Posts

Showing posts from August, 2023

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

Image
 परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण परतुर येथील  न्यू वंडर किड्स ईंग्लीश स्कुल मधे  शैक्षणिक वर्ष 2022/23 यावर्षी घेण्यात आलेल्या अॉलिंपियाड राज्यस्तरिय हस्ताक्षर स्पर्धेत  पहिली ते नववी मधिल तब्बल 45 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन  केले.        यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष  गणेश सोळंके  यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना प्रमाण पत्र आणि गोल्ड मेडल वितरित करण्यात आले. कार्याध्यक्ष .या प्रसंगी  सोंळके बोलताना  म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील प्रत्येक स्पर्धात्मक परिक्षेत भाग घ्यावा जेणे करुन विद्यार्थी भविष्यात सर्धा परिक्षेत  सहज यश संपादन करता येईल            यावेळी संस्थेच्या सचिव सौ छाया बागल मॅडम, प्रिन्सिपल साम वर्घिस सर  संपूर्ण शिक्षक वृंद  व वीद्यार्थी उपस्थित होते.

पाटोदा येथे श्री समर्थ विद्यालयात नागपंचमी निमीत्त प्रदर्शन.

Image
परतुर प्रतीनिधी कैलाश चव्हाण पाटोदा [ माव ] श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात नागपंचमी चे निमित्ताने विवीध जातींच्या सर्पाचे छायाचित्राचे प्रदर्न आयोजीत करण्यात आले होते.    आपले प्रत्येक सण व ऊत्सव हे वैज्ञानिक दृष्ट्या परीपुर्ण आहेत. आपण त्या मागील कारण मिमांसा समजुन घेतली पाहीजे.  नागपंचमी चे दिवशी देशाभर नागदेवतेची पुजा करण्यात येते . सापांबद्दल असलेले गैरसमज दुर व्हावेत या साठीच विद्यालयात चित्रमय माहीतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.    महाराष्ट्रात आढळुन येणारे बहुतेक साप हे बिनविषारी आहेत. साप हा शेतकर्यांचा मित्र असुन सापांना शक्यतो ठार मारु नये.  विद्यालयाचे शिक्षक श्री चत्रभुज खवल यांनी प्रत्येक सापाची जात त्याचा आढळ ई. लक्षणे विद्यार्थ्यांना समजुन सांगितली.    मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी संकलीत केलेल्या माहीतीवर आधारीत या चित्रप्रदर्शनीला विद्यार्थ्यांनी खुप मोठा प्रतीसाद दिला. साप चावल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार या वेळी समजुन सांगण्यात आले. प्रदर्शन यशस्वीतासाठी विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंदांनी परीश्रम घेतले.

बेकायदेशीरित्या विदेशी दारुच्या मालाची चोरटी वाहतूक करताना इसमास अटक

Image
 परतूर प्रतीनीघी कैलाश चव्हाण दिनांक 09/08/2023 रोजी 12.30 वाजता ईसम नामे सिध्दार्थ शांतीलाल सदावर्ते हा वाटुर-परतुर रोडवर नागापुर येथील नायरा पेट्रोलपंपासमोर विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारुच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उददेशाने मिळुन आला आहे. सदर आरोपीकडून विदेशी दारु Mc Donwells, Officer's Choice Blue Whisky, Royal Stag Deluxe, Imperial Blue किंमती 12800/- व मोटारसायकल असा एकुण 27800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदरची कारवाई मा. तुषार दोशी पोलिस अधीक्षक , मा. डॉ. राहुल खाडे , अप्पर पोलिस अधीक्षक , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी .बुधवंत  ,  पोलीस निरीक्षक श्री.एम.टी.सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली पोउपनि केंद्रे पोलीस अंमलदार किरण मोरे, गजानन राठोड व ज्ञानेश्वर वाघ यांनी केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या बचत खात्याचे होल्ड काढून पीएम किसान सन्मान निधी व अनुदान शेतकऱ्यांना सन्मान आणि द्या - आमदार लोणीकर,आष्टी मंठा व परतुर पोलीस ठाण्यास नवीन जीप गाड्या उपलब्ध करून देण्याची आमदार लोणीकरांची पालकमंत्र्याकडे मागणी

Image
  परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण     गेल्या वर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले होते. पीक उत्पादन करण्यासाठी केलेला शेतकरी बांधवांचा खर्च ही वसूल झाला नव्हता. आणी त्यातच शेतकरी बांधवांनी व्याजाने किंवा उसने पैसे कशीबशी बी बियाणे व खताची उपलब्धता निर्माण करून शेतात पेरणी केली असून. शेतातील पिकांची नासधूस हजारो हरीण रानडुक्कर रोही व वानराच्या कळपाने माझ्या परतूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी पुरता वैतागला आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाची तातडीने पंचनामे करून शेतीमालाचा झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याची माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनास केल्या.  शेतकरी बांधव आता गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून राज्य सरकारच्या तिजोरीतून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री द

प्रा.शाम जवळेकर यांना गणित विषयात ph.D प्राप्त

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  स्वामी विवेकानंद बीसीए महाविद्यालय मंठा चे प्रभारी प्राचार्य  शाम दिनकरराव जवळेकर यांनी नुकतेच मॅथेमॅटिक्स या विषयामध्ये प्रोफेसर डॉक्टर शोएब अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर करून विद्यावाचस्पती(ph.D) हि पदवी प्राप्त केली आहे.  अनाल्याझिंग द असिम्प्टोटिक प्रॉपर्टीज ऑफ झिरो सेट्स ऑफ मल्टी वरायटीज पोलिनोमिया अँड डियर प्रॅक्टिकल एप्लीकेशन. या प्रमुख विषयामध्ये शोध प्रबंध सादर केला. या साठी त्यांना गणित विभाग प्रमुख प्रा डॉ शोएब अली सय्यद व बहिस्त म्हणून प्रा डॉ निधी राईकुंदलिया यांनी सहकार्य केले.    प्रा शाम जवळेकर यांनी मिळवलेल्या यशा बदल संस्थेचे सचिव  कपिल भैया आकात, उपाध्यक्ष  कुणाल दादा आकात,प्राचार्य डॉ भारत खंदारे,प्राचार्य डॉ माणिकराव थिटे,प्राचार्य डॉ सुधाकर जाधव,प्रा डॉ सदाशिव कमळकर,प्राचार्य डॉ मानव ठाकूर,प्राचार्य डॉ शिदे सर, प्रा डॉ भगवानसिग ढोभाल,श्री दत्ता भाऊ पाथ्रीकर,प्रा डॉ शरद कुलकर्णी,श्री अशोक मुळे, प्रभाकर सुरुग,प्रा डॉ बापू सरवदे आदी महाविद्यालयामधील सहकारी मित्र परिवाराच्या वतीने आनंद व्यक्त होत आहे तर स

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत योजनेत देशातील लहान आणि महत्त्वाच्या १२७५ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा आणि सिटी सेंटर उभारले जातील. या योजनेद्वारे देशातील १००० हून अधिक लहान स्थानकांचे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये परतुर रेल्वे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला असून ०६ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी सकाळी ०९ वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शुभ हस्ते केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत १२ कोटी ०८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत केंद्र सरकार मार्फत परतुर स्थानकाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्र ट्रिपल इंजिनचे सरकार अस्तित्वात आले अ

जालना जिल्हा मध्य गोरसेनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण    जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा येथे गोर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.. विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील होत असलेली बोगस राजपूत भामटा परदेशी,मीना, छप्परबंद, समाजाशी घुसखोरी थांबविण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी चौकशी पूर्ववत लागू झाली पाहिजे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले.. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले असल्याचे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी सांगितले.  मागील अनेक वर्षापासून विमुक्त जाती (अ )प्रवर्गामध्ये अवैधरित्या व संवैधानिक मार्गाने जात वैधता प्रमाणपत्र मिळवणारे राजपूत ,परदेशी, मीना व छप्परबंद लोकांनी फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे त्यामुळे मूळ विमुक्त जाती अ प्रवर्गातील लोकांचे आरक्षण संपूर्णतः धोक्यात आलेले आहेत त्यामुळे विमुक्त जाती-अ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच या प्रयोगातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अन्याय सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गोरसेनेच्या वतीने २०१९ पासून वेगवेगळ्या स्वरूपाची आं

