आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे गणेशोत्सवाच्या निमित्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार विदर्भरत्न ह भ प पूरूषोत्तम महाराज पाटील यांच्या एकदिवसीय हरी किर्तनाचे आयोजन तळणी परीसरातील प्रसिद्ध युवा उद्योजक शरद पाटील व भगवान देशमुख याच्या वतीने या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या *आपुला तो एक देव करुनी घ्यावा* *तेणे विन जिवा सुख नोहे* *येरती माईक दुःखाची जनीती* *नाही आदी अंती अवसान* या अभंगावर सुंदर निरूपण केले सध्य स्थितीचा काळ हा मानव जातीच्या परीक्षेचा काळ आहे धर्ममंडपात बसलेली लोक ही खरच भाग्यवान आहेत कोरोना सारख्या महामारीत आपंण जिवंत आहोत या महामारीतून जर आपल्याला वाचायचे असेल तर धार्मीक विचाराचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल महामारीच्या काळात वारकरी सप्रदायच खूप मोठा आधार आहे सध्य स्थितीत मानव जातीची मानसीक अवस्था सक्षम असणे गरजेचे आहे कोरोना ने मानवी जीवनातील गरजा कीती कमी आहेत यांची जाणीव आपल्या सगळ्याना करून दीली आहे मनुष्याच्या आयुष्यातील नामसाधना ही त्याच्यासाठी खूप मोठा आधार असते परतू आज काल तीच साधना करण्याचा आळस आ...