अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,शासनाच्या आदेशाची वाट न पाहता आपत्ती व्यवस्थापननुसार अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करा मदत द्यायची किंवा नाही ते सरकार ठरवेल - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला सूचना


परतूर(प्रतिनिधी)

मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सह इतर पिके पिवळी पडत असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने देखील शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

अतिवृष्टी गारपीट ढगफुटी भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सरकारने सजग राहून तात्काळ पंचनामे करणे बाबत आदेशित करणे आवश्यक आहे परंतु महा विकास आघाडी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले नाहीत त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही ही बाब भाजपा किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनानुसार शासनाच्या आदेशाची वाट न पाहता जिल्हाधिकारी स्तरावर संबंधित अतिवृष्टी ग्रस्त भागाचे पंचनामे करणेबाबत संबंधित तहसीलदारांना सूचना करण्यात यावी. "शेतकऱ्यांना मदत करायची किंवा नाही ते सरकार ठरवेल तुम्ही पंचनामे तात्काळ करा" अशी सूचना देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला केली आहे

*भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष अंकुशराव बोबडे, जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके, दारासिंग चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब मोरे, नारायण काकडे, रामदास घोंगडे, मंठा तालुका अध्यक्ष अशोकराव वायाळ, जिल्हा चिटणीस केशव येऊल यांच्यासह शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करण्याचे अद्याप शासनाने आदेश दिले नाहीत ही बाब निदर्शनास आणून दिली होती*

जालना जिल्ह्यातील मंठा परतुर घनसावंगी जालना ग्रामीण अंबड बदनापुर यासह भोकरदन जाफराबाद तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे ग्रामीण भागात काही रस्त्यांवरील पूल वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे तसेच झाडे उन्मळून पडल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे तसेच गावातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर आपत्कालीन परिस्थितीत पंचनामे करणेबाबत सर्व तहसीलदारांना सूचना करावी व शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासकीय पातळीवर पंचनामे करणेबाबत पुढाकार घ्यावा अशी सूचना लोणीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना केली आहे

आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी स्तरावर निर्णय घेऊन पंचनामे करता येऊ शकतात त्यासाठी शासनाच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही मागील पंचवार्षिक मध्ये तत्कालीन पालकमंत्री पदावर असताना दुष्काळ अतिवृष्टी बोंडआळी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित आपत्तीचे पंचनामे करणेबाबत अधिकार असतात असेही लोणीकर यावेळी म्हणाले अनेक तहसीलदारांकडे पंचनामे बाबत शेतकऱ्यांनी मागणी केली असता आम्हाला अद्याप पंचनामे करण्याचे आदेश नाहीत अशा प्रकारची माहिती तहसिलदारांकडून दिली जात आहे त्या पार्श्वभूमीवर लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शासनाच्या आदेशाची वाट न पाहण्याची सूचना केली.
================
मागील पंचवार्षिक मध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर पालकमंत्री असताना अतिवृष्टी गारपीट ढगफुटी यासारखे प्रकार झाल्यानंतर स्वतः तत्कालीन पालकमंत्री म्हणून तासाभरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत होते परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारचे कोणत्याही प्रकारचे शासकीय आणि प्रशासकीय बाबींवर नियंत्रण राहिले नसून शेतकऱ्यांच्या हाल-अपेष्टा कमी होण्यापेक्षा अधिकाधिक वाढतच आहेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांची आज आठवण होत आहे
*- श्री. बाबासाहेब पाटील मोरे*
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा जालना
================

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती