शिवसेनेच्या मेळाव्याला अधिक संख्येने उपस्थित राहा - मोहन अग्रवाल
परतूर (प्रतीनीधी): आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे करण्यात आले आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, बुलडाणा जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, रामेश्वर नळगे, उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी केले. शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्ह...