Posts

Showing posts from February, 2024

पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन.

Image
परतूर प्रतिनिधी : कैलाश चव्हाण      सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती व आधारवड फाउंडेशन यांच्या वतीने शिव जन्मोत्सव निमित्त भव्य पोवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.   दि. २७ फेब्रु. रोजी सायं. ठीक सात वाजता योगानंद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आवाजाचे सुप्रसिद्ध शिवशाहीर प्रा. अरविंद घोगरे पाटील यांच्या पहाडी आवाजात भव्य पोवाड्या च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.   या कार्यक्रमाला मा. मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेश जेथलिया, कपिल भैय्या आकात, माधवराव मामा कदम, रामेश्वर अण्णा नळगे, शाम वाडेकर, मोहन अग्रवाल, बाबाजी तेलगड सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व शिव भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन जन्मोत्सव समिती व आधारवड फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे नीरोप सभारंभ संपन्न

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हा    परतूर येथील न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज  येथे नवविच्या विद्यार्थ्यांकडून दहाविच्या विद्यार्थ्यांना दि.२१ बुधवार रोजी निरोप सभारंभ देण्यात आला या मधे नववीच्या विद्यार्थ्यांनी   भरगच्च करमणुकिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.    या वेळी दहाविच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपर विषयी तसेच दहावी नंतर काय? याबद्दल ही सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहाविच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष  नारायण सोळंके, सौ पार्वताबाई सोळंके, कार्याध्यक्ष  गणेश सोळंके, सचिव सौ छाया बागल, प्रिन्सिपल साम वर्घिस व संपूर्ण शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवविची विद्यार्थ्यांनी कार्तिकी कवडे हिने केले तर आभार प्रदर्शन सेजल सवने हिने व्यक्त केल...

आरती मुके ची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     परतूर येथील आरती भाऊसाहेब मुके ची सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स आंबेगाव पुणे या कॉलेज मध्ये बि.एस.सी. बायोटेक च्या द्वितीय वर्षात शिकते. तिची कॉलेज च्या वतीने २०२४ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली.   आरती ही खर तर क्रिकेट मधील उत्कृष्ठ ऑल राऊंडर खेळाडू असुन ती कॉलेज च्या टीम ची कर्णधार आहे. परंतु क्रिकेट सोबत तिने कब्बडी व वॉलिबॉल मध्ये चमकदार कामगिरी बजावली म्हणून कॉलेज च्या वतिने तिला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करून गौरवण्यात आले. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पियुष हनुवंते सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.   या प्रसंगी सिंहगड कॉलेज चे प्राचार्य डॉ. श्री. मगन घाटूळे, उप प्राचार्य दिपा रमाणी, क्रिडा प्रशिक्षण श्री. संतोष नवले, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख विभावरी दिक्षित, सोनल मॅडम, मनिषा मॅडम, ऋतुजा मॅडम, लोंढे सर आदिंचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या उपस्थितीत आरतीला मेडल देऊन सन्मानित केले..

प्रत्येक माणसाने आनंदाने जगणं, परमेश्वराचे नाव घेऊन जगणं ही आज काळाची गरज झाली आहे- योगानंद बापू महाराज

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण परतूर तालुक्यातील श्रीष्टी तांडा येथे संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमित्त आयोजित  अखंड सेवालाल महाराज सप्ताहाच्या कार्यक्रमाला श्री योगानंद बापू महाराज यांनी उपस्थित राहून भविकांशी संवाद साधला. प्रत्येक माणसाने आनंदाने जगणं, परमेश्वराचे नाव घेऊन जगणं ही आज काळाची गरज झाली आहे. या पृथ्वीवर आपण प्रवासी म्हणून आलो आहे, एक दिवस सर्वांनाच जायचे आहे. म्हणून जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सर्वांशी प्रेमाने, आनंदाने वागले पाहिजे. मनुष्याच्या जीवनात धार्मिक अधिष्ठान खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे धार्मिक सोहळे होत राहिले पाहिजे.     या प्रसंगी श्रीष्टी तांडा व परिसरातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता