दिव्यांग व्यक्ती ना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील- आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न,दिव्यांगांसह गुणवंत विद्यार्थ्यांशी आमदार लोणीकरांनी साधला संवाद
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारताला प्रगतीपथावर नेणारे सरकार केंद्रात कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वात देशाची प्रतिमा अधिक उंचावली आहे मोदींचे सर्व घटकांवर बारकाईने लक्ष असून सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्य प्रमाणे सर्व घटकांचा विचार करत असताना दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी देखील पंतप्रधान मोदींनी घेतली आहे दिव्यांगाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे देखील यावेळी बोलताना श्री लोणीकर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण बाबी हाती घेतल्या असून अस्थि व्यंग कर्णबधिर मूकबधिर यांच्यासह विविध प्रकारच्या दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी कानपूर येथील संस्थेच्या माध्यमातून कर्णयंत्र स्ट्रेचर सायकल यासारखे वेगवेगळे साहित्य दिले जाणार असून दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट