Posts

Showing posts from February, 2022

परतूर तालुक्यात 4 हजारांवर बालकांनी घेतली पोलिओ लस

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  दि.२८ - तालुक्यात रविवारी (दि.27) राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत एकूण 4 हजार 318 बालकांनी पोलिओ लस घेतल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.ज्ञानेश्वर नवल यांनी दिली.      पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात अधिक माहिती देताना डॉ.नवल यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यात रविवारी (दि.27) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 4 हजार 318 बालकांना लस देण्यात आली.यामध्ये 5 वर्षांच्या आतील 4 हजार 247 तर 5 वर्षांच्या वरील 72 बालकांचा समावेश आहे.ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या 27 केंद्रावर बालकांना लस देण्यात आली.यासाठी एकूण 70 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. -----------------------------    पोलिओ लसीकरणासाठी एका मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली होती.या टीमने शेतात, वीटभट्टीवर काम करणा-या मजुरांची मुले तसेच रस्त्याच्या कडेला छोटासा निवारा (पाल) करून राहणा-यांची मुले अशा एकूण 38 मुलांना पोलिओ लस दिली. -----------------------------

परतुर न्यायालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे दिनांक 28/ 2/ 2022 रोजी तालुका विधी सेवा समिती परतुर वकील संघ परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने वकील संघ हॉल परतूर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सदरील शिबिरांमध्ये माहितीचा अधिकार कायदा 2005 , महाराष्ट्र राज्य नागरी सेवाअधिकार 2015 ,अपघात प्राधिकरण हे विषय ठेवण्यात आले होते          .सदरील कार्यक्रमास ए. जी.चव्हाण अध्यक्ष तालुका वकील संघ ,यांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 या विषयावर सखोल माहिती सांगितली .तसेच विधिज्ञ श्री .एस. जी. देशपांडे यांनी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिकार 2015 या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विधिज्ञ श्री. दराडे यांनी अपघात प्राधिकरण या विषयावर माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. श्रीमती .पी. एम .कोकाटे दिवाणी न्यायाधीश क स्तर परतुर, तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतुर ,यांनी मराठी भाषा गौरव दिन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा वि .वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यां

छत्रपती संभाजी राजे यांच्या अमरण उपोषणाला मंठा मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा

Image
 मंठा प्रतिनिधी सुभाष वायळ /पप्पू घनवट  दि.२८ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने अनेक जणांनी वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत. तरीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसून हा प्रश्न सतत प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये विविध मराठा सामाजिक संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.        आता यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या सुद्धा पूर्ण व्हाव्यात यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणाला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्य व तेथील जनतादेखील पाठिंबा दर्शवित आहे. या आमरण उपोषणाला मंठा तालुक्यातील मराठा समाजाच्या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.या पाठिंब्याची निवेदन मंठा तहसीलदार व मंठा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ,शिवाजीराव जाधव, एकनाथराव काकडे, शिवाजीराव देशमुख, वैजनाथराव मोरे दिगंबर बोराडे, कुलदीप बोराडे, सचिन बोराडे, शत्रुघन तळेकर, शरद बाहेकर, आद

चोरीला गेलेली बेलोरा गाडी चा शोध लावला पोलीसानी

Image
तळणी : प्रतिनिधी रवि पाटील  तळणी येथील चोरीला गेलेल्या बोलेरो गाडीचा शोध लावण्यात मंठा तळणी पोलीस प्रशासनाला यश आले असून पूणे जिल्हातून ही गाडी ताब्यात घेऊन गाडी मालक शिवाजी राऊत यांच्याकडे ती सूपूर्द करण्यात आली जलद गतीने तपास करून व सी सी टी व्ही फुटेजचा आधारावरून गाडीचा शोध लावण्यात आला असून या कामगीरी मुळे मंठा तळणी पोलीसांचे कौतूक होत आहे दि २२ २ २०२२ रोजी तळणी येथील कांपड दुकान बँक व बोलेरो चोरी प्रकरणी विविध कलमाखाली मंठा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्या पासून पोलीसांच्या विविध प्रकारच्या यंञणा कामाला लागल्या होत्या सराईत गुन्हेगारानी गांडीची नंबर प्लेट बदलल्याने पोलीसांसमोर या गाडीचा शोध लावणे कठीण होते               मंठा तालुक्यातून एकाच दिवशी दोन बोलेरो गाडीची चोरी झाल्याने गुन्हे दाखल झाले होते पोलीसाच्या जलद तपासाने व सीसी टीव्ही फुटेजची मोठी मदत झाली असुन चोरट्याना सुध्दा लवकरच अटक करण्यात येईल गाडी मालंकाना गाडी सुपूर्द करण्यात आली असल्याची प्रतिक्रीया मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दील सदरील कार्यवाही ही मा पोल

बरबडा प्रकल्पासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी 350 कोटी रुपये निधी दिल्यास चांदीचा रथ देऊन सत्कार करू - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांच्या हस्ते आकणी येथील पुलाच्या कामाचे उद्घाटन

