Posts

Showing posts from December, 2021

अखेर आज डेमु पॅसेंजर ला पारडगाव रेल्वे स्टेशन थांबा मिळाला..

Image
परतूर ( हनुमंत दवंडे) घनसावंगी तालुक्यातील पारड गाव या ठिकाणी        मागील 1 महिन्यापासून डेमू पॅसेंजर गाडी चालू झाली होती .परंतु ही  गाडी पारडंगाव येथे थांबत नव्हती .यासाठी ग्रामस्थांकडून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे थांब्यासाठी मागणी करण्यात आली होती..         आज थांबा मिळाल्यानंतर समस्थ ग्रामस्थांच्या वतीने  पायलट मिनाज सर व गाडीस हार घालून स्वागत करण्यात आले.                ग्रामस्थांच्या वतीने रेल्वे प्रशासन व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले....      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भालेकर, पत्रकार नजीर कुरेशी , रामेश्वर ढेरे , दिगंबर ढेरे, बाबा सय्यद , प्रसाद सुतार , भारत काळे , पुंजाराम मंडपे , अब्दुल रहीम,  अंबादास वढे , संभाजी ताठे, पवन भारस्कर , ज्ञानराज भालेकर , अक्षय आढाव ,रितेश वैष्णव , माऊली गायकवाड , सत्तर भाई, अब्दुल हक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

परतूर थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा वॉच

परतूर (हनुमंत दवंडे) नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला असून काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात.         परतूर शहरात 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’ नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला जातो. यात काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात. हे प्रकार रोखण्यासाठी परतूर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील मुख्य चौक तसेच अंतर्गत भागात पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तसेच फिरत्या पथकांचा ‘वाॅच’ राहणार आहे.   कोरोना तसेच ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांकडून मोठा जल्लोष केला जातो. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहने दामटण्याचे प्रकार हाेतात. त्यासाठी शहरात ठिकिठिकाणी बॅरिकेड्स लावू

कपिल आकात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोहीणा( बू) येथील अनेक तरुणांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश..

Image
परतूर (हनुमंत दवंडे)दि 31रोजी परतुर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल  आकात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व संघटक अबुद चाऊस, प्रा.डॉ पंडित गाते सर, वैजनाथ गवळी, हरीभाऊ मानवतकरम यांच्या मार्गदर्शनाखाली रोहीणा (बु) येथील अध्यक्ष.प्रेम गवळी ,  ऊप अध्यक्ष सुमीत प्रधान, व सचिव. रामेश्वर काकडे, अर्जुन काळदाते, राम गवळी, ज्ञानेश्वर काकडे, अशोक वाघमारे, रामभाऊ गवळी, पांडुरंग गाते, गजानन गाते, गजानन राऊत, गोवर्धन भालेकर, ब्रम्हदेव डोने, नारायण काळदाते, महेश डोने, दत्ता गवळी  दत्ता गुजाळ केशव काळदाते यांच्या सह अनेक युवकांनी युवा नेते कपिल अकात यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला या वेळी युवा नेते कपिल  आकात यांनी युवकांचा सत्कार केला व सर्वांना शुभेच्छा दिल्या

दैठणा बु व हरेरामनगर येथील शालेय व्यवस्थापन समित्या ची परंपरा कायम दोन्ही समित्या बिनविरोध

Image
       परतुर(हनूमंत दंवडे) तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये राजकारण केल्या जात असुन शिक्षण क्षेत्रातही कुरघोडी भांडणांचा बाजार मांडला आहे.पण याला दैठणा बु व हरेराम नगर अपवाद ठरला आहे.तालुक्यात दैठणा गावाची परंपरा आहे  शालेय व्यवस्थापन समितीची निवड सर्वानुमते बिनविरोध  करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून श्री विठ्ठल नरवडे तर उपाध्यक्ष म्हणून श्री अशोक मुकादम यांची निर्विरोध निवड झाली.  तसेच पालक सदस्य म्हणून सौ मीरा तात्याराव गायके, द्रोपदा गुलाबराव कवडे, श्री कैलास मखमले, सौ शोभा गजानन वखरे, सौ गंगासागर अर्जुन सोनगुडे, श्री हनुमान थोरे, श्री लक्ष्मण मोरे, सौ नीता विठ्ठल घोडे यांची तर, शिक्षण प्रेमी म्हणून श्री अशोक गुलाबराव बेरगुडे यांची निवड करण्यात आली. स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून सौ संगीता शामराव चव्हाण यांचे नामनिर्देशन करण्यात आले. सदर निवडीवेळी खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध सर्व निवड पार पडली. याप्रसंगी सरपंच मा.श्री. शत्रुघ्न भैय्या कणसे यांनी नवीन समितीस शुभेच्छा देताना शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी समितीस सहकार्य करण्यासाठी मी सदैव असल्याच

कायद्यावर लाकूड तोड गिरण्यांची करवत.................

Image
परतुर  (हमूमंत दवंडे) परतुर शहरातील आरा गिरण्याच्या तपासनित वन विभागाचा हलगर्जीपणा वाढताच अवैध लाकूड वाहतूक बोकाळली आहे. दररोज रात्री १० ते सकाळी ७ या कालावधीत ट्रक-ट्रॅक्टरद्वारे लाकडाची वाहतूक सुरू आहे. वृक्षतोड व लाकूड वाह तुकीचा परवाना नसतानाही गिरणीसमोर वाहनांच्या रांगा आहेत. फिरते पथक दिसून येत नाही.  वन विभागाची कारवाई ढेपाळली आहे. महसूल व पोलिस प्रशासनानेही बघ्याची भूमिका घेतली आहे. तालुक्यातीलअवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने स्वतंत्रनियमावली तयार केली पाहिजे. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असावी दरमहा प्रत्येक आरा गिरणीचे रजिस्टर तपासून वृक्षतोडीसाठी परवानगी असल्याची शहानिशा करणे अपेक्षित आहे. वृक्षतोड परवानगी ते वाहतूक परवानगीसाठी अधिकारी नियुक्त कोण आहेत  मात्र, प्रत्यक्षात दिसत नाहीत. परतुर तालुक्यात अवैध वृक्षतोड वाढली आहे. दिवसा कारवाईची शक्यता असल्यामुळे लाकूड माफियांनी दररोज रात्री लाकडांची वाहतूक सुरू केली आहे. रात्री १० ते सकाळी सात या वेळेत शेकडो वाहनांद्वारे शहरात लाकूड आणले जाते. विशेषतः आष्टी रोड वाटू र सातोना,माव पाटोदा या भागातून म

माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदान येथे ओबीसी चा मोर्चा.

