Posts

Showing posts from March, 2021

परतुर विभागासाठी त्वरीत डिवाएसपींची नियुक्ती करा- काकडे

जालना जिल्ह्यातील परतुर ऊपविभागीय पोलीस  अधिकारी कार्यालय मध्ये गेली दोन महिने झाले आहे. नेहमीप्रमाणे डिवाएसपी आद्याप नेमवलेले नसल्याने सर्व कारभार भोकरदनचे डिवाएसपी ईंदलसिंग बहुरे यांच्याकडे चार्ज आसल्याने त्यांच्यावर भोकरदन विभागासह ईतर पाच पोलीस ठाणेचा भार आहे.परतुर पोलीस उपविभागीय अधिकारी श्री बांगर हे सेवानिवृत्त झाले आसुन त्यांच्या जाग्यावर नविन डिवाएसपी अद्याप का नाही? आसा सवालही मनसेचे काकडे यांनी केला आहे. म्हणुन परतुर विभागाला गृहमंत्रालयाने तात्काळ नविन ऊपविभागीय पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करावी आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी गृहमंत्रालयाचे स्वीय सहाय्यक पालांडे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. गृहमंत्रालयाचे सध्या जालना जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष आसुन याकडे गृह खात्याने लक्ष घालावे आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केली आहे. मंठा,परतुर,आष्टी तसेच सेवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रहाण्याची व्यवस्था नाही. पोलीस कर्मचारी व अधिकारी

१२ दिवसात सायकलवरुन प्रवास करत रायगडावर शिवरायांना करणार अभिवादन नागपूर येथील "धाडस" ग्रुपचा अभिनव उपक्रम

Image
प्रतिनिधी स्त्री सशक्तिकरण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची स्वामीनिष्ठा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, हागणदारी मुक्त गाव, शिवरायांच्या विचारांचा अनमोल ठेवा जपणे, नैसर्गिक साधन संपत्तीची बचत, शिवरायांच्या गडकिल्ल्यावर बद्दलची जनजागृती आणि प्रदूषणाला आळा बसवणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागपूर येथील "धाडस" ग्रुप च्या वतीने नागपूर ते रायगड शिवरायांना तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला अभिवादन करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले 20 मार्च रोजी निघालेली ही रॅली 31 मार्च रोजी रायगडावर पोहोचणार आहे 12 दिवसात 780 किलोमीटरचा पल्ला गाठत रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सायकल वर जाण्याचं धाडस तरुण तरुणींनी केलं आहे 24 मार्च रोजी मुक्काम जालना येथे होता 18 ते 24 वयोगटातील वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे, सुमित शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निंदेकर, अनिरुद्ध सोलाट, शरद आमगावकर, राज मुन्ने या 12 युवक-युवतींचा समावेश आहे जालना येथे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या

शितला माता पूजनामध्ये मारवाडी समाजाने दक्षता घ्यावी-विकासकुमार बागडी

Image
जालना : गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा साजरी होत असलेल्या शितला माता पूजेच्यावेळी मारवाडी समाजाने शासकीय नियम पाळून हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. विकासकुमार बागडी यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, मारवाडी समाजामध्ये शितला माता पुजनाला अनन्य साधारण असे महत्व आहे. हा उत्सव वर्षातून एकदाच साजरा होतो परंतू कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव साजरा करतांना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याचे कारण असे की, या उत्सवानिमित्त समाजातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती हा शितला मातेचे दर्शन या दिवशी घेतच असतो. यंदा हा उत्सव सोमवार दि. २९ मार्च २०२१ रोजी येत असून शहरात शितला मातेचे केवळ काद्राबादेतच एकमेव मंदिर असल्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. परंतू यावर्षी गर्दी करता येणार नाही, याची खबरदारी मारवाडी समाजातील प्रत्येक कुटुंबियांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी घ्यावी. दर्शनास येतांना मास्कचा वापर जरुर करा

राज्य शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत,अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान,राज्यसरकार कुंभकर्णा सारखे झोपेत -आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात

Image
प्रतिनिधी(जालना) मराठवाड्यात गेल्या चार दिवसात गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्शवभूमीवर राज्य शासन आदेशाची प्रशासन वाट पाहत आहे कि सरकार पंचनामे करण्याचे आदेश देईल, परंतु राज्य सरकार आपल्या गैरकारभरात गुंतले आहेत बलात्कार, खून, खंडणी अश्या वेगवेगळ्या प्रकरणात राज्यसरकार चे दररोज धिंडवडे निघत आहेत. अश्या परिस्थिती राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे शासन मदत करणार नाहीच परंतु प्रशासनाने वेळ न दवडता राज्यसरकार च्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ मराठवाड्यात झालेल्या शेती च्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासन दरबारी अहवाल पाठवावा. आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मागणी केली आहे. चार दिवस उलटून देखील अवकाळी पावसाने, गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ज्यावेळी राज्य सरकार आदेश देत नसेल त्यावेळी पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतात त्यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनास पाठवावा असे पत्र आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.

सिध्दार्थ पानवाले,योगेश दुबाले यांचे पीएचडी पात्रता (पेट) परिक्षेत यश.

Image
परतूर(प्रतिनिधी)  तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकतीच पेट  पात्रता परिक्षा डॉ.आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातर्फे घेण्यात  आली.शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्वपुर्ण पदवी पीएचडी मिळविण्यासाठी पेट ही पात्रता परिक्षा असते. सिध्दार्थ रामचंद्र पानवाले(इंग्रजी) आणि योगेश यशवंतराव दुबाले(फिजिक्स,मटेरिअल सायन्स) या विषयांमधुन पेट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया,मराठवाडा सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव कुणाल आकात,माजी प्राचार्य डॉ.भगवानराव दिरंगे, प्रा.मनवर,प्रा.बिडवे,एकनाथ कदम तसेच विद्यापिठातील डॉ.ह.नी.सोनकांबळे,डॉ विशाल शिरसाठ,डॉ.किशोरवाघ, ॲड.मस्के,ॲड.तथागत पाईकराव,ॲड.विष्णु ढोले,प्रा.संदीप धापसे सामाजिक क्षेत्रातील  उपनगराध्यक्ष सादेक खतीब,नगरसेवक बाबुराव हिवाळे,सिध्दार्थ बंड, प्रा.प्रविण कनकुटे,महेंद्र बनकर,सिध्दार्थ इंगळे,डॉ.प्रविण दासुद,प्रशांत दासुद,विजय वेडेकर,रमेश पाईकराव,बाबासाहेब वाघमारे,विरेंद्र सातपुते,अर्जुन शेजुळ या सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून अभिनंदन केले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी , परतुर येथे बैठक घेऊन सदस्य नोंदणी कारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मार्गदर्शन केले,

Image
प्रतिनिधी / परतुर... महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणीला आज पासून सुरुवात झाली, परतूर ९९ विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी व राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्‍या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी सहभाग घेतला  राज ठाकरे यांचा विचार घराघरात पोहोचण्यासाठी आपण सगळे रक्ताचे पाणी करू व  महाराष्ट्र नवनिर्माण करुया हा संकल्प करूण सदस्य नोंदणीला सुरुवात केली         सदस्य नोंदणी ऑफलाइन नोंदणी कराण्यासठी मनसे पदाधिकारी यांच्या कडे सदस्य नोंदणीचे फॉर्म देऊन नियोजन केले, तसेच परतूर-मंठा नेर,शेवली, विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा,किंवा ऑनलाइन सदस्य नोंदणी करायचे असेल तर आपण स्कॅन करून सुद्धा करू शकता, या नंतर आपण या क्रमांकावर ९९२०४५६७८९ मिस कॉल करून सदस्य नोंदणी करता येईल, जास्तीत जास्त संख्येने नवीन सदस्यानी भाग घ्यावा कारण येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे लोकसभेत लोकसभा सदस्य असणार व महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असणार याबाबत कोणाच्याही मनात शंका यायला नको, कारण काळ बदलत राहतो काळानुस

हयात प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांसाठी निराधारांच्या होणाऱ्या येरझरा थांबवा - प्रा सहदेव मोरे पाटील यांची टोपे लोणीकारांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Image
(मंठा) प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ, विधवा, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त इत्यादी विविध योजनांचे लाभार्थी हयात प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयात येरझारा मारताना दिसत आहेत.  सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याकारणाने त्यांचे वयोमान लक्षात घेता व तहसील कार्यालयातील गर्दी पाहता तहसीलदारांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करून आवश्यक असणारी कागदपत्रे गावपातळीवर जमा करावेत परिणामी वयोवृद्ध असणाऱ्या लोकांची वाताहत न होता गावपातळीवरच प्रशासनाचे व निराधारांचे काम सोपे होईल त्यामुळे निराधारांना हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी संजय गांधी निराधार समितीचे जालना ग्रामीण अध्यक्ष प्रा सहदेव मोरे पाटील यांनी पालकमंत्री राजेश टोपे, माजी पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर व जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे  केली आहे मार्च एण्ड असल्यामुळे तहसील परिसरात संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी येरझरा मारताना दिसत आहेत.  खरे पाहता मंठा, बदनापुर यासारख्या

श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद, मग स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी टाळाटाळ का? : प्रा. सहदेव मोरे पाटील*

Image
मंठा(प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी चारशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली ही बाब अत्यंत अभिनंदनीय असून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या स्मारकाला मात्र पाने पुसण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्मारक उभारण्यासाठी कारखान्यांकडून व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून निधी उपलब्ध केल्यानंतर स्मारक उभारण्याचे काम होणार आहे असे अर्थसंकल्पात सांगगण्यात आले आहे. मात्र संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  व सशस्त्र क्रांतीचे जनक आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी कोणतीही आर्थिक तरतूद न करणे ह्या बाबी अत्यंत निषेधार्य  आहे. असे भाजपा जालना ग्रामीण चे तालुका सरचिटणीस प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करण्यात आलेला कायदा व मागासवर्गीय आयोगाची नेमणूक ही या घटना दुरुस्तीच्या आधीचा असल्याने महाराष्ट्राच्या कायद्याला १०२ वी घटन

मराठवाड्यावर अन्याय करत सर्वसामान्यांना निराशा करणारा अर्थसंकल्प, केंद्र सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या निधीचेच सभागृहात निव्वळ वाचन, राज्यसरकारकडून कोणतीही तरतूद नाही : भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

Image
जालना(प्रतीनीधी) महाराष्ट्रातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प  हा मराठवाड्यावर अन्याय करण्याच्या हेतूने व सर्व सामान्य लोकांची फसवणूक करणारा  आपला संकल्प आहे  या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला व  शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून सर्वच घटकांची निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे तीन चाकी रिक्षा असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील दोन लाखापेक्षा कमी कर्ज असणारे सुमारे २० लाख शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत. दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’साठी कोणतीही तरतूद नाही तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्यासाठीही काही केले नाही. शेतकऱ्यांना वीजबिल सवलत देण्याबाबत केलेली घोषणा फसवी आहे. शेतकऱ्यांना भरमसाठ बिले आल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या ऐवजी काही सवलत दिली तरीही शेतकऱ्यांच्या डोक्याव

शेतकर्यांना त्रास दिला तर बँकेच्या प्रशासकाचे कपडे फाडु मनसे विद्यार्थी सेनेचा ईशारा

   मंठा (प्रतीनीधी)तालुक्यातील मंठा अर्बन बँक सध्या आडचणीत सापडली आहे. ठेवीदारांचे लाखो रुपये बँकेमध्ये आडकलेले आसतांना बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. यामुळे बँक आडचणीत आहे. धनदांडग्या लोकांनी बँकेला मोठ्या प्रमाणात ललुटलेले आहे. आणि बँक आडचणीत आणली आहे. ठेवीदारांचे पैसे बँकेने परत करने म्हणजे शेतकरी राजांकडुन वसुली करणे नव्हे, आसे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. मंठा तालुक्यातील गोर गरीब शेतकर्‍यांना बंकेने नोटिसा काढुन त्रास देऊ नये, व शेतकर्यांकडे वसुलीसाठी तगादा लावता कामा नये अन्यथा बँकेला जो प्रशासक दिला आहे.त्यांचे कपडे फाडण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करेल आसा ईशाराच मनसेचे आक्रमक म्हणुन ओळखले जाणारे सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. सबंधीत बँकेतील लोकांनी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करुन ठेवला आहे आगोदर त्याची चौकशी करुन सबंधीतांवर कार्यवाही करावी मगच शेतकर्‍यांकडुन वसुली करावी आसी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. आपण जिल्हा उपनिबंधक जालना डि डि आर यांच्य

औरंगाबाद 11 मार्च पासून मिनी लॉक डाऊन

 औरंगाबाद (प्रतीनीधी) – गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाऊनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. आता त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. येत्या ११ मार्च पासून ते ४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच या कालावधीमध्ये रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले. या अंशतः लॉकडाऊन मध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलतरण तलाव, क्रीडा मैदाने (मात्र सरावासाठी चालू असतील), शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद असतील. यात महत्वाचे म्हणजे मंगल कार्यालय, सभागृह यात होणारे सर्व लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा, मीडिया ऑफिस, दूध विक्री, भाजीपाला, फळविक्री सुरू राहील. १५ दिवसांनी कोरोना टेस्ट बंधनकारक खाजगी व कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त

युवकांनी आत्मनिर्भर च्या माध्यमातून सक्षम व्हावे* *प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,युवकांनी समर्पित भावनेने काम करावे ; - हर्षल जी विभांडीक,*परतूर येथे युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न*

Image
=================== परतूर (प्रतिनधी) युवमोर्चा कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केल्यास खऱ्या अर्थाने बेरोजगार युवक युवतींना आत्मनिर्भर बनवता येईल त्या साठी युवा मोर्चा ने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले   ते परतूर येथे युवमोर्चा च्या संघटनात्मक बैठकीत बोलत होते या वेळी व्यासपीठावर हर्षल जी विभांडीक(संयोजक, आत्मनिर्भर भारत), हर्षवर्धन कराड(जिल्हा प्रभारी) भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर,जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, ता अध्यक्ष शत्रुघन कणसे अविनाश राठोड विक्रम उफाड योगेश ढोणे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियल वाले संपत टकले तुकाराम सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी युवा युवती यांना विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम करावे असेही ते म्हणाले पुढे

अनाथ मुलांच्या हस्ते केक कापून लोणीकर यांनी केला आहे वाढदिवस साजरा,कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणाने वाढदिवस साजरा

Image
औरंगाबाद(प्रतीनीधी) कोरोना पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न जन्मता अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात यावा अशा सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केल्या होत्या त्यानुसार आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वतः लोणीकर यांनी औरंगाबाद येथे अनाथ मुलांच्या हस्ते केक कापून अगदी साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला औरंगाबाद येथील भगवान बाबा बालिका आश्रमात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला ॲड.विरेंद्र देशमुख, सभापती शिवहरी खिस्ते, किशोर यादव, पालवे आणि संस्थेच्या संचालिका कविता ताई वाघ उपस्थित होते. यावेळी ॲड.विरेंद्र देशमुख आणि संचालिका कविता ताई वाघ यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच याप्रसंगी आदरणीय बबनराव लोणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने काम करावे यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केली. अगदी आनंदी वातावरणात लोणीकरांच्या वाढदिवसाचा केक अनाथ मुलांच्या हस्ते कापण्यात आला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज पांगारकर यांच्या हस्ते लोणीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भगवान बाबा बालिका आश