Posts

Showing posts from September, 2022

सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुरच्या पाठपुराव्यामुळे वरफळ येथील निराधार कुटुंबास मिळाला मदतीचा हात

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे             गेल्या तीन महिन्यांपूर्वी पहिल्या मुसळधार पावसामध्ये वरफळ येथील खंडागळे परिवार यांचं घर त्या मुसळधार पावसामध्ये पडल्याने त्यांच्या लहान मुलास गंभीर दुखापत झालेली होती ही बाब सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वरफळ येथील खंडागळे परिवार यांना भेट देऊन तसेच सर्व परतूर करांना एक मदतीचं आवाहन करून ती मदतपण त्या परिवारास सनी गायकवाड यांनी मिळवून दिली          खंडागळे परिवाराला शब्द दिला तुम्हाला शासकीय मदतपण लवकरात लवकर सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या पाठपुराव्यामुळे आम्ही मिळवून देऊ,आज राेजी दिनांक 30 सप्टेंबर त्यांना त्यांच्या मुलाला जी घरपडीमध्ये दुखापत झालती त्या दुखापती साठी आज खंडागळे परिवाराला सन ऑफ आंबेडकर ग्रुपचा पाठपुराव्यामुळे 12700 रुपयांचा धनादेश आज रोजी प्राप्त झाला तसेच सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांनी बोलतानाने असे सांगितले की त्यांचे जे घर पडलेल आहे त्या पडधडीचेही पैसे लवकरात लवकर सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या पाठपुराव्यामुळे मिळवून देण्याचा प्रयत्न करू तसेच सनी गायकवाड यांनी परतूर

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर!,शिष्टमंडळाने मंत्र्यांसमोर प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या मांडल्या व्यथा; मंत्री महोदयांकडून शिष्टमंडळास सकारात्मक आश्वासन!

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्यता प्राप्त असणाऱ्या राज्यातील 78 महाविद्यालयांना अनुदानित करावे या संदर्भात महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील मुंबई मंत्रालय येथे भेट देऊन निवेदन सादर केले तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या व्यथा शिष्टमंडळाने मांडल्या.   शिष्टमंडळाच्या समितीच्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील एकवीस वर्षापासून महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी विनावेतन सेवा देत आहेत. मागील वर्षी शासनाच्या माध्यमातून 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या मान्यताप्राप्त 78 महाविद्यालयांची पुणे संचालक कार्यालयामार्फत संचालकांकडून तपासणी झालेली आहे तपासणी प्रक्रिया होऊन दहा महिन्याचा कालावधी ओलांडला आहे तरीसुद्धा आमच्या अनुदानाचा निर्णय झालेला नाही.   महायुती कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी निर्णय होत आहेत. आज ७८ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक व कर्मचारी यांचा एक एक दिवस लाख

मंठ्यात कायदेविषयक शिबिर संपन्न..... प्रत्येकाने कायदेविषयी जागरूक असावे - न्या. सुर्यवंशी

Image
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ  दि ३० न्यायव्यवस्थेमध्ये कायद्याने महिलांना खूप मोठे अधिकार दिले आहेत, कायदा म्हणजे महिलांची ताकद आहे,म्हणून प्रत्येकाने कायद्याबद्दल जागरूक असले पाहिजे असे प्रतिपादन न्या.कु.सूर्यवंशी मॅडम यांनी केले.        तालुका विधी सेवा समिती मंठा व वकील संघ मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जगदंबादेवी परिसरात कायदेविषयक शिबिराचे गुरुवार (ता.29)रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर दिवाणी व व फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या न्यायाधीश सूर्यवंशी मॅडम, सहन्यायाधीश शेख मॅडम, बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्या.सूर्यवंशी बोलत होत्या. महिलांवर अत्याचार होत असेल तर न्यायव्यवस्था आहे,त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असून या माध्यमातून महिलांना निश्चितपणे न्याय मिळतो. महिलांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, प्रत्येक महिलांनी मुलींना चांगले शिक्षण द्यावे, विचारातून समाजाची सुधारणा होते असे प्रतिपादन न्या.कु.सूर्यवंशी मॅडम यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहन्य

सेवेच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार द्या माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन ,रूरबन योजनेतील आष्टी येथील मिनी एमआयडीसी चा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निकाली काढणार

Image
प्रतिनिधी- कैलाश चव्हाण  गोरगरीब वंचित शोषित पीडितांची सेवा करणे हाच आमचा अजेंडा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, यांच्या माध्यमातून हा झेंडा देशभरात राबवण्यात येत असून गोरगरीब दलित पीडितांना विविध योजनांचा लाभ देऊन आर्थिक सक्षम करण्याची आमची भूमिका असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते सेवा पंधरवड्या निमित्त आयोजित आष्टी तालुका परतुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त संपन्न झालेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होती पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे माध्यमातून आपण पालकमंत्री असताना तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणला होता या पार्श्वभूमीवर परतुर मंठा तालुक्यासाठी 42 कोटी रुपयांचा निधी आत्तापर्यंत खर्च करण्यात आला असून या निधीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना शेततळे शेडनेट स्प्रिंकलर ठिबक अवजार बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर मळणी यंत्र रोटावेटर व इतर अवजारे उपलब्ध झाली असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या वेळी बो

शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,सेवा समर्पण पंधरवड्याच्या माध्यमातून जनसेवा करा - लोणीकरांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांना आवाहन,घरकुल योजनेतील परतुर शहर तसेच तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभाचे करण्यात आले वितरण*, पोखरा योजनेच्या माध्यमातून ठिबक, शेततळे नेट शेड विहीर आदीसाठी 07 कोटी 50 लक्ष रु चे विविध योजनेच्या लाभाचे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वितरण करणार