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  बरबडा प्रकल्पाचे काम मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या मंत्रिपदाच्या काळात बरबडा आणि केंधळी गावातील लोकांच्या जमीन आणि घराचा मावेजा त्यांना उपलब्ध करून दिला परंतु माकणी गावातून लोकांनी पुढाकार न घेतल्यामुळे व अंतर्गत विरोधामुळे या गावातील लोकांना मावेजा मिळाला नाही तसेच गावाचे पुनर्वसन देखील रखडले असून पालकमंत्री राजेश टोपे यांनी बरबडा प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्यास त्यांचा चांदीचा रथ देऊन सहकुटुंब सत्कार करू असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले आकणी येथे बळीराजा कृषी संजीवनी योजने अंतर्गत येणाऱ्या बरबडा प्रकल्पाला लगतच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सभापती संदीप भैय्या गोरे सभापती रंगनाथ येवले भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे उपसभापती राजेश मोरे उपसभापती नागेश घारे माजी उपसभापती अंकुशराव कदम जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे माजी सभापती संभाजी खंदारे संचालक विठ्ठलराव काळे निवास देशमुख सरपंच सोपान वायाळ गणेश चव्हाण

श्रेया आर्दड हीच एमबीबीएस साठी निवड

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे घनसावंगी तालुक्यातील रहिवासी आणि सध्या जालना येथे स्थायीक असलेले दत्तात्रय आर्दड यांची कन्या व भा.ज.पा युवा मोर्चा चे माजी जिल्हा अध्यक्ष सुनिल आर्दड यांची पुतणी श्रेया दत्तात्रय आर्दड यांची एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल तीचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना भाजपा युवा मोर्चा घनसावंगी तालुका सरचिटणीस रामा पाटील खांडे , सोबत वडील दत्ताञय आर्दड , आई उमाताई आर्दड शिवकन्या खांडे नम्रता खांडे आदी दिसत आहेत .

संत रविदास नगर परतूर येथे सिमेंट काँक्रेट रस्त्याचे उद्घाटन

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे  परतूर शहरातील संत रविदास नगर येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे  यांच्या कडून विशेषनिधी द्वारेमंजूर करून आणलेल्या  सिमेंट रस्त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोबत उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड तालुकाप्रमुख अशोकराव आघाव शहर प्रमुख विदूर जईद शिवसेना युवा नेते महेश नळगे सुदर्शन सोळंके,बाळू गाते, संदीप पाचारे, दिपक हिवाळे, विकास खरात, संदीप शिंदे ,सुरेश पाटील, रामा घाडगे ,सुंरूग पाटील, बाजीराव गोरे, परमेश्वर पाचारे, व्यंकटेश सरकटे, अशोक गांगुर्डे, बालाजी कांबळे, कैलास सर्जे, शिंदे संतोष, व कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते        सदरील रस्त्याचे काम मोहन अग्रवाल यांनी मा.नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधी द्वारे मंजूर करून आणल्याचे सांगितले 

गाडगेबाबांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजीविरुद्ध समाज प्रबोधन केले.-.अॅड महेंद्रकुमार वेडेकर

Image
परतूर प्रतिनिधी  हनुमंत दवंडे लोकांना सांगण्यापूर्वी स्वतः कृती केली व त्यातून सामाजिक प्रश्नांचा विचार गाडगेबाबांनी पुढे नेला असे प्रतिपादन अॅड महेंद्रकुमार वेडेकर यांनी केले. परतूर तालुक्यातील लिंगसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते.            लिंगसा येथील सरपंच व गावकरी यांच्या वतीने गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. पुढे ते म्हणाले गाडगे बाबांनी आपल्या सहज सोप्या सवांदाने समाजाची मने प्रवर्तित केली लोकांच्या मनातील अज्ञान ,अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड, आदी समाजविघातक बाबीवर त्यांनी सडकून टीका केली. मायबाप शिक्षण हीच तुमच्या विकासाची व प्रगतीची गुरुकिल्ली आहे घरातील भांडे कुंडे विकून शिक्षण घ्या असा उपदेश ते करत असत गाडगेबाबा नी नुसते विचार सांगितले नाही तर कृतीशीलताही अंगी मानवली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याची नोंद घेतली .बाबासाहेब गाडगे बाबांचे किर्तन ऐकायला आवर्जून जात असतं तसेच त्यांच्याबरोबर सल्लामस

परतूरला रविवारी माजी सैनिकांचा मेळावा ...

= परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर,दि.२५ - शहरात रविवारी (दि.२७) माजीसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजीसैनिक संघटनेच्या वतीने देण्यात आली.    याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे की, शहरातील वरद विनायक मंगल कार्यालयात रविवारी मराठवाड्यातील माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता महादेव मंदिर चौक ते वरद विनायक मंगल कार्यालय या मार्गावर माजीसैनिकांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.   मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन माजीसैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत राखे,सचिव तुकाराम उबाळे तथा उपाध्यक्ष प्रकाश हिवाळे यांनी केले आहे.

गुरुजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर सांभाळा.. -माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे : शंभू महादेव विद्यामंदिरात १२ वीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण नि रोप

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  शाळा-महाविद्यालयात शिकत असताना गुरुजनांनी दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर सांभाळा असे प्रतिपादन परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांनी केले.     तालुक्यातील वाटूर येथील शंभू महादेव विद्या मंदिरच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्यानिरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.अदबने हे होते.       या प्रसंगी बोलताना डाॅ.भगवान दिरंगे म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर खरे संस्कार होत असतात. पुस्तकातील ज्ञानाबरोबर जीवन जगण्यासाठी आवश्यक ते मूल्य शिक्षण शाळेत मिळते.त्या दृष्टीने शंभू महादेव विद्या मंदिरातील विद्यार्थी भाग्यवान आहेत. या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवनात आवश्यक असणारी मूल्ये शिकवली, या विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी शिस्त तर वाखाणण्याजोगी आहे. गुरूजणांनी दिलेली संस्काराची शिदोरी पुढील आयुष्यात कामी येत असते. असे ते शेवटी म्हणाले.         अध्यक्षीय समार

मंठा तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणासाठी १६० लसीकरण केंद्र

मंठा प्रतिनिधी / सुभाष वायाळ             दि.२५ मंठा तालुक्यात दिनांक २७ फेब्रुवारी रविवार रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. यासाठी तालुक्यामध्ये १६० लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली या ठिकाणी तालुक्यातील १८ हजार ९३० या पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना मोफत पोलिओ डोस दिला जाईल. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुकेश मोटे यांनी सांगितले आहे.        पल्स पोलिओ लसीकरणासाठी तालुक्यात एकूण १६० लसीकरण बुथ उभारण्यात आले आहेत. सर्व लाभार्थी ना लस मिळावी यासाठी एसटी स्टँड,बांधकामाची ठिकाणी, रस्त्यांची कामे,ऊसतोड कामगार,वीटभट्ट्या,वाड्या इत्यादी ठिकाणाच्या लसीकरणासाठी ०७ मोबाईल पथक,०७ ट्राजिस्ट टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. असे तालुका नर्सिंग ऑफिसर अर्जुन हमिर्गे यांनी सांगितले.  या लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून ०६ वैद्यकीय अधिकारी,३३ सुपरवायझर ४३६ आरोग्य कर्मचारी,एन.एम.एम,एम.पी.डब्ल्यू, अंगणवाडी,गटप्रवर्तक,अशा इत्यादी स्वयसेवक परिश्रम घेणार आहेत.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना विकास रत्न पुरस्कार जाहीर,सोनार सेवा महासंघाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत परभणी येथे दिला जाणार पुरस्कार,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकासकामा बद्दल वाढदिवसाचे औचित्य साधून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिला जाणार पुरस्कार

Image
प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे    सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना विकास रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार दिनांक 02 मार्च रोजी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री हरी मंगल कार्यालय परभणी येथे दिला जाणार असल्याची माहिती सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला दिला जातो यावर्षी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार यांना विकास रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्यांनी केलेल्या परभणी लोकसभा मतदार संघातील विकास कामांबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात येणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे     पुढे या पत्रकात म्हटले आहे की माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी गेल्या सहा सात वर्षांमध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये पाणीपुरवठामंत्री पदाचा भार सांभाळताना राज्यात यापूर्वी कधीही माहित नसलेल्या खात्याला नवसंजीवनी देत रा

ओबीसींच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना "संघर्षयोद्धा लोकनेते गोपीनाथराव मुंडे पुरस्कार-२०२२" जााहीर,लोकनेते गोपीनाथराव मुंडे विचारमंच, महाराष्ट्र' प्रदेशाध्यक्ष देवेंद्र बारगजे, माजी आमदार तोताराम जी कायंदे व विकास पालवे यांची माहिती

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  गेली ३५ वर्ष ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावरची लढाई लढत ओबीसींच्या आरक्षणात सह इतर न्याय मागण्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे तसेच वंजारी बंजारा माळी धनगर तेली साळी कोळी यांच्यासह तमाम ओबीसींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडून तमाम ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे सर्वसामान्य गोरगरीब व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी गावपातळीपासून राज्य स्तरापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करत आपल्या राजकीय सामाजिक धार्मिक कार्यातून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटविणारे अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन गावातील सरपंच ते राज्याचे कॅबिनेट मंत्री पदापर्यंत वाटचाल करणारे स्वतःला "मी जो काही आहे तो गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे आहे" असे छातीठोकपणे भरसभेत सांगणारे परतुर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे विचारमंच महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा *"संघर्षयोद्धा गोपीनाथराव मुंडे पुरस्कार-२०२२"* जाहीर करण्यात आला ओबीसींच्या प्रश

परभणी महानगर भाजपने केली नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी...

Image
परभणी प्रतिनिधी / हनुमंत दवंडे  महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना काल ED नी अटक केली त्यांच्यावर 1993 साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम यांच्या जमीन देवाण घेवाण प्रकरण मध्ये नवाब मलिक यांचे हात असून त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी दिली आहे या प्रकरणी आज परभणी भाजपा महानगरच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नवाब मलिक यांचा मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा व त्यांच्या वर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. यावेळी एन. डी. देशमुख,संजय रिझवानी, अतिक पटेल, दिनेश नरवाडकर, कमलकिशोर अग्रवाल,प्रदीप तांदळे,शकुंतला मठपती,छाया मोगले,विजया कातकडे,विजय गायकवाड,संजय कुलकर्णी,संतोष जाधव,रामदास पवार, अनंता गिरी, संदीप शिंदे, दीपक शिंदे, नीरज बुचाले, माऊली कोपरे व मोहम्मद गौस आदीच्या स्वाक्षरी आहेत....

दैठना येथे गॅसचा भडका, घर जाळून खाक घरासह संसार उपयोगी साहित्य नगदी दोन लाख रुपये रक्कम जळून खाक

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे  तालुक्यातील दैठना खुर्द येथे दत्ता विष्णु सवने यांचे घरी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याची आईने गॅस पेटवला असता गॅसचा भडका झाल्याने घरातील संस्कार उपयोगी साहित्य व नगदी रोख रक्कम जाळून खाक झाल्याची घटना दि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली आहे. या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शेतकरी दत्ता सवने यांच्या आई सकाळी घरी आठ वाजेच्या सुमारास चहा करण्यासाठी गॅस पेटवित असतांना अचानक भडका झाल्याने आगीने रोद्ररूप धारण करून लाकडी माळवद असल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. ग्रामस्थांनी आग विझविन्यासाठी अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आले. अग्निशामक व गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणली. गॅस टाकीचा विस्फोट न झाल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरासह घरातील एक किंट्टल गहू, ज्वारी, किराणा, कपाट, कपडे, लोखंडी टीन पत्रे, व नगदी रोख रक्कम दोन लाख तीन हजार रुपये जाळून खाक झाले. असा अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी अनिल पारिख, फायरमन अमित कनाके, प्रशिक्षणार्थी सुनील काळे, संदीप हिवाळे, तसेच गावाती

ऑस्ट्रेलियातुन सेवा पूर्ण करून आलेल्या अभियंत्यांचा परिवारा कडून सत्कार

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे  ऑस्ट्रेलिया येथे सहा वर्ष संगणक अभियंता म्हणून काम करत परतूर येथील सुपुत्र भारतात परतल्यावर त्यांचा कुटूंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.     परतूर येथील भगीरथ भारतराव केशरखाने ये ऑस्ट्रेलिया येथील सिडनी शहरात इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून मागील सहावर्ष पासून काम करत होते. दि 19 रोजी सहा वर्षे पूर्ण करून सपत्नीक ते भारतात परतले या बद्दल बरीदे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भगीरथ यांनी अंबाजोगाई येथून आपले अभियंता चे शिक्षण पूर्ण केले आहे. परतूर येथील बरीदे परिवाराचे ते भाचे आहेत. परतूर येथे पोहचल्यानंतर गटविकास अधिकारी नारायण बरीदे व पत्नी प्रभावती बरीदे यांनी त्यांचा सत्कार केला या वेळी सहाशिक्षक रमेश बरीदे, सोनुभाऊ बरीदे,पांडुरंग कानपुडे,बाळू धारूकर, लक्ष्मीकांत माने,नागेश केशरखाने , श्रीमती शोभा बरीदे,सकाळ चे तालुका बातमीदार योगेश बरीदे आदी उपस्थित होते. ..

परतूर येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मंदाताई लोणीकर यांच्या विविध ठिकाणी भेटी

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे      दि 23 बुधवार रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शहरात विविध भागात गजानन महाराज यांचे विविध ठिकाणी पारायण ठेवण्यात आले होते यासोबतच बऱ्याच ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या पारायणाच्या ठिकाणी व भंडारा च्या ठिकाणी माजी मंत्री बबनरावजी लोणीकर यांच्या सुविद्य पत्नी मंदाताई लोणीकर यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या व भंडार यांचा आस्वाद घेतला       यावेळेस त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश चव्हाण,नगरसेवक कृष्णा आरगडे, नगरसेवक प्रवीण सातोनकार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

मतदार संघात 200 च्या वर मंदिरांना सभामंडप देऊन परमेश्वराची सेवा केली,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माझ्यायावर पांडुरंगाची कृपा त्यामुळेच मी मंत्री झालो,परमार्थ आश्रम सोयंजना येथे सभामंडपा साठी 15 लक्ष रुपयाचा निधी

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे  मी गेली 35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून समाज सेवेबरोबरच ईश्वरी सेवेला वाहून घेतल्यानेच मंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला केवळ पांडुरंगाचे कृपा आशीर्वादामुळे इथपर्यंत मजल मारता आल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते परमार्थ आश्रम सोयंजना ता परतुर येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित द्वि दिवशीय किर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या वेळी ह भ प रामराव महाराज ढोक, ह भ प भागवताचार्य हरिदास जी महाराज बद्रीनारायण ढवळे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, अशोकराव बुरकुले प्रदीप कुमार लड्डा, विक्रम माने सुरेश सोळंके नितीन जोगदंड संपत टकले शत्रुघन कणसे ओमप्रकाश बोरकर गजानन काळे श्यामसुंदर काळे केशव ढवळे विष्णू ढवळे यांची उपस्थिती होती   पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी मतदार संघाचा विकास करत असताना वाड्या-वस्त्या तांडे अशा 200 गावांमध्ये विविध मंदिरांसमोर सभामंडप बांधकाम केले तीर्थक्षेत्र विकास च्या माध्यमातून दैठणा गंगाभारती महाराज संस्था

छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय - प्रा.सहदेव मोरे पाटील

Image
प्रतिनिधी हनुमंत दवंडे  छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्व जाती-धर्माच्या सर्वसामान्य माणसासाठी होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही उलट शिवरायांच्या काळात आया बहिणीचे रक्षण आणि गोरगरीब शेतकरी शेतमजूर इत्यादींच्या कल्याणासाठी काम करणारा राजा म्हणून शिवकल्याणरजा अशी उपाधी मिळाली होती त्यामुळे आपणही शिवरायांच्या विचारांची पाईक बनवून त्या विचारांना साजेशी शिवजयंती साजरी करावी कारण छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे असे प्रतिपादन निपाणी पोखरी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी शिवव्याख्याते प्रा सहदेव मोरे पाटील यांनी केले यावेळी पोखरी निपाणी ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विलास मोरे यांना शिवछत्रपती ग्रामविकास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रा रंगनाथ खेडेकर भाजपा जालना तालुकाध्यक्ष प्रकाश टकले गजानन उफाड बाबुराव खरात कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार नारायण मगर

परतूर ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर ग्रामीण रुग्णालय येथे परिसरातील स्वच्छता करून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कृष्णा आरगडे नगरसेवक यांनी सांगितले की,              महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांची आज२३ फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली. गाडगेबाबा यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.  गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्

एसटी अहवालावर कोर्टात काय झालं?

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे एसटीच्या अहवालावर सुनावणी एसटीच्या अहवालावर सुनावणी पार पडल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर आगपाखड केली आहे. कोर्टाने आजही एसटी कर्मचाऱ्यांना तरीख पे तारीख देत सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातलं वातावरण पुन्हा तापलं आहे. कोर्टातील सुनावणीवर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते सरकारवर भडकल्याचे दिसून आले. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा नाही. राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, असा थेट आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर केला आहे. आम्ही न्यायलयाला सांगितलं ही संपाची याचिका नसून दुखवट्याची आहे. आम्ही सांगितलं आमचा फंडामेंटल राईट आहे की रिपोर्ट वाचायला मिळणं. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाला आम्हाला रिपोर्ट देण्याचे आदेश दिल्याचेही सदावर्ते यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रशासन आज उगडे पडले. न्यायालयाने आता सर्व हरलं आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांची अहवालावर साक्षरता नव्हती, त्यावरून त्यांनी सव

डाँ .गोपाल तुपकर यांना सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार जाहीर

Image
 मंठा-प्रतिनिधी / सुभाष वायाळ       दि.22 मराठी साहित्य मंडळ तर्फे साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्याला दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार यावर्षी मंठा येथील डॉ.गोपाळ विठोबा तुपकर यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ.गोपाल तुपकर यांचे अंतरीचे शब्दफुले हा काव्यसंग्रह व इतर अनेक काव्य व लेख प्रसिद्ध झालेले आहेत.साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार त्यांना वितरण केला जाणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळाचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवड झाल्याचे कळवले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे प्रा.सतीश वैद्य, संजय भवर, मुरलीधर बोराडे, सुभाष वायाळ, भीमाशंकर तुपकर, व शैक्षणिक क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील सर्वाकडून अभिनंदन होत आहे.

तळणी येेथे एकाच रात्री एक बोलेरो गाडी बॅंक व कापड दुकानावार धाडसी चोरी

Image
मंठा प्रतिनिधी / रवी पाटील             तालूक्यातील तळणी येथे एकाच रात्री चोरट्यानी एक बोलेरो गाडी बॅंक व कापड दुकानावार धाडसी चोरी केल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यात भितीचे वातावरण आहे तळणी हे मोठी बाजारपेठ असल्याने येथे मोठी आर्थीक ऊलाढाल असते तळणी येथे गेल्या दोन ते तीन महीन्यापासून सतत चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तळणी पोलीस चौकीचे . कर्मचारी कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत गैरहजर राहत असल्याची प्रतिक्रीया व्यापाऱ्यानी मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमूख यांच्या समोर व्यक्त केली आज सकाळी तीनच्या सुमारास झालेल्या तीन ठिकाणच्या एका चोरीमध्ये तळणी व परीसरातील नितीन सरकटे यांची  प्रसीध्द बँक मंठा ग्रामीण को ऑप क्रेडीट सोसायटीचे शटरचे लाँक तोडून तिजोरीला छेडछाड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला बॅंकेमधील सीसी टीव्हीचे पूर्णपणे नुकसान करून चोरट्यानी डीव्हीआर पळवून नेला बॅंकेच्या बाजूलाच माऊली कापड केद्रातील नवीन कापडाची अंदाजे  एक लाखाची चोरी व दहा हजाराची नगदी रोकड चोरट्यानी लंपास केली आहे जनार्धन आडळकर यांच्या मालकीचे हे कापड दुकान असुन सहा

श्रद्धा वायाळ हिने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पटकावले प्रथम पारितोषिक

Image
परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे      जालना जिल्ह्यातील तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन द ग्लोबल गुरुकुल इंग्लिश स्कूल जालना येथे भरवण्यात आले होते या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम, टेबल टेनिस,बुद्धिबळ,कराटे,स्केटिंग, आर्चरी व बॅटमिंटन या स्पर्धेचे आयोजन केले होते या विविध स्पर्धा करिता जिल्ह्यातून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये परतूर येथील श्रद्धा नामदेव वायाळ या विद्यार्थिनीने बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले या स्पर्धेचे वितरण अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले   या स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावलेली श्रद्धा नामदेव वायाळ या विद्यार्थिनीला अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले पारितोषक मध्ये मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले होते     या यशाबद्दल तिचे कौतुक आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर कपिल आकात नितीन जेथलिया बॅडमिंटनचे जिल्हा सचिव नागोजी चिखलकर माजी उपनगराध्यक्ष संदीप बाहेकर न

