Posts

Showing posts from January, 2023

परतुर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती जाहीर अध्यक्षपदी विष्णू मचाले,सचिवपदी रशीद बागवान

Image
       परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी प्रतिवर्षा प्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे.नवनिर्वाचीत समितीमध्ये अध्यक्षपदी विष्णू मचाले,सचिवपदी रशीद बागवान याची निवड करण्यात आली.     परतूर येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी (ता.२९) रोजी शिवजन्मोत्सव समितीची निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे एकमताने ठरविण्यात आले.समितीचे उपाध्यक्षपदी विजय यादव,राहुल कदम ,कार्याध्यक्षपदी संदीप पाचारे, कोषाध्यक्षपदी शुभम कठोरे तर सहसचिव पदी सचिन माकोडे याचा समावेश आहे.यावेळी शिवसंग्राम चे तालुका अध्यक्ष सचीन खरात,  रमेश सोळंके ,पांडुरंग नवल, महेश नळगे, संदीप जगताप, विनायक भिसे, विकास खरात, आशिष गारकर,भारत सवणे, विशाल पवार ,श्याम शिंदे, सिद्धेश्वर लहाने,शिवा पवार, अशोक तनपुरे, लक्ष्मण भिलारे, आदी उपस्थित होते.

Pcm च्या परतूर तालूका अध्यक्ष पदी प्रभाकर प्रधान कैलाश चव्हाण तर सचिव

 

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकता आणि राष्ट्रभक्तिची भावना वाढण्यास मदत – आ. लोणीकर,परतूर पत्रकार समन्वय समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे    सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कृति संवर्धनाचे कार्य केले जाते. अनेक वर्षांपासूनचा सांस्कृतिक ठेवा एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचे काम अशा कार्यक्रमांमधून केले जाते. लोकांमध्ये राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचे काम सांस्कृतिक कार्यक्रम करत असल्याचे मत माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले आहे.        प्रजासत्ताक दिनानिमित्त परतूर पत्रकार समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक आ. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. माजी आ. सुरेशकुमार जेथलिया,बाळसाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मोहनकुमार अग्रवाल, एसडीएम भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, डीवायएसपी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड, युवा सेना समन्वयक महेश नळगे, विजय नाना राखे, एकनाथ दहिवाळ, प्रकाश चव्हाण, इजरान कुरेशी, आदींची यावेळी प्रमुख उपस्थ

श्री समर्थ विद्यालयात जागतिक सुर्यनमस्कार दिन साजरा.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  अठ्ठावीस जानेवारी. हा दिवस संपुर्ण जगात जागतिक सुर्यनमस्कार दिन म्हणुन साजरा केल्या जातो.  शासन निर्देशाप्रमाणे आज श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा [ माव ] या प्रशालेत. मोठ्या ऊत्साहात सुर्यनमस्कार करुन हा दिवस साजरा करण्यात आला.  सुर्यनमस्कार हा सर्वांगीन व्यायामाचा शास्त्रशुध्द प्रकार असुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज सुर्यनमस्कार घालुन शरीर बळकट व मजबुत करणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले.   सुर्य नमस्काराच्या विविध पायर्या विद्यार्थ्यांना सहशिक्षक श्री आबासाहेब गाडेकर व श्री भास्कर कुळकर्णी यांनी समजुन सांगितल्या.   तत्पुर्वी कार्यक्रमाचे ऊद्घाटन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री प्रभाकर कादे यांचे हस्ते सरस्वती पुजण करुन करण्यात आले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री रोकडे , सातपुते , खवल , जोशी , खरात , वखरे या कर्मचारी बंधुनी परीश्रम केले.

येनोरा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतुर तालुक्यातील मौजे येनोरा येथे ग्रामपंचायतच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर घेण्यात आले. सदरील शिबिरात 265 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदरील शिबिरात 32 मोतीबिंदू नेत्र रुग्णांना सरकारी दवाखाना आष्टी येथे दिनांक 29/1/2023 रोजी तपासणी करिता बोलवण्यात आले . मोतीबिंदू असलेल्या रुग्णावर दिनांक 8/02/2023 रोजी जालना येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील. सरकारी दवाखाना येथील डोळ्याचे डॉ. शिवाजी पोकळे यांनी नेत्र तपासणी केली सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी येणोरा येथील सरपंच सौ. कांचन उद्धव जोगदंड व ग्रामपंचायत उपसरपंच अरुणा तौर, इतर प्रकाश बोंबले, अंगदराव भुंबर, सर्जेराव घोडे,भारत भुंबर, बंडेराव भुंबर, सर्जेराव घोडे, लक्ष्मण भुंबर, इतर पांडुरंग नवल, एकनाथ भुंबर , मनोज भुम्बर, गौतम साळवे,माऊली साळवे, पिणू भुंबर ,नामदेव तौर, भागवत भुंबर, ज्ञानेश्वर तौर,व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

परीक्षा पे चर्चा अंतर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेचे करण्यात आले आमदार लोणीकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण , तणावमुक्तीसाठी मोदीजींचे विचार प्रेरणादायी-माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,तालुक्यातील 22 शाळांचे विद्यार्थी शिक्षक होते यावेळी उपस्थित

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत परतुर तालुक्यात ही हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये परतूर येथील नवोदय विद्यालयांमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम संपन्न झाला    यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परीक्षा पे चर्चा विषयांतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमधील प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विजेत्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र रोख बक्षीस देण्यात आले     सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी पालक आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्रमुग्ध होऊन ऐकला या कार्यक्रमानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करतेवेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परीक्षाची धास्ती घेऊन अनेक विद्यार्थी आत्महत्या करत असतात मानसिक दडपणाखाली असतात त्यामुळे आज मोदीजींनी विद्यार्थ्यांसाठी

आम्हावरी धरीलीया राग काय तुझे सांग केले आम्ही -भ प विष्णू महाराज देशमूख

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटिल      अध्यात्मामध्ये शंकराने जाळले म्हणजे ज्ञानाने जाळले ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि भगवान श्रीकृष्णाने जाळले म्हणजे विरहाने जाळले काम कधी कधी ज्ञानाने ही नष्ट होत नाही तो भक्तीन पळून जातो असे प्रतिपादन ह भ प विष्णू महाराज देशमूख यानी तळणी येथे काल्याची प्रसंगी केले तळणी येथे चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता काल काल्याने झाली संत नामदेव महाराज यांच्या आम्हावरी धरीलीया राग काय तुझे सांग केले आम्ही या अभंगावर निरूपण केले  भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी रती कामदेव गेले कामदेवाने जेव्हा आपल्या पंच बाणाने समाधी भंग केली महादेवानी तीसरा डोळा उघडून कामदेवाला जाळले एकदा जळाल्यानंतर ही कामदेव सावधान होत नाही मग रास क्रीडेतून श्रीकृष्णाच्या ह्दयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो पण ते कामदेवाला शक्य झाले नाही कारण कृष्ण हा निष्काम निराळा आहे मग कामदेवाने गोपीकेच्या ह्दयात प्रवेश केला कृष्णा ने जेव्हा ही घटना जाणली . कृष्ण जाण्याचे हे खरे कारण आहे कृष्ण अंतरधाम होण्याचे हे कारण काम आला होता आणि काम हा अग्नी आहे आणि या अग्नीला जाळण्

आ.लोणीकरांचे हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप.

Image
 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे द्वारा आयोजित " मन की बात ", या ऊपक्रमाअंतर्गत " परीक्षा पे चर्चा " या संदर्भात विवीध विषयावार शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा[ माव ] या शाळेतुन या चित्रकला स्पर्धेसाठी मोठ्या संखेने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी स्पर्धकांमधुन प्रथम तिन विजयी स्पर्धकांना माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचे हस्ते जवाहर नवोदय विद्यालय आंबा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षिस देवुन सन्मानीत करण्यात आले. या स्पर्धेत शेख सानिया नबी, प्रतिक्षा गायकवाड , करण बोराडे या स्पर्धकांनी यश मिळवले.  शासनाच्या विवीध शैक्षणिक ऊपक्रमात श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो या बद्दल मा. आमदार लोणीकर साहेबांनी समाधान व्यक्त करुन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर व सर्व सहकार्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख श्री शंकरराव थोटे गट समन्वायक कल्याणरावा बागल यांनी ही समर्थ टिमचे अभिनंदन

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना (खुर्द) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.....

Image
 सातोना प्रतिनिधी पांडुरंग शिंदे   दि.२६ जानेवारी २०२३ रोजी यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व यश प्रायमरी इंग्लिश स्कूल सातोना येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष  बालासाहेब (काका) आकात यांची तसेच प्रमूख उपस्थिती म्हणून इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. सुरुवातीला दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. सचिनराव आकात यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते यशोदर्पण चे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आले. वर्ग नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत तसेच वर्ग पहिलीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर  गित सादर केले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक  जयराम खंदारे यांनी केले        त्यानंतर  देशभक्तीपर गीत नृत्य सादर करण्यात आले व विद्यार्थी भाषणे सादर करण्यात आले  सहशिक्षक  गणेश गोरे यांनीही अनमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब आकात यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी यश क्रीडा महोत्सव डिसेंबर- २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या विविध क्रिडाप्रकारात सर

रक्ताचा वारसा चालविण्या पेक्षा विचाराचा वारसा चलवा - हभप अशोक महाराज ईदगे

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील      तळणी येथे चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताहमध्ये आजच्या पाचव्या दिवशी ह भ प अशोक महारज ईदगे यानी पाचव्या दिवशी पुष्प गुफले जगद गूरू तुकाराम महाराज यांच्या बळीवंत आम्ही समर्थाचे दास घातली या कास कळीकाळासी तेथे माणसाचा कोण आला पाड उल्लोघनी जड गेलो आधी  या अभंगावर निरूपण केले     रक्ताचा वारसा चालविण्या पेक्षा विचाराचा वारसा चालंवणे सध्याच्या युगात महत्वाचे आहे मनुष्याला जोपर्यत्न ध्येयाचे वेड लागणार नाही तोपर्यन्त तो यशस्वी होणार नाही जगदगूरू तुकाराम महाराजानी दाश्यत्वाचा मार्ग स्वीकाराला देवाला शरण गेल्याशीवाय तो प्राप्त होत नाही महाराजांनी पांडूरंगाच्या भक्तीत स्वःत ला वाहवून घेतले सर्वसामान्य भक्त सुध्दा जर देवाला जरी शरण गेले तरी त्याच्या कठीण काळात तो ऊभा राहतो मनुष्याच्या जीवनात दोन दुःख आहेत एक जन्माचे आणि दुसरे मरणाचे माता आणि सस्कार हे जवळचे नाते आहेत ते नाते पित्याच्या बाबतीत होऊ शकत नाही कारण पित्याचे आयुष्य हे जोडा जोडीचे आयुष्य असते आज काल प्रत्येक मनुष्य हा सर्व सुख सोई युक्त परीपक्क असला तरी मुत्युचे भय हे कायमचे आहे ज्ञ

दैठना खुर्द येथील ग्रामसेवक गावात फिरकेना

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे  तालुक्यातील दैठना खुर्द येथील ग्रामसेवक आर.बी मेहत्रे हे गावात गेल्या तीन आठवड्या पासून आले नसल्या गावकर्‍याची कामे खोळंबल्याने ग्रामस्थामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी गावचा सचिव म्हणून ग्रामसेवक यांची नियुक्ती केली आहे. मात्र ग्रामसेवक गावाच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावातच नसल्याने शासनाच्या उद्देशाला हरताळ फासण्याची काम ग्रामसेवक यांच्याकडून होत असतांना वरिष्ठ मात्र बघ्याची भूमिका घेऊन ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याने गावाच्या समस्येकडे तसेच नागरिकांच्या खोळंबलेल्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हम करेसो कायद्या प्रमाणे वागत असल्याने याला लगाम घालण्याची मागणी होत आहे. शासनाकडून गाव विकास करण्यासाठी थेट ग्रामपंचायतच्या खात्यात निधी वर्ग करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न होत असतांना शासन आणि लोकप्रतिनिधी यांचा दुवा म्हणून काम करणारे ग्रामसेवक हे विकास कामात आणि नागरिकांच्या कामात गावात न येता खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने अश्या ग्रामसेवकावर मुख्य कार्यकारी अधिकारी

निष्ठा व्यंग आणि कर्म कुशलता यांची अशी उंच शिडी तयार करा की असीम आकाशाची सीमा देखील संपून जाईल" - आमदार बबनराव लोणीकर ,उत्तुंग यश संपादन करण्याकरिता परीक्षेला उत्सव समजून सामोरे जा - आमदार बबनराव लोणीकर ,परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 99 परतूर विधानसभा मतदार संघातील विविध विद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण

Image
सहभाग प्रतिनिधी परतूर कैलाश  चव्हाण  दिनांक 24 जानेवारी 2023 विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देता यावा आणि परीक्षा देण्यापूर्वी वातावरण तणावरहित करता यावे या उद्देशाने “परीक्षा पे चर्चा 2023” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाष चंद्र बोस “पराक्रम दिना”निमित्त आज एका देशव्यापी चित्रकला स्पर्धेचे आयोजन देशभरात शासकीय स्तरावरून सर्व विद्यालयात व महाविद्यालयात दिनांक 24 आणी 25 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज 24 जानेवारी 2023 रोजी मंठा परतूर व जालना तालुक्यात सर्वत्र विद्यालय व महाविद्यालयात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.          यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री बबनराव लोणीकर यांनी मतदार संघातील परतुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतुर तालुका परतुर जिल्हा जालना, योगानंद माध्यमिक विद्यालय परतुर तालुका परतुर जिल्हा जालना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आंबा तालुका परतुर जिल्

दैठना खुर्दच्या सरकारी विहीरीवरचा पाईप कापून नुकसान

 परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे  तालुक्यातील दैठना खुर्द येथील गावाला पाणीपुरवठा करणार्‍या सरकारी विहिरीवरील मोटरचा पाइप कापून नुकसान केल्या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच सुनिल तायडे यांनी आष्टी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि १४ जानेवारी रोजी २०२३ रोजी ग्रामपंचायत ग्रामपंचायत मार्फत गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून नुकसान केले आहे. तसेच दुसर्‍यांदा दि. २० जानेवारी रोजी रात्री ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनचा मोटारचा पाईप कुणीतरी अज्ञाताने पाईप कापुन विहीरीत टाकुन देऊन दहा हजार रुपयाचे नुकसान केले आहे. या प्रकरणी सरपंच सुनिल तायडे यांच्या फिर्‍यादीवरुण दि २१ जानेवारी रोजी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

साईनाथ यात्रेचा शुभारंभ यात्राकाळात दिंडी मार्ग व परिसरातील विद्युत दिवे चालू करावे - मा.आ. जेथलिया

Image
 परतूर प्रतिनीध कैलाश चव्हाण                                       गेल्या 64 वर्षाची परंपरा असलेल्या परतूर येथील साईबाबा यात्रेला दोन वर्षा च्या कोरोनाच्या काळातील खंडा नंतर यंदा उत्साहात सुरवात झाली, आज दिनांक 24 रोजी मा.आ. सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे जालना जिल्हा युवक अध्यक्ष कपिल आकात, वैजनाथ बागल,बाबुराव हिवाळे, रहेमूसेठ कुरेशी, राजेश खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्तीतीत जागा वाटपाचे उदघाटन संपन्न झाले        या वेळी मोठ्या संख्येने परिसरातील व्यापारी, नागरिकांची उपस्तीथी होती. उद्या पासून या यात्रेला सुरवात होत असून सदरलील यात्रा 5 फेबुरवारी पर्यंत चालू राहणार असून महाप्रसादाने याची सांगता होणार असल्याची साईनाथ मंदिराचे पुजारी रामेश्वर वंगुर यांनी दिली. यावेळी आपल्या मनोगतात मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की दोन वर्षाच्या खंडा नंतर चालू होणाऱ्या या यात्रेला यंदा जास्तच महत्व येणार असून यावेळी यात्रेत पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक, यात्रेकरू हजेरी लावणार, याबाबत मी पालिका प्रशासन तथा स्वच्छता विभागाला सूचना देत यात्रेचा परिसर स्वच्छ करून घेतला, योगा योगा

जगात सर्वात श्रेष्ठ वारकरी संप्रदाय आहे तो जपला पाहिजे..- विलास महाराज गेजगे..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे =परतूर तालुक्यातील येनोरा येथे दिनांक 16 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ची सोमवारी काल्याच्या कीर्तनाचे सांगता झाली. महान संत शिरोमणी यांच्या चार चरणाचा अभंग घेऊन महाराजांनी कीर्तन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आजची वारकरी संप्रदायची परंपरा ज्येष्ठ आहे वारकऱ्यांनी संताचे विचार जो पासत पुढच्या पिढीला संग्रहित ते विचार ठेवायचा आहे. संताचे विचार घराघरा पर्यंत पोहचवणे हे सर्व वारकरी धारकरी यांची जबाबदारी आहे. माणसाने आजच्या काळात माणसाने सैरावैरा धावू नये .         या विषयी चिंतन करणे गरजेचे आहे. या कीर्तनाला भाविक भक्तां चा मोठा प्रतिसाद मिळाला या कीर्तन सोहळ्याला सर्व भाविक भक्त वारकरी संप्रदाय, गायक वादक, मृदुंग वादक, काकडा नेतृत्व, पारायण नेतृत्व, गाथा भजन, हरिपाठ नेतृत्व, व सर्व भजनी मंडळ व गावकरी मंडळी उपस्थित होती.

आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री खिशाला पेन नसणारा 18 महिने घरात बसून राहणारा होता- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे=बावनकुळे यांच्यामुळे जिल्ह्यात विजेचे जाळे विनता आले- माजी मंत्री बबनराव लोणीकर=युवा मोर्चा ने चार लाख धन्यवाद मोदींच्या पत्रांचे संकलन केले युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर ,परतुर येथील भाजपा युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स मेळाव्यात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरांचा करण्यात आला नागरी सत्कार

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल करताना कधीही खिशाला पेन नसणारा मुख्यमंत्री व 18 महिने घरात बसून राहणारा मुख्यमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्याचा हा विक्रम इतिहासात नोंदवला जाईल अशा शब्दात टीका केली ते परतुर येथे भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा वॉरियर्स मेळाव्या प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील बसवराज मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती      पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारने विकासाची चाके थांबवली होती मात्र राज्यात भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार येताच सर्वसामान्य जनतेच्या कामांना विकास कामांना गती आल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले  पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी पाण

बहु आवडेसी जीवापासोनीया कानडीया विठोबा कानडीया वीसी हभप-सोमनाथ महाराज कऱ्हाळे

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटिल      तळणी येथील अंखड हरीनाम सप्ताहात आज पहील्या दिवशीचे किर्तन पूष्प ह भ प सोमनाथ महाराज कऱ्हाळे यानी गुंफले     संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय याच्या बहु आवडेसी जीवापासोनीया कानडीया विठोबा कानडीया या अभंगावर चितंन केले या निरुपणा मध्ये विश्ववंदनीय ज्ञानेश्वर महाराज देवाचे महत्व विषद करतात मला देव आवडला पण तो किती आवडला आवडची पराकाष्टा करणारे ज्ञानोबाराय सांगतात देवा तुझी शपथ घेऊन सागतो तुझी आण वाहीन गा पण देवा तु मला किती आवडतो तर बहु आवडीसी जीवा पासोनीया  प्रत्येकाला ज्याचे त्याचे शरीर प्रिय असते शरीरावर प्रेम करणारी आपण मानसे आहोत शरीराची ठेवण व्यवस्थीत ठेवण्यासाठी आज कालचा तरुण किती तरी तास सलून मध्ये व्यर्थ घालवत आहे मनुष्याला शरीरापेक्षा जीव महत्वाचा वाटतो पण हीच गोष्ट संतांच्या बाबतीत होत नाही खास करुन ज्ञानोबारांय म्हणतात पांडूरगा मला जीवापेक्षा तु महत्वाचा आहे तु मला जास्त आवडतो जीवीचीया जीवा प्रेमभावाचीया भावा तुज वाचुनी केशवा आनु ना आवडे    मनुष्याला देव आवडण्या आधी देव मान्य असावा लागतो मान्य असणारा देव समजावा लागतो व समजलेला देव भेटावा लागतो म

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात जागतिक हिंदी दिवस साजरा

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय हिंदी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  प्राचार्य डॉ. भारत खंदारे  होते         या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते प्रा. बद्रीनारायण बिडवे यांनी हिंदी भाषेचा वापर आणि गरज याविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, भारतातील सर्व जाती-धर्मांना एकत्र ठेवण्याचे महत्त्वाचे काम हिंदी भाषा करते. त्याच वेळी, जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांमध्ये आपली मूल्ये आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करत आहे. हिंदी ही लवकरच राष्ट्रभाषेतून जागतिक भाषा होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समारंभाचे प्रस्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.विजयानंद गंगावणे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जागतिक हिंदी दिन कधी आणि का साजरा केला जातो या विषयावर आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की भारतात 10 जानेवारी 1975 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. परदेशात गेलेल्या भारतीयांना त्यांच्या देशाशी जोडण्याचा मूळ उद्देश होता. ही परिषद दरवर्षी 10 जानेवारी रोजी जगातील विविध देशांमध्ये भारतीय

युवकानी राष्ट्रबाधनी साठी पुढाकार घेऊन ग्रामीण जिवन आत्मसात करावे - प्रार्याय डॉ भारत खदारे

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतुर यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिरचे उद्घाटन झाले   या प्रसंगी डॉ खंदारे बोलत होते पुढे बोलताना म्हणाले कि आपल्या देशातील ग्रामीण जिवन हे स्वालबी असून बहुतेक जण हे आपल्या कर्तेतुवावर जीनव जगत आहेत या उलट शहरी भागातील नागरिका दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे सुखी जीवनासाठी ग्रामीण भागात राहाने उत्तम आहे राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराची थीम युवकाचा ध्यास ग्राम शहर विकास ही घेऊन विद्यार्थी मैजे दैठना खुर्द तालुका परतुर या गावी सात दिवस विशेष निवासी शिबिरामध्ये सहभागी झाले या शिबिराचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ . माणिकराव थिटे , स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित आणि अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ . भारत खंदारे हे होते तसेच डॉ . भारत धोत्रे, प्रा . डॉ . सुभाष वाघमारे तर गावातील प्रथम नागरिक गावचे सरपंच श्री सुनील सुदामराव तायडे , श्री राजाभाऊ काटकर

पिंपरखेडा येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 13 पैकी 10 सदस्य बीन वीरोध

Image
परतूर प्रतिनिध कैलाश चव्हाण        दि. 18 रोजी  पिंपरखेडा ता.परतूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 13 पैकी 10 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल भैया आकात यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.     यावेळी नवनिर्वाचित सदस्य श्री.पाराजी बंडू आप्पा मुळे,सौ.पद्माबाई पाराजी मुळे,सुखदेव किशनराव अंभिरे,शेख इब्राहिम शे.याशिन,रोहिदास आण्णासाहेब गरड,चंद्रप्रकाश नानाभाऊ सोम्मारे,अहमद खां.नसीर खां.पठाण,प्रल्हाद सखाराम सागुते,काशिनाथ सुंदर उकांडे यांची निवड झाली.यावेळी सोबत रामभाऊ मुळे,हुसैन पठाण,योगेश मुळे,मेहमूद सय्यद,निवृत्त्ती सोम्मारे,कैलाश मुळे,विठ्ठल सागुते,आंशिराम सोम्मारे,सुंदर उकांडे,अच्युत मुळे,गमाजी गरड यांची उपस्थिती होती.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेणारे आ.विक्रम काळे यांना निवडून द्या आमदार सतीश चव्हाण यांचे आवाहन

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      आमदार विक्रम काळे शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडत असत. सरकार आपले असो की विरोधी पक्षाचे असो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात ते नेहमीच आक्रमक भूमिका घ्यायचे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणार्‍या आ.विक्रम काळे यांना पुन्हा विधी मंडळात मराठवाड्यातील शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी होत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आज (दि.१६) मंठा व परतूर येथे आ.सतीश चव्हाण यांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित सभेत बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही शासनस्तरावर जोमाने पाठपूरावा सुरू केला. मात्र कोरोनासारख्या नव्या संकटाला सरकारला सामोरे जावे लागले. मात्र अशाही परिस्थितीत 23 जून 2022 रोजी राज्याचे तत्कालीन उ

दैठणा खुर्द अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उदंड प्रतिसाद,हभप रुपालीताई सवने महाराज यांच्या संगीत भागवत कथेला जनसमुदाय उसळला

Image
 परतूर कैलाश चव्हाण       तालूक्यातील दैठणा खुर्द येथे ब्रम्हनिष्ठ गंगा भारती महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि . १३ जानेवारी ते २० जानेवारी करण्यात आलेले आहे . या अखंड नाम सप्ताहासोबत सुप्रसिध्द किर्तनकार हभप रुपालीताई रामेश्वर सवने महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचेही आयोजन केल्याने या सोहळ्याला आणखी झळाळी प्राप्त झालेली आहे. भाविकभक्तांचा मोठा प्रतिसाद भागवत कथेला मिळत आहे.   या कीर्तन सोहळ्यात दि . १७ जानेवारी रोजी हभप . ज्ञाने्श्वर महाराज सेलूदकर भोकरदन , दि १८ जानेवारी रोजी किर्तन केशरी पांडुरंग महाराज उगले पाथरी , १९ जानेवारी रोजी हभप शिवा महाराज बावस्कर बुलढाणा यांचे किर्तनाचा लाभ रात्री ९ ते ११ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मोरश्श्वर संस्थान दैठणा खुर्द यांच्याकडुन करण्यात आले आहे. तसेच प्रख्यात सुप्रसिद्ध किर्तनकार हभप रुपालीताई सवने महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथेचे आयोजन दररोज सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत करण्यात आलेले आहे . याचाही हजारो भाविक भक्त महिला कथा श्रवनचा आनंद घेत आहेत. दि . २० जा

अबॅकस स्पर्धेमध्ये विषेश प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Image
प्रतिनिधी सातोना/ पांडुरंग शिंदे    श्री गजानन जी चॅम्प अबॅकस क्लासेस (सातोना खु) येथे.  नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेमध्ये विषेश प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य.  सत्कार करण्यात आला.      गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  क.नी. टोणपे सर, संपत आप्पा आकात तर अध्यक्ष म्हणून संचालिका दुर्गा आकात मॅडम, संतोष सर, गायकवाड सर विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. राज्यस्तरीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेमध्ये प्रामुख्याने 1) दुष्यंत दीपक डहाळे (जी चॅम्प सुपरस्टार फर्स्ट लेवल)2) आराध्या अर्जुन आकात (जी चॅम्प सुपरस्टार जूनियर लेवल) 3) शेख हाशिम शेख मुस्तकुद्दीन (स्टेट लेवल फर्स्ट रँक)4) अपूर्वा अर्जुन आकात ( स्टेट लेवल फर्स्ट रँक) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले. व इतर 14 विद्यार्थ्यांना सहभागीता प्रमाणपत्र व मेडल प्राप्त झाले. उपस्थित सर्व मान्यवरांनी ट्रॉफी मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच

चिंचोली ग्रामपंचायत सरपंचासह सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश,उस्मानपूर येथीलही कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश , माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  चिंचोली ता परतूर येथील ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला   यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भारतीय जनता पार्टीचा रुमाल व पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी प्रकाश परमेश्वर चव्हाण सरपंच बाजीराव भुजंगराव कातारे उपसरपंच अनंत वशिष्ठ टेकाळे सदस्य गोविंद मदनराव चव्हाण सदस्य दिगंबर सुदामराव चव्हाण सदस्य दिगंबर प्रभाकरराव कातारे सदस्य हरिभाऊ सोळंके सदस्य बाळासाहेब ज्ञानोबा गोरे सदस्य किसन शिवाजी घुगे सदस्य कृष्ण हरिभाऊ चव्हाण सदस्य दामोदर सोळंके कृष्णा कातारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर उस्मानपुर ता परतुर येथील मदन ओमप्रकाश राऊत संजय अंबादास आंबेकर दत्ता नारायण वैद्य किसन भिमराव आंबेकर नवीन शेख चांद सारंगधर राऊत सिद्धेश्वर राऊत हरिभाऊ लक्ष्मण राऊत अमोल किसन आंबेकर नामदेव रमेश वंजारे आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना युवा मोर

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील आष्टी व अकोली येथील पांदण रस्त्यांच्या कामाची माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केली पाहणी,पांदण रस्ते पाहून केले समाधान व्यक्त

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  बागायतदार व कोरडवाहू शेतकऱ्यांना, खऱ्या अर्थाने शेतीत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मशागतीसाठी जाणे येणे करणे अतिशय पानंद रस्त्या मध्ये असलेल्या गुडघाभर चिखलामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र आष्टी व अकोली येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून झालेल्या पाणंद रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले     थेट शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी उत्कृष्ट असे म्हणून रस्त्यावरील काम झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पिकणारी अन्नधान्य सोबतच डाळिंब ,मोसंबी ऊस, केळी ,सिताफळ आदी उत्पादित मालांना शेतकऱ्यांना सहज बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे उस मुख्य पिक आष्टी व परिसरातील शेतकऱ्यांचे असून केवळ, रस्त्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड करता येत नव्हती अनेक फळपिके घेता येत नव्हती अशा परिस्थितीत हे पांदण रस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यांना या पांदण रस्त्याच्या माध्यमातून आपल्या शेतातील फळबाग उसाचे क्षेत्र वाढवता येणार असल्याचे यावेळी आमदार लोणीकर यांनी शेतक

खांडवी व खांडवीवाडी वि.वि. सोसायटीच्या चेअरमन पदी अंकुशराव बरकुले यांची चौथ्यादा तर आसाराम बरकुले यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  खांडवी सह खांडवीवांडी गावच्या संयुक्त सोसायटी चेअरमन पदाच्या निवडनुकीत माझे काकासाहेब अंकुशराव त्र्यंबकराव बरकुले (तात्या ) यांची सलग चौथ्यादा वेळस चेअरमन पदी तर आशीकराव रुस्तुमराव बरकुले यांची पहिल्यादा व्हाईस चेअरमन पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली        यावेळी दोन गावातुन तेरा सदस्य यांची देखिल बिनविरोध निवड करण्यात आली या मध्ये श्री जगननाथ बरकुले, श्री जनार्धानराव बरकुले ,श्री अंकुशराव बरकुले आशोकराव बरकुले श्री आकात लक्ष्मणराव,श्री आसाराम बरकुले श्री सुर्यकात बरकुले ,श्री भिमराव साळवे, श्री चोरघडे किशनराव श्रीमती पौळ कल्पना जितेंद ,श्रीमंती रुखमीनबाई आंबासाहेब श्री दत्ता मारोतीराव हारकळ तालुक्यातील सर्वत मोठी सोसायटी म्हणुन खांडवी सोसायटी कडे पाहिले जाते या सोसायटी मध्ये एकुन दोन गावे असल्याने मतादार संख्या देखिल जास्त आहे त्यामुळे या सोसायटी कडे सर्वचे लक्ष लागुण होते या बिनविरोध निवडीसाठी भाजपाचे रमेशराव भापकर श्री भुंजगराव बरकुले श्री संजयभाऊ अंभुरे मा संरपच विष्णूपंत बरकुले गणेश हारकळ विठ्ठलराव बरकुले दत्ताराव नारायण बरकुले

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटील यांना विजयी करा-माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,12 जानेवारी रोजी उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिक्षक मतदार संघामध्ये शिक्षकांचा योग्य आमदार निवडून न दिल्यामुळे मराठवाड्यातील शिक्षकांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले ते परतूर येथे आयोजित विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी बैठकीमध्ये बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये असून त्यामुळे भारतीय जनता पार्टीने दिलेला चरित्र संपन्न सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार किरण पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित मंठा जालना आणी परतूर येथील शिक्षकांना केले. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शिक्षकाच्या पेन्शनचा प्रश्न असो विनाअनुदानित शाळांचा प्रश्न असो विद्यार्थी गुणवत्तेचा प्रश्न असो या सर्व प्रश्नाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान शिक्षक आमदारांनी कधीच लक्ष दिले नाही ते शिक्षकांचे आमदार नव्हतेच ते तर फक्त राष्ट्रवा

बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख पदी दीपक हिवाळे यांची निवड

Image
* पृरतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण         परतुर येथील कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक दीपक हिवाळे यांची नुकत्याच झालेल्या शिवसेना पक्ष सोहळा कार्यक्रमात माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर प्रमुख पाहुणे जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्याम नाना उढाण, युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे, एँड. अनुराग कपूर, मंठा तालुकाप्रमुख उदयसिंग बोराडे व परतुर तालुका प्रमुख अमोल सुरूंग यांची उपस्थिती होती.       हिवाळे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे कीं ,हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व जालना जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना परतुर शहर प्रमुख पदी आपली निवड करण्यात आलेली आहे. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण या

कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Image
परतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण     सामाजीक कार्यकर्ते ईजरान कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.   त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे,ईज्रान भाई कुरेशी, अर्जुन पाडेवार, गफार सौदागर, विष्णू मुजमुले, पञकार अजय देसाई, रशिद बागवान, मुमताज अन्सारी, शेख, शबीर,यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहनवाज कुरेशी,मलीक कुरेशी, ईसरार खतीब, सलिम काजी,निसार भाई,शेख जलील ,अरबाज तांबोळी, जुनैद कुरेशी,अखिल बिल्डर,शेख गौस, शेख मोईन, सरफराज कायमखाणी, सिराज खतीब,सैयद नोमान,फरहान लाहमदी,शकील कुरेशी, शेख सोनु, शेख अशफाक, ईलियाज कुरेशी, रफीक कुरेशी, शेख फरहान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरफराज कायमखाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन पाडेवार यांनी मानले. -----------------------------    या कास्को बॉल नाईट सर्कल स्पर्धा प्रथम पारितोषिक 11111 रुपये ईजरान कुरेशी यांच्यामार्फत तर व्दितीय पारितोषिक 7777 रुपये सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्या

दहीफळ खंदारे येथे ग्रामीण रुग्नालयात डॉक्टर गैरहजर,तर औषधाची नासधूस

Image
तळणी प्रतिनीधी रवी पाटील     तळणी येथून जवळच असलेल्या दहिफळ खंदारे येथील प्राथमीक आरोग्य केद्रांचा कारभार ग्रामस्थानी . उघडकीस आणला कितेक दिवसाचा औषधीचा साठा रुग्नाना न देता प्राथमीक आरोग्य केंद्रांतील कर्मचार्यानी परस्पर त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकार ग्रामस्थाच्या निदर्शनास आल्यानंतर . या सबंधीत वैद्यकीय अधिकार्यासह दोषी कर्मचार्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थानी जिल्हाधिकार्याना दिले आहे  डॉक्टर याच्या येण्याची वाट पहताण रुग्न दहीफळ खंदारे येथील वैद्यकीय अधी कार्यासह काही कर्मचारी हे आठ आठ दिवस केद्रांवर येत नाही आठ आठ दिवसाच्या स्वाक्षऱ्या एकदाच उपस्थीती रजिष्टवर करण्यात येतात हा प्रकार या आधी सुध्दा दोन ते तीन वेळा ग्रामस्थानी उघडकीस आणला तरी सुध्दा त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही निवासाची व्यवस्था असताना सुध्दा एक दोन कर्मचारी वगळता कोणीच मुख्यालयी . थांबत नाही वैद्यकीय अधिकारी डॉ . पूनम मान्टे या आठवड्यातून एक ते दोन वेळा च जालना येथून . येऊन आठवडयाचा स्वाक्षऱ्या एकदाच . करतात या प्राथमिक आरोग्य केद्राचा कारभार हा रामभरोसे कारभार झाला असुन ग

पत्रकारितेने समाजाला दिशा देण्याचे काम केले - भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांचा सत्कार,संघटनात्मक ५६ जिल्ह्यांमध्ये ४००० पेक्षा अधिक पत्रकारांचा युवा मोर्चाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त सत्कार

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे, समाजाला आरसा दाखविणारे, प्रसंगी रोष पत्करून सत्य समोर आणण्याचे धाडस करणारे, लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्यासाठी पत्रकार आणि पत्रकारितेचे मोठे योगदान असून पत्रकारिताने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे असा शब्दात भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर यांनी पत्रकार बांधवांचा गौरव केला. मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित दर्पण दिन व पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी माजी खासदार किरिट जी सोमय्या, भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता केशव जी उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, ६ जानेवारी १८३२ रोजी "दर्पण" सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी तत्कालीन इंग्रज राजवटी विरोधात भारतातील जनसामान्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता आजही समाज भावना मांडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले जात असून पत्रकारितेला समाज मनाचा आरसा वाटल्यास वावगे ठरणार नाही. उपम

स्थानिक स्वराज संस्थामध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने विकासाचे तीन तेरा नऊ बारा व अधिकारी स्वतःची मनमानी करीत आहेत:-सचिन खरात

Image
  परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण         Aस्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पड़ल्यामुळे, स्थानिक स्वराज संस्थेच्या कार्यकाळ संपूर्ण प्रशासकाची नियुक्ती मागील एका वर्षा पासुन आहे स्थानिक संस्था नगर परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत पण या सदस्य व पदाधिकारी यांचा कार्य काळ संपला प्रशासक आहे शहराचा विकास नगर परिषद माध्यमातुन होतो आणी जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून ग्रामीण भागाचा विकास होत असतो.      मागील एक वर्षे पूर्ण झाले विकासाच्या स तेची चाबी प्रशासक यांच्या हातात आहे स्थानिक स्वराज संस्थेवर प्रशासक असल्यामुळे विकासाला खिळ बसुन विकासाचे तीन तेरा वाजले आहेत.पंचायत समिती BDO दोन दोन महिने ऑफिसला येत नाही सामान्य जनतेने तक्रार करूनही त्यांच्या तक्रारीच्या कोणी दखल घेत नाही  म्हणून राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आहे या सरकार नी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी तात्काळ निर्णय घेने. निवडणुका लांबणीवर टाकल्याणे इच्छूक उमेदवार कुठे ही दिसत नाही व आरक्षण न्यायालयात असल्याने इच्छुकांची हिरमोड होत आहे . आरक्षणांचे गणित सध्या कोणाला ही कळत नाही. नगर परिषद मध

.देेवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याबरोबर कामगार संघटनांची सकारात्मक चर्चा झाली व लेखी स्वरूपाचे कार्यवृत्त दिल्यामुळे संप मागे घेण्यात आला

प्रतिनिधी कैलाश चव्हाण          महाराष्ट्र राज्यातील ८६ हजार कर्मचारी,अभियंते व अधिकारी तसेच ४० हजाराच्या वर कंत्राटी कामगार दि.३.१.२०२३ रोजी मध्यरात्री पासून महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तीनही वीज कंपन्यातील ३१ कामगार संघटना ७२ तासाच्या संपावर गेले होते.      विविध संघटनाना संलग्न असलेल्या कंत्राटी कामगाराच्या संघटना या संपाला पाठिंबा देऊन सहभाग घेतला होता.वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये,फेंचाईशी करण्यात येऊ नये,नवीन कामगार भरती करावी,कंत्राटी कामगाराला कायम करण्यात यावे. या व इतर मागण्या बाबत विस्तृत चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर अधिकारी व ३१ कामगार संघटनाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथी गुरुवार दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत संपन्न झाली या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाल्यामुळे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन झालेले निर्णय जाहीर करण्यात आले व कामगार संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. *उपमुख्यमंत्री यांनी का