सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता अतिक्रमण ग्रस्त मोकळा करण्यात आला.
प्रतिनिधी /हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील सावरगाव (बुद्रुक) येथील सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमण ग्रस्त होता तो तहसीलदार मॅडम यांच्या आदेशाने मोकळा करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण असलेला रस्ता, शेतकऱ्यांचे व पिंपळगाव कडे जाणाऱ्या लोकांचे झालेले हाल या कारवाईमुळे संपुष्टात आले. गेल्या दोन वर्षापासून शेतामध्ये तयार झालेला माल व शेतीमध्ये नेण्यासाठी लागणारे खत अक्षरशः दुसऱ्या गावाहून शेतीमध्ये नवे लागत होते. शेतकऱ्यांना व मुक्या जनावरांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. या यातनेचा अंत पाहून सुमारे 40 शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार परतूर यांना निवेदन देऊन या वही वाटा प्रमाणे जाणारा अतिक्रमित रस्ता मोकळ्या करण्याची विनंती केली. तसेच माजी मंत्री व विद्यमान आमदार माननीय बबनराव जी लोणीकर साहेब व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री मंत्री युवा नेते माननीय राहुल भैया लोणीकर यांना वेतना व होणारे हाल शेतक-याने यांच्या निदर्शनास म्हणून दिले. माननीय बबनराव जी लोणीकर साहेबांनी व राहुल भैया लोणीकर साहेबांनी माननीय तहसीलदार साहेब