मंठा पोलीस ठाणे येथे विद्यार्थ्यांने जाणून घेतले पोलीस कामकाज

Image
 मंठा प्रतिनिधी / सुभाष वायळ        दि.21 तालुक्यातील पांगरी गोसावी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच मंठा पोलीस स्टेशनला भेट दिली.यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना पो.नि.देशमुख यांनी केले.या भेटीत विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज कशाप्रकारे चालते याविषयीची माहिती घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख,पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष रणजित बोराडे,मुख्याध्यापक के.के. भांडवलकर,फौजदार बलभीम राऊत,आसमान शिंदे यांची उपस्थिती होती.      या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गुन्हा कसा दाखल होतो, ठाणे अंमलदाराचे कार्य, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग कसा केला जातो, समाजामध्ये शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस कशाप्रकारे काम करतात आदीबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करावा याविषयी देखील माहिती दिली.मोबाईल वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील सांगितले. महिला पोलीस क

सातोना येथील यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये विक्रमी 172 रक्तदान

Image
परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे      सातोना येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त यश अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परतूर व बाजीराव पाटील आकात बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सातोना खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. श्री ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांच्या शुभहस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व ज्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे चळवळ खऱ्या अर्थाने सुरू करून दिली असे स्वर्गीय महेश भाऊ सितारामजी आकात व दत्तात्रय सितारामजी आकात यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.               यावेळी श्री ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांच्यासह परिसरातील 172 जणांनी रक्तदान केले.  दरम्यान यश प्रा .व मा. विद्यालयाचा माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर भागवतराव आकात याने वैद्यकीय पूर्वपरीक्षेत(एमबीबीएस) घवघवीत यश संपादन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पालकांसह गौरविण्यात आले.

पोलिसांना हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल...

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे दिनांक18/ 2/ 2022 रोजी प्रकाश सूर्यकांत ढवळे रा.कोकाटे हादगाव याने पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून देत असलेली माहिती ही खोटी आहे. याची त्याला पूर्ण माहिती असतानासुद्धा त्यांनी या क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती दिली .म्हणून त्याच्या विरुद्ध पोलिस ठाणे आष्टी एन. सी. आर. नं 44/ 2022 कलम 182 भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरील कारवाई मा. श्री. विनायक देशमुख पोलीस अधीक्षक साहेब जालना ,मा. श्री. विक्रांत देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक जालना, तसेच श्री .राजू मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवाजी नागवे , सपोनि तथा प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे आष्टी, मुं ढे कॉन्स्टेबल ,राठोड साहेब, यांनी ही कारवाई पार पाडली. शिवाजी नागवे तथा प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे आष्टी यांनी आव्हान केले आहे की अशा प्रकारे प्रशासनास खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्यास अशाच प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

छत्रपती शिवरायांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जीवनातील सर्वोच्च आनंद झाला- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार बबनराव लोणीकर यांना ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार करण्यात आला प्रदान

Image
परतूर  प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे  छत्रपती शिवरायांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने आपण कृतार्थ झालो असून मिळालेल्या पुरस्कारामुळे आपणास जीवनातील सर्वोच्च आनंद झाला असून आज हा पुरस्कार हिंदुत्ववादी विचाराचे पुरस्कर्ते समाजातील प्रत्येक व्यंगावर भाष्य करणारे ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते मिळाला हे माझे भाग्य असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले     ते अकोली येथील मातोश्री सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या शिवछत्रपती पुरस्कार वितरण समारंभा प्रसंगीबोलत होते   पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, संस्कार हे माता-पित्याच्या शिकवणीतून मिळत असतात या संस्काराला साजेशी क्या संस्काराला साजेशे काम आजच्या युवा पिढीने करणे गरजेचे असून आज अकोली च्या तुकाराम सोळंके अध्यक्ष असलेल्या मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने जो गौरव केला त्याबद्दल आपण त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो गेल्या  35 वर्षांमध्ये राजकीय पटलावर काम करीत असताना जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असून आज या पुरस्काराने अकोलीक

विलास आकात यांच्याकडून सुमेध घनघावला उपचारासाठी आर्थिक मदत

Image
    परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे   येथील सुमेध राजु घनघाव रा. परतूर (वय १९) याला आठ महिन्यापूर्वी अपघातात डोक्याला मार लागल्याने जखमी झाला होता. त्याचा उपचारासाठी सातोना     येथील भाजपाचे विलास आकात यांनी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली आहे.        सुमेध घनघाव हा नातेवाईक सोबत परतुर ते आष्टी रोडवर एचपी पेट्रोलपंपच्या समोर पुलाजवळ गाडी खड्ड्यात जावुन गाडीवरील ताबा सुटल्याने दि. २६ जून २०२१ रोजी अपघात झाला होता. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सुमेध हा बेशुद्ध झाला. दवाखान्याला मोठा खर्च लागल्याने घरची शेती, ट्रॅक्टर, प्लॉट विकून, नातेवाइकाकडून पैसे आणून दवाखाना खर्च केला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिति बिकट असल्याने समाजातून आर्थिक मिळाली. सध्या त्याच्यावर औषध उपचार चालु आहे. जवळ असलेली आर्थिक पुंजी संपली असल्याने कुटुंबासमोर आर्थिक अडचणीचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या औषध उपचाराचा खर्च मोठा असल्याने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना छत्रपती गौरव पुरस्कार जाहीर,मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे च्या वतीने ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार,मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे तुकाराम सोळंके यांची माहिती

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे   भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोली ता परतुर च्या वतीने छत्रपती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आष्टी ता परतूर येथे ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे पुरस्काराचे हे प्रथम वर्ष असून यापुढे दरवर्षी मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोली च्या वतीने राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम सोळंके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे     पुढे या पत्रकात म्हटले आहे की माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी गेल्या सहा सात वर्षांमध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये पाणीपुरवठामंत्री पदाचा भार सांभाळताना राज्यात यापूर्वी कधीही माहित नसलेल्या खात्याला नवसंजीवनी देत राज्यभरामध्ये 18000 गावामध्ये पाणीपुरवठा योजना केल्या त्याच बरोबर राज्यात 70 लाख शौचालय बांधून स्वच्छतेच्या बाबतीत देशात महार

उद्या शिवरायांच्या विचारांच सरकार सत्तेत येईल, त्यावेळी सगळा हिशोब चुकता करू - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा राज्य सरकारला इशारा,पक्ष पाहून पुतळ्यांची परवानगी ही बाब महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारी - लोणीकर,वाटुर फाटा येथील रास्ता रोको दरम्यान तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक बंद परतूर येथे शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार - लोणीकर यांचे वक्तव्य

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे  राज्य सरकार राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभा करण्यात परवानगी देत नाही म्हणुन लोक पुतळे उभे करतात.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सरकारने परवानगी दिला नाही तरी लोकच पुतळे उभारत आहे.काही दिवसांपूर्वीच बसवण्यात आले आहेत परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी सेवली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुतळा बसवला म्हणून भावनेने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु प्रत्येकाची वेळ येत असते आज बेईमान लोकांच सरकार सत्तेत आहे उद्या पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच सरकार सत्तेत येईल त्यावेळी या सर्व बाबींचा हिशोब चुकता करू असा इशारा देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिला वाटुर फाटा येथे आयोजित रास्ता रोको आंदोलन प्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर तालुकाध्यक्ष रमेश भापकर सतीश निर्वळ प्रकाश टकले गणेशराव खवणे माऊली शेजुळ संदीप भैय्या गोरे नागेशराव घारे राजेश मोरे हरिराम माने बीडी पवार रंगनाथ येवले शहाजी राक्षे बद्रीनारायण ढवळे विक्रम माने गणपतरा

जुन्या चालीरीती बंद करून समाजाने नवीन बदल स्विकारावेत – हभप इंदोरीकर महाराज दैठण्यातील गुरु गंगाभारती महाराज संस्थानात संपन्न झाला कीर्तनाचा कार्यक्रम आ. लोणीकरांची उपस्थिती

Image
परतूर प्रतिनिधी / हनुमंत दवंडे      समाजाने जुनाट झालेल्या समाजविघातक प्रथा, चालीरीती बंद करून नवीन बदल स्विकारावेत. मुलीच्या लग्नाला कर्ज काढून उधळपट्टी करण्यापेक्षा कमी खर्चात लग्न लावा. मुलीच्या लग्नावर खर्च करण्यापेक्षा, तिच्या शिक्षणावर खर्च करा. लग्नातल्या आतष बाजी पेक्षा गावची शाळा अधिक सुविधा संपन्न, डिजिटल कशी होईल याकडे लक्ष द्या असे आवाहन हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे. गुरु गंगाभारती महाराज यांची पुण्यतिथी व माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सायंकाळी परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द येथील गुरु गंगा भारती महाराज संस्थानात आयोजित कीर्तनात ते बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले यांच्यातीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.          जुन्या काळात आपल्या मुलीचे लग्न बापाने किती थाटामाटात केले यावर बापाची पत ठरवली जायची, आता काळ बदलला आहे. असा अमाप आणि निरुपयोगी खर्च करणाऱ्या बापाला आज मुर्खात काढले जाईल. काळाचे पाऊले ओळखून

हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर; विद्यार्थी आंदोलनप्रकरणी झाली होती अटक.....

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे अखेर हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने विकास पाठक याला जामीन मंजूर केला. धारावीमधील विद्यार्थी आंदोलनाप्रकरणात विकास पाठक याला एक फ्रेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. अटक करून हिंदुस्थानी भाऊला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी, त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसांची वाढ करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर हिंदुस्थानी भाऊ हा न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला 30 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्थानी भाऊचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली.

मंठा पोलीस ठाणे येथे शिवजयंती निमित्त शांतता समिती बैठक संपन्न शिवजयंती शांततेत साजरी करा -पो.नि.संजय देशमुख

Image
मंठा(सुभाष वायाळ )दि.१७ मंठा पोलीस ठाणे येथे शिवजयंती निमित्त शांतता समिती बैठकीचे आयोजन दि.१७ गुरुवार रोजी करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष रंजीत बोराडे , पोहेका.शंकर राजाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजित बैठकीत पो.नि.देशमुख यांनी सांगितले की, शिवजयंती शांततेत व शासन परिपत्रकाच्या नियमानुसार तसेच कोरोनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून साजरी करावी असे आव्हान केले. याप्रसंगी डिगांबर बोराडे, शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप बोराडे , सचिन चव्हाळ , महेश बोराडे ,शुभम बोराडे , विजय बोराडे , विकास बोराडे , किरण सूर्यवंशी , कृष्णा खरात , शिवराज बोराडे , दत्ता घुगे यांच्यासह पत्रकार सुभाष वायाळ , अशफाक शेख , बाळासाहेब खराबे यांची उपस्थिती होती.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतिने आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा सांगण्यात आली.

परतूर येथील पारधी वाडा इंद्रा गिरी महादेव मंदिर येथील अतिक्रमण हटवण्यात यावे उपविभागीय अधिकारी परतूर यांना निवेदन सादर..

परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे इंद्रा गिरी महादेव मंदिर येथे कडब्याची पेंडी व कुपाटी टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. शेत गट नंबर 272 /2 मधील निजाम कालीन महादेव मंदिर असून सन 1981 पासून सदर मंदिर देवस्थानचे रामा मालू काळे हे अर्थक सेवक असून मंदिराची देखभाल व दुरुस्ती करतात व पूजाअर्चा करत आहेत. मंदिराच्या प्रवेश शंभर फूट जागा दक्षिणेस 20फूट जागा व उत्तरेस 20 फूट जागा अशी आहे सध्या सदर ठिकाणी विद्युत पुरवठा नाही तसेच सदर मंदिर परतूर शहरातील पुरातन मंदिर असून अनेक वर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला लोकांची जास्त प्रमाणात गर्दी होत असे सदर ठिकाणी इंगळा गिरी महादेव मंदिराचे समोर काही व्यक्तीनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे जेणेकरून सदर मंदिरासमोर दरवर्षी होणारी यात्रा करणे सुलभ होईल अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांना रामा मालू काळे यांनी दिले आहे.

मंठा येथे ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

मंठा -(सुभाष वायाळ )दि.१७ माहिती अधिकार कायदयाला अधिकारी कर्मचारी वर्ग महाराष्ट्रात जुमानत नसताना दिसून येत आहे.माहिती अधिकार कायद्याप्रमाणे अर्जदाराने मागितलेली माहिती देणे कर्तव्य असताना, माहिती दिली नाही म्हणून एका ग्रामसेवकावर मंठा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत थोडक्यात माहिती अशी, जनमाहिती अधिकारी तथा तत्कालीन ग्रामसेवक अनिल तुकाराम चव्हाण याने माहिती अधिकारात मागितलेली माहिती दिली नाही. याबाबत अर्जदाराने राज्य माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपीठाकडे आपला अर्ज केला आणि माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याबाबत तक्रार केली. राज्य आयुक्त औरंगाबाद यांनी सदर घटनेची दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकास वेळेत माहिती दिली नाही म्हणून सात हजार दंड आणि सात दिवसात माहिती देण्यासाठी आदेशित केले. परंतू सदर ग्रामसेवकाने राज्य आयुक्त औरंगाबाद यांच्याही आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. म्हणून येथील पंचायत समिती विस्तार अधिकारी विजयकुमार प्रल्हाद पाटील यांच्या तक्रारीवरून हिवरखेडा येथील तत्कालीन ग्रामसेवक अनिल तुकाराम चव्हाण यांच्याविरोधात मंठा पोलिसात गुन्हा दाखल केला आला आहे.

वझरसरकटे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची शाखा ओपन

Image
मंठा प्रतिनिधी( पप्पू घनवट )तालुक्यातील वाझरसरकटे येथे मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे यांच्या हस्ते   धुमधडाक्यात रॅली काढून मनसेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, योगेश खंदारे, दिपक देवकर, आदित्य केंधळे, प्रविण केधळे, ज्ञानेश्वर जाधव,शाम केंधळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वझर सरकटे शाखा कार्यकारिणी खालील प्रमाणे                 शाखा अध्यक्ष - ॠषिकेश सरकटे,उपाध्यक्ष - गोपाल सरकटे, कार्याध्यक्ष - पवन‌ सरकटे, सरचिटणीस - धनंजय सरकटे, सचिव - रवि सरकटे, सदस्य : - रवि सरकटे,पंढरी सरकटे, दत्ता सरकटे,डिगांबर सरकटे, गणेश सरकटे, ज्ञानेश्वर सरकटे,ओम सरकटे, सुदर्शन सरकटे, सोपान सरकटे,सुरज सरकटे,पंकज सरकटे, अमोल नागरे, सचिन खंडागळे, अविनाश सरकटे, दत्ता सरकटे, संतोष सरकटे, धनंजय सरकटे, योगेश सरकटे, कैलास डोंगरे,तन्मय सरकटे, अमोल सरकटे, अभिषेक पोपळघट.