Posts

Showing posts from October, 2022

30 ऑक्टोबर रोजी जालन्यात भाजपा युवा मोर्चा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार

Image
प्रतिनिधी समाधान खरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी युवा नेते राहुल लोणीकर यांची निवड झाल्याबद्दल दिनांक ३० ऑक्टोबर रविवार रोजी वृंदावन गार्डन, हॉटेल गॅलेक्सी जालना भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार कैलास गोरंट्याल माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार संतोष दानवे आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड माजी आमदार अरविंद चव्हाण माजी आमदार विलासराव खरात माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संतोष सांबरे रिपाईचे नेते ब्रह्मानंद चव्हाण उद्योगपती घनश्याम शेठ गोयल शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर सतीश टोपे भास्करराव दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४:०० वाजता हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. जिल्हाभरातील युवकांसाठी प्रेरणास्थान असणारे राहुल लोणीकर यांची निवडणे महाराष्ट्रातील युवांसाठी काम करणाऱ्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी झाल्यानंतर जिल्हाभरात फटाके कडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला होता मागील काळात ४२ पेक्षा अधिक मोठी व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून येथ

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या निवास स्थानी दीपावली पाडवा स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न..

Image
 परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण      ता.२७ रोजी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या वतीने दीपावली - पाडवा स्नेहमिलन कार्यक्रम लड्डा काँलनी परतूर येथे आयोजित केला होता      या कार्यक्रमास जिल्ह्यातील राजकीय, नामांकीत व्यक्ती ,प्रतिष्ठित व्यापारी, लोकप्रतिनिधी ,शासकीय कर्मचारीसह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रदीपकुमार लड्डा ,माजी नगराध्यक्ष विनायक काळे, शिवसेना नेते रामेश्वर अण्णा नळगे,काँग्रेसचे युवा नेते नितिन जेथलीया तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे,नगरसेवक अंकुश बापू तेलगड, राखे नाना आरेफ आली, सादिक खतीब, राजेश खंडेलवाल ,सिध्दार्थ बंड, अजिज सौदागर, मुरली देशमुख ,आयुब कुरेशी , संदीप पाचारे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल नाटकर, प्रदीप साळवे, बाळू कदम, प्रहारचे शिवाजी सवणे ,तसेच आरपिआयचे बळीराम हिवाळे ,सर्जेराव प्रधान ,आशोक पुरुळेसह तालुक्यातील विविध पक्षाचे लोकप्रतीनिधी,परतूर पञकार,वकील,प्रध्यापक, शिक्षक वर्ग, सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत सर्वच लोकप्रतिनीधीनी व अनेक

ह.भ.प. भागवताचा-र्या रूपालीताई सवने यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Image
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर यांच्या वतीने राष्ट्रवादी कोंग्रेस सेवादलचे मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथील महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार माजी गृहराज्य मंत्री आमदार संजय बनसोडे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.    ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी करत असलेल्या धर्म जागृतीचा, संस्कार जागरणाचा आणि ज्ञान साधनेचा प्रचार आणि प्रसार करून शब्दसिध्दी अमृतवानीने कीर्तनाने आणि प्रबोधनाने समाज प्रभावित होत आहे.  महाराष्ट्रात केलेल्या व करत असलेल्या धर्म, संस्कृती आणि नैतिक मूल्यांच्या जागरणामुळे गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळातर्फे ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना दि २२ आक्टोंबर २०२२ रोजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आ

मतदार संघातील जनतेच्या प्रेमाने आशीर्वादाने भारावलो कायम जनतेच्या ऋणात राहील - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,येणाऱ्या विधानसभेत २०० पेक्षा अधिक मतदार संघात युवा मोर्चा निर्णायक भूमिका निभावणार - युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा निर्धार,परतूर येथे लोणीकरांच्या उपस्थितीत दिवाळी स्नेह मिलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतुर विधानसभा मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले असून जनतेच्या प्रेमातून मी कदापि उतराई होणार नाही उलट कायम जनतेच्या ऋणात राहील जनतेच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहील अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या परतुर येथे आयोजित दिवाळी स्नेह मिलन व स्नेहभोजन कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी लोणीकरांसह मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थित त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या राहुल लोणीकर यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी घराणेशाहीची टीका केली होती त्या टीकेला उत्तर देताना आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की राहुल लोणीकर यांची निवड ही पूर्णपणे त्यांच्या कर्तुत्वावर अवलंबून असून राहुल लोणीकर यांच्या कामाची पावती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कर्तुत्ववान व्यक्तीच्या कामाची दखल घेतली जाते तशी इतर पक्षात घेतली जात नाही म्हणून जयंतराव पाटील यांनी भाजपच्या घराणेशाहीची चिंता करू नये त्यापेक्षा स्व पक्

