Posts

Showing posts from July, 2022

शिक्षकी पेशेत निष्ठने काम करा- रमाकांत बरीदे परतूर सेवानिवृतीनिमित्त सत्कार

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे       ता.३१(बातमीदार) शिक्षकी पेशात निष्ठतेने काम केल्यास चांगलेच फळ मिळते असे उदगार रविवार (ता. ३१) रोजी जिल्हा परिषद शाळेतून सेवा निवृत्त झालेले शिक्षक रमाकांत बरीदे यांनी आयोजित सेवा गौरव कार्यक्रमात केले.  यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रमोद कुमावत हे उपस्थित होते. या वेळेस पुढे बोलताना सेवानिवृत्त शिक्षक रमाकांत बरीदे म्हणाले की, मी माझ्या 30 वर्षाच्या नोकरीत खडू व फळा यात कधीच अंतर पडू दिले नाही. नवीन भरती झालेल्या शिक्षकांनी पण ही गोष्ट पाळलीच पाहिजे असे ते म्हणाले यावेळी म्हणाले, दरम्यान यावेळी मा.नगराध्यक्ष विनायक काळे,विजय राखे,राजेश कानपुडे, डॉ.संजय पुरी,लक्ष्मीकांत राऊत आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाला शंकरराव पवार,अंकुश बागल,अंकुश तेलगड,अखिल काजी,आरिफ आली, अँड.जगन्नाथ बागल,विष्णू कदम,विष्णू ढवळे, अशोक माने,लक्ष्मीकांत माने,प्रल्हाद माने,नंदलाल कपाळे, प्रभाकर बागल,सतीश गवळी,चंद्रकांत कपाळे, डॉ.गजानन केशरखाणे, डी. बी. काळे, ईश्वर दडमल,श्री पिंपळे,नितीन गवळी,सोनुभाऊ बरीदे,सुभाष बरीदे,महादेव बरीदे

ऐतिहासिक हेमाडपंती हर हर महादेव मंदिर बनले भाविकांचे आकर्षण श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी होते भाविकांची गर्दी

Image
 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ       दि.३१ऐतिहासिक हेलावंतीनगरी अर्थात हेलस येथील ऐतिहासिक पुरातन हेमाडपंथी हर हर महादेव मंदिर श्रावण महिन्यानिमित्त भाविकांचे आकर्षण बनले असून श्रावण सोमवार निमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात.  मंठा शहराच्या पूर्वेस जवळच असलेल्या नगरीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या गाव व शिवारात 12 मारुती मंदिर जागृत, गणपती मंदिर, दत्तात्रय मंदिर, कालिंका देवी माता मंदिर, हेमावती देवी मंदिर, गोंदेश्वर महादेव मंदिर,पुरातन बारव आहे. हेमाडपंथी राजा मामा- भांजे यांच्या आकर्षक मूर्ती या गावात आहेत श्रावण महिन्यानिमित्त दररोज व विशेष करून श्रावण सोमवारी हर हर महादेव मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात आपल्या इच्छा आकांक्षा व इच्छित कामे पूर्ण करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी अभिषेक, दर्शन, संकल्प आणि भंडाऱ्याचे आयोजन दरवर्षी करतात, हर हर महादेव मंदिराला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा क दर्जा दिलेला असून ग्रामपंचायत चे सरपंच पांडुरंग खराबे पाटील यांच्या पुढाकाराने मंदिर परिसर व पुरातन बार

ओला दुष्काळ जाहीर करुनहेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी- सचिन खरात

Image
      परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  जुलै महिन्यात परतुर तालुक्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या तालुकाध्यक्ष सचिन खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांनादिलेल्या निवेदनात नमूद आहे की, परतुर तालुक्यात गत दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे शेतीत पाणी शिरून शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके केली आहे. बुडाल्यात जमा आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी

शेवगा येथील सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णूपंत धुमाळ यांची बिनविरोध निवड

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे शेवगा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णुपंत सुंदरराव धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपील आकात यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालुन स्वागत केले.       यावेळी नवनिर्वाचित सदस्य प्रभाकरराव धुमाळ,पांडुरंग धुमाळ,गुलाब नाथभजन, विठ्ठलराव धुमाळ,सरपंच कैलास नाथभजन,गुलाबराव धुमाळ,सुनिल धुमाळ, पाराजी धुमाळ,राजेभाऊ धुमाळ,विक्रम धुमाळ, विकास प्रधान दत्ताराव धुमाळ,सखाराम वरकड,गजानन धुमाळ,महेश धुमाळ ,विष्णु मुजमुले आदींच्या यावेळी उपस्थिती होती.

मंठा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व जागा आप लढवणार - जगदीश राठोड

Image
मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ दि.२९ महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्यातील आरक्षणाच्या सोडती [ ता.२८ ] रोजी जाहीर करण्यात आल्या असून लवकरच निवडणुकीच्या तारखा ही जाहीर होतील असे असताना या शेतकरी, वंचित,उपेक्षित समाजाचे मूलभूत प्रश्नच अजून कित्येक वर्षापासून प्रलंबित आसल्याने तांडा,वाडी वस्त्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आम आदमी पार्टी संघटनमंत्री मराठवाडा विभाग सुग्रीव मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील होऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणुकांसाठी आता कंबर कसली आहे.          या शेतकरी,वंचित,उपेक्षित, दुर्लक्षित समाजाला कोणी वाली नसल्याने यांचा फक्त मतदानासाठीच आज आजपर्यंत वापर करण्यात आलेला असून कोणत्याही प्रकारच्या मूलभूत गरजा व सुख सुविधा आजपर्यंत यांच्यापर्यंत पोहोचवल्या नसल्याने आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी गाव,तांडा वाडी,वस्तीवरील होतकरू तरुणांना निवडणुकीत उतरवून तसेच समाजातील सर्वच जाती धर्मातील समुहाला सोबत घेत समविचारी पक्ष पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मंठा तालुक्

शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील सावंगी गंगा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे,मेघा इंजीनियरिंग कंपनीने रखडवलेल्या पुलाच्या कामासह मतदारसंघातील दिंडी मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Image
 परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे   मेघा इंजीनियरिंग इनफ्रास्ट्रक्चर कंपनीने NH- C 548 शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाचे कामाचे कंत्राट घेतलेले असून काम आता अंतिम टप्प्यात आले आहे मात्र परतूर विधानसभा मतदारसंघातील गंगा सावंगी तालुका परतुर जिल्हा जालना येथील गोदावरी नदीच्या पुलाचे काम भूसंपादनाचे कारण पुढे करत कंपनीने जाणीवपूर्वक केले नसल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून कळविले आहे शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरून विदर्भातून सोलापूर पंढरपूर आदी भागांमध्ये मोठ्या हजारो वाहनांची नियमितपणे येजा असते मात्र सावंगी गंगा येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे हजारो वाहनांना वेळेबरोबरच जासन तास बसून राहण्याचा मनस्ताप सहन करावा लागतो पुढे या पत्रात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की कंपनीने काम करत असताना डबर खडी मुरूम इत्यादी बांधकामासाठी लागलेल्या कच्च्या मालाचा 54 कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाला फसवण्याचे काम केले असून, प्रशासनाने कंपनीने अनामत ठेवलेल्या 200 कोटी र

मधुकर निलेवाड यांचा समर्थकासह मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठिंबा

Image
 परतूर/( प्रतिनिधी) हनुमंत दवंडे  परतुर शहरातील प्रभाग क्र. दोन मधील इच्छुक उमेदवार मधुकर श्रीरंग निलेवाड यांनी त्यांच्या सहकार्यासह आज परतूर येथे अग्रवाल साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जाहीर समर्थन दिले आहे.       त्यांच्या समवेत पाराजी तुकाराम निलेवाड, विलास पांडुरंग निलेवाड ,श्रीरंग बाजीराव निलेवाड ,सुधाकर विठ्ठल निलेवाड ,मयुरी निलेवाड, परसराम माने संदीप जईद, अरुण बागवान, गणेश निलेवाड, आदींनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली परतूर शहरांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण तन-मन-धनाने काम करणारा असून व शहराच्या विकास कामात मोहन अग्रवाल यांना नेहमी सहकार्य राहील असेही समर्थन देणाऱ्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. मधुकर निलेवाड हे प्रभाग क्र. दोनचे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून इच्छुक उमेदवार आहेत.

विठ्ठला अर्बन को.ऑ.बँक मंठा शाखेचे उत्साहात उद्घाटन ठेवीदार व खातेदारांचा विश्वास संपादन करणार---डॉ. राजेश वायाळ

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ दि.२९ मंठा येथे विठ्ठला अर्बन बँक शाखेचे उत्साहात उद्घाटन शुक्रवार दि.२९रोजी श्री. पोळ बाबा यांच्या हस्ते करण्यात आले.        विठ्ठला अर्बन बँक मार्फत ठेवीदार व खातेदारांना सुविधा देणार असून ग्राहकांचा विश्वास संपादन करणार तसेच बेरोजगार तरुण, शेतकरी, कर्मचारी यांना बँके मार्फत आर्थिक सक्षम बनविणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वायाळ यांनी केले. यावेळी शेतकरी,व्यापारी, डॉक्टर, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी यांची उपस्थिती होती. विठ्ठला अर्बन बँकच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत मदनराव वायाळ तसेच बँकेचे मॅनेजर किरण देशमुख यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्त परतूर येथे महादेव मंदिरात आरती करण्यात आली

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे शिवसेना पक्ष प्रमुख. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव मंदिर परतूर येथे आरती करण्यात आली तसेच परतूर येथे शिवसेना सदस्य नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते.       या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माधवराव मामा कदम युवा नेते नितीन भैया जेथलिया राष्ट्रवादी तालुका अध्यक्षय रमेश काका सोळंके शिवसेना तालुका प्रमुख अशोक राव आघाव शिवसेना युवा नेते महेश भैया नळगे शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग किसान सेना उपजिल्हा प्रमुख कांताराव सोळंके कॉग्रेस तालुका अध्यक्ष बाबाजी घाडगे नगरसेवक बाबुरावजी हिवाळे शिवसेना दलित आघाडी तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव विठ्ठलराव वटाने आबासाहेब कदम वसंत बरकुले रामजी सोळंके गोविंद मुंदडा रोहित अग्रवाल दिपक कदम सुदर्शन धुमाळ बाळू गाते शिवा पवार गणेश लालजरे शंकर भापकर बापू घटमळ गोपाल माने अशोक धुमाळ मंगेश भुसारे व इतर शिवसेनीक मोठ्या संखेने उपस्थित होते महा आरतीचे आयोजक युवा सेना शहर प्रमुख राहुल भैया कदम होते

कपिल आकात यांनी घेतली अनाथ मुलींची शैक्षणिक जबाबदारी...

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालय या शहरातील नामांकित शाळेत दिनांक 27 जुलै रोजी परतूरच्या इतिहासात नोंद घ्यावी असा प्रसंग पाहिला मिळाला. शाळेतील एका अनाथ गरीब मुलीचा वाढदिवस संस्थाचालक कपिल आकात यांनी स्वतः साजरा करून त्या मुलीची पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.        परतुर येथील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयाची इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी जागृती पिसाळ या मुलीचे आई-वडील तीन महिन्यांचे असतानाच वारले परतूर शहरातील देवकर गल्लीत राहणारे तिचे मामा गणेश घोडके यांनी तिला परिस्थिती गरीब असताना शिक्षण सुरू ठेवले. शाळेत मुलींचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा असल्याने दिनांक 27 जुलैला या मुलीचा वाढदिवस साजरा केला जात असताना योगायोगाने शाळेत संस्थेचे सचिव कपिल आकार तिथे आले होते त्यांना याची माहिती दिली असता त्यांनी अनाथ मुलीचा वाढदिवस स्वतः साजरा करून सर्वांना चिकित केले इतकेच नाही तर तिला आतापर्यंत शिक्षण देणारे तिच्या मामाची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे शिक्षक योगेश बरी दे यांनी सांगितले असता कपिलाकडे या मुलीची पुढील शिक्षणाची जबाबदारी

मंठा तालुक्यात गरोदर माता व चिमुकल्या बालकांचा पोषण आहाराचा घास गायब ?

Image
 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ     दि. २८ महाराष्ट्र शासन गरोदर, स्तनदा माता व बालक तंदुरुस्त राहावे यादृष्टीने विविध योजना राबवित असते.                    त्यामध्ये गरोदर माता व बालक यांना बालविकास प्रकल्प अंतर्गत त्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी त्यांना सकस आहार पुरविण्याचे काम या विभागामार्फत चालत असते. परंतु हा विभागच जर गरोदर,स्तनदा माता व चिमुकले बालक यांच्या घशात जाणारा सकस पोषण आहार संबंधित विभागाच्या खिशात जातो की काय हा प्रश्न उपस्थित होतो ? यामध्ये संबंधित लाभार्थ्यांना दोन-तीन वेळा जाऊनही आहार वाटप केला जात नाही. व त्यानंतर लाभार्थी कंटाळून तिकडे जाणे सोडून देतो. कालांतराने नंतर लाभार्थी दुसऱ्या वेळेस गेल्यास मागील आहाराची चौकशी केली असता. मागील वेळेस पोषण आहार आला नाही, कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जमा करून घेतला, असे अनेक नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. तसेच पोषण आहार वाटपाचे दोन ते तीन दिवसच ठेवले जातात एखाद्यावेळेस लाभार्थी हा त्या दोन दिवसांमध्ये गेला नाही तर त्याचा आलेला पोषण आहार त्यानंतर त्याला दिला जात नाही. आलेला पोषण आहार संपला असे सांगितले

मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांना मातृशोक

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथिल श्री .समर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर यांच्या मातोश्री श्रीमती मंगलाबाई प्रभाकरराव पाटोदकर कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या .         त्यांच्या पश्चात एल.आय.सी.चे विकास अधिकारी सुभाषराव पाटोदकर , ॲड.सुधीर कुलकर्णी ,तीन सुना ,नातु ,पणतू असा मोठा परिवार आहे .

जालना जिल्ह्यात टवाळखोरांना आवर घाला, मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

Image
जालना: प्रतिनिधी समाधान खरात         जुन महिन्यात राज्यातील काॅलेज महाविद्यालय सुरु झाल्याने विद्यार्थी तरुणीं या काॅलेज व महाविद्यालयात रस्त्याने पायी तर काही विद्यार्थींनी सायकल, स्कुटी, बसने जाणं येणं करत आसतात. तसेच जालना शहरात व जिल्ह्यात काॅलेज, विद्यालयाबाहेर टवाळखोरांची झुंबड ऊडतांना दिसुन येत आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे.       या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे जालना पोलीस अधिक्षक डाॅ.अक्षय शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जालना जिल्हा व शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा आशी मागणी केली आहे. तसेट टवाळखोर व गुन्हेगार वृत्तीच्या विद्यार्थ्यांना काॅलेज महाविद्यालयात प्रवेश देऊ नये. आसी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी सुरवातीपासुनच जालना जिल्हा शिक्षण विभागाकडे लाऊन धरली होती. पण काॅलेज, व महाविद्यालय व्यवस्थापकांवर दबाव टाकून व दहशत निर्माण करुन टवाळखोरांनी प्रवेश मिळवला आसल्याचा आरोप म

मंठा येथील कन्या शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेखलाल भाई तर उपाध्यक्ष आशपाक शेख

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायळ      दि.२५  बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते त्यानुसार आज दिं २५ जुलाई २२ सोमवार रोजी मंठा येथील कन्या शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची पालक बैठक बोलवण्यात आली होती.     त्यानुसार सर्वानुमते सर्व रीतसर प्रक्रिया पुर्ण करत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेखलाल भाई तर उपाध्यक्षपदी आशपाक शेख यांची निवड करण्यात आली.तर सदस्यपदी फेरोज अन्वर शेख,सय्यद अल्ताफ युसुफ, सत्यदीप नंदकिशोर प्रधान, अश्विनी संतोष धाबे,खाटिक शाहिन जावेद,शमीम युसुफ बागवान, समीना तोफिक बागवान, या समितीने सर्वांना असा विश्वास दिला की, शालेय गुणवत्ता वाढवने व मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे. व शालेय व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता यावी. शाळाबाह्य व अपंग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षकांच्या समस्याचे निराकरण करणे व त्यांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे,शालेय विकास आराखडा तयार करणे, या सर्व गोष्टीवर भर देऊन न

मुख्यमंत्री वैद्यकीय आरोग्य सहाय्यता कक्ष" पुन्हा सुरु, सामान्य व गरजू रूग्णांना मिळणार मोठा आधार - प्रा. सहदेव मोरे पाटील,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्यासह कक्ष सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आ. लोणीकरांचे मानले आभार

Image
 मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ मागील पंचवार्षिकमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उप मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला "मुख्यमंत्री वैद्यकीय आरोग्य सहाय्यता कक्ष" पुन्हा सुरु करणे अत्यन्त आवश्यक होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेकांनी हा कक्ष सुरु करण्याबाबत वारंवार विनंती केली होती, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही केली नाही अनेक रुग्णाच्या वारंवार या कक्षाकडे अनेकदा येरझरा सुरु असायच्या परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परंतु हिंदुत्वाचा विचार घेऊन पुन्हा एकदा भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आलं आणि हा कक्ष पुन्हा सुरु झाला याचा मनस्वी आनंद असून सामान्य व गरजू रुग्णांना यामुळे मोठा आधार मिळणार असल्याचे भाजपा जालना ग्रामीण तालुका सरचिटणीस प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी यावेळी सांगितले.  "मुख्यमंत्री वैद्यकीय आरोग्य सहाय्यता कक्ष" सुरु करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, मा.उप मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मा.आ

