Posts

Showing posts from April, 2023

माविम मार्फत परतूर तालुकास्तरीय सुधारक सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  महिला आर्थिक विकास महामंडळ जि. जालना मार्फत तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्र परतूर, आणि सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र,आष्टी ता परतूर जि. जालना येथे नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत Gender & Nutrition उप घटकाच्या अमलबजावणी साठी Gender Sensitive Role Model Award म्हणून तालुकास्तरीय सुधारक सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. महिलांच्या विकासा करिता उल्लेखनिय कार्य व विशेष सहकार्य केल्या बद्दल पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाला सोबतच सी एम आर सी व्यवस्थापक यांचे मार्फत प्रास्ताविक व माविम च्या कामाची माहिती देण्यात आली तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांचे स्वागत सी एम आर सी व्यवस्थापक व स्टाफ मार्फत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना सहकार्य करणारे किंवा गाव स्तरावरील महिलांना मदत करणारे तालुक्यातील 60 गावातील निवड करण्यात आलेल्या 55 पुरुषांना सुधारक सन्मान या पुरस्

तळणी बस स्टँन्ड परीसरातील दाेनशे हॉर्स पावर क्षमतेचे रोहीञ जळाले

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील       मंठा तालूक्यातील तळणी येथील तळणी बस स्टँन्ड परीसरातील दाेनशे हॉर्स पावर क्षमतेचे रोहीञ वादळी वारे व विजाच्या कडकडाटाने क्षतिग्रस्त झाल्याने गेल्या तीन दिवसापासून बस स्टँन्ड परीसरातील विजपूरवठा खंडीत झाला असल्याने नागरिक ञस्त आहेत बस स्टँन्ड परीसरात शासकीय बँका विविध सहकारी बँका विद्युत उपकरणावर चालणारे अनेक व्यावसाईक अनेक हॉस्पीटल याच परीसरात येत असल्या विद्युत पूरवठा खंडीत झाल्याने अनेक सेवा तीन दिवसापासून ठप्प आहे तळणी हे मोठे बाजार पेठेचे गाव असून अनेक गांवाचा सपर्क हा रोज तळणी येथे येतो तळणी बस स्टँन्ड परीसरात अनेक व्यापारी असून विज पूरवठा सतत खंडीत होत असल्याने या परीसरातील विद्युत ग्राहक नेहमीच या अडचणीचा सामना करत आहेत तळणी गाव भागातील अनेक भागात एबी केबल टाकले असून अनेक भागात ते टाकणे गरजेचे आहे तळणी गावचा वाढता विस्तार पाहता त्या रचनेनुसार विज विद्युत यञणां व्यवस्था सुध्दा वाढणे गरजेचे आहे गावात मोठ्या प्रमाणात अधिकृत विज बील ग्रांहकांची सख्या मोठी आहे विज बीलांचा भरणा सुध्दा मोठ्या प्रमाणात होतो त्या तूलनेत येथे विद्युत पूरवठा होत

मेहकर दरेगाव जालना बस पूर्वत करा अन्यथा आंदोलन- मनसे

Image
सिंदखेडराजा प्रतीनीधी समाधान सरकटे मेहकर येथून ग्रामीण भागातून धावत जाणारी जालना ही बस सेवा काही दिवसा अगोदर चालू होती. परंतु अचानक बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांचे हाल होत आहे .     मराठवाड्याला जोडणारा जालना हे मोठे शहर असून तेथे मोठी बाजारपेठ आहे. या शहरापर्यंत ही बस धावत होती. अनेक व्यापारी या बसने प्रवास करत पंरतु ही बस बंद करण्यात आली असल्याने अनेकांचे हाल होत आहे. ही बस पूर्ववत करावी अशी मागणी मेहकर आगार व्यवस्थापक यांच्याकडे वारंवार करण्यात आली. पंरतु आता जर बस पूर्ववत करण्यात नाही आली तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व मेहकर आगारातून एकही बस बाहेर न पडू देण्याचा इशारा निवेदनात नमूद केला असून निवेदनावर मनसे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. अशी माहिती मनसे प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे याांनी दिली आहे.

तळणी परीसरात गारपीटीने कांदा पिकाचे व उन्हाळी भाजीपाल्याचे अतोनात नुकसान

Image
तळणी .. प्रतिनिधी ( रवि पाटील )      तळणी परीसरातील तळणी कानडी उस्वद लिबंखेडा कोकंरबा वडगाव ( स ) शिरपूर इंचा टाकळखोपा वाघाळा दुधा सासखेडा आदी गावात गारपीटीने कांदा पिकाचे व उन्हाळी भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे ऐन भरात आलेल्या कांदा या पिकांचे लाखोच्या घरात नुकसान झाले विविध कंपन्या सोबत करार करून शेतकर्यानी उन्हाळी कांदा पिकाचे उत्पादन जोमात घेतले होते तळणी परिसरातील जवळपास पंधरा गांवात अनेक शेतकर्यानी कांदा उत्पादन घेण्यासाठी मोठी मेहनत केली सपूर्ण एप्रिल महिन्यात कमी अधिक प्रमाणात बेमोसमी पावसाची हजेरी तळणी परीसरात लागतच होती पंरतूं . काल वार गुरूवार रोजी संध्यांकाळी पाच वाजलेल्या सुमारास तुफान पावसाला सुरवात झाली पाऊस पडल्यानंतर तुफान गारांचा तंडाखा बसल्याने कांदा भाजीपाला व उशीरा पेरलेली ज्वारी भुईसपाट झाली पावसाळ्यात ज्या प्रमाणे पाऊस पडतो त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या विषेश करुन पूर्णा नदी पाञाच्या काठावरील अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात पंरतू काल झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकर्याना भाजीपाला तळण

परतुर महेश्वरी महिला मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी सुनीता सोनी तर सचिव पदी मंगल पोरवाल

Image
    परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दिनांक 26 रोजी परतूर येथील बालाजी मंदिर मध्ये परतुर माहेश्वरी महिलांचा एक बैठक झाली या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली ही निवड तीन वर्षाकरिता निवड करण्यात आलेली आहे या निवडीमध्ये तालुका अध्यक्षपदी सौ सुनिता सोनी तर सचिव पदी सौ मंगल पोरवाल यांची निवड करण्यात आली        जिला उपाध्यक्ष पदी ममता मंत्री उपाध्यक्ष सौ सीमा राठी व सौ प्रेमा दरगड़ सहसचिव किरण मालपानी कोषाध्यक्ष सौ कल्पना लोया सहकोषध्यक्ष सौ किरण तापड़िया संघटन मंत्री सौ कविता दरगड़ सौ सीमा भूतड़ा तर सल्लागर पदी सौ विमलताई जेथलीया रेखा झंवर सौ ममता मंत्री यांची निवड यावेळी करण्यात आली   ही निवड जालना जिल्हा सभा माहेश्वरी महिला मंडळ व परतुर सभा माहेश्वरी महीला मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यानी केली     या निवडी बदल माहेश्वरी महीला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

Image
   परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      दी.22 रोजी शहरातील गायत्री मंदिर येथे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला             सर्वप्रथम भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले नंतर गायत्री माता यांच्या आरतीने सुरुवात करण्यात आली गायत्री माता यांच्या आरती नंतर भगवान परशुराम यांची आरती घेण्यात आली या आरतीनंतर समाजातील संस्कृत मध्ये पीएचडी प्रदान केलेले डा.प्रतीक प्रमोद जोशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे वडील प्रमोद जोशी यांचाही सत्कार करण्यात आला     नंतर प्रसाद स्वरूपात अल्पोपहार व थंड पेय देण्यात आले      या वेळी श्याम खंडेलवाल मुरली देशमुख राधेश्याम दायमा सतीश देशपांडे बालाप्रसाद ओझा प्राध्यापक प्रमोद टेकाळे रतन दायमा सुरेश जोशी डॉक्टर नंद राजेश खंडेलवाल विठ्ठल कुलकर्णी नंदकुमार कुलकर्णी योगेश खंडेलवाल दुर्गेश पोतदार श्यामसुंदर चितोडा राम देशपांडे अश्विन दायमा शिवा जोशी अविनाश कुलकर्णी सुनील पारिक शाम डंख नटवर खंडेलवाल किशोर व्यास मेहता महाराज जुगल दायमा मनोज कुलकर्णी लखन जोशी शुभम खंडेलवाल राजेश दा

परतूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     परतूर येथील लिंगायत समाजाच्या वतीने दि 22 महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी  दुचाकी फेरी काढण्यात आली.     सर्वप्रथम महात्मा बसवेश्वर चौकात सर्व समाज बांधवाने जमा होत ध्वजारोहण करत सिद्धलिंग विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज संस्थान आष्टी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर चौकाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मा. आ.सुरेश जेथलिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष कपिल आकात, मा. नगराध्यक्ष विनायक काळे, विजय राखे, अंकुश तेलगड ,आष्टी येथील ग्रामपंचायत सदस्य बबलू सातपुते, वाटूर चे सरपंच गजानन केशरखाने, मा. नगरसेवक शिवा बल्लमखाने,बबनराव उन्मुखे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महात्मा बसवेश्वर चौकातून रामेश्वर मंदिर पर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष ओम कानडे,उपाध्यक्ष संजय देशमाने,नंदकिशोर बल्लमखाने,सचिव महालिंग स्वामी,अंकुश आवटे, कोषा अध्यक्ष सुरेश दसमले,रमाकांत बरीदे, सोमनाथ पांगरकर,बबनराव उन्मुखे, सोनाप्पा धारूरकर,वैजनाथ ढबे,अमोल हरजुळे, सुदर्शन पांगरकर,शिवा स्वा

दिव्यांगाच्या पेन्शन वाढ संदर्भात दिशाभूल-अशोक तनपुरे

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण परतुर दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासाठी  अनेक निवेदन उपोषण प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली पण निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाचशे रुपयाची वाढ करण्यात आली असे विविध पत्रकामध्ये माहिती देण्यात आली अशा महागाईच्या काळात दिव्यांगांना व निराधार प्रत्येकी पाच हजार रुपये महिना पेन्शन करावे यासाठी राज्यामध्ये विविध उपोषण मोर्चे लेखी निवेदन देण्यात आली होती राज्य सरकारने मार्च महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत 5000 महिना केला नाही पण पाचशे रुपयाची वाढ करण्यात आली होती आणि एक एप्रिल पासून दिव्यांग व निराधार यांच्या पेन्शन मध्ये वाढ होईल असे आश्वासन विविध पत्रकात देण्यात आले होते पण एप्रिलमध्ये दिव्यांग व निराधार यांच्या पेन्शनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही  दिव्यांग व निराधार यांची राज्य सरकार हे दिशाभूल व फसवणूक करत आहे  असे प्रहार संघटनेचे जिल्हा निरीक्षक अशोक तनपुरे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये खंत व्यक्त केली

समर्थ नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात        नेहरू युवा केंद्र व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ नगर येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात अली साजरी.     यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अली व प्रमुख पाहुणे समर्थ नगर चे नगरसेवक श्री.संदीप खरात व ऍड.रीमा खरात यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनाबद्दल महत्व पटवून सांगितले यावेळी तक्षशिला बुद्धविहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे,संबोधी ड इंगोले, प्रा.राजकुमार म्हस्के, युवा संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, अजय हिवाळे, विशाल वाघमारे, किरण दाभाडे, आनंद वाघमारे, सौरभ जाधव, शुभम गायकवाड, अजय ढवळे, सुधीर खंडारे, संदिप इंगोले, अशोक गंगावणे, सर्जेराव शरणागत, माया रत्नपारखे संगिता गंगावणे, मिनाबाई शरणागत, शोभाबाई खरात, चंद्रकांत वाघमारे, डॉ. सुशील सूर्यवंशी, प्रशिक खंडारे, प्रणाली खंडारे इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आले.

शिक्षण शिकवणी मुळे मुलांचे मैदानी खेळाचे भविष्य अंधारात - संतोष शर्मा

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  सध्या पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा उत्तम निर्णय आहे,  पण तो निर्णय आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले ठरेल का! कारण गेल्या  दहा वर्षात ज्या शिक्षक सरांची लायकी नाही . ते आज लाखों ने कमाई करत आहे त्या मध्ये भर पड़ली उच्च शिक्षण म्हणजेच - इंग्लिश शाळे ची ते म्हणजे दोघात मिळून झालेली साठ-गाठ .... ह्या सर्व प्रकारा मुळे मुलांना उन्हाळयात पडणारी सुट्टी वर पडली तलवार त्यांना माघीलं दहा महीण्यात न मिळालेला  खेळासाठी वेळ, मी म्हणत नाही कि फक्त मुलांनी क्रिकेट च खेळावें ! नाही तर खुप प्रकारचे मैदानी खेळ आहे त्यात बॅटमिटन , रणींग फुटबाल, हॉकी, कब्बडी, खो-खो आसे खूप प्रकारचे खेळ आहे पालंकानी आपल्या मुलांवर आलेला बर्डन ( ताण) कमी करावा . व आपल्या मुला सोबत एक मित्रा ची भूमिका घेऊन त्यांच्या भावना स्वतः पालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे आपल्या मुलाना ह्या बारा महिन्यातून मिळालेला दोन महिण्याचा सुवर्ण काळ स्वत आपल्या मुलाला विचारून मुलाना मन मोकळे खेळ खेळु दयावे ,  त्यांच्या पसंतीचे सुट्टी चे हे दोन महिने आपल्या पद्धतीने व्यतीत करू दयावे  खेळाचे महत

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू; गोहत्या करणार्‍यांना होईल कठोर शिक्षा ,गो हत्या बंदीची मागणी प्रमुख्याने मारवाडी समाजाने लावून धरली होती - आमदार लोणीकर

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात   महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍यात आला आहे. राष्ट्राचे महामहीम राष्ट्रपती यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे 'गोहत्या' हा दंडनीय अपराध मानला जाणार आहे. गोहत्या करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शिक्षाही होणार आहे. गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍याची मागणी सात‍त्याने राज्यातील मारवाडी समाज करत होता. 1995 साली युती सरकारच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आले होते. मात्र, या विधेयकात काही त्रृटी होत्या. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची शिफारस केंद्राकडून करण्यात आली होती. परंतु, 15 वर्षांच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्यावर काही अभिप्राय सरकारने दिला नाही. मात्र, महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेवर येताच यावर आपला अभिप्राय नोंदवला. याप्रकरणी यांनी दखल घेऊन आज गोवंश हत्या बंदी कायद्यावर स्वाक्षरी केली. असे प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारस

बुद्धभूषण मित्र मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती निमित्त अन्नदान

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      येथील बुद्धभूषण मित्र मंडळाचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महादेव मंदिर चौक येथे अन्नदान करण्यात आले. परतुर शहरासह तसेच तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच विविध नेते मंडळी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मध्ये सहभाग घेतला होता. बुद्धभूषण मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल पहाडे हे दरवर्षी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान करत आले आहे. तसेच यापुढेही आपण हे सामाजिक कार्य चालू ठेवणार आहे असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी स्वप्निल पहाडे, तुषार पहाडे, अमोल पहाडे, सुनील पहाडे, रवि घोडे, सतीश पहाडे, राहुल पहाडे, आकाश पहाडे, निलेश पहाडे, अनिल पहाडे, कृष्णा वाघमारे, अनिकेत सोनपसारे, रूपेश पहाडे, संकेत सोनपसारे, सूरज पहाडे, आदर्श सोनपसारे, अजय निकाळजे, विकास पहाडे, बाला पहाडे, इंद्रजीत गायकवाड, अमरदीप सुतार, अमोल नाथभजन, गौतम प्रधान, अनिल जहार, दत्ता एक्कीलवाले,

नगर परिषदेच्या साहित्य खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन गुन्हा दाखल करा-विकासकुमार बागडी

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात     नगर परिषदेने खरेदी केलेल्या साहित्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून सदरची खरेदी ही शासन नियमाप्रमाणे करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे. या ंसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात   बागडी यांनी म्हटले आहे की, उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण - 2016/ प्र. क्र. 215/ उद्योग- 4 दिनांक 24.08.2017 अन्वये Gem portal वरुन खरेदी करण्याबाबत सूचना दिलेल्या असतांना सुध्दा दरपत्रके मागविण्यात आली आहे. कोणतेही वस्तु किंवा साहित्य Gem portal वरुन खरेदी करण्यात आलेली नाहीत. भांडार विभाग प्रमुख आणि कर्मचार्‍यांनी साहित्य एकत्रित खरेदी न करता सदर खरेदीचे 3.00 लक्ष पर्यंतचे तुकडे करुन खरेदी केल्याचे दाखविले आहे. ज्यामुळे नगर परिषदेचे भांडार विभाग प्रमुख आणि कर्मचार्‍यांनी बोगस पुरवठा संस्थेला आणि कर्मचारी यांनी बोगस पुरवठा संस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. सन 2017 ते 2023 या कार्यकाळामध्ये भांडार विभाग मार्फत पुरवठा दारांना

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार

Image
  परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण     येथील आदर्श शिक्षक जे आण्णा या नावाने प्रसिद्ध आहे असे दिलीप मगर सर यांचा दि. १० एप्रील रोजी दिडोरी चे गुरु माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या वेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर उपस्थीत होते     परतूर येथे दि १० एप्रील रोजी दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केद्रा चे गुरू माऊली आबासाहेब मोरे हे आले आसता परतूर येथील वीवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा सत्कार करण्यात आला या वेळी गुरु माऊली आबासाहेब मोरे यांच्या सोबत माजी मंत्री तथा परतूर विधानसभाचे आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर हे देखील उपस्थीत होते या कार्यक्रमा मधे परतूर येथील महाराष्ट्र शिक्षक परीषदचे तालूकाध्यक्ष अदर्श शिक्षक दिलीप मगर सर यांनी मागील काळात शहरामधे वीवीध ठीकाणी वृक्ष लागावडे केली तसेचे शेतकरी व गरीब कष्टकर्याच्या मुलांना शौक्षणिक साहित्य वाटप केल या बरोबरच परिसरातीत वृक्ष संवर्धन   करून झाडे जगविली गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करून विविध मान्यवर

दिंडी महामार्गावर असलेल्या गोदावरी नदीवरील एक किलोमीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार,आमदार लोणीकरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी द्वारे सरकारचे लक्ष वेधल्याने प्रत्यक्षात पुलाच्या कामास सुरुवात

Image
 जालना प्रतिनिधी समाधान खरात        परतूर मतदारसंघात ९५ किलोमीटर लांबी असलेला शेगाव पंढरपूर दिंडी 'राष्ट्रीय महामार्ग खामगाव-लोणार -तळणी-मंठा -वाटूर-परतूर-लोणी-आष्टी-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या ४३० किलोमीटरच्या रस्त्याच्या कामातील बीड व जालना या दोन जिल्ह्याच्या हद्दीतील रस्त्याचे व पुलाचे बांधकाम मेघा इंजीनियरिंग व इन्फ्रा कंपनी हैदराबाद या कंपनी ला देण्यात होते. या कंपनी ने रस्त्याचे काम पूर्ण करून गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे सोडून दिले होते.      रस्त्याचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष उलटले असले तरीही गोदावरी नदीवरील पुलाचे काम सुरू होत नव्हते. नदी तीरावरील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे कारण कंपनी पुढे करत होती. या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे अविरत प्रयत्न करीत होते. याबाबतीत आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्षात भेटून व निवेदनाद्वारे या प

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात      शहरात मागील महिन्याच्या ३० तारखेला राम नवमी मिरवणुकी दरम्यान जुना जालना भागातील हॉटेल व्यावसायिक विष्णू उर्फ विकी श्रीराम सुपारकर यांची छातीत चाकूने वार करून निघून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे मयत यास 2 वर्षाचा छोटा मुलगा असून, ज्या दिवशी अंत्यसंसकार करण्यात आले त्याच दिवशी मुलगी जन्माला आली. अश्या एका क्लेशदाई घटनेचा अनुभव सुपारकर परिवारास आला. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी त्याब्यात घेतले होते, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान आज दी. 12 एप्रिल रोजी शहरातील नागरिकांच्या वतीने आरोपींना फाशीची शिक्षा, 15 दिवसात दोषारोप पत्र दाखल करावे, आरोपींवर मोक्का कायदा व MPDA कायद्याने कारवाई करावी, तसेच उच्च अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा ई. मागणी करत लाड गवळी समाज व मित्र परिवार आणि शहरातील नागरिकांच्या वतीने शनी मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत मुक मोर्चा काढला.

तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील    तळणी महात्मा फुले सा. वाचनालय तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित गावचे सरपंच गौतम सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सरकटे, जयदेव मुर्तडकर,कृष्णा सरकटे, कृष्णा वाघमोडे, ज्ञानेश्वर काजळे,नंदु सरकटे माविम चे लेखापाल सतिश सरकटे व वाचक वर्ग. मोठया प्रमाणात उपस्थीत होता     या जयंती निमीत्य सरपंच सदावर्ते यानी मनोगत व्यक्त करताना सागीतले आपल्या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात कर्तृत्वाने मोठी असणारे माणसे जन्माला आली आपल्या पिढीसाठी त्या काळी त्याचा मोठा सघर्ष केला म्हणून ईतिहासाने त्याची नोद घेतली फुले दाम्पत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य एक आदर्श घेणारे आहे .सद्य स्थीतीत कुठल्याही संताना राष्ट्रपूरुषाना जाती पूरते बघण्याची सकूंचीत प्रवूती वाढत चालली असली तरी त्या महापूरुषाचा तो काळ जातीपूरता नसल्याने त्याचे कार्य कधीही नजरेआड होऊ शकत नाही महापूरुषांचा आदर्शच घ्यायचा असेल तर त्यानी केलेला त्याग व त्याचे विचार आत्मसात करावी लागतील महापूरुषानी सगळ्यांचा विचार करुनच ती जगली आहेत त्याचा समर्पण भाव आज

परतुर विधानसभा मतदार संघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 112 नवीन जलकुंभास मंजूरी,माजीमंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रयत्न यशस्वी

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  जल जीवन मिशन योजनेअंतर्गत परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून परतूर विधानसभा मतदार संघात 120 गावात नवीन जलकुंभ बांधण्यास मंजुरी मिळाली आहे.      173 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजना व 95 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या गावांकरिता फिल्टर पाण्याची योजना प्रस्तावित आमदार बबनराव लोणीकर यांनी सतत पाठपुरावा केल्याने दोन्ही ग्रीड योजनेमध्ये समाविष्ट नसलेली परतुर तालुक्यातील 24 गावे योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे तसेच 173 गावे ग्रीड योजनेतील 11 गावांची व 95 गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेतील 12 गावांची कामे जिल्हा परिषद मार्फत करण्यात येणार होती त्या कामांचा समावेश देखील 120 गावे योजनेत करण्यात आला आहे तसेच पुनर्वसनातील पाच गावे व ज्या गावांमध्ये जल जीवन मिशनच्या निर्देशाप्रमाणे जलकुंभाची क्षमता कमी पडते अशा 68 गावांचा समावेश सदर योजनेत करण्यात आला आहे. या योजनेत 36.13 किलोमीटर लांबी उधर्वावाहिनी 170.64 किलोमीटर लांबीची पाणीपुरवठा पाई

परतुरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य पालखी सोहळा संपन्न,विषमुक्त शेती काळाची गरज - आबासाहेब मोरे दिंडोरी

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   देशातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी, वाढत्या आजारांचे प्रमाण पाहता रुग्णांची संख्या कमीत कमी करण्यासाठी आजार टाळण्यासाठी शेतात पिकांच्या उत्पादना करता रासायनिक कथा ऐवजी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून विषमुक्त शेती करण्याकडे सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे घरचेच बियाणे जतन करत,घरचेघरी वनस्पती व गोमुत्र पासुन किटकनाशक तयार, करून शेतीतील खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी परतुरात श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.     यावेळी मंचावर मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राहुल बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परतुरात आज पालखी श्री स्वामी समर्थांच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात

स्व.दर्शन देवावाले याच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबीर संपन्न

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात       स्व. दर्शन देवावाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ के.डी. फिटनेस जिम जालना येथे दि. ९ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी के डी फिटनेस जिम मित्र मंडळ , स्व. दर्शन देवावाले मित्र मंडळ तसेच रामनगर आणि शहराच्या इतर भागातील दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. तसेच स्मृती दिनाचे निमित्त जालना शहरातील पांजरापोळ गौशाळा येथे गौमाता साठी चारा दान करण्यात आले. यावेळी स्व दर्शन देवावाले यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य तरुणांची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरामुळे ऐन उन्हाळ्यात गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास सहाय्य होणार आहे. यावेळी रक्त संकलनाचे कार्य जालना रक्तकेंद्र,जालना यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन योगेश देवावाले, अर्जुन देवावाले मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी दुर्गेश कठोटीवाले शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या कार्यक्रमात परिश्रम घेतले.

देव देश धर्म टिकवण्यासाठी जाती पातीचे बंधने तोडून एक व्हा प पू आनंद चैतन्य बापूचा संदेशमाळेगाव येथील तीन दिवसीय सत्संगाचा समारोप

Image
तळणी रवी पाटिल      मनुष्याला स्वार्थ आणि अहंकाराचा रोग लागलेला आहे रावणाला झालेला अहकार त्याच्या सर्वनाशाचे कारण झाले सर्व सताचे सुख असुन सुध्दा जर तो रावण सपल्या जातो तेथे तुम्ही आम्ही कोण आहोत असे प्रतिपादन प पू आनंद चैतन्य बापूनी केले  मंठा तालूक्यातील माळेगाव येथे गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या गीता रामायण सत्संगाची सांगता काल शनिवारी अनेक मान्यवराच्या व हजारो च्या सख्येत उपस्थीत असलेल्या भक्ताच्या उपस्थीतीत करण्यात आली हनुमान जन्मोसव व विश्व बंजारा दिवसाच्या निमित्याने या गीता रामायण सत्संगाचे आयोजन इजि प्रा माधव चव्हाण यांच्याकडून करण्यात आले होते यावेळी बापूनी उपस्थीतांना मञमूग्ध केले  आपली सनातन सस्कृती ही खूप चांगली आहे तीचा विसर पडू देऊ नका संत सेवालाल महाराजाने मोठया सघर्षातून आपली संस्कृती टिकून ठेवली आहे सनातन धर्मच आपल्या सगळ्याचे मूळ आहे बंजारा समाजाचा इतिहास हा सघर्षाचा ईतिहास आहे आपल्या पूर्वजानी केलेल्या सघर्षामुळेच आपण आज सुस्थीतीत आहोत कोणाच्या मोहाला प्रलोभनाला बळी पडू नका विश्व बंजारा दिवस हा क्रां

सिंगोना येथे आनंदाचा शिधा वाटप

Image
  परतुर प्रतिनिधी कैलास चव्हाण      तालुक्यातील सींगोना या गावात केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधावाटप आज वाटप करण्यात आला आहे    केंद्र सरकार व राज्य सरकारने गुढीपाडवा व 14 एप्रिल या दिवशी आनंदाचा सुविधा गोरगरिबांना मिळावा म्हणून राशन दुकानात मार्फत हा शिधा देण्यात येत आहे सिंगोना येथील रास्त दुकानदार मार्फत आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला या प्रसंगी       किसनराव सोनपसारे गणेश सोळंके माजी उपसरपंच सूर्यभान कदम विष्णू सोळंके तानाजी सोळंके रवी सोनपासारे नामदेव सोळंके संजय अंभूरे रामराव मुळे आधी शिधा वाटप करताना दिसत असून गाव गावातील गावकरी या सेवेचा लाभ घेताना दिसत आहे

देव देश धर्म टिकवण्यासाठी जाती पातीचे बंधने तोडून एक व्हा प पू आनंद चैतन्य बापूचा संदेश माळेगाव येथील तीन दिवसीय सत्संगाचा समारोप

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटिल     मनुष्याला स्वार्थ आणि अहंकाराचा रोग लागलेला आहे रावणाला झालेला अहकार त्याच्या सर्वनाशाचे कारण झाले सर्व सताचे सुख असुन सुध्दा जर तो रावण सपल्या जातो तेथे तुम्ही आम्ही कोण आहोत असे प्रतिपादन प पू आनंद चैतन्य बापूनी केले  मंठा तालूक्यातील माळेगाव येथे गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या गीता रामायण सत्संगाची सांगता काल शनिवारी अनेक मान्यवराच्या व हजारो च्या सख्येत उपस्थीत असलेल्या भक्ताच्या उपस्थीतीत करण्यात आली हनुमान जन्मोसव व विश्व बंजारा दिवसाच्या निमित्याने या गीता रामायण सत्संगाचे आयोजन इजि प्रा माधव चव्हाण यांच्याकडून करण्यात आले होते यावेळी बापूनी उपस्थीतांना मञमूग्ध केले  आपली सनातन सस्कृती ही खूप चांगली आहे तीचा विसर पडू देऊ नका संत सेवालाल महाराजाने मोठया सघर्षातून आपली संस्कृती टिकून ठेवली आहे सनातन धर्मच आपल्या सगळ्याचे मूळ आहे बंजारा समाजाचा इतिहास हा सघर्षाचा ईतिहास आहे आपल्या पूर्वजानी केलेल्या सघर्षामुळेच आपण आज सुस्थीतीत आहोत कोणाच्या मोहाला प्रलोभनाला बळी पडू नका विश्व बंजारा दिवस

महिला पोलीस सीमा साकळकर यांचा शिक्षक परिषदेकडून सत्कार ग्रामीण भागातील मुलीचे यश.

Image
परतूर. प्रतिनिधी कैलाश चव्हाण       तालुक्यातील मापेगाव येथील सीमा साकळकर या मुलीने पोलीस दलात भरती होऊन यश संपादन केल्याने हिचा शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष आदर्श शिक्षक दिलीपराव मगर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पोलीस दलात भरती झालेल्या सीमा बालासाहेब साकळकर यांचा सत्कार करण्यात आला.      साकळकर यांना अकोला येथे नियुक्ती मिळाली यावेळी मुख्याध्यापक विष्णुपंत तोटे, गणेश राठोड विष्णू कदम, देविदास आठवे, रामेश्वर दीरंगे, जगन्नाथ अंभोरे आदी उपस्थित होते. फोटो. परतुर तालुक्यातील मापेगाव येथील सीमा बालासाहेब साकळकर या मुलीने पोलीस दलात भरती होऊन यश मिळवल्याने तिचा महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष दिलीपराव मगर, गणेश राठोड, देविदास आठवे, विष्णू कदम आदी.

मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या जय भद्रा नगर ,वडारवाडी येथील सभा मंडपाचे उद्घाटन

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या परतुर येथील जय भद्रा नगर वडारवाडी येथील सभा मंडपाचे उद्घाटन कर्तव्यदक्ष नगरसेवक संदीप बाहेकर यांच्या हस्ते हनुमान जन्मोत्सव या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने परतूर शहराच्या विकासासाठी भरपूर निधी झाला आहे यांनी आणलेल्या निधी अंतर्गत शहरातील विविध भागात विकास कामे चालू आहेत व पुढेही निधी परतूर शहराच्या विकासाकरिता निधी युती सरकारच्या माध्यमातून कमी पडू देणार नाहीत असे नगरसेवक संदीप बाहेकर यांनी याप्रसंगी सांगितले . डॉ. संजय पुरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जय भद्रा नगर वडरवाडी परिसरातील विविध विकास कामे थ्री फेज लाईट वडारवाडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर असून युती सरकारच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू व अग्रवाल यांना निधी मंजूर करून आणण्यासाठी माजी मंत्री बबनराव लोणीकर सहकार्य करतील असेही डॉ पुरी यांनी सांगितले   यावेळी जिल्हाप्रमुख मोहन अ

परतुरात हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य शोभा यात्रा

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      हनुमान जन्मोत्सव निमित्ताने परतूर शहरात गाव भागात  आगदि कमी वेळात भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.                    दरम्यान ,यावेळी सहा फुटांची हनुमानाची मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवनुक काढण्यात आली.शहरातील भाविकांनी मिरवनुक मार्गावर रांगोळी काढल्या होत्या व ठीक ठिकाणि पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले.यावेळीं मोठ्या संख्येने हनुमान भक्तांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे सावता काळे,रामेश्वर उबाळे,रोहित कपाळे,कृष्णा तरोडकर, कैलास मुजमुले, अमृत बागल, राधेश्याम राऊत, विष्णु इगळे, अजय ईगळे, मोहन मुजमुले, अनिल सागुळे, प्रल्हाद ईगले , ऋषी काळे, नागेश तराशे, कुमार हनवते, लखन अग्रवाल, ऋषी कऱ्हाले, श्रीकांत उबाळे यांनी परिश्रम घेतले.