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  राष्ट्रनेता हे राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत सर्वसामान्य गोरगरीब दिन दलित शेतकरी कष्टकरी माता भगिनी व बांधवांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम प्रत्येकानं करावं त्याचबरोबर आपल्या परीने होईल तेवढी मदत सहकार्य या वंचित वर्गाला करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावे असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली  ते सेवा पंधरवड्या निमित्त आयोजित विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाची वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते  पुढे बोलताना ते म्हणाले की आपण शेवटच्या श्वासापर्यंत गोरगरीब दीन दलितांची सेवा करणारा असून अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबर पासून तर 2 ऑक्टोंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे करावीत असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले. पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना दिव्यांग विधवा परित्यक्ता दुर्

अनिल खंदारे यांच्या कार्याची पावती मिळाली -किसनराव मोरे

Image
   मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ      अनिल खंदारे यांनी मागील वीस वर्षीच्या पत्रकारितेत समाजातील शोषित, वंचित घटकाना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची पावती प्रेस काउन्सील ऑफ महाराष्ट्र च्या राज्य कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांना मिळाली आहे, आत्ता समाजिक प्रश्न हाताळण्या बरोबरच ते पत्रकाराना न्याय मिळून देतील असं मत पंचायत समिती चे सदस्य किसनराव मोरे यांनी व्यक्त केले       मंठा येथील शासकीय विश्राम गृहात खंदारे यांचा सत्कार करतांना ते बोलत होते यावेळी जेष्ठ पत्रकार राजेश भुतेकर, रंजित बोराडे, शेतकरी नेते बाळासाहेब वांजोळकर, जगन दवणे, बाळासाहेब वैद्य ,संजय वाघमारे, रामा दहातोंडे, गजानन देशमुख,सुनिल खंदारे, विश्वाभंबर काकडे याच्या सह आदी उपस्थित होते

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनच्या मंठा तालुका अध्यक्ष पदी शेख आशपाक यांची निवड ,पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर-शेख अशपाक

Image
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ      इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या निर्देशानुसार व मराठवाडा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने जालना जिल्हा अध्यक्ष शेख उमर (बबलू भाई) यांनी मंठा येथील पत्रकार दैनिक लोकसंपर्कचे तालुका प्रतिनिधी शेख अशपाक यांची मंठा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शेख अशपाक यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना जोडून पत्रकारांचे रक्षण करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. शेख अशपाक यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे. शेख अशपाक यांना जिल्हा अध्यक्ष शेख उमर (बबलू भाई) आणि जिल्हा महासचिव प्रेम जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. शेख अशपाक यांची मंठा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल असलम कुरेशी (प्रदेश अध्यक्ष मराठवाडा महाराष्ट्र), व्यंकटेश सूर्यवंशी (प्रदेश महासचिव मराठवाडा), देवेंद्र योगेन्द्र भोंडे (इम्पैक्ट 24 न्यूज), जावेद पठाण (प्रदेश कोषा

येनोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी उद्धवराव जोगदंड यांची बिनविरोध निवड...

Image
परतूर प्रतिनिधी: हनुमंत दवंडे परतुर तालुक्यातील येनोरा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सोसायटीच्या चेअरमन पदी उद्धवराव साहेबराव जोगदंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली .सेवा सहकारी सोसायटीवर 13 पैकी 13 जागेवर पॅनलने विजय मिळवला.        यामध्ये विजयी उमेदवार कपिल बाबासाहेब आकात ,उद्धव साहेबराव जोगदंड, गीताराम रामचंद्र भुंबर, अर्जुन दगडोबा नवल, नारायण तुळशीराम भुंबर, लिंबाजी सुंदरराव नवल, तुकाराम नामदेव सोळंके ,प्रल्हाद रामभाऊ नवल, सुरेखा नितीन जोगदंड , मीराबाई रावसाहेब नवल, श्रीमंत भीमराव भालके, अशोक शंकर शेळके, नामदेव निवृत्ती बोंबले, हे उमेदवार विजयी होऊन सर्वांच्या एक मताने सोसायटी च्या चेअरमनपदी उद्धव साहेबराव जोगदंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल कैलास साळवे ,सुभाषराव जोगदंड, रुस्तमराव बोंबले, विष्णू गायकवाड (सरपंच) सुरेश भुंबर (उपसरपंच)अर्जुन दौंडे ,अंकुश भुंबर,नितीन जोगदंड ,आबासाहेब भुंबर, पांडुरंग नवल , भागवत भुंबर, नामदेव तौर, भीमराव साळवे, प्रकाश बोंबले, ज्ञानेश्वर साळवे गावकऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग व बांबू लागवड योजनेचे अर्ज तात्काळ ऑनलाईन करा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जागतिक बँकेच्या मदतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारा प्रकल्प सुरू केला होता या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय करण्यात आला होता त्यानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा या योजनेमार्फत दिल्या जातात मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पातील अनेक योजनांवर बंधने घालण्यात आली होती तसेच शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या अनेक योजनांची अनुदान देखील प्रलंबित होते नवीन योजना करावी की न करावी अशा प्रकारची द्विधावस्था शेतकऱ्यांची होती परंतु आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस यांच्या रूपाने शेतकऱ्यांचे सरकार आलं असून शेतकऱ्यांनी फळबाग व बांबू लागवड करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत फळबाग व बांबू लागवड अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ असून त्यानंतर पोर्

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या रेट्याने शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील स्ट्रीट लाईट झाले सुरू,परतुर साईबाबा मंदिर ते रेल्वे गेट परिसर झाला प्रकाशमय

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण             आज परतुर शहरातील साईबाबा मंदिर परिसरापासून तर रेल्वे स्टेशन गेट पर्यंतचे शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू झाल्यामुळे परतुर शहर प्रकाशमान झाले असून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी अध्यक्ष अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार व भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या होत्या या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नवरात्रीच्या काळामध्ये स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून लवकरच तळणी वाटुर शिंगोना दैठणा आष्टी लोणी ते माजलगाव येथील स्ट्रीट लाईट सुरु होणार असून यामुळे विविध गावावरून ये जा करणाऱ्या पादचारी दुचाकी स्वार वाहन चालकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून हे दिवे प्रकाशमान झाल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना पत्र व्यवहार करत

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेची सेवा करणार - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, समर्पण पंधरवड्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सेवेत कायम तत्पर रहा - लोणीकरांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकाऱ्यांना आवाहन,०१ कोटी ६४ लाख ८४ हजार ५६० रु अतिवृष्टी अनुदान ४२४५ शेतकऱ्यांना वाटप यासह शेतकरी आत्महत्या व विविध धनादेशांचं लोणीकरांच्या हस्ते वाटप

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण सातत्याने काम करत असून पण लोकांच्या सेवेसाठी आपण कायम तत्पर असले पाहिजे सर्वसामान्य गोरगरीब दिन दलित शेतकरी कष्टकरी माता भगिनी व बांधवांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम प्रत्येकानं करावं त्याचबरोबर आपल्या परीने होईल तेवढी मदत सहकार्य या वंचित वर्गाला करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा मी स्वतः रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोरगरीब दीन दलितांची मदत करणे दुबळ्यांची सेवा करणे यासाठी खर्च करणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले. तहसील कार्यालय मंठा येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेच्या ७२९ लाभार्थ्यांना अर्थसहाय मंजुरी आदेश पत्राचा वाटप आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना दिव्यांग विधवा परित्यक्ता दुर्धर आजार ग्रस्त अशा अनेक विविध लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ दिला जातो या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळव

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवून "सेवा समर्पण पंधरवडा" साजरा करा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन,माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - माजीमंत्री आमदार लोणीकर यांच्या आरोग्य विभागाला सूचना ,"महिला सुरक्षेसाठी डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा - लोणीकर यांचे आवाहन

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा समर्पण पंधरवडा" साजरा केला जात असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवून "सेवा समर्पण पंधरवडा" साजरा करावा, *केंद्र सरकारकडून पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत पहिलं बाळंतपण असणाऱ्या गरोदर महिलेला ५००० रुपये लाभ दिला जातो तर महाराष्ट्र सरकारकडून मानव विकास मिशन अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती-जमाती च्या बुडीत मजुरी असणाऱ्या महिलेला ४००० रुपयांचा लाभ दिला जातो,*  असे गोरगरीब, दीन दलित शेतकरी शेतमजूर यांच्यासह पुरुष महिला युवा युवती यांच्यासह सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं. यावेळी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा ग्रामीण रुग्णालय येथे सी.एस.आर. फंडातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली, यावेळी भाजप जालना जिल्हा उपाध्यक्

नवरात्रोत्सवात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर हा अत्यंत स्तुत्य उपक्रम- माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ०९ दिवसीय महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा माता भगिनींनी लाभ घ्यावा- डॉ.सौ.उषा कल्याण मोरे

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ  "शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था" व "मोरे हॉस्पिटल मंठा"च्या संयुक्त विद्यमाने रेणुकादेवी मंदिर नवरात्र उत्सव यात्रा ०९ दिवसाचे खास महिलांसाठी "मोफत आरोग्य तपासणी शिबिर" आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. मोरे हॉस्पिटल मंठा यांच्या वतीने महिलांच्या विविध आजारांची तपासणी उपचार व मार्गदर्शन यावर आधारित मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसृष्टी संस्था व मोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या या मोफत आरोग्य शिबिरामधून नक्कीच सर्वसामान्य महिला माता-भगिनींना तपासणी उपचार व मार्गदर्शनाच्या माध्यमातून फायदा होईल मोरे हॉस्पिटल च्या वतीने आयोजित महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत स्तुत्य उपक्रम असून स्वयंसेवी संस्थांनी अशा प्रकारे जनसेवेचा वसा हाती घ्यावा व सर्वसामान्यांची सेवा करावी अशी अपेक्षा यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले व मोरे हॉस्पिटलच्या महिला मोफत आरोग्य तपासणी शिबिराल

मंठा येथे आ.भा.मराठा महासंघा तर्फे कै.अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ  दि.२६ अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माथाडी कामगार चळवळीची प्रणेते कै.अण्णासाहेब पाटील यांची रविवारी ८९ वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास भाजपचे माजी मंत्री,विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थित होती.                       यावेळी व्यासपिठावर संदीप भैया गोरे,सतीश निर्वळ,गणेश रावजी खवणे,सुभाष राठोड,उदय बोराडे,भाऊसाहेब गोरे,बबनराव गणगे,कैलास सरकटे बीड थोरात महादेव वायकर,सोपान वायाळ,अंकुश वायाळ नाथराव काकडे भगवान महाराज सरकटे विष्णुपंत महाराज डॉ. देशमुख सुधाकर सरकटे शिवाजी जाधव सर्वांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री तथा विधानसभा लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांनी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक आणि भाजप राज्याचे आध्यात्मिक आघाडीचे सदस्य भगवानराव महाराज सरकटे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी &q

विषबाधा प्रकरणी कठोर कार्यवाही करा:- श्री राम हिंदु जनजागृती संघाची मागणी

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ                मंठा व परतूर तालुक्यात नवरात्र उत्सवा निमित्त भगरीच्या भातामधुन भाविक भक्तांना विष बाधा झाल्याने मंठा व परतूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच श्री.राम हिंदु जनजागृती संघ अध्यक्ष तथा मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी या प्रकरणाची दखल घेत जालना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार पाठवली आसून या संदर्भात विषबाधा प्रकरणी हिंदु धर्माच्या नवरात्र उत्सवातच भगरी मधून विषबाधा का? या मागचा हेतू तपासून सबंधित लोकांवर कठोर कार्यवाही करावी आशि मागणी श्री. राम हिंदु जनजागृती संघ अध्यक्ष तथा मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केली आहे.        नवरात्र उत्सव हा उत्सव आनंदाने साजरा करायचा तर? विषबाधाचा प्रकार का घडला आहे. या बाबीची पोलीस प्रशासनाने कठोर कार्यवाही केली पाहिजे. व भगर निर्मित कंपनीवर कारवाई करण्यात आली पाहिजे आशि मागणी सिद्धेश्वर काकडे यांनी केली आहे.

महाराजा श्री.अग्रसेन यांची जयंती परतूर मधे उत्साहात साजरी

Image
 परतूर/प्रतिनिधी- कैलाश चव्हाण        येथे आज सोमवार दि.२६ रोजी अग्रोहा नरेश छत्रपती महाराजा श्री.अग्रसेन यांची ५१४६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी शहरातून सकाळी ८ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येऊन महाराजा श्री.अग्रसेन यांच्या प्रतिमेची रथाद्वारे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी या मिरवणुकीत पुरुष,महिलांसह लहान मुलांची-मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.          दरम्यान मिरवणूकीनंतर मोंढा भागातील श्री.बालाजी मंदिरात यजमान अनिलकुमार बगडीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर अग्रवाल सेवा समितीचे अध्यक्ष निखिल अग्रवाल,कार्याध्यक्ष रोशन बगडीया,अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा श्वेता कंसल,सचिव बिंदीया केजडीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात अग्रवाल महिला मंडळ यांनी जयंती निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.जयंतीनिमित्त जालना येथील डॉ.अनिता तवरावाला यांचा सामाजिक प्रबोधनावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जयंतीनिमित्त जालना येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान

मंठा येथील विद्युत रोहित्र जळाल्याने नवरात्र उत्सव अंधारात ,तात्काळ रोहित्र बसविण्याची संचालक वैजनाथ बोराडे यांची मागणी

Image
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ  दि.२६ मंठा शहरातील गोडाआड गल्लीतील विद्युत रोहित्र अचानक जळाल्याने प्रभाग 12 मधील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.    सध्या नवरात्र उत्सव सुरू असून या भागातील रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.प्रभाग क्रमांक 12 मधील जळालेले विद्युत रोहित तात्काळ बदलून मिळावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक वैजनाथ बोराडे यांनी केली आहे. या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिल जंगम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांच्यासह दिनेश जोशी,नागेश कुलकर्णी,सुखदेव बोराडे,भगवान कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

तळणि परिसरात जोरदार पाऊस,अधीच पावसाने शेतकरी हैराण

Image
 तळणी प्रतिनीधी रवी पाटील रविवार रोजी तळणीसह सपूर्ण परीसराला जोरदार पावसाने झोडपून काढले चार दीवसापूर्वी पडलेल्या ढगफूटीस सदृश्य पावसाच्या तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आज दुपारी पाच वाजे च्या सुमारास अचानक मोठ्या पावसाला सुरवात झाल्याने रस्त्यावर व्यवसाय करणार्याची फजीती झाली        आधी पासून तळणीसह सपूर्ण परीसरात मोठया प्रमाणाता वातावरणात उकाडा होता या खरीप हंगामात आधीच शेतकर्याचे सोयाबीन कापूस तूर मुग ऊडीद पिकांचे मोठे नुकसान झाले गेल्या चार दीवसात शेतात साचलेले पाणी काढूण देण्यात शेतकरी व्यस्त होते साचलेले पाणी कसेबसे कमी होत नाही तोच आज पावसाने पून्हा तडाखा दिल्याने शेतकरी मेटाकुटीस आला तळणी मंडळात या बर्षी सलग दोन वेळा अतिवृष्टी झाली तरी आता पर्यंत कुठला पंचनामा ना पाहणी झाली प्रशासन स्तरावर सरसकट मदतीची कुठलीच घोषणा आजपर्यन्त झाली नाही लवकरच रब्बी हंगामाची तयारी शेतकर्याना करायची आहे तरी आर्थीक नियोजन काटकसरीने करावे लागणार असुन महीन्यावर आलेल्या दीवाळी सण सुध्दा यावर्षी गोड होण्याची शक्यता दीसत नाही शासनाने व नव्याने पांलंकत्र्याची जबाबदारी घेणारे अतूल सावे

परतूर शहरात लेजंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ ,मा.नगराध्यक्ष संदीप बाहेकर यांच्या हस्ते झाले उदघाटन

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण          परतूर येथे लेजंड क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे नेते माजी उपनगराध्यक्ष संदीप बाहेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर संयोजक कृष्णा आरगडे नगरसेवक प्रवीण सतोनकर नगरसेवक प्रकाश चव्हाण संतोष हिवाळे यांची उपस्थिती होती लिजेंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं परतुर शहरांमध्ये अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आयोजन होत असून या माध्यमातून 35 वर्षाच्या वरील खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेट विश्वामध्ये आपले हात आजमावण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शहरातील जुन्या जाणत्या क्रिकेट खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण असून या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना वरिष्ठ खेळाडू कडून मार्गदर्शन होणार आहे क्रिकेटचे धडे गिरवताना तात्कालीन क्रीडापटूंनी परतु सारख्या छोट्या शहरातून झेप घेत थेट रणजी नीट पर्यंत धाव घेतलेली आहेत यापेक्षाही पुढची धाव घेण्यासाठी किंवा पल्ला गाठण्यासाठी युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या लिजेंड क्रिकेट स्पर्धेचा उपयोग होणार असल्याची भावना यावेळी बाहेकर यांनी व्यक्त केली सदरील स्पर्धेमध्ये शहरातील नामवंत खेळाडूंनी सह

भारतीय स्टेट बँकेच्या त्रिवार्षिक निवडणुकीत प्रबंधक अतुल सावजी बिनविरोध

Image
परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे  येथील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांची स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन औरंगाबाद, जालना, परभणी, व अहमदनगर अश्या जिल्हात असलेल्या औरंगाबाद विभागात विभागीय अध्यक्ष म्हणून पुढील तीन वर्षाकरिता बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेच्या माध्यमातून अधिकारी वर्गांसाठी त्यांच्या समस्यांसाठी निस्वार्थपणे काम करण्याची जिद्द व तळमळ मनात ठेवून अतुल सावजी यांनी या पदासाठी संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला होता. चारी जिल्ह्यामधून त्यांची उमेदवारी बिनविरोध अशी ठरली. एकंदरीत निवडणूक असली म्हणजे हेवे दावे तसेच प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क असतो परंतु भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना ही या गोष्टीला अपवाद ठरली आहे. बँकेच्या औरंगाबाद विभागामध्ये पूर्ण कार्यकारणी बिनविरोध निवडून आली आहे. यावेळी बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल सावजी यावेळी बोलताना अधिकारी वर्गांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस यांनी व्यक्त केला आहे. भविष्यात येणाऱ्या  अधिकारी वर्गाच्या अडीअडचणी त

हस्तिनापूर नवरात्र महोत्सवाची कार्यकारणी ,अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी, उपाध्यक्षपदी सत्यम ओझा तर सचिव पद्दी गणेश देवक

Image
परतूर प्रतिनिधी  हनुमंत दवंडे     येथील हस्तिनापूर नवरात्र महोत्सवाची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी , उपाध्यक्षपदी सत्यम ओझा तर सचिव पदी गणेश देवक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.         मागील दोन वर्ष कोरोना काळात गेल्यामुळे नवरात्र महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला नसल्याने यावेळी नवरात्र महोत्सव अति उत्सवात साजरा करण्यात येणार आहे. परतूर येथील हस्तिनापूर नवरात्र महोत्सव अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो. उर्वरित कार्यकारणी कोषाध्यक्षपदी सागर झंवर, कार्याध्यक्ष पदी गणेश सुरसुरवाले,  सदस्यपदी सचिन नंदीकोल्हे, प्रफुल पवार, श्रीराम मुंदडा, आराध्य ओझा, भारत जोशी, कृष्णा मारोठे, अशोक राजपरोहित, आदित्य अंभुरे, अनमोल अग्रवाल, गणेश माकोडे, सल्लागार प्रदीप लढा, मोहन अग्रवाल, जगदीश झंवर, राजू आण्णा सुरसुरवाले, प्रवीण मारोठे, शाम ओझा, रोहित अग्रवाल, मनोहर कुंटुर, राधेश्याम तापडिया, सागर काजळे, रोहित अग्रवाल, सुदर्शन पांगारकर, गोविंद बजाज, संजय मोर, गजानन चोरघडे, विकास अग्रवाल ( बबलू) प्रवीण कुलकर्णी, विकास पवार, अक्षय

अंगलगाव येथे ल॑पीचे 185.लसीकरण

Image
सातोना/पांडुरंग शिंदे परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे दि.२२.रोजी. ग्रामपंचायत अंगलगाव मार्फत लंपी लसीकरण शिबीर घेण्यात आले .काही दिवसापासुन महाराष्ट्रसह  परतूर तालुक्यात ही ह्या आजाराने शिरकाव केला आहे .मोठ्या प्रमाणावर गाय , बैल इत्यादी जनावरांना होणारा लंपी हा आजार धुमाकूळ घालतोय , लंपी आजारामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून  शासनाकडून लसीकरण होईपर्यंत या आजारात आपले दुभते जनावर दगवण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि हा आजार अति प्रमाणात पसरू नये यासाठी सरपंच आप्पासाहेब खंदारे यांनी वेळीच लक्ष देऊन गावातील जनावरांना लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामपंचायत मार्फत एकूण. 185.. जनावरांचे लसीकरण करून घेतले .हा आजार रोखण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन शिबीर आयोजित केले. होते... पशुसंवर्धन व दि:-22/09/2022 रोजी  पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ सातोना ता. परतूर जि जालना अंतर्गत मौजे अगलगाव येथे .किटकनाशकांची फवारणी सह गोचीड व जंत निर्मुलन करण्यात आले, व विषाणूजन्य आजार लंम्पी स्कीन डिसी या आजारा विषयक उपयुक्त उपाययोजना व सविस्तर माहिती देऊन जन

वरफळकरांच्या आंदोलनाने विजवीतरण कार्यालय दणाणले.....उपकार्यकारी अभियंता यांच्या अश्वासनाने आंदोलन मागे

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे  ग्रामीण भागातील वीजपुरवठा विस्कळीत अनेक वेळा विद्युत वितरण कंपनी च्या निष्काळजीपणा मुळे झालेला असल्याच्या अनेक तक्रारी तालुक्यात असतांना मौजे वरफळ येथील सिंगल फेज योजनेचे रोहित्र वेळोवेळी जळत आहे याबाबत गावकऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या निदर्शनास आणून दिले असता विद्युत विभागाकडून अत्यंत खराब दर्ज्याचे रोहित्र दुरुस्त करून आणून दिलेले असल्याचा आरोप करत नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला याबाबत गावकरी यांचे म्हणणे आहे की मागील अनेक वर्षापासून विजेच्या समस्या बाबत कायमचा तोडगा निघत नसल्याने स्थानिक गावकरी लोकवर्गणी जमा करून गावातील जळालेले रोहित दुरुस्त करून आणतात व रोहितरावर झालेल्या बिघाडा चा खर्च सुद्धा गावकरी आपल्या माध्यमातून करतात परंतु जळालेले रोहित्र दुरुस्तीच्या नावाखाली अत्यंत खराब दर्जाचे व त्यातील आई हे पूर्णतः काळे असतात त्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महिना महिना दोन दोन महिने घरगुती वीज पुरवठा मिळत नाही तरीही विद्युत वितरण विभागाकडून विजेचे बिल देण्यात येतात यामुळे

पैठणच्या जायकवाडी धरणातील पाणी गंगापात्रात सोडल्याने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा आमदार लोणीकर यांच्या तहसीलदारांना सूचना

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पैठण च्या जायकवाडी धरणातील पाणी गोदापात्रात सोडल्यामुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्याला आलेल्या पूरांमुळे नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले नदीकाठच्या गोळेगाव चांगतपुरी सावरगाव गंगासांगवी येथील शेतकऱ्यांच्या शेतात गोदावरी नदीचे पाणी शिरल्यामुळे तेथील सोयाबीन कापूस मूग उडीद तुर अशा अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी याची तात्काळ दखल घेत परतुर तहसीलदार यांच्याशी ध्वनीवरून संपर्क साधला व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत..! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा याची काळजी घेण्यासंदर्भात देखील लोणीकरांनी सूचना केली यावेळी दूरध्वनीवरून तहसीलदार यांना बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की अतिवृष्टी किंवा सततच्या पावसाने ते 33 टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या पिकांचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत त्यामुळे शासनाच्या आदेशाची वाट न पाहता ते 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले आहे त्यामुळे तात्

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान

Image
नेर प्रतिनीधी  सुभाष वायाळ    जालना तालुक्यातील नेर सारख्या ग्रामिण भागात मरावे परि कीर्तीरुपी उरावे या उक्ती प्रमाणे येथील ९० वर्षीय जेष्ठ महिला नागरीक श्रीमती कौसल्याबाई रामेश्वर लाहोटी यांचे काल मरणोपरान्त यशस्वी नेत्रदान झाले.या घटनेचे सर्व स्तरातुन लाहोटी कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.               दि.04/9/22 रोजी सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्ट हिवर्डी   यांच्यातर्फे नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली होती. त्यावेळी कौसल्याबाई रामेश्वर लाहोटी वय 90 वर्षे यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. आज दि.21/9/22 रोजी त्यांचा हा संकल्प त्यांच्या नातू गौरव श्रीनिवास लाहोटी यांनी सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ.लुंगाडे.एस. एस.यांच्या मदतीने सकाळी 2 वाजता फोन करून आजीला देवयाज्ञा झाली हे निश्चित केल्यानंतर पूर्ण केला. ग्रामीण भागातून सूर्योदय चॅरीटेबल ट्रस्ट हिवर्डी, यांच्या प्रयत्नातून प्रथमच नेत्रदान झालेले आहे. डॉ लुंगाडे यांनी लोकांना नेत्रदानासाठी संकल्प करण्याचे आव्हान केले.या कार्यासाठी श्री गजानन मुरलीधर उफाड, भूषण कुरकुटे, लाहोटी परिवार, व डॉ. गणेश राठोड व अभय करावा यां

वाई येथे जनावराचे मोफत लसीकरण

Image
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ   वाई ग्रामपंचायत च्या वतीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लंपी साथरोग प्रतिबंधक लस देण्यात आली या मोहिमेचा समारंभ वाई गावचे सरपंच परमेश्वर उबाळे तसेच उपसरपंच सुनील दत्तात्रय ठाकरे तसेच गावचे मानकरी नारायण पाटील उबाळे यावेळी हजर होते      सुमारे चारशे ते साडेचारशे जनावरांना या मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली वाई गावातील नागरिक शेतीसह मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करतात सद्यस्थितीला लंबी हा सात रोग झपाट्याने वाढत असल्याने शेतकरी व पशुधन पालक चिंतेत आहेत शासनाकडून लपी प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने सरपंच परमेश्वर उबाळे तसेच पत्रकार रामेश्वर उबाळे यांनी पुढाकार घेऊन खाजगी लस उपलब्ध करून दिली. त्यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण सर तसेच डॉक्टर मानमोडे सर तसेच त्यांची पूर्ण टीम वाई गावात दाखल झाली तसेच सरपंच यांनी जनजागृती करताना शेतकऱ्यांनी जनावरांचे गोटे फवारून घ्यावे लिंबाचा पाला दिवस माळवतेच्या वेळी लिंबाच्या पानाचा धूर करावा असे आवाहन केले.

कापकार मेडीकल च्या वतीने तळणी येथे जनावरांसाठी लम्पीस्कीन आजारावर मोफत लसीकरण

Image
तळणी प्रतिनिधी  रवी पाटील         ता.२१ ; मंठा तालुक्यातील तळणी येथे जनावरांसाठी लम्पीस्कीन आजारावर मोफत लसीकरण बुधवार ( ता.२१ ) रोजी कापकर मेडीकल तर्फे गढी जवळील परकोटात आयोजीत करण्यात आले होते.जनावरांच्या या आजारामुळे अनेक शेतकरी त्रस्त होते. या लसीकरण शिबिरात पाचशे जनावरांचे लसीकरण करण्यात आले.सामाजीक बांधीलकीचा वसा जपत सामाजीक कार्येकते गणेश कापकर यांनी जनावरांसाठी मोफत लसीकरण ठेवले होते. यावेळी डॉ. वासुदेव राठोड, डॉ.बी.जे.सरकटे, डॉ. संकेत खंदारे , डॉ.पवन आघाव, डॉ.विशाल मोरे शेतकरी ग्रामस्थ आदि ऊपस्थित होते. श्रीधर कापकर यांनी मोफत लस उपलब्ध करुन दिली. ग्रामीण भागातील जनावाराना लसीची व मनुष्यबळाची कमतरता असल्या कारणाने उपलब्ध असलेले सरकारी व खाजगी जनावारावर तळणी परिसरातील अन्य तीन ते चार डॉक्टराच्या सहाय्याने या श्रीधर कापकर व गणेशराव कापकर याच्या पूढाकाराने या पाचशे जनावाराना मोफत लसीकरण करण्यासाठी मोठी मदत झाली तसेच तळणी हे मोठे बाजाराचे गाव असल्याने जनावाराची सख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे सदरील लसीकरणासाठी गेल्या तीन दिवसापासून सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात ज

बबन दुलबाजी एक्कीलवाले यांचे निधन

Image
परतूर हनुमंत दवंडे      येथील बबन दुलबाजी एक्कीलवाले यांचं अल्पशा आजाराने दि. १९ सप्टेंबर वार सोमवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्ष होतं. येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता एक्कीलवाले यांचे ते वडील होते.          त्यांच्यावर येथील वैकुंठधाम स्मशान भूमी येथे दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कु. साक्षी बोरकरचा मनसे विधार्थी सेनेचे काकडे यांच्या कडून सत्कार

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात            रिसोड (जि. वाशीम) तालुक्यातील वडजी येथील कु.साक्षी रमेश बोरकर या विद्यार्थीनीचे वडील मयत झाले असता. वडिलांचा मृतदेह घरामध्ये होता. व या विद्यार्थीनीचा इयत्ता १२ वी पेपर त्याच दिवशी होता.       या दुःखाच्या डोंगरात परीक्षाच्या दिवशी कु. साक्षी बोरकर हिने वडिलांचा मृतदेह घरामध्ये असताना आगोदर पेपर देऊन दिला व नंतर वडिलांच्या पार्थिवाला आग्निडाग दिला. संकटाचा सामना कसा? करावा हे उदाहरण कू. साक्षी हिने दिल्याचे दिसून आले आहे. या बद्दल या विद्यार्थिनीचे सामाजिक स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. ही बातमी मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांच्या कानावर पडली असताना त्यांनी वाशिल जिल्ह्यातील रिसोड येथे जाऊन गुणी विद्यार्थी साक्षी बोरकर हीची भेट घेऊन सत्कार करत अभिनंदन केले. या वेळी या विद्यार्थिनीने बँकिंग क्षेत्रात प्रगती करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांच्यासह खाजा भाई पठाण, विद्यार्थिनीचा भाऊ मयुर बोरकर, सचिव किशोर सपकाळ आदी उपस्थित होते.

शेतकर्यानी ई पीक पाहणीची नोद करावी मंठा तहसीलदार वाघमारे यांचे आव्हाहन

तळणी प्रतीनीधी रवी पाटील       सपूर्ण मंठा तालूक्यासह तळणी मंडळात होणाऱ्या सततच्या पावसाने होणारे नुकसान व पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी करण्याचे आव्हाहन मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे यानी शेतकर्याना केले आहे ई पीक पाहणी साठी अँप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून कुठल्याही परीस्थीतीत शेतकर्यानी ई पीक पाहणी करून घ्यावी असे आव्हाहन केले असले तरी अनेक शेतकर्याकडे पीक पाहणी मोबाईल नाहीत शेतकर्याना नोद कशा प्रकारे करावी याची माहीती नाही तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक याच्या कडे गावे वाटून दीली तरी तळणी परीसरात ई पीक पाहणी साठी ना मार्गदर्शन केले ना कृठली जनजागृती केली तळणी सज्जाचे तलाठी यानी मागील काही दिवसात सोशल मिडीयावर माहीती देऊन ई पीक पाहणी साठी येणार असे सागीतले खरे प्रत्यक्ष्य ते पाहणी करण्या साठी आलेच नसल्याचे शेतकरी भगीरथसिग चंदेल  यानी सांगितले तसेच स्थानिक तळणीसह परिसरातील असंख्य शेतकरी ई पीक नोदणी पासून वंचित आहे ई पिक नोदणी केल्याशिवाय पिक विमा व शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे ई पीक नोंदणी च्या प्रारभी अँप मध्ये असलेल्या असख्य अडचणी चा सामना शेत

मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे ५० लक्ष रुपये किमतीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामाचे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन ,लंम्पी प्रादुर्भाव व उपाय योजना लसीकरण मेळावा पांगरी येथे संपन्न=लंम्पीमुळे दुधाळ जनावर दगावल्यास ३०००० तर बैल दगावल्यास २५००० व वासरू दगवल्यास १६००० रु शेतकऱ्यांना देणार - लोणीकर

Image
 मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ मी शेतकरी असल्यामुळे लावणीला असलेले बैल गाय वासरू दगावल्याचे दुःख मला चांगले माहीत असून शेतकऱ्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या जनावरांवर लम्पि नावाच्या साथीच्या रोगाने, शेतकऱ्यांना संकटात टाकले असून या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी व जनावरे वाचवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार संपूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथे ५० लक्ष रु किमतीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन व लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात या संदर्भातील मेळाव्यात बोलत होते यावेळी मंचावर हभप विठ्ठलगिरी महाराज गोखुरेश्वर संस्थान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊसाहेब पाटील कदम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामराव भाऊ लावणीकर उत्तमराव राठोड, बाबूलाल डी.पवार उपसभापती नागेश घारे, भाजपा जालना तालुका अध्यक्ष प्रकाश टकले सरपंच परमेश्वर मानकर, उपसरपंच संतोष पवार डॉ.आशिष राठोड महादेव बाहेकर, कल्याण उब

सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास पोलीस बांधव कटीबद्ध - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,सेवली येथील सुसज्ज पोलीस ठाणे इमारतीचे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. समाजातील दुर्जन शक्तीचा पराभव करण्यासाठी सज्जनशक्ती सक्रिय होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाने अतिशय उत्तमपणे आपले कार्य करावे,असे वाटत असेल तर समाजातील सर्व सज्जन शक्तीने देखील पोलीसांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले जालना तालुक्यातील सेवली येथे आयोजित पोलीस ठाणे लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे पोलीस उपाधीक्षक श्री राजू मोरे गणेशराव खवणे ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव पीएन यादव विकास पालवे डॉ.शरद पालवे कोमल कुचेरिया सरपंच नवीद शेख कार्यकारी अभियंता कांडलीकर पोलीस निरीक्षक कोठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या कुठल्याही सज्जन व्यक्तीला त्रास होणार नाही.

पोलीस क्रीडा सर्धेत अमलदार गणेश शिंदे यांनी पटकावले सुवर्ण पदक

Image
 जालना प्रतिनिधी समाधान खरात         औरंगाबाद येथे पोलीस क्रीडा स्पर्धेत वजन गटात  सर्वाधिक वजन उचलून आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अमलदार गणेश शिंदे यांनी सहभागी होऊन जालना जिल्ह्याला सुवर्ण पदक पटकावून दिले आहे. औरंगाबाद ग्रामीण येथे होत असलेल्या ३६ वी औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये जालना पोलीस दलातील परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अमलदार गणेश विठ्ठल शिंदे यांनी वेटलिफ्टिंग प्रकारात दि १७ सप्टेंबर  रोजी त्यांच्या वजन गटात सर्वाधिक ११७ कीलो वजन उचलून प्रथम क्रमांक घेत जालना जिल्हाला सुवर्ण पदक पटकावून दिले. यासाठी जालना पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनासह जालना टीमचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, व खेळप्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय निर्मल यांचे मार्गदर्शन लाभले.  जालना पोलीस दलाने सुवर्ण पदक पटकावल्याने जालना पोलीस दलाची मान उंचावली आहे. पोलीस अमलदार गणेश शिंदे यांनी सुवर्ण पदक पटकावून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी र

जालन्यातील १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपये निधीच्या कामात मोठा अपहार झाला असल्याची तक्रार वीकास बागडी यांनी केली

Image
  जालना प्रतिनीधी  समाधान खरात        जालन्यातील १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपये निधीच्या कामात अपहार मोठा अपहार झाल्याची पत्रकार तथा जालना समाचारचे संपादक  विकासकुमार बागडी यांनी राज्यपालासह सर्व संबंधिकांकडे एका निवेदनाव्दारे तक्रार केली असून सदर निवेदनाच्या शेवटी जीवीतास धोका असल्याचेही  नमूद केले आहे.  या संदर्भातील निवेदनात बागडी यांनी म्हटले आहे की, जालना शहराच्या जल वितरण करीता शासनाने १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपयांचा निधी खर्च करुन नगर परिषद हद्दीत जन सामान्य जनतेसाठी ४१९ किलो मीटर लांबीची पाईप लाईन आणि ९ जल कुंभ आदी जल वितरण करीता कामाचा करारनामा  मुख्याधिकारी नगर परिषद, जालना यांनी आर. ए. घुले कंत्राटदार पालघर जि. ठाणे यांनी सन २०१६ (दि. २३ जून २०१६) मध्ये केला होता.         सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषद जालना यांनी मे. फोरट्रेस इन्फ्रास्टक्चर ऍडव्हायचरी कन्सलंटस् मुंबई यांची योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन समिती म्हणून नियुक्ती केली आहे. या योजनेची सर्व कामे आराखड्यानुसार पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी या संस्थेची आहे

रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने रमेश कुडे सन्मानित

Image
 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ     दि. १८ मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हेलस येथील मुख्याध्यापक श्री.आर.बी.कुडे यांना त्यांचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गोडी निर्माण करणारे, विद्यार्थी प्रिय, तालुक्यामध्ये शिस्तप्रिय म्हणून अशी ओळख असणारे व त्यांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. डीडी विसपुते महाविद्यालय विचुंबे, पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी श्री महेंद्र विसपुते यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. प्रसंगी श्रीमती मनीषा पवार मॅडम शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग .श्रीमती पालकर मॅडम उपशिक्षणाधिकारी रायगड .श्री राजेश सुर्वे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष,श्री शाहू भारती संपादक दैनिक रयतेचा कैवारी व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मंठा शहरांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रा

नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात कणखर पंतप्रधान - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,खर्च टाळून सेवा समर्पण पंधरवाडा साजरा करा - लोणीकरांचे आवाहन,सेवा समर्पण पंधरवाडा निमित्त लोणीकरांच्या हस्ते अस्थिव्यंग विद्यालयात ब्लॅंकेट शालेय साहित्य व फळ वाटप तर नानसी पुनर्वसन येथे वृक्ष लागवड

Image
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ देशातील सर्वसामान्य जनतेसाठी व राष्ट्रकार्यासाठी दिलेले आजपर्यंतचे अमुल्य व आदर्शवत असे योगदान देणारे देशाचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांचे नाव डोळ्यासमोर येते त्यांच्या नावाचा, कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा राष्ट्रपती समर्पण भावाचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतापर्यंतच्या पंतप्रधानांच्या तुलनेत सर्वात कणखर पंतप्रधान आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले मंठा येथील कै रामराव कान्हेरकर निवासी अस्थिव्यंग विद्यालय येथे सेवा समर्पण पंधरवाडा निमित्त आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टी मंठा तालुक्याच्या वतीने ब्लॅंकेट वाटप, शालेय साहित्य वाटप तसेच फळ वाटप करण्यात आले यावेळी गणेशराव खवणे, संदीप भैया गोरे, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेशराव घारे, प्रसादराव गडदे, नाथराव काकडे, प्रल्हादराव बोराडे प्रसादराव बोराडे, विठ्ठल मामा काळे, सुभाष राठोड, कैलास बापू बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. द