देशात २२ जानेवारीला रामराज्य स्थापन होईल- ह.भ.प.रुपालीताई सवने
प्रतीनीधी समाधान खरात भोकरदन - देशातील तरुणांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्यावा. देशाने आपल्यासाठी काय केले हा विचार केल्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, हा विचार तरुणांनी करावा. तसेच २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन होत आहे. त्या दिवसापासून देशात रामराज्य स्थापन होईल, असे प्रतिपादन ह.भ.प. रुपालीताई सवने यांनी केले. भोकरदन शहरात स्व.भिकनराव श्रीनिवासराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त लक्ष्मणराव देशमुख, राम देशमुख यांच्या वतीने ह.भ.प.रुपालीताई सवने परतुरकर यांचे किर्तणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या किर्तनात विष्णु महाराज सास्ते, गोरक्षनाथ महाराज, शंकर महाराज साबळे, सोमनाथ महाराज सहाने, दत्ता महाराज, नितीन महाराज, संतोष महाराज, साहेबराव बारोकर, प्रभाकर तळेकर यांच्यासह नागेश्वर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्यांना सहकार्य केले. पुढे बोलतांना रुपालीताई सवने म्हणाल्या की, नव्या वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. 500 वर्षानंतर राममंदिर लोकार्पणाचा हा अविस्मरणीय प्रस