Posts

Showing posts from April, 2022

महसुल पथकाच्या सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपी सह १७ लाखाचे टिप्पर जप्त

Image
मंठा-प्रतिनिधी सुभाष वायळ . तालुक्यातील सासखेडा येथे दि. ११/०४/२२ रोजी दु ०२:०० वाजता येथील जिल्हा परीषद शाळे समोर अवैध रित्या साठवुन ठेवलेल्या वाळु साठ्यातुन वाळु भरतांना टिप्पर क्रमांक MH-21BG-4027 चे चालक व मालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जण हे महसुल पथकातील तलाठी महेंद्र प्रभाकर साळवे तलाठी सज्जा दुधा ता मंठा जि जालना यांना अवैध रीत्या वाळु भरतांना आडळुन आले महसुल पथकातील तलाठी कारवाई करतील म्हणुन टिप्पर चालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जणांनी तलाठी साळवे यांना धमदाटी करून टिप्पर मधील वाळु खाली करून तेथुन पळुन गेले.म्हणुन तहसीलदार मंठा यांच्या आदेशाने तलाठी साळवे यांनी सदरील आरोपींच्या विरूद्ध मंठा पोलीस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा व अवैध वाळु चोरीचा गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी (१)पवन सुभाष राठोड वय २४ वर्ष रा नायगांव ता मंठा टिप्पर चालक यास ताब्यात घेवुन टिप्पर चालकाच्या म्हणण्याप्रमाणे टिप्पर मालक विजय उत्तम चव्हाण वय ४२ वर्ष रा हिवरखेडा सध्याचा पत्ता तळणी फाटा रोहाऊस यांच्या राहत्या घरासमोरून टिप्पर क्रमांक MH-21-BG-4027 हे टिप्पर ज्याची अंदाजीत किंम

झोयाअनम चा पहिला रोजा

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतुर येथील नाईकवाडी गल्ली येथील रहिवासी झोयाअनम शेख जफर या चिमुकुलीने जीवनातील पहीला रोजा ठेवल्याने  परिसरातील  भरभरुन कौतुक केले रखरखत्या उन्हात या लहान चिमुकुलीने जीवनातील पहीला रोजा पूूर्ण केला रोजेचीं रूढी परंपरा असल्याने मुस्लिम समाजातील लहान लहान मुले मुली रोजा ठेवतात व आपल्या जीवनात सुख समृद्धी भेटवे अशि ईश्वर चरणी प्रार्थना करीत आल्हा कडे नत्मसतक होऊन प्रार्थना करतात सगळ्यासाठी दुवा ची मागणी करुन रोझा उघडतात।

शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलींचा सत्कार संम्पन

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे बळीराजा करिअर अकॅडमी,खरपुडी जि. जालना या संस्थेच्या वतीने ई. 11 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी कोचिंग क्लास घेण्यात येणार आहेत. यामध्ये NEET, JEE, MHCET या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेने जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली होती.             या कठीण असलेल्या परीक्षेत आनंद माध्यमिक विद्यालय परतूर च्या विद्यार्थिनी झाशी राजेभाऊ जगताप , श्रावणी राजकुमार तांगडे , पूजा भारत मंडपे या उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक प्रशांत वेडेकर , अनुसया गारकर , विक्रम भांडवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थान राजकुमार तांगडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेभाऊ जगताप , एकनाथ कदम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकुमार तांगडे म्हणाले की, मुलीच्या यशस्वीते बद्दल आई-वडिलांचा सत्कार होणे याचे मोल होऊ शकत नाही.या यशाचे श्रेय शिक्षक व मुलींचे आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले. कार्यक्रमाचे सूत्रस

राज्यातील दोन लाखावर नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी दोन मे 22 पासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन ....प्रलंबित मागण्याबाबत प्रदीर्घ काळापासून सरकार तोडगा काढत नसल्याने घेतला आंदोलनाचा पवित्रा......

प्रतिनिधी हनुमंत दवांडे  महाराष्ट्रातील 400 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतीचे दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी 2 मे 22 पासून महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे.  महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने व नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ऑनलाइन बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय कायम केला आहे...  2 सप्टेंबर 2021 रोजी नगरपालिका प्रशासन मुंबई यांच्याबरोबरच प्रदीर्घ बैठक होऊन त्याबाबत आश्वासने दिली मात्र ठोस कारवाई केली नाही.  दरम्यानच्या काळात संघर्ष समितीने वेळोवेळी नगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नगरविकास मंत्र्यांकडे या मागण्यांबाबत पाठपुरावा केला परंतु मागण्यांबाबत ठोस निर्णय झालेला नाही.  राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शंभर टक्के वेतन कोषागार मार्फत मिळावे, राज्य सरकारने सहाय्यक वेतन अनुदान ऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे ,दहा- वीस -तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्

दुकान जळीत प्रकरणी आकात यांनी केली 21 हजारांची मदत

Image
परतूर प्रतिनधी हनुमंत दंवडे दि.२७ - शॉर्टसर्किटने किराणा दुकानास आग लागून मोठे नुकसान झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांनी दुकानदार शेख अयाज यांना 21 हजार 101 रुपयांची आर्थिक मदत केली.यामुळे पीडित दुकानदारास दिलासा मिळाला.    शहरातील गाव भागातील लड्डा कॉलनीत शेख अयाज यांचे किराणा दुकान आहे.या दुकानावरच शेख यांची उपजीविका चालते.परंतु सोमवारी (दि.25) अचानक शॉटसर्किट होऊन दुकानास आग लागली.क्षणार्धात आग संपूर्ण दुकानात पसरून दुकानातील किराणा सामान जळून खाक झाले.त्यामुळे करावे तरी काय असा प्रश्न शेख यांना पडला.उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते हतबल झाले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल भैया आकात यांच्या कानावर टाकली.आकात यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेख अयाज यांना 21101/- रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.  यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक काळे,नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखिल काजी,विजय राखे, आरेफ अली, रियाज कुरेशी, कदिर कुरेशी ,

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मध्ये होणाऱ्या सभेला परवानगी न देण्याची मागणी., परवानगी दिल्यास आत्मदहन करणार मंठा येथे नागरिकांनी दिले निवेदन.

Image
मंठा - सुभाष वायाळ दि.२७ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न देण्याची मागणी मंठा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले की सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या स्वार्थासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे.जातीवादी चे राजकारण करीत आहे.व शांत महाराष्ट्र राज्याला पेटविण्याचे काम करीत आहे. मुंबई येथिल सभेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या मस्जिद वरील भोंग्याबबात व अजान बाबत नवा वाद निर्माण करुन सभेत प्रक्षोभक भाषण करुन हिंदु मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.व समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या आहे. राज ठाकरे भर सभेत मुस्लीम समाजाच्या विरोधात चेतावनी खोर भाषण खुले आम करीत आहे. व पवित्र अजानच्या विरोधात मस्जिदीसमोर भोंगे लावुन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याची धमकी देत आहे.त्यामुळे हिंदु मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन महाराष्

टेम्पो - हायवाची जोरदार धडकतळणी- लोणार मार्गावर अपघात : टेम्पोतील चालकाचा मृत्यू

Image
 तळणि प्रतीनीधी रवि पाटील तळणीकर तळणी : टेम्पो- हायवाची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेम्पोच्या चालकांचा मृत्यू तर हायवातील चालक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ११ वा. तळणी - लोणार मार्गावरील वडगांव सरहद्द पाटीजवळ घडला.    सचिन खंदारे कानडी       नवनाथा कोकाटे लोणारकडे जाणा-या हायवा क्र . एम एच २१ बी यु ८८५५ व तळणीकडे येणाऱ्या टेम्पो क्र. एम एच ३७ बी १७२४ यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात टेम्पो चालक सचिन विष्णू खंदारे ( २२ वर्ष ) रा. कानडी, ता. मंठा यांच्या मृत्यू झाला. तर हायवातील चालक जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच तळणी चौकीचे पोलीस नाईक रखमाजी मुंडे व पोलीस कॉन्स्टेबल जी एस कातकडे महसूलचे तलाठी नितीन चिंचोले यांनी घटनास्थळावर भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलवले तर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वाळू वाहतुकीचा दुसरा बळी ... गेल्या चार दिवसातील हा दुसरा अपघाती बळी असून दहीफळ खंदारे येथील नवनाथ कोकाटे या विस वर्षीय तरुणाचा सुध्दा उपचारादरम्यान मूत्यू झाला मागच्या महीन्यात जास्त मागणी नसल्याने शेगाव पंढरपूर रस्त्यावर वाळूची वाहतूक

पोलीस ठाणे मंठा येथे रोजा इफ्तार पार्टी संपन्न

Image
मंठा- सुभाष वायाळ दि.२७ पोलीस ठाणे मंठा येथे सर्व धर्मीय जाती सलोखा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मागील काहि वर्षात कोरोणाच्या महामारीत कोणतेच सार्वजनिक कार्यक्रम घेता आले नाही.          पण या वर्षी कोरोणाच्या परीस्थितीवर मात करण्यात काहि प्रमाणात यश आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम,उत्सव, जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभुमीवर सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.आणी या महिन्यात मुस्लिम बांधव कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्याचा थेंब हि न पीता रोजे/उपवास धरतात अल्लाहाची इबादत/प्रार्थना करतात.म्हणुन मुस्लिम बांधवाच्या रमजान महिन्यानिमित्त मंठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजयजी देशमुख यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे साहेब उपविभागीय परतुर तसेच परतुर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री.श्यामसुंदर कोठाळे साहेब व शहरातील सर्व धर्मीय नागरिक तसेच उपनगराध्य, नगरसेवक, पञकार, डाॅक्टर,वकिल,व शहरातील प्रतिष्ठित नागरीक व सर्व पोलीस बांधव उपस्थित होत. Hide quoted text ---------- For

जिद्द चिकाटीच्या जोरावर कु. सायली भिमराव हाके हिने महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा (MPSC)सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रीत अधिकारी) Gr-B या पदावर मारली बाजी

Image
प्रतिनिधी हनूमत दंवडे  गाव सांगोला ता.सांगोला जिल्हा. सोलापूर येथील सायली भीमराव हाके हिने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमपीएससी सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी ग्रेड बी ) या पदावर निवड झाली आहे सायली हिने पहिली ते बारावी शिक्षण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगोला येथे झाले डिग्री शिक्षण राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे झाले सायली हाके हिचे वडील सायली दोन वर्षाची असताना भीमराव हाके यांचे निधन झाले व सायली हाके यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखाच्या डोंगरातून सावरून आई व भाऊ यांनी सायलीला साथ देऊन शिक्षणासाठी खंबीरपणे सायलीच्या पाठीमागे उभे राहून सायलीच्या शिक्षणासाठी आईने व भावाने भरपूर कष्ट व मेहनत करून सायलीला शिकवण्यासाठी मेहनत केली आज सायलीला वडील नसून सायली हिने आपल्या आई व भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी या पदावर जाण्याची जिद्द ठेवली आज खरोखर सांगायचे म्हटले तर सायली एक गरीब घराण्यातील मुलगी आहे.   ती लहान असताना तिचे वडील त्यांना सोडून गेले तिच्या पाठीमागे आईने व भावाने त

ब्राह्मण समाजाची अमोल मिटकरी यांच्या विरोधात परतूर पोलीस ठाण्यात तक्रार,मिटकरी ने फुकट चे ज्ञान पाजळू नये ब्राह्मण समाजाची संतप्त प्रतिक्रिया,ब्राह्मण समाजा विषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांना तात्काळ अटक करा

Image
वीषेश प्रतिनिधी वीठ्ठल कूलकर्णि ब्राह्मण समाजाच्या विषयी द्वेषपूर्ण भाष्य करणाऱ्या अमोल मिटकरी यांना गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी परतूर येथील बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे परतूर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात ब्राह्मण समाजाने आपल्या तीव्र भावना व्यक्त करतात समाजाचे तुष्टीकरण करून समाधान समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र रचणाऱ्या ब्राह्मण द्वेषी अमोल मिटकरी यांना लोकप्रतिनिधी आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नसून भारतीय घटने समोर सर्व जाती धर्म समान असतानाही विशिष्ट जातीच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या मिटकरी ना आमदार या घटनादत्त पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा अशीही मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे हिंदू धर्मातील प्रत्येक प्रथा चालीरीती परंपरा विषयी नियमितपणे गरळ ओकत सदैव प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर रेणुका दास पुराणिक, कमलाकर रोहिनकर, जगन्नाथ सोनखेड़कर, द

२९ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन मंठा येथे होणार आयोजन

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ दि.२५ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन तारीख 28 व 29 मे रोजी मंठा येथे होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मंठा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत 29 वे साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक , मराठवाडा सरचिटणीस अनिल खंदारे , जालना जिल्हा अध्यक्ष कुलदीप रुघे , भरत मानकर ,प्रा.गौतम वाव्हळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या संमेलनात ग्रंथदिंडी , उद्घाटन समारंभ , परिसंवाद , चर्चासत्र , कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात होणार आहेत. या साहित्य संमेलनात देशभरातून 400 साहित्यिक सहभागी होणार आहेत. तसेच या अगोदर सांगली , रत्नागिरी, नवी मुंबई , गोंदिया , बारामती या ठिकाणी संमेलन संपन्न झाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.याप्रसंगी शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

. श्री.क्षेत्र संस्थान देवमाळ आंबा- मसला येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात प्रारंभ....

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील मसला येथे अखंड हरिनाम सप्ताह आरंभ झाला असून यामध्ये काकडा, भजन, ग्रंथराज ,ज्ञानेश्वरी पारायण, व भागवत पुराण कथा, वाचन गाथा, भजन ,हरिपाठ ,रात्री नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन प्रवचन व जागर कार्यक्रम मोठ्या उत्साहाने भाविक भक्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये तल्लीन होऊन गेलेले आहेत        .तसेच नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन प्रवचन व जागर कार्यक्रम दररोज सुरू आहे. कीर्तनाचे पहिले पुष्प श्री. ह. भ .प दगडुबा महाराज दाते, कीर्तनाचे दुसरे पुष्प श्री .ह .भ. प विशारद रामेश्वर महाराज नरवडे, कीर्तनाचे तिसरे पुष्प श्री. ह .भ. प भागवताचार्य श्याम महाराज, कीर्तनाचे चौथे पुष्प श्री. ह .भ. प शिवाजी महाराज भोसले, कीर्तनाचे पाचवे पुष्प ह-भ-प शोभा ताई चव्हाण कीर्तनाचे सहावे पुष्प ह .भ. प विनोदाचार्य गणेश महाराज जाधव, कीर्तनाचे सातवें पुष्प श्री ह. भ. प भागवताचार्य चंद्रकांत गुंजकर महाराज . यांचे कीर्तन रुपी सेवा असणार आहे. सात दिवस पण तिचे यजमान श्री .वैजनाथ राव माने आंबा, श्री .रमेश गोरे परतुर, श्री. पंडितराव शेंडगे मापेगाव, अनिल राव काळे

वाळूच्या टेम्पोला धडकून दुचाकी स्वार गंभीर जखमी

Image
तळणी : प्रतिनिधी रवी पाटील दुचाक  स्वारा ची वाळूच्या टेम्पोला धडकून गभीर जखमी झाल्याची घटना तळणी येथील पूर्णा पाटीजवळ घडली असून दोनही गंभीर जखमीना जालना येथे उपचारासाठी पाठवले असल्याची माहीती तळणी बीटचे जमादार सुभाष राठोड यानी सांगीतले           दोनही तरुण दहीफळ खंदारे येथील असून त्याची नावे सांरंग काळे व मनोज असल्याची माहीती तळणी पोलीसांनी दीली घटना घडताच तळणी पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेऊन अडकलेल्या वांहनांना रस्ता सुरळीत करून दिला दुचाकीस्वाराचे नियञण सुटल्याने चुकीच्या दिशेने जाऊन वाळूच्या च्या टेम्पोवर धडकल्याचे प्रत्यक्ष्य दर्शीने सांगीतले अपघात होताच घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती सदर वाळूने भरलेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखडी दुभाजकला अडकला असल्याने तो काढण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न चालू होते सदर घटनास्थळाचा पंचनामा करून व जखमीची माहीती मिळवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया तळणी पोलीस ठाण्यात चालु होती आशी माहिती एस ओ घोडके पोलीस शिपाई यानी दिली

जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा खोराड सावंगी विजेता तर आन्वीचा संघ उपविजेता

Image
मंठा-प्रतिनिधी सुभाष वायाळ दि.२४ बालेवाडी, पुणे येथे मे २०२२ मध्ये होणाऱ्या ४८ व्या राज्य अजिंक्यपद कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी जालना जिल्हा कबड्डी असोसियशनच्या वतीने प्रनुसरा नगर, मंठा येथे २३ रोजी आयोजित जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मंठा तालुक्यातील खोराड सावंगीचा संघ विजेता ठरला तर बदनापूर तालुक्यातील आन्वीचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन युवानेते राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले तर याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पालवे, गणेश खवने, सतीश निर्वळ, विठ्ठल काळे, प्रसाद बोराडे, गणेश शहाणे, विजय घोडके, दत्ताराव खराबे, गंगाराम हावळे, नारायण दवणे, राहुल वाव्हळे, नंदकिशोर खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत जिल्हाभरातून कुमार गटातील चौदा कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला तर कुमारी गटातील संघांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. यावेळी राहुल लोणीकर यांनी जालना जिल्ह्याच्या संघाने राज्य अजिंक्यपद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आपल्या क्रीडाकौशल्य पणास लावावे असे आवाहन केले.  या निवड चाचणी स्पर्धेत पंजाब वाघ, बाबासाहेब मंडाळे, राजू

इमर्जन्सी लोडशेडिंग च्या नावाखाली जनतेचा छळ वीजवितरणने थांबवावा-संपत टकले,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण ला भाजपाचे निवेदन

Image
प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने जनतेचा छळ चालवला असून रात्री-बेरात्री केव्हाही लाईट घालवण्याचे पाप वीज वितरण करीत असून श्रीष्टी सर्कल मध्ये एक दिवस आड विद्युत पुरवठा केला जात असल्याने नागरिकांसह शेतकरी हवालदिल झाला असून बागायती क्षेत्राला या वीज वितरण च्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले संपत टकले यांनी म्हटले आहे आज भाजपा च्या वतीने इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली चालवलेला सावळागोंधळ थांबवावा यासाठी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा छळ न थांबवल्यास आमचे सर्वोच्च नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संपत टकले यांनी यावेळी वीज वितरण ला दिला पुढे बोलताना संपत टकले म्हणाले की राज्यातील आघाडी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे पाप करू नये उन्हाळ्याच्या दिवसात इमर्जन्

परतूर नगरपालिकेच्या वाढीव घरपट्टी वरून भारतीय जनता पार्टी आक्रमक,कार्यालयीन वेळेत अधिकारी गैरहजर असल्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातच मांडला ठिय्या,शहरातील अवास्तव घरपट्टी विरोधात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात करणार आंदोलन,घरपट्टी वाढीस प्रशासना सह तत्कालीन नगराध्यक्ष जबाबदार*==

Image
प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे परतूर नगरपालिकेचा वास्तव घरपट्टी वाढी च्या मुद्द्यावरन भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून अवाच्या सवा घरपट्टी वाढ झाल्याने शहरात नागरिकांनी घरी बांधावीत का नाही असा सवाल उपस्थित करीत उपविभागीय अधिकारी,नप मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले संबंधित घरपट्टी वाढीस तत्कालीन नगराध्यक्ष व प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पार्टी प्रणित नगर विकास आघाडी नगरसेवकांनी सदरील घरपट्टी वाढीच्या प्रस्तावाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून स्थगिती मिळवली होती मात्र स्थगिती नंतर संशयास्पद एजन्सीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी पुढाकार घेतला मात्र नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीला फारसे महत्त्व न दिल्यामुळे आज ही वेळ आली आहे खरेतर घरपट्टी ची वाढ करताना 17 टक्के वाढ अपेक्षित होती मात्र प्रत्यक्षात ही वाढ पाच पटीने अधिक असल्यामुळे शहरातील नागरिकांना घरपट्टी मुळे डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे अशाप्रकारची संतप्त प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्य

जिल्ह्यातील अपंग निराधार वयोवृद्ध यांची पेन्शन बँक खात्यात जमा करावी___ अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे        परतुर तालुकयातील व जिल्ह्यातील अपंग निराधार वयोवृद्ध यांची गेल्या चार महिन्यापासून शासनामार्फत दिली जाणारी मासिक पेन्शन झालेली नाही तरी ,अपंग वयोवृद्ध यांचे जीवन हे पेन्शनवर अवलंबून असून व शासनामार्फत दिली जाणारी पेन्शन सुद्धा चार महिन्यापासून मिळालेली नाही तसेच दुसरीकडे महागाई वाढत असून जीवन जगणे कठीण होत आहे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे आज अपंग व वृद्ध यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे            तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी वैयक्तिक लक्ष घालून जिल्ह्यातील तहसीलदार साहेबांना अपंग व वयोवृद्ध यांची मासिक पेन्शन बँक खात्याम ध्ये जमा करण्याचे आदेश द्यावेत असे प्रसिद्धी पत्रकामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी म्हटले आहे

पारडगाव येथील आठवडी बाजारातील अतिक्रमण हटवा...रा. काँ. नेते शिवाजी भालेकर यांची मागणी.

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे घनसांगी तालुक्यातील पारडगाव येथील आठवडी बाजारात पार डगाव येथील काही विघ्नसंतोषी लोकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून त्यामुळे पारडगाव येथे येणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने येथील आठवडी बाजारातील अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी पार डगाव येथील रा. काँ. नेते शिवाजीराव भालेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे          यासंदर्भात घनसावंगी चे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पारडगाव येथे महाराष्ट्रातला सर्वात प्रसिद्ध असा बैल बाजार भरत असतो त्यामुळे या बाजारात दूरवरून शेतकरी आणि व्यापारी जनावरे खरेदी करण्यासाठी येत असतात परंतु पार डगाव येथे आठवडी बाजाराला अतिक्रमणाचा विळखा झाला असून येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि व्यापाऱ्यांना त्या प्रमाणात त्रास होत असून प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवावे नसता पार डगाव येथील नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवाजी भालेक
Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे शासनाच्या गृह विभाग सहसचिव व्यंकटेश भट यांनी आज दिनांक 20 रोजी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेले आहेत त्यामध्ये चंद्रपूर येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अतुल कुलकर्णी हे जालना येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदलून येत आहेत तर जालना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची अप्पर पोलिस आयुक्त म्हणून पश्चिम प्रादेशिक विभाग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

ऊस वेळेत जात नसल्याने शेतकरी हतबल, शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा

Image
आष्टी/प्रतिनिधी सुधाकर जाधव परतूर तालुक्यातील श्रद्धा एनर्जी. मॉ बागेश्वरी साखर कारखाना येथील अनागोंदी कारभारामुळे काऱ्हाळा व लिंगसा शिवारातील ऊस लागवड शेतकरी हतबल झाला आहे.कारखान्याच्या गलथान कारभाराला वैतागून शेतकरी उपोषण करण्याच्या पावित्र्यात आहे.गेल्या वर्षी डिसेंबर जानेवारी, फेबरुवारी,मार्च,2021 मध्ये खोडवा ऊसाची नोंद असून,आज रोजी त्या ऊसाला 15 ते 16 महिने झाले आहेत. परंतु कारखान्याच्या नियमानुसार तोड येऊनही कारखान्याने ऊस तोड केली नाही         त्या संदर्भात शेतकरी यांनी कारखाना येथील कर्माचारी यांना वेळोवेळी व्यक्तिगत व सामूहिक भेट देऊन, खोडवा ऊस तोडण्याची विनंती केली. परंतु त्यांनी आमाच्या विनंतीस मान न देता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचे काम केल्याचा आरोप शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. वेळेत ऊस तोडणी न झाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून,मोठे आर्थिक नुकसान झाल्याने , आत्महत्या करण्याची वेळ आम्हा शेतकऱ्यावर आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम अंतील टप्प्यात असून,आम्ही शेतकरी हतबल झाल्याने, स्थानिक

हेलस येथे शाळा प्रवेश पूर्व तयारी मेळावा संपन्न

Image
 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ दि.20/04/2022 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हेलस येथे इयत्ता पहिली शाळा प्रवेश पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम अगोदर वाजत गाजत गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा राजेभाऊ खराबे यांच्या हस्ते फीत कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले .या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर शिक्षक ,अंगणवाडी ताई व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी काम पाहिले.                                नोंदणी-उंची- वजन ,शारीरिक विकास ,बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास ,भाषा विकास ,गणन पूर्व तयारी याबाबत बालकांकडून कृती करून घेण्यात आली व साहित्य वाटप करण्यात आले .माता पालकांना मार्गदर्शन करण्यात आले .साहित्याचा वापर करून हसत खेळत बालकांनी सहभाग नोंदवला. मेळाव्याला पालकांचा व बालकांचा प्रतिसाद चांगला होता. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दीपक खराबे,दगडूबा पाटील खराबे ,साहेबराव खराबे,सतीश खराबे ,राजेभाऊ खराबे ,भारतराव खराबे, केशवराव खराबे, दत्तराव खराबे,नारायण

परतुर नगरपालिकेच्या घरपट्टी वाढी विरोधात राष्ट्रवादीचे लक्षणिक उपोषण

Image
परतूर,प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतूर नगरपालिका प्रशासनाने वाढवलेल्या घरपट्टी च्या विरोधात बुधवारी (ता. 20) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.                  यावेळी मुख्यआधिकरी याना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, तत्कालीन नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांच्या कार्यकाळात कर वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. जी कर वाढ करण्यात आली आहे ती सामान्य जनतेला न परवडणारी आहे. या करवाढीला तत्कालीन नगरसेवक अंकुश तेलगड यांनी विरोध देखील केला होता.असे पण या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर मा नगराध्यक्ष विनायक काळे,अंकुश तेलगड,विजय राखे, संतोष चव्हाण, आरिफ अली,कदिर कुरेशी,सत्तार कुरेशी, संजय राऊत,परवेज देशमुख,शिवशंकर स्वामी,रजाक कुरेशी आदींच्या साह्य आहेत. दर चार वर्षाला घरपट्टी ची करवाढ करणे अनिवार्य असते. तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत ठराव घेऊन ही करवाढ करण्यात आली आहे. ही कर वाढ नियमबाह्य नाही.  सुधीर गवळी ,मुख्याधिकारी, परतूर नगरपालिका प्रशासना

निर्धास राठोड सरपंचपदी कायम

Image
आष्टी प्रतिनीधी सूधाकर जाधव  ग्रामपंचायत हस्तूर तांडा चे सरपंच निर्धास राठोड यांच्या विरुद्ध रावसाहेब आढे यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे सरपंचाने कुटुंबातील सदस्याच्या नावे धनादेश दिला म्हणून विवाद अर्ज दाखल केला होता व जिल्हाधिकारी जालना यांनी विवाद अर्ज मंजूर करत सरपंच पद निरर्ह ठरवले होते सदरील निर्णयाच्याविरुद्ध सरपंच यांनी विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात स्थगिती अर्जासह अपील दाखल केले होते .        स्थगिती अर्जावरील युक्तिवादानंतर सरपंचाचे व भावाचे कुटुंब हे वेगळे आहे व शिधापत्रिका देखील वेगळी आहे अशा सर्व बाबींचा विचार करत जिल्हाधिकारी जालना यांच्या निर्णयास स्थगिती देत निर्धास राठोड यांना ग्रामपंचायत हस्तूर तांडा च्या सरपंच पदी कायम ठेवले आहे . राठोड यांच्या वतीने विधिज्ञ वैभव कुलकर्णी यांनी काम पहिले .

परतुर येथे भीम शाहिर साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम

Image
परतुर प्रतिनीधी हनूमत दंवडे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आर सी सी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक   24 /04/2022 वार रविवार रोजी संध्याकाळी सात वाजता रेल्वे स्टेशन येथे प्रबोधनकार भीम शाहिर  साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला आहे        तरी तालुक्यातील सर्व भीम अनुयायांनी संविधान प्रेमी लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान आर सी सी मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळच्या वतीने करण्यात येते आहे   

जारचे पाणी ; गंदा है पर ठंडा है यह------------------ अशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी : पाण्याच्या गोरखधंद्याला आळा घालण्याची गरज---------------------------------------------

Image
मंठा प्रतिनिधी  सुभाष वायाळ  मंठा शहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पण ; थंडपाणी विक्रीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे.यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने पाण्याचे जार विक्रीची गल्लीबोळात दुकानदारी थाटण्यात आली आहे. कमी खर्चात,कमी जागेत चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून आता पाणी विक्रीकडे बघितल्या जात आहे. सुरुवातीला शुद्धीकरणाचे प्लान्ट टाकून मिनरल वॉटरचे जार विकणारे मोजकेच व्यावसायिक होते.परंतु, भूगर्भातील पाणी उपसून केवळ थंड करुन विकण्याला जास्त खर्च लागत नसल्याने आता पाणी विक्रीचा व्यवसाय शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली पहावयास मिळतो.यात पाण्याच्या शुद्धीबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही.        बोअरवेलद्वारे आलेले पाणी मशिनद्वारे थंड करून जारमध्ये भरले जाते. तो जार सध्या तीस ते चाळीस रुपयात विकल्या जात आहे. नागरिकही दिवसेंदिवस या थंड पाण्याची मागणी करीत असल्याने पाणी विक्री जोरात आहे. विशेषत: विविध कार्यक्रम, सोहळे, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक उत्सवासह शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि दुकानांमध्येही आता जारमधील थंड पाणी वापरले जात असल्याने पाण

शेतकऱ्याची मुलगी कु.मिनल राजू गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेट-बी या पदावर उंच भरारी राज्यभरातून कौतुक

Image
   प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील कु.मिनल राजीव गावंडे यांची एमपीएससी 2019 परीक्षा सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेट-बी या पदावर निवड झाली आहे. ह्या वडगाव येथील असून गावामध्ये शाळा नसल्यामुळे यांचे शिक्षण धामणगाव रेल्वे येथे झाले प्राथमिक शिक्षण श्रीमती हरीबाई भागचंद्रजी विद्यालय धामणगाव रेल्वे येथे झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धारे येथे झाले.   स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्रो.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च बडनेरा अमरावती येथून केली. (College topper gold medalist 2019) मध्ये पहिल्याच प्रयत्नात सार्वजनिक बांधकाम विभाग या मध्ये सहाय्यक अभियंता ग्रेट- b म्हणून निवड झाली.   मी माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील माझे भाऊ यांना देते कारण शेतामध्ये काम करून त्यांनी मला शिक्षणासाठी पैसे पुरवले माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे हे सर्व जे उभे राहिले आहे ते माझे वडील व माझे भाऊ माझे यांच्यामुळे झाले आहे.   माझे बहिण व भाऊ मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे व माझी बहीण ही मेकॅनिकल इं

महेश भालेकर यांची पारडगाव येथील राशन दुकानावीरो धात तक्रार अर्ज तहसील कार्यालय घनसावंगी यांना सादर..

 प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे घनसावंगी तालुक्यातील पार डगाव येथील रहिवासी महेश नामदेव भालेकर यांनी गावातील रेशन दुकानदार असेफा सर फरोउद्दीन यांनी मागील चार महिन्यांमध्ये केवळ एक वेळेस रेशन वितरित केले आहे तसेच हे दुकानदार जनतेचे ऐकून घेत नाहीत. त्यांना वेळेवर रेशन देत नाही त्यांना रेशन मागण्यासाठी गेले असता उलट-सुलट भाषेचा वापर करून उत्तर देतात व ते नेहमी सांगतात की मी गावाचा आहे किंवा माझ्या मागे काम आहे असे उत्तर देऊन राशन देण्यास नागरिकांना टाळाटाळ करतात. काही निराधार कुटुंबांना केसरी कार्ड प्रमाणे रेशन वितरित केल्या जात आहे गावकरी मंडळी कडून शासन दरापेक्षा अधिक प्रमाणात शुल्क सुद्धा राशन दुकान दुकानदाराकडून आकारले जात आहे हा सर्व प्रकार तक्रारी अर्ज मार्फत तहसील कार्यालय घनसावंगी येथे महेश भालेकर यांनी दिला आहे तहसीलदार हे चौकशी करून या राशन दुकानावरती काय कारवाई करणार आहेत याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे..

सुमित भंडारी व संतोष काळे यांच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुमित भंडारी व संतोष काळे,सय्यद तय्यब यांच्याकडून उपवास धारकांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मोंढा भागातील तय्यब मोबाईल शॉपच्या आवारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते  यावेळी शहरातील उपवास धारक, व्यापारी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती  यावेळी सुमित भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की देशामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाजाने एकोपा जपला पाहिजे आणि सर्वधर्मीय सण उत्सव मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन साजरे केले पाहिजे यावेळी माजी नगरसेवक आबासाहेब कदम,शिवसेना शहराध्यक्ष दत्ता सुरुंग,राहुल कदम,सचिन खैरे,अंकुश काष्टे,पांडुरंग सोळंके,अविनाश कुलकर्णी, मदन सोळंके,हबीब शेख,जुबेर खतीब,राजेश गोरे,राहुल काळे,शत्रूधन सोळंके,सुरेश नवगिरे,नसीर शेख,शेख अकबर,शेख अथर,सचिन धुमाळ,भारत धुमाळ,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

मनसे विद्यार्थी सेनेकडुन' भोंग्याच्या आवाजावर हनुमान चालीसा

Image
मंठा प्रतिनीधी सुभाष वायळ  तालुक्यातील मौजे जयपुर काकडे येथे मनसे संस्थापक अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे सिध्देश्वर काकडे यांनी जयपुर काकडे येथील हनुमान मंदिर व श्री.राम मंदिर परिसरात भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण केली व दररोज सायंकाळी व सकाळी हनुमान चालीसा भोंग्याच्या आवाजावर वाजवत राहिल आसी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी दिली आहे.          महाराष्ट्र राज्यासह देशभरातील हिंदु बांधवांकडुन राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळत आसल्याने हि आनंदाची बाब आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. हनुमान चालीसामुळे हिंदु धर्मीय सामाजिक कार्यात एकवटतो व तसेच यामुळे हिंदु धर्माच्या नियमांचं पालन देखील होत आहे. व समाजात भक्तीभावाचं वातावरण निर्माण होत आसल्याने जालना जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक गावा गावात हनुमान चालीसा दररोज पठण करायला हवी आहे. आसे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. (फोटो सह बातमी)

मावियां फातेमा, ईरमंफातेमा व इम्तियाज नाईकवाडी चा पहिला रोजा,

Image
परतुर प्रतीनीधी हनूमंत दंवडे येथील एस एम ओ कम्प्यूटर चे मालक समीर नाईकवाडी व प्रसिद्ध हाँटेलचे मालक ईसतियाक नाईकवाडी यांच्या तीन ही चिमुकुल्याने आपल्या जीवनात पहीला रोजा ठेवल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून रोजा ठेवल्याने त्याचा इस्लाम धर्म नुसार खूप महत्त्वा आहे         आनेक ठिकाणी मुस्लिम समाजातील लहान लहान मुले मुली आपल्या जीवाची पर्वा न करता पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवण्याची प्रथा रोजा ठेऊन नियमाचे पालन करतात या तीनही मुले लहान वयाचे असताना त्यांच्या आई वडीलनी रोजेचीं महत्वा काय आहे ती दाखवून दिली त्याच प्रमाणे या चुलत बहीण भावाने रोजा ठेवल्याने   आई कौसरफातेमा, वडील समीर नाईकवाडी,  आजोबा सज्जाद भाई नाईकवाडी,  व दैनिक राज सम्राट चे तालुका प्रतिनिधी सरफराज नाईकवाडी,  शेख साबेर सर, यांनी त्यांना रोजा ठेवल्या मुळे चिमुकल्याचे कौतुक केले

कर्जबाजारी युवक शेतकऱ्यांची गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर येथील युवक शेतकरी दिनकर हरिभाऊ मुजमुले वय 35 वर्षे याने गुरुवार ता.14 रोजी रात्री 7: 30 च्या सुमारास स्वतःच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे  घटनेची माहिती मिळताच घटस्थापस्थळी पोलीस शिपाई श्री. अशोक गाढवे,श्यामुअल गायकवाड, श्री कोकाटे यांनी भेट देत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले .उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईक स्वाधीन करण्यात आला. सतत शेतीपिकाचे होणारे नुकसान,नापिकता यामुळे हे पाऊल उचले असल्याचे बोलले जात आहे         भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पाच लाखाच्या वर कर्ज असल्याचे समजते याचबरोबर काही खाजगी सावकाराचे पण कर्ज होते. खाजगी सावकाराने तगादा लावल्याने हे पाऊल त्यांनी उचले आसाअंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, पत्नी आई असं  परिवार आहे. घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे करीत असल्याची माहिती श्री अशोक गाढवे यांनी द

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूलमध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Image
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे शहरातील न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूलमध्ये दि १४ एप्रिल २०२२ रोजी महामानव भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्राचार्य सॅम वर्गीस, शिक्षक गोविंद पाठक, लीना सॅम, सुरेखा ताजी, किशोरी पाठक, मिना गोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय वाटप

Image
 परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे तालुक्यातील दैठणा खू  येथील जिल्हा परिषद शाळेत तक्षशीला बहुउदेशीय सेवाभावी संस्थाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी महामानव भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सवने, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सोनाजी गाडेकर, तक्षशिला बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास भदर्गे, समता बांधकाम पर्यवेक्षक महाविद्यालयाचे प्राचार्य विशाखा भदर्गे हे होते. विद्यार्थ्यांने डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली. याप्रसंगी तक्षशिला बहुउदेशीय संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व बिस्कीट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य ब्रम्हंनंद तायडे, अतिष गाडेकर, शिक्षणप्रेमी दत्ता सवने, दौलत सवने, अलका दवंडे, व मुख्याध्यापक एस बी भापकर, शिक्षक एच. ए कायमखानी, ए. के. माने, पी. डी. जोगदंड, ए. के. चौधरी, बि. के कराड, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

भीम जयंती कशी साजरी करणार? डीजेच्या तालावर की विचारांच्या?--एडवोकेट महेंद्रकुमार वेडेकर

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याची संधी दोन वर्षे मिळाली नाही याची खंत अनेकांना आहे. त्यामुळेच या वर्षी दोन वर्षाचा खर्चडा डीजे वाजून बेधुंद होऊन नाच-गाणे करुन करणार अशा पोस्ट सोशल मीडियावर हजारोच्या संख्येने फिरत आहे         त्यामुळे दोन वर्षात शिक्षण ,आरोग्य ,आणि रोजगार वर काय परिणाम झाला याची थोडी खंत आम्हाला नाही. त्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1941 आणि ब्रिटिश गव्हर्नर मध्ये कामगार मंत्री असताना काय काय कामगार कायदे बनवून देशातील असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना दिले यांची थोडी सुद्धा जाणीव आजच्या असंघटित कष्टकरी कामगारांना नाही .तो झोपडपट्टीत राहणारा ग्रामीण गावातील खेड्यात पाड्यात राहणारा असंघटित कामगार भीम जयंती एक दिवस नाही तर पाच दहा दिवस साजरी करण्याकरता परवानगी मिळावी म्हणून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी वाद घालत आहेत .जागरूक अधिकारी विचारतात दहा दिवस कोणते उपक्रम राबवणार याची लेखी माहिती देण्यात यावी. आणि वर्षभरात कोणकोणते सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक, कला ,क्रीडा, प्रोत्साहन देणारे प्रेरणादायी उपक्रम राबविले त्याची

सुदामा गरीब असू शकतो माञ तो कदापीही दारीद्री होऊ शकत नाही - हभप मनमोहन महाराज गिरी

Image
तळणी ( रवि पाटील ) येथून जवळच असलेल्या ऊस्वद येथे अंखड हरीनाम सप्ताहच्या निमीत्याने श्रीमद संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते ह भ प मनमोहन महाराज गीरी आंळंदी याच्या, सुमधुर वाणीतून पंचक्रोशीतील भावीकांनी मोठा लाभ घेतला पूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या व्यकेश्वर मंदीराच्या प्रागणात या कथेचे आयोजन ऊस्वद ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले होते कथा समारोप प्रसंगी महाराजानी श्रीकृष्ण आणि सुदामा याच्या जीवनचरिञावर प्रकाश टाकला  अनेक कथाकार सुदामाला दारीद्री संबोधतात पण सुदामा कधीच दारीद्री नव्हते जगाच्या मालकाचा सखा कसा काय दारीद्री असू शकतो भगवान कृष्णा वर असलेली श्रध्दा व विश्वासामुळे सुदाम देवानी कठीणातल्या कठीण प्रसंगाला सुध्दा सामोरे गेले भगवान श्रीकृष्णाचा प्राणप्रिय सखा सुदामा गरीब असू शकतो माञ तो कदापीही दारीद्री होऊ शकत नाही सुदाम देवा जवळ स्वःतचे कुठलेही ऐश्वर्य नसले तरी दान देण्याची प्रवृत्ती माञ आताच्या समाजाला आदर्श घेण्यासारखी आहे  अनेक दीवसाच्या भेटीने भगवतांला सुध्दा आपल्या आयुष्यातील मिञाच्या भेटीचा विरह सतत ञासदायकच जाणवत होता प्रत्यक्ष्य भेटीत भगव

परतूर शहरात महात्मा फुले व भारतरत्न , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमर हजारे यांचे जाहीर व्याख्यान ...

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे उपेक्षितांचे जीवनमान उंचावण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य व मार्गदर्शक आणि प्रेरक ठरतात      आधुनिक युगातही त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा दिवसेंदिवस वाढत असून महापुरुषांच्या विचाराचे पाठबळ पाठीशी असल्यास वेगळ्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही प्रसंगाला सहजतेने सामोरे जाता येईल म्हणून आजच्या तरुण पिढीला या व्याख्यान मालेची नितांत गरज आहे म्हणून परतूर शहरात क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त परतूर शहरात बीड येथील सामाजिक चळवळीतील काम करणारे युवा वक्ते अमर हजारे यांचे दिनांक 13/4/2022 वार बुधवार रोजी जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला परतूर परिसरातील बंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान दीपक मुजमुले व सिद्धार्थ बँड यांनी केले आहे.

येणार्‍या पालिका निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार – ऐ जे बोराडे

Image
परतूर प्रतिनिधी  हनुमंत दवंडे  येणाऱ्या काळात पालिका निवडणुकासाठी पक्ष प्रमुखाकडून कोणत्याच पक्षाची युती केली जाणार नसल्याचे भूमिका त्यांनी जिल्हाप्रमुखाच्या बैठकीत घेतली असल्याने येणार्‍या पालिका निवडणुकीत शिवसेना कोणत्याच पक्षाची युती करणार नसून स्वबळावर लढणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी दिली ते परतूर येथे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे परतूर तालुकाप्रमुख अशोक आघाव, मंठ्याचे अजय अवचार, सुर्दशन सोळंके, दत्ता सुरूग, विदुर जईद, भगवान सुरूंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना बोराडे म्हणाले की शिवसेनेच्या व आघाडी सरकारच्या माध्यमातून रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून परतूर तालुक्यासाठी दहा कोटी रुपये निधि आणून पाणंद रस्त्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात रस्त्याचा कामातून विकास होणार आहे. शहाराच्या विकासासाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, विनोद घोसाळकर, यांच्याकडे मागणी करून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा प्रमुख ऐजे बोराडे, मोहन अग्रवाल, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, बाबासाहेब तेलगड

श्रीराम मंदिर संस्थानचा अनोखा श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.

Image
परतुर विशेष प्रतिनिधी विठ्ठल कुलकर्णी     दोन वर्षाच्या कोरोना महामारीमुळे साधेपणाने साजरा झालेला श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.गेल्या दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षी अभुतपुर्व गर्दी या उत्साहाला होती. श्रीराम मंदिर संस्थान परतुरचा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास अनेक वर्षाची परंपरा आहे यावर्षी सुध्दा हा जन्मोत्सव उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा झाला.सोंगाव्दारे रामाचा जन्मोत्सव सोहळा दृश्य रुपात भक्तासमोर दाखवला जातो ज्याव्दारे प्रत्यक्ष जन्मोत्सव सोहळा अनुभवन्याचे भाग्य आपणास लाभत आहे अशी श्रीराम भक्ताचा भावना निर्माण होते.ईस्काँनच्या भक्तमंडळीने भजनाचे आयोजन करुन या उत्साहात भर घातली.आपल्या खुमासदार शैलीत धनंजय जोशी सर यांनी कथा सांगितली.आजच्या या रामनवमीच्या मुर्हुतावर शिवसेना जिल्हा संघटक मोहनजी अग्रवाल यांनी भक्ताची गरज लक्षात घेता 10 लाख रु.सभामंडप देण्याची घोषणा केली.यावेळी सोहळ्यात दशरथ राजे-कांतराव देशमुख,सुमंत प्रधान-शुभम सातोनकर,वशिष्ट ऋषी-प्रसाद बाप्ते,गंधर्व-शिवाजी काटे,शृंगऋषी-संजय सातोनकर,कांदे महाराज-स