सचिन राठोड यांची भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वर निवड

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण      भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकार्णी जाहिर करण्यात आली त्यात .सचिन राठोड यांची प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाली.श्री.सचिन राठोड हे मंठा तालुक्यातील असून ते सर्वसामान्य कुटुंबातील असून माजी मंत्री आमदार.बबनराव लोणिकर व भाजपा युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणिकर यांचे अत्यंत विश्वासू मानले जाते  जालना जिल्हा असो की महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातील सोशल मीडिया च्या माध्यमातून पक्षा साठीची तळमळ व काम करण्याची जिद्द ठेवून पक्षाचे एकनिष्ठ पणे काम करुन लोकांचे प्रेम कमावलं त्याचे फळ त्यांना सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर सदस्य या रूपाने मिळालेला आहे श्री सचिन राठोड यांची सोशल मीडियातील कारकीर्द अशाच पद्धतीने वृद्धिंगत होत राहो अशा शूभेच्छा सर्वत्र बाबीकडून देण्यात येत आहे

रामेश्वर मंदिरा समोर भक्तांनी उभा केला स्वखर्चाने सभा मंडप...

Image
परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण      दि .03 परतूर शहरातील रामेश्वर गल्लीतील शिवभक्तांनी तब्बल पाच लाख रूपये खर्च त स्वखर्चाने सभा मंडप उभा केला .        परतूर शहरातील गाव भागातील रामेश्वर मंदिराचा मोठा इतिहास आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात जिल्ह्याभरातून दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. पण या ठिकाणी सभा मंडप नसल्या कारणाने नागरिकांना तासन तास ऊन पाऊसा मध्ये उभा राहून दर्शन घ्यावे लागते. ही बाब निवृत्त साहाय्यक कृषी अधिकारी सदाशिव उर्फ सोनू भाऊ बरीदे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी गल्लीतील शिव भक्त यांची बैठक लावली व तात्काळ सभा मंडप उभा करायचा असे आवाहन केले. त्यांच्या हाकेला साथ देत सर्व युवक एक झाले व जवळपास पाच लाखाच्या वर लोकवर्गणीतून निधी जमा झाला व दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात आले. आता या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम तर होतच आहे त्याच बरोबर गोरबरीब नागरिकांचे लग्न देखील होत आहे. या मंदिराच्या सभागृहाची चर्चा पूर्ण शहरात होत आहे. या युवकांनी दिले योगदान बाळू रोहिणकर,राहुल मानवतकर,दीपक बरीदे, सौरव दसमले,शंतनू कपाळे,राम हारबक,गणेश सोनवणे, दि

लाच स्वीकारल्या प्रकरणी ग्रामसेवकाला पाच वर्षाची कैदेची सजा

जालना प्रतिनीधी समाधान खरात दि.३ मे २०१६ रोजी आभोरा शेळके येथील ग्रामसेवक मेहबुब अमीन मसूलदार यांनी फिर्यादी कडून वडीलाच्या नावावरील घर वारसा हक्काने व भावाच्या नावावरील घर वाटणी पत्राच्या अधारे तक्रारार दाराकडून नमूना नं ८ देण्यासाठी   दोन हजार रुपए ची मागणी केली होती परंतु तडजोडी मधे १५०० रु देण्याचे ठरले खर तर फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे तक्रार दार यांनी लाचलुचपत कार्यालय जालना यांना तक्रार दिली यांनंतर लाचलूचपत तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे यांनी सापळा रचून सदरील गुन्हा मंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदववून दोषारोप पत्र दाखल केले होते या दोषारोप पत्रा अधारे मा. न्यायलयाने कामकाज चालवून साक्षीदार, पंच व तपास अधिकारी याचे साक्षी पुरावे नोंदवून दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. ४ जालना मा. किशोर एम. जैस्वाल यांनी सापळा कार्यवाहीतील ओलोसे ग्रामसेवक मेहबूब अमीन मसलूदार यास भ्रष्टाचार अधिनीयम १९८८ कलम ७ अन्वेये चार वर्ष सक्त मजूरी व दहा हजार दंड तसेच कलम १३ (२) पाच वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व दहा हजार रू दंड व दंड न भरल्यास सहा म