शंभर रुपयात लाभार्थ्यांना शिधा किट वाटपपरतूर: लाभार्थ्यांनमध्ये समाधान

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण          राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत तालुक्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना दिवाळी सना निमित्त शंभर रुपयात चार वास्तुनचा एक सच याप्रमाणे आनंदाची शिधा किट प्रत्यक राशन दुकानदाराकडून वितरण करण्यात येत आहे.सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी यासाठी राज्य शासनाने शंभर रुपयात रवा,चांनाडाळ,एक लिटर तेल निर्णय घेण्याचा निर्णय घेतला होता.यात परतूर तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानदाराने कडून आनंदाच्या शिधा चे वाटप सुरू करण्यात आले आहे.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तहसिल कार्यालय अंतर्गत 122 रास्त भाव दुकानदारा मार्फत सदर शिधापत्रिका सच लाभार्थी वितरण करण्यात येत आहे.याचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावी  प्रकाश जाधव,पुरवठा निरीक्षक परतूर  वाढती महागाई यामुळे सना वर संकट उभे राहते शासनाने शंभर रुपयात शिधा किट दिल्याने समाधान मिळाले आहे. ऋषिकेश खरात, लाभार्थी, परतुर दिवाळी निमित्ताने नागरिकांन साठी राज्य शासनाने कडून शिधा किट चे वितरण करण्यात येथे आहे.ऑनलाईन प्रणाली चालत नसल्याने ऑफलाईन पध्दतीने शिधा किट वाटप करण्यात येत आहे. द.या.काटे,

आनंदाचा शिधा गरजुवंतांना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या तर्फे मोफत वाटप

Image
परतूर/( प्रतिनिधी ) कैलाश चव्हाण    बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्यातर्फे आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला १०० रुपयात १ किलो साखर, १ किलो चना डाळ, १ किलो रवा ,१ किलो तेल व इतर वस्तू अत्यंत माफक १०० रूपयात वितरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळाचे मोहन अग्रवाल यांनी कौतुक करून अभिनंदन केले. जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी शिवसेनेच्या वतीने शहरातील अत्यंत गरजूवंत कुटुंबांना १०० रुपये किमतीचा आनंदाचा शिधा किटचे मोफत वितरण शिवसेना कार्यालय गार्डन हॉटेल शेजारी परतुर येथे केले. यात शेकडो गरजू कुटुंबाना मोफत आनंदाचा शिधा राशन कार्ड धारकास वितरण करण्यात आले,याप्रसंगी तालुका प्रमुख अमोल सुरूंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, शिवाजी तरवटे ,दत्ता अंभोरे ,सोपान कातारे ,रितेश अग्रवाल, अविनाश कापसे, कृष्णा अग्रवाल, विकास यादव, शिवसेना पदाधिकारी व आदी शिवसैनिकासह शहरातील लाभार्थी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माधवराव नवल यांचे निधन

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण परतूर तालुक्यातील माव (पाटोदा) येथील प्रतिष्ठित नागरिक माधवराव निवृत्ती नवल वय 70 वर्ष यांचे दि २३ आक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेपाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. माव येथे त्यांच्यावर सकाळी दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मूले, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. पत्रकार रामप्रसाद नवल व मुख्याध्यापक उद्धव नवल यांचे ते वडील होत.

शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा.सिध्दार्थ पानवले सन्मानित..

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   सामाजिक आणि क्षेत्रात कार्यरत असणार्या नवतरुणांपैकी एक प्रा.सिध्दार्थ पानवले यांचा औरंगाबाद येथील होल्डींग हँडस संस्थेतर्फे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने सन्मान करण्यात आला. संस्थेतर्फे विविध क्षेत्रात आघाडीवर कार्यरत व्यक्तींचा सन्मान करण्याचे ठरविले. या प्रसंगी मान्यवर प्रा.डॉ.हृषिकेश कांबळे तहसिलदार राहुल गायकवाड,न्युरोसर्जन डॉ.जीवन राजपुत,जिल्हा माहीती अधिकारी मुकुंद चिलवंत,एमजीएम फिल्म ॲण्ड क्राफ्टचे शिव कदम तसेच संस्थापक अध्यक्ष सिरसीकर ,आण्णा वैद्य यांच्या हस्ते प्रा.सिध्दार्थ पानवले यांना स्मृतीचिन्ह देवुन सन्मानीत करण्यात आले.

