तळणी येथील सकल मराठा समाज बांधवाचे साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात
तिनिधी | तळणी( रवि पाटील) मंठा तालूक्यातील तळणी येथे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली होती याच साखळी उपोषणाचे रुपांतर आज मंगळवार पासून आमरण उपोषणात करण्यात आले आहे नानासाहेब खंदारे याच्या नेतृत्वात हे आमरण उपोषण आज पासून सुरू करण्यात आले तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग या उपोषणात राहणार आहे अंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या . मराठा आरक्षणाच्या या लढाई ला व मनोज जरांगे याना पाठबळ मिळावे या हेतुने सकल मराठा समाज या आंदोलनात सक्रीय झाला असल्याचे उपस्थित मराठा बांधवानी सांगीतले आहे तळणी परीसरातील तळणी वडगाव शिरपूर कोकंरबा देवठाणा उस्वद कानडी इंचा टाकळखोपा वाघाळा लिबंखेडा दुधा सासखेडा किर्ला हनवतखेडा व आणखी अन्य गावांचा सहभाग या साखळी उपोषणाला राहणार आहे सुरवातीला छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे एक मराठा कोटी मराठाच्या जयघोषाने बस स्टँन्ड परीसर दुमदुमून गेला या आमरण उपोषणा सदर्भात जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले आहे काल सोमवार रोजी मंठा तहसीलदार रुपा चिञक यान