Posts

Showing posts from June, 2021

भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी ५१ वटवृक्षाची लागवड

Image
मंठा(प्रतिनिधी) - माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे भाजयुमोचे महामंत्री राहुल भैया लोणीकर यांचे निकटवर्तीय व अत्यंत विश्वासू जालना जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मा. गणेशरावजी खवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज केहाळ वडगाव, वैद्यवडगाव, देेेवगाव खवणे येथील जिल्हा परिषद शाळा तसेच गायरान जमीन परिसरात  वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी तालुक्यात ५१ वट वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असून गावातील प्रत्येक तरुण महिला सर्व शेतकरी बांधवांनी वृक्ष संगोपन करावे गाव परिसरात एक व्यक्ती एक झाड ही मोहीम राबवावी टिकवावे त्या वृक्षाचे पालकत्व घेऊन वृक्षाचे संगोपन करावे करुणा महामारी च्या काळात आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासली असून भविष्यात तशी गरज भासू नये यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात ५१ वटवृक्षाची लागवड आपण करत आहोत वटवृक्ष लागवड इमागे सामाजिक धार्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाने समजून घ्यावा व समाजहितासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संगोपन यावर विशेष भर द्यावा अशी प्रतिक्रिया भा

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी पांडूरंग शेजूळ

Image
   परतूर –प्रतिनिधी तालुक्यातील आनंदवाडी येथील  पत्रकार पांडुरंग तुळशीराम शेजुळ यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या जालना जिल्हा प्रभारी जिल्हाध्यक्ष एका पत्राद्वारे  राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांनी  केली आहे. सदरील नियुक्ती ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नियम व अटीच्या अधीन राहून केली जात असून कोणत्याही नियमबाहया कृती न करता समाज माध्यमातून आपल्या लेखणीतून जन सामान्य जनतेचे प्रश्न मांडून वाचा फोडून न्याय देण्याचे अविरत कार्य करावे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्ती बद्दल परतूर पत्रकार संघाचे अध्यक्ष शेषराव वायाळ,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे, सचिव दीपक हिवाळे,  शामसुंदर चित्तोडा, अजय देसाई, योगेश बरीदे, एम.एल. कुरेशी, आशीष गारकर, भारत सवने, आर.एम. नवल, राजकुमार भारुका, सरफराज नाईकवाडी, सुरेश कवडे, अशोक साकळकर, इम्रान कुरेशी, प्रभाकर प्रधान, संजय देशमाने, सागर काजळे, तारेख शेख, मुमताज अंसारी, राहुल मुजमुले, माणिक जैस्वाल, संतोष आखाडे, शेख असेफ, शेख अथर, कैलास चव्हाण, कैलास सोळंके, कृष्ण

ओबीसी समाजाचे राजकीय व मराठा समाजाचे शैक्षणिक व नोकरीतील हक्काचे आरक्षण मिळवल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही- चक्काजाम आंदोलनात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा एल्गार,महा विकास आघाडी सरकारने गोड बोलून ओबीसी समाजाचा गळा कापला लोणीकर यांचे टीकास्त्र,महाविकासआघाडी सरकारने हेतूपुरस्सर मागासवर्गीय आयोगाची गठन केले नाही पण लोणीकर यांचा गंभीर आरोप,महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे "लबाडाचे आवतन....,१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन

Image
वाटूर(प्रतिनिधी) महाराष्ट्र मध्ये आजच्या परिस्थितीत मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे काही दिवसांपूर्वी मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण, यासंदर्भातील आपल्या सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली. केवळ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजा चे आरक्षण रद्द झाले असून जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय व मराठा समाजातील शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही असा एल्गार भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वाटुर येथे आयोजित चक्काजाम आंदोलन दरम्यान पुकारला चक्काजाम आंदोलनासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर महिला आघाडी अध्यक्ष जिजाबाई जाधव भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेश राव खवणे ज्ञानेश्वर शेजुळ परतुर तालुका अध्यक्ष रमेश भापकर मंठा तालुका अध्यक्ष सतीश निरवळ जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाश टकले पंचायत समिती सभापती बीड पवार मंठा मार्केट कमिटी सभापती संदीप गोरे उपसभापती राजेश मोरे स

महाविकास आघाडी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुळावर - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची आघाडी सरकारवर घणाघाती टीका,ओबीसी- मराठा समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपा खंबीरपणे पाठीशी – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात ओबीसी आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी भाजपाचे २६ जून रोजी चक्काजाम आंदोलन

Image
परतूर(प्रतिनिधी-) विद्यमान महाविकासआघाडी सरकार हे मराठा ओबीसीसह विविध आरक्षणाच्या मुळावर आले आहे, केवळ पाठपुरावा न केल्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण या सरकारने घालवले आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जेव्‍हा भाजपा-शिवसेना सरकार होते तेव्‍हा ओबीसी साठी स्‍वतंत्र मंत्रालय स्‍थापन केले. त्‍यामुळे ओबीसी समाजाबद्दल भाजपाला नेहमीच आस्‍था राहिली आहे. नुकतेच सर्वोच्‍च न्‍यायालयाने ओबीसी समाजाकरिता असलेले राजकीय आरक्षण रद्द केले. ही अतिशय दुःखद बाब आहे. महाविकास आघाडी सरकारने कोर्टामध्‍ये ओबीसी समाजाची बाजू योग्‍य पध्‍दतीने न मांडल्‍यामुळे हे आरक्षण रद्द झाले. या आधी मराठा आरक्षण व आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्‍यामुळे महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन असल्‍याचे दिसुन आले आहे. या गोष्‍टीचा भाजपा निषेध करीत आहे. ओबीसी-मराठा समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार असून भाजप खंबीरपणे ओबीसी व मराठा समाजाच्या बाजूने उभी आहे असे प्रतिपादन, भारतीय जनता पार्टी चे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर  यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.  या

बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करा,बी-बियाणेसह खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.दोन महिन्यात घरकुल योजनेचे काम पूर्ण करा,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विविध विभागांची घेतली आढावा बैठक

Image
परतूर(प्रतिनिधी) सद्यस्थितीत पेरणी जवळ आलेली असताना बँकांनी तात्काळ पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पंतप्रधान किसान सन्मान योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असणारे मानधन अडवणूक करण्यात येत असल्याबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अडवणूक करण्यात येऊ नये. अनेक बँकांनी अद्याप आपले उद्दिष्ट पूर्ण केले नाही ते तात्काळ पूर्ण करावेत अन्यथा गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातील मंठा, परतूर, नेर-सेवली येथील बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना केल्या. मागील वर्षी बोगस बियाणे विक्री करण्यात आले होते त्यात विविध खाजगी कंपन्या बरोबर महाराष्ट्र शासनाचे बियाणे महामंडळ देखील समाविष्ट होते या वर्षी तो प्रकार होऊ नये यासाठी ७० टक्केपेक्षा अधिक उगवण क्षमता असणारे बियाणे शेतकऱ्यांना दिले जावे तसेच बी-बियाणे खते यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता देखील कृषी विभागाने घ्यावी अशा सूचना यावेळी आढावा बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या. यावेळी बैठकीसाठी उपविभागीय अधि

ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफीयांवर कडक कारवाई करा,परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधिक्षकांना निवेदन

Image
  परतूर –प्रतिनिधी जाफ्राबाद येथील दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफीयांनी केलेल्या झालेल्या भ्याड हल्लाचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्फत पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.   दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि ११/०६/२०२१ रोजी जाफराबाद येथील पंचायत समिती कार्यालय समोर दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर वामनराव पाबळे यांच्यावर वाळु माफीयांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जिवघेण्या हल्ला करण्यात आला आहे. तसेच वाळुच्या बातम्या का छापतो म्हणून जबर मारहाण केल्याने ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह इतर जण मारहाणीत जखमी झाले आहेत. जखमीवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. पत्रकार ज्ञांनेश्वर पाबळे यांच्यावर औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षाभरापासून वाळु माफियांनी दहशत निर्माण केली असून यामध्ये महसुल व पोलीस प्रशासन सहभागी आहे. समाजहितासाठी पत्रकारांनी अवैध वाळु उत्खनन बाबत आपल्या दैनिकात बात

दहावीच्या विद्यार्थ्यांचेअंतर्गत मूल्यमापन 10 जून पासूनतर निकाल जुलै महिन्यात लागण्याची शक्यता

दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया  10 जूनपासून सुरू होणार आहे.  शिक्षक व मुख्याध्यापकांना मूल्यमापन कार्यपद्धतीचे यू टय़ुबच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मूल्यमापन कार्यपद्धतीचे स्वतंत्र वेळापत्रक मंडळाने जाहीर केले असून या वेळापत्रकानुसार दहावीच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम 10 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या मूल्यमापन कार्यपद्धतीत शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावरील जबाबदाऱया निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत 7 सदस्यांची निकाल समिती स्थापन केली जाणार असून ही समिती मंडळाच्या कार्यवाहीच्या वेळापत्रकानुसार कामकाजाची रूपरेषा ठरवणार आहे. तसेच निकालाचे परीक्षण व नियमन समितीमार्फत केले जाणार आहे. या कार्यवाहीत मुख्याध्यापकांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे     शाळा समितीकडून तयार करण्यात आलेला निकाल संगणकप्रणालीमध्ये नोंदवण्याची आणि मंडळाला निकाल गोपनीय पद्धतीने देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे. नियमित विद्यार्थ्यांच

राष्ट्रवादि कॉग्रेस जिल्ह्यातून मराठा आरक्षण करीता पंतप्रधान मोदी यांना पाठवणार पाच लाख पत्र -- युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात

 

आषाढीवारीत खंड पडू देऊ नका, वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आषाढी वारीसाठी परवानगी द्या- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

 

आषाढीवारीत खंड पडू देऊ नका, वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आषाढी वारीसाठी परवानगी द्या- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Image
परतूर(प्रतिनिधी-) महाराष्ट्रातील आषाढी वारी ही अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे या वारीमध्ये खंड पडू नये अशी महाराष्ट्रातील तमाम टाळकरी, माळकरी, धारकरी आणि वारकऱ्यांची भावना आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार ने घालून दिलेले सर्व नियम पाळून वारीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी मध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत मीराबाई, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ महाराजांपासून अनेक साधू संत होऊन गेले आहेत. या साधू-संतांनी समस्त मानव जातीला प्रेरित करण्याचे आणि मानवजातीच्या उद्धारासाठी प्रयत्न केले आहेत या सर्व साधू संतांच्या माध्यमातून महाराष्ट्राला आषाढी वारीची एक अलौकिक अशी परंपरा लाभली आहे दरवर्षी लाखो लोक पायी चालत पंढरपूरला वारीसाठी जात असतात. महाराष्ट्राची अशी अलौकिक परंपरा असलेल्या वारी आहे खंड पडू नये यासाठी लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे केवळ आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढ

मराठा आरक्षणावर चालढकल करणाऱ्या राज्य सरकारने, आमच्या हक्काचे वस्तीगृह सुरू करावे,जालना जिल्ह्यात वस्तीगृहाच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक,*माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात 151 गावांमध्ये आंदोलन

Image
परतूर(प्रतिनिधी) तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण राज्यातील आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही राज्यातील सरकार मराठा आरक्षणाबाबत  वेळकाढूपणा करत आहे यासंदर्भात सरकारच्या या कृतीवर मराठा समाज प्रचंड संतापलेला असून राज्यभरात 58  मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणासाठी प्राणांच्या आहुती द्याव्या लागल्या होत्या     या सगळ्या बाबींचा विचार करून सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडायला हवी होती मात्र तसे सरकारने केले नाही त्याचबरोबर राज्यात फडणवीस सरकार असताना मराठा समाजातील मुलांसाठी राज्यभरामध्ये जिल्हा स्तरावर वस्तीगृह उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये वस्तीगृह सुरू झालं होतं तर काही वस्तीगृहा ची कामे अंतिम टप्प्यात होती मात्र निवडणुका लागल्या आणि दुर्दैवाने सत्तांतर झाले बदललेल्या सत्ताधीशांनी मराठा मुलांच्या वस्तीगृहांचा प्रश्न अनुत्तरित ठेवला यावर कळस म्हणून जालना येथे तर पालकमंत्री राजेश टोपे यांनी या नियोजित वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये घुसखोरी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बसवण्याचा प्

मराठा आरक्षणासाठी मराठ्यांसह बहुजन समाजाने 5 जूनच्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात सामील व्हावे*सचिन खरात

Image
*परतुर(प्रतीनीधी)गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी  मा. आमदार विनायकराव मेटे संघर्ष करीत असून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रातील अन्य बहुजन समाजबांधवांची जनभावना आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरुद्ध निर्णय आल्यानंतर मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असून  आ. विनायकरावजी मेटे यांच्यानेतृत्वाखाली बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा दि.5 जून रोजी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी जनभावना असणाऱ्या बहुजन समाजाने देखील या मोर्च्यात सहभागी होऊन मराठा समाजाला साथ द्यावी असे आवाहन सचिन खरात यांनी केले आहे.  आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये सर्व प्रथम आरक्षणाची तरतूद करुन मागासलेल्या जातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. आज देशाची महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरू असताना मराठा समाजाची दैनिय अवस्था झालीय. शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाची स्थिती मराठ्यांवर ओढावली आहे. मराठ्यांवरील मागासलेपण दूर करून त्यांना ही विकासाच्या प