Posts

Showing posts from March, 2022

ऐकण्यासाठी नव्हे.. अनुभवण्यासाठी या! चला शिवतीर्थावर! -गणेश बोराडे

Image
मंठा प्रतिनिधी पप्पू घनवट   गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष  नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक  तावरे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश  बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली मनसे मंठा राजगड कार्यालय येथे मिटींग घेण्यात आली, यावेळी गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबई शिवतिर्थ येथे राज ठाकरे यांच्या विचार ऐकण्यासाठी मंठा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे आवाहन  त्यानी  केले, यावेळी महादेव मिसाळ, रामभाऊ इंगळे, तुळशीराम बोराडे, दिपक देवकर, रामेश्वर घुंगरट, ईश्वर मोरे, मच्छिंद्र निकाळजे, बालासाहेब बोराडे, गजानन माळकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

परतूर नगर परिषद कडून परतूर दिव्यांग अर्थसाह्य वाटप

Image
.................. परतूर,ता.29 प्रतिनिधी हनुमंत दवंडे  नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषद अर्थसंकल्पातील एकुण उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांग नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येते. त्‍यानुषंगाने नगर परिषद परतूरने दिव्‍यांग नागरीकांसाठी .सन 2021-22 या आर्थिक वर्षात 2,45,000/- (दोन लक्ष पंचेचाळीस हजार रुपये केवळ) ची तरतुद केली आहे. परतूर नगर परिषद कार्यालयातील सभागृहामध्‍ये मंगळवारी ता.29 रोजी दिव्‍यांग बांधवांना अर्थसहाय देण्‍यासाठी बोलावण्‍यात आले होते. परतूर नगर परिषद हद्दीत एकूण दिव्यांग लाभधारकांची संख्या 140 असून असून त्‍यापैकी जवळपास 30 ते 35 दिव्‍यांग बंधु-भगिनी उपस्थित होते.   उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व माननीय मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सहा दिव्यांगांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. उर्वरित दिव्यांगाचे धनादेश आरटीजीएस करून थेट लाभधारकांच्‍या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. याप्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद परतुर परतुर यांनी दिव्यांग नागरिकांशी मुक्‍त संवाद साधला व त्यांच्या समस्य

आमदार संतोष बांगर यांच्या निषेधार्थ परतुर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दि 25/03/2022 या दिवशी भाषण देत असतांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल व वंचित बहुजन आघाडी बद्दल अपमानास्पद बोलले व बिनबुडाचे आरोप केले म्हणून आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आज दि 29 / 03 / 2022 मंगळवार रोजी तहसील कार्यालय परतूर येथे तालुका अध्यक्ष बाबुराव गोसावी व तालुका महासचिव रविंद्र भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले उपस्थिती   डॉ किशोर त्रिभुवन जिल्हा उपाध्यक्ष, रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष , राहुल नाटकर जिल्हा सचिव, हनुमंत मोरे जिल्हा संघटक ऍड सुरेश काळे, तालुका उपाध्यक्ष शोएब पठाण, उपाध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष प्रकाश मस्के, ता सचिव उत्तम साळवे, ता सचिव नामदेव नाचणप परमेश्वर पाईकराव, सारनाथ सोनपसारे, सतिष गरड, संदीप सोनपसारे, अभिषेक गरड, गौतम गरड, गोटू गरड, बाळू झोटिंग, दत्ता सोनपसारे, आनंद गरड, विश्वजीत गरड, संकेत गरड, नागसेन घायताडक, निवृत्ती पाईकराव, सुमेध वानखेडे, कैलास घायताडक, चंद्रकांत मस्के, लखन केवट, विकास भदर्गे, सचिन पडघन, प्रदीप जाधव,आक

हिंदुत्वाची गुढी उभारण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा -सिध्देश्वर काकडे

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या च्या वतीने गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जातो. याच धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वर्षी २ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी सांगितले आहे.    या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाची दिशा आणि पक्षाची पुढील भुमिका मनसे संस्थापक अध्यक्ष श्री. राज ठाकरे जाहीर करतील आशी शक्यता आसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आता अमित ठाकरे यांच्या रुपानं अध्यक्षपद मिळाल्याने राज्यातील तरुणाई मध्ये ऊत्साही वातावरण आसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. या गुढीपाडवा मेळाव्याला मराठवाड्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असुन हिंदुत्वाची सर्वात मोठी गुढी उभारण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा

प्रत्येक मुलींना आत्मस्वरक्षणासाठी कराटे ची गरज - उपविभागिय अधिकारी जाधव.

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे  अलीकडे वाढत चालेली समाज व्यवसतेची विकृती पाहता महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणे अलीकडे वाढत चाललेली आहेत, या साठी प्रत्येक मुलींना आत्मस्वरक्षणासाठी कराटे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी केले. आखाडा बाळापूर, किनवट येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत येथील सोतोकान कराटे पटूंनी उपविजेता पद व विविध पदके जिंकल्या बद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.  25/03/2022 रोजी येथील जिल्हा परीषद प्रशाळा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन उपविभागीय आधिकारी.भाऊसाहेब जाधव यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक, शामसुंदर कौठाळे,डॉ. तापडीया, विष्णू वाघमारे,पत्रकार, अजय देसाई, राजेंद्र मुंदडा , आषिश गारकर, सोतोकानचे प्रशिक्षक माणिक जैस्वाल, रोहित जैस्वाल यांची उपस्तीती होती। यावेळी आपल्या मार्गदरपर मनोगतात जाधव पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक मुलींनी आपल्या बचाव करीता सेल्फ डिफेन्स जरूरी आहे. याकरिता मैदानी खेळ खेळत रहावे. यामुळे शरीर तर निरोगी राहते शिवाय आत्मबल वाढण्यासाठी कराटे सारखे

जि.प.प्रा.शा.वसंतनगर तळणी येथे शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण व शाळा स्तरीय मेळावा पार पडले.

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील केंद्रस्तरीय प्रशिक्षण व शाळा स्तरीय मेळावा यांच्या आतर्गत तळणी येथे  सुरुवातीला प्रभातफेरी काढण्यात आली.आगामी जुन 2022 या वर्षात शाळेत प्रवेशीत बालकांचे व माता पालकांचे अगदी उत्साहात स्वागत करण्यात आले. मेळाव्याची सुरुवातीला सांस्कृतीक गीते सादर करण्यात आली.त्यानंतर मेळाव्यात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते.जसे शारीरिक ,बौद्धिक,सामाजिक व भावनिक , भाषा विकास ,गणनपूर्व तयारी असे एकूण 8 प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले. या प्रत्येक स्टॉल वर बालकाची प्रगती तपासण्यात आली. बालक ज्या ज्या गोष्टीत कमी असेल तेथे त्या गोष्टीत परिपूर्ण होण्यासाठी त्या बालकाच्या माता पालकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी तळणी केंद्राचे गटसमन्वयक - श्री अभिमान बायस सर , तळणी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक - श्री जे.डी. इंगळे सर , श्री ए.टी.धारतकर सर तसेच तळणी केंद्रातील सर्व शाळेतील 50% शिक्षक उपस्थित होते.  प्रशिक्षण तज्ञ म्हणून - श्री राजबिंडे सर व पी.डी.उमाळे यांनी मोलाची भूमिका बजावली. या शाळापूर्व तयारी मेळावा यासाठी अंगणवाडी ताई

मंठा येथील आरेफ शेख यांचे SET, GATE, व NET या तिनिही परीक्षामध्ये घवघवीत यश

Image
मंठा -प्रतिनिधी सुभाष वायाळ  दि.२८ येथील स्वामी विवेकानंद वरीष्ट महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आरेफ शेख यांने Result Of The Joint CSIR-UGC National Eligibility Test ( NET) For Junior Research Fellowship And Lectureship /Assistant Professor Chemistry ( Chemical Science) (नेट)या परीक्षा मध्ये ऑल इंडियामध्ये (104) नंबर मिळवत गरूड झेप घेतली आहे         मंठा येथील स्वामी विवेकानंद वरीष्ट महाविद्यालयाचा विद्यार्थी आरेफ आफसर शेख यांने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून "वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परीक्षद"(विज्ञान आणी प्रौद्योगिक,मंञालय भारत सरकार) (CSIR-UGC) या परीक्षेमध्ये पुर्ण भारतामधुन(104) वा नंबर मिळवला आहे.व आय.आय.टी खारगपुर कडुन घेण्यात आलेल्या (GATE)गेट या परीक्षेमध्ये ऑल इंडियामध्ये (412) वा नंबर मिळवला व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिपत्याखाली सप्टेबंर 2021 घेण्यात आलेल्या (SET) सेट या परीक्षे मध्ये घवघवीत यश संपादीत केल, जिद , चिकाटी , व कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांने हे यश प्राप्त केले त्यांच्या या यशाबदल , स्वामी विवेकानंद वरीष्ट महाविद्य

सुलोचना आठवे यांचे निधन

Image
परतूर,प्रतिनिधी हनुमंत दवंडे  येथील देशपांडे गल्लीतील जेष्ठ नागरिक श्रीमती सुलोचना श्रीधरराव आठवे यांचे शनिवारी (दि.२६) वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ८१ वर्षांच्या होत्या.    संत कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचे मानकरी वेशास स्व.श्रीधरगुरू आठवे यांच्या त्या पत्नी होत्या.     त्यांच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.   त्यांच्या पश्चात्य एक मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.    जिल्हा परिषद प्रशालेचे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक देविदास आठवे त्यांचे चिरंजीव होत.

दैठणा खुर्द येथे जागतिक जल दिन साजरा*

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे  तालुक्यातील दैठना खुर्द येथे तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक शिबीराचे आयोजन दि २२ मार्च २०२२ रोजी करून जागतिक जल दिन साजरा करण्यात आला आहे. सदरील शिबीरामध्ये जागतिक जल दिनाच्या निमित्ताने विविध विषयावर व्याख्यात्यांनी मार्गदर्शन केले. त्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.एन. कोकाटे यांनी असंघटीत कामगारांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना या विषयी मार्गदर्शन अध्यक्षीय भाषणात केले. तसेच यावेळी विधीज्ञ ए.जी. चव्हाण यांनी स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाण्याचे महत्व विषद केले. विधीज्ञ एम.पी.वेडेकर पाण्याचे महत्व पटवून दिले. विधीज्ञ आर.एल.लिंबुळकर यांनी पाणी आडवून ते जमिनीत जिरउन पाणी पातळी वाढविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास विधीज्ञ आर.एल पाईकराव, सचिव विधीज्ञ एम.आर. सोळंके,  तालूका विधी सेवा प्राधिकरण कर्मचारी, तसेच दैठणा खुर्द येथील गांवकरी, महिला यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. वकिल संघाचे अध्यक्ष विधिज्ञ ए. जी. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, विधीज्ञ ए.ए. जवळेकर यांनी सुत्रस

परतूर तालुक्यातील संकनपूरी येथे नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.. गावावर शोककळा पसरली आहे.

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतूर तालुक्यातील संकनपुरी येथील नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. संकनपुरी येथील उमेश बाबासाहेब नाचण वय 11 वर्ष करण बाळासाहेब रघुनाथ नाचण वय 13 वर्ष हे तिघेजण शाळा सुटल्यावर गावाजवळ असलेल्या नदीच्या ओढ्यावर पाहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यान पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला तर गावात व पंचक्रोशीत सोककळा पसरली असून सर्व नागरिक दुःख व हळहळ व्यक्त करत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत आष्टी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही.

आ.विनायक मेटे बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू-सचिन खरात

Image
परतूर प्रतिनिधी, हनुमंत दवंडे   शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नायक आ. विनायकराव मेटे यांच्याबद्दल सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह असभ्य भाषेत मजकूर टाकून बदनामी केली आहे. यामुळे आ. मेटे समर्थकांची मने दुखावली असुन पोस्ट टाकणाऱ्या बद्दल रोष निर्माण झाला आहे. बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करु असे शिवसंग्राम तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन दिले आहे. सोशल मीडिया फेसबुकवर दीपक इंदर थोरात या व्यक्तीने स्वतःच्या अकाउंट वरून आ. विनायकराव मेटे यांच्याबद्दल बदनामी करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह असभ्य भाषेचे पोस्ट टाकली आहे. यामुळे शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. पोस्ट टाकणारा दीपक इंदर थोरात याचा यांच्या निषेध करून ठाणेदारांना निवेदन दिले. मेटे हे अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे. समाजातील लोक त्यांना बहुजन नायक म्हणून मागणी ओळखतात. मात्र दीपक इंदर थोरात या मानसिक रुग्ण व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त डॉ.संदिप चव्हाण सर यांचा जालना येथे सत्कार!

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे    क्षयरोगी रुग्णांच्या ऊत्कृष्ट सेवेबद्दल क्षयरोग निर्मूलनाच्या शासनाच्या मोहिमेमध्ये हातभार लावण्याची नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल परतूर येथील डॉ.संदिप चव्हाण  यांचा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जालना येथे आयोजित एका कार्यक्रमात जिल्हा मुख्य कार्यकारी मनुज जिंदाल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला!       याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खतगावकर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची उपस्थिती होती!

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून परतूर विधानसभा मतदार संघासाठी मोठ्या ग्रामपंचायती साठी निधी उपलब्ध=युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची माहिती

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नाने परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये जनसुविधा निधी अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीसाठी चा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे  या प्रसिद्धिपत्रकात राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून आम्ही सदैव मतदार संघाच्या विकासासाठी तत्पर असून विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून देत विकास साधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे  पुढे या पत्रकात म्हटले आहे की जनसुविधा निधी अंतर्गत मोठया ग्रामपंचायतीसाठी दिला जाणारा निधी यामध्ये मतदार संघातील शेवली नेर तळणी व सातोना खुर्द या ग्रामपंचायतीसाठी 40 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचे राहुल लोणीकर यांनी नमूद केले आहे पुढे या पत्रकात युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे की गेल्या सात वर्षांमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघांमध

परतूर येथे यूवा सेना तर्फे पाणपोई चे उद्धघाटन

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे      दि 23रोजी शिवसंपर्क अभियानानिमित्त युवा सेना शहर प्रमुख राहुल कदमयांच्यातर्फ पाणीपोईचे उद्धघाटन मावळ लोकसभा चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,अर्जुन भाऊ खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले           यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे पाटील बोराडे उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम,तालुका प्रमुख अशोकराव आघाव, महेश  नळगे, अजय कदम युवा सेना शहर प्रमुख राहुल कदम, कांताराव सोळंके,विठ्ठलराव वटाने,शाहीर खालापुरे, भारत पंडित, दत्ता पाटील सुरुंग अमोल सुरूंग,रामजी खवल,मुधुकर पाईकराव राजु शिंदे,विकास खरात, गजानन चवडे,दिपक काळे,लक्समिकांत कवडी,आबा कदम,आप्पासाहेब वटाणे, बाळासाहेब अंभुरे, नितीन राठोड, कैलास ढवळे, दिलीप निकम गजानन खोसे तुकाराम बोरकर,बापुराव बोरकर, अरूण धुमाळ, नागेश चिखलीकर,संदिप पाचारे यांच्या सह शिव सैनिक उपस्थित होते 👍🏹🏹

मनुष्याच्या कृळाने कोणी श्रेष्ठ होत नाही मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या साधने वरुन सिध्द होत-विशाल महाराज खोले

Image
तळणी प्रतिनिधी रवि पाटील :       मनुष्याच्या कृळाने कोणी श्रेष्ठ होत नाही मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या साधने वरुन सिध्द होत असते कोण जाणे घडे उपासना या ओवीप्रमाणे कोणाच्या समाजावरून ज्ञान गृहीत धरू शकत नाही या काळात अशा गोष्टीला थारा नाही असे प्रतिपादन ह भ प मुक्ताबाई संस्थांनचे मठाधिपती विशाल महाराज खोले यानी काल्यांची प्रसंगी कानडी येथे केले  पाहाता गोवळी खाय त्यांची उष्टावळी॥१॥ करिती नामाचे चितंन गडी कान्होबाचे ध्यान॥ ध्र॥ या अभंगावर चित्तन केले मनुष्याने पंडित कोणालाही मणू शकत नाही आजच्या किर्तनात जो पाडीत्य दाखवेल तोच पंडित वाचक कोणाला म्हणावे जो अठरा पूराणाचे वाचन करतो त्याला वाचक म्हणावे पूर्ण जीवनाची कल्पना इश्वाराच्या पायावर वाहीली त्याने त्यांचे जीवन साध्य केले असे समजावे त्याने कृष्ण कथा ऐकायची आणि सांगायची काल्याच्या किर्तनात बाईचे  चरित्र कधी सागू नये धनाचे महत्व कधी सांगू नये त्यामुळे किर्तनाची मर्यादा भंग  होते कमी कालावधी मध्ये जास्त धन कमवण्याची ईच्छा मनुष्याने बाळगू नये तो पैसा जास्त काळ टिकत नाही स्वःत मेहनतीने जे अस्तीत्व मनुष्य निर्माण करू

परतूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जागतिक वन दिन उत्साहात साजरा.,वने जगली तरच जीव सृष्टी जगेल ! ------ डाॅ. भगवान दिरंगे

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  भारतीय संस्कृती ही अरण्य संस्कृती आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजात वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.परंतु अलिकडच्या काळात वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असल्यामुळे मानवासह संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे यांनी केले. ते परतूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जागतिक वन दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.तायडे हे होते. व्यासपीठावर वन परिक्षेत्र अधिकारी मनिषा मगरदे, वनपाल डी.जी.राठोड,अर्चना चंद्रमोरे,सूर्यकांत बुरांडे आदी मंडळी उपस्थित होती.         आपले मनोगत व्यक्त करताना डाॅ.दिरंगे पुढे म्हणाले की, मानवाला जगण्यासाठी शुद्ध हवा, पाणी आणि अन्न वनांमुळे मिळते. सध्या जग जागतिक तपमान वाढीच्या संकटात सापडले आहे. त्यामुळे भीषण अशी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. पिण्यासाठी, शेतीसाठी , आणि उद्योग धंद्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कधी अवर्षन तर कधी अतीव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंठा येथे मनसे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 51जणांनी केले रक्तदान

Image
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनसे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांनी तिथीनुसार येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करा‌ असे आवाहन केले होते  तिथीनुसार शिवजयंती चे औचित्य साधून मनसे नेते  दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस  संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष  अशोक  तावरे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली  मनसे मंठा तालुकाध्यक्ष अध्यक्ष  गणेश  बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंठा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले, या शिबीराला मंठा तालुक्यातील नागरिकांनी व‌ महिला भगिनींनी असे एकूण 51 जनांनी रक्तदान केले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साधु संताच्या विचाराचा आदर करा -ह भ प नामदेव महाराज ढवळे यांचे कानडी येथे प्रातिपादन

Image
उद्या ह भ प विशाल महाराज खोले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता तळणी :( रवि पाटील )  मनुष्याने कथा पाठ किर्तन करून जर त्याच्या आचरणात वागण्यात बदल होत नसेल तर ते किर्तन ऐकुण काहीही फायदा होणार नाही साधुं संताच्या विचारांचा त्याच्या शब्दांचा मान आपण ठेवू शकत नसाल तर हजार किर्तन ऐकुन ही त्याचाकुठलाच फायदा होणार नसल्याचे  *विष्णूदास नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यानी कांनडी येथे सांगीतले* जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या संसाराचे अंगी अवघी च वेसने आम्ही या किर्तने शुध्द झालो ॥१॥ आता हे सोवळे जाले त्रिभूवन विषम धोऊन सांडीयले या अंभगावर निरूपण केले संत विचारच हे मनुष्याच्या आयुष्याला परीवर्तीत करू शकतात फक्त तो विचार मनुष्याने स्वीकारण्याची गरज आजच्या युगात जास्त आहे सांधु संतांच्या शब्दाचा मान ठेवणे त्याच्या शब्दाप्रमाणे वागणे म्हणजेच त्याचे अनुकरण होय  मनुष्याच्या सांसारीक आयुष्यात अनेक प्रकारची व्यसने आहेत संसार या शब्दाचा अर्थच मुळात आस्थिर आहे आस्थिर गोष्ट मनुष्याच्या हिताची कधीच नसती तरी सुध्दा मनुष्य संसार या गोष्टीला चिकटवून बसला आहे मनुष्याच्या डोक्यावरील काळ्या केसाचे प

येनोरा येथील म्हसोबा यात्रा महोत्सव, जल्लोषात साजरा होणार..

Image
परतुर प्रतिनिधी : हनुमंत दवंडे         परतुर तालुक्यातील येनोरा येथे दरवर्षी म्हसोबा महाराज यांची यात्रा भरत असते यामध्ये म्हसोबा ला काही जण नवस करतात तर काही घरी पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो, तसेच रूढी परंपरे नुसार गाड्या ओढण्याचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी कुस्तीचा कार्यक्रम ही केला जातो . यात्रा निमित्त गाडी ओढण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 23/ 3/ 2022 रोजी दुपारी 4:00 वाजता होणार आहे भव्य जंगी शंकरपट बुधवार दिनांक 24/ 3 22/ रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. भव्य कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कुस्तीचे प्रथम बक्षीस 11111 / रु. बक्षीस अशोक भीमराव गरड (शिक्षक) यांनी ठेवले आहे.कुस्ती चे द्वितीय7777 रु, बक्षीस एकनाथ शिंदे कुस्तीचे तृतीय बक्षीस 5555 रु. श्री. उमाशंकर द वंडे यांनी घोषित केले .चतुर्थ बक्षीस 4444 रू. रुपये,साहेबराव नवल श्री गायत्री ट्रेडर्स चे मालक. पाचवे बक्षीस श्री. बंडू अंबादास भूंबर( माजी सरपंच येनोरा)3333 रुपये, कुस्तीचे सहावे बक्षीस 2222/रू.श्री .प्रकाश बोंबले(मा. पं. सदस्य परतूर) कुस्तीचे सातवे बक्षीस सुंदर भूंब

ना बच्चु कडू राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट - अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना

Image
   परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे          दिनांक 20  रोजी प्रहार अपंग संघटनेचे व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष  नामदार बच्चु कडू यांच्या आईचे निधन झाले त्यांनिमित्त            प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सवने शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोषजी राजगुरू सर व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा निरीक्षक अशोक तनपुरे प्रहार तालुकाध्यक्ष आत्माराम जगताप प्रहार अपंग संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमान माने तालुका संघटक आबाराव भुबर गजानन उबाळे जाधव कदम आदी प्रहार सेवक यांनी ना.बचू कडू यांची सात्वन पर भेट घेतली 