शिक्षकांचे पगार दिवाळीपूर्वी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी पूर्वी शिक्षकांचे वेतन करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांची दिवाळी गोड केली,विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न ही लवकरच मार्गी लागतील आमदार लोणीकर यांचा विश्वास,कार्यक्षम शिंदे फडणवीस सरकारमुळे शेतकरी सरकारी नोकरदार कामगार यांचे प्रश्न लागत आहेत मार्गी

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांच्या दिवाळी सणाच्या आनंदाला द्विगुणीत केले असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे  पुढे आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे क्रियाशील सरकार असून या सरकारच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी नोकरदार सोडवण्याचे काम प्रचंड वेगाने सुरू असून मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबलेला विकासाचा गाडा आता शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जोरदारपणे पुढे जात असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या पत्रकात नमूद केली आहे शिक्षक पोलीस बांधव यांच्यासह नागरी सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका राज्यातील सरकारचे असून अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी राज्यातील सरकारची असल्याचे सांगतानाच ही जबाबदारी निश्चितपणाने पूर्ण करणार असल्याचे यावेळी त्यांनी या पत्रकामध्ये नमूद केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र

भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई सवने महाराज यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने सन्मानित

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  ख्यातनाम कीर्तनकार परतूर तालुक्याचे भूषण सुप्रसिध्द कीर्तनकार भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने पुणे येथे एका  कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राची संत परंपरा, कीर्तन परंपरा जपणाऱ्या 'मन मंदिरा-गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून 'उत्सव कीर्तनाचा, गौरव कीर्तनकारांचा' हा पुरस्कार सोहळा झी टॉकीजच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.  या सोहळ्यात दैठना खुर्द येथील रहिवाशी परतूर तालुक्याचे भूषण, महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाचे मानबिंदू सुप्रसिध्द कीर्तनकार भागवताचा-र्या हभप सौ. रुपालीताई रामेश्वर महाराज  सवने यांना 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रसिध्द गायिका श्रीमती सन्मिता धपाटे  व श्रीमती दिप्तीताई भागवत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील तमाम वारकरी बांधव, संप्रदायातील मंडळींसाठी ही गौरवाची बाब आहे. झी टॉकीजचा हा 'उत्कृष्ट कीर्तनकार' पुरस्कार मिळा

शेतक-यांना न्याय मिळेपर्यन्त स्वस्थ बसणार नाही मा.आ सुरेशकुमार जेथलिया मागण्या मान्य न झाल्यास दिवाळी नंतर विराट मोर्चा-नितीन जेथलिया

Image
परतुर - प्रतिनिधी हनुमंत दवंडे  सर्वसामान्यांना प्रत्येक बाबतीत निराश करणारे हे सरकार सामान्यांचे नसुन शेतकऱ्यांना न्याय मिळे पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.     शेतक-यांच्या रखडलेल्या पिक विम्याबाबत व ओला दुष्काळ जाहिर करा या प्रमुख मागणीसह शेतक-यांच्या अनेक प्रश्नाबाबत आज दिनांक 18 आक्टोंबर रोजी काॅग्रेस कमिटीच्या वतिने काढण्यात आलेल्या मोर्चाला ते संबोधीत होते. यावेळी त्यांच्या समेवत अन्वर बापु देशमुख, नितीन जेथलिया, किसनराव मोरे, आर.के.खतिब, एकनाथ कदम, तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, निळकंठ वायाळ, जि.प.सदस्य इद्रजित घनवट, शिवाजी महाराज भेसले, शामसुंदर काळे, सुरेश सवणे, मंजुळदास सोळंके, सुखलाल राठोड, सुर्यभान मोरे, सादेख जाहिरदार, डाॅ.केशरखाने, लक्ष्मन शिंदे, माउली तनपुरे, बद्रीभाऊ खवणे, दिलीपराव चव्हाण, मनोज जाधव, बाळासाहेब अंभिरे, दत्ता पवार, अनिल अंबेकर, बाजीराव खरात, रोजेभाउ दांगट, गजाजनन पुंड, गोपाल मरळ, पाडुरंग कुरधने, भाउसाहेब जगताप, सययद राजु, मंजु देवकर, शिवा राठोड, अन्नासाहेब लिपणे, सचिन लिपने, गोपाल स

मराठवाड्यातील सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्नशील - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,जालना, परभणी सह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - लोणीकर यांची माहिती,शेतकऱ्यांसाठी आंदोलन हे काँग्रेसला उशिरा सुचलेलं शहाणपण, काँग्रेसचे शेतकऱ्यांविषयी "पुतणा मावशी"चे प्रेम शेतकरी चांगलेच ओळखून - लोणीकर

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  मागील अनेक दिवसांपासून जालना व परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात प्रचंड पाऊस सुरू असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्नशील आहोत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे ६५ मिली पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तर संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळणे क्रमप्राप्त ठरते त्यानुसार जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी ६५ मिली पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे या भागात अतिवृष्टी नसली तरी देखील सततच्या पावसामुळे हे नुकसान झाले आहे त्यात जालना व परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून मंठा तालुक्यात आतापर्यंत सरासरी ११७७ मिली (१२६%)), प

परतूर येथे शरद युवा संवाद यात्रा निमित्त भव्य मोटारसाकल रॅली चे आयोजन

Image
परतूर दी.16 प्रतिनिधी हनुमंत दवंडे        परतूर येथे दी 17 रोजी सकाळी दहा वाजता शरद युवा संवाद यात्रा निमित्त भव्य मोटारसाकल रॅली चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात यांनी एका पत्रकाद्वारे दिली. दिलेल्या पत्रकत नमूद करण्यात आले की राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेत्रत्वत पूर्ण महाराष्ट्र त शरद युवा यात्रा संवाद हा कार्यक्रम रबावण्यात येत आहे.          या अनुषंगाने युवकांशी संवाद साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे काम तळागाळातील लोकांन पर्यंत पोहचविण्यात येणार आहे. तसेच या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय पर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली ला उपस्थित राहण्याचे अहवान युवक चे जिल्हा अध्यक्ष कपिल आकात सह मा नगरअध्यक्ष विनायक काळे, अंकुशराव तेलगड, विजय राखे, अखिल काजी, युवकचे तालुका अध्यक्ष ओंकार काटे सह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

मंगळवारी परतूर तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणार, हाजारोच्या संख्येने उपस्थित रहा -बाबासाहेब गाडगे

Image
परतूर प्रतिनिधी  हनुमंत दंवडे       झोपलेल्या सरकारला व प्रशासनाला शेतकयांच्या प्रश्नावर जागे करण्यासाठी परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस,तुर,सोयाबिन सह आदि पिकांची झालेल्या नुकसानीची हेक्टरी 50000 रुपये भरपाई देण्यात यावी व फळबाग नुकसानीसाठी हेक्टरी 100000 मदत देण्यात यावी व तसेच तात्काळ 100% पिक विमा मंजूर करण्यात यावा व तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करून दिवाळी गोड करावी या मागणीसाठी मा.आ सुरेशकुमार जेथलिया,अन्वर देशमुख  यांच्या उपस्तिथीत उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन देण्यांत येणार आसल्याचे एका प्रसिद्ध पत्रकात सांगितले आहे दिवळी आगोदर मदत जाहीर न झाल्यास  दिवाळी नंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल तरी हे निवेदन देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी दिनांक 18-10-22 वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या संपर्क कार्यालयाजवळ उपस्थित राहावे असे अवाहन  कांग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे व

केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल - राहुल लोणीक भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची भाजयुमो महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करत असले बाबतची घोषणा केली यावेळी मार्गदर्शन करताना श्री बावनकुळे म्हणाले की भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आणि सजग असला पाहिजे तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत घटकापर्यंत पोहोचून शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम पोहोचविण्यासाठी त्याने प्रयत्नशील असावे युवा वॉरिअरच्या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील तरुणांना भारतीय जनता पार्टी कडे आकर्षित करण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भ

प्रतीक जोशी यांना संस्कृत काव्यशास्त्र विषयात पीएचडी

Image
परभणी प्रतिनिधी कैलाश चव्हाण          येथील आचार्य वेदशास्त्र पाठशाळेचे विद्यार्थी श्री प्रतीक प्रमोदराव जोशी यांना  दि.१२ऑक्टोबर रोजी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक,नागपूर यांच्यामार्फत पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी संस्कृत काव्यशास्त्र या विषयात पीएचडी करताना "जगन्नाथोत्तराणां प्रमुखकाव्यशास्त्रीय ग्रंथानां समीक्षणात्मकम् अध्ययनम्" या विषयावर आपला प्रबंध मार्गदर्शक डॉ.पराग जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला.      त्यांना त्यासाठी त्यांचे गुरुजी वेदांतकोविद प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ झाला. भागवतकार असलेल्या प्रतीक जोशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सर्वश्री हभप माधवराव आजेगावकर, प्रमोदशास्त्री कुलकर्णी, नरहरी गुरुजी एरंडेश्वरकर, शंकर आजेगावकर, सर्वोत्तम पाथरीकर, विश्वजीत कुलकर्णी, चंद्रकांत साळेगावकर गजानन खळीकर प्रसाद रोपळेकर विलास कौसडीकर किशोर पुराणिक उपेंद्र दुधगावकर आदींनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

उद्या निघणाऱ्या मशाल यात्रेस हजारों च्या संख्याने उपस्थित रहा -राहुल कदम

Image
  परतूर प्रतीनीधी हनुमंत दवंडे       शिवसेनेतील गद्दारानी फूटून शिवसेनेच्या धनुष्य बाणावर आपला हक्क सांगितला होता परंतु खरा हक्क हिन्दू हृदय सम्राट माननीय बालासाहेब ठाकरे यांचे वारसदार माननीय उद्योग साहेब ठाकरे यांचा होता परंतु गद्दारानी यांच्या वर हक्क सांगीतल्या मुळे नुकतेच निवडणूक आयोगाने शिवसेनाचे आसणारे निवडणूक चिन्ह धनूष्य बाण हे गोठवले आहे      आरे निवडणूक चिन्ह गोठवले म्हणून तर रक्त आमचे पेटवले        तरी मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगा समोर *पेटती मशाल* या चिन्हाची मागणी केली होती या चिन्हाची या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली असून हे निवडणूक चिन्ह प्रत्येक मतदाराच्या घराघरात नाही तर मनामनात पोहोचवण्याकरिता उद्या दिनांक 13 रोजी रेल्वे गेट परतुर येथून संध्याकाळी सहा वाजता *पेटती मशाल* यात्रेचे आयोजन केलेले आहे     तरी महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ही मशाल प्रत्येक मतदाराच्या मनामनात पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे      

युवा ऊद्योजक शरद पाटील दहातोडे याच्या अभिष्टचितंना निमित्य किर्तन संपन्न

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील          येथून जवळच असलेल्या देवठाणा येथे हं भ प प्रसाद महाराज काष्टे याच्या किर्तनाचे आयोजन करण्या आले होते संत नामदेव महाराज याच्या  अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझीया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहकांराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णु दासा भावीकासी  या संत नामदेव महाराज याच्या अभंगावर निरुपण केले संत हे काहीच मागत नसतात याचा अर्थ असा होत नाही की ते काहीच मागत नाही संत हे समाजासाठी धर्मासाठी मागणे मागत असतात जे संत स्वःत साठी काही मागतात ते संत होऊ शकत नाही आणि समाजही अशा ना स्वीकारत नाही संत हे किती महान आहेत संतांनी संतांना उठवले संतानी जीवाला उठवले संतांचे वर्णन हे शब्दात मनुष्य करू शकत नाही संतांनी देवाला सुध्दा उठवले ऐवढा मोठा अधिकार संतांचा आहे संत हे त्यागाचे प्रतिक असतात त्याग निष्ठा समर्पण हे संतांनकडून शिकले पाहीजे पंरतू मनुष्य हा दोष बघण्यातच धन्यता मानतो बरेच माणसे दुसर्याना जागे करतात माञ जागे करणारा स्वतःचे अस्तीत्व विसरून जातो दुसर्याचे दोष काढण्यातच तो व्यस्त असतो

सद्गुरू संत श्री सेवालाल महाराजांचे जीवन कार्य प्रत्येकाने अंगीकारावे - भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण        प्रत्येकाच्या आयुष्यात संतांची शिकवण मार्गदर्शक ठरत असते प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतःची ओळख निर्माण करून स्वतःसह समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा त्यासाठी संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचे जीवन कार्य प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी आज केले. मंठा तालुक्यातील कर्णावळ येथे संत सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी श्री राहुल लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर महंत योगानंद महाराज, गणेशराव खवणे, सतीश निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेश घारे, सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. संतांच्या सानिध्यात मोक्ष आणि सद्गती प्राप्त होते त्यामुळे उपदेशाप्रमाणे आपले जीवनकार्य चालवावे त्यासोबतच समाजासह गावाच्या विकासावर देखील भर द्यावा संतांनी महंतांच्या सूचनांचे पालन करावे त्याशिवाय तरणोपाय नाही असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले. सत्संगतीचा महिमा अपार आहे. सत्संगतीने आपल्या सद्बुद्धीत वाढ होते. यासाठी संतांची संगती करायला शास्त्रात आग्र

परतूर तालुका क्रीडा संयोजक पदी प्रमोद राठोड यांची निवड ,परतूर येथे तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२२-२३ नियोजन बैठक संपन्न

Image
 परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण .         परतूर: क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना तसेच तहसील कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने परतूर येथे तालुकास्तरीय शालेय तसेच क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली.  या बैठकीस तालुका क्रीडा अधिकारी  रेखा परदेशी मॅडम,गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष साबळे साहेब, गटसमन्वयक   कल्याण बागल , निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी ,नवनियुक्त क्रीडा संयोजक  प्रमोद राठोड ,परतूर क्रीडा समितीचे अध्यक्ष निर्वळ सर आदी उपस्थित होते. त्याच बरोबर परतूर तालुक्यातील विविध शाळेचे क्रीडा शिक्षक त्यामध्ये   काकडे व्ही जी,    कबाडी एस एल, कोरडे ए डी,   तन्वीर शेख,  नवल आर एम,   विकास काळे, राठोड व्ही एच, सरदार एन एस. गायकवाड व्ही एस, देवडे व्ही ए,  गिरी बी के,   खान माजीद परतुरी,   नलावडे एन एस, गीते जे एन,. सिरसाठ बी व्ही, श्री.आढे पीबी,श्री.भांडवलकर ए सी,  देशमुख के वाय,   कुकडे जी आर इत्यादी क्रीडा शिक्षक व मुख

मंठा येथे सोमावारी कविसंमेलन

Image
  मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ      दि.०९ मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उद्या १० ऑक्टो. रोजी, सायंकाळी ठीक ६:३० वा मंठा येथे "पौर्णिमा कवितेची" या शीर्षकांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.      जि. प.प्रशालेच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ.राजेशभैया राठोड यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ए.जे.बोराडे पाटील यांची उपस्थिती असेल, तर विशेष अतिथी म्हणून भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र सचिव मा.राजेश मोरे व अ.भा.सा. सोशल फाऊंडेशनचे संचालक मा.डॉ.प्रवीण माळेगावकर हे उपस्थित राहणार आहेत.      या कविसंमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत,अकोला, निलेश चव्हाण औरंगाबाद, अविनाश भारती परळी, धम्मपाल जाधव,औरंगाबाद यांच्या बहारदार काव्याची मेजवानी उपस्थित रसिकांना मिळणार आहे.     याच कार्यक्रमात मंडळाचे वयोवृद्ध सक्रिय सभासद प्राचार्य कु.पि.इंगळे व श्री हरिराम तिवारी ( बाबुजी ) यांचा "जीवनगौरव पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कविसंमेलनास मंठा,सेलू, परतूर,

शेतकऱ्याच्या शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची कैलास सरकटे यांची मागणी

Image
मंठा प्रतीनीधी  सुभाष वायाळ मंठा तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वच शेतकऱ्यांची शेत रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे शेतकऱ्यांना कायम स्वरूपी रस्ताचे जाळे निर्माण करुन दिल्यास शेत मालाची वाहतूक करता येणार आहे. शेतकऱ्यांचे शेत रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सरकटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री. विधानसभा अध्यक्ष. व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि ग्रामीण भागात अनेक शेत रस्त्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी वाद .भांडण कोर्ट मध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात ते न्यायालयापर्यंत कितेक दिवस चकरा माराव्या लागतात .यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट येत आहे. प्रत्येक ठिकाणी नंबर बांध आहे. बांधावरुन जाण्यासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. पुर्वी सर्वे .नंबर हा एकाच मालकिचा असायचा किंवा एकाच कुटुंबातील असायचा पण वाटणी किंवा रजिस्ट्री झाली की वाद निर्माण करण्यात येतात. त्यामुळे रजिस्ट्री व वाटणी पत्रक करतानी त्या

आनंदवाडी ,रायपुर, शिरसगाव या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलार पॅनलचे अतोनात नुकसान.

Image
परतुर प्रतिनिधी हनुमान दवंडे परतुर तालुक्यातील आनंदवाडी, शिरसगाव ,रायपुर या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले आहे.        अशी तक्रार शेतकरी विठ्ठल सुदाम सावंत यांन सांगितले आहे. याशिवारातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये बसवलेला सोलार शक्ती या कंपनीचा 3 एचपी चा सोलर बसवलेला होता अचानक मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व वादळ वारा आला आणि सोलार पंपाचे होत्याचे नव्हते झाले. मोडून तोडून पडलेल्या अवस्थेत त्याची दुर्दशा झालेली आहे त्यामुळे विठ्ठल सावंत या शेतकऱ्यांनी दैनिक परतवाडा टाइम्सशी बोलताना हळहळ व्यक्त केली आहे... तसेच तीन एचपी सोलर हा शक्ती पंप कंपनीचा आहे तरी ह्या कंपनीने माझे झालेले नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तक्रारी अर्जद्वारे केली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघ देवठाणाच्या वतीने वृक्षारोपन

Image
मंठा - प्रतिनिधी सुभाष वायाळ        दि.०७मौजे देवठाणा उस्वद अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा देवठाणाच्या वतीने वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक दुर्गा मंडळ देवठाणा जगद् गुरु तुकाराम महाराज सृष्टी या स्थळी कार्यक्रमाचे आयोजन केले.            या कार्यक्रमाचे उद्घाटक भगवानराव महाराज सरकटे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष मंठा बाळासाहेब देशमुख होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल भारतीय मराठा महासंघ युवक ता. अध्यक्ष मुकुंद गोटे, शाखा अध्यक्ष दिपक वरकड, मानिक वरकड हे होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व सर्व आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस हार अर्पन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुकुंद गोटे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब देशमुख यांनी विचार व्यक्त केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सामाजिक धोरण यावर प्रकाश टाकला तसेच सारथी सारख्या योजनेचा व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व पंजाबराव देशमुख वसतीग्रहाचा लाभ समाज बांधवांनी घ

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार येताच परतूर शहरात प्राधान्याने 05 कोटी रुपयांचा निधी रस्ते विकासासाठी आणल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सन्मित्र कॉलनी परतूर येथे बोलताना सांगितले ते सन्मित्र कॉलनी येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून परतूर शहराच्या अंतर्गत रस्त्यांसाठी आणलेल्या सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की मी मंत्री असताना परतुर शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला शहरात रस्ते विकास करताना 22 कोटी रुपयांची रस्ते बांधणी केली हे करत असताना शहरातील 28 नवीन ट्रान्सफर बसवण्याचे काम करण्याबरोबरच मुख्य रस्त्यावर गंजलेले विजेचे खांब बदलण्याचं काम त्याचबरोबर शहरांमध्ये बंच केबल टाकून घेण्याचं काम आपण केला असल्याचे यावेळी बोलताना ती म्हणाले आपण नियमितच नगरपालिकेची सत्ता जरी विरोधकाकडे असली तरी परतूर शहरातील नागरिकांच्या विकासासाठी सदैव प्रयत्न केलेला असून शहराच्या सौंदर्यात आणि सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी उच्च दर्जाचे नाट्यगृह या ठिकाणी मंजूर करत असतानाच मराठवाड्यातील सर्वात भव्य दिव्य असे नाट्

मनसेचे काकडे यांना पाच जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात       जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारधारेला अनुसरून जालना जिल्ह्यातून आपल्या मनसे स्टाईलच्या आंदोलनातून प्रशासनाला नियमित वेठीस धरून लोकांसाठी आवाज उठवत असल्याने याच माध्यमातून मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांच्या विरुद्ध काही राजकीय गुन्हे नोंद आहेत आसे सिद्धेश्वर काकडे यांनी काढलेल्या एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे       पुढे पत्रकात सांगितले कि याच पाश्र्वभूमीवर सिद्धेश्वर काकडे यांनी भोंगा आंदोलन, मंठा वीज वितरण कार्यालय तोडफोड आंदोलन, मंठा गट विकास अधिकारी कार्यालय तोडफोड करून जालना जिल्ह्यात मनसे स्टाईल चांगलीच आक्रमक केली आहे.            सिद्धेश्वर काकडे यांच्या विरुद्ध आता पोलीस प्रशासनाने कार्यवाही करण्याचे नियोजन करत मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांच्या विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी राजु मोरे यांच्या कार्यालयात जालना, बीड, औरंगाबद, परभणी, बुलढाणा, या पाच जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपारीची नोटीस काढली आहे. यावर काकडे यांना उपविभाग

पिडीत कुटुंबाला आधार कडून आर्थिक मदतीचा "आधार"

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे अचानक कोसळलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे वरफळ येथील नामदेव खंडागळे यांच्या घराची मध्ये रात्री पतझड होऊन भिंती कोसळल्या होत्या यात घरातील एका चिमुकल्या सह अन्य सदस्य सुद्धा जखमी झाले होते तालुका गटसमनव्यक श्री कल्याण बागल यांनी घटनेची माहिती आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम वाडेकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी प्रतिसाद देत  १००००/-रुपयाचा धनादेश आधावडचे पदाधिकारी यांनी पीडित कुटुंबाच्या वरफळ येथील घरी जाऊन सुपूर्द केला यावेळी तालुका गट समनव्यक कल्याण बागल,सचिन चव्हाण,गावचे सरपंच नदीम पटेल,सनी गायकवाड, जावेद पठाण,दत्ता डोईजड,बाबासाहेब थोरात,यांच्यासह अन्य उपस्थित होते.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी मोहन अग्रवाल यांची नियुक्ती

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण          परतूर नगररपालिकेचे माजी गटनेते मोहन अग्रवाल यांची शिवसेनेचा हिंदू गर्व गर्जना व शिवसंपर्क अभियान यात्रेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जालना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली.         यावेळी मोहन अग्रवाल यांनी बोलतांना म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून एकनिष्ठतेने प्रामाणिक काम करून शहराचा विकासासाठी मोठा निधी आणून विकास कामे केली आहेत. शिवसेनेचे माध्यमातून यापुढे मोठी चळवळ उभा करून सर्वसामान्य नागरिकांच्या आणि शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहण्याची ग्वाही यावेळी मोहन अग्रवाल यांनी दिली आहे.  यावेळी शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर, खासदार हेमंत पाटील, उपनेते विजय नहाटा, अमोल सुरुंग, बाबासाहेब चिखले, सतीश हजारे, दत्ता कातारे, अविनाश कापसे, अविनाश कापसे, दीपक हिवाळे, दत्ता अंभुरे, गजानन वटाने, गजानन आकात, गंगाधर गोरे, नितीन राठोड, सोनू डोलारकर, राजाभाऊ मुळे, विष्णू जगताप, बळीराम वाघमारे, रितेश अग्रवाल, अरुण धुमाळ, प्रल्हाद बोराडे, रामेश्वर खरात, शिवाजी लहाडे, उदयसिंग बोराडे, गजानन बोराडे, इत्यादी कार्यकर्त्यांनी मोहन आग्रवाल यांचा

दैठना खुर्द शिवारातील कसूरा नदीवरील पूल गेला वाहून, कसूरा नदीवरील रस्त्यातील पूल उभारण्याची मागणी

Image
 परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण         दैठना खुर्द शिवारातील शेतीकडे कसूरा नदीवरुण जाणारा पूल पावसाने वाहून गेला आहे. नवीन पूल उभरा नसता जलसमाधी घेण्याचा इशारा येथील शेतकर्‍यांनी तहसीलदारकडे निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे की दैठना खुर्द येथील पिंपळगाव रोड ते कुलकर्णी वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावरील कसूरा नदीवरील पूल दि २७ व २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या पावसाने वाहून गेला आहे. कुलकर्णी वस्तीकडे हातडी लघु सिंचन तलावच्या खाली कसूरा नदी जात आहे. या नदी वरील पूल झालेल्या पावसाने नदीला पुरात वाहून गेला असल्याने या भागातील शेतकर्‍यांची शेती असल्याने अनेकांना शेती वहिती करण्यास अडचणी येत आहेत. या रस्त्यावरील पूल तात्काळ निर्माण करावा आमचे शेती मशागत करण्यासाठी जात येत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तात्काळ पूल उभारून रस्ता करावा नसता या पुलावरील पाण्यात जलसमाधी घेण्यात येईल. घडलेल्या घटनेला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. अण्णासाहेब सवने, विलास भदर्गे, भीमराज तयाडे, संदीप शिंदे, अमोल सवने, गणेश कदम, अमर राकूसले, लक्ष्मण मोर

शिवसेना मंठा शिंदे गट तालुकाप्रमुखपदी उदय बोराडे यांची नियुक्ती

Image
 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ    दि.०१ शिवसेनेच्या मंठा तालुकाप्रमुखपदी शिंदे गटाचे उदय प्रल्हादराव बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परतूर येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, पंडितराव भूतेकर, प्रल्हादराव बोराडे, यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.       यावेळी मंठा शिवसेना शहर प्रमुख पदी गणेश रामराव बोराडे यांची निवड करण्यात आली. उदय बोराडे व गणेश बोराडे यांच्यासोबत तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला मंठा तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करून गावा गावात शिवसेनेचे कार्य मजबूत करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले प्रत्येक गावात त्यांचे विचार पोचविणार असल्याचे उदय बोराडे यांनी सांगितले.. उदय बोराडे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची खूप आवड आहे त्यांनी 2012 सली शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करून तालुक्यात शाखाचां माध्यमातून सर्व अठरा पगड जातींच्या सर्व बांधवांना सोबत घेऊन सामाजिक कार्य