गुरुजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर सांभाळा.. -माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे : शंभू महादेव विद्यामंदिरात १२ वीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण नि रोप


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 शाळा-महाविद्यालयात शिकत असताना गुरुजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर सांभाळा असे प्रतिपादन परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी केले.
    तालुक्यातील वाटूर येथील शंभू महादेव विद्या मंदिरच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्यानिरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.अदबने हे होते.
      या प्रसंगी बोलताना डाॅ.भगवान दिरंगे म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर खरे संस्कार होत असतात. पुस्तकातील ज्ञानाबरोबर जीवन जगण्यासाठी आवश्यक ते मूल्य शिक्षण शाळेत मिळते.त्या दृष्टीने शंभू महादेव विद्या मंदिरातील विद्यार्थी भाग्यवान आहेत. या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवनात आवश्यक असणारी मूल्ये शिकवली, या विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी शिस्त तर वाखाणण्याजोगी आहे. गुरूजणांनी दिलेली संस्काराची शिदोरी पुढील आयुष्यात कामी येत असते. असे ते शेवटी म्हणाले.
        अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डी.डी.अदबने म्हणाले की,शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झाला पाहिजे. अभ्यासाबरोबरच जीवनात शिस्तीलाही तेवढेच महत्त्व आहे. आमच्या विद्यालयात शासनाच्या आदेशानुसार आणि कोरोना नियमांचे पालन करून अध्यापनाचे कार्य करण्यात आले. 
या काळात शिक्षकांनी केलेले कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आहे.तसेच विद्यार्थ्यांनीही सर्व नियम पाळून सहकार्य केले. विद्यार्थ्यांना शाळेत मिळालेल्या ज्ञानाचा आणि संस्काराचा निश्चितच लाभ होईल.परीक्षेसाठी आणि भावी जीवनासाठी विद्यार्थ्यांप्रती शुभेच्छा व्यक्त करून प्राचार्य अदबने यांनी परीक्षेच्या नियमांबाबत माहिती दिली.
    प्रा.कार्ले , प्रा.लिपणे, प्राध्यापिका परभणकर मॅडम यांनीही १२ वी परीक्षेची तयारी कशी करावी,परीक्षेच्या काळात अभ्यास कसा करावा, तणावमुक्त राहून परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.
   या प्रसंगी व्यासपीठावर प्रा.मिसाळ, प्रा.आढे, प्रा.हजारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन परभणकर मॅडम यांनी केले तर आभार प्रकटीकरण प्रा.राठोड यांनी केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती