Posts

Showing posts from July, 2023

बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे -गजानन इगळे

Image
परतूर दि.28 प्रतिनिधी कैलाश चव्हाण बालविवाह रोकण्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर पुढाकार होणे गरजेचे असल्याचे मत दि.27 रोजी परतूर तालुक्यातील आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात भाग दोन व चार येथे आयोजित बालविवाह प्रतिबंध व किशोरी मेळाव्यात बाल संरक्षण जिल्हा अधिकारी गजानन इंगळे यांनी व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती डॉ. स्मिता रोडगे, श्रीमती आशा मगरे, मुख्यध्यापिका ज्योती साळवे, श्रीमती मंगल खवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.     या वेळी पुढे बोलताना श्री. इंगळे म्हणाले की, बालविवाह ही समाजाला लागलेली कीड आहे आणि हे रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा बालविवाह होत असेल तर तात्काळ प्रशासनाला कळवावे असे सांगितले. या वेळी मुलींनी बालविवाह प्रति वेगवेगळी नाटिका सादर करत प्रभात फेरी काढली. या वेळी श्रीमती संगीता गोरे, श्रीमती राज्यश्री जाधव, श्रीमती दीपा नारायनकर, श्रीमती शीतल कुलकर्णी, श्रीमती सुकुमारी गोरे आदी शिक्षिका उपस्तीत होत्या. फोटो ओळी- आंबा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी माहिती सांगताना गजानन इंगळे दिसत आहे.

अंनिसचे कार्यकर्ता संवाद - प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्रअंनिसच्या जालना जिल्हा शाखेतर्फे नुकतेच नागसेन वाचनालय, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे नवीन कार्यकर्त्यांसाठी संवाद- प्रशिक्षण शिबिर अतिशय उत्साहात संपन्न झाले.  शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डाॅ.बसवराज कोरे यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात प्रा.कोरे यांनी देवा धर्माच्या नावाने ठिकठिकाणी विविध प्रकारचे शोषण कसे होत असते आणि ते कसे थांबवायला हवे यावर प्रकाश टाकला. नवयुवांनी महाराष्ट्र अंनिसच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले. महाराष्ट्र अंनिसची पंचसूत्री व अंनिसची व्यापक वैचारिक भूमिका याबाबत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे सर यांनी सविस्तर मांडणी केली. चमत्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण कसे करावे,त्यामागील शास्रीय कारणमीमांसा कशी स्पष्ट करावी हे सांगून, कार्यकर्त्यांच्या सहभागाने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे सादरीकरण संघटनेचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी करून दाखविले. कार्यकर्त्य

अमृत महोत्सव निमित्त स्वातंत्र्य सेनानी कुटुंबाचा सत्कार , भारतीय स्टेट बँकचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांचा स्तुत्य उपक्रम

Image
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण मराठवाडा स्वातंत्र्यसंग्राम मधील स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी काशिनाथ तुळशीराम वराडे यांच्या धर्मपत्नी पार्वतीबाई काशिनाथ वराडे यांचा आजादी का अमृत महोत्सव हे वर्ष साजरे करताना भारतीय स्टेट बँक शाखा परतूरच्या वतीने शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार दि १५ जुलै २०२३ रोजी करण्यात आला. यावेळी भारतीय स्टेट बँकचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी, उप प्रबंधक मनोहर गावडे, कर्मचारी इमरान खान, प्रवीण दुधाट, आदर्श ताम्हणे, मनीषा कांबळे, प्रतिष्ठित नागरिक गंगाधर पवार, यांची उपस्थिती होती.      भारतीय स्टेट बँक शाखा परतूरच्या वतीने पार्वतीबाई वराडे यांचा सत्कार करतांना मुख्य प्रबंधक अतुल सावजी, उप प्रबंधक मनोहर गावडे, कर्मचारी इमरान खान, प्रवीण दुधाट, आदर्श ताम्हणे, गंगाधर पवार आदि यावेळी मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांनी आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्य सैनिकाचे महत्त्व त्यांनी समाजासाठी केलेला त्याग व त्यांच्या या अथक परिश्रमामार्फत मिळालेले स्वातंत्र्य भावी पिढीला कळावं. त्या पिढीचा स्वातंत्र्य सेनानी कुटुंबाचा विसर समाजाला पडलेला चाललेला दिसत आहे. तो पडू

तळणीसह परिसरात पाऊस नसल्याने पेरणी पूर्णपणे थांबली

Image
तळणी, ता. प्रतिनिधि रवी पाटील     मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात पाऊस नसल्याने पेरणी पूर्णपणे थांबली आहे.हजारो हेक्टर जमीन ही आजही पेरणीविना आहे. शेतकरी कृत्रीम पाऊस पाडण्याची मागणी करीत आहेत.परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. मृग नक्षत्रासह आर्द्र नक्षत्र कोरडे जात आहे.वातावरणात केवळ ढगांची गर्दी दिसुन येत आहे. सोसाट्याचा वारा व ढगाळ वातावरण निर्माण होत आहे परंतु पाऊस येत नाही त्यामुळे पेरणी पुर्णपणे खोळंबली आहे. खरीप हंगामातील कापुस,तुर,सोयाबीन, ऊडीद,मुग,मका आदि पीकांची पेरणी झाली नाही.उशीराने होणाऱ्या पेरणीला अपेक्षीत ऊत्यादन होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक घडी विस्कटणार आहे .पेरणीची पुर्ण तयारी शेतकऱ्यांनी केली .बी बीयाणे सह खतांची खरेदी केली यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उधारी ऊसनवारी केली. आधीच कर्ज बाजारी असलेल्या शेतकऱ्यांना ऊशिरा पेरणीचा फटका बसणार आहे . मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पीकाचे खुप मोठे नुकसान झाले होते . परतीच्या पावसाने झालेले नुकसान खुप होते परंतु आता पेरणी होत नाही . थोड्या फार पडलेल्या पावसावर काही शेतकर्यानी पेरणी केली खरी प

दिशाहिन राजकारणात कॉग्रेसची नौका स्थीर आहे- युवक कॉग्रेस प्रदेशअध्यक्ष कुणाल राउतकार्यकर्त्योनी झटुुन काम करावे,येणारा काळ आपलाचं - मा.आ. सुरेशकुमार जेथलिया

Image
परतुर -प्रतिनिधी कैलाश चव्हाण  देशासह राज्या राज्यात अनेक पक्षातील मोठ मोठाले गट सत्तेच्या आमीशाला बळी पडुन फुटले मात्र या दिशाहिन राजकिय स्तीतीथ कॉग्रेस पक्षाची नौका भक्कम व स्थिर असल्याचे प्रतिपादन युवक कॉग्रेसचे प्रदेष अध्यक्ष कुणाल राउत यांनी केले. युवक काँग्रेसच्या पुढाकारणे मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 10जुलै रोजी परतुर येथील गजानन लॉन्स येथे आयोजीत युवक कॉग्रेसच्या युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर युवक कॉगेसचे निमंत्रीत जम्मु प्रदेशचे संपर्कनेते उदयभान चिभ, आ. राजेश राठोड,अक्षय गोरंट्याल मराठवाड्याचे सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्तीती होती. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर मानोगतात विशाल पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परस्तीतीचा समाचार घेत म्हटले की, आज अनेक पक्षातील गट बाजुला पडत सत्तेच्या लाटेत मतलबी वृत्तीमुळे दाखल होत आहे. यामुळे त्यांना मतदान करणारे व त्यांच्या विचारांना समर्थन देणारे मतदार संभ्रम अवस्थेत दिसत आहेत त्याना निवडून दिले तेच बैमान होत असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न अनेक

जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरापर्यंत मोदीजींचे विचार पोहोचवा-युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणकर,परतुर येथून घरोघरी संपर्क अभियानाची राहुल लोणीकर यांच्या हस्ते सुरुवात

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नऊ वर्षे पूर्ण केलेले असून या नउवर्षाच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले जनसेवा व विकासात्मक कामाचा लेखाजोखा थेट घराघरापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांनी सादर करावा असे आवाहन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले   ते परतुर येथे महाजन संपर्क अभियानाच्या निमित्ताने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की बूथप्रमुखापासून शक्ती केंद्र विस्तारक शक्ती केंद्रप्रमुख जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पक्षाचे आजी माजी पदाधिकारी या सर्वांनी या अभियानात सहभाग घेऊन येत्या आठ दिवसांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून संपर्क करत नऊ वर्षाच्या काळात झालेली विकास कामे थेट जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वांगीण प्रगती होत असून दी

परतुर पोलिसांनी अवघ्या 24 तासात मोटरसायकल चोराच्या आवळल्या मुस्क्या

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण      परतूर शहरातील बुलढाणा अर्बन बँक मोंढा परिसर तसेच मनःपूरम फायनान्स लिमिटेड परतुर समोरून उभी केलेली मोटरसायकल फिर्यादी नामे १) प्रल्हाद विठ्ठल राऊत राहणार उस्मानपुर यांची मोटर सायकल क्रमांक MH-21 BJ- 7002 तसेच फिर्यादी नामे २) राहुल शिवाजी खाडे राहणार एकुरूका तालुका घनसांगवी याची मोटरसायकल MH- 21 AM- 8823 अज्ञात आरोपीने चोरून घेऊन गेले होते. त्याबाबत पोलीस स्टेशन परतुर येथे दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते     सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोपनीय माहिती काढून परतुर पोलिसांनी चोरी करणारा आरोपी नामे 1) दत्ता एकनाथ कराळे रा. टाकळगाव ता. वसमत जिल्हा हिंगोली यास सिताफिने ताब्यात घेऊन त्याच्याकडून वरील दोन्ही मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच एक H F dilax विना नंबरची मोटार सायकल जप्त केली आहे.  सदरची कार्यवाही ही मा. श्री. तुषार दोशी साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. श्री. डॉ. राहुल खाडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक जालना, तसेच मा. सुरेश बुधवंत साहेब, SDPO परतुर यांच्या मार्गदर्शनाखाली  एम.टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर