Posts

Showing posts from May, 2022

शिवसेनेच्या वतीने योगेश कुलकर्णी यांचा सत्कार

Image
परतूर प्रतीनीधी हनुमंत दंवडे  धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे कलाकार परतूर शहराचे भूमिपुत्र योगेश कुलकर्णी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपट) या चित्रपटात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका उत्कृष्टपणे निभावल्या बद्दल परतुर शिवसेनेच्या वतीने योगेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.             यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, विकास खरात, उपशहरप्रमुख दिपक हिवाळे, राहुल कदम, संदीप पाचारे,श्री ठोंबरे,व परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतिने सत्कार करण्यात आला. कोरोणा काळ संपल्यानंतर प्रथमच या मराठी चित्रपटाने २० कोटीचा गल्ला जमलेला असून सर्व महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे. योगेश कुलकर्णी हा परतूर येथील भुमी पुञ असून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका हुबेहुब साक्षात न्याय दिल्या बद्दल योगेश कुलकर्णी यांचा खरोखरच परतुर वासि...

मंठा तालुक्यातील गुटका विक्री थांबेना...शहरात व खेड्या-पाड्यातील किराणा दुकानावर गुटखा विक्री जोरात ; संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

Image
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ दि.३० शहरासह तालुक्यात गुटखा विक्री पुन्हा बोकाळली आहे. शहरातील प्रत्येक व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील किराणा दुकानात सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मंठा तालुका मराठवाड्यातील गुटखाविक्रीचे केंद्र झाले आहे.याकडे जिल्हा वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मागील तीन वर्षापासून गुटका विक्रीने कळस गाठला आहे.तालुक्यात व शहरात गुटका विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. गुटखा विक्री करणारे माफीया संबंधित विभागाला हाताशी धरून आपला काळाबाजार चालवत आहेत.याकडे वृत्तपत्र अथवा इतर कोणी यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तर त्यांची मुस्काट दाबी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. किवा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येते.यामुळे गुटका माफियाची दादागिरी शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पंधरवड्यात दोन-तीन दिवस गुटका विक्रीलाचा चाप बसला होता. परंतु पुन्हा आर्थिक हव्यासापोटी गुटखा विक्री गोरख धंदा शहर परिसरात व खेड्यापाड्यात बोकाळली आहे.    मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटका शहरा...

३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करा- प्रकाश सोनसळे धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य

Image
प्रतीनिधी हनुमंत दंवडे  आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश  सोनसळे यांनी अनेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.     आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन मा.ज्ञानेश्वर गाडेकर सर व सुंदरराव काकडे मंडलाधिकारी हस्ते करण्यात आले.  राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.महादेव हजारे ग्रामसेवक यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश सानप, बनसोडे  यांच्या हस्ते करण्यात आले.    यावेळी बोलताना प्रकाश  सोनसळे यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद ,महानगरपालिका,व शासकीय कार्यालये या ठिकाणी जयंती साजरी करण्यात यावी असे बोलताना सांगितले.   यावेळी शितल मतकर,पवन गावडे, विशाल प्रभाळे, सुधाकर वैद्य, सुभाष महानोर,कसपटे भैय्या,प्रभाळे भैय्या,वैध भैय्या, आदी समाज बांधव उपस्थित होते.

पोलिस पाटील तुकाराम शिंगटे यांचे निधन

Image
   परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे तालुक्यातील आनंदवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक पोलिस पाटील तुकाराम आंबादास शिंगटे यांचे अल्पशा आजाराने दि २८ मे २०२२ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षाचे होत.            त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, एक भाऊ, चार बहिणी, जावई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आनंदवाडी येथे शेतात दुपारी दोन वाजेचा सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.    

विकास कोरडे यांची नायब तहसीलदार बीड पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करताना प्रकाश सोनसळे (धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य व सहकारी )

Image
बीड प्रतिनिधी हनुमंत दंवडे  आज बीड येथे मा. विकास कोरडे साहेब यांची बीड तालुका नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला‌. यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज नेते महाराष्ट्र, डॉ.संतोष महानोर, नारायण भोंडवे, शीतल मतकर, पवन गावडे, प्रजित भोंडवे, बाळासाहेब गावडे, राहुल ठेंगल, विजय घोंगडे, महादेव सातपुते ,श्याम गाडेकर,काशीद मामा, सखाराम गोरे, विशाल प्रभाळे, मयुर खोमणे, योगेश केसकर , कृष्णा पितळे सरपंच, अविनाश बारणे,सुरेश देवडे, नारायण धापसे, महादेव हजारे, ग्रामसेवक ,ज्ञानेश्वर देवकते पोलीस, उपनिरीक्षक, कोकाटे सूर्यकांत , साईनाथ गावडे, सुधाकर वैद्य,शिवराम शिरगिरे, खांडेकर भैय्या ,परमेश्वर तागड, वैद्य सर,गुरव भैय्या, आजीनाथ भोंडवे,रूषीकेश भोंडवे, भाऊसाहेब भोंडवे, विश्वजीत ससाने ,अमर भोंडवे,आदींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

तळणी येथे गेल्या ६९ वर्षापासुन अंखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन ,सप्ताहाची सांगता सेवाधारी पौळ बाबा यांच्या काल्याच्या किर्तनाने

Image
तळणी प्रतिनीधी रवी पाटील तळणी येथील श्री संत नेमिनाथ महाराज याच्या ६९व्या पूण्य निमित्य चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता सेवाधारी पौळ बाबा यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली ( गोकूळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आंनदल्या नरनारी ) या अंभ गावर काल्याचे किर्तन केले हा काला फक्त भूतलावर भारतात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळेच या भूमीवर नामस्मरणाचे अध्यात्माचे पेव आहे भक्ती ही निस्वार्थ असावी त्यामध्ये कुठलाच स्वार्थ नसू नाही गवळणीची भक्ती जशी भगवान श्रीकृष्णावर होती त्यामुळे परमात्मा त्याच्या हाकेला धावून जात सत्य युगातील राजा हरिश्चद्राची साठ हजार वर्षाची तपश्चर्या केली तेव्हा देव भेटला त्या साठी त्याग निष्ठा व समर्पण व ईच्छा शक्ती असणे गरजेचे आहे आजच्या युगातील भक्ती ही नाटकी व स्वार्थी आहे मनुष्यावर संकट आली की तो भंगवंताचा धावा करू लागतो ईतका स्वार्थी मनुष्य झाला आहे    काला हा मानवी जीवनासाठी एक अमृतच आहे जो काला घेण्यासाठी भंगवंताला मश्य अवतार घ्यावा लागला तरी सुध्दा तो भंगवंताला मिळाला नाही ब्रम्हदेवाला न मिळालेला काला तुम्हा आम्हाला...

शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार द्विभाषिक पुस्तके

Image
 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ  दि.२६समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता मराठी, उर्दू व सेमी इंग्लिश माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सदर योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे.मंठा पंचायत समिती अंतर्गत मंठा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व शासकीय १४९ तसेच खाजगी अनुदानित १९ शाळांतील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या २०८४, इ. दुसरीच्या १९६९, इ. तिसरीच्या २०५५, इ. चौथीच्या २०३६, इ. पाचवीच्या २०४३, इ. सहावीच्या २०१२, इ. सातवीच्या १९४३ व इ. आठवीच्या २३५१ अशा एकूण १८५३६ लाभार्थी विद्यार्थ्यांना तसेच उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिली ८०, दुसरी ७४, तिसरी ७४, चौथी ८०, पाचवी ९१, सहावी ८५, सातवी ८०, आठवी ७९ अशा एकूण ६४३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे.  एकूण पुस्तक मागणी संख्येपैकी आजपावेतो मराठी माध्यामाची ९६ टक्के तर उर्दू माध्यमाची ९० टक्के पाठ्यपुस्तके गट साधन केंद्र मंठ...

१० हजाराची लाच घेतांना कंत्राटी संगणक परिचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Image
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ दि.२४ रजिस्ट्री केल्याचा टेबल खर्च म्हणून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना मंठा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कंत्राटी संगणक परिचालक आस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ता.२३रोजी रंगेहात पकडले. संदीप प्रभाकर जायभाये असे या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नाव आहे.     याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी ब्रह्मनाथ तांडा येथील प्लॉट खरेदी केला होता या प्लॉटची रजिस्ट्री १९ मे रोजी तक्रारदार यांनी दुय्यम निबंधक कार्यालय मंठा येथे जाऊन केली,परंतु रजिस्ट्रीचे कागदपत्र संदीप जायभाये यांनी स्वतःकडे ठेवून घेतली व तसेच त्यांनी करण्यासाठी लागलेला टेबल खर्च म्हणून तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.       या तक्रारीवरून २३ मे रोजी लाच मागणीसाठी मागणीबाबत पडताळणी केली असता संदीप जायभाये यांनी तक्रारदार यांच्याकडे रजिस्ट्री करण्यासाठी लागलेल्या टेबल खर्च म्हणून दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ती ...

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त बीड जिल्हा स्तरीय बैठक सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न.

Image
बीड प्रतीनीधी दि .२५रोजी बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती बीडजिल्हा बैठक सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.      शासकीय विश्रामगृह येथे मा.प्रकाश  सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर जयंतीचे नियोजन या संदर्भात बैठक घेण्यात आली.   यामध्ये जयंतीचे रूपरेषा व नियोजन करण्यात आले या बीड जिल्हा अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शीतल मतकर व उपाध्यक्ष पदी पवन गावडे, उपाध्यक्षपदी प्रजित भोंडवे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब गावडे, सचिव पदी राहुल ठेंगल, मार्गदर्शक विजय घोंगडे, महादेव सातपुते ,श्याम गाडेकर,काशीद मामा, सखाराम गोरे, विशाल प्रभाळे, मयुर खोमणे, योगेश केसकर , कृष्णा पितळे सरपंच, अविनाश बारणे,सुरेश देवडे, नारायण धापसे आदींची निवड करण्यात आली यावेळी विकास कोरडे साहेब,डॉ.संतोषजी महानवर, नारायण भोंडवे सरपंच, महादेव हजारे ग्रामसेवक,ज्ञानेश्वर देवकते पोलीस, उपनिरीक्षक, कोकाटे सूर्यकांत , साईनाथ गावडे, सुधाकर वैद्य,शिवराम शिरगिरे, खांडेकर भैय्या ,परमेश्वर तागड, वैद्य सर,गुरव भैय्या, आजीनाथ भोंडवे,रूषीकेश भोंडवे, भ...

पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार थकलेलं भविष्य निर्वाह निधी.....एमआयएमच्या पाठपुराव्याला यश.....

Image
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या जवळपास सर्वच कर्मचारी वर्गाला भविष्य निर्वाह निधी मिळत असतो परंतु मागील अनेक वर्षांपासून परतूर पालिकेच्या कंत्राटी कामगार यांना भविष्यनिर्वाह निधी मिळाला नव्हता ही बाब एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांच्या निदर्शनास येताच            त्यांनी याबाबत अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला आणि परतूर नगर पालिकेने कामगारांसाठी असलेले निधी भविष्यनिर्वाह निधीत न भरलेल्याने पालिकेतील कंत्राटी कामगार यांना भविष्यनिर्वाह निधीचा लाभ घेता आला नव्हता याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून कंत्राटी कामगार यांना भविष्यनिर्वाह निधी बाबतची असलेली अडचण दूर केल्याबद्दल पालिकेतील कामगार यांनी एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांचा सत्कार करून धन्यवाद व्यक्त केले...  यावेळी उपस्थित होते. एडवोकेट सुरेश काळे शेषेराव चव्‍हाण. दशरथ हीवाले .नामदेव चव्हाण .रमेश चांदलिया.सय्यद जावेद .अशोक हिवाळे .वाघमारे अशा मती .लक्ष्मण हिवाळे . गर्भिया काळे .बेबे कले .भागूबाई काळे .

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील – पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे

Image
       परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमी प्रयत्नशील आहे. पोलिस प्रशासन काम करीत असतांना वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी केले. येथील आष्टी रेल्वेगेट जवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्धभवत आहे. येथे उड्डाण पुलाचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक आहे. एका बाजूचा रस्ता बंद असल्याने रेल्वेगेट जवळ वळण रस्ता आहे. दोन वाहने एकाच वेळी वळत नसल्याने वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होत आहे. येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. रेल्वेगेट बंद झाल्यास काही काळ वाहतूक थांबत असल्याने वाहनाच्या रांगा लागत असल्याने वाहन चालक वाहने बाहेर काढण्यास घाई करून कधी अडथळा होण्यास करणीभूत ठरत आहे. पोलिस अश्या वाहनावर कारवाई केली. काहींना समज दिली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठक घेतल्या मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस प्रशासन हे जबाबदारी घेत स्वत रेल्वेगे...

परतुर ते चौंडी विशेष बस सेवेसाठी परतूर आगार प्रमुख यांना निवेदन...

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दंवडे 31 मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवासाठी परतुर आगारातून विशेष बस सेवा सोडण्याची मागणी आगार प्रमुख यांना मौर्य क्रांती संघ परतूर यांच्या नेतृत्वा खाली एका निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली        31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे भव्यदिव्य जन्मोत्सव साजरा केला जातो .या निमित्ताने चौंडी येथे देशभरातून हजारो भाविक भक्त अहिल्या प्रेमी जमा होतात ,परतूर तालुक्यातील चौंडी येथे जाणाऱ्या भाविक भक्त व अहिल्याप्रेमीची संख्या मोठी आहे. परतूर तालुक्यातील हजारो लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी परतुर आगारातून म्हणजे परतुर, आष्टी, लोणी ,माजलगाव या ठिकाणावरून बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली माननीय जिल्हाधिकारी आणि परिवहन मंत्री यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या . निवेदना वरील सह्या हनुमंत दवंडे ,दत्ता कोल्हे, विलास रोकडे ,भागवत रोकडे, विलास तरव टे, नामदेव गोरे, शिवाजी भालेकर ,बाबू गोसावी...

माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या मारेकर्याना कठोर शिक्षा व्हावी-- सिल्लोडे, कटुंबियास दहा लाख रुपयांची आर्थिक मदतीची मागणी

Image
मंठा - प्रतिनीधी सुभाष वायाळ दि.२३ यवतमाळ जिल्हा घांटजी तालुक्यातील पारवा येथील रहीवासी माहीती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यराञी अतिशय क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली माहीती आधिकारी अधिनियमानुसार माहीती मागीतली असल्याने सुड भावनेने क्रुर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार व प्रसार माध्यमातुन समोर आले आहे            हि घटना धक्कादायक असुन महाराष्ट्रांच्या प्रागतिक पंरपरेला काळीमा फासणारी आहे शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणुन काम करणार्या हजारो माहीती अधिकार कार्यकर्त्यांचे जागरुक व संवेदनशिल नागरिकांचे मनोधर्य खचुन जाणारी घटणा घटली आहे मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला लवकर ट्रॕक कोर्टात चालवुन दोषीवर कठोर शिक्षा द्यावी याप्रकारणात अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी सुञधार यांच्याही मुसक्या अवळव्यात माहीती अधिकार कार्यकर्ता म्हणुन जीव धोक्यात घालुन काम करुन प्रशासन शासन पारदर्शक चालावे म्हणुन आपल्या जिवाची बाजी लावणार्या मृत कार्यकर्ता यांच्या कुटुंबास किमान द...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्मोत्सव प्रत्येक गावागावात साजरा करणार-प्रकाश सोनसळे(धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य तथा सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना)

Image
  बीड प्रतिनिधी आज बीड येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.   या अभिवादन सभेचे आयोजक मा. प्रकाश  सोनसळे हे अनेक दिवसापासून एक समाजाला नवी दिशा देण्यासाठी हा उपक्रम चालवत आहेत.   आज बीड येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्यास अभिवादन डॉ.योगे साहेब यांच्या शुभहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर राजे यशवंतराव होळकर प्रतिमापूजन माननीय श्री शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व मल्हाराव होळकर यांच्या प्रतिमेचेपूज मा.श्री.बाबासाहेब लंबाटे अण्णा यांच्या हस्ते करण्यात आले.    यावेळी प्रकाश  सोनसळे यांनी बोलताना सांगितले की या वर्षी अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव प्रत्येकाने आपापल्या गावात साजरा करण्यात यावा यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करुया असे सांगितले.     यावेळी लिंबाजी महानोर साहेब, प्रकाश बुधनर, अमर वाघमोडे ,सतीश लंबाटे, सुधाकर वैद्य ,शीतल मतकर, कोळेकर मनोज, आदी स...

मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे परतूर शहरातील अतंर्गत सिमेंट रस्ते

Image
 परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे  शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नाने परतूर शहरतील प्रभाग क्र. ०८ मध्ये राहुल सातोनकर यांचे दुकान ते स्व. बाबुराव सातोनकर व्यायाम शाळे पर्यतच्या सिमेंट काँक्रीट रोडचे काम चालू असून     सदरील कामासाठी मोहन अग्रवाल यांनी नगर विकास मंञी एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आला आहे.सदरील कामासाठी माजी नगरसेवक मोहन अग्रवाल व शोभाताई लड्डा यांनी खूप शर्यतीचे प्रयत्न करून निधी उपल्ब्ध केला आहे. अग्रवाल यांच्यामुळे परतूर शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते चकाचक होत आहेत. प्रत्येक्षात सिमेंट रस्त्याचे काम सुरु झाल्यावर येथील नागरिकांनी अग्रवाल व सौ.लड्डा यांचे आभार मानले.

मंठा येथे होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या निमंत्रक पदी ए.जे. पाटील बोराडे

Image
मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ       अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिनांक 28 व 29 मे रोजी अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन जालना जिल्हयातील मंठा शहरातील गणेश मंगल कार्यालय लॉन उस्वद रोड मंठा येथे होणार आहे. या संमेलनाच्या निमंत्रक पदी ऐ. जे.पाटील बोराडे यांची निवड करण्यात आली. या निवडी नंतर मंठा येथील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोराडे यांनी संमेलनात जास्तीत जास्त लोकांनी या संमेलनात सहभाग नोंदवावा असे आव्हान श्री बोराडे यांनी केले आहे,    अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 1993 पासून आज पर्यंत वेगवेगळी 116 संमेलन घेतली आहेत. यामध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. मंठा येथे 28 व 29 मे2022 रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे तर स्वागताध्यक्ष इंजि.विजय घोगरे भूषिवणार आहेत,  29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनात राज्यभरातून जवळपास 400 साहित्यिकांनी संमेलनात आपली नोंदणी केली आहे. हे संमेलन मंठा सारख्या ग्रामीण भागात होत...

२१ मे रोजी होणाऱ्या भव्य रास्ता रोको आंदोलन व ओबीसी परिषदेसाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा- ओबीसी परिषदेचे आवाहन

मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ  महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले जे मध्यप्रदेश मध्ये होऊ शकतो ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा संतप्त सवाल प्रत्येक ओबीसी समाजाचा व्यक्ती आज विचारतो आहे आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आपलं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्ती संघर्ष करण्यासाठी तयार आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे मध्यप्रदेशातील राज्य सरकारने ओबीसींसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या अटींप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाचे नेमणूक केली ओबीसींचा इमपेरिकल डेटा तयार केला ट्रिपल टेस्ट ची अट पूर्ण केली आणि तेथील ओबीसी आरक्षण टिकले परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा सरकार म्हणून कुरघोडी करत सत्तेत आलेले सत्ताधारी मात्र केवळ वसुली करण्यात मग्न आहे आहेत ओबीसींच्या इंटरिकल डेटा ट्रिपल टेस्ट किंवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या निवडणुकीबाबत ब्र शब्द न करता केवळ केंद्र सरकारच्या नावाने आरडाओरड करण्यात धन्यता मानत होते परिणामी ओबीसींचे हक्काचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले यासाठी पूर्णतः राज्य सरकार जबा...

29 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनास जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार

Image
जालना प्रतिनीधी समाधान खरात  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 28 व 29 मे 2022रोजी मंठा या ठिकाणी सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे, विजय घोगरे हे स्वागताध्यक्ष पद भूषिवणार आहेत या साहित्य संमेलनास मोठया संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, या संमेलनास जालन्याचे जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांना आज साहित्य साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निमंत्रण दिले या वेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल खंदारे,औरंगाबाद विभागीय अध्यक्ष भरत मानकर, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अशोक कुरूंद आदीजण उपस्थित होते.

मध्यप्रदेशात टिकणारे ओबीसींची राजकीय आरक्षण महाराष्ट्रात का टीकू शकत नाही?- माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा , आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा घात - लोणीकर यांचा आरोप, भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने २१ मे रोजी मंठा येथे लोणीकर यांच्या उपस्थितीत ओबीसी परिषदेचे आयोजन

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दंवडे महाविकास आघाडी सरकारने आपल्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा घात केला असून ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द होण्यामागे हेच जबाबदार आहेत महाराष्ट्र सरकारचं नियंत्रण न समजण्याइतपत ओबीसी समाज दुधखुळा नसून सरकारचा दुटप्पीपणासह सरकारचे पितळ उघडे पडले आहे असा घणाघाती आरोप करत सरकारने हात जोडून ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे परिसर राज्य मागासवर्ग आयोगाचे नेमणूक केली इमपेरीकल डेटा गोळा केला तो डेटा वेळेत सुप्रीम कोर्टात दाखल केला आणि मध्यप्रदेशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवले त्या पद्धतीने महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आपली भूमिका ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्याच्या बाजूने ठाम राहून मिळवून देऊ शकत होते परंतु मागील अडीच वर्ष एम्पिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करणे राज्य मागासवर्ग आयोगाचे स्थापना करण्यात टाळाटाळ करणे केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवणे अशा पद्धतीने काम करत ओबीसी समाजाचा विश्वास घात करून ओबीसींच्या राजकीय आरक्...

ट्रान्सफार्मर मिळेना अखेर शेतकऱ्याने... टोकाचे पाऊल उचलले..

