्यवर्ती बँकेचे मोठे योगदान आहे हे अनुदान वाटप चालु असतानाच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान नीधीचा दोन हजार रुपयाचा २०२१चा शेवटचा हप्ता सुध्दा याच दरम्यान आला अपूरे कर्मचारी व कोरोनाचे नियम पाळून हे वाटप. सुधा बहुतांश शेतकर्याना वाटप करण्यात आल्यानतर लगेचच काही शेतकर्याना पीक विमा मंजूर झाला तो सुध्दा वाटप करण्यात आला नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम शेतकर्यासाठी कमी जरी असली तरी विविध लाभातून शेतकर्याना मिळालेली मदत ही वेळेवर मिळाल्याने त्या मदतीचा मोठा आधार दीवाळी सणासाठी  व रब्बीच्या लावगडी साठी शेतकर्या ना आधार झाली  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे राज्य शासनाकडून दोन टप्यात देण्याचे नियोजन करण्यात आले होते त

नगरपरिषद परतूर मध्ये पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा नऊ बारा अभियंता घाटेकर असून अडचण नसून खोळंबा

Image
परतूर / हनुमंत दवंडे     परतूर नगर परिषद चे पाणी पुरवठा विभाग म्हणजे तमासगीर यांचा खेळ झालेला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता घाटेकर यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा कोलमडलेली आहे. घाटेकर हे एक तर ऑफिस मध्ये नसतात त्यांना मोबाईलवर कॉल केल्यावर कॉल घेत नाहीत मोंढा भागातील पाण्याच्या टाकी मागे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागरिकांना अर्ध्या भागात पाणी मिळत नाही घाटेकर यांना मोबाईलवर अनेकदा सूचना केल्या असतात दोन दिवसात करतो एक दिवसात करतो असे उडवाउडवीचे उत्तर देतात परत फोन केल्यावर फोन रिसीव्ह करीत नाहीत .बऱ्याच दिवसांपासून या भागातील नागरिक पाण्यामुळे त्रस्त झालेले आहे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे जर नागरिकांना विकतच पाणी घ्यायचा असेल तर नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील अभियंता घाटेकर यांच्यावर का खर्च करत आहे हेच कळत नाही  तसेच नागरीकांनी ही नळपट्टी का भरावी हा प्रश्न निर्माण होत आहे मुख्यअधिकारी यांना फोन लावल्यास त्वरित फोन उचलून संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवतात परंतु यामधील टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे तो अभियंता घाटेकर यांनाच माहीत असेल मुख्

जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक संपन्न

Image
जालना (समाधान खरात)शासकीय विश्रामगृह जालना येथे 'जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन जय जवान जय किसान संघटनेचे जालना जिल्ह्याध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांनी केले होते. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून जय जवान जय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी आलेल्या संघटनेच्या सैनिकांना मार्गदर्शन केले. ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, जय जवान जय किसान या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व तरुणांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम जालना जिल्ह्यात सुरु आहेत. आपल्या संघटनेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. सतत आपण आपले काम सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात काम जर सुरू ठेवले तरच आपली प्रगती होईल व आपल्या संघटनेचे काम पण चांगल्या प्रकारे सुरू ठेवता येईल. आपल्या संघटनेच्या प्रत्येक सैनिकांने कोणत्याही कामात स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. सतत समाजात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण लढले पाहिजे. गोरगरिबांच्या मदतीसाठी

जिजाऊ जयंती विशेष

Image
मंठा (सुभाष वायाळ) दि.12 जानेवारी हा दिवस स्वराज्याचे स्वप्नण साकार करणार्‍या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रताप शादी संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा हा जन्मदिवस. आई ही जगातील महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आहे आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवाजी महाराजांना घडविले. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली मुघलांच्या अन्यायाच्या पर्दा फाश करण्यासाठी स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवराया मध्ये नितांत श्रद्धा निर्माण केली. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शिंदखेड गावात झाला त्या मराठा लखोजी राजे जाधव आणि माळसा राणी यांच्या कन्या होत्या. सिंदखेड

मंठा शहरात राजमाता माँ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

Image
मंठा(सुभाष वायाळ) दि.12 मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१२बुधवार रोजी विविध सामाजिक संघटना व धर्मवीर शंभुराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आदी गोष्टीचे काटेकोरपणे पालन करून साजरी केली. विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. यामध्ये राजमाता शिक्षण प्रसारक मंडळ व राजमाता अर्बन मंठा तर्फे माँ जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माॅसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. व मान्यवरांनी जिजाऊच्या जीवनावर प्रकाश टाकला.या प्रसंगी संस्थाध्यक्ष डिगांबर बोराडे, नितिन राठोड, अचित बोराडे,वैजनाथ बोराडे ,कृष्णा खरात,संजय बोराडे ,डॉ.देवडे, प्रा.शेळके,संदिप बोराडे,प्रा.ज्ञानेश्वर वायाळ, शिवाजी जाधव,बाळासाहेब

येणारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली..

परतूर प्रतीनिधी/ हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील येनोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली. ज्या शूर माता- पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही स्मरण केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे हीच कृतज्ञतेची भावना आहे. राष्ट्रातील या महान राजमाता लोकमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधन आहे. असे यावेळी बोलताना भागवत  भूंबर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी रमेश भाऊ भुंबर,नाथाभाऊ शिंदे,भागवतदादा भुंबर,भास्करराव साळवे, दिगंबर गायकवाड, अर्जुन मोरे, अशोक दवंडे,  पांडुरंग भुबर, वैष्णव भुबर कृष्णा तौर यावेळी उपस्थित होते...

पारडगाव येथे मल्हार अक्वा वॉटर व अहिल्यादेवी सांसस्कृतिक सभागृहा चे उद्घाटन पालकमंत्री मा.ना.राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या हस्ते संपन्न

Image
*पारडगाव तालुका घनसावंगी येथे   मल्हार अक्वा वॉटर व अहिल्यादेवी सांसस्कृतिक सभाग्रहाचे उद्घाटन  भव्य शुभारंभ मा. ना.श्री. राजेश भैय्या टोपे साहेब सार्वजनिक आरोग्य, व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या हस्ते संपन्न ==================== परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे घनसांवगि तालूक्यातील पारडगांव येथे अहील्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन व मल्हार अक्वा वॉटर फिल्टर चे उद्घाटन याप्रसंगी बोलताना आमदार राजेश भैय्या टोपे म्हणाले की पारडगाव येथे गावालगत असणारे पांदण रस्ते, स्मशान भूमी , शादिखाना याची रंगरंगोटी करून ते काम भरीव करण्यात आलेलं आहे. तसेच आपण या ठिकाणी असलेले भैरवनाथाचे मंदिरला   आपण तीर्थक्षेत्रांमध्ये घेतलेले आहे पारगाव या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे इथे मोठा जनावरांचा बाजार भरतो आणि त्यामुळे या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना असणे गरजेचे होता आणि ते पशुवैद्यकीय दवाखाना तात्काळ या ठिकाणी होणार आहे. त्या अनुशेष मध्ये आहे.,त्याचे सुद्धा काम मार्गी लागेल काही विविध शासनाच्या योजना यामध्ये मातोश्री पांदण रस्त्याची योजना ठाकरे सरकारने आणलेली आहे ह्या योजनेचा सुद्धा फायदा अ

भीमराव मनाजी तरवटे यांच्या प्लॉटवर नगरपरिषदने केले अतिक्रमण उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

Image
परतूर/ हनूमंत दंवडडे भीमराव मनाजी तरवटे यांचा प्लॉट आदर्श कॉलनीत असून सर्वे नंबर 138 मधील प्लॉट क्रमांक 64 व र नगरपरिषदेने अतिक्रमण केले आहे. हा प्लॉट सदर इसवी सन 2004 मध्ये खरेदी केलेला आहे बाबुराव बापूराव घरत यांच्याकडून त्यांनी विकत घेतलेला प्लॉट आहे .त्याची सदरील रजिस्ट्री, मालकी हक्क प्रमाणपत्र, नगरपरिषद कार्यालयाची रिविजन नक्कल, नकाशा, हे सर्व डॉक्युमेंट्स भिमराव तरवटे यांच्या नावाने आहेत. तरीसुद्धा त्या ठिकाणी नगर परिषद चे काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी सदरचे काम हे गुत्तेदार यांनी घेतलेले आहे त्यांनी तरवटे यांचा प्लॉट कंपाऊंड वॉल मध्ये घेण्यात आलेला आहे . तो काढण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद व पोलिस प्रशासनास निवेदन दाखल केले आहे. तरी याची त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी समाजाव गुन्हे दाखल,असे कितीही गुन्हे दाखल करा आमचे आंदोलन आरक्षण घेतल्या शिवाय थांबणार नाही,ओबीसी समाजाचा एल्गार

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे  वाटुर तालुका परतुर येथे आज सर्व ओबीसी बांधवांनी हिरावले गेलेले राजकीय आरक्षण तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे . यासंदर्भात ओबीसी समाजाच्या वतीने अशा प्रकारचे कितीही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहोत मात्र आमचा हक्क आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमचे राजकीय आरक्षण पूर्ववत लागू केले जात नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा वनवा असाच पेटत राहील असा एल्गार ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे     खरेतर राज्यातील ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणाविना अपंग झाला आहे अशा परिस्थितीमध्ये या समाजाला राजकीय आरक्षण देऊन पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात अन्या ची गरज आहे मात्र सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असू तर कुठे बिघडले कोरोना चे कारण पुढे करून राज्यसरकारचा आमचे आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचे मत ओबीसी समाजातून व्यक्त केले जात आहे आज वाटुर तालुका परतुर येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची सरकारने धास्ती घेतली असून यापुढे महाराष्ट्र पेटेल

आपला देश लवकरच कोरोना मुक्त होईल. तहसिलदार रुपा चित्रक.

Image
  परतुर (हनूमंत दंवडे) संपुर्ण जगात थैमान घालणार्या कोरोना या आजारातुन आपला देश लवकरच मुक्त होईल असा आशावाद परतुरच्या तहसिलदार रुपा चित्रक यांनी व्यक्त केला. आपल्या देशातील लोकसंख्येची घनता व लोकसंख्या मोठी असुनही सामाजिक अंतर व प्रभावीपणे राबण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम या मुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले . पाटोदा[माव] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील पंधरा ते अठरा या वयोगटातील  विद्यार्थ्यांच्या लसिकरण कार्यक्रमाचे ऊद्घाटण प्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षक - पालक - संस्थाचालक यांच्या सहकार्यातुन या वयोगटातील संपुर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण आपण पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .     या कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेची प्रतीमा पुजन करुन झाली.  कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी नेहा पुजरवाड यांनी लसीकरणाबाबत अनेक शंकाचे निरसन करुन लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले .कोणतीही शंका मनात न बाळगता पालकांनी आपल्या पाल्यास लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान आज रोजी वर्ग नववी व दहावी मधील श्याहाशि [86] व

सन आँफ आंबेडकर ग्रुपच्या प्रयत्नाने,निराधार महिलेस मिळाला योजनेचा लाभ

Image
परतुर (हनूमंत दंवडे) परतूर येथील सन आँफ आंबेडकर ग्रूप च्या पाठ पुराव्यामुळे एका निराधार महिलेस  योजनेच्या माध्यमातून २० हजार रुपये अर्थसहाय्य मिळून दिले    गेल्या सहा ते सात महिन्या पुर्वी  परतुर येथील रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या  सुलताना आजम शेख वय ३७ या महिलेच्या पतीचा नैसर्गिक मुत्यु झाला होता,  सन आँफ आंबेडकर ग्रूपचे सनी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी  निराधार महिलेचा  योजनेचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालय येथे दाखल करुन तब्बल सात महिने त्या गोष्टीचा पाठपुरावा केला.शेवटी त्याला यश येऊन 10 जानेवारी या महिलेला शासकिय योजनेतून  20 हजार रुपये अर्थसहाय्य मंजुर झाले . महिलेच्या परिवाराने सन आँफ आंबेडकर ग्रूपच मनापासुन आभार मानले . या ग्रुपच्या  वतीने यापूर्वी ही अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून  यापुढेही गोर गरीब निराधार साठी सन आँफ आंबेडकर ग्रूप सदैव तत्पर असेल असे ग्रुपचे सनी गायकवाड यांनी सांगितले.तसेच तहसीलदार मा.रुपा चिञक व निराधार कार्यालय येथील सर्व अधिकार्यांचे सनी गायकवाड यांनी आभार मानले

रायगव्हाण येथे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश,भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष,प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
प्रतिनिधी(सुभाष वायाळ) रायगव्हाण तालुका परतुर येथील अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला       यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे तिथे तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली जाते या पक्षामध्ये कुणाची एकाधिकारशाही नसून संघटनेच्या बळावरच आज रायगव्हाण येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याचा निश्‍चितपणे फायदा पक्षासाठी होईल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज अनेक समाज उपयोगी कामे झाली असून राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मतदार संघाचा चौफेर विकास झाला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले वीज सिंचन रस्ते विकास यासह तात्कालीन सरकारच्या काळामध्ये मतदार संघामध्ये फिल्टर पाण्याची वॉटर ग्रीड व शेगाव पंढरपुर दिंडी मार्ग का सारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ वाटूरात भव्य रास्ता ,ररस्ता रोकोपक्ष गट तट आणि संघटना बाजूला ठेवून ओबीसी समाज एकवटला,आरक्षण नाही तर निवडणूका नाहीची घोषणाबाजी

Image
परतूर(हनूमंत दंवडे ) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी प्रवर्गातील जात समूहाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात झाल्याने ओबीसी समाजातुन तीव्र संताप व्यक्त केला जात असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, सर्व गट तट पक्ष संघटना बाजुला ठेवून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकवटल्या चे चित्र यावेळी दिसून आले, आरक्षण नाही तर निवडणूका नाही आशा घोषणाबाजी करत तब्बल दोन तास ठिय्या मांडण्यात आला. याविषयी अधिक माहिती अशी की,मंगळवार दिनांक 11 रोजी वाटूर फाटा ता परतूर येथे नांदेड जालना महामार्गावर सदरील आंदोलन करण्यात आले,राज्यातील ओबीसी समाज राजकीय अरक्षणापासून वंचित झाला असून झालेल्या अनेक निवडणूका अरक्षणाविना घेण्यात आल्याने ओबीसी समाजात तीव्र संताप व्यक्त यावेळी दिसून आला, सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलेले आरक्षण पुन्हा मिळावे याकरिता ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गावागावातून हजारो ओबीसी बांधव उपस्थित झाले होते,ओबीसी समाजातील विविध घटकातील लोक आपल्

पत्रकार राहुल मुजमुले यांना उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.....

Image
परतूर –(हनूमंत दंवडे) परतूर येथील पत्रकार राहुल शामराव मूजमुले  यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने  उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार मिळाला परतूर येथे आयोजित दर्पण दिननिमित्त कार्यक्रमात   मराठी पत्रकार संघ  परतूर पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.               परतूर तालुक्यात राहुल मुजमुले यांनी २०१६ पासून पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करून गेल्या पाच वर्षापासून पत्रकारिता पदवी घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपल्या पत्रकरीतेतून प्रश्नांना निर्भीड वाचा फोडत सातत्याने न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपले योगदान देत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे. याची दखल घेऊन त्यांना मराठी पत्रकार संघ परतूर शाखेच्या  वतीने श्री.मूजमुले उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                           या निवडीबद्दल  पत्रकार संघटना, पोलिस, राजकीय, सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान,दर्पण दीना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री.मुजमुले याना पुरस्क

विडोळी येथे नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळा संपन्न

Image
मंठा (सुभाष वायाळ) -दि.10 मंठा तालुक्यातील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा विडोळी येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून दोन दिवसीय नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व यातूनच एखादा कलाकार निर्माण व्हावा. यासाठी नाट्यकलावंत, दिग्दर्शक, सतीश पाटील खरात लिंबे वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना आंगिक ,वाचिक, अभिनय व नाट्य लिखाणाचे धडे दिले.नाट्य सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांचा भरभरून असा प्रतिसाद दिला.यावेळी   मुख्याध्यापक श्री राजाराम बोराडे, तसेच शिक्षक श्री किशोर निर्वळ,श्री प्रभाकर वायाळ,श्री अण्णा लंगडे, श्री.पांडुरंग वगदे, श्री परमेश्वर सोनटक्के, श्री मोहोर, श्री.वेळेकर, श्री.रामा चव्हाळ, श्रीमती अनिता चव्हाण, श्रीमती वर्षा वानखेडे शिक्षक, विद्यार्थी,व गावकरी मंडळी उपस्थित होती.

विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले मेसेज,प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात परतूर विधानसभा मतदार संघातून 5000 मेसेज

परतूर (हनूमंत दंवडे)  काल दिनांक  09 रोजी 10000 पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर आज दिनांक 10  रोजी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री यांच्या नेतृत्वाखाली परतूर विधानसभा मतदार संघातून शिक्षण मंत्री उदय सामंत यांना 5000 मेसेजेस पाठवण्यात आले  हे मेसेज पाठवण्याचे सुरुवात युवा मोर्चा प्रदेश महामंत्री यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी एकाच वेळी आपल्या मोबाईल वरून मंत्री उदय सामंत यांना मेसेजेस पाठवत पवित्र विद्यापीठांना तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवू नका विद्यापीठ सुधारणा विधेयक काळे विधेयक त्वरित मागे घ्या अशा प्रकारचा मेसेज प्रत्येकान पाठवला ======================= *विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घेईपर्यंत आता माघार नाही*  *राहुल लोणीकर* ======================= कालच आम्ही महाविद्यालयीन परिसरामध्ये बॅनर लावून राज्य सरकारच्या विद्यापीठ सुधारणा विधेयका संदर्भात जनजागृती सुरू केली व मुख्यमंत्र्यांना 10000 पोस्टकार्ड पाठवत जोरदार निदर्शने केली असे यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की हे विधेयक मागे

विद्यापीठ कायदे संदर्भात पारीत केलेले विधेयक हे काळे असून ते त्वरित मागे घ्यावे-- आ.बबनराव लोणीकर

Image
मंठा(सुभाष वायाळ) पोस्ट ऑफिस कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने विद्यापीठ कायदा विषयक विधेयक चुकीचे असल्या कारणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी आणि रोष व्यक्त करण्यात आले.महाराष्ट्र सरकारने जे विद्यापीठाच्या संदर्भात विधेयक पारित केले आहे.हे विधेयक विद्यार्थ्याचा भविष्यात  राखरांगोळी  व घात करणारा आहे.घाई गडबडीत घेतलेले हे विधेयक  काळे असून शिक्षण प्रणालीला गालबोट लावणारे आहे.पारित केलेले विधेयक त्वरित  मागे घेण्यासाठी युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्याच्या पत्त्यावर  हजारो  पोस्टकार्ड  पाठवून  निषेध दर्शवला आहे.या कार्यक्रमाला युवा मोर्चाच्या विनंतीला मान देऊन आ. बबनरावजी लोणीकर यांनी उपस्थिती दर्शवली.        लोणीकर यांनी बोलताना  हे पारित केलेले विधेयक काळे असून फक्त आणि फक्त वसुली,घोटाळे आणि हुकूमशाही  करण्याचा मानस या सरकारचा या मध्ये आहे. महाराष्ट्राला गालबोट लावणारे हे  विधेयक त्वरित मागे घ्यावे असे बबनराव  लोणीकर यांनी प्रसारमाध्यमांशी  बोलताना सांगितले. पुढे त्यांनी राज्यपाल, कुल

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त हेलस येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले

Image
मंठा (सुभाष वायाळ। दि.09  मंठा तालुक्यातील हेलस या गावी सलग 3  वर्षापासून राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे या वर्षीही हेलस येथे सर्व कोरोनाचे नियम पाळून संभाजी ब्रिगेड हेलस शाखेच्या वतीने व श्री स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी 30  पेक्षाही अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले,  कार्येक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेलस चे चेअरमन दिपक भाऊ खराबे यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्येक्रमास सुरुवात केली तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे सर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश घारे मंठा तालुकाध्यक्ष  बाळासाहेब खवणे व सर्व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्येकर्ते, जिजाऊ भक्त, गावकरी उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाणे एक कोटी 10 लाख रुपये चा फुल बांधून तयार .-पद्माकर कवडे

परतूर प्रतिनिधी/ हनुमंतराव दवंडे  वैजोडा. रोहिना खुर्द. रोहिना बुद्रुक. या गावातील धरणाच्या बॅक वॉटर मुळे 250 ते 300 एकर जमिनीला पडलेले बेट  पाण्याच्या वेडा. असल्यामुळे संबंधित गावातील शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी बेटावर जाता येत नव्हते. तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव  लोणीकर. व राहुल  लोणीकर यांच्या यांच्याकडे हा विषय घेऊन. तत्कालीन पुनर्वसन समितीचे अध्यक्ष. स्व. उमाकांत  मानवतकर. पद्माकर कवडे. यांनी या बेटाची पाहणी करून हा विषय कानावर घातला.  तात्काळ लोणीकरानी या बेटावर जाण्यासाठी एक  कोटी दहा लक्ष रुपये मंजूर करून दिले.  म्हणून या बेटावर जाण्यासाठी आता मार्ग सुकर झाला आहे. पूल बांधून तयार झाल्यामुळे संबंधित गावातील शेतकरी. वर्ग आनंदित झाले आहेत. गावातील शेतकऱ्याकडून आमदार बबनराव  लोणीकर व राहुल  लोणीकर यांचे  भुजंगराव कवडे. ज्ञानदेव शिंदे. गोविंद यादव. प्रकाश कवडे. परमेश्वर जाधव. रंगनाथ शिंदे. भगवान यादव. भाऊसाहेब खामकर. ओमप्रकाश दहिवाळ. अनिल दहिवाळ. राजेभाऊ शिंदे. नारायण खिंडकर विठ्ठल राव हिंगे. वसंत गवळी. प्रकाश राव भामट. गणेश गवळी. प्रभाकर मस्के. बालासाहेब भोपाळ. नामदेव शिंदे. स

तळणी येथे नूतन शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या सत्कार संपन्न

Image
   तळणी (रवी पाटील):-  मंठा तालुक्यातील तळणी येथील केंद्रीय प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत शिवाजी मूर्तडकर तर उपाध्यक्षपदी सौ.मंगल प्रभुसिंग चव्हाण यांची निवड यांची करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना विषयक सर्व नियमावलीचे पालन करून शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे. पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपसरपंच श्री.सुधाकर सरकटे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अमोल सरकटे, केंद्रीय मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर, शिक्षक आर.जी.खंदारे, डी. टी. शिंदे, पी.जे.वराडे, जी.ए. धारतरकर, एस.बी.गारोळे,ए. डी. आकाळ, एस.एस.येलेकर आदींसह गावकऱ्यांची  उपस्थिती होती.  नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष भागवत मूर्तडकर, उपाध्यक्ष सौ.मंगल चव्हाण, सदस्य सुप्रिया जोशी, सोपान सरकटे, सौ.सुनीता कुकडे, ज्ञानेश्वर चौकसकर,रफिक शेख,सौ

पत्रकार भारत सवने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

Image
परतूर (हनूमंत दंवडे) येथील पत्रकार भारत सवने यांना प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या वतीने स्व. श्रीकृष्ण भारुका स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार संघ पदाधिकारी आणि महावितरनाच्या कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  परतूर तालुक्यात भारत सवने यांनी २००९ पासून पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करून गेल्या बारा वर्षापासून पत्रकारिता पदवी घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपल्या पत्रकरीतेतून प्रश्नांना निर्भीड वाचा फोडत सातत्याने न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपले योगदान देत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे. याची दखल घेऊन त्यांना परतूर तालुक्यात प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या पहिला उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या झाल्याबद्दल पत्रकार संघटना, महावितरण, पोलिस, राजकीय, सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची-. माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर. दर्पण दिनानिमित्त भाजपा, माऊली अर्बन पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांचा गौरव

Image
 प्रतिनिधी(रवी पाटील) स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली आहे. स्वतंत्रपूर्व काळात दर्पणकार बाळशास्त्री बाळकृष्ण जांभेकर यांनी तात्कालीन इंग्रज राजवटीला आपल्या लेखणीतून सळो की पळो करून सोडले होते. समाज प्रबोधन करून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सरकारला झुकवण्याची पत्रकारिता जांभेकेरान सोबतच स्वातंत्रपूर्व लढ्यातील पत्रकारांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली आहे.असे प्रतिपादन माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी केले.ते भारतीय जनता पार्टी व माऊली अर्पण पतसंसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पण दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. (ता.7) शुक्रवार रोजी माऊली इग्लिश स्कूल येथील आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे, आयोजक,भाजपा तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सतीशराव निर्वळ,बाजार समितीचे संचालक निवासराव देशमुख,प्रसाद बोराडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेशराव कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार पंड

लालबहादूर शास्त्री खांडवी येथे 9 वी. आणि 10 वी च्या विद्यार्थ्याचे लसीकरण संपन्न...

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील खांडवी येथे लालबहादूर शास्त्री हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गिरी मॅडम यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले आणि शाळेमध्ये   शाळेतील विद्यार्थ्यांचे एकूण 169 लसीकरण करण्यात आले .या वेळी शाळेच्या वतीने आरोग्य कर्मचारी व गावातील सरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गिरी मॅडम, खांडवी गवाचे सरपंच गणेशराव हा रकळ,  शाळेतील कर्मचारी श्री. कामठे सर , श्री. जोगदंड सर,श्री. चव्हाण सर, माकोडे सर, बरकुले सर , आरोग्य कर्मचारी वृंद श्रिष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे  बी.आर. तोटे , जी.बी. बुधवंत, श्री. आसाराम नागरगोजे, श्री प्रधान पी. एस . श्रीमती. वैद्य, एल. एस. आशा वर्कर श्रीमती, रेणुका पराडे , चंद्रकला चींचाने,तसेच गावातील पालक विश्वनाथ बरकुले ,श्री ,गोविंदराव बरकुले व,अनेक गावातील मंडळी या वेळी उपस्थित होती .

पिक विमा भरून हि मोबदला मिळाला नाहि , तक्रारीचा पाऊस पाडून सुध्दा , तळणी परीसरातील बहुसंख्य शेतकरी लाभा पासुन वंचित...

Image
सग्रहीत तळणी (रवी पाटील) मंठा तालुक्यातील तळणी परीसरातील पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत रीलायंन्स कंपनीच्या नावाने आपल्या शेतातील खरीप हंगाम वर्षे  2021  सोयाबीन ,मुग, ऊडिद,कापुस,तुर या पिकाचा विमा उतरविला होता . या मंडळात क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाला होता .यामुळे कंपनीने पिक वामा मंजुर केला पंरतु याचा मोबदला मोजक्याच शेतकऱ्यांना दिला. या बाबतीत बर्याच शेतकऱ्याने कपनीकडे तक्रारी केल्या तर काहि लोकांचे कंपनीने फोन उचलले नाहि नॉट रीचेबल दाखविले . या बाबतीत तालुका पिक विमा आधिकारी यांच्या कडे विमा भरलेल्या पावत्या देऊन तक्रारी केल्या तरी सुध्दा बविमानात काहि शेतकरी पिक विमा भरूनहि त्यांच्या खात्यावर पैसे आले नाहि.यवढ्या प्रचंड प्रमाणात अतिवृष्टि मुळे नुकसान होऊन सुध्दा  मोबदला मिळत नाही तर शेतकऱ्याने विमा भरून तरी काय फायदा अशे सुभाष लाड , शर्मा सोनुने , रघुनाथ लाड, गौतम सदावर्ते , पिनू येऊल ,गुलाबसिगं जनकवार ,व इतर  शेतकऱ्यांना विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना न्यायालयाने द्यावा .नसता  शेतकरी   रीलायन्स कंपनीने शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मोबदला द्यावा नसता शेतकरी

मंठा येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा , आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

Image
 मंठा-(सुभाष वायाळ) दि.06 मंठा येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.एस.यु.  वायाळ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगदीश राठोड, श्री संतोषराव बोराडे, श्री सुशील घायाळ उपस्थित होते. यामध्ये सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशपाक शेख यांनी केले. तर प्रास्ताविक बाळासाहेब खराबे यांनी केले.बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचे औचित्य साधून मंठा येथील पत्रकार बांधवांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयुब पठाण व उस्मान पठाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.तर रफिक सय्यद यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माऊली बाहेकर,आशिष मोरे, आयुब खान व परिसरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रांजनी येथे सभु मा. वीद्यालयात कोविड लसीकरणास प्रारंभ

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे                    श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,रां जनी दिनांक : ६ जानेवारी रोजी  प्रशालेत शासन आदेश व परिपत्रकाप्रमाणे कोविड 19 लसीकरणास सुरुवात करण्यात आली.वयवर्ष १५ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना ही लस देण्यात येणार आहे. लसीकरण सुरु होण्यापूर्वी दाखल झालेल्या सर्व आरोग्य कर्मचारी,आणि वैद्यकीय अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष मा.श्री नानासाहेब देशमुख,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री विश्वरूप निकुंभ सर,पर्यवेक्षक श्री अतुल हेलसकर, कपिल दहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मा.मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार आणि आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार हे लसीकरण वर्ग व शिक्षकांच्या विविध टीम तयार करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घेतले जाणार आहे.यासाठी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी डॉ.स्वप्नील राठोड,आरोग्य सेविका श्रीमतीशारदा धंदाले,मीरा गाढवे,महानंदा मुळे, आरोग्य सेवक श्री कैलास गर्जे,रितेश तौर,संजय घुगरे श्रीमती विशाखा जोंधळे काम पाहत आहेत.तसेच विद्यालयातील स

परतूर येथे ओबीसीची बैठक संपन्न..==========

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे परतुर: दिनांक 6 जानेवारी 2022रोजी कालिका माता मंदिर गाव भाग परतूर येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी वाटुर तालुका परतुर येथे होणाऱ्या रास्ता रोको  आंदोलनासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .ओबीसी आरक्षण हा केंद्र आणि राज्य सरकारचा डावआहे ,ओबीसींचे राजकीय आरक्षण का गरजेचे आहे? यावर प्रवीण भैया सातोनकर साहेब यांनी आपले विचार मांडले  तर भारत हा पूर्वीपासून खेड्यांचा देश असून या खेड्यात सुद्धा बारा बलुते दार आणि अठरा आलुते दार पद्धती होती असे राम प्रसाद थोरात सर यांनी सांगितले. ओ.बी.सी. आरक्षण सरकारने हिसकावून घेऊ नये यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन एल्गार करावा असे आवाहन रासवे सर  यांनी केले. आता राजकीय आरक्षण काढले आता शैक्षणिक आरक्षण काढतील यावर इंद्रजित बापू घनवट  यांनी आपले मत मांडले तसेच पत्रकार हनुमंत दवंडे यांनी आपल्या ओबीसी गीत गाऊन वाटूर च्या मोर्चाला येण्यासाठी आव्हान केले. या बैठकीसाठी परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद जी थोरात सर  जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित बापू घनवट नगर परिषद परतूर चे

महेश आकात यांच्याकडून ऊसतोड कामगारांना ब्लँकेट स्वेटर चे वाटप..===========

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे             माव येथे . श्री महेश  आकात .यांनी त्यांच्या शेतामध्ये सहकुटुंब उपस्थित राहून. त्यांच्या शेतामध्ये चालू असलेल्या ऊस तोडी कामगारांना. आज ब्लॅकेट. जर्सी स्वेटर. थंडीपासून बचाव करणाऱ्या उबदार कपड्यांचे वाटप केले. महेश आकात यांची ही दूरदृष्टी व एकमेकांना मदत करण्याची ही प्रवृत्ती नेहमी प्रत्येक नव युवकांना प्रेरणा देणारी च आहे .हे अकात यांच आजचं  कर्तुत्व बघून अनेकांना खूप समाधान वाटलं .की महेश अकात  सारखा माणूस आपल्या तालुक्याला आपल्या गावाला मिळाला. खरंच भाऊ ऊसतोड कामगारांच्या मनामध्ये देखील आज आनंदाचं वातावरण तयार झालं .त्यांच्या चेहऱ्यावर हसू आल. 

रायपूर येथे ओबीसीची बैठक संपन्न..======

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे परतुर: दिनांक 5 जानेवारी 2022रोजी हनुमान मंदिर रायपूर येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी वाटुर तालुका परतुर येथे होणाऱ्या रास्ता रोको  आंदोलनासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .ओबीसी आरक्षण हा केंद्र आणि राज्य सरकारचा डावआहे ,ओबीसींचे राजकीय आरक्षण का गरजेचे आहे? यावर शिवाजीराव तरवटे साहेब यांनी आपले विचार मांडले  तर भारत हा पूर्वीपासून खेड्यांचा देश असून या खेड्यात सुद्धा बारा बलुते दार आणि अठरा आलुते दार पद्धती होती असे राम प्रसाद थोरात सर यांनी सांगितले. ओ.बी.सी. आरक्षण सरकारने हिसकावून घेऊ नये यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन एल्गार करावा असे आवाहन अशोक राव आघाव साहेब यांनी केले. आता राजकीय आरक्षण काढले आता शैक्षणिक आरक्षण काढतील यावर प्रवीण काका सातोनकर साहेब यांनी आपले मत मांडले या बैठकीसाठी परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद जी थोरात सर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक रावजी आघावसाहेब नगर परिषद परतूर चे नगरसेवक प्रवीण काका सातोनकर रासपचे शिवाजीराव तरवटे साहेब आणि पत्रकार मित्र दवंडे साहेब, खांड

सामान्य जनतेच्या कामास विलंब करून मनमानी कारभार करणार्‍या तहसिलदारांची बदली करा -- अच्युत पाईकराव

Image
परतूर – प्रतिनिधी/ हनूमंत दंवडे सामान्य जनतेचे तहसील कार्यालयातून वेळेवर कामे होत नसून कामास विलंब करून मनमानी करणार्‍या तहसिलदार यांची तात्काळ बदली करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जालना                                                  जिल्हा उपाध्यक्ष अच्युत पाईकराव यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर तालुक्यामध्ये सामान्य नागरिक आपल्या राशन कार्ड, संजय गांधी योजना, शेती प्रकरणे, पी.एम.किसान योजना, निवडणुकीच्या मतदार नाव नोंदणीसह, तालुक्यातील बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करून जनतेला वेठीस धरत असल्याने माहिती घेणे देणे यासह आदि समस्या संदर्भात चकरा मारीत असून अनेकांच्या समस्या सुटत नाहीत. तहसिलदार या कार्यालयात नियमित तसेच वेळेवर येत  नसल्याने कर्मचारी वर्ग मनमानी करीत असल्याने सामान्य जनता वेठीस धरून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे विविध कामे खोळंबली आहेत. तहसिलदार या सामान्य जनतेचे कामे करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच महसूल कर्मचारी यांच्यावर वचक नसल्याने यांची येथून तात

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी....................

Image
परतूर/प्रतिनिधी परतूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.                    परतूर येथेली परिसरात ऊसतोड मजुरांन  सोबत सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रभारी नगराध्यक्ष सादेक खतीब, नगरसेवक सिदार्थ बंड याची प्रमुख उपस्थिती होती.                      दरम्यान यावेळी ऊसतोड मजुरांना कपडे वाटप करण्यात आले.यावेळी दिपक मूजमुले,दीपक उबाळे,श्रीकांत उबाळे,सुमित माने,रवी बागल,विलास गायकवाड,दशरथ मुजमुले,विष्णू मूजमुले,गणेशराव मुजमुले,अविनाश  पाडेवार,विनायक मुजमुले,रमेश गुजकर,योगेश जईद,सुरेश काळे,शेख समद , बाबा भाई, आदींची यावेळी उपस्थिती होती.

रोहिना बु. येथे गेल्या दोन महिन्यापासून तलाठी गायब ! अबब!

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील रोहिना बु.  या गावाला गेल्या दोन महिन्यापासून तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे. शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते. शेतकऱ्यांना तलाठ्याकडून दिला जाणारा सातबारा आहे तो मिळत नाही तलाठी गावात वेळेवर  नसल्यामुळे फेरफार असेल हस्त लिखित 7/12 असेल नवीन रजिस्ट्रीची  कामे जी आहे ती सुद्धा खोळंबलेली  आहेत. तसेच तीन वर्षाचे शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सुद्धा वेळेवर मिळत नाही कारण की फाईल त्रुटी मध्ये काढले जाते त्याला जोडलेला सातबारा नसतो त्यामुळे . नमुना नंबर 8 अ अद्यावत करणे, वरीलप्रमाणे सर्वच कामे खोळंबली असल्या मुळे शेतकरी हतबल झाला आहे. आणि यामुळे आता प्रशासनाला आम्ही हाक देत आहोत की कोणी रोहिना बु. गावाला तलाठी देता का हो? अशी आरोळी देण्याची वेळ आली आहे. अश्

ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे आरक्षण हा विषय राज्यात सध्या जोरदार चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारला या मुद्द्याने चांगलंच पछाडल्याचं दिसून येत आहे. सध्याचा विरोधी पक्ष यावरून राज्य सरकारवर निशाणा साधत असला तरी गेल्या टर्ममध्ये तुम्ही काय केलं, हा प्रश्न त्यांनाही विचारला जात आहे. राज्यात मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलं होतं. कालांतराने त्यामध्ये पदोन्नती आरक्षण आणि आता ओबीसी राजकीय आरक्षणाची प्रकरणंही समाविष्ट झाली आहेत. यापैकी मराठा आरक्षणाच्या मागणीचा 40 वर्षांचा प्रवास आणि पदोन्नतीतील ओबीसी आरक्षणाचा वाद याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला वरील लिंकवर मिळेल. तर ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात संपूर्ण माहिती आपण या बातमीत घेऊ. सर्वप्रथम राजकीय आरक्षण म्हणजे काय, ते कुणाला मिळतं, याची आपण माहिती घेऊ. राजकीय आरक्षण म्हणजे काय? आरक्षण विषयाबाबत लोकांमध्ये विविध प्रकारचे समज-गैरसमज आहेत. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्याशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द - सर्वोच्च न्यायालय डॉ. बाबासा

अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन..

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापन

बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

Image
         परतूर (हनूमंत दंवडे)   बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप  यांनी आपल्या  समर्थकांसह शिव सेनेत जाहिर प्रवेश केला  त्यांनी शिवसेनेचे उप ता प्रमुख  रामचन्द्र काळे यांच्या मार्गदर्शना खाली हा प्रवेश केला त्यांचा प्रवेश  जालना येथे मा मंत्री अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी झाला                या वेळी  अर्जुनराव खोतकर यांच्या सह जिल्हा संघटक मोहन अग्रवाल ता प्रमुख अशोकराव अघाव ,किसान सेनेचे माउली राजबिंडे, संदीप पचारे आदि उपस्थित होते या प्रंसगि जगताप यांनी सांगितले कि  जी प निवडणूकीत रामचंद्र  काळे यांना  निवडूण आण्या साठी आपण  प्रयत्न करुण व तो सार्थ ठरवणार असल्याच प्रतीपादन केले   हीच खोतकर साहेबांना  वाढदिवसाची भेट देणार असल्याच त्यांनी शेवटी सांगितले

मंठा तहसीलचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात

मंठा -(सुभाष वायाळ) दि.4 मंठा तालुक्यामध्ये रेती व गौण खनिजे उत्खनन हे अवैधरित्या चालूच आहे. रेती व गौण खनिजे प्रतिबंधक पथकाची कारवाई मात्र शून्य आहे. अवैध गौण खनिज व रेती यासाठी तहसीलच्याच अधिकारी व कर्मचारी यांचा हात असतो हे कालच्या दिनांक 3 रोजीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. मंठा येथे मुरमाचे टिपर व ट्रॅक्टर चालू ठेवण्यासाठी मंठा तहसील मधील कर्मचारी विठ्ठल पांडुरंग बोरकर वय 34 वर्ष ह.मु.संत तुकाराम नगर मंठा यांनी एकूण 26 हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे संपर्क साधून मंठा तहसील येथे सापळा रचला व तहसील मधील कर्मचारी यांना सव्वीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध दि.04.01.2022 रोजी गु.रं.न.4/2022 कलम 7व 7अ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस निरीक्षक एस.एस.ताटे करीत आहेत.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Image
मंठा (सुभाष वायाळ) -दि. 03 महिलांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती [ता.३] सोमवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्यावतिने उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय देशमुख , पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, उत्सव समितीचे अध्यक्ष सोपान घनवट,बालासाहेब घनवट,गणेश शहाणे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे, विजय जुंबडे, सतीश राऊत, पिंटू लोखंडे,महादेव लोखंडे,सुरेश गोरे, विकास घनवट,अशोक घनवट, स्वप्निल खंदारे,संभाजी बनकर, कैलास बनकर,गजानन माळकर, संदीप काकडे,विक्रम घनवट,विष्णू घनवट,कुलदीप वाघमारे,परमेश्‍वर राऊत, प्रशांत जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) राज्याभिषेक दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा...

Image
परतूर प्रतिनिधी/ दवंडे हनुमंत आपला स्वाभिमान चला करू या महाराजांचा सन्मान इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे चक्रवती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा दिनांक 6 जानेवारी रोजी वाफगाव किल्ल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे 9:30 वाजता विविध कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे होळकर घराण्यातील व समस्त भारत वासियांच्या  उपस्थितीत गाव दर्शन ,गड पूजन , ध्वजपूजन, ध्वजारोहण  ,राज्याभिषेक तळी भंडार ,व महाराजांना अभिवादन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.अखंड भारत आणि Nation first, चा नारा देणारे देशाच्या इतिहासात इंग्रजांविरुद्ध सलग 18 लढाया अजिंक्य असणारे इंग्रजांना देशातून परतवून लावण्यासाठी देशातील सरदार- वतनदार -राजे यांना आपल्यातील वाद थांबवून इंग्रजांविरुद्ध एक  होण्यासाठी प्रयत्न करणारे देशासाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आजीवन लढणारे आद्यस्वातंत्र्य योद्धे राजराजेश्वर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा हा दिवस सर्व भारतीयांसाठी प्रेरणा दिवस आहे. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे क्रांती ज्योती

Image
परतूर (हनूमंत दंवडे) सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी* आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी परतुर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक श्री संतोष चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शंकर चव्हाल, प्रा. प्रदीप चव्हाण , शाळेचे  प्राचार्य श्री गजानन कास्तोडे आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फिरत्या मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून ६५५ कोव्हीड लसीकरणमुख्या बाजार पेठेत होतोय लसीकरण

Image
परतूर/प्रतिनिधी:- हनूमंत दंवडे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सह शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लसीकरण व मास्क अनिवार्य करण्यात आल्याने लसीकरणाचा वेग थोड्याफार प्रमाणात वाढला असून पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता परतूर शहरात फिरते मोबाईल व्हॅन मार्फत कोव्हीड-१९ लसीकरण करण्यात येत असून शहरातील मुख्य बाजार पेठेसह विविध भागात जाऊन लसीकरण करून घेण्यात येत असून ही मोबाईल व्हॅन २३ डिसेंबर पासून शहरात लसीकरण करत आहे आज पर्यंत ६५५ नागरिकांचे या मोबाईल व्हॅन मार्फत लसीकरण करन्यायत आल्याची माहिती देण्यात आली आहे  या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून,डॉ.स्वाती फलटणकर,लॅब टेक्नीशन शे.फरीना,नर्स नेहा जगदने,चालक वीजय राठोड,नितीन हीवाळे,फार्मशि सुमित लोंखडे हे लसीकरणाचे कार्य पार पाडत आहेत

ओबीसी समाजाचा वाटुर येथे रास्ता रोको उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.....

Image
परतूर/प्रतिनिधी हनूमंत दंवडे         ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणाचा मुद्दा आता जोर धरू लागला आहे सर्वोच्च न्यायालयात तांत्रिक बाबीची पूर्तता न झाल्याने राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याने तालुक्यातील ओबीसी समाजामध्ये असंतोष पाहायला मिळत आहे याबद्दल तालुक्यातील गावागावात जाऊन समनव्य समिती बैठका घेत असून या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे  राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने तालुका ओबीसी समाजाच्या वतीने ११ जानेवारी रोजी वाटुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की ओबीसी घटकाला घटनेने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मागविलेल्या तांत्रिक बाबीची पूर्तता न झाल्याने अडचणीत सापडले आहे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार तिहेरी चाचणी चा अवलंब करून त्यासंबंधी त्यावर आधारित माहिती सादर करणे बाबत सुचविले आहे सदरील तथ्यावर आधारित माहिती सादर न झाल्याने न्यायालयाने सुचविल्या प्रमाणे निवडणूक आयोग ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहे त्

तळणि येथे क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जंयती साजरी, विद्यार्थ्यांना कापडी पिशवी चे वाटप

Image
तळणि(रवी पाटील)आज दि 03 जानेवारी 2021 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जालना अंतर्गत मातोश्री रमाई लोकसंचलित साधन केंद्र तळणी व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व माविम यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती साजरी करण्यात आली         क्रातीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त क्रेदिय प्राथमिक शाळा तळणी व जिल्हा परिषद प्रशाळा तळणी या ठिकाणी कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.सदरिल कार्यक्रमास क्रेदिय प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री जे.डी.इंगळे सर,जिल्हा परिषद प्रशाळेचे मुख्यध्यापक श्री.आर .एल.चव्हाण सर,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थांनी शाळेच्या शिक्षिका श्रीमती आकाळ तर प्रमुख पाहुणे म्हणुन मातोश्री रमाई लोकसंचलित साधन क्रेद्रांच्या व्यवस्थापक श्रीमती.लता चव्हाण ,लेखापाल सतीश सरकटे हे होते.यावेळी  सतीश सरकटे यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जिवनचरिञावर  मार्गदर्शन केले तर लता चव्हाण यांनी प्रदुषण नियंञण ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन शाळेचे शिक्षक श्री गारोळे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन

उस्वद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Image
 मंठा-(सुभाष वायाळ) दि.03 मंठा तालुक्यातील ऊस्वद येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.       यावेळी शेतमजूर युनियनचे जिल्हासचिव कॉम्रेड सचिन थोरात, राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड स्वाती थोरात यांची उपस्थिती होती..ज्या काळात महिलांना शिक्षण घेणे अशक्य होते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी कर्मठांकडून होणारा शेण, दगड, चिखल यांचा मारा सहन करून मुलींना शिक्षण देण्याचे असाध्य कार्य यशस्वी केले. त्यांनी त्यांच्या कवीतांच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कुटुंबाचा उद्धार करायचा असेल तर स्त्रियांनी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे त्या ठासून सांगत. महिलांचे होणारे शोषण वेगवेगळ्या क्षेत्रात अत्याचार सहन न करता रणरागिणी सारखे आधुनिक कल्पना चावला ,सुनिता विल्यम्स, मीरा बोरवणकर, यांच्या सारखे कर्तृत्व सिद्ध करुन शिक्षण, आरोग्य ,उद्योग ,प्रशासकीय क्षेत्रात नाव उंचावून आई वडिलांचे नाव रोशन करुन समाजात आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन शेतमजूर युनियन लालबावटाचे जिल्हा सचिव काँ सचिन थ

जि.प.प्रा शा पाटोदा येथे बालिका दिन व सावीत्रीबाई फुले जंयती उत्साहात साजरी

Image
परतूर (हनूमंत दंवडे)आज  दि 3 रोजी जि .प प्रा शा पाटोदा येथे बालिका दिन उत्साहात  साजरा करण्यात आला.  सावित्री बाई यांच्या ओव्या , भाषणे, आणि गीत गाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्री बाई च्या वेशभूषा धारण करूण क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांची  आत्मकथा मांडली .           या  प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक   गणेश अंभुरे यांनी स्त्री शिक्षण आणि सावित्री बाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन काटे सरांनी केले              श्रीमती कुलकर्णी सुचिता यांनी सावित्री बाई वर स्वलिखित कविता व गीत सादर केले.           तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या  सदस्या सौ अनिता शाहूराव मुंढे यांनी सावित्री बाईवर एक प्रेरणागीत सादर केले.            बालिका दिनाचा कार्यक्रमासाठी कैलास जाधव सर व श्रीमती स्वप्ना गोदबोले यांनी परीश्रम घेतले.               या कार्यक्रमा करीता अंगणवाडी कर्मचारी नलिनी कुलकर्णी, वृंदावणी देशमुख व कालिंदा गायकवाड व सर्व अंगणवाडी मदतनीस यांनी सहकार्य केले        या जंयती साठी शाळेती सर्व शिक्षक वृंद व वीधार्थी उपस्थीत होते

सामाजिक उपक्रम राबवत परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन वह्या वाटप....!

Image
परतूर/प्रतिनिधी:- हनुमंत दवंडे तालुक्यातील वरफळ येथील जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट व परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे निमित्त साधून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू  विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. परिवर्तन युवा ग्रुपचे संचालक योगेश खंडागळे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले याला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट यांच्या मार्फत शालेय साहित्य उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन आणि वह्या चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात  सम्राट अशोक नगर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट, सरपंच नदीम पटेल,ग्रामसेवक श्री राऊत,शाकेर मापेगावकर,ग्रामपंचायत सदस्य उद्धव गोरे,सुभाष खंड

शेतकरी क्रांती सेनेच्या पदाधिकारी नियुक्त्या

Image
:मंठा(सुभाष वायाळ) शेतकरी क्रांती सेना च्या माध्यमातुन शेतकरी हिताचे कामं आपण राबवणार आसुन येत्या काळात राज्यात सर्वात मोठी शेतकरी चळवळ उभी करणार आसल्याचे शेतकरी क्रांती सेना च्या पदाधिकार्यांनी म्हंटले आहे. यामध्ये शेतकरी क्रांती सेना युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी विष्णु जगणराव काकडे तर शेतकरी क्रांती सेना युवक आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदि सचिन दारासिंग जाधव यांची नीयुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकार्यांनी आता शेतकरी चळवळीचा मार्ग स्विकारुन शेतकरी हितासाठी लढा द्यावा आसे नियुक्तीपत्रात शेतकरी क्रांती सेनाचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. शेतकरी परीषद, ऊस परीषद, कापुस परीषद व शेतकरी हितासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा संकल्प नवनिर्वाचीत पदाधिकारी यांनी केला आहे‌. शेतकरी हितासाठी कोणतीही तडजोड न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे‌. आसे नियुक्तीपत्रात संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. यावेळी शेतकरी क्रांती सेना युवक आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, निकेश चव्हाण, राजु पवार आदी उपस्थित होते.