Posts

समाज माध्यमातही होतोय मतदानाचा जागर

Image
परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण   दि.२१ - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाप्रमाणेच आता समाज माध्यमावरही जास्तीत जास्त मतदान करावे याबाबत आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मतदान करण्याबाबतचे संदेश समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात झळकू लागले आहेत.व्हॉटसऍपच्या स्टेटसवर मतदान करण्याचे संदेश ठेवले जात आहेत.     लोकसभा निव्वडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला आहे.दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. परभणी मतदारसंघात येणाऱ्या परतूर विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेली निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.    लोकसभा निववडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने आटोकात प्रयत्न केले जात आहेत. शहरातील प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी बॅनर लावून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ' स्विप ' कार्यक्रमांतर्गत बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या माध्यमातून

ओंकारेश्वर आश्रमात गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर अत्याधुनिक नुतन गोशाळा इमारतिचे अनावरण

Image
तळणी प्रतिनिधी ( रवि पाटील ) तळणी येथून जवळच असलेल्या  ओंकारेश्वर आश्रमात गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर अत्याधुनिक नुतन गोशाळा इमारत अनावरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न. मंठा तालुक्यातील ओंकारेश्वर संन्यास आश्रम देवगाव खवणे या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून जालना जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी नियमितपणे या ठिकाणी येत असतात.गुरुवर्य परमश्रद्धेय श्री.महंत भागवत गिरीजी महाराज(मठाधिपती श्री क्षेत्र नांगरतास संन्यास आश्रम ) यांच्या प्रेरणेने व श्री. महंत बालक गिरीजी महाराज (अध्यक्ष सद्गुरू श्री सेवागिरीजी सेवा ट्रस्ट, संस्कार प्रबोधिनी गुरुकुल /विद्यालय )यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकारेश्वर आश्रमात समाज हित डोळ्यासमोर ठेऊन वेगवेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी, दिशादर्शक सामाजिक उपक्रम सेवेकरी भक्तांच्या सहकार्याने राबवले जातात. ओंकारेश्वर आश्रमात पूर्वीपासून गो पालन केले जाते परंतु या गायीसाठी गोशाळा अस्तिवात नव्हती. या ठिकाणी गोशाळा उभी राहावी अशी भागवत गिरीजी बाबाजीनी इच्छा व्यक्त केली तेंव्हा महंत बालक गिरीजी महाराज यांनी

परतूर शहरातील मलंग शाह चौक ते अंबा रोड दरम्यानचे अतिक्रमणावर हातोडा

Image
  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी अंबा व इतर ग्रामीण भागातील नागरिकांनी परतुर शहरात प्रवेश करताना आणि मलंग शाह चौकातील झालेल्या अतिक्रमणामुळे झालेली अडचण  प्रशासनासमोर मांडली आणि योग्य कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार करण्याचा इशारा दिला होता    याची गांभीर्याने दखल घेत नगरपालिका प्रशासनाने आज रोजी या रस्त्यावरील सर्व हातगाडे पान टपऱ्या रस्त्यावर साचलेले लोकांचे बांधकाम साहित्य सर्व हटवण्यात येऊन रस्ता मोकळा केला या कार्यवाहीमुळे मलंग शहा चौकाने आणि तेथील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला सदर कार्यवाही माननीय मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली या कामी नगरपरिषद कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे अनिल पारीख,काशिनाथ जाधव ,सुदाम खंदारे,अशोक पावर इत्यादी स्वच्छता कर्मचारी यांनी पार पाडली

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतूर च्या वतीने गटवीकास अधीकाऱ्यांना निवेदन

Image
 परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण   येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद च्या वतीने दि. 18 एप्रील रोजी वीवीध मागण्याचे एक निवेदन देण्यात आले      शिक्षकांचे आनेक देयक बाकी असून त्या मधे शिक्षकांचे वैद्यकीय देयक व , थकीत देयक , आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त देयक बाकी असल्या मुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतूर चे तालूकाध्यक्ष दिलीप मगर यांच्या नेतृत्वखाली गटवीकास अधिकारी कार्यालयात एक निवेदन दिले दिलेल्या निवेदनावर कल्याण बागल पाटील,विष्णू कदम,विशाल ढवळकर,ए. एच.देशमुख,मोरे बी.आर.,बी.बी.आन्सारी,शे.ताहेर म.जफर, तोटे,पाईकराव, आढे,रामेश्वर हातकडे,कैलाश गाडगे,नदिम अन्सारी,म.इक्कबाल,भारसाकळे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

परतूरमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना ' होम वोटिंग ' प्रशिक्षण

Image
परतूर कैलाश चव्हाण  दि.१७ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदारांना स्वतःच्या घरून मतदान करता येणार आहे.हे मतदान कसे करावे याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१७) प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार विजयमाला पुपलवाड, श्रीकांत गादेवाड यांची उपस्थिती होती.दरम्यान,२० एप्रिल रोजी प्रत्यक्ष घरी जाऊन निवडणूक विभागाचे कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत.     लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ८५ पेक्षा जास्त वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी यासाठी सूक्ष्म निरीक्षक,सेक्टर अधिकारी,पर्यवेक्षक,बीएलओ इतर निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. ----------------------------------------    यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वेगळे वैशिष्टय म्हणजे निवडण

सेवानिवृत्त कर्मचारीही करणार मतदान जनजागृती

Image
परतूर प्रतिनिधी  कैलाश चव्हाण    दि.१६ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने कसोशीने प्रयत्न केले जात असून मंगळवारी (दि.१६) नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचे आवाहन करणार असल्याचा विश्वास यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवला.      यासंदर्भात निवडणूक नोडल अधिकारी प्रशांत रोहनकर म्हणाले की,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समाजात मानाचे स्थान असते. त्यांच्या शब्दाला किंमत असते.हा मुद्दा लक्षात घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याचे तसेच निवडणूक विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.   यावेळी विष्णुपंत खंडागळे, सुभाषराव बागल, शेख मोईन, सुनील स्वामी, रमाकांत बरीदे, सत्यनारायण सोमाणी, अशोक डिघोळे, खतीब, सुलताना बामुसा आदी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह स्विप कक्षाचे सदस्य कल्याण बागल उपस्थ

निवडणूक निरीक्षकांची परतूरला भेट

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दि.१५ - लोकसभा निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी सोमवारी नवोदय विद्यालयात सुरु असलेल्या प्रशिक्षणास भेट दिली.     लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरु आहे. नियुक्त करण्यात आलेले कर्मचा-यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.दि.१५ व १६ एप्रिल असे दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी प्रशिक्षण सुरु असताना निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी प्रशिक्षण ठिकाणी भेट देऊन एकंदरीत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार विजयमाला पुपलवाड, चिंतामण मिरासे, विनोद भालेराव,संतोष पवार,रुस्तुम बोनगे, बाबासाहेब तरवटे यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.