परतुरात 1990 च्या वर्ग मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार संपन्न प्रत्यक्ष व झूम मिटिंग द्वारे मित्रांनी केले पाल्यांचे कौतुक

Image
परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे   जि. प.प्रशाला शाळेच्या सन 1990 च्या वर्गमित्रांचे स्नेहमिलन कार्यक्रम 25 डिसेंबर 2019 ला संपन्न झाला होता. या सर्व मित्रांचा व्हाट्सअप्प च्या माध्यमातून संपर्क कायम राहिला. या मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ हॉटेल आस्वाद येथे पार पडला. परतूर येथील मित्र प्रत्यक्षपणे तर बाहेरगावातील मित्र झूम ऍप प्रणाली द्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील व्यावसायिक राहुल कुंपावत होते. या प्रसंगी सार्थक काशीनाथ देशमुख याचा कॉम्प्युटर सायन्स ला आणि सुशांत संदीप बाहेकर व नरेंद्र प्रशांत अंभुरे याचा MBBS ला प्रवेश झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जीवनातील सुख ,आनंद वाढविण्यासाठी व दुःख कमी करण्यासाठी मित्रासारखे नाते नाही. त्यामुळे सदरील नात्याला बळकटी देण्यासाठी मित्रांच्या गुणवंत मुलांचे कौतुक केलेच पाहीजे. याप्रसंगी नगरसेवक संदीप बाहेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत अंभुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समारोप राहुल कुंपावत यांनी क

मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचा फेरविचार करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे राज्यपालांना भगतसिंह कोश्यारी पत्र,मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळासह घेणार राज्यपालांची भेट,मराठवाडा वॉटर ग्रीड पुनरुज्जीवन प्रश्नी राज्यपालांनी व्यक्तिशः लक्ष घालावे- लोणीकर यांची राज्यपालांना विनंती

Image
प्रतिनिधी- हनुमंत दवंडे  मराठवाड्याला स्वच्छ पाणी मिळू नये, येथील आत्महत्या थांबू नये, मराठवाड्याचा विकास होऊ नये, दुष्काळवाडा म्हणून मराठवाड्याची ओळख पुसली जाऊ नये असेच विद्यमान महाविकास आघाडी सरकारला वाटते काय? शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात. अशी विनंती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह जी कोश्यारी यांना पत्राद्वारे केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा हा सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेला विभाग आहे कोरडवाहू जमीन परवडत नाही म्हणून पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अजूनही आत्महत्त्यांचे हे सत्र थांबलेले नाही दुष्काळाचा हा मराठवाड्याला लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात इजराइल च्या राष्ट्रीय जल व्यवस्थापन समितीने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प अहवाल तयार केला होता परंतु दुर्दैवाने सरकार बदलले आणि मराठवाडा वॉटर ग्रीड हा शेतकर्‍यांच्या हिता

सचिन मगर यांचा पी.एचडी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन किसनराव मगर यांनी नुकतिच गणित या विषयात पीच.डी.(Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन केली.      सचिन मगर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डाॅ. कीर्तीवंत घडले यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन कार्य केले. " सम काॅन्ट्रीब्युशन टू फ्रॅक्शनल डिफ्रनशियल इक्वेशन्स युजिंग इंटिग्रल ट्रान्सफाॅर्न्स " असा विषय आहे.  सचिन मगर हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधिक्षक किसनराव मगर यांचे चिरंजीव आहेत.      सचिनच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.परतूर येथील पतंजली आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकचे डाॅ.दीपक दिरंगे यांनी त्याचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे आणि मित्र मंडळी उपस्थित होती.

परतुर मंठा परिसरात बोर्ड परिक्षा सुरुळीत

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे   आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे आठ हजार ३०० परीक्षा केंद्रे होती. नव्या निर्णयानुसार परीक्षा केंद्रांत वाढ होऊन ती ३१ हजारांवर झाली.परीक्षा कक्षात गर्दी होऊ नये; म्हणून एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थ्यांची परीक्षेची सोय करण्यात आली. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था झिगझॅग पद्धतीने करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. परिक्षा मंडळाच्या गाईडलाईन्सनुसार परतुर मंठा परिसरातील सर्वच केंद्रांवर बारावी परिक्षेच्या संदर्भात संबंधित केंद्राकडुन जय्यत तयारी करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुरेपूर सुविधा मिळतील यासाठी सर्वच केंद्रांनी प्रयत्न केल्याचे दिसत आहे. पोलिस प्रशासन,केंद्र व्यवस्थापन या सर्वांच्या नियोजनाखाली बारावी परीक्षा सुरळीत पार पडत आसल्याचे चित्र दिसत आहे.

दैठणा फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे   तालुक्यातील दैठणा फाटा येथे प.पू ब्रम्हनिष्ठगुरु गंगाभारती महाराज  यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनानी झाली. दैठणा फाटा येथे झालेल्या अखंड  हरिनाम सप्ताहात काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, गाथा भजन, हरिपाठ, रात्री नामवंत किर्तनकार यांचे कीर्तन प्रवचन व जागर कार्यक्रम झाले. तसेच भागवत कथा प्रवक्ते भागवताचा-र्य हभप नामदेव महाराज शास्त्री शिळवणीकर यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली. दि १५ मार्च रोजी एक वाजता हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनानी सप्ताहाची सांगता झाली.   यावेळी हभप बाळू महाराज गिरगावकर बोलताना म्हणाले की ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे भूत भरलेले असते भाविकांनी अंधश्रद्धा डोक्यात ठेऊ नका. भाविकांचा विश्वास संपादन करून गैरफायदा घेतला जात असल्याने अंधश्रद्धेच्या बळी पडू नका असे आवाहन केले. या सप्ताह दरम्यान माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, नितिन जेथलिया

सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

Image
 मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ  दि.१७ तालुक्यातील खोराड सावंगी येथील, महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात गेल्या ३२ वर्षांपासून जालना जिल्ह्यात कार्यरत असलेले सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली.त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना,परतुर,टेभुर्णी,जाफ्राबाद,सेवली, आष्टी,मंठा ह्या सर्व पोलीस स्टेशनवर कार्यरत असतांना त्यांनी आतिशय कर्तव्यदक्षपणे कामे केली आहे.सोपान चव्हाण एक शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनत करून जालना जिल्ह्यात १९९१ साली पोलीस भरती झाले आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक,सहायक पोलीस निरीक्षक यांचे सन २००० ते २०२१ पर्यंत रायटर [ मुन्सी ] म्हणून काम पाहिले आहे. सोपान चव्हाण यांचा सामाजिक चळवळीचाही फार मोठा सहभाग असतो.  माननीय पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पदोन्नती दिल्याने माननीय पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सोपान चव्हाण यांना स्टार लावले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी पोलिस उपनिरीक्षक आसमान शिंदे बलभीम राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण आढे, पो.हे.कॉ.उत्तम राठोड, हे.कॉ.बंनकर,मांगीलाल राठोड,विजय जुमडे,आ

पारडगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा संपन्न पारडगाव/अंतरवाला ग्रुप ग्रामपंचायत विभक्त करा ग्रामस्थांचा सुर

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  घनसावंगी तालुक्यातील पारडगाव/अंतरवाला बू ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दि.१२ मार्च रोजी सरपंच शशिकला साहेबराव खरात यांच्या अध्यक्षेतखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांच्या विविध समस्या व नागरिक सुविध,योजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामसभेला सदस्य प्रतिभा विष्णु माकोडे, गोरख जाधव, ग्रामविकास अधिकारी दीपक साळवे, लिपिक रामेश्वर ढेरे, उपस्थित होते. यावेळी ग्राममसभेत विशेष करून ग्रुप ग्रामपंचायत असल्याने अंतरवाला स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत होती. या झालेल्या ग्रामसभेत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यास ठराव घेण्यात आला. तसेच गावातील नाल्या रस्त्ये, स्मशानभूमी वॉल कंपाऊंड, मंदिर परिसर विकास, लाइट, पाणी, स्वच्छता, हात पंप दुरूस्ती, स्वछालय, वयक्तिक लाभ योजना बाबत देण्याबाबत चर्चा करून ठरावात नमूद केल्या आहेत. या ग्रामसभेला प्रकाश कोकणे, बाबासाहेब माकोडे, विष्णु अण्णा माकोडे, महादेव माकोडे, धर्मराज माकोडे, लक्ष्मण गोरे, गणेश माकोडे, कैलास मगर, मसूद सय्य्द, जावेद सय्य्द भगवान टोनपे, दिलीप माकोडे, अजिक्य माको

जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज –एकनाथ कदम,आनंद विद्यालयात संपन्न झाला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे                  दहावी शालेय जीवनाची शेवटी पायरी असल्याने या नंतरचे प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकणे गरजेचे आहे. इथपर्यंतच्या प्रवासात आपले कुटुंब,आपले शिक्षक आणि इतरांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले. या नंतरची लढाई मात्र आपल्याला एकट्याच्या हिमतीने लढायची आहे. परीक्षा असो वा जीवनातील एखादी जबाबदारी यशस्वीरित्या पार पडायची असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही.आपल्यातील क्षमता ओळखून त्या अधिक बळकट करण्यासाठी, आपली बलस्थाने अधिक भक्कम करण्यासाठी पुढील आयुष्यात आपण कायम प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी केले आहे. शनिवारी आनंद विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षक, गट समन्वयक कल्याणराव बागल, मुख्याध्यापिका सत्यशीला तौर-कदम, संजय कदम आदीची प्रमुख उपस्थिती होती.        दहावी नंतर जीवनातला एक नवा अध्याय सुरु होणार आहे. या प्रवासात अनेक वेळा अनेकांना अपयशाचा सामना कराव लागू शकतो. अशावेळी

जिल्हाधिकार्याच्या पथकासह तलाठी नितीन चिचोले याची वाळू घाटातून भरून आलेल्या नऊ हायवावर कारवाई,कारवाई दरम्यान तहसीलदार गायब

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील   लिलाव झालेल्या वाळू घाटातील नऊ हायवावर जिल्हाधिकार्याच्या पथकासह तळणी सज्जाचे तलाठी नितीन चिचोले यानी भल्या पहाटे येऊन कार्यवाही केली पंरतू या कारवाई दरम्यान मंठा तहसीलदार कैलास वाघमारे गायब दीसले पूर्णा नदीपात्रातील एकूण चार वाळू घाटाचा लिलाव झाला असून सुरवातीपासूनच जास्तीची वाळू वाहतूक मोठ्या वाहनाद्वारे होत असून वाळू वाहतूकीची रॉंयल्टी माञ कमी ब्रासची घेतली जात असल्याने अतिरीक्त वाळूचा ऊपसा हा लिलाव धारकांकडून होत आहे सदरील पथक हे सकाळीच कोणालाही सुगावा न लागू देता तळणी लोणार मंठा रोडवर आल्याची कल्पना कोणालाच नसल्या कारणाने ही मोठी कारवाई पथकाने केली पकडलेल्या नऊ हायवा कडे वाळू जास्त व पावत्या कमी असल्याने सदरील हायवा सुरवातीला तळणी पोलीस चौकी येथे लावण्यात आल्या नंतर मंठा पोलीसांच्या स्वाधीन करून सर्व गाडया मंठा तहसील मध्ये पाठवण्यात आल्या  पथक आल्याचे समजताच अवैध वाळू वाहतुक करणारे वाहने ही तळणी गावात व इतरत्र आश्रयाला उभी राहुन पथक गेल्याचे विचारपूस करत होते सकाळी सहा पासून कारवाई सुरु होताच वाळू घाटातील वाहतूक व इतर ठिकाणची चोरटी वाहतूक बं

महिला दिनानिमित्त परतूर येथील विवेकानंद इंग्रजी शाळेच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन. स्पर्धेमुळे महिलांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे   येथील विवेकानंद सेवा केंद्र संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल व विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर येथे महिला दिनानिमित्त 12 मार्च रोजी उत्साहात स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची पालकांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेला शहरातील पालकांनी महिला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे पाहण्यास मिळाले अनेक महिलांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्या म्हणून मंदाताई लोणीकर विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे, नगरसेवक संदीप बाहेकर,उपस्थित होते.  दरम्यान महिला ही आज विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा देत आज आपले अस्तित्व सिद्ध करतांना आपल्याला दिसून येत आहे,परंतु हे करत असताना आज कुठे तरी त्यांचे बालपण ,लहानपण त्या विसरू नये या अनुषंगाने त्यांच्यातील बालपण परत जागी करण्यासाठी अशा विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून करण्यात आले होते.  या कार्यक्रमांमध्ये खास करून पाककला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा नृत्य स्पर्धा, चे आयोजन केले होते.याव

शिवरायांनी ३५ वर्षात साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य संपवलं –प्रा.नितीन बानगुडे पाटील,परतूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे          ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी यशाचा मूलमंत्र आपल्या कार्यकर्तृत्वातून आपल्यासमोर ठेवला आहे. जगात स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज्याच्या व्यवस्थापनाचे धडे आजही शिकविले जात आहे. माणसाला हवं तिथं पोहचता येत, मात्र यासाठी केवळ विचार करून चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रसिद्ध व्यख्याते तथा शिवसेनेचे उपनेते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड यांच्या पुढाकारातून शक्रवारी सायंकाळी ७ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे आयोजित व्याखानात ते बोलत होते. यावेळी परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय जाधव, जालना जिल्हा प्रमुख ए.जे.पाटील बोराडे,युवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा संघटक मोहनकुमार अग्रवाल, रामेश्वर नळगे, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव,सुदर्शन सोळंके, शहर विदुर जईद आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.           याच कार्

ज्या ठिकाणी श्रध्दा असते त्या ठिकाणी भगवंता येने भाग असते ती श्रध्दा फक्त पांखडी नसावी - श्री आनंद चैतन्य महाराज

Image
तळणी ( रवि पाटील )  ज्या ठिकाणी श्रध्दा असते त्या ठिकाणी भगवंता येने भाग असते ती श्रध्दा फक्त पांखडी नसावी ती त्या सुष्टीनिर्मात्याला प्रिय असली पाहीजे जसे की अंधाराचे साम्राज्य एक दीप नाहीसा करतो तसेच मनुष्याच्या संसारूपी गाड्याच्या साम्राज्याला संत्संगाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री आंनद चैतन्य महाराज यानी दहीफळ खंदारे येथे तीन दीवसाच्या सत्संग समारोपाच्या प्रसगी व्यक्त केले मनुष्याचे युद्ध बाहय जगासोबत अतंरमनासोबतच चालू आहे कारण रोगी मानसा सोबत रोगी गेला तर तो कसा बरा होईल जोपर्यन्त निरोगी मनाचा सहवास त्याला होनार नाही तोपर्यन्त तो बरा होणार नाही या सं सांरातील प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे कोणी मनाने तर कोणी तनाने दुःखी आहे कोणीच या संसारात शारीरीक दुःखी मानसीक दुःखी आहेच सर्व गोष्टीची सांसारीक उपलब्धतता असताना सुध्दा मनुष्य दुःखी आहे संसारीक सुखात कोणी पन्नीकडून तर कोणी त्याच्याच आपत्याकडून दुःखी आहे त्याच दुःखी माणसाला खरी गरज ही सत्संगांची आहे  मनुष्याने जर काही मागायचे असेल तर त्याने देवालाच मागीतले पाहीजे या दरिद्री व लुटारुनाभिकाऱ्याना मागवून आ

जय भीम सेना पार्टी, युवा जिल्हा अध्यक्ष (पुर्व) पदी दिपकभाई वक्ते यांची निवड..

Image
.प्रतिनीधी परतूर हनुमंत दवंडे       /जय भीम सेना महाराष्ट्र प्रदेश, संस्थापक अध्यक्ष मा.सुधाकरभाई निकाळजे.यांच्या नेतृत्वाखाली जय भीम सेनेची स्थापना झाली.मा.सुधाकर भाई निकाळजे हे नेहमी दलीत बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत.व त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देत आहेत.         त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक बहुजन बांधव मा.सुधाकरभाई निकाळजे, यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मोठ्या संख्येने जाहिर प्रवेश करत आहेत.जिल्हा अध्यक्ष, पुर्व. डॉ.दिपक भदर्गे.याच्या मार्गदर्शनाखाली,अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे.जय भिम सेना पार्टी ,युवा, जिल्हा अध्यक्ष जालना (पुर्व)दिपक भाई वक्ते यांची निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित . जिल्हा युवा सचिव पुर्व मा.विनोदजी वाघमारे, महादेव पैठणे,जि.यु.उपाध्यक्ष.परतूर ता.अध्यक्ष.मा.दादासाहेब वाघमारे, मा.उपाध्यक्ष शाहुजी आव्हाड, ओमप्रकाश वाघमारे.ता.कोषाध्यक्ष. परतूर युवा अध्यक्ष मा‌.भारतजी मोरे,युवा उपाध्यक्ष,धूराजी सहजराव,युवा ता.सचिव.शिवाजी रायते, तसेच आष्टी सर्कल युवा.अध्यक्ष.भगवान वाघमारे.सुदर्शन वाघमारे सर.इ.अनेक कार्यकर्त्य उपस्थित होते.

गीता हा अमृत ग्रंथ आहे गीता ही मार्गदर्शक आहे गीता ही योग शास्ञ आहे -आनंद चैतन्य महाराज

Image
तळणी : ( रवि पाटील ) तळणी येथून जवळच असलेल्या दहिफळ खंदारे येथे चालू असलेल्या श्री गीता रामायण सत्सगांचा आजचा दुसरा दीवस या सत्संगाचे आयोजन योगीधाम येथील योगानंद बापू याच्या मार्गदर्शनाखाली या तीन दीवशीय संत्संगाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय संत प पु लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांचे शिष्य श्री आंनद चैतन्य महाराज यांच्या सुमधूर वाणीतून या सत्संगाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो नागरिक घेत आहे  गीता हा अमृत ग्रंथ आहे गीता ही मार्गदर्शक आहे गीता ही योग शास्ञ आहे तर रामचारीत मानस हे प्रयोग शास्ञ आहे त्याचे अनुकरण करणे हे मानव जातीच्या हिताचे आहे पाच हजार वर्षापासूनच्या आधी पासून गीता ही धर्माचा आधार बनली आहे आज ही लाखो साधक गीतेचा आधार घेऊन जीवन सार्थकी करत आहे तीच गीता कुरूक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगून उपदेश केला होता त्याच गीतेचा आधार हा धर्माच्या बाजूने होता ही वस्तूस्थीती गीतेच्या माध्यमाध्यमातून अर्जुनाला भंगवताने सागीतल्या नंतरच अर्जुनाने शस्त्र हाती घेऊन हे धर्मयुद्ध .पांडवाने जिंकले सत्संग हा मानव जातीच्या उद्धाराचा आधार आहे यामध्ये प्र

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

Image
परतूर ( आशिष धुमाळ) तालुक्यातील हातडी शिवारात 11 मार्च शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास गावातील सचिन शिंदे सह काही शेतकर्‍यांना शेतात काम करत असतांना बिबट्या निदर्शनास पडला.या घटनेला सरपंच मधुकर झरेकर यांनी दुजोरा दिला आहे. बिबट्याची व्हिडिओ क्लिप परतूर परिसरात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.          परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठस्से सुध्दा दिसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.गावकर्‍यांनी व सरपंच मधुकर झरेकर यांनी बिबट्या आढळ्याची माहिती वनविभागाला देताच वनविभागाचे व्हि.पी. अवचार घनसावंगीचे वनरक्षक पवार व वनमजुर यांनी हातडी शिवारात हजर होत पायाच्या ठस्यावरून बिबट्याचा शोध सुरू केला आहे. शेतकर्‍यांनी एकटे शेतात जाऊ नये तसेच पाळीव प्राण्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच मधुकर झरेकर व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

राजा उदार झाला हाती भोपळा दिला", महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसणारा**मराठवाडा वॉटर ग्रीड साठी सरकारने एक छदाम देखील खर्च केला नाही,न्यायालयाच्या आदेशानंतरही आरोग्य विभागाची स्थिती जैसे थे, राज्य सरकारला जनतेच्या दुःखाचे सोयरसुतक नाही,मोदी लागले द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी महाराष्ट्र सरकारची स्थिती,सर्वसामान्य जनतेची या अर्थसंकल्पात घोर निराशा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील पोकळ घोषणा म्हणजे लबाडा घरचे आवतन...माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे अर्थसंकल्पानंतर राज्य सरकारवर टीकास्त्र

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  महाराष्ट्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार महिला विद्यार्थी आरोग्य कर्मचारी शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह सर्वच स्तरावर सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड निराशा करणारा असून राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा स्वरूपाचा असून मराठवाड्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या तोंडाला पाणी पुसणारा हा अर्थसंकल्प असल्याची तिखट प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादरीकरण नंतर अर्थसंकल्पात सर्वसामान्य व्यक्तीला काय मिळाले असा सवाल करणे लोणीकर यांनी अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांची चिरफाड केली महाराष्ट्र सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला असून त्यानुसार लोणीकर यांनी आपले सविस्तर प्रतिक्रिया दिली मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्वपूर्ण योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती या योजनेचे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आले होते तर तीन जिल्ह्यांचे प्रकल्प अहवाल पूर्णत्वास गेले होते त्या साठी खास बा

जीवनात जर यशाचा शिखर गाठायचा असेल तर कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही -संतोष साबळे

Image
परतूर दि 11 प्रतिनिधी हनुमंत दवंडे  जीवनात जर यशाचा शिखर गाठायचा असेल तर कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही असे उदगार परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील इयत्ता 10 वि च्या मुलींच्या निरोप। समारंभात गटशिक्षण अधिकारी संतोष साबळे यांनी काढले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक संजय जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख नामदेव धुमाळ,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कल्याण बागल, श्रीमती विशाखा जोशी, आगार प्रमुख दिगंबर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती..     या वेळी पुढे बोलताना श्री साबळे म्हणाले की, आज चे युग स्पर्धेचे आहे या युगात जो कठोर परिश्रम करेल तोच टिकेल . तसेच जिल्हा परिषद च्या वतीने देण्यात येणार आदर्श शिक्षक पुरस्कार 2021-22 कल्याण बागल यांना मिळाल्या बद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी इयत्ता 10 वि च्या विद्यार्थ्यांनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाम कबडी, तुकाराम जईद, रामराव घुगे,श्री कदम,रामप्रसाद नवल,अनिल काळे,सचिन कांगने,स्वरा राखे,वृन्दा डक,योगेश बरीदे आदी उपस्थित होते. फोटो ओळी- आदर्श शिक्षक