Posts

Showing posts from November, 2022

परतूर उपविभागात कृषी पंप् वीज बिल वसुली मोहिमेस प्रतिसाद.

  परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण येथील महावितरण कंपनीच्या वतीने कृषी पंपाची वीज बिल वसुली मोहीम सुरु असून ग्राहक बिले भरून सहकार्य करत आहेत, परतूर उपविभागात एकूण 11600 कृषी पंप वीज ग्रहाक असून, 150 कोटीं रुपये थकबाकी आहे. या मोहिमे मध्ये 700 डिपींचा वीज पुरवठा खंडीत केला असून , आता पर्यंत 350 ग्रहकांनी बिले भरले असून् , 50 डिपीचा वीज पूर्वठा सुरु करण्यात आला आहे.  उपविभागा मधील सर्वच घरगुती, वाणिज्य , आयदयोगिक , व कृषी पंप विज ग्राहकांनी थकबाकी बिल भरून महावितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता निलेश बेंडाळे यांनी केले आहे.

प्रलोभनांना बळी न पडता गावच्या विकास करणाऱ्यांना निवडुण दया - अशोक साबळे

Image
परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण सध्या निवडणुकिचे गावागावात धुमशान सुरू आहे . यात अनेक उमेदवार जाहीर असून विविध खोटे प्रलोभने दाखवून मतदार बांधवांची दिशाभुल करून फसवणूक करतात . आज रोजी निवडणूक रिंगणात सरंपच पदावर उभे असणारे उमेदवार यांनी गावाच्या विकासासाठी कोणते योगदान दिले हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे . यामुळे मतदार बांधवांनी विचारपूर्वक कुणाच्याही भुलथापांना वळी न पडता गावया विकास करणारा उमेदवार निवडावा .  सन २० १७ - २०१८ ला गावातील शाळांत खोली बांधकाम भ्रष्टाचार उघड करून उर्वरित बांधकाम पुर्ववत सुरु केले. तसेच गावातील अंगणवाडी गावापासून 3किमी अंतरावर भरत असल्याने ति पूर्णवत गावात आणली . व सर्व बालकांना पोषन आहार मिळाला . गावच्या मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल ६ दिवस उपोषन केले . विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गावातील पाणी पुरवठा करणारी कोरडी विदीर आधिग्रहण घोटाळा उघड केल्याने गावाला पाणी मिळाले.           आज गावात शुद्ध मुकलब पिण्याचे पाणी नाही . गावात अंगणवाडी व्यवस्थित नाही . गावातील प्राथमिक शाळा गावापासून अंदाजे 3...

कपिल आकात यांनी सिनेट साठी बजावले मतदानचे हक्क

Image
परतूर प्रतीनधी कैलाश चव्हाण       डॉ. बानासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या नुकत्याच सीनेट सदस्य निवडीसाठी मतदान दि 26/11/2022 रोजी होत आहे या निवडणूकीत एकूण दहा सदस्य निवडून द्यायचे असून ओपन (खुला) प्रवर्गाता 5 सदस्य तर रिझरवेसन (आरक्षण) मधून 5 असे दोन्ही मिळून दहा सदस्या करीता पंसती क्रमाकाने मतदान करावे लागाते      परतूर येथे ला.बा .शास्त्री वरीष्ठ महावीद्यालय येथे मतदान केंद्र असून या केंद्रावर रा कॉ. चे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला

गौतमी पाटील विरुध्द' मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांची तक्रार दाखल

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात             डान्सर गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी आक्रमक भूमिका घेत सेवली पोलीस ठाणे मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांना सेवली पोलीस ठाणे मार्फत दिनांक २४ नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमी पाटील हिचे डान्स शो हे आक्षेपार्ह आहेत. आणि या डान्स मध्ये अश्लील हावभाव व अश्लील चाळे दिसून येत आहे.       हा सर्व प्रकार राज्यातील पोलीस बांधव यांच्या दुर्लक्षपणामुळे चालत असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केलं आहे. गौतमी पाटील हिच्या शो मध्ये अश्लील हावभाव आणि अश्लील चाळे यामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी युपी बिहार सारखी वाटचाल करेल का? आसा प्रश्नही मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केला आहे. गौतमी पाटील हिच्यावर कलम ५०९ म्हणजे अश्लील हावभाव करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल क...

जि .प.प्रशाला परतुर येथे शालेय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      दि.23नोव्हेंबर वार बुधवार रोजी जि प प्रशाला परतुर येथे तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी, क्रीडा संयोजक प्रमोद राठोड, क्रिकेट पटू संतोष शर्मा ,सम्राट अशोक मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष हिवाळे, राजू सुरसुरवाले, निलेश सरदार सर, विलास काकडे, परिमल सर व ब्राईट स्टार शाळेचे क्रीडा शिक्षक  गजानन कुकडे इ. मान्यवरांच्या हस्ते पार पडले.  तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग नोंदवला होता.14 वर्षाखालील मुलांमध्ये विवेकानंद इंग्लिश स्कूल या शाळेचा संघ विजयी झाला  पंच म्हणून शरीफ व आकश जाधव गुण लेखक किशोर ,प्रेम , पवार यांनी काम पाहिले असून या संघाची जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल निवृत्त क्रीडा संयोजक सरफराज कायमखानी, संयोजक प्रमोद राठोड, आशिष कन्सल सहाय्यक  विकास काळे व क्रीडा प्रसिद्धीप्रमुख  गजानन कुकडे सर यांनी अभिनंदन केले 

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लक्ष्मण नवले यांना सर्वाधिक मतांनी विजयी करा:- सचिन खरात,स्व.विनायकरावजी मेटे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष्मण नवले यांना प्रथम क्रमांकाची पसंती द्या :-सचिन खरात

Image
 परतुर (प्रतिनिधी) कैलाश चव्हाण  डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 साठी एकूण दहा जागेपैकी पाच जागा खुल्या वर्गासाठी आरक्षीत आहेत.*परिवर्तन पॅनलचे श्री. लक्ष्मण उत्तम नवले यांनी खुल्या वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे        .पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे *शिवसंग्राम चे उमेदवार लक्ष्मण उत्तम नवले* हे विद्यापीठाशी निगडित अडीअडचणीत बाबतीत सदैव तत्पर असून स्व.विनायकराव मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांचे हित बघितलेला आहे मेटे साहेबांच्या माध्यमातून सदैव विद्यापीठाचे प्रश्न व विद्यार्थीच्या अडचणी ते सोडवण्याचा काम केलेला आहे त्याच प्रमाणे काम करत आहेत *परिवर्तन पॅनलचे समन्वयक खंदारे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या प्रवर्गातून सर्व समाजातील विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ते सदैर करत आले आहेत. विद्यार्थ्यांची हालाखीची परिस्थिती त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी *मतदार बंधू बहिणींनो प्...

युवा वॉरियरच्या माध्यमातून २५ लाख युवकांना भारतीय जनता पार्टीचे जोडणार - भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,राहुल लोणीकर यांनी घेतलं कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन

Image
प्रतिनिधी समाधान खरात भारतीय जनता पार्टी प्रथम देश नंतर पक्ष व शेवटी स्वतः या भूमिकेतून काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ सबका विकास सबका विश्वास या हेतूने पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो हीच राष्ट्रनिष्ठा व जनसेवेचा वसा सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचावा यासाठी युवा वॉरियर्सच्या माध्यमातून येणारी नवी पिढी भारतीय जनता पार्टीची जोडण्याचा संकल्प युवा मोर्चा ने केला असून आगामी काळात महाराष्ट्रातील २५ लाख युवकांना युवावर यशच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची जोडण्याचा संकल्प कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या साक्षीने केला असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी मध्ये समाविष्ट होणारा युवा वर्ग यांना भारतीय जनता पार्टीचा इतिहास व तत्कालीन काँग्रेसची सरकारने केलेले अन्याय अत्याचार माहीत असावेत. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची युवा वॉरियर ही मूळ संकल्पना असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी व भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांच्या म...

वाहेगाव येथे हभप रुपालीताई सवने महाराज यांचे कीर्तन

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  तालुक्यातील वाहेगाव (सोपारा) येथे दि २२ नोहेंबर मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील *सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम हभप रुपालीताई रामेश्वर महाराज सवने* यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजीत कीर्तन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे यांनी केले आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्राईट स्टार इंग्लीश स्कुलचे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश, सााई अजय कांबळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Image
परतुर प्रतिनिधी अजय कांबळे  जालना येथील भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे दिनांक 18 नोव्हेंबर शुक्रवार रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत येथील ब्राईट स्टार इंग्लीश स्कुलचा विद्यार्थी साई अजय कांबळे इयत्ता आठवी याने स्पर्धेत बाजी मारत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मा.नगरसेवक बाबुराव हिवाळे,राजेश भुजबळ,राजेश खंडेलवाल संचालक शेख शब्बीर, श्री भालेराव, मुख्याध्यापक शंकर खनके सर्व शिक्षक वृंदासह ,तालुका पञकार संघ व राज्य मराठी पञकार संघाने अभिनंदन केले आहे संपादक तसेच पञकार अजय कांबळे यांचा साई मुलगा आहे.

भाजपा युवा मोर्चा व बंजारा ब्रिगेड कडून एकनाथ खडसे चा निषेद्

 

भाजयुवा मोर्चा व बंजारा ब्रिगेड कडून एकनाथ खडसे चा निषेध

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण         परतूर तालुक्यातील श्रीष्टी तांडा येथे राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव  च्या सभेमध्ये बंजारा समाज बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे की बंजारा समाज २किलो मटण व एक दारू ची बाटली मधे विकले जातात असे वक्तव्य करून एकनाथ खडसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील बंजारा समाजाचा आपमन केला      बंजारा समाजाबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल एकनाथ खडसे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल बंजारा समाजाकडून या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत आहे व याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल  एकनाथ खडसे यांनी संपूर्ण महाराष्ट्राची व बंजारा समाजाची माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या वेळी एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुर्दाबाद चे नारे देण्यात आले  या वेळी युवा नेते अर्जुन राठोड ,पत्रकार कैलास चव्हाण,नितीन राठोड,अजय चव्हाण , महेश राठोड,राहुल राठोड,उमेश राठोड, हे सर्व जण उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री एकनाथ ...

मंठा येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन,मंठा व परतूर येथे अनुक्रमे 15 - 15 कोटी रु ची क्रीडा संकुल

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या माध्यमातून मतदार संघासह जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय जागतिक पातळीपर्यंत न्यावे असा सल्ला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी खेळाडूंना दिला ते मंठा येथे आयोजित क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मतदार संघातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळावे यासाठी आपण मंत्री असताना अनुक्रमे मंठा व परतुर येथे अद्यावत अशी क्रीडा संकुल मंजूर करून घेतली होती साकारत असलेल्या क्रीडा संकुला साठी 15 - 15 कोटी चा निधी मिळवून दिला त्यापैकी मंठा येथील क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात असून परतुर येथील क्रीडा संकुलाचा ही प्रश्न लवकरच मार्गी लागेल या माध्यमातून अतिशय उच्च सुविधा ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध होणार असून राष्ट्रीय राज्य पातळीवर पात्र होण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था या क्रीडा संकुल मध्ये असल्यामुळे निश्चित प्रमाणे मतदारसंघातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर आ...

परतूर येथे नवीन दहा अंगणवाडी देण्याची नरेश कांबळे यांची मागणी

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण                                                     परतूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिव वाढत चालली आहे पण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा येथे खूप कमी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविका यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी करण्याची मागणी होत आहे तसेच शहरातील गरोदर मातांचे प्रमाण वाढत असून सुध्दा त्याप्रमाणात या महिलांना लसीकरण, तसेच इतर संदर्भसेवा मिळत नाहीत व नवजात बालक यांना सुद्धा लसीकरण, पोषक आहार तसेच संदर्भ सेवा पोचवणे अडचणीचे होत आहे.     यामुळे पोषक आहाराअभावी नवजात शिशू हे कुपोषित होण्याची शक्यता वाढत आहे. यामूळे आपण या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन परतूर शहराला नवीन दहा अंगणवाडीची मान्यता देऊन अंगणवाडी सेविका व मदतनिस भरती प्रक्रीया करून परतूर शहराची अडचण सोडविण्याची विनंती येथील सामाजिक कार्यकर्ता नरेश रामभाऊ कांबळे यांनी निवेदनाद्वारे आपणास केली आहे, नरेश कांबळे हे कित्येक वर्षापासून या मागणीचा...

परतूर येथे शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतुर येथे शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट सरसेनापती मा.  स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश नळगे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला  बोलताना महेश नळगे यांनी सांगितले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आज महाराष्ट्रातील मराठी माणूस सुरक्षित असून त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्र हा प्रगतिशील झालेला आहे         यावेळी शिवसेना वाहतूक संघटना तालुका अध्यक्ष रामजी सोळंके युवा तालुका समन्वयक राहुल कदम माजी शहराध्यक्ष गोविंद मुंदडा माजी युवा सेना शहर उपाध्यक्ष रूपेश व्होटकर संदिप पाचारे मंगेश भुसारे अनिल सोळंके गजानन मस्के विष्णूपंत सोळंके सचिन माकोडे बाबा मथुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

मॉ. बागेश्वरी साखर कारखान्याचा मोळी पुजनाचा कार्यक्रम संपन्न.

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण              श्रध्दा एनर्जी  अॅण्ड इंफ्राप्रोजेक्टस् प्रा.लि. मॉ. बागेश्वरी साखर कारखाना युनिट १ वरफळ ता. परतुर जि.जालना या साखर कारखान्याच्या नवव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ श्री अजय शिवाजीराव जाधव यांच्या शुभ हास्ते विधीवत पुजा करून मोळी टाकुन दि.१५/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाला. या प्रसंगी कारखाना परिसरातील शेतकरी श्री बाजीराव खरात, श्री संतोष दिंड, श्री. महादेव खरात, श्री विष्णु बेरगुडे, श्री विष्णुपंत निर्वळ, व कारखान्यातील आधिकारी जनरल मॅनेजर श्री काशीनाथ निर्वळ, वर्क्स मॅनेजर श्री मनोज नवनाळे, चिफ् इंजिनिअर श्री गजानन जाधव, चिफ् केमीस्ट श्री अशोक शेंडगे, शेती अधिकारी श्री पंडीतराव खंदारे, पी.आर.ओ. श्री आर. आर. निर्वळ, इलेक्ट्रीकल इंजिनिअर, श्री लहु बचाटे, श्री सुंदरराव देशमुख, श्री हाणुमंत मुंगळे, श्री राहुल माने, श्री ज्ञानेश्वर देशमुख, सुरक्षा आधिकारी श्री दिनकर लिपन, कर्मचारी व आधिकारी हाजर होते. कारखान्याचे हंगाम २०२२ - २३ या हंगामाची कारखान्याची गाळप क्षमता २५०० प्रति मेट्री...

धन्यवाद मोदीजी उपक्रमात भारतीय जनता युवा मोर्चा अव्वल,महिनाभराच्या कार्यकाळात भारतीय जनता युवा मोर्चा व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकरांची कौतुकास्पद कामगिरी - चंद्रशेखर बावनकुळे,भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ०४ लाख "धन्यवाद मोदीजी" उपक्रमाचे पत्र संकलन

Image
प्रतिनिधी समाधान खरात  भारतीय जनता युवा मोर्चा ने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली असून महिनाभराच्या कार्यकाळात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ०४ लाखापेक्षा अधिक पत्र संकलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २७ योजनांचे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन पत्र संकलन करण्यात आले अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे कौतुक केले. धन्यवाद मोदीजी या उपक्रमांतर्गत पत्र संकलनामध्ये ९९८३३ मतांची संकलन करून मराठवाडा प्रथम क्रमांकावर आहे तर पश्चिम महाराष्ट्र ६९२१६ पत्राचे संकलन करून दुसऱ्या क्रमांकावर आहे पत्र संकलनात उत्तर महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला असून ५९३४४ पत्रांचे संकलन उत्तर महाराष्ट्र ने केले आह चौथ्या क्रमांकावर विदर्भ विभागातून विदर्भ विभागाने ५८४७३ पत्राचे संकलन केले आहे तर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या कोकण विभागाने ५३६२० पत्रांच्या संकलन केले आहे रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ३,४०,४८६ एव...

मंठा येथे 10 कोटी रुपये किंमतीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाच्या इमारतीचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ शिक्षण हे वाघिणीचे दूध असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा मूलमंत्र ध्यानात ठेवून मतदार संघातील मंठा आणि परतूर येथे मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने अनुक्रमे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणत वस्तीग्रह इमारती बांधल्या असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते मंठा ता मंठा येथे मागासवर्गीय मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वस्तीगृहाच्या इमारतीच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी गेली 40 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत असताना दीन दलित पीडित दुबळ्यांची सेवा करताना आपल्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा फायदा मतदारसंघांमध्ये वाडी वस्ती तांड्यावर विकास कामे आणण्यासाठी उपयोग केला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले, मतदार संघातील दलित वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देताना 200 च्या वर गावांमध्ये दलित वस्त्यांमधील विकास कामे पूर्ण केली तसेच 200 च्या वर गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधली ...

यश ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट येथे बाल दिन उत्साहात साजरा

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण       तालुक्यातील सातोना येथील यश प्रायमरी इंग्लिश स्कूल तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सातोना येथे आज पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.       चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक शामीर शेख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बहुरूपी कैलास शिंदे व भारत शिंदे, विलास गोरे यांची उपस्थिती होती. यावेळी शामीर शेख, जयराम खंदारे यांनी चिमुकल्यांना मोलाचे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.तसेच बहुरूपीनी सुद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरपूर हसवले. मुलांनीही चाचा नेहरूविषयी मनोगत व्यक्त केली.   दरम्यान विविध पशु पक्ष्याच्या वेशभूशेत आलेल्या विद्यार्थ्यांनी बालमित्रांना संगीताच्या जोमात मनसोक्त आनंद दिला. यावेळी येथील शिक्षकांनी विविध खेळांचे आयोजनही केले होते.अनेक मुलांनी प्राण्यांची आवाज काढली. कोणी गाणी म्हणली. यात शिक्षकांनीही जणु बालपणात जा...

परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेला विजेचा प्रश्न सोडवा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी,परभणी जिल्ह्यात १ - २२० केव्ही, २ - १३२ केव्ही व साधारणपणे २० - ३३केव्ही ची आवश्यकता-लोणीकर यांची माहिती

Image
प्रतिनिधी समाधान खरात  परभणी जिल्ह्यामध्ये विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून शेतकऱ्यांना आठ दिवस दिवसा तर आठ दिवस रात्री वीज मिळते आहे असे भारनियमन अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे केले आहे याचे उत्तर महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेल्या विजेच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परभणी जिल्ह्यातील विजेचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यात १ - २२० केव्ही, २ - १३२ केव्ही व साधारणपणे २० - ३३केव्ही करणे आवश्यक आहेत. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विजेसंबंधीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. अशी माहिती देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे फडणवीस यांना दिली आहे. मागील पंचवार्षिक मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन ऊर्जामंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यात २ - २२० केव्ही, १ - १३२केव्ही व ४९ - ३३केव्ही मंजूर करून आपण जालना जिल्...

मंठा येथे भव्य शोभायात्रेत प.पू. राधाकृष्णजी महाराज यांचे ठिकठिकाणी स्वागत

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ      दि.१२ गोवत्स प.पू. राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथेला १३ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून शनिवार (ता.१२) रोजी निघालेल्या शोभायात्रेत भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गणेश लॉन्स मंगल कार्यालय येथून निघालेल्या शोभायात्रेत शहरातील विविध शाळेचे लेझीम, विविध सजीव देखावे, पारंपरिक बंजारा वेशभूषेतील पथकासह मंगल कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.         राम कृष्ण हरीच्या गजरामध्ये प्रभात फेरी मंडळासह शहरातील व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथामध्ये स्वार प.पू. राधाकृष्णजी महाराज यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव झाला. ही शोभायात्रा मेन रोडने गोवर्धन धाम कथास्थळी पोहोचली. रस्त्याने नागरिकांनी भावीक भक्तांसाठी दूध व पाण्याची व्यवस्था केली होती. परमपूज्य महाराजांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कथा स्थानी भव्य दिव्य स्वरूपाची तयारी करण्यात आली आहे. श्रीमद भागवत कथास्थळी येणाऱ्या भाविकांसाठी पार्कि...

मनुष्याचे जिवन म्हंटले की त्यामध्ये अनुभव हे येणाारच -हभप चैतन्य महाराज देगलूरकर

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटिल          आपल्याला प्राप्त झालेली परमार्थीक अनुभूती तूमच्या माझ्या जीवाला दिशा देण्याची अनुभूती महाराजानी या अंभंगातून प्रकट केली मनुष्याचे जिवन म्हंटले की त्यामध्ये अनुभव हे येणाारच जगतामध्ये कोणताही प्राणी असला तरी त्याच्या जिवनामध्ये अनुभव हे येणारच अनूभवाशिवाय जिवन ही संकल्पना आपल्याला विचारात घेता येणार नसल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यानी पाटोदा येथील सप्ताह मधील चौथ्या दिवशीचे किर्तनपूष्प गुंफत असताना व्यक्त केले  आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया॥१॥ भाग गेला सीण गेला अवघा झाला आंनदू प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठीमुखासी॥ २॥ तुका म्हणे आम्हां जोगे| विठ्ठल घोगे खरे मापll३॥ या जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या अभगावर सुंदर निरुपण केले अनुभव फक्त माणसानाच असतात का तर ते नाही पूथ्वीतलावरील सर्व प्राण्यानां अनुभव असतात रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्र्याला सुध्दा त्याच्या आयुष्यामध्ये अनुभव असतात एखाद्याच्या दारामध्ये गेल्यावर भाकरी मिळायच्या ऐवजी त्याच्या पाठी...

मराठवाड्यात राहुल गांधींजीची पाऊले काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करणारी-जेथलीया ,देगलूर ते नांदेड मा.आ.सुरेशकुमार जेथलियांनी राहुल गांधी सोबत घेतला भारत जोडो यात्रेत सहभाग

Image
प्रतीनिधी समाधान खरात       स्वतंत्र चळवळीपासून आजवर केवळ लोकशाहीचा सन्मान करत सामान्यांच्या भावना जोपासणारी काँग्रेस परिवारातील नेते राहुल गांधी यांची पाऊले मराठवाड्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांत जोष, चैतन्य निर्माण झाले असल्याचे गौरवउद्गार मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी काढले.         भारत जोडो यात्रा निमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत देगलूर ते नांदेड सभास्थानापर्यंत जेथलिया यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ देशमुख,राजेंद्र राख,कल्याणराव दळे,जालना उपजिल्हाध्यक्ष किसनराव मोरे,प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब खंदारे, माऊली तनपुरे, दिलीप चव्हाण, सादेक जहागीरदार, मंठा तालुकाध्यक्ष निळकंठराव वायाळ, विष्णू चव्हाण,जालना तालुकाध्यक्ष वसंतराव जाधव यांच्या सह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता. या यात्रेत सहभाग नोंदवल्यावर आपल्या प्रतिक्रियेत मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की, देशाच्या जडणघडनीत गांधी परिवाराचे मोठे योगदान असून देशासाठी त्यांच्या परिवातील अनेकांनी प्राणाची आहुती दिली. आमचे नेते ...

परतूर येथे जारकीहोळी यांच्या हिंदूविरोधी वक्तव्याचा युवा मोर्चाच्या वतीने पुतळा जाळून निषेध,युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलन,काँग्रेसच्या हिंदू विरोधी वक्तव्याच्या शृंखले चा जोरदार घोषणाबाजी करत युवा मोर्चा कडून तीव्र निषेध

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण        कर्नाटक काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी याने हिंदू व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य केले तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी देखील श्रीकृष्णाने भगवद्गीते अर्जुनाला जिहाद शिकवला असे मूर्खपणाचे वक्तव्य केले यांच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा परतुर विधानसभा च्या वतीने माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला प्रसंगी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत सतीश जारकीहोळी याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं यावेळी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतलाया संदर्भामध्ये युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सदरील घटनेचा आपण तीव्र शब्दात निषेध करत असून काँग्रेस हिंदू विरोधी बेताल वक्तव्य करून काय साध्य करू पाहत आहे असा सवाल ही यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष रा...

अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणुकी चा विद्यापीठ विकास मंच चा सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार

Image
परतूर  प्रतिनिधी  कैलास चव्हाण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणुकी करिता जालना येथे काल सायंकाळी देवगिरी पतसंस्था या ठिकाणी व्यापक स्वरूपाची बैठक संपन्न झाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट निवडणूक साठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे      या निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरसकृत विद्यापीठ विकास मंचाने देखील आपले दहा उमेदवार दिले आहे या उमेदवारांची व जालना शहरातील सर्व कार्यकर्ते प्राध्यापक यांची व्यापक स्वरूपाची बैठक जालना येथे घेण्यात आली या बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक विद्यापीठ विकास मंचचे प्रदेश सचिव डॉ गजानन सानप होते .जालन्यातील एकूण झालेली नोंदणी व त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून या नोंदणीचे रूपांतर मतदानामध्ये करण्याची एक रचना लावण्यात आली *यावेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवार ॲड.सुनील जाधव यांनी प्रचाराचा प्रारंभ करत सांगितले की निवडणुकीतील विजय पक्का आहेच पण विद्यापीठाचा भ्रष्टाच...

माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण भारतात प्रथम महाराष्ट्रात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना दिव्यांगाच्या कल्याणासाठी व इतर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये दिव्यांगासाठी माजी राज्यमंत्री बच्चु कडू गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे       यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांनी विविध प्रकारचे आंदोलने मोर्चा उपोषण केले  मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्या असून जागतिक अपंग दिनाच्या दिवशी 3 डिसेंबर रोजी स्थापन होणार आहे अशी माहिती माझी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली याबद्दल दिव्यांग्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चु कडू यांचे दिव्यांगाच्या वतीने आभार मानले व आनंद व्यक्त केला आसल्याचे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी दिलेल्या एका पत्रकामध्ये म्हटले आहे

परतूर येथे सहजयोग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन.

परतूर:( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण         येथील सहजयोग ध्यान केंद्रा च्या वतीने दीं:13 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6:30 वाजता जिल्हा परिषद प्रशाला मैदान परतूर येथे भव्य प्रमाणात सहजायोग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात आत्मसाक्षात्काराची जाणीव झालेली सहजयोगी बंधू व भगिनींनी कुंडलिनी जागृतिचे व आत्मसाक्षातकार झाल्याचे पावित्र द्यान देणार आहेत. सहजयोग हा जगातील 150 पेक्षा अधिक देशा मध्ये प्रसारित झालेला असून या मध्ये सर्व जाती, धर्मातील बंधू व भगिनींना निःशुल्क प्रवेश घेता येणार आहे तरी नगरीतील व पंचकोशितील नागरिकांनी या संधी चा सह- कुटुंब सह परिवार उपस्थीत राहून  अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन परतूर येथील सहजयोग ध्यान केंद्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे .या बाबत अधिक माहिती जाणून घेण्या साठी जि.प.,मैदानावर उपस्थित राहावे . सहजयोग माध्यमातून शांतता,मन: शांति ची प्राप्ती होत असून सध्याच्या धावपळीच्या युगात हे सर्वांसाठीच अवश्य आहे. सहजयोग पद्धतीने शेतीत केल्यास त्यांना लाभ शेतकरी बांधवांना देखील झालेला आहे.असे एक ना अनेक फायदे सहजयोगा...

समाजभूषण पुरस्काराने अर्जुन पाडेवार सन्मानित

Image
परतूर( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण      डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह आष्टी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.बुधवारी (दि.९) सायंकाळी आष्टी येथील धम्मपीठावर भन्ते कास्यपली,,भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,राष्ट्रवादी चे नेते बळीराम कडपे,काँग्रेसचे नेते नितीन जेथलिया, जगन भाई सोनवणे संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष, संदीप भैया निकुंभ दयावान सरकार, चौखाजी सौंदर्य,साय्यक पोलीस निरीक्षक नागगवे, हाजी रहमत पठाण, सौ, पुष्पाताई सोनवणे नगरसेविका भुसावळ,निशाताई गवई संविधान आर्मी महिला आघाडी अध्यक्षा, प्रिया ऊबाळे, सेने अभिनेत्री,सुवर्णाताई कांबळे, भगवान कांबळे,नगरसेवक बाबुराव हिवाळे, या मान्यवरांच्या उपस्थितीत पाडेवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.    दिलेल्या सन्मानपत्रात म्हटले आहे की,आपण आपल्या कर्तव्याच्या वाटचालीत समाजामध्य समता, न्याय,बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक चळवळीत अविरत सक्रिय राहून सामाजि...

मंत्री अब्दुल सत्तार याच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन , परतूर राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून सत्तार याचा निषेध

Image
------------------------------ परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण         राज्यांचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार याने आदरणीय संसदरत्न खाजदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल बेताल वक्तव्यं केल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.आठ) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, परतूर च्या वतीने अब्दुल सत्तार चा पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून पुतळा जाळण्यात आला. यावेळी आंदोलनामध्ये नगरसेवक अंकुशराव तेलगड,आरेफ अली,अखिल काजी, विजय राखे, महिला अध्यक्षा उर्मीलाताई खाडे, आरेफ अली, युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे,बाळासाहेब घारे,कदिर कुरेशी, रज्जाक कुरेशी, माजी प.स.सदस्य मनोहर पवार,सरपंच सोनाजी गाडेकर, मधुकर झरेकर,कैलाश मुळे,प्रभाकर धुमाळ, इब्राहिम कायमखानी, लालमिया बागवान,रफिक कुरेशी, निसार चाऊस, इफ्तेकार काजी, परवेझ देशमुख, पंजाबराव अवचार, शाहूराव मुंढे,अखिल पठाण,अनिल बिडवे,मोहन बान,नामदेव पोटे,परमेश्वर पोटे,राजेभाऊ आघाव, अंकुश शिंदे,उत्तमराव पवार,ओ.बी.सी.चे तालुकाध्यक्ष भगवात चव्हण, शहराध्यक्ष राजेश तेलगड, संजय ...

महाराष्ट्रात ४५ खासदार व २०० आमदार निवडून आणण्यासाठी "धन्यवाद मोदीजी" हे अभियान घरोघरी राबवा - माजी मंत्री बाबनरावलोणीकर,युवामोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून ०५ लाख पत्र पाठवण्याचा संकल्प- युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

Image
प्रतिनिधी  कैलाश चव्हाण  देशात ४०० पेक्षा अधिक खासदार यावेळी भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार असून महाराष्ट्रातून ४५ खासदार व २०० आमदार निवडून आणण्यासाठी "धन्यवाद मोदीजी" हे अभियान घरोघरी जाऊन राबवावे त्यासाठी भाजपा युवा मोर्चा सर्व आघाड्या मोर्चे सेल चे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी राबवावे. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोककल्याणकारी सरकार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास आणून द्यावे व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील तर हवे असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे दुःख हाल अपेक्षा समजून घेणारा पंतप्रधान मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील केंद्र सरकारची प्रत्येक योजना ही लोककल्याणकारी योजना आहे प्रत्येक योजनेचा लाभ थेट त्याला भरताना व्यक्तिशः कसा होईल यासाठी पंतप्रधान मोदी सातत्याने प्रयत्नश...

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा,सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले स्वागत

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षाणाचा मार्ग मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाच्या ०५ न्यायमूर्तींच्या घटनापीठीने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १०३ वी घटना दुरुस्ती देखील वैध ठरवली आहे. या निकालामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.      सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने ४ विरूद्ध १ अशा बहुमताने हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षण कायम ठेवलं आहे. त्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत या ऐतिहासिक निकालाचे स्वागत केले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे सवर्ण समाजाला १० टक्के आरक्षणाचा फायदा होईल. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबाच्या सदस्याला नोकरीत १० टक्के आरक्षण लागू होईल. ज्या कुटुंबाकडे ५ एकरप...

परतुर येथील नाट्यगृहाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी व अधिकाऱ्यांना दिल्या योग्य त्या सूचना,लवकरच नाट्यगृहाचे बांधकाम होणार पूर्ण

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात परतुर शहराच्या विकासात भर घालत असताना शहर व तालुक्यातील युवकांनी सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी परतूर शहरामध्ये व मराठवाड्यातील सर्वात उत्तम असे सुसज्ज एक हजार आसन व्यवस्था असणारे असे 17 कोटी रुपयाचे नाट्यगृह मंजूर करून घेतले त्या नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच जनतेच्या सेवेत ते रुजू होईल या नाट्यगृहामुळे परतूर शहरात तील व तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवक व युवतींना एक सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना आपल्या कला अविष्कार सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे या नाट्यगृहाच्या कामाकडे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे बारकाईने लक्ष असून आज माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत नाट्यगृहाच्या बांधकामाच्या प्रगती विषयी चर्चा करीत लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शहरासाठी भरीव निधी आणला होता त्याचाच एक भाग म्ह...

स्वार्थ व गर्वा पाई जिल्ह्यातील क्रिकेट खेळांडूंच भविष्य अंधारात.

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात      जालना जिल्ह्यातील विजय झोल, मिना गुरवे, आघाव आदी क्रिकेट खेळाडी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेले असल्या मुळे क्रिकेट या खेळा कडे अनेक पालकांचा कल आहे. या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यातील अनेक खेळाडू सद्या क्रिकेट चा सराव करताना दिसतात.     प्रत्येक पालक क्रिकेट शिकवण्या करिता अगदी मुलगा-मुलगी ५-६ वर्षाचे झाले की, आपल्या पाल्याला चांगला प्रशिक्षक शोधून क्रिकेट करिता ते सांगतील त्या महागातल्या महाग वस्तू घेतात. क्रिकेट चा सराव सुरू राहतो, दिवसेनं दिवस आपल्या पाल्यात सुधारणा पाहून पालक आनंदात असतात.   मुलगा १४ वर्षाचा होईपर्यंत प्रशिक्षकाची फिस जी १०-१२ हजार असते ती दर वर्षाला भरत असतात. परत दर रविवारी किंवा सुट्यांमध्ये मॅचेस असतात त्या सामण्यांची फिस भरतात. का तर आपला मुलगा-मुलगी ही भविष्यात महाराष्ट्र व नंतर भारताचे प्रतिनिधीत्व करेल. या भाबड्या आशेपोटी हा सगळा खटाटोप सुरू असतो. मुलं मुली नियमित चांगले खेळले तर ते प्रतिनिधीत्व करतात.    पण गेली अनेक वर्षे जालना जिल्ह्यातील जालना क्रिकेट असोस...

सुनील स्वामी विभूते यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण          परतूर येथील रहिवाशी व आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले सुनील स्वामी विभूते यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.        आष्टी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर ते मागील दहा वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी 35 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम केले. सतोना, परतूर आष्टी अश्या विविध ठिकाणी त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले दि 04 पार पडलेल्या कार्यकमात सुनील स्वामी विभूते त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळीओम स्वामी, महारुद्र स्वामी ,जितेंद्र स्वामी ,सिद्धलिंग स्वामी ,शिवकुमार स्वामी, अमरनाथ स्वामी ,उमाशंकर स्वामी ,शिवशंकर स्वामी ,महालिंग स्वामी, शांतलिंग स्वामी ,अक्षय स्वामी ,आकाश स्वामी ,अनिकेत स्वामी ,डॉ शेषेराव वायाळ,प्रल्हाद माने, अशोक माने, रामा माने, रमाकांत बरीदे आदी उपस्थित होते. फोटो ओळी- सेवा निवृत्त झाल्या बद्दल सुनील स्वामी विभुते यांचा सत्कार करताना स्वामी परिवार.

शिवसेना परतुर तालुका प्रमुखपदी सुदर्शन सोळंके यांची निवड

Image
परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण           येथील शिवसेनेचे जुने कार्यकर्ते सुदर्शन बप्पा सोळंके यांची शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी निवड घोषित करण्यात आली. पूर्वीचे तालुकाप्रमुख अशोक आघाव यांना पद उन्नती देत मंठा, परतूर तालुका समनवयक म्हणून निवडण्यात आली. शिवसेना भवन मुबई येथून सदरील निवडी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी पत्रकारांना दिली. यानिवडीबद्दल त्यांचे शिवसेनेचे जेष्ठ नेते रामेश्वर अण्णा नळगे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड ,उपतालुका प्रमुख रामचंद्र काळे, संजय गोंडगे, शिव वाहतूक संघटना तालुकाध्यक्ष रामजी अण्णा सोळंके  शहरप्रमुख विदूर जैद , युवानेते गजु भाऊ चौडे, रामजी खवल, अशोक काका सोळंके , संतोष ठोंबरे भास्कर तात्या सोळंके , दुष्यंत ठोंबरे, बाळू गाते, सुदाम कदम, प्रमोद सोळंके, प्रभाकर सोळंके, गजानन सोळंके यांच्या प्रमुख उपस्तीतीत स्वागत करण्यात आले. दरम्यान या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, जिल्ह्यात शिवसेनेची नवी कार्यकारणी घोषित करण्या...

नांदेडच्या ऐतिहासिक धम्म सोहळ्याचे साक्षीदार व्हा - राहुल नाटकर

Image
परतूर / (प्रतिनिधी) कैलाश चव्हाण दिल्ली मध्ये मध्यतंरी धम्म दिक्षेचा सोहळा पार पडला.त्या मध्ये २२ प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले.या २२ प्रतिज्ञावरुन देशभरात वादळ माजतय अशी परिस्थिती आहे. वैदीक हींदु संघटना व त्याचे प्रतिनिधींची २२ प्रतिज्ञावर बंदी आणावी अशी भुमीका आहे. गुजरातच्या निवडणुका होई पर्यंत बंदी येणार नाही.परंतू गुजरातच्या निवडणुकि संंपल्या की बंदी येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने विचार करता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नांदेड येथे ५ नोव्हेबंरला धम्म अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे.        सर्व आबेडकरवादी आणी ज्यांनी ज्यांनी दिक्षा सामारोह पार पाडलेला आहे.त्यांनी लाखोच्या संख्खेने उपस्थित राहणे क्रम प्राप्त आहे. असे जाहीर आव्हान परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर सह रविंद्र भदर्गे, रोहण वाघमारे , बाबु गोस्वावी आशोक ठोके, लिंबाजी कदम प्रदीप साळवे,दीपक हिवाळे आकाश मुंढे व आदी कार्यकर्त्योनी दिलेल्या प्रसिध्दी पञकाद्वारे केले आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या परतुर विधानसभा प्रमुख पदी शिवाजी तरवटे तर तालुका सह प्रमुख पदी दत्ता अंभोरे यांची निवड

Image
 परतुर /(प्रतिनिधी) कैलाश चव्हाण   राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सूचनेनुसार आणी शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या शिफारसीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष परतुर विधानसभा प्रमुख पदी शिवाजी तरवटे आणि  सह तालुका प्रमुख पदी दत्ता अंभोरे यांचे निवड नियुक्तीपात्राद्वारे निवड करण्यात आलेली आहे.    दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात१०%+१०%)  राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णावर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर राहावे. गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गर...