अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत योजनेत देशातील लहान आणि महत्त्वाच्या १२७५ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा आणि सिटी सेंटर उभारले जातील. या योजनेद्वारे देशातील १००० हून अधिक लहान स्थानकांचे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये परतुर रेल्वे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला असून ०६ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी सकाळी ०९ वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शुभ हस्ते केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत १२ कोटी ०८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत केंद्र सरकार मार्फत परतुर स्थानकाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्र ट्रिपल इंजिनचे सरकार अस्तित्वात आले असून महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढला आहे. रस्ते वीज पाणी दळणवळण यासह अनेक मूलभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे.* अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांवर प्रशासकीय इमारत, शौचालय, संरक्षण भिंत, कँटीन यासह प्रवाशांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवाशांसाठी उत्तम प्रकाश व्यवस्था असलेल्या खोल्या तयार केल्या जाणार असून या योजनेच्या माध्यमातून नको असलेली बांधकामे हटवली जाणार आहेत. त्याप्रमाणे पदपथ विकसित केले जाणार असून रस्ते रुंदीकरण, पार्किंग आदी कामे आधुनिकीकरणाद्वारे पूर्ण केली जाणार आहेत. याशिवाय ग्रीन पॅच व्दारे नागरिकांना स्थानिक कला आणि संस्कृतीचा उच्चस्तरीय अनुभव येईल, त्यामुळे प्रवाशांना स्थानकांवर आपल्या संस्कृतीचा खास अनुभव घेता येणार आहे. अशी माहिती देखील यावेळी लोणीकर यांनी दिली.

केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परतुर येथील रेल्वे उड्डाणपूल यासह स्थानकाच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणी कर यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान केली होती या मागणीला यश मिळाले असून पूर्ण झाले आहे आणि आता २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत रेल्वे मंत्रालयाकडून परतुर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार असल्याची माहिती यावेळी श्री लोणीकर यांनी दिली. परतुर रेल्वे स्थानकाला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना रेल्वेची योग्य माहिती मिळावी आणि या योजनेचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावे यासाठी भारतीय रेल्वे बोर्ड महत्त्वाच्या ठिकाणी मोठे होल्डिंग लावण्यात येणार आहे. होल्डिंगच्या निर्मितीमुळे कोणत्याही नागरिकाला रेल्वेची वेळ व इतर माहिती घेण्यासाठी कोणाकडेही विचारणा करावी लागणार नाही. सर्व नागरिकांना स्टेशनच्या प्रतिक्षालयाचे वर्गीकरण छोट्या विभागात करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रेल्वे स्थानकात छोट्या व्यावसायिक बांधवांसाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधांची तरतूद करण्यात येणार आहे. यामध्ये महिला आणि दिव्यांग लोकांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. असेही श्री लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

या योजनेद्वारे रेल्वेच्या विविध विभागांचे नूतनीकरण करण्यात येणार असून सदरील काम किमान २ वर्षात पूर्ण होईल.परतूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणामुळे नागरिकांना चांगल्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ज्या प्रवाशांना कोणत्याही स्थानकावर थांबावे लागेल त्या स्थानकावरून नागरिकांना त्या शहरातील कला आणि संस्कृतीची संपूर्ण माहिती मिळणार आहे. रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांना चालण्यासाठी फूटपाथ बनवले जाणार आहेत. या योजनेंतर्गत प्रवाशांना सुसज्ज पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार असून प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. अशी माहिती देखील यावेळी बोलताना श्री लोणीकर यांनी दिली.

मराठवाड्यात ०९ ठिकाणी अमृत भारत रेल्वे स्थानक पुनर्विकास योजनेअंतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नंतर दुसऱ्या क्रमांकाची उपस्थितांची संख्या परतुर रेल्वे स्थानक या ठिकाणी होती. यावेळी विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड परतुर तहसीलदार प्रतिभा प्रतिभा गोरे, मंठा तहसीलदार रूपा चित्रक, उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत रेल्वे अधिकारी श्री बसवराज श्री साठे श्री अमरदीप परतुर तालुकाध्यक्ष रमेश भापकर मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाश टकले गणेशराव खवणे पंजाबराव बोराडे संपत टकले कैलास बोराडे संदीप बाहेकर प्रदीप ढवळे शिवदास हनवते ज्ञानेश्वर शेजुळ भगवानराव मोरे जिजाबाई जाधव नागेश घारे मुस्तफा पठाण रवी सोळंके दत्ता कांगणे प्रसाद बोराडे संभाजी वारे सुधाकर सातोनकर राजूदादा वायाळ पाटील, प्रकाश चव्हाण विलास आकात बंडू मानवतकर भगवान आरडे सुरेश सोळंके परमेश्वर शिंदे प्रवीण सातोनकर गजानन लोणीकर दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव विठ्ठलराव बिडवे विलास घोडके राजभाऊ खराबे गोंडगे लक्ष्मण टेकाळे संदीप तनपुरे वसंत राजबिंडे, प्रशांत बोनगे मिराज खतीब सुधाकर बेरगुडे विक्रम उफाड विकास पालवे कोमल कुचेरिया महेश पवार लहू आढे मोहन आढे नितीन साठे बबलू सातपुते लक्ष्मण बोराडे मधुकर मोरे अमोल जोशी पद्माकर कवडे अन्साबाई राठोड जयश्री पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.