पॅसेंजर तसेच लोकल रेल्वे गाड्यांचे ग्रामीण स्टेशनचे थांबे पूर्ववत करा.....लालबावटा
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे कोरोणाच्या नंतर नांदेड विभागातील पूर्ववत चालू असलेल्या रेल्वेगाड्या काही बंद तर काहींना एक्सप्रेस केले आहे त्यामुळे ग्रामीण स्टेशन वरील थांबे बंद झाले आहेत तसेच गाड्या एक्सप्रेस केल्यामुळे त्यांचे तिकिटाचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशांना जालना औरंगाबाद कडे किंवा परभणीकडे जावयाचे असल्यास त्यांना परतुर किंवा सेलू सारख्या स्टेशन कडे खाजगी वाहनाने यावे लागते मगच प्रवास करता येतो त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे कोरोणाच्या महामारी नंतर रेल्वे विभागाने जनतेला सेवा देणे अपेक्षित होते परंतु रेल्वेने या गाड्यांचे थांबे बंद करून व तिकीट दरात वाढ करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे तसेच ग्रामीण गरीब जनतेला रीझर्वेशन करता येत नसल्यामुळे त्यांना अत्यंत मानसिक त्रास होत आहे. हैदराबाद- औरंगाबाद, निजामाबाद-पुणे,मन माड-काचिगुडा या पॅसेंजर गाड्या पूर्ववत करून सातोना खुर्द, उस्मानपुर, पारडगाव, कोडी,सारवाडी, येथे थांबा देऊन ग्रामीण विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर,कामगार यांना सहकार्य करावे गंभीर आजार, गरोदर महिला, लहान मुले असलेल्या मह