ओबीसी समाजाला आरक्षण मंजूर केल्याबद्दल बीड येथे धनगर समाज बांधवांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे   दि 24 ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा लागू व्हावे यासाठी राज्यभर ओबीसी समाजातील संघटनेचा व ओबीसी नेत्यांचा संघर्ष चालूच होता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले होते. समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात होते काही निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला संधी मिळत नव्हती ओबीसी समाजाचा राज्यभर मोठमोठाले आंदोलन, मोठमोठे मोर्चे ,मोठ मोठाले रस्ता रोको, करून सुद्धा या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी व न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी निवेदन ओबीसी नेते करत होते‌‌. परंतु या समाजाकडे दुर्लक्ष केले जात होते.       राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर शिंदे- फडवणीस सरकारने काटेकोर पणे या ओबीसी समाजाकडे लक्ष देण्याचे काम केले व ओबीसी समाजाला न्याय मिळवण्यासाठी लक्ष दिले‌‌.     आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर प्रकाश भैय्या सोनसळे ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाला आरक्षण मंजूर झाल्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यामध्ये सर्व समाज बांधव नेते कार्यकर्ते यांनी सहभा

दहावी सीबीएस ई परीक्षेत श्रद्धा शर्माचे 94% गुण मिळवीत घवघवीत यश

Image
परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे  येथील विवेकानंद इंग्लिश स्कुल ची विद्यर्थिनी पत्रकार ऍड.केदार ज.शर्मा यांची कन्या कु.श्रद्धा हिने आज जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९४.२०% गुण मिळवीत घवघवीत यश मिळविले.  तिच्या यशाचे श्रेय तिने आपले आई वडील, शाळेचे शिक्षक व ज्ञानदीप फाउंडेशन सेंटरचे संचालक काबरा सर व इतर शिक्षक वृंदांना दिली आहे तिच्या यशाबद्दल तिचे माजी मंत्री बबनराव लोणीकर, नगराध्यक्षा विमालताई जेथलिया, राहुलभैया लोणीकर, प्रकाशराव सोळंके, काबरा सर, शाळेचे संचालक संदीप बाहेकर शिक्षक वृंद, पत्रकार अजय देसाई, बालाजी ढोबळे, शामसुंदर चित्तोड, राजकुमार भारूका, कैलास सोळंके, माणिक जैस्वाल आदींसह मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली,वरफळ विविध सेवा सहकारी संस्थेवर भाजपचा झेंडा

Image
* परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे  तालुक्यातील वरफळ येथील वरफळ विविध सेवा सहकारी संस्थेवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजप युवा मोर्चा चे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  अटीतटीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पक्षाचा झेंडा विविध सेवा सहकारी संस्थेवर फडकवला. यात चेअरमन पदी सतिष माणिकराव कुलकर्णी तर व्हाईस चेअरमन पदी हयात खान दाऊद खान यांनी बाजी मारली यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले की सहकार क्षेत्राला भरारी देण्यासाठी सहकारी संस्थाच्या माध्यमातून गावगाड्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उलेखनीय कार्य करणार आहोत तसेच वरफळ येथील शेतकरी यांनी भारतीय जनता पक्षांवर दाखवलेल्या विश्वासा बद्दल ही श्री राहुल लोणीकर यांनी आभार मानले यावेळी राहुल लोणीकर, नवनिर्वाचित चेअरमन सतिष कुलकर्णी, व्हाईस चेअरमन हयात खान पठाण,रामकीसन रुपनर,गुलाब सावंत,सुधाकर बेरगुडे उद्धव गोरे,सरपंच नदीम पटेल,अश्रोबा गोरे,गजानन गोरे,रंजित बेरगुडे, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकार

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथे 500 रक्तदात्यांचे रक्तदान,देवेंद्रजींच्या दीर्घायुष्यासाठी लोणीकरांची परतुरातील महादेव मंदिरात महाआरती,पागरी गोसावी ता.मंठा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 200 गणवेश ( ड्रेस ) वाटप

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य असून राज्यसभेच्या तीन व विधान परिषदेच्या 5 जागा निवडून आणण्याचे अशक्यप्राय असणारे काम त्यांनी पूर्ण करून दाखवले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जे भल्याभल्यांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले त्यामुळेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याला लाभलेले अलौकिक नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याने विकास कामामध्ये कात टाकली असून महाराष्ट्रातील विकासाचा रथ जोमाने सुरू आहे मागील पंचवार्षिक मध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळात महाराष्ट्रातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केल आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले  मागील पंचवार्षिक मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या पथावर घेऊन जात असताना देवेंद्रजींनी राज्याच्या विकासासाठी अनेक योजना अमलात आणल्या त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांबरोबरच सर्वसामान्य दिलासा देणाऱ्या योजनाही देवें

परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न....

परतूर,/प्रतिनिधी हनुमंत दवंडे  वंचित बहुजन आघाडीची आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकी संदर्भात शासकीय विश्राम गृह , परतूर येथे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये परतूर नगर पालिकेच्या सर्व वॉर्ड मध्ये उमेदवार उभे करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.               जिल्हाअध्यक्ष भालचंद्र भोजने यांनी सर्व कार्यकर्त्यांना झटून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. गरजवंत लोकांना रेशकार्ड मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित होताच लवकरच तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले . या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते चोखाजी  सौदर्य, जालना जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, डॉ किशोर त्रिभुवन,जिल्हा महासचिव शाफिक आत्तार, जिल्हा संघटक हनुमंत मोरे, माजी जिल्हा अध्यक्ष गौतम खंडागळे,मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव,सुरेश काळे शहर अध्यक्ष राहुल नाटकर, उपाध्यक्ष बाळू कदम , संघटक प्रदीप साळवे, महासचिव रामा कोयते, सचिव दीपक कचरू हिवाळे, सहसंघटक प्रशांत वाकळे,सल्लागार अशोक ठोके, परतुर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे,शोएब पठाण, उत्तम साळवे, तालुक

सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथे रक्तदान शिबिर,पाचशे रक्तदाते रक्तदान करणार- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,रक्तदान करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लोणीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात येणार ड्रेस वाटप1000 विद्यार्थ्यांना करण्यात येणार वाटप

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असताना तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणतीही बॅनर बाजी पोस्टरबाजी जाहिरात बाजी न करण्याचे राज्याचे विकासप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी ठरवले असून सेवा समर्पण सप्तांतर्गत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 22 जुलै 2022 रोजी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतुर येथील जनसंपर्क कार्यालयावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर हजार शाळकरी गरजूवंत विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, रक्तदान हे श्रेष्ठदान असून मागील कोरोना महामारीच्या काळात भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून हजारो रक्त पेशव्यांचा संकलन करण्यात आलं होतं महामहीम पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवस

मुस्लिम, दलित, आदिवासी समाज बांधवांना परिवार नव्हे तर कर्तुत्व पाहून देशाच्या सर्वोच्च पदावर बसवणे हे केवळ भाजपातच शक्य - , मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या पायगुणामुळेच ओबीसी आरक्षण मिळाले - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,मराठा आरक्षणासाठी सदैव प्रयत्नशील लवकरच त्याबाबतही निर्णय होईल अशी अपेक्षा - लोणीकर

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या अधिकृत उमेदवार व नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची आज प्रचंड मताधिक्याने राष्ट्रपतीपदी निवड झाली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली त्यानिमित्त आज मंठा येथे आदिवासी समाज बांधवांसोबत जल्लोष करत फटाक्यांच्या आतिषबाजीत लोणीकर यांनी श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले व सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही वाटचालीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  देशाच्या इतिहासात पहिल्यांदा परिवार वादाचा विचार न करता सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती या अत्यंत महत्त्वाच्या पदांसह पद्म, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी निवड करण्यात येत आहे ही खऱ्या अर्थाने भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असून एखाद्या विशिष्ट परिवारात जन्माला आलो यापेक्षा कर्तुत्व पाहून संधी दिली जाते ही बाब अत्यंत महत्त्वाची असून *स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहार

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रल्हादराव बोराडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट..

Image
( मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ  दि.२० मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंठा शहरातील सुपरहिट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिवसेनेच्या नगरसेविका सरोजाताई प्रल्हादराव बोराडे यांचे पती यांनी मुंबई येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मंठा शहर तालुका विकासमय आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी भरीव निधीची मागणी केली असून मंठा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याकडेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे म्हणून प्रल्हादराव बोराडे यांनी त्यांची भेट घेऊन साहेब, मंठा शहरा तालुक्याकडे आपले लक्ष असू द्या अशी विनंती केली. (मंडळ शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणून शहराचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार प्रल्हादराव बोराडे असा विश्वास व्यक्त केला. (आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बबनरावजी लोणीकर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार- प्रल्हाद बोराडे)

जयपूर येथे जय भवानी माध्यमिक विद्यालयात वृक्षरोपण

Image
परतूर –प्रतिंनिधी हनुमंत दवंडे मंठा तालुक्यातील जयपूर येथे जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया चया मैदानात 12 वी विज्ञान विद्यार्थी व विद्यार्थिनीने वतीने मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सिद्धार्थ पवार, शिक्षक एस.आर.पाटील, एस डी काकडे, सचिन मस्के, गजानन तुरेराव, सुगण नितनवरे, जगन काळे, एकनाथ वायाळ, रामेश्वर उबाळे, गजानन काकडे, उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थी यांनी वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग घेतला, विद्यालयाच्या परिसरात लावलेल्या झाडाची संगोपन करून संवर्धन करण्याची जबाबदारी उच्च महाविद्यालय घेणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सिद्धार्थ पवार, यांनी दिली आहे.

मंठ्यात सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे फटाके वाजवून जल्लोषओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा.

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायळ  दि.२० आज मंठा शहरात माननीय सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडल्यामुळेच राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे समस्त ओबीसी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ.बाबासाहेब पुतळ्या समोर फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.        सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्‍य केला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे समस्त ओबीसी बांधवांनी स्वागत केले आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्‍याचा प्रश्‍न दिर्घकाळ प्रलंबित होता. हा प्रश्न निकाली. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल. इच्छा असेल तर कोणतेही काम करा त्यात नक्की यश मिळेल हेच आजच्या या निकालातून दिसून येत आहे.          राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यास महापालिकांमध्ये बाठिंया आयोगानुसार २७ टक्के आरक्षणाप्रमाणे ७ म

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यासाबरोबरच पायगुण चांगला, सुप्रीम कोर्टात अभ्यासपूर्ण बाजू मांडली- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन* *भाजपच्या अभ्यासू नितीमुळेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा- आमदार लोणीकर*

  ***

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यासाबरोबरच पायगुण चांगला, सुप्रीम कोर्टात अभ्यासपूर्ण बाजू मांडली- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,भाजपच्या अभ्यासू नितीमुळेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा- आमदार लोणीकर,लोणीकर यांनी केले सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे स्‍वागत.,भाजपच्या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्‍याचे यश...

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पायगुण चांगला असून अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडल्यामुळेच राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्‍य केला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे भाजपा नेते माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यासंदर्भात सातत्‍याने केलेल्‍या पाठपुराव्‍याचे हे यश असल्‍याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्‍यक्‍त केले आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्‍याचा प्रश्‍न दिर्घकाळ प्रलंबित होता. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून आमच्या हाती सत्ता द्या तीन महिन्यात आरक्षण मिळवून देतो

पक्ष बळकट करण्यासाठी सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यावर भर द्या.-जिशान शेख रॉ. कॉ.परतूर मंठा विधानसभा निरीक्षक

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे दि. 19 रोजी परतूर येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या आढावा बैठकीत परतूर विधानसभा पक्ष निरीक्षक जीशान यांनी काढले यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे,युवकाचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,तालुका अध्यक्ष रमेश सोळंके,विजय राखे,अखिल काजी,भागवत कडपे आदी उपस्थित होते.         यावेळी  बोलताना श्री खान म्हणाले की पक्ष स्थापने पासून ते आज पर्यंत पक्षातील नेते कार्यकर्ते हे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आला आहे याची पावती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत मिळाल्या शिवाय राहणार नाही असे सांगत निवडणुकीच्या तयारी ला लागा असे सूतोवाचक दिले यावेळी पंकज बोराडे,कपिल आकात यांनी पण उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंठा युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब घारे, परतूर तालुका अध्यक्ष ओंकार काटे,परतूर शहर अध्यक्ष राजेश तेलगड,पंजाबराव अवचार,योगेश बरकुले,कदिर कुरेशी,रजाक कुरेशी, शेख अफरोज, अनवर पठाण,गजानन अँभुरे,बंटी चव्हाण,सचिन चव्हाण,बाळासाहेब चव्हाण, महेश नागरे,सत्तार कुरेशी,योगेश अवचार, सोनाजी गाडेकर, माऊली डाव्ह

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त मंठा येथे अभिवादन..!

Image
 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ        येथे (ता.१८) सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी शाळेत न जाता बिनभिंतीच्या शाळेतच शिक्षण घेऊन त्यांनी ३५ कांदिबऱ्या,१९ कथासंग्रह,१३ लोकनाट्य, १० पोवाडे, १ नाटक, १ प्रवासवर्णन अशी ७० पुस्तकांच्यावर साहित्य लिहून त्यांचे काही साहित्य अनेक भाषेत भाषांतरीत झाले आहे. अण्णाभाऊ हे, सुरुवातीला कम्युनिस्ट विचारसरणीचे होते नंतर त्यांनी आंबेडकरी विचारधारा अंगिकारली.  त्यांच्या वारणेचा वाघ, वैजंता, फकिरा, आवडी, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, अलगुज,चित्रा या कादंबऱ्यावर चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. १६ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा येथे अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ.प्रतापसिंह चाटसे, अरामकिसन कांबळे, नगरसेवक राजेश खंदारे, अरुणभाऊ वाघमारे, बाळासाहेब वांजोळकर,ॲड सिद्धार्थ अवसरमोल, प्रकाश घुले, शरदभाऊ मोरे, मारुती खनपटे, राज खनपटे, पिराजी पवळे, जय खंदारे, भीमराव वाघ, विलास

स्व. अनिल जिंदल नगरपरिषद प्राथमिक शाळा जालना येथे एस. जे. ग्रुप तर्फे वृक्षारोपण

Image
जालना सुभाष वायळ      दि.१८स्व. अनिल जिंदाल नगरपरिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे सचिन जाधव एस के ग्रुप यांनी स्वखर्चाने एक सामाजिक उपक्रम म्हणून शालेय मैदानात 50अनेक प्रकारचे तसेच बदाम चाफा कणेर मेहंदी लिब झाडे बांबू मध्ये फिटिंग करून झाडे लावली उपस्थित ग्रुपचे सदस्य .राहुल कंळबकर .          रुपेश नाईक तसेच सर्व सदस्य यांनी शाळेला केलेल्या श्रमदान बद्दल सचिन जाधव एस जे ग्रुप चे धन्यवाद शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक यांनी मानले.

स्व बळीराम काशिनाथ राऊत यांना आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून श्रद्धांजली,पंढरपूर दिंडीहून परतत असताना अपघाता दरम्यान झाला होता मृत्यू,द्धांजली कार्यक्रमाला राहुल लोणीकर यांची उपस्थिती,1993 पासून स्व बळीराम राऊत करायचे नित्यनियमाने पंढरीची वारी,कार सेवक म्हणून ही आमदार लोणीकर यांच्यासोबत नोंदवला होता सहभाग

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  स्वर्गीय बळीराम काशिनाथ राऊत राहणार अंगलगाव तालुका परतुर यांचा दिनांक 13 जुलै रोजी पंढरपूर येथील वारीतून परतताना पंढरपुर येथेच अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर स्व बळीराम राऊत यांना अंगलगाव तालुका परतुर येथे आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली  माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे सध्या मुंबई येथे असल्यामुळे आमदार लोणीकर यांनी चिरंजीव युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांना स्वर्गीय राऊत यांचे मुळगाव अंगलगाव येथे पाठवून स्वतः भ्रमणध्वनीवरून स्वर्गीय बळीराम राऊत यांना श्रद्धांजली अर्पित केली यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की स्वर्गीय बळीरामजी 1993 पासून सदैव पंढरपूर च्या वारीचे वारकरी होते न चुकता ते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडी मधून जायचे मात्र यावर्षी दिंडीहून परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि निष्कलंक निष्पाप माझे सहकारी बळीराम राऊत यांचा अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून मनाला बोचणारी आहे असे सांगतानाच आमदार लोणीकर म्हणाले की राम

सय्यद वसीम व मित्र मंडळाच्या वतीने पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार....

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे अनेक वेळा चांगले कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव झालेले तसे कमी पाहण्यात येथे  याला अपवाद आहे शहरातील एआईएमआयएम चे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांच्या वतीने शहराची साफसफाई करणाऱ्या पालिका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. झाले असे की मागील आठवड्यात आषाढी एकादशि व बकरी ईद हे महत्वाचे सण साजरे करण्यात आले या सणाच्या काळात शहरातील विविध भागांतील स्वच्छता करून आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून देणाऱ्या पालिका कर्मचारी यांनी मुख्याधिकारी सुधीर गवळी व स्वच्छता अभियंता प्रमोद घाटेकर ,निरीक्षक रवी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई केली  याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आला होता याबाबतची दखल घेत सय्यद वसीम व त्यांच्या मित्रमंडळी यांनी दिनांक 17 जुलै रोजी पालिकेत जाऊन सफाई कामगार यांचा सत्कार केला  यावेळी सय्यद रहेमान,इसा अन्सारी,नईम भाई,शेख हसन,रज्जाक कुरेशी,नजीब काजी,शेख आसेफ,अनिल पारीख यांच्यासह पालिकेतील सफाई कामगार व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

मंठा पोलीसाची उत्कृष्ट कामगिरी जालना जिल्ह्यात सर्वात जास्त अवैध धंद्या विरुद्ध मंठा पोलीसाची कार्यवाही,..जालना जिल्ह्यात मानांकन मध्ये मंठा पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकावर. , निरीक्षक संजय देशमुख यांचा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित..

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ  दि.१७ मंठा पोलीस ठाणे कडून अवैध दारू विक्रेते विरुद्ध ५७ गुन्हे दाखल करून ५८ करून सहा लाख वीस हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त तसेच जुगार मटका चालकाविरुद्ध १३ गुन्हे दाखल करून ३६ आरोपींना अटक करून २१ हजार ७४० चा मुद्देमाल जप्त केला आहे.मंठा पोलीस स्टेशन येथे मागील संपूर्ण वर्षांमध्ये अवैध दारू विक्रेत्या विरुद्ध सन २०२१ मध्ये एकूण ४६ गुन्हे नोंदविलेले होते.सन २०२२ मध्ये १५ जुलै २०२२ पर्यंत पोलीस ठाणे मंठा हद्दीत एकूण अवैध दारू विक्रेत्यावर ५७ गुन्हे दाखल केले,असून एकूण ५८ आरोपींना अटक केली आहे.त्यांच्याकडून सहा लाख विस हजार तिनसे साठ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.तसेच मंठा पोलीस हादी मध्ये मटका जुगार खेळणाऱ्या विरुद्ध चालू वर्षात एकूण १३ गुन्हे दाखल केले असून एकूण ३६ आरोपींना अटक केली आहे.त्यांच्याकडून २१,७४० रुपयाची रक्कम व मुद्देमाल जप्त केला आहे.अशा प्रकारे अवैध धंद्याविरुद्धची कठोर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्री अक्षय शिंदे,अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस न

देवर्षी संगीत विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती गीतांच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त परतूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे विठ्ठल आवडी प्रेमभाव हा अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला. देवर्षी संगीत विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्राध्यापक रामेश्वर नरवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष होते. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस अशा भक्तीगीताचे आणि सुप्रसिद्ध अभंगाचे सादरीकरण केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष  रामेश्वर अण्णा नळगे उद्घाटक   कपिल आकात सभापती कृउबा समिती   ज्ञानेश्वर काळे संस्थापक अध्यक्ष अर्बन बँक प्रमुख पाहुणे  माजी प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे, जेष्ठ नगरसेवक अंकुश  तेलगड, विनायकराव काळे, विजय राखे, बाबासाहेब तेलगड, गटसमन्वक  कल्याण बागल, प्राचार्य शंकरराव चव्हाळ, लायन्स क्लबचे  मनोहरराव खालापुरे, शाम तेलगड, माजी सैनिक प्रशांत पुरी, जिजाऊ ब्रिगेड च्या अर्चना तनपुरे, सौ, वर्षा पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. अभंगवाणी कार्यक्रमाचे प्

शेतकर्‍या साठी नेहमी झटणारे आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या- अरुण खराबे पाटील.

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ मंठा येथील अरुण खराबे पाटील यांनी परतूर मंठा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांना मंत्रिमंडळामध्ये परत एकदा मंत्री मंडळामध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे गेल्या अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती. ही जबाबदारी बबनराव लोणीकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे पार पाडून पाणीपुरवठा योजनेच नातं जिवंत करण्याचे काम त्यांच्या हातून झालेला आहे      सतत दुष्काळात भरपळत असलेला मराठवाडा यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न त्यांनी केले असून परतूर मंठा तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्या हातून विविध विकास कामे झालेली आहेत.तसेच नेहमी शेतकरी, कष्टकरी साठी आ. लोणिकर हे प्रयन्तशिल आसतात प्रत्येकाच्या सुखदुःखाला हजर असणाऱ्या व चार ते पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आलेले आमदार बबनराव लोणीकर यांचा

आष्टी येथे स्वर्गीय दत्तात्रय (नाना) शामराव लोणीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शिबिर , राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन,गरजू रुग्णांचा शिबिराला मोठा प्रतिसाद

Image
   परतुर प्रतिनीधी  हनुमंत दवंडे जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल मेडिकल अँड रिसर्च सेंटर च्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांचे आजोबा स्वर्गीय दत्तात्रय नाना शामराव लोणीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आष्टी तालुका परतुर येथे संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की माझ्या आजोबाच्या स्मरणार्थ आनंद ऋषी हॉस्पिटल ने या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना नेत्र तपासणी ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा आपणास आनंदा असून आष्टी व परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने हे शिबिर वरदान ठरणार असल्याचे यावेळी बोलताना राहुल लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागामध्ये अनेकांना उपचारासाठी शहरात जाणे व उपचार करून घेणे परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर मस्के यांनी अत्यल्प दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची जबाबदार

वलखेड येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप समाजिक उपक्रमाने युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस साजरा

Image
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर येथील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवामोर्चा  प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून भारतीय जनता युवा मोर्चाकडुन जि.प.प्रा.शाळा वलखेड येथील १४० विद्यार्थ्यांना युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.        यावेळी आसाराम सुरुंग, विश्वनाथ सुरुंग, कुंडलिक डव्हारे, बबन येडेकर, लक्ष्मण बिल्हारे, विजय गिरी, तुळशीदास बिल्हारे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष खवल, श्रीकांत मायकलवाड, कैलास पाईकराव, प्रेमनाथ झरेकर यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे कार्यकर्त्ये उपस्थित होते. *फोटो ओळी.. परतूर येथे युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस वलखेड येथे शालेय विद्यार्थ्यांना वही पेन शैक्षणिक साहित्य वाटप करतांना आदि,*

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले निर्णयाचे स्वागत,यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र

Image
प्रतिनिधी समाधान खरात  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मध्ये थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार भेटला असून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडून देण्याची संधी या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे युती सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पुढे या पत्रकात म्हटले आहे की आघाडी सरकारने अधिवेशनादरम्यान घाई गडबडीत निर्णय घेत एक कोटी रुपये कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांनाच या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव पारित केला होता त्यामुळे खऱ्या अर्थाने आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती या धन दांडग्यांच्या हातचे बाहुले बनणार होत्या त्याचबरोबर मराठवाडा विदर्भात डबघाईस आलेल्या या संस्था एक कोटी रुपयांचं कर्ज वाटप कुठून करणार हा प्रश्न होता या संस्थांना किंवा विविध कार्यकारी सोसायट्यांना कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे एक कोटी रुपयांचे कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांनाच अधिकार देणे ही अतिशय

जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाचे सरपंच परिषदेकडून स्वागत योग्य निर्णय..... घोडेबाजाराला चाप- शत्रुघ्न कणसे पाटील

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे  ग्रामपंचायतींवर सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिवसेना - भाजप युती सरकारने 3 जुलै 2017 रोजी घेतला होता . मात्र महाविकास आघाडी सरकारने जानेवारी 2020 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय रद्द करीत पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंच निवड करावी असा निर्णय 25 फेब्रुवारी 2020 महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करून , सरपंचाची निवड सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता परत नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने दिनांक 14 जुलै रोजी निर्णय घेतला की यापुढे नगराध्यक्ष व सरपंच निवड ही थेट जनतेतूनच होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या वतीने करण्यात येत आहे. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे पाटील यांनी स्वागत करतांना सांगितले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व मा.जि.परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या माध्यमातून नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारकडे सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र राजे भोसले व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊल

माजी मंत्री आमदार लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश.,परतुर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला 2 कोटी 34 लाख रुपये. निधी मंजुर,संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाथ्यांनी मानले आ.लोणीकर यांचे आभार

Image
प्रतिनीधी हनुमंत दवंडे  परतुर तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना गेली एप्रिल .मे .जून . महिन्यापासून निधी उपलब्ध नव्हता. माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी या विषयाची तात्काळ दखल घेत परतूर तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करत परतुर तालुक्यासाठी दोन कोटी 34 लाख रुपये उपलब्ध करून दिल्या मुळे परतुर तालुक्यातील स.गा. योजनेच्या 7 हजार 800 लाभार्थ्यांना आता एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचे रखडलेले मानधन मिळण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे.असे आ.लोणीकर यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे..! पुढे या पत्रकात आ.लोणीकर यांनी म्हटले आहे कि सध्या परतुर तालुक्यामध्ये संजय गांधी योजनेचे १८६६ लाभार्थी. श्रावण बाळ अ.व ब. चे 5936 लाभार्थी. राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची 2852 लाभार्थी. इंदिरा गांधी.अपंग योजना 131 इंदिरा गांधी योजना विधवा 234 . संजय गांधी योजना एस. सी .43. संजय गांधी योजना एस.टी . 5 श्रावण बाळ एस .सी. 41 श्रावण बाळ एस.टी.8.संजय गांधी योजना एस सी च्या लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन

नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार परतुर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका संदर्भात जबाबदारी देण्यात आली-अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार

Image
 परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे        परतूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका संदर्भात नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार तालूक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद संपर्कप्रमुख म्हणून नीयूक्त्या करण्यत आल्या आहे        कोकाटे हदगाव सर्कल शिवाजी  सवणे जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी जालना वाटुर जिल्हा परिषद सर्कल संपर्क प्रमुख अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना सातोना सर्कल फिरोज शेख गुलाब शेख प्रहार अपंग संघटना श्रीष्टी सर्कल हनुमान गुंजाळ युवक तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आष्टी सर्कल ज्ञानेश्वर आडे तालुका अध्यक्ष प्रहार संघटना पाटोदा सर्कल आबासाहेब भुम्बर प्रहार अपंग संघटना परतुर नगरपरिषद शहर माऊली कदम तालुका उपाध्यक्ष प्रहार संघटना या सर्व नियुक्त्या प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ ढवळे यांनी केल्या आहेत तसेच या नियुक्त्यामध्ये नामदार बच्चुभाऊ यांचे कार्य गावागावात व घराघरात पोहोचण्यासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक सर्कल मध्ये गावात जाऊन माहिती देण्यात यावी असे म्हटले आहे

छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कुलमध्ये चिमुकल्या वारकर्‍यांची दिंडी

Image
परतुर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतुर शहरातील छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्या वारकर्‍यांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. त्यातील वारीची ही परंपरा तसेच संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावे व वारीचा प्रत्यक्ष अनुभव यावा आणि आपल्या देशाची संस्कृती कृतीतुन जपावी याकरिता या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्यध्यापिका सुवर्णा आवचार यांनी बोलताना दिली आहे. यावेळी चिमुकल्या मुले व मुली विठ्ठल रुक्मिणी महाराष्ट्रात विविध संत यांच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. दिंडीत हातात टाळ घेऊन विठूरायाच्या गजर करत दिंडी काढली. सदरील दिंडी सोहळामध्ये संस्थेचे अध्यक्ष सिध्देशवर आवचार, मुख्यध्यापिका सुवर्णा आवचार, शिक्षिका भाग्यश्री बागुल, प्रिया खरात, शिपाई श्रीमती गिराम यांनी परिश्रम घेतले.