Image
परतूर (हनूमंत दवंडे) ओबीसी जन् मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानावर ती एक दिवस धडक आक्रोश आंदोलन करण्यात आले. विधिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्था मताने त्यांचं लक्ष वेधून सर्व निवडणुका सहा महिने पुढे दखल घेण्यात आली .ओबीसी डेटा 435 कोटी रुपये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, यांची ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याशी चर्चा करून सरकारकडे पाठवले. ओबीसी जन् मोर्च्याच्या वेळी उपस्थित ओबीसी महिला प्रदेशाध्यक्ष प्रेमलता ताई  साळी ओबीसी मोर्चाचे कार्य अध्यक्ष चंद्रकांत बावकर, माजी आमदार प्राध्यापक टी .पी .मुंडे ,जेडी तांडेल ,मच्छिंद्र भोसले, इत्यादी ओबीसी समाजाचे नेते व महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दैठणा खु. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय सवने यांची निवड

Image
परतूर (हनूमंत दंवडे) तालुक्यातील दैठणा खुर्द येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय सवने तर उपाध्यक्षपदी बालाजी नखाते यांची निवड यांची करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. मंगळवारी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक सरपंच राधा सोनाजी गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम भापकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे.         पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच राधा गाडेकर,केंद्र प्रमुख देशमुख, केंद्रीय मुख्याध्यापक खंडागळे, मुख्याध्यापक श्रीराम भापकर, शिक्षक अज्जू कायमखानी, अशोक माने, प्रकाश जोगदंड, चौधरी, कराड आदींसह गावकऱ्यांची  उपस्थिती होती.  नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष विजय सवने, उपाध्यक्ष बालाजी नखाते, सदस्य शीतल सवने, इरफाना शेख, ब्रम्हानंद तायडे, अतिष गाडेकर, बिबनभाई शेख, रेणुका लिंगायत, सरिता सवने, सुनिता पाईकराव, सुरेश काटकर, सागर सवने यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल राष्ट्रव

बालमित्र चळवळ गावागावात सुरू करणार._ श्री. माधव हिवाळे

Image
परतूर (हनुमंत दवंडे) युनिसेफ आयोजित बाल मित्र प्रशिक्षण स्वराज्य ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दैठना बु. येथे आयोजित कार्यक्रमामध्ये  गावातली युवकांनी पुढें येऊन गाव विकास प्रक्रियेत सहभाग घ्यावा. आपल्या आणि आपल्या गावातील मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत या साठी बालमित्र होणे ही एक संधी आहे. बालमित्रांनी केलेले काम हे मुलांच्या शिक्षणासाठी भरीव आहे.असे प्रतिापादन संस्थेचे तालुका समनव्यक श्री. माधव हिवाळे यांनी केले.स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या बाल संरक्षन प्रकल्पा अंतर्गत दैठणा येथे स्वयंसेवक बालमित्र यांची आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली या वेळी ते बोलत होते.  प्रकल्पातील 16 गावातून बालमित्र उपस्थीत होते. तालुक्यातील गावागावात शिक्षण प्रेमी बालमित्र चळवळ सुरू करणार असल्याचे यावेळी सांगीतले.  कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत दवंडे, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रकाश दिवटे, सुधाकर दवंडे, विट्ठल सुभेदार, भास्कर साळवे, गजानन खरात, शरद साळवे, अण्णासाहेब गाडेकर,.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन हरिभाऊ गायके यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले  या वेळी उत्

परतूर वकील संघाची 2022 कार्यकारिणी जाहीर.

Image
 परतूर(हनूमंत दंवडे) येथील वकील संघाची आज बैठक घेऊननिवडणूक घेण्यात आली या मधे  परतूर वकिल संघा च्या अध्यक्ष पदी अँड अर्जुन जी. चव्हाण तर वकील संघाच्या सचिव पदी अँड मनोज आर सोळंके व सहसचिव पदी अँड मुद्दसर देशमुख यांची निवड झाली           .यावे‌‍‌‍‍ळी  सदरील अध्यक्ष पदासाठी ॲड. एम. पी. वेडेकर व ॲड. ए.जी. चव्हाण हे उभे होते  . ॲड ए. जी. चव्हाण हे  निवडून आले. तर सचिव पदावर ॲड एम. आर. सोळंके तर ग्रंथपाल म्हणून ॲड एम आय देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. या प्रंसगि परतूर बार कौन्सिल चे  अँड  .जवळेकर अँड बागल अँड दराडे अँड वशिम बरेखानी  अँड एमएम काजी अँड देशमुख अँड निंबूळकर ॲड राठोड ॲड  शेख अँड राऊत  ॲड चव्हाण अँड देशपांडे अँड राखे अँड.झेड.एन कादरी अँड मगर अँड काळे अँड डोल्हारकर अँड बेरगूडे अँड खरात अँड चिखले अँड डहाळे अँड पाईकराव अँड देशपांडे अँड श्रीमती पूरी अँड वैघ अँड मसलकर अँड दैठणकर अँड आढे अँड मस्के अँड राठोड आदि मेंबर उपस्थित होते  निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून अँड ए.आर देशपांडे व अँड आर.बी.अंभुरे यांनी चोख काम बजावले सर्व पदाधिकारी यांचे परतूर बार कौन्सिल च्या वतीने सत्कार

रामचरित मानस सप्ताहाताच आयोजकांचे निर्वाण, सोहळ्यात मात्र खंड नाही !,जयनारायणजी (मिठूशेठ)झंवर यांचे निधन

Image
परतूर (हनूमंत दंवडे) दि 30 गुरूवार रोजी येथील प्रसिद्ध व्यापारी जयनारायणजी गोपूलालजी झंवर यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले मुत्यृ समयी त्यांचे वय  87 वर्ष होते. आयोजकांचे निर्वाण तरीही सोहळ्यात खंड नाही ------------------------------ प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामचरित पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते, व ते यजमान व आज सकाळी 10 वाजता एकादशी तिथीची विशेष कथा सोहळ्याची तयारी करताना यजमान मिठुसेठ याना अचानक  छातीत त्रास झाला व सोहळा स्थळीच त्यांचे निर्वाण झाले, या तिथीला निर्वाण होणे भाग्याचे समजले जाते, शिवाय घरात धार्मिक सोहळ्याचा आठवा दिवस होता, व उद्या शुक्रवारी समाप्ती आहे,  घरात आयोजक व यजमानाच्या निधनानंतर ही परिवाराने सायंकाळी सोहळ्यात खंड पडू दिला नाही, दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केल्यानंतर सायंकाळी सोहळा कायम ठेवला, व त्याच उत्साहात उद्या समापन होणार आहे. या घटनेची शहरभर चर्चा होती.  त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुली ,सुना ,नातवंड पात्रूड आसा मोठा परीवार होता     शहरात यांचे फर्टीलायझर वस्त्राचे दालन आहे तसेच जालना व परतूर येथे त्यांचे फर्टीलाइजर व सिड चा व्यवसा

परतूर येथील प्रभाग क्रमांक 10 मधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश

Image
परतूर(हनूमान दंवडे) माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परतुर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील अनेक युवकांनी  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला     यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी या युवकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशित केले यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी भाजपाचा शेला देऊन स्वागत केले      यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असून भारताला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विकासाचा अजेंडा घेऊन चालणारा कार्यकर्ता असून जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्वाची शिकवण व जोपासना करणारा हा पक्ष असल्याचे प्रतिपादन यावेळी राहुल लोणीकर यांनी केले   पुढे राहुल लोणीकर म्हणाले की परतूर विधानसभा मतदार संघामध्ये युवकांची मजबूत फळी पक्षाकडे अ

परतूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी च्या 4 शाखेचे अनावरण सोहळा संपन्न

Image
परतूर (हनुमंत दवंडे)  परतुर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या 4 शाखेचे अनावरण सोहळा संपन्न झाला  आंबा,सातारा,संकनपूरी, चांगतपुरी या गावांमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडी पुर्व जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या हस्ते संपन्न झाला. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा उपाध्यक्ष, दिपकजी डोके सर,ज्येष्ठ नेते विष्णु कुमार शेळके,जेष्ठ नेते चोखाजी नाना सौंदर्य, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.किशोर त्रिभुवन रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष,अच्युत पाईकरव जिल्हा महासचिव नारायण बर्वे,ऍड सुरेश काळे,परतुर तालुका अध्यक्ष बाबुरावजी गोसावी,ता.महासचिव रवींद्र भदर्गे,तालुका उपाध्यक्ष,शेख जमीर भाई तालुका उपाध्यक्ष शोएब पठाण तालुका सचिव नामदेव नाचण तालुका सचिव उत्तम साळवे, विष्णू वाघमारे गौतम मस्के,ज्ञानेश्वर सांगुते, महादेव पैठणे ,आकाश वाघमारे संकेत प्रधान विशाल प्रधान वैभव प्रधान व तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध गावांमधून जाहीर प्रवेश करण्यात आला. सातारा वाहेगाव येथील तरुणांचा प्रवेश यामध्ये भागवत कुरधने, अनिल गायकवाड,शिवाजी राय

मंठा शहरामध्ये पार्किंगसाठी सम विषम व्यवस्था

Image
मंठा (सुभाष वायाळ)मंठा शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी व रहदारीचा अडथळा निर्माण होत असल्यामुळे मंठा पोलिस व नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने वरिष्ठांच्या सुचनेनुसार पी-1 , पी -2 (सम व विषम ) पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विडोळी फाट्यापर्यत रस्त्याच्या दोन्ही कडेला पांढऱ्या रंगाचा पट्टा ओढण्यात येणार आहे.        याप्रसंगी मुख्याधिकारी सतिश कुलकर्णी , पोलिस निरीक्षक संजय देशमुख,पोलीस उपनिरिक्षक अस्मान शिंदे,पोहेकाॅ.दिपक ढवळे,प्रशांत काळे यांची उपस्थिती होती.

विटा महाग, लाभार्थ्याचे बजेट कोलमडले.

Image
परतूर (हनूमंत दवंडे) परतूर तालुक्यात घरकुल योजने अंतर्गत अनेक घराचे बांधकाम सुरु आहे.आधीच बांधकामाकरिता वापरात येत असलेल्या विविध साहित्याच्या दरात भरमसाठ वाढ झाली असतानाच आता वीट भट्टी मालकांनी ही विटाचे दर वाढविल्याने ही दरवाढ घरकुल लाभार्थ्याचे बजेट बिघडवणारी ठरत आहे .शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना ,रमाई घरकुल योजना, समाज कल्याण विभाग घरकुल योजने अंतर्गत परतूर तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना विशिष्ट मर्यादित घरकुल बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाकरिता वापरात येणाऱ्या साहित्यात दरवाढ झाली असल्याने लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रेती, लोहा, सिमेंट ,मुरूम ,विटा ,आधी साहित्याचा समावेश आहे. विटा ची मागणी वाढ ली याचा फायदा घेत विटा भट्टी मालकाची मनमर्जी चालू  झाली आहे .वीटभट्टी मालक प्रति ट्रॅक्टर नऊ हजार रुपये दर आकारीत असल्याने लाभार्थ्यांना घरकुल कामात अडचणी येत आहेत..

वाढोना येथे लोकसहभागातून शेतीपोच रस्त्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले या उपक्रमाचे कौतुक

Image
वाटूर(प्रतिनिधी) दि 29 डिसेंबर 2021 रोजी युवामोर्चा प्रदेश महामंत्री तसेच जि प मा उपाध्यक्ष जालना मा राहुल  लोणीकर यांनी वाढोना येथे लोकसहभागातून तयार झालेल्या रस्त्यांची पाहणी केली व पुलाचे उद्घाटन केले. जालना जिल्ह्यात गाव पातळीवर असा नवखा उपक्रम राबविणारे वाढोना हे पहिलेच गाव ठरले आहे . लोकवर्गणीतून शेता पर्यंत रस्ते तयार करण्याचा हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून मा. राहुल भैय्या लोणीकर यांनी आनंद व समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले . वाढोना येथे पहिल्यांदाच लोकवर्गणीतून 3 km चे चार शेतीपोच रस्ते तयार करण्यात आलेले आहेत अश्या  प्रकारचा उपक्रम संपूर्ण जालना जिल्ह्यात राबविला जावा, शेतकरी व गावकऱ्यांनी या उपक्रमातुन प्रेरणा घ्यावी यासाठी या उपक्रमास प्रसिद्धी मिळावी म्हणून मा. कलेक्टर साहेब व कर्तव्यदक्ष  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी वाढोना येथे प्रत्यक्ष भेट द्यावी व असा उपक्रम जिल्ह्यात इतर ठिकाणी राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत मा. राहुल लोणिकर यांनी व्यक्त केले तसेच पुलाचा निधी स्वखर्चातून देण्याचे आश्वासन दिले . जिल्ह्यात इतर ठिकाणी असा स

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

Image
. परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली  चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास  घडली.             आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी  -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले  ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली.               दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उतरीय  तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन  करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण ,  जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी  दिली. .......................... फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले

मौजे वाढोना येथील पांदण रस्त्याच्या कामाला उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली भेट

Image
परतूर प्रतिनिधी(हनुमंत दवंडे) जालना जिल्ह्यात प्रथमच परतूर तालुक्यातील वाढोना या गावातील  शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचा व येण्याचे तीनही पांदण रस्ते हे पावसाळ्यामध्ये अत्यंत चिखलमय होत असे आणि त्यामध्ये शेतकऱ्याला शेतामध्ये बैलगाडी नेण्यासाठी मोटरसायकल, ट्रॅक्टर, या वाहनांना ये-जा करता येत नव्हती यामुळे गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी आपल्या लोकवर्गणीतून हा रस्ता करण्याचा ठरवले आणि हा रस्ता लोकवर्गणीतून तयार झाला, असून ते खडी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे आश्‍वासन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिले आहे.यावेळी उपस्थित अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना. , व सरपंच सुरेश शेळके, मंडळ अधिकारी देशपांडे साहेब, तलाठी चव्हाण साहेब ,                        यावेळी सुभाष शेळके ,नवनाथ तनपुरे ,अशोक तनपुरे सर ,कैलास शेळके सर, शिवनाथ शेळके, रामेश्वर शेळके ,कैलास शेळके, लखन तनपुरे ,सोपान थिटे, बालू हामिरगे, रामेश्वर शेळके ,आदी शेतकरी बांधव उपस्थित होते . तसेच गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री . भाऊसाहेब जाधव साहेब  यांचा सत्कार करण्यात आला.

माता-पित्याची सेवा हीच खरी ईश्वर ,बदलत चाललेली समाजव्यवस्था घातक,हभप बंडातात्या कराडकर महाराज,आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*-*माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनधी(आष्टी) आई-वडिलांच्या सेवेत सर्व सुख सामावलेले असून,आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा प्रत्येक मुलगा ईश्वराच्या जवळ आहे असे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी केले    ते लोणी खु ता परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील स्व. दत्तात्रय (नाना) लोणीकर यांच्या चौदाव्याचा कार्यक्रमा प्रसंगी हरिकर्तनात बोलत होते       *आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया।* *कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा।* *गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।* *तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥*   या अभांगचे निरूपण करताना त्यांनी अनेक दाखले देत मातृ पित्र सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून युवा पिढीने हे व्रत अंगिकारने गरजे असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले     पुढे हभप बंडातात्या कराडकर म्हणाले की, बदलत चाललेली समाजव्यवस्था ही, विघातक असून या व्यवस्थे मुळे आई वडील पती पत्नी  या नात्याना तिलांजली दिली असून या मुळे सांस्कृति विनाशाच्या उंबरठ्यावर आपण असून हे थांबवन्यासाठी सांस्कृति चे जतन करणे गरजेचे अस

मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे. – राजकुमार तांगडे

Image
परतूर प्रतिनिधी(हनुमंत दवंडे)  : मुलांना टक्केवारीच्या मागे धावायला लावून. आपण आपल्या उत्तपनाचा 60 % हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत आहोत.  नोकर्या मिळवन्यासाठी मुलांना शिकवू नका तर त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी शिक्षिति करा. शिक्षणा सोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येणोरा येथील कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेते,लेखक,नाटककार राजकुमार तांगडे यांनी केले. स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित स्थानिक कलावंत आणि सामाजिक विषयावर प्रबोधन करणार्या कलाकाराचा सन्मान सोहळा  कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. मुलांचे शिक्षण,आरोग्य, पोषण, बालविवाह,बाल मजुरी या विषयावर जिल्हातील गावा –गावात जाऊन कलापथक आणि पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करणार्या हरिभाऊ गायके, श्रद्धा वाघमारे, शरद शाळवे, गणेश घोडे, गणेश वाघमारे, किशोर घोडे, गोविंद जोगदंड आणि सचिन पाटोळे या कलाकारांचा राजकुमार तांगडे, संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंजाळ, मा. संरक्षण अधिकारी एकनाथ राऊत, गजानन तालुका अध्यक्ष  शाहीर घोडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे

मंठा ग्रामिण को ऑप. क्रिडीट सोसायटीचे दिनदर्शिकाचे वीमोचन

Image
तळणी(रवी पाटील) येथील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यापारी यांची व परिसरात कमी वेळेत जास्त नावलौकीक निर्माण करणारी म्हणून परिचीत असलेल्या मंठा ग्रामीण को -ऑपरेटिव्ह मर्यादीत क्रेडीट सोसायटीच्या शाखा तळणी च्या  वतीने येणाऱ्या नविन वर्षाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी दत्त मदीर संस्थांनचे मंहत चरणदास महाराज व नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अर्जुन महाराज बादाड यांच्या हस्ते या दिनदर्शीकेचे वितरण करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व सभासद सर्व राजकीय सामाजीक वैद्यकीय अध्यात्मीक क्षेञातील मान्यवर मडळी उपस्थीत होते यावेळी ग्रामीण भागामध्ये अशा छोटया बँकाच्या मदतीने सर्वसामान्य  शेतकरी कष्टकरी यांना बँकेचे मार्फत होणारी मदत मोलाची असून हक्काची बँक म्हणून संस्थेला नावलौकीक प्राप्त झाला असल्याची भावना अर्जुन महाराज बादाड यांनी यावेळी व्यक्त केली  तर चरणदास महाराज यानी यावेळी संस्थेच्या पुढील सामाजिक कार्यासाठी  मनस्वी शुभेच्छा दील्या  यावेळी सस्थेचे व्यवस्थापक नितीन सरकटे  यानी सस्थेसंदर्भात उपस्थित सदस्य खातेदार यांना माहीती दीली कोरोना काळात अनेक गरजूना विनाविलंब गर

मंगरूळ ते गेवराई शिव पांदन रस्त्याचं तहसीलदार वाघमारे यांच्या हस्ते उदघाट्न-

Image
मंठा -(सुभाष वायाळ)दि.28 मंठा तालुक्यातील मंगरूळ गावठान ते गेवराई शिव पादंन रस्त्याच्या पांदन मुक्ती रस्ता उद्घाटनप्रसंगी मंठा तहसिलदार श्री कैलासचंद्र वाघमारे सरांनी रस्त्याचे उद्घाटन केले या प्रसंगी गावचे तलाठी लोखंडे सर, ग्रामसेवक जाधव सर, ग्रा.पं. प्रशासक धोत्रे सर, सहशिक्षक संदिप उगले सर (निवडणूक विभाग), केंद्र प्रमुख विष्णू बागल सर, पोलिस पाटील कचरु मगर, उपस्थित होते.या प्रसंगी तहसीलदार साहेबांचा सत्कार गावातील ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब बागल व लिंबाजीराव बागल यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना तहसीलदार साहेबांनी शेतरस्त्यांचे महत्त्व व गरज विशद केली,पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले व विविध शासकीय योजना,कोरोना लसीकरण व रस्ता पादंन मुक्ती साठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप उगले यांनी केले तर आभार दिपक बागल  यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद बागल, वसंत बागल,विठ्ठल बागल, कल्याराव राजबिंडे,मुरली घांडगे, राधाकिसन बागल,सिध्देश्वर बागल , शंकर बागल यांनी परिश्रम घेतले.. या निर्णयामुळे गावचा दहा

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

Image
परतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर  ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि  मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच  मृत्यू झाला  तर तीन  जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी झाले आहेत.  या मधे शिवाजी मस्के व त्यांची  पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत.  जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे.                                           परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर स

परतूर -मंठा सकल ओबीसी समाजाची बैठक मापेगाव पुनर्वसन परतुर येथे संपन्न..

Image
परतुर (हनूमंत दवंडे) ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधील आरक्षण धोक्यात आल्याने या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ओबीसी, भटके-विमुक्त, एसबीसी समाजाची भूमिका व तसेच पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आज परतूर येथे दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी बैठक मोठ्या ओबीसी संख्येने संपन्न झाली या बैठकीमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण गेल्यामुळे व राहिलेले आरक्षण संपुष्टात येऊ नये म्हणून सर्व ओबीसी बांधवांनी राजकीय वळण न लागता समाज बांधवासाठी लढा सक्रिय करून गेलेले राजकीय आरक्षण मिळावे व संपूर्ण आरक्षण अबाधित राहावे यासाठी लढा तीव्र करणे या प्रकारचे नियोजन जसे की, 11 जानेवारी 2022रोजी. वाटुर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन, प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा ठराव घेऊन प्रशासनाला पाठविणे, मंठा -परतूर तालुक्यातील जिल्हा परिषद गणा वाईज मीटिंग लावणे इत्यादी नियोजन करण्यात आले. या बैठकीच्या प्रसंगी मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले. या बैठकीला खालील पदाधिकारी ओबीसी बांधव उपस्थित होता यामध्ये श्री सत्संग मुंडे साहेब, श्री बळीरामजी कडपे साहेब, श्री रामप्रसा

मंठा महा.वीज वितरण कंपनीचा कारभार बेभरोसा- शेतकऱ्यांची विज अभावी पिके करपू लागली

Image
 मंठा (सुभाष वायाळ)दि.27 मंठा तालुक्यातील महा.विज वितरण कंपनीचा कारभार हा परतुर या ठिकाणावरून सध्या चालत आहे. मंठा येथील अधिकृत अधिकारी म्हणून पदावर असणारे मुख्यअभियंता श्री खंडागळे यांची बदली होऊनबरेच दिवस ओलांडले आहेत. तरी आतापर्यंत कुठलेही अधिकारी त्या पदावर रुजू झाले नाही. मंठा तालुक्यातील चार्ज हा परतुर येथील अभियंता श्री बेंडाळे यांच्याकडे आहे. ते मंठा येथे चार्ज घेतल्यानंतर फिरकलेच नाही.मंठा महा. विज वितरण कंपनी मध्ये शेतकरी व नागरिक त्यांच्या कामा करिता गेले तर तेथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. व सध्या चार्ज परतुर येथील अधिकाऱ्याकडे आहे. आम्ही काही करू शकत नाहीत. त्यांना येऊ द्या नंतर तुम्ही तुमचे काम सांगा असे सांगून वेळ मारून नेत आहेत. सध्या तालुक्यामधील बऱ्याचशा शेतकरी नागरिकांची नवीन वीज जोडणी, मीटर खराबी,विज बिल वाढ, विज बिल दुरुस्ती, नवीन ट्रांसफार्मर (डीपी)घेणे, ट्रांसफार्मर(डीपी.)दुरुस्ती, शेतकऱ्यांना वीज पुरवठा ही रात्री केला जात आहे.त्यामध्ये ही बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.अशी अनेक कामे रखडलेली आहेत. तरी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्य

जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ कदम तर उपध्यक्षपदी शंकर उबाळे बिनविरोध

Image
परतूर दि. प्रतिनिधी  परतूर येथील जिल्हा परिषद कन्या  शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ कदम तर उपध्यक्षपदी शंकर उबाळे यांची बिनविरोध निवड.       शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शालेय शिक्षण समिती ची निवडणूक केंद्रप्रमुख नामदेव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 रोजी दुपारी 12 च्या सुमारास कन्या शाळेच्या कार्यालयात पार पडली या वेळी केंद्रीय मुखध्यापक विष्णुपंत ढवळे, सत्यनारायन सोमाणी,श्रीमती वाईकर,श्रीमती कीर्ती सैदाने सह शाळेतील सहकारी उपस्थित होते. शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पत्रकार योगेश बरीदे,बाळासाहेब चव्हाण,वैभव बागल,श्री माने आदींनी सत्कार केला. फोटो- परतूर येथील शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना केंद्रप्रमुख नामदेव धुमाळ, पत्रकार योगेश बरीदे सह आदी दिसत आहे.

सतिश खरात यांना "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" जाहीर.

Image
मंठा(सूभाष वायाळ) दि.26 मंठा येथील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत सतिश खरात यांना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रॉडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने "राज्यस्तरीय कलावंत" हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून तो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , शाहीर अमर शेख, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथे देण्यात येणार असल्याचे कलावंत मंचचे अध्यक्ष सुनील मोंढे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.      मंठा तालुक्यातील लिंबेवडगावसारख्या एका छोट्याशा खेडेगावात राहून नाट्यकलावंत सतिश खरात यांनी पुणे, मुंबई, कोकण मधील दिग्गज कलाकारांसोबत नाट्यरंगभूमीवर ऐतिहासिक पात्राच्या भूमिका वठवल्या आहेत शिवाय नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयासोबतच अनेक लघुचित्रपटाची निर्मितीही केली आहे.        मध्यमहाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणभूमीत वाड्या-तांड्यावरील शाळेतून विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांनी सतत भ्रमंती केली आहे.        या अगोदर त्यांना "आविष्कार गौरव २०२१"

वीष्णू कदम यांचा दादर येथे सत्कार

Image
मुंबई (समाधान खरात)नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् तर्फे दि 24डिसेंबर 2021राेजी दादर येथे   विष्णू कदम संपादक विश्व क्रांती  मराठवाडा  तथा संस्थापक अध्यक्ष छत्रपती व्हि.के. फाउंडेशन यांचा शाल  श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन राज्यसभेचे खासदार,  तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सोबत माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर,  शिवसेना संपर्कनेते मराठवाडा सभापती महाडा विकास महामंडळ विनोद घोसाळकर ,झी २४ तासचे संपादक निलेश खरे , एन यु जे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शितलताई करदेकर. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे  आदी सहप्रमुख मान्यवर उपस्थित होते

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोन रुग्ण आढळले औरंगाबाद

औरंगाबाद - विषाणुच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटचे दोन रुग्ण औरंगाबाद शहरात आढळून आले आहेत. मुळची औरंगाबादची रहिवासी असलेल्या पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या एका युवतीचा जिनोम सिक्वेंन्सिंग चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तिच्यावर मुंबईत उपचार केले जात आहेत. औरंगाबादेत आलेल्या तिच्या वडिलांचा जिनोम सिक्वेंन्सिंगचा अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. त्याच बरोबर दुबईहून आलेला आणि सिडको एन ७ भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू,रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी,सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध, कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मुंबई-राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून ये

जालना जितूर महामार्गावर गांज्याची तस्करी, मंठा पोलीसाची धडाकेबाज कारवाई दोन जण ताब्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू

Image
प्रतिनिधी : (रवि पाटील /सुभाष वायाळ)  जालना जितूर महामार्गावरील कर्नावळ पाटीजवळ इंडियन हॉंटेल जवळ एक संशयीत ट्रक उभा असल्याची बातमी गुप्तहेराकडून मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाल्या नंतर लगेच सर्व पोलीस f कर्मचार्याना घेऊन  सदर घटनास्थळावर जाऊन ट्रक सदर्भात विचारणा करून तपासणी केली असता या ट्रक मध्ये ०३क्कीटल ७ किलो च्या वर गांजा सापडला त्याची किमंत १८ लाख ४३६८० रू असुन व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक सुध्दा यावेळी जप्त करण्यात आला असून त्याची किमंत २० लाख रूपये आहे विशेष बाब म्हणजे गांजा तस्करीचा संशंय कोणाला येऊ नये म्हणून नर्सरीसाठीची विविध प्रकारची  आठशे रोपे ज्याची किमंत ०६ लाख रुपये असून एकूण ४४ लाख ४३६८० रुपयचा मुद्देमाल मंठा पोलीसांनी जप्त केला आहे ताब्यात घेतलेला ट्रक क्रंमाक एम एच २१ वि एच १७५८ असून या ट्रकवरील दोनही व्यक्ती भोकरदन येथील असुन गोविद हिरालाल चांदा वय वर्ष ४२ व बादल हिरालाल चांदा वय वर्ष ३५ यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे या तस्करी मध्ये पांढऱ्या गोण्यामध्ये लपवलेला १४८ पूडया मधील गांजा पोलीसांनी हस्तगत केला  सदरची ग

मंठा नगरपंचायत प्रभाग आरक्षण सोडत

Image
मंठा (सुभाष वायाळ)दि.23 मंठा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021साठी एकूण तेरा प्रभागांसाठी निवडणूक पार पडली. तर उर्वरित एकूण चार प्रभागासाठी मा. सर्वोच्च न्यायालययाच्या निकाला नुसार  ओ.बी.सी.आरक्षणाला स्थगिती देऊन हे प्रभाग आता सर्वसाधारण मधून निवडणूक लढवली जाणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक दोन, तीन,चार व नऊ यासाठी आरक्षण सोडत आज दिनांक 23 वार गुरुवारी रोजी पार पडली.त्यापैकी सर्वसाधारण महिला प्रवर्गा साठी प्रभाग चार व नऊ आरक्षित करण्यात आले. यावेळी सारंग उमेश भावसार व सोहम रमेश खंदारे या लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या यावेळी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उत्सुक उमेदवार, नागरिक, पोलीस,पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

बदनापूर नगर पंचायत निवडणूकवॉर्ड क्रमांक १२ मध्ये भाजप आणि आघाडीत मारामारी!,इतर ठिकाणी शांततेत मतदान, ७७ टक्के मतदान

Image
बदनापूर(समाधान खरात)   नगर पंचायत निवडणूक च्या मतदानाची रणधुमाडी आटोक्यात आली असून आज बदनापूर शहरातील १२ वॉर्डात ७७ टक्के मतदान झाले आहे या मतदानाच्या  पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला होता शहरात पोलिसांनी पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक केंद्रात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही वॉर्ड क्रमांक १२ च्या मोसंबी संशोधन केंद्र येथे मतदाना दरम्यान महाआघाडी आणि भाजपा च्या कार्यकर्त्यांत बोगस मतदानावरून तुंबळ हाणामारी झाली  यात भाजप चे कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आले असता ते एकमेकांत भिडले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला बाकी इतर मतदान केंद्रावर शांततेने मतदान झाले शहरातील संपूर्ण १७ वॉर्ड साठी मतदान होणार होते परंतु मा कोर्टाच्या आदेशाने ओबीसी ठिकाणी मतदान स्थगित केले होते त्यामुळे १३ वॉर्डात मतदान होणार असल्याने वॉर्ड क्रमांक ८ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या एक उमेदवार  बिनविरोध निवडुन आल्याने बाकी १२ वॉर्डात ७७ टक्के मतदान झाले संपूर्ण  मतदान केंद्रात अतिर

जगदीश दरगड यांचे निधन

Image
परतूर(प्रतीनीधी)परतूर येथील व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष शीवजी मामा दरगड यांचे पुतणे जगदीश दरगड यांचे दिनांक 22 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले  ते जालना येथे वास्तव्यास होतेत्यांचा अंत्यसंस्कार जालना येथील  वैकुंठवासी स्मशानभूमी येथे करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, तीन भाऊ , बहीनी  सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे

केहाळ वडगाव येथे पौर्णिमा उत्साहात साजरी - भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेचे उद्घाटन

Image
 मंठा- (सुभाष वायाळ) दि. 22 मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथे भारतीय बौद्ध महासभा आयोजित जयपुर सर्कल बारागाव गट पौर्णिमा या निमित्त केहाळ वडगाव येथे भव्य  बौद्ध पौर्णिमेचे आयोजन केले होते. या पोर्णिमे निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे वडगाव शाखा उद्घाटन कार्यक्रम सुद्धा पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जालना जिल्हा अध्यक्ष महिंद्र बनकर साहेब भारतीय बौद्ध महासभा मंठा तालुका अध्यक्ष विष्णू वाघमारे, अतुल खरात ,दत्तात्रय चोरमारे ,गौतम अंभोरे . विठ्ठल मोरे, आत्माराम मोरे, अशिष मोरे ,किरण मोरे ,अशोक रणवीर , प्रकाश खाडे ,दत्तात्रय प्रधान, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन पार पडले. व नवनिर्वाचित सर्व शाखा सदस्यांना निवडून निमित्त शुभेच्छा दिल्या  पूर्णिमा ची सुरुवात महापुरुषांच्या फोटो पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या पौर्णिमाची मुख्य आकर्षक राहिल्या त्या माहोरा येथील मुली व मुलं या मुलांनी प्रमुख उपस्थित नागरिकांना चांगले पैकी या मार्गदर्शन केले  .केहाळ वडगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी पौर्णिमेचे उत्तम प्रकारे आयोजन केले होते. संपूर्ण जयपुर सर्कल परिसरातील समाज बांध

तळणी येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता

Image
तळणी (रवी पाटील) येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता ह भ प लक्ष्मीकांत महाराज सेवलीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने .झाली तळणी येथील दत्त जयंती उत्सवाला गेल्या ७० वर्षापासूनची पंरपरा सेवलीकर महाराजाच्या किर्तनरूपी सेवेने आजतागायत सूरूच आहे या सात दिवसात रोज सकाळी  रामदासी भिक्षा दत्ताञयाचे नित्योपचार आरती नैवेद्य व मानाची पंगत असलेल्या एका भक्ताकडून अन्नदानाची प्रथा गेल्या ७० वर्षापासून पेक्षा जास्त काळापासून सुरूच आहे दत्त जयंती निमित्य श्री विठ्ठल मंदीर येथे सात दीवस हरदासी किर्तनाची सेवा सेवलीकर महांराजांच्या वतीने होत असते त्यांनंतर भोलेनाथ महाराज स्थापीत श्री दत्त मंदीर पुर्णा भोलेनाथा गड येथे सुध्दा गेल्या चाळीस वर्षापासून काल्याच्या किर्तनाची पंरपरा कायम आहे  या काल्याच्या .निमित्याने जगदगूरू तुकाराम महाराज यांच्या * उपजोनिया पुढती येऊ काला खाऊं दहीभात* ॥१॥ *वैकूठी तो ऐसे नाही* *कवळ काही काल्याचे* II ध्रू॥ *एकमेका देऊमुखी* I *सुखी घालू हुबंरी* II २॥  *तुका म्हणे वाळवंट* I *बरवे नीट उत्तम* ll ३॥ या अभंगावर सुंदर निरुपण केले भगवान श्रीकृष

सरपंच परिषदेच्या एकदिवशीय संपात राज्यातील सर्व संगणकपरिचालक सहभागी होणार – सिद्धेश्वर मुंडे,संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा देऊन ग्रामपंचायत मध्ये सामाऊन घेण्याची मागणी

जालना(समाधान खरात)सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र या सरपंच संघटनेच्या वतीने अनेक मागण्यासाठी २२ डिसेंबर २०२१ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून या सरपंचांच्या मागण्या बरोबरच csc –spv या कंपनी कडून नियुक्त असलेल्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर सामाऊन घेऊन कर्मचारी दर्जा व किमान वेतन राज्य सरकारने देण्याची मागणी असल्याने सरपंचांच्या मागण्याना व आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने घेण्यात आला असून या संपात राज्यातील २८००० ग्रामपंचायती मध्ये काम करणारे संगणकपरिचालक सहभागी होणार असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.        याबाबत सविस्तर वृत्त की राज्यातील सरपंचांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे,त्यामुळे मुंबई येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने अनेक मागण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेऊन एकदिवशीय संप करण्यात येणार आहे,यात प्रामुख्याने गावाच्या वि

पीर पिंपळगाव येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना झाल्या प्रसंगी पूर्णाकृती पुतळ्याची दूग्धाभिषेक, व तलवार परत बसवून शिवपूजन करण्यात आले

Image
 जालना(समाधान खरात)तालूक्यातील पीर पिपंळगाव येथील  ग्रामपंचायत,ग्रामस्थ व शिवप्रेमी,पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळ्याची सूरक्षीतता साठी CCTV कॅमेरे  बसवून व संरक्षण तारफेन्सीगंचे काम हाती घेऊन व ज्या अज्ञात समाजकंटकानी दोन धर्मात,जातीत वाद निर्माण करन्यासाठी शिवरांयाची विटंबना केली याचा तपास करून त्याला तात्काळ अटक करून कायदेशीर कार्यवाहीची मागणी यावेळी ग्रामस्थ व शिवप्रेमीनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली .जालना तालुक्यातील पिरपिपळगाव येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ची अज्ञात इसमाने सोमवारी मध्यराञी अंधाराचा फायदा घेऊन  शिवाजी महाराज यांच्या हातातील तलवार काढुन घेतली  , हि दोन महिन्यांतील दुसरी घटना होती ,मंगळवार सकाळी विटंबना झाल्याचे कळताच सर्वधर्मीय ग्रामस्थ,शिवप्रेमी, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू  होम डिझावायएसपी व्यास , चदनझिरा पोलीस निरीक्षक देवीदास शेळके तालुका पोलीस निरीक्षक खेडकर एलसीबी चे पी एस आय प्रमोद बोडले,  पीएस आय सदिप सावळे , संजय गवळी  , गणेश मिसाळ,  पल्लेवाड, राठोड, शिंदे,  आदींसह घटना

मराठवाडा कौशल्य विकास मंडळाच्या वतीने मंत्री नवाब* मलिक यांना निवेदन ,विद्यार्थी प्रवेशास मुदतवाढ देण्याची मागणी.

Image
प्रतिनिधी:( परतूर ) राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक हे नुकतेच घनसावंगी येथे दौऱ्यावर आले असता मराठवाडा कौशल्य विकास संस्था मंडळाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊ विद्यार्थी प्रवेश मुदतवाढदेण्या सह विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले  या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  कोविड19 विषाणू संसर्गामुळे 10 वी 12 वी चा निकाल उशिरा लागलेला आहे प्रथम प्राधान्य विद्यार्थी हे आयटीआय 11वी 12 वी सायन्स आर्ट कॉमर्स पोलटेक्निक या प्रवेशासाठी देतात या सर्व प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे तसेच शासकीय आयटीआय मधील प्रवेशास पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास अभ्यासक्रमांक मागील वर्षीप्रमाणे क्षमता पूर्ण होईपर्यंत प्रवेश प्रक्रियास  मुदतवाढ देण्यात यावी तसेच एन्रॉमेंट कम परीक्षा कॉपी फिस ऑनलाइन मान्यतेप्रमाणे एकाच वेळी घावे किंवा पूर्वीच्या चालनाप्रमाणे घावे राहिलेल्या जिल्ह्याचे नूतनीकरण नविन मान्यता जुन्या संस्थेत नविन अभ्यासक्रम मुदतवाढ मिळणे विद्यार्थी प्रवेश इन्सट्यूट ऑनलाईन मधील त्रुटी सोडवणे आदी मागण्या बाबत निवेदन देण्यात आले आहे या प

देवगिरी पतसंस्थेच्या बचतगट प्रतिनिधीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी,मंठाप ोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..._

Image
   मंठा(सुभाष वायाळ)दि.21 देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा मंठा यांच्या वतीने मंठा तालुक्यात महिला बचत गट लोन देण्याचे काम चालू आहे, तालुक्यातील प्रत्येक गावात लोन वाटप आणि मार्गदर्शन करण्याचे काम जोमाने सुरू आहे. असेच दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास देवगिरी पतसंस्थेचे बचत गट प्रतिनिधी विकास दराडे हे कर्नावळ ता. मंठा येथे महिला बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी गेले असता. प्रयागबाई भोपा चव्हाण यांच्या घरा पुढे ते मार्गदर्शन करीत असताना कर्नावळ येथे रहिवासी आकाश चव्हाण ही व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन म्हणाली की, आपण चुकीचे मार्गदर्शन करत आहात म्हणून वाद करून शिवीगाळ करून बचत गट प्रतिनिधी विकास भगवानराव दराडे यांच्या डोळ्याखाली वार केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून आकाश चव्हाण या इसमा विरुद्ध देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा मंठा व बचत गट प्रतिनिधी विकास भगवानराव दराडे यांनी मंठा पोलीस ठाणे येथे जाऊन भारतीय दंड संहिता १८६०कलम ३२३,५०४,५०६ दाखल करून आकाश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . तरी आरोपीला लवकरात लवकर अटक करून

जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी यांची तात्काळ बदली करा शेतकरी क्रांती सेनेची मागणी

मंठा (सुभाष वायाळ)तालुक्यातील मौजे जयपुर सज्जावर गेली सहा वर्षापासुन तलाठी सौ.माळी या रूजु आसुन कधीच सज्जावर हजर रहात नाही. यामुळे शेतीचे कामं व शेतकरी वर्गाला मोठी अडचण निर्माण होत आहे. जयपुर तलाठी सज्जा माळी यांनी सज्जावर काम करत आसतांना शासकीय कामात खुप मोठी अफरातफर केली आसल्याची लेखी तक्रार शेतकरी क्रांती सेना संस्थापक सिध्देश्वर काकडे यांनी परतुर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे केली आहे. जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी यांच्या गैर कारभाराची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी क्रांती सेनेच्या वतीने परतुर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. मंठा तालुक्यातील अनेक सज्जावर काही तलाठी हजर रहात नसुन यामुळे शेतकर्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आसुन जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आसल्याचा आरोप शेतकरी क्रांती सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी केला आहे. जयपुर तलाठी सज्जा माळी यांची बदली न झाल्यास आपण आंदोलन करणार आसल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी या मंठा येथे बसुन काम पहातात. जयपुर तलाठी माळी यांचे सर्व का

मंठा तालुक्यातील शाळांना शालेय व्यवस्थापन समितीच वावड

मंठा- (सुभाष वायाळ)दि.20 बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील भाग 4 कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. मंठा तालुक्यातील बहुतांशी शाळातील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपलेली आहे. तरीपण नवीन शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यामध्ये संबंधित शाळा, मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, केंद्रप्रमुख वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये उत्सुकता दिसून येत नाही. व शासनाच्या नियमाला जुमानत नसल्याचे आवआणताना दिसून येत आहेत. शासनाने शालेय गुणवत्ता वाढवावी व मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे. व शालेय व्यवस्थापनामध्ये  पारदर्शकता यावी. शाळाबाह्य व अपंग मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, शिक्षकांच्या समस्याचे निराकरण करणे व त्यांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे,शालेय विकास आराखडा तयार करणे, यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात यावी. असा नियम  लागू केला आहे. परंतु मंठा तालुक्यामध्ये बहुतांशी शाळांमध्ये या नियमाला केराची टोपली दाखवताना दिसून येत आहेत. ही समिती म्हणजे तालुक्यातील

कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी यांचा संप मागे,काही संघटना विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम ,एसटी संपाबद्दलचा गोंधळ अजूनही कायम आहे.

Image
  मुंबई कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्या संघटनेने एसटी संप मागे घेत असल्याची घोषणा काल (20 डिसेंबर) केली. विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात असल्याचं कारण देत अजय गुजर यांनी संप मागे घेतला आहे. कर्मचार्‍यांनी संप मागे घेऊन, कामावर रूजू व्हावं असं आवाहन कर्मचाऱ्यांना केलं आहे. पण एसटी कर्मचारी आणि गुणरत्न सदावर्ते हे विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. त्यामुळे हा संप आझाद मैदानात आम्ही सुरूच ठेवणार अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि संपकरी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेतील चर्चेनंतर कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्या संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. चर्चेदरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे तो सोडून कर्मचाऱ्यांच्या अन्य मुद्यावर शासनाने तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी आग्रही भूमिका मांडली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या विलिनीकरणाचा मुद्दा सोडून संघटनेने दिलेल्या अन्य मागण

लोकनीधीतुन शेतकरी चळवळ उभारण्याचं काम करणार- सिध्देश्वर काकडे

Image
मंठा(सुभाष वायाळ) जालना जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी राजाला न्याय मिळावा आणि शेतकरी वर्गाला चांगले दिवस यावे या हेतुने शेतकरी क्रांती सेनाची स्थापना करण्यात आली असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. मि चळवळीतील कार्यकर्ता आसुन माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा शेतकरी मायबाप जणतेसाठी समर्पीत केला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी चळवळ टिकवणं खुप म्हत्वाचं आहे. कर्जबाजारी शेतकरी, शेती मालाला योग्य हमीभाव मिळवुन देण्यासाठी, कापुस,तुर, सोयाबीन,. ऊस व फळबाग लागवड करणार्यां शेतकरी हिताची हि चळवळ उभी करण्यात आली आसुन आपण या संघटनेच्या माध्यमातुन राज्यभर वेळ प्रसंगी आक्रमक आंदोलन पेटवणार आहे. शेतकरी हिताचा लढा आता आपण स्विकारला आहे. लोक निधी ऊभा करुन संघटनेची चळवळ कायम ठेवुन शेवटच्या घटका पर्यंत शेतकरी हिताची बाजु आपण मांडतच रहाणार आसल्याचे शेतकरी क्रांती सेनेचे, कापुस परीषद, शेतकरी परीषद, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, विविध संघटनेचे धेय्य धोरणं आखण्यात आली आहे. शेतकरी वर्गाला आज कोणीच वाली नसुन सर्व नेते मंडळीं हे सत्तेच्या मागं धावत आहेत. खरोखर आज शेतकरी व

तळणी येथे आ.भा. मराठा महासंघ तर्फे जन आक्रोश आंदोलन

Image
मंठा(सुभाष वायाळ) दि.20 मंठा तालुक्यातील तळणी येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे व शिवप्रेमी मार्फत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. अखंड भारताचे प्रेरणास्त्रोत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्नाटक राज्यामध्ये काही समाजकंटकांनी विटंबना केली. त्या निषेधार्थ तळणी बस स्टॅन्ड येथे जन आक्रोश आंदोलनाला सुरुवात केली होती.व या आंदोलनाचा समारोप अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यालय मध्ये करण्यात आला. या आंदोलनामध्ये तळणी परिसरातील बहुसंख्य शिवप्रेमी तसेच तळणी गावचे सरपंच उद्धवराव पवार उपसरपंच सुधाकरराव सरकटे, कैलासराव सरकटे, बाळासाहेब देशमुख, अवि सरकटे आदी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंध लसीकरणात मंठा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंठा आरोग्य विभागाकडे लक्ष देण्याची गरज

Image
 मंठा (सुभाष वायाळ) कोरोना या महाभयंकर रोगाने जगभर गेली दोन वर्ष झाले हा -हा कार माजवला आहे. कोरोना च्या  आलेल्या दोन लाटेमुळे अनेक लोकांचा रोजगार तर गेलाच तर काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व ओमायक्रोनच्या रूपात तिसरी लाट येते का, यामुळे नागरिकांमध्ये अगोदरच  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेगवेगळे उपाय अवलंबिले यामध्ये स्वच्छता, लॉक डाऊन, वैद्यकीय उपचार, व त्यानंतर कोरोना प्रतिबंध म्हणून  लसीकरण हाच एकमेव उपाय समजून शासनाने लसीकरनणाला सुरुवात केली.लसीकरणासाठी शासनाचे दररोज करोडो रुपये खर्च होत आहेत. परंतु मंठा तालुक्यातील आरोग्य विभाग पाहिजे तेवढा जागृत झाल्याचा दिसून येत नाही.यामध्ये त्यांचा नाकर्तेपणा म्हणा किंवा नियोजनाचा अभाव या अशा ढसाळ कारभार पणामुळे मंठा तालुक्याचे लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. मंठा केंद्र एकूण  व तालुक्या अंतर्गत लसीकरणाचे एकूण 04 उपकेंद्र आहेत.पाटोदा, ढोकसाळ, दहिफळ खंदारे व तळणी यामध्ये येणारी एकूण लोकसंख्या एक लाख 91हजार 489 आहे. तर अठरा वर्षावरील लाभार्थीची संख

दुःखाचं डोंगर बाजूला सारून राहुल लोणीकर थेट अपघात ग्रस्तांच्या मदतीला रस्त्यावर

Image
परतूर(प्रतिनिधी) घरातील एखादा कर्ता माणूस कायमच आपल्याला सोडून गेला तर त्याच दुःख कायम असतो आणि वेळोवेळी त्या वैक्तीच्या आठवण मनाच्या गाभाऱ्यात कायम राहत असते परंतु दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे वडील तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे आजोबा स्व.दत्तात्रय लोणीकर यांचे निधन झाले  आणि तालुक्यासह राज्यभरातील नेते,कारकर्ते,मित्र परिवार,पक्षातील सहकारी, अन्य पक्षातील राजकीय मंडळी यांची सांत्वन पर भेटी सुरू असतांना तालुक्यातील शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर रोहिणा गावाजवळ  रात्री आठ वाजेच्या सुमारास एक अपघात झाला आणि माहिती मिळताक्षणी राहुल लोणीकर यांनी सहकारी कार्यकर्त्यांना सोबत तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने  अपघातग्रस्त जखमींना रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आणि या जखमींना वेळेत उपचार कसे करता येईल यासाठी स्वतः काळजी घेत आहेत या कार्याबद्दल राहुल लोणीकर व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचे जनसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.

कोरोना लस न घेतल्यास अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार- उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे.

Image
 मंठा(सुभाष वायाळ)    कोरोना लस न घेणाऱ्यास सेवा दिल्यास ग्रामपंचायत करणार दंड मंठा पंचायत समिती येथे दि. १६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार गावातील राशन दुकानदार,किराणा व इतर कोणत्याही आस्थापनांनी नागरिकांना सेवा देण्यापूर्वी लस घेतल्याबाबत खात्री करून घ्यावी.        सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित किराणा दुकान,राशन दुकानदारावर ग्रामपंचायतीमार्फत दंड आकारण्यात येईल,जर दुसऱ्यांचा उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास दुकान सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.     "मिशन कवच-कुंडल" मोहिमेसाठी मंठा तालुका संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या ग्रामसेवक बैठकीमध्ये याबाबत सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील लसीकरणाचे काम इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असल्यामुळे यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी सर्व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन लसीकरण वाढवावे.व्यापक प्रमाणपत्र,जनजागृती करावी सर्व यंत्रणांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावे.अशा सूचना दे