अंबा वि वि का सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीराम बोंनगे तर व्हाईस चेअरमन पदी सुनील झिंजाडे

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
     आंबा तालुका परतुर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर भारतीय जनता पार्टीचे श्रीराम बोंनगे यांची चेअरमन म्हणून तर व्हाईस चेअरमन म्हणून सुनील झिंजाडे यांची निवड करण्यात आली या सेवा सहकारी सोसायटीमध्ये भारतीय जनता पार्टीने वर्चस्व राखत तेरापैकी तेरा जागा जिंकल्या होत्या या पार्श्वभूमीवर आज झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध श्रीराम बोणगे यांची चेअरमन म्हणून तर सुनील झिंजाडे यांची व्हॉइस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली या निवडीबद्दल राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आंबा गावचे सरपंच मेराज खतीब प्रशांत बोनगे रामजी कोरडे कृष्णा भदरगे, रघुनाथ बोनगे, रमेश बोनगे सुनील बोंनगे, सोनू खतीब रमेश बोनगे रविद्र झिजाडे अंकुश बोनगे सुनिल बोनगे विलास डोईफोडे रोहिदास बोनगे विठ्ठल बोनगे रंगनाथ तायडे कैलास बोनगे आदींनी अभिनंदन केले आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान