Posts

Showing posts from January, 2021

मंठा येथील महावीर जीनींगवर कार्यवाही करण्याची मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

मंठा (प्रतीनीधी)येथील तळणी रोडवरील महावीर जीनींगकडुन शेतकर्यांची फसवणुक व अर्थीक लुट होत आसल्याचा आरोप *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंठा तहसिलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महावीर जीनींगमध्ये शेतकरी राजा सोबत फसवणुकीचे काम सुरू आसुन शासनाच्या हमी भावापेक्षा खुप कमी भावाने या जीनींग चालकांकडुन शेतकर्यांचा कापुस खरेदी केला जात आहे. म्हणुन शेतकर्यांवर अन्याय होत आसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वर्षी अतिवृष्टी ने कापुस पिक कमी आले होते. कारण या वर्षीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची खुप मोठी नासाडी झाली होती. राज्य व केंद्र सरकारने शेतकर्यांना योग्य प्रकारे अर्थीक मदत केली नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या कारणामुळे शेतकरी अर्थीक आडचणीत आहे.  यातच जिनींग,आडत हे शेतकर्यांची फसवणुक करुन लुटतांना दिसत आहे. शेतकर्यांनी नेमकं जगायचं कसं आसा सवाल मनसेचे काकडे यां...

भारतीय रेल्वे देत आहे नवीन सुवीधा तुमचे लगेज तुमच्या घरा पर्यंत पोहचवेल

Image
नवी दिल्ली :भारतीय रेल्वे ने आता   प्रवाशांचा प्रवास सुखवर आणि आरामदायी व्हावा यासाठी .नेहमी वेगवेगळ्या सुविधा सुरु करत असते. यावेळी तर भारतीय रेल्वेने तुमची बॅग घरापासून रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनपासून घरी घेऊन जाण्यासाठी विशेष सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने आता प्रवाशांना त्यांची बॅग किंवा लगेज उचलण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण रेल्वे प्रशासन ते काम करणार आहे (Indian Railways end to end luggage parcel service). पश्चिम रेल्वे प्रशासनाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सर्वात आधी ही सुविधा सुरु करण्यात आली. NINFRIS च्या अंतर्गत ही सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हीच सुविधा आगामी काळात सर्वच रेल्वे स्टेशनवर सुरु करण्याचं ध्येय आहे.  यासुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना Bookbaggage.com वेबसाईटवर बुकिंग करणं आवश्यक असेल. तिथे प्रवाशांना लगेजची साईज आणि वजन यासंबंधित माहिती द्यावी लागेल. या माहितीच्या आधारावर ...

चांगली बातमीः रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये बदल होणार आहेत, रेल्वे प्रवाशांना ही सुविधा मिळेल

Image
  नवी दिल्ली (प्रतीनीधी)  रेल्वे प्रवाश्यांसाठी चांगली बातमी आहे.  आता लोकांना प्रवासादरम्यान पाण्याची चिंता करण्याची गरज भासणार नाही किंवा पाणी भरण्याच्या चक्रात त्यांची ट्रेन हरवणार नाही.  मोठ्या गाड्यांच्या बोग्यांमध्ये मिनी आरओ प्लांट उभारण्याची तयारी रेल्वेकडून केली जात आहे.  यामुळे प्रवाशांना मोफत पाणी मिळणार आहे.  रेल्वे बोर्डाने झोनल रेल्वेकडून मोठ्या गाड्यांची यादी मागविली आहे.  खरं तर, बर्‍याच वेळा ट्रेन सुटल्याच्या भीतीने प्रवाश्यांनी पाणी न भरता ट्रेनमध्ये चढले आणि मग अस्वस्थ व्हायला किंवा पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागलं.  गर्दी आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्रास अधिक असतो.  ही समस्या लक्षात घेता रेल्वेने रेल्वेमध्ये आरओ वॉटर मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे.  पहिल्या टप्प्यात ही मशीन अशा मोठ्या गाड्यांमध्ये बसविण्यात येणार आहे जे कमी स्थानकांवर थांबतात आणि जास्त गर्दी करतात.  मशीन बसवल्यानंतर प्रवाशांना हलत्या ट्रेनमध्ये सहज पाणी मिळू शकेल.  होय, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना रिकाम्या बाटल्या...

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

Image
मंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत

Image
परतूर तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे          

भाजप युवामोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केलेल्या संघटनात्मक कामाचा त्रैमासिक कार्य अहवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर,राहुल लोणीकर यांना देवेंद्रफडणवीसांची कौतुकाची थाप

Image
परतूर प्रतिनिधी  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीचा व युवा मोर्चाने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचा त्रैमासिक अहवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल लोणीकर यांनी केलेल्या मराठवाड्यातील संघटनात्मक बांधणीच्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना युवकांना सन्मान प्राप्त करून देणारी आत्मनिर्भर भारत ही योजना तळागळातील युवांच्या आर्थिक उन्नतीचे साधन बनावी यासाठी राहुल लोणीकर यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवत संघटन मजबुती मध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान राहुल लोणीकर यांनी केले असल्याचे देवेंद्रजी फडणवीस यावेळी म्हणाले. राहुल लोणीकर यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमापासून आत्ताच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीपर्यंत चा...

भारतीय क्रांती सेनेच्या वतीने हळदि कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

Image
औरंगाबाद (शहर प्रतिनिधि-)- भारतीय क्रांतीसेना प्रणित राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये जगदंबा महिला बचत गट, (जय भवानी नगर,) अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट (जय भवानी नगर)राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट ( राजनगर) पंचशील महिला बचतगट (राजनगर) जय भवानी महिला बचत गट (राजनगर) दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर) दुर्गा माता महिला बचत गट (विश्रांती नगर) आदु महिला बचत गटांनीआपला सहभाग नोंदविला                  या कार्यक्रमाचे आयोजन  दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर )यांनी केले या कार्यक्रमाला भारतीय क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष वनिता ताई चव्हाण ,जिल्हा अध्यक्ष संगीताताई हनवते,  जिल्हा कार्याध्यक्ष मंगलताई उफाडे ,अमृता सावंत ,कार्याध्यक्ष सखुबाई खकाळ ,जय भावनगर वार्ड अध्यक्ष मंगल ताई राऊत, सचिव उषाताई घोंगडे पंचफुला ताई कुराडे ,वंदनाताई राठोड ,महिमा सिंग, निधी सिंग ,मंदा...

परतुर तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रुपये 7 हजार 478 लाभार्थयांच्या खत्यात जमा,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे वृध्द अपगांना मिळाले मानधन

Image
 परतूर प्रतिनिधी - श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील 7  हजार 478 वृद्ध, अपंग, विधवा, निराधार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रु मानधन  जमा झाले असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वृद्ध,अपंग, निराधारांना मानधन सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी  विविध ठिकाणी कॅम्प लावून मिळावे घेऊन लाभार्थ्यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा केला होता त्यामुळे परतूर तालुक्यातील 7 हजार 478 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून लाभार्थ्यांकडून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धन्यवाद दिले जात आहे.                    परतूर तालुक्यामध्ये श्रावण बाळ योजनेचे अ गटातील लाभार्थी 2835 असून  त्यांना 65 लाख 63 हजार 700  तर ब गटामध्ये 90 लक्ष 90 हजार  रुपयाचे अनुदान जमा झाले आहे तर संजय गांधी योजने अंतर्गत 198  विधवा लाभार्थ्यांना 2 लाख 77 हजार 200  व अपंग लाभार्थ्यांना 1 लाख 56 हजार 800  तर  निराधार योजनेतील 1333  लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 26 लाख 66 हजार...

प्रलंबित मागण्यासाठी ब्राम्हण समाजाचे पळी-ताम्हण आंदोलन. , परतुरःसमाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी ब्राम्हण समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करुन उपजिल्हाधिकारी कार्यालय परतूर येथे निवेदन सादर केले.

Image
परतूर (प्रतीनीधी ) आखाली भारतीय बहूभाषीक ब्राम्हण महासंघाच्या वतीने उपवीभागिय अधीकारी कार्यालया समोर पळी ताम्हण वाजवून आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात  समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे,तरुण व व्यावसायिकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन 1000कोटीची तरतुद करावी,जिल्हास्थानी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह स्थापन करावे,ब्राम्हण समाजाविषयी जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर शिक्षा करणारा कायदा करावा,स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा,पुरोहित्य करणाऱ्यास 5000/मानधन सुरु करावे.कुळात गेलेल्या जमीन परत देण्यात याव्या आदी मागण्यासाठी समाजातर्फे यापुर्वी आझाद मैदान येथे आंदोलन,तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन आमदार-खासदार यांना स्मरण पत्राद्वारे जागो सरकार-जागो असे अभियान राबवण्यात आली,हिवाळी अधिवेशनात सुध्दा समाजाच्या मागण्यावर विचार झाला नाही,तेव्हा समाजाने या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पळी-ताम्हण वाजवुन आंदोलन केले. शासनाने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असे निवेदनात म्हटले,निवेदनावर अँड.भगवानरावजी कवडी,अँड.डोल्हारकर,अँड.ए...

अवैध धंदयाना मिळते का पोलीसाचे पाठबळ? नागरीकांचा सवाल

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी सह परिसरात सध्या अवैध धंदयानी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असुन तरुण या अवैध धंदया मुळे भरकटत असुन पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने या धंद्याना खत पाणी मिळत असल्याची चर्चा जनतात मोठ्या प्रमाणात आहे तळणी बस स्टँन्ड परिसर या सपूर्ण विळख्यात अडकले आहे अवैध देशी दारू गुटखा ऑनलाईन मटका अशा धंद्याना सुरवात झाली असल्याने तरूणाई या  पैश्याच्या मोहापाई यामध्ये अडकत आहे  यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो गेल्या दोन तीन वर्षापासुन बंद  असलेले हे धंदे हळहळू सुरु झाले असुन गावातील काही जागरूक तरुणांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून पोलीस प्रंशासनांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले पंरतू त्याकडे फारशे गंभीरतेने घेतले गेले नाही तळणी बस स्टँन्ड परिसरात तळीरामांचा येणाऱ्या जाणाऱ्याना त्रास हा नित्यांचाच झाला असुन त्यात आणखी नविन अवैध धंदयाची जोड मिळाली कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांची बदली होताच हळू हळू या धंदयानां पोलीस प्रशासना कडूनच पाडबळ मिळत असल्याने या व्यवसायावर कारवाईची टाळाटाळ होत आसल्याचे नागरीकांकडून बोले जात आहे दीव...

परतुरात शूक्रवारी श्रीराम मंदिर निर्माण समर्पण महाअभियान भव्य शोभायात्रेचे आयोजन , दि.१५ जानेवारी पासून तालुक्यातील १११ गावातील ४५ हजार कुटुंबांपर्यंत ११०० कार्यकर्ते पोहचणार

Image
 परतूर(प्रतिनिधी) - समस्त भारत वासीयांचे आदर्शवत महापुरुष श्रीराम यांचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहावे, असे भारतातील प्रत्येकाला वाटत होते, ते श्रीरामाच्या मंदिर निर्माणाचे ध्येय आता लवकरच पूर्ण होणार आहे.यानिमित्ताने श्रीरामाच्या मंदिर निर्माणात देशभरातील प्रत्येक कुटुंबातील, प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागावा म्हणून संबंध देशभरात दि.१५ जानेवारी पासून या महाअभियानाची सुरुवात होत आहे.या अनुषंगाने परतूर शहरात शूक्रवार.१५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रेल्वे गेटपासून लेझीम पथकासह व वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही शोभायात्रा पोलीस स्टेशन मार्गे दसमले चौक मार्गे नारायण दादा पवार चौकात जाणार आहे.या यात्रेचा समारोप नारायण दादा पवार चौकात होणार आहे.गुरुवार दि.१५ जानेवारी पासून पुढील एक महिना दि.१५ फेब्रुवारीपर्यंत या अभियानाच्या निमित्ताने परतूर शहरातील व तालुक्यातील ११०० कार्यकर्ते ३ उपखंड,११ मंडलातून १११ गावातील ४५ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मंदिर निर्माणाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.शहरात ग...

खांडवीवाडी येथील जि.प.शाळेत जंयती साजरी

Image
परतूर (प्रतीनीधी)12 जानेवारी रोजी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवीवाडी येथे जंयती साजरी करण्यात आली या प्रसंगि  शाळेत आनेक विद्यार्थानी जयंती निमित्त आपले  मनोगत व्यक्त केले आजच्या काळातील जिजाबाईने कश्या प्रकारे वागावे व कश्या प्रकारे कार्य करायवे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले या जिजाउनी  आज जर पाहिले तर कोणत्याही क्षेत्रात मुलींना प्राधान्य आहे हे त्यांच्या मनोगतातून  व  उत्कृष भुमिकेतून संभाषण करून दाखवले                सक्सेस कोचिंग क्लासेस परतूरचे गजानन राहेकर सर यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.  यावेळी  मुख्याध्यापक.  सुदेवाड सर , भांडवलकर सर , सोनपेठ मॅडम, सतीश सर , निर्वल सर , गजानन सर, पाठक सर शाळेत सतत सहकार्य करणारे रोहिदास शेळके वीद्यार्थी उपस्थित होते

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व विवेकानंद जयंती निमित्त परतुरात युवा गौरव सन्मान वितरण संपन्न,विविध क्षेत्रातील युवक, युवतींचा करण्यात आला सन्मान,युवकांनी सतत कार्यमग्न राहून देशाचे नाव उज्वल करावे : -राहुल लोणीकर

Image
परतूर (प्रतिनधी) युवकांनी आपल्या अवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करत स्वतः बरोबरच देशाचे नाव उज्जवल करावे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी केले     ते परतूर येथे  राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त संपन्न झालेल्या युवा गौरव सन्मान वितरण समारंभा  प्रसंगी बोलत होते       या वेळी व्यासपीठावर व्यख्याते हरी कवडे, भाजपा ता अध्यक्ष रमेश भापकर, ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे, दया काटे ,हरिराम माने ,रंगनाथ येवले शहाजी राक्षे ,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले ,भाजपा युवा मोर्चा परतुर तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे, भाजयुमो मंठा तालुका अध्यक्ष अविनाश राठोड, डॉक्टर संदीप चव्हाण, डॉक्टर भक्ती नंद ,यांची उपस्थिती होती       पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज या महान विभूतींनी युवा अवस्थेमध्ये या देशाला आपले मोठे योगदान दिले होते याच आदर्शावर तरुणांनी आपले कर्तत्व सिद्ध करत आपले गाव जिल्हा राज्य देशाचे नाव लौकिक वाढवावे क...

भारतीय रेल्वे: रेल्वेने नियम बदलले, आता 9 महिन्यांसाठी रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा मिळवा, या अटी आहेत रेल्वेने सांगितले की, हेल्पलाईन क्रमांक 1 or 139 किंवा आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे काउंटरचे तिकीट रद्द केल्यासही कोणत्याही रेल्वे काऊंटरवर तिकिट जमा करण्याची मुदत प्रवासाच्या तारखेपासून 9 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Image
 नवी दिल्ली,08 जानेवारी 2021,  कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेने काउंटरवरुन बुक केलेले तिकिटे रद्द करण्याच्या आणि त्यांचा परतावा मिळवण्याच्या कालावधीची मुदत वाढविली आहे.  रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पीआरएस काउंटरची तिकिटे रद्द करण्याची आणि कोणत्याही काऊंटरकडून परतावा मिळण्याची मुदत 6 महिन्यांवरून 9 महिने करण्यात आली आहे.  भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 21 मार्च 2020 ते 31 जुलै 2020 दरम्यानच्या प्रवासासाठी तिकिट बुक केलेल्या लोकांना परतावा देण्यात येईल.  म्हणजेच, जर आपण 30 जुलैसाठी रेल्वेचे तिकीट बुक केले असेल तर आपण एप्रिलपर्यंत ते रद्द करू शकता आणि परतावा मिळवू शकता.  हा नियम फक्त रेल्वेने रद्द केलेल्या अनुसूची वेळ सारख्या गाड्यांच्या खरेदी केलेल्या तिकिटांवरच लागू होईल.  पहा: आज टाक लाइव्ह टीव्ही  रेल्वेने (भारतीय रेल्वे) माहिती दिली की हेल्पलाईन क्रमांक १ or or किंवा आयआरसीटीसी वेबसाइटद्वारे काउंटरचे तिकिट रद्द झाल्यास कोणत्याही रेल्वे काऊंटरवर तिकिट जमा करण्याची अंतिम मुदत प्रवासाच्या तारखेपासून months महिन्यांपर्यंत...

आणीबाणीतील बंद्यांना सहा महिन्यांचे थकीत पेन्शन आदा करा, औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयाचा आदेश*माजी मंत्री बबनराव लोनिकरांनी केले निर्णयाचे स्वागतमहाविकास आघाडी सरकारला चपराक,लोनिकरांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस यांच्या कडे मागणी लावून धरत सुरु केली होती पेन्शन*

परतूर, दि. 8 (प्रतिनिधी) : १९७७ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्ती व मृतांच्या वारसांचे थकीत सहा महिन्यांचे पेन्शन देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारला चपराक बसली असून, उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना स्वातंत्र्यसैनिकांच्या धर्तीवर आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना जुलै २०१८ मध्ये पेन्शन सुरू केली होती. या साठी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्त्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी लावून धरत पेन्शन अदा करण्यासाठी पाठपुरावा केला होता यानुसार एक महिना तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार रुपये, व त्यापेक्षा कमी तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा ५ हजार रूपये पेन्शन देण्यात येत होती. या निर्णयामुळे आणीबाणीत बंदीवास भोगलेल्या राज्यातील सुमारे ३५०० हून अधिक बंदीवान व मृतांच्या नातेवाईकांचा सन्मान झाला होता. तर ८०० बंदीवानांकडून केलेल्या अर्ज...

आता एखादा जिल्‍हा नव्‍हे तर संपूर्ण महाराष्‍ट्रातील पत्रकारांची मोबाईल अॅप मध्‍ये नोंदणी होणार आहे.संपूर्ण महाराष्‍ट्रातील प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधवांची फोटोसह माहिती सर्वांसाठी आता एका क्लिक वर उपलब्‍ध होणार आहे.

दि.६ जानेवारी (दर्पण दिन / पत्रकार दिन) रोजी "महासंपर्क अॅप" या मोबाईल अॅपचे निर्माता पत्रकार परवेज पठाण यांच्‍या आई सौ.फैमिदा व वडील श्री. इब्राहीम पठाण (जेष्‍ठ पत्रकार) यांच्‍या हस्‍ते लोकार्पण झाले. सदरील शुभारंभा पासूनच सशुल्‍क नोंदणीला सुरूवात झाली आहे.  महाराष्‍ट्रात पहिल्‍यांदाच अशा प्रकारचा अॅप लॉन्‍च झाला असून पहिल्‍यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पत्रकारांची माहिती अॅपच्‍या माध्‍यमातून नोंदणी केली जात आहे.  सदरील "महासंपर्क अॅप" मध्‍ये वर्तमानपत्र / पोर्टल / चॅनलचे नाव, लोगो अथवा टायटल बॅनर, थोडक्‍यात माहिती, पत्रकाराचे नाव, पत्रकाराचा फोटो, मोबाईल नंबर व पत्‍ता टाकण्‍यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, चांगली स्‍पीड, फुल स्‍क्रीन मध्‍ये माहिती, अनेक सुविधा तसेच वापरण्‍यास सहज व सोपा असलेला हा "स्‍वदेशी" अॅप आपणांस नक्‍कीच आवडेल यात शंका नाही.  योग्‍य प्रकारे नोंदणीला सुरूवात व्‍हावी यासाठी पहिल्‍या आठवड्यात म्‍हणजेच दि. ६ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या ४ जिल्‍ह्यातील पत्रकारांची नोंदणी होणार आहे. त्‍यानंतर संपूर्ण ...

न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने दर्पणदिनानिमित्त मान्यवर पत्रकारांसह गुणवंत कर्मचार्‍यांचा सत्कार' मोठ्या संख्येने उपस्थित रहा -विकासकुमार बागडी

Image
जालना : (प्रतीनीधी) ६ जानेवारी अर्थात् पत्रसृष्टीचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिन ! त्याच अनुषंगाने असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास संंबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशनचे जालना जिल्हा अध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे. या संदर्भातील प्रसिध्दी पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, बुधवार,दि.६ जानेवारी २०२० रोजी आयएमए हॉल, भोकरदन नाका, जालना येथे  सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास सुप्रसिध्द उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री घनशामसेठ गोयल, कैलासजी लोया, सतीषजी अग्रवाल, सुभाषजी देविदान,विनीत साहणी, विनयजी कोठारी, डॉ.ओमजी अग्रवाल, रवीसेठ अग्रवाल, तुलजेसभैय्या चौधरी, डुंगरसिंगजी पुरोहित,चेतनभाऊ कांबळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत! याच कार्यक्रमात पत्रकारितेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, पत्रकारितेसाठी समर्पित भावनेने वृत्तपत्र चालवले, वृत्तपत्र चालवण्याची मोठी कसरत केली आणि करत आहेत असे पत...

शेगाव पंढरपूर महामार्ग राजकीय जीवनातील मोठे यश : बबनराव लोणीकर यांचे तळणी येथे प्रतिपादन

Image
तळणी : (रवि पाटील ) माझ्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनातील शेगाव पंढरपूर मार्ग निर्मीतीचे  मोठे यश असुन त्यामुळेच मंठा परतूर मतदार संघाचे वैभव वाढले असुन रोजगार वाढीसाठी हा रस्ता नावलौकीकास येत असल्याचे त्याने सांगीतले  केद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या कडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी मोठा निधी मिळवून विकासाला चालना दिली असुन शेत जमीनी खरेदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली असुन भविष्यातील व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक होत असल्याने येणाऱ्या काळात मोठी रोजगार निर्मिती व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे  तळणी येथील डॉ रवि गोविदराव देशमुख यांच्या श्री कृपा हॉस्पीटलच्या उदघाटन प्रंसगी त्यानी उपस्थीतांना मार्गदर्शन केले तळणी हे मराठवाडा विदर्भाच्या टोकावरचे गाव असुन आरोग्य सुविधा मिळण्यास अनंत अडचणी आहेत सध्याच्या या रोगराईच्या काळात ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सुविधा उपलब्घ नसल्या तरी छोटी हॉंस्पीटल हे त्याच्यासाठी आधार आहेत रुग्न सेवा देता सेवा भाव जपूण रुग्नसेवा देणे गरजेचे आहे मोठ मोठी हॉस्पीटल ही गरीबांसाठी आर्थीक दुष्टया परवड नारी नसुन ग्रामीण भागातील डॉ...

माणसाने जीवन जगण्यात समतोल साधला पाहिजे ----सरपंच उद्धव पवार

Image
  तळणी/ प्रतिनिधी : मानवाला जीवनामध्ये तीन अवस्थांमधून जावे लागते, बाल्यअवस्था,तरुणपण आणि वार्धक्य या तीनही अवस्थांमधून जाताना आपण जे कर्म करतो त्याचे फळ निश्चितच मिळते असे प्रतिपादन तळणी येथील सरपंच उद्धव पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, मंठा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे यांच्या वाढदिवसानिमित्त तळणी येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार बोलत होते. वाढदिवसानिमित्त नेमिनाथ महाराज संस्थान मधील वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले तसेच मंठा येथेही ह भ प ज्ञानेश्वर महाराज  मदने माऊली यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनाही  मिष्ठान्न वाटप करण्यात आले. तळणी येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच उद्धव पवार यांनी सांगितले की, माणसाने गर्व अहंकार लोभ इर्षा आदिचा त्याग करून आनंदी जीवन जगावे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवतो असे सांगून त्यांनी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतर...

कलशाव रोहण : ऊस्वद येथील व्यकेश्वर महादेव मदीराचा कलशावरोहण सपन्न

Image
तळणी : ( रवि पाटील )येथून जवळच असलेलेल्या उस्वद येथील व्यकेश्वर महादेव मंदीराचा कलशावरोहणाचा कार्यक्रम सपन्न झाला गेल्या तीन दिवसापासुन ब्रम्हवृदाच्या मञघोषात हा सोहळा सपन्न झाला पूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या या हेमाडपथी मंदीराचा जीर्णध्दार गावकरी व पंचक्रोशीतील भावीकाच्या मदतीने करण्यात आला असुन बेचाळीस फुट उंचीचे भव्य दिव्य मखर यावेळी नव्याने बांधण्यात आले या प्राचीन मंदीराचा भांगवत स्कंदामध्ये सुध्दा उल्लेख आहे पुसद नगरी म्हणून असा नामोल्लेख भागवत स्कंदामध्ये आहे असे ग्रामस्थ सागतात  पुसद नावावरूनच नंतर उस्वद असे नामकरण झाले नवसाला पावणारा महादेव मंदीर मणून सपूर्ण मंठा तालुक्यात प्रसिद्ध आहे याच कलशावरोहण प्रसंगी ह भ प भगवान महाराज सेलुकर यांचे हरि कीर्तन ठेवण्यात आले होते  आपुला तो एक देव करूनी घ्यावा  तेने विणा जीवा सुख नोव्हे हेरती माईक दुःखाची जणीती नाही आदी अंती अवसान  या जगदगुरु तुकाराम महाराजाच्या गाथ्यातील अंभगावर सुंदर निरुपण केले आजच्या या कलयुगात देवाला आपलेसे करणारा खरा पुण्यवान कारण आज काल देवफक्त संकटे आल्यावर आठवतो माईक म्हणजे व्यर्थ तु...