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने शेतकरी थेट महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याच्या दालनात गेला. सोबत आणलेली किटकनाशकाची बाटली काढली आणि विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अधीक्षक अभियंत्याच्या दालनात बसलेल्या ईतर अधिकाऱ्यांनी ही बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. जालन्यातील महावितरणच्या कन्हैयानगर भागातील कार्यालयात मंगळवारी (17 मे) दुपारी ही घटना घडली महादेव चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून ते परतूर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी आहे. चव्हाण यांची चिंचोली शिवारात शेती आहे. त्यांनी 2 एकर ऊसाची लागवड केली होती. मात्र, वीजेअभावी ऊसाला पाणी देता येत नसल्याने त्यांचा 2 एकर ऊस करपून गेला. आपल्याला नवीन ट्रान्सफार्मर मिळेल या आशेने त्यांनी आजवर महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिंजवले मात्र त्यांना ट्रान्सफार्मर मिळाला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, चव्हाण यांच्या शेतालगत अगोदर ट्रान्सफार्मर होता. हा ट्रान्सफार्मर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी इतरत्र हलवला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, महावितरण कार्यालयात व...

अहिल्याबाई होळकर उत्सव समितीची बैठक संपन्न...

Image
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दंवडे राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त उत्सव समितीची परतूर विश्रामगृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत अहिल्याबाई होळकर उत्सव समिती परतुर अध्यक्षपदी नामदेव गोरे, उपाध्यक्षपदी दत्ता कोल्हे ,तर सचिव पदी हनुमंत दवंडे यांची निवड करण्यात आली.अहिल्याबाई होळकर जयंतीच्या नियोजनासंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली या बैठकीत राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती सर्व धर्मीय व सर्वपक्षीय घेण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व समाज बांधवांना जयंती उत्सव कार्यकारणी मध्ये सामाविष्ट करून घेऊन जयंती उत्सव बहुजन प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने 31 मे रोजी समाज बांधव अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जात असतात त्यामुळे परतूर येथे 3 जून रोजी कार्यक्रम घेण्यात येणार आहे .भव्य दिव्य अशी मिरवणूक परतूर रेल्वे गेट ते परतूर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. व शेवटी समारोप सुद्धा तहसील कार्यालयासमोर होईल या बैठकीला उपस्थित म्हणून. संयोजक कमिटी . हारेराम माने , शिवाजीराव ...

परतूर येथील नाफेड केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी .सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शेजुळ यांचे उपोषण..

Image
परतूर/प्रतिनिधी:- हनुमंत दवंडे परतूर येथे नाफेड केंद्र चालकाकडून हमाली व चाळणीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या आर्थिक पिळवणून होत असल्याची तक्रार  सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शेजुळ यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक २८ एप्रिल रोजी केली होती  या अनुषंगाने आज पर्यंत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या वतीने कोणत्याही प्रकारे कारवाई नाही म्हणून श्री पांडुरंग शेजुळ यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर समोर उपोषन सुरू केले असून  परतूर येथील नाफेड केंद्र चालकाकडून शेतकऱ्याकडून हमालीच्या नावाखाली प्रत्येकी क्विंटल मागे १५० रुपये घेतलेले पैसे परत करण्यात यावे,नाफेड केंद्र चालकांच्या संस्थेवर कार्यवाही करून काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच नाफेड केंद्र चालकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अश्या विविध मागण्यांसाठी पांडुरंग शेजुळ यांनी उपोषन सुरू केले आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी हे परतूर येथील सुरू असलेल्या नाफेड चालकाला पाठीशी घालत आहे.

मंठा येथे छत्रपती शंभूराजे जन्मोउत्सव निमित्त व्याख्यान संपन्न

Image
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ दि.१७ मंठा येथे जिल्हा परिषद प्रशाला प्रांगणात छत्रपती शंभूराजे जन्मोउत्सव निमित्त संभाजी ब्रिगेड मंठा तर्फे शिवश्री प्रा.गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर वायाळ यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.गंगाधर बनबरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक शिवश्री संजय देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री सोमेश घारे यांनी केले. शिवश्री सुदर्शन तारक, यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तर शिवश्री प्राध्यापक गंगाधर बनबरे यांनी प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना श्रोत्यांच्या अंगावर शहारे येतील असे प्रसंग संभाजी महाराजांच्या जीवनातील सांगितले.व आयुष्यात एकही लढाई न हरणारे राजे तसेच आजच्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन जीवन जगावे. आजच्या घडीला काही पक्ष व संघटना देशामध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत. परंतु आजची जी शांतता प्रस्थापित झालेली आहे.ती शांतता द...

नशा मुक्तीचे उपचार करूनही नशा मुक्त होईना,रुग्णालयावर कारवाई करण्याची रुग्णाच्या कुटुंबियांची मागणी

Image
  *परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे - दारूच्या नशेच्या आहारी गेलेले त्यातून बाहेर पडत नसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला समाजात मिळत आहेत. दारू पिण्याची सवयी असलेल्या घरातील व्यक्तिला अनेक वेळा समज देऊनही दारू सुटत नसल्याने उपचारा मार्ग अवलंबला मात्र लाखो रुपये खर्च करूनही हाती निराशा पडल्याने नाशिक येथील नेर्लिकर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी परतूर येथील महिलांनी नाशिक येथील महानगर पालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.        या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक शहरातील नेर्लीकर हॉस्पिटल मध्ये नशामुक्त करण्यासाठी पूर्ण खात्री देऊन गेल्या एक दीड वर्षापूर्वी उपचार केले. त्यांनंतर नियमित औषध गोळ्या घेतल्या. उपचारासाठी लागणार्‍या खर्च करण्यासाठी घराची परिस्थिति हालाखीची असल्याने व्याजाने, दाग दागिने, शेती विकून उपचासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र नशामुक्तीचे उपचार करूनही दारूची सवयी सुटली नसल्याने नियमित दारू पित असल्याने नातेवाईक हे डॉक्टरांना चौकशी करण्यासाठी गेले असता नशामुक्त करण्याची हमी...

धर्मवीर शंभुराजे बहुउद्देशींय संस्थेच्यावतिने रक्तदान शिबिर संपन्न

Image
मंठा प्रतिनिधी  पप्पू घनवट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिनांक १४ मे शनिवार रोजी धर्मवीर शंभु राजे बहुउद्देशींय सेवाभावी संस्थेच्यावतिने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले.    या शिबिराच्या सुरूवातीस संस्थेचे सचिव बाजीराव बोराडे,व पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष रंजित दादा बोराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी धर्मवीर शंभु राजे बहुउद्देशींय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष डिगांबर बोराडे,उपाध्यक्ष भागवत चव्हाण, सचिव बाजीराव बोराडे,कृष्णा खरात, गजानन बोराडे,संतोष बोराडे,विजय बोराडे,आकाश गिरी,विष्णु बहाड, वैभव शहाणे,किरण बोराडे,आकाश कास्तोडे,योगेश बोराडे,ज्ञानेश्वर वायाळ, संदिप बोराडे,बाळु गवळी, मोहन बोराडे,प्रल्हाद बोराडे,वझीर पठाण,सोनु काका,अमोल लोखंडे, मोसीन कुरेशी,भारत काळे,दत्ता घुगे, संदिप वायाळ,राहुल पाटील,सुरेश बाहेकर,गणेश पोटे,कैलास बोकाडे, सिद्धेश्वर भगस यांच्यासह लोकमान्य...

राज्य शासनाकडून धनगर समाजावर अन्याय- हनुमंत दवंडे मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष

Image
जालना प्रतिनिधी/ समाधान खरात  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास महामंडळासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रात दोन नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला वगळण्यात आले आहे. मेंढ पाळा साठी असणारे अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिला नाही.              यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजावर अन्याय करण्यात आला आहे. असा आरोप मौर्य क्रांती संघाचे तालुका अध्यक्ष हनुमंत द वंडे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील महामंडळांना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला असून त्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ 500 कोटी, वरून 1000 कोटी ,संत रोहीदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळ 73 कोटी वरून 1000 कोटी,धनगर समाज हा दोननंबर वर असलेला व अति मागास असलेल्या धनगर समाजाला यातून वगळण्यात आले आहे. धनगर समाजाची गेली कित्येक वर्षापासून एसटी आरक्षण देण्याबाबतची मागणी सर्वच राजकीय पक्षानी कायमस्वरूपी बाजूला ठेवली आहे. धनगर समाजावर अन्याय करत आहात मेंढपाळ वरती दररोज अन्याय होत असून साधी त्यांची ...

आम आदमी पार्टीच्या मंठा तालुका अध्यक्ष पदी जगदीश राठोड यांची नियुक्ती

Image
मंठा सुभाष वायाळ  आम आदमी पार्टीचे मराठवाडा विभाग समिति संगठन मंत्री सुग्रीव मुंढे यांच्या हास्ते नियुक्ती देण्यात आली.            यावेळी मराठवाडा सचिव अनिल ढवळे, मराठवाडा सोशल मीडिया ॲड. योगेश गुल्लापेल्ली आणि जालना जिल्हा कमिटी चे जिल्हा अध्यक्ष संजोग हिवाळे, जिल्हा संगठन मंत्री प्र. सुभाष देठे सर यांच्या मार्गदर्शन खाली पार पडण्यात आली आहे. जगदिश राठोड यांना मंठा तालुका अध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली. या बैठकीत होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगर पालिका, नगर परिषदाच्या निडणुकांबाबत सूचना देण्यात आल्या या वेळी उमेश राठोड, एड. सुनिल इंगळे, बाळु सदावर्ते, आत्माराम राठोड, दत्ता राठोड, श्रीहरी राठोड यांची उपस्थिति होती.

परतुर येथे आम आदमी पार्टी ची आढावा बैठक संपन्न परतुर तालुकाध्यक्ष पदी प्रभाकर प्रधान यांची निवड

Image
                                                                                                                                                                                                                                                                                              ...

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात साजरी करा. -हनुमंत दवंडे मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष

Image
जालना जिल्हा प्रतिनिधी/ समाधान खरात गेल्या वर्षी कोरोना व्हायरस असल्या मुळे जयंती फार मोठया उत्साह साजरी करता आली नाही महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवानी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात साजरी करा असे आवाहन हनुमंत दवंडे यांनी केले आहे         31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती येत आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास हा संपुर्ण जगात सुप्रसिद्ध आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी संपुर्ण जीवन चरित्र प्रेरणादायी आहे, त्यांनी जवळ जवळ माळवा प्रांता वर 29 वर्ष राज्य केले .आणि त्यांचा राज्य कारभाराचा ठसा संपुर्ण देशात उमटला होता, त्यांनी अनेक जनकल्याण कारी कार्य केले मंदिर, घाट, रस्ते, धर्म शाळा तर संपूर्ण देश भर बांधल्या, अनेक अंधश्रद्धा असलेल्या परंपराना प्रतिबंध घातला त्यांच्या बुद्धी चातुर्याने अनेक वेळ संघर्षा तुन होणारी हानी टळली, प्राणी मात्राची व निसर्गाची विशेष काळजी घेतली, शेती, व्यापार, इतर व्यावसायी भरभराटकेली, आजचा 7/12 कायदा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या काळात विकसित झाला होता, राजकारण समाज कारण अर्थ कारण विकास ...

परतूर पंचायत समिती मध्ये कृतज्ञता दिन साजरा ..

Image
 परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व सामाजिक न्याय भवन समाज कल्याण विभाग जालना पंचायत समिती परतुर आधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था वाटुर ता परतुर यांच्या वतीने आज 6 मे 2022 रोजी राजश्री श्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त 100 सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली तसेच राजश्री शाहू महाराज यांनी केलेले समाजकार्य शैक्षणिक कार्य व इतर सर्व कार्याबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रमही डॉ रेखा बोर्डे यांनी सांगितले  लोकनेता राजश्री शाहू महाराज यांचे हे स्मृति शताब्दी ( १९२२ते२०२२) वर्ष असल्यामुळे सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने कृतज्ञता पर्व म्हणून साजरी करण्यात येत आहे या अंतर्गत परतूर तालुक्यामध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम ऊस तोड कामगार सर्वे आर टी आय सर्वे ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भात मार्गदर्शन दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना संदर्भात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून माहिती गोळा करणे तसेच शैक्षणिकदृष्ट्या उपक्रम व अशा ...

एस. एम. इंग्लिश स्कूल खांडवी येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

Image
==================== प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतुर तालुक्यातील खांडवी एस. ए.म इंग्लिश स्कूल मध्ये सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त एस. एम. इंग्लिश स्कूल खांडवी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी उपस्थित एस. एम. इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल शेख सर ,शिक्षक सुरुंग सर ,दौंडे सर, आयशा मॅडम, सायमा मॅडम, व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दौंडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरुंग सर यांनी मानले.

अवैध वाळू वाहतूकीचा टेम्पो पकडला,अवैध वाळू चोरीच्या तक्रारी : वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई

Image
तळणी प्रतिनीधी रवी पाटील  मंठा तालुक्यातील सासखेडा येथुन अवैध वाळू उपसा करत वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो क्र. एम एच २१ बी एच ७३३३ याला दिंडी महामार्गावर ठेंगेवडगाव येथे तहसीलदाराने गुरुवारी दुपारी २ वा. पकडले. पूर्णा नदीपात्रातील ऊस्वद , देवठाणा, लिबखेडा, सासखेडा, दुधा , पोखरी केंधळे व भूवन येथून दिवसरात्र वाळू उत्खनन व चोरी सुरू असल्याची तक्रार जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे करