Posts

Showing posts from February, 2021

समाजाने संतांचे विचार अवगत करावे-प्रदिप फुलमाळी

Image
परतुर/प्रतिनिधी येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सम्राट आशोक मित्र मंडळाचे संतोष हिवाळेप्रमुख पाहूणे नगरसेवक श्रीकांत उन्मुखे,कृष्णा आरगडे  संदिप काळे  होते.यावेळी चर्मकार महासंघाचे युवा नेते प्रदिप  फुलमाळी यांनी संत रविदास महाराजांच्या कार्याची माहिती दिली. समाजाने जागृत होऊन संत रविदास महाराजांचे विचार अवगत करून युवकांनी उच्च शिक्षणाकडे वळावे जेणेकरुन समाजाची प्रगती होईल.सदर कार्यक्रमाला मुन्ना चित्तोडा,सावता जईद,अजय देसाई, ज्ञानेश्वर जईद,गणेश हिवाळे,शंकर ठाकुर,पत्रकार माणिक जैस्वाल,संजय देशमाने ,आदी उपस्थित होते.        कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीष हिवाळे,काळे,सुनिल खंदारे आदीनी परीश्रम घेतले

कोरोनाची भीती सर्व सामान्य लोकांनाच का? मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे

Image
मंठा (प्रतीनीधी कोरोना ची भीती दाखवत राज्य सरकार महाराष्ट्रात सध्या सर्व सामान्य जनतेला वेठीस धरून राजकारण करीत आसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे.  पुजा चव्हाण मृत्यु प्रकरणी आपण गुन्हेगार नाही हे सिध्द करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार मधील मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी संस्थानाचा आधार घेत शक्ति प्रदर्शन करून सर्व सामाण्यांच्या भावना दुखावल्या आसल्याचे मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना सस्पेंड केलं पाहिजे व मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील कार्यवाही करायलाच पाहीजे आशि मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे कोरोनाचे नियम पाळावे आसे अहवान करतात आणि दुसरीकडे त्यांचेच मंत्री नियम तोडतात हे मनसे खपवुन घेणार नसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी सांगितले आहे.

आधुनिक काळात शिवरायांच्या विचारांचा जागर महत्त्वाचा- कान्होजी जेधे यांचे वंशज राजधीर जेधे यांचे प्रतिपादन,शिवरायांच्या विचारातून आधुनिक राष्ट्राची निर्मिती - इतिहास संशोधक विलास सोनवणे यांचे मत,युवकांनी शिवविचारांचा आणि कर्तृत्वाचा जागर करावा, मोरे पाटील परिवाराचा अत्यंत स्तुत्य उपक्रम - भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
मंठा(प्रतिनिधी) आधुनिक काळात शिवरायांचे विचार हेच मार्गदर्शिका असून शिवरायांच्या विचार आणि आचार मार्गावर गेल्यास आधुनिक काळात प्रत्येक जण शोधू शकतो म्हणून आधुनिक काळात शिवरायांच्या विचारांचा जागर खूप महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन शहाजीराजांचे सहकारी मित्र व शिवरायांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी कान्होजी जेधे यांचे १४ वे वंशज राजधीर जेधे यांनी केले. शिवरायांचे विचार संपूर्ण जगाच्या पाठीवर अद्वितिय असून शिवरायांच्या विचारावरच आधुनिक राष्ट्राची नवनिर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक विलास सोनवणे यांनी केले मोरे पाटील परिवार आयोजित शिवजन्मोत्सव २०२१ निमित्त आयोजित कार्यक्रमात राजधीर जेधे व विलास जी सोनवणे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर होते यावेळी राजधीर जेधे यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार तर विलास सोनवणे यांना शिवस्वराज्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी संत नामदेव महाराज यांच्या साहित्यावर पीएचडी प्राप्त करणारे डॉ. एकनाथ शिंदे कोरोना काळात प्रभावी काम करणारे ...

वाटुर येथे युवा वारियर्स शाखेच्या नामफलकाचे राहुल लोणीकर यांच्या हस्ते अनावरण,युवा वारियर्स म्हणजे युवकांमधील सुप्तगुणांना संधी देण्याचे व्यासपीठ-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
परतुर प्रतिनिधी आज राज्यभरात मध्ये युवा  वारियर्स च्या बाराशे शाखांच्या नामफलकाचे अनावरण होत असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा वारियर्स या युवक आतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या शाखे चे उदघाटन करतानाच राज्यभर  आशा प्रकारच्या शाखांचे2 उद्घाटने होत असल्याचे होत असल्याचे भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी वाटुर येथे वटुर पंचायत समिती गणाच्या युवा वारियर्स शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की युवा अवस्थेतील मुला-मुलींना आपल्यातील नेतृत्व गुण त्याचबरोबर विविध क्षेत्रात असलेली हातोटी व त्यांच्यात असलेले कलागुण यांना या युवा वारियर च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे त्यामुळे युवकांनी युवा वारियर च्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करावी असेही सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की  जास्तीत जास्त युवकांनी युवा वारियर च्या माध्यमातून सक्र...

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी गावच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे- माजी मंत्री बबनराव लोणीकर, मतदार संघातील 78 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात

Image
परतूर( प्रतिनिधी )ग्रामपंचायत चा सरपंच हा त्या गावच्या विकासाचा आरसा असून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी स्वताला झोकून देऊन काम करावी असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते परतुर येथे संपन्न झालेल्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपाध्यक्ष तथा भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल शिंगी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश राव निरवळ जालना तालुका अध्यक्ष प्रकाश राव टकले विलासराव आकात परतूर पंचायत समितीचे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात, जिल्हा परिषद सदस्य पंजाब राजेश मोरे, अंकुशराव बोबडे माऊली शेजुळ बद्रीनारायण खवणे बद्रीनारायण ढवळे बोराडे कैलास बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी सरपंच उ...

स्थानिक स्वराज संस्था प्रमाणे व्यापाऱ्यांचा हि एक आमदार असावा -हस्तीमल बंब,परतूर येथे व्यापारी महासंघाची बैठक संपन्न,परतूर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी राहूल सातोनकर तर सचिव प्रवीण सोमाणी*

Image
परतूर (प्रतीनीधी) स्थानिक स्वराज संस्थे प्रमाणे व्यापारी महासंघाचे  स्वंतत्र आमदार  विभाग स्तरावर  आसावा  आसी मागनी  व्यापारी महासंघाचे परतूर येथे झालेल्या बैठकित जालना जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी  केली      याप्रसंगि व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून व्यापारी महासंघाचा जिल्हा सहसचीव जगन्ननाथ थोटे,वीजयकुमार सुराना उपस्थित होते         पूढे बोलतान बंब म्हणाले कि ज्या प्रमाणे स्थानीक स्वराज संस्था चे वीभाग स्तरावर आमदार आसतो त्याच प्रमाणे व्यापारी मतदार संघाचा स्वंतत्र आमदार आसवा  जेने करून व्यापारी यांच्या समस्येवर वीधानभनात आवाज उठेल व व्यापाऱ्याच्या समस्यावर तोडगा निघेल    यावेळी परतूर तालूका व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारणिची घोषणा करण्यात आली यामधे, सर्वानूमते राहूल सातोनकर याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सचिव प्रवीण सोमाणि उपाध्यक्ष महेश दहिवाळ,अनील वाशिंबे कोषाध्यक्ष जुबेर तंबोली तर सह सचिव गोपाल दरगड  यांचा समावेश करण्यात आला ====================== माझ्या वर टाकलेला वीश्व...

स्व.किशोर अग्रवाल यांना पत्रकारांची श्रध्दांजलीशहरातील चौकात पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार-विकासकुमार बागडी

Image
जालना,दि.13 (प्रतिनिधी) रुपम ग्रुपचे चेअरमन, ज्येष्ठ समाजसेवक स्व. किशोर अग्रवाल यांना आज शनिवारी असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम न्यूज पेपर्सच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील हॉटेल मधुबन येथे झालेल्या शोक सभेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान, यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी म्हणाले की, स्व. किशोर अग्रवाल यांची समाजसेवा खर्‍याअर्थाने वाखण्याजोगी होती. गरिबांना मदत करणे हा त्यांचा छंद होता. लॉकडाऊनच्या कार्यकाळातही त्यांनी भरघोस अशी मदत केलेली आहे. त्यांची ही सेवा विसरण्याजोगी नाही.  त्यांच्या पासून इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणूनच त्यांची प्रतिमा शहरातील एखाद्या चौकात उभारुन त्या चौकाला स्व. किशोरसेठ अग्रवाल असे नाव देण्यात यावे, अशी आपण संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांसह सर्व संबंधितांकडे करणार असून तशा आशयाचे निवेदनही उद्या सोमवारी देणार असल्याचे यावेळी संंघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लियाकतअली खान यांनी केले. तर शोकसभेस रवि अग्रवाल, राम अग्रव...

सर्वांनी मिळून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा येथे भाजपाच्या वतीने समर्पण दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

Image
मंठ(प्रतिनिधी) जनसंघाच्या निर्मितीपासून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून व सर्व सामान्य व्यक्तीच्या सहकार्यातून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे मत भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा येथे आयोजित समोर पण दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, ज्ञानेश्वर शेजुळ, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ सभापती संदीप भैय्या गोरे उपसभापती राजेश मोरे पंचायत समिती उपसभापती नागेश घारे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे विठ्ठलराव काळे नाथराव काकडे उद्धवराव गोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या माध्यमातून जनसंघ का पासून भारतीय जनता पार्टीचे सुरुवात झाली असून ०२ खासदारांच्या संख्या पासून ते आज ३०३ खासदारांपर्यंत भारतीय ज...

बहुचर्चितआंबा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात,माजी मंत्री बबनराव लोणीकर व राहुल भैय्या लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली खाली करणार विकास:- प्रशांत बोनगे

Image
परतूर (प्रतिनधी) तालुक्यातील बहुचर्चित आंबा ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात भाजपा ला यश आले असून सरपंचपदी मेराज खतीब तर उपसरपंच पदी उमा महादेव वीर यांची निवड झाली असून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेत्रत्वाखाली आंबा गावाला विकसित करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रशांत बोनगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे   पुढे या पत्रकात म्हंटले आहे की,काहींनी आंबा ग्रामपंचायत भाजपा च्या ताब्यात येऊ नये यासाठी देव पाण्यात ठेऊन ग्रामपंचायत भाजपा च्या हातून गेल्याचे विविध माध्यमा द्वारे प्रसिद्ध केले होते मात्र कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता भाष्य करणाऱ्या साठी ही मोठी चपराक असल्याचे बोनगे यांनी म्हंटले आहे   पुढे या पत्रकात म्हंटले आहे की , आंबा गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी सरपंच मेराज खतीब व उपसरपंच उमा वीर सह आम्ही सर्वजण पूर्ण प्रयत्न करणार असून आमचे नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना राबवण्याचा संकल्प पॅनल प्रमुख प्रशांत बोनगे यांनी...

आष्टी येथील रूरबन अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन,सरकारच्या उदासीनतेमुळे अनेक प्रकल्पांची कामे रखडली-माजी मंत्री बबनराव लोणीकर

Image
परतूर (प्रतिनिधी ) केंद्र सरकार ची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी  रुरबन योजना ही महाराष्ट्र राज्यातील केवळ सात जिल्ह्यांमध्ये राबवली गेली या योजनेमध्ये जालना जिल्ह्यातील आष्टी व परिसरातील सोळा गावांचा समावेश करण्यात आला या माध्यमातून आष्टी व परिसरातील गाव समूहांचा मोठ्या प्रमाणात विकास साधला गेल्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते आष्टी येथे आष्टी शहरांतर्गत रस्ते व आष्टी शहरातील अंतर्गत पाईपलाईन च्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की रूरबन योजनेच्या माध्यमातून आष्टी शहरासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी आपण मंत्री असताना मंजूर करून घेतला आज आष्टी गावातील 4 कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन होत असल्याचा आपणास आनंद असून गेल्या कित्येक महिन्यांपासून निधीअभावी रखडलेली 3 कोटी रुपयांची अंतर्गत पाईपलाईन  अंथरन्याची योजना आपण प्रयत्न पूर्वक मार्गी लावली असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. ======================   *सरकारच्या उदासीनते मुळे मिनी एम  आय डी सी प्र...

रामनगर सर्कलमधील तरुणांचा मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश

Image
जालना(प्रतीनीधी) जालना तालुक्यातील रामनगर सर्कलमधील तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसे राज्य सरचिटणीस तथा मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली   महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे, जालना तालुका अध्यक्ष सचिन एरंडे, मनसे जालना तालुका ऊपाध्यक्ष कृष्णा खलसे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मनसे विद्यार्थी सेना मध्ये जाहिर प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या विचारधारेवर आपण ठाम राहुन तरुणांना सोबत घेऊन आपण पुढची वाटचाल जोरात करणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेेमध्ये रामभाऊ कातकडे, गणेश कातकडे, आरूण नागवे, विलास काटकर, भगवान काटकर, सिध्देश्वर खांडेभराड, अनिल कातकडे, गजानन लोखंडे, योगेश नागवे, प्रदिप खांडेभराड, संजय  खांडेभराड, प्रकाश खांडेभराड, बालाजी शेळके,अमर जाधव, दिपक राऊत,विष्णू कुंडकर विलास डुकरे, खांडेश्वर गायकवाड, निवृत्ती भालेकर, कृष्णा काटकर, सचिन चौधरी,  आदि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

वाहेगाव(श्रीष्टी) येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Image
श्रीष्टी(प्रतीनीधी) दि.7 रोजी वाहेगाव ( श्रीष्टी  )येथे 14व्या वित्त आयोगा अंतर्गत मा.आ.सुरेशकुमारजी जेथलिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्त युवा नेते नितीन  जेथलिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या     यावेळी  उपस्थित सरपंच ता.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, गटनेते बाबुराव हिवाळे, अशिष भैय्या जेथलिया, उपसरपंच विठ्ठलराव आघाव, गणेश ढवळे,पांडुरंग गाडगे,विकास झरेकर, सर्जेराव आघाव, वाल्मीक आघाव, भगवानराव आघाव, प्रविण आघाव, नारायण आघाव, महादेव आघाव,भगवान नांगरे, निवृत्ती आघाव,मोतिराम आघाव, किसनराव गाडगे, भगवान पोटे, अतुल आघाव, नितीन नांगरे,गौतम वाघमारे, संजय नांगरे,राजेभाऊ नांगरे,सतिष आघाव, सुभाष पांजगे, गणेशराव गाडगे इत्यादी उपस्थित होते...

संपादक सुरेंद्रकुमार जायस्वाल यांना जालन्यात श्रध्दांजली

जालना,दि.५ (प्रतिनिधी) साप्ताहिक लोकअहवालचे संपादक तथा ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते  स्व. सुरेंद्रकुमार किशनलाल जायस्वाल (६६) यांना आज शनिवारी असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडियम न्यूज पेपर्स इंडीयाच्या जालना शाखेच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.  हॉटेल मधुबन येथे आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी, पत्रकार श्रीमती आयेशा मुलानी, पारस नंद, मुकेश परमार, दिनेश नंद, अशपाक पटेल, राहुल वाहुळे, शेख इर्शाद, नाजीम मनियार, फेरोज मनियार, शेख मुजिनोद्दीन, बालाजी अडियाल, मयूर अग्रवाल, गोपाल भुरेवाल, मधुकर मुळे,  धनंजय देशमुख, रुख्मीनीकांत दिक्षीत, विजय सकलेचा, संतोष भुतेकर, राजेश भालेराव, दिपक शेळके, साहिल पाटील, मनोज कोलते, सुनिल खरात, रवि दानम, गणेश वैद्य, नरेश धारपावरे आदींसह विविध वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थिती होते. प्रारंभी स्व. सुरेंद्रकुमार जायस्वाल यांना उपस्थित पत्रकारांनी  श्रध्दांजली अर्पण केली.

मोलमजुरीतून वाचवलेले पैसे वृद्धेने दिले राममंदिर साठी !

Image
परतूर (प्रतिनिधी )-श्रीराम मंदिर निर्माण अभियानात आज विविध स्तरातून देणगीचा येत असताना लहान मुले आपले बचतीचे पैसे राम मंदिर निर्माणासाठी देत आहेत तर दुसरीकडे रिक्षावाले हातगाडीवाले तर काही ठिकाणी चक्क भिकाऱ्यांनी आपल्या बिग मागितलेल्या पैशातून या अभियानात देणगी दिलेली आहे अशाच प्रकारे परतूर तालुक्यातील पाटोदा येथील अत्यंत वृद्धावस्थेत जवकेल असे काम करून, आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या व मोल-मजुरीतुन बचत केलेले एका वृध्द मातेने जमवलेले 500/रु.श्रीराम मंदिर निर्माण कार्यास सर्मपण केले. वृध्द माउली चे नाव सीताबाई तुकाराम झाटे असून त्या पाटोदा ( माव ) येथील रहिवासी आहेत . पती व दोन मुले अवेळी स्वर्गवासी झाले . म्हातारपणी एकटे राहून कष्ट करून पोट भरत असतांना हि प्रभू श्रीरामावरची श्रद्धा तुसभरही कमी झाली नाही. रामाचा वनवास संपला आता त्याचे घर रुपी मंदिर माझ्या जिवंतपणी पाहायला मिळेल, व माझेही कणभर योगदान यात राहील हे माझे भाग्य आहे असे गहिवरलेल्या सीताबाई यांनी सांगितले. त्यांचे हे योगदान कोटींपेक्षा मोठे असून अमूल्य आहे व इतरांना प्रेरणा देणारे आहे. असे यावेळी संकलक सुभाष अण्णा अँ...

मतदार संघातील कामे मार्च पुर्वी पुर्ण करा,डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रूरबन योजनेतील कामा वरूण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Image
परतुर (प्रतिनिधी) मतदार संघातील विकास कामे मार्च पुर्वी पुर्ण करा नसता कामचुकार पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर येथे तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.      या वेळी बबनराव लोणीकर यांनी डॉ. शामप्रसाद रूरबन योजनेत महाराष्ट्रातील केवळ 7 जिल्ह्यातील क्लस्टर चा सामावेश आहे  मोदी सरकारने केला त्यामध्ये आष्टी व परिसरातील 16 गावातील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 3 कोटी 25 लक्ष  रुपयांचा निधी दिला रुपयांचा निधी दिला या क्लस्टर मधील शाळाखोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय सुशोभिकरण, आष्टी शहरातील अंगणवाडी बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, शहरांतर्गत सिमेंट रस्ते, वीज वितरण कंपनीचे खांब बदलून बंच केबल टाकण्याची कामे त्याच बरोबर या क्‍लस्टर मधील अंगणवाडी इमारतीची कामे त्वरेने पूर्ण करा असे ठनकावतानाच विलंबास कारणीभूत ठरणार्‍या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले ================================ *वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना...

सर्वसामान्यांना दिलासा देत आत्मनिर्भर भारत घडवणारा अर्थसंकल्प -भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया

Image
जालना(प्रतीनीधी) कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देत आत्मनिर्भर भारत घडवणारा अर्थसंकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात अर्थ मंत्री निर्मला सीतारामन जी यांनी मांडला असून नक्कीच प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती या अर्थसंकल्पाचे स्वागत करेल अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे  कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शेतकरी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात बारकाईने विचार करण्यात आला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीची तरतूद 30,000 कोटींवरून वाढवून 40,000 कोटी रुपये केली आहे. सूक्ष्म सिंचनासाठीची तरतूद दुप्पट केली आहे. शेतीसाठीच्या कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवून साडेसोळा लाख कोटी रुपये केली आहे. ग्रामीण भागातील प्रॉपर्टीची मालकी स्पष्ट करणारी स्वामित्व योजना देशभर लागू केली आहे. पिकांच्या बाबतीत मूल्यवर्धन व निर्यातीसाठीची ‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’ योजनेचा विस्तार करून ती आता 22 पिकांना लागू केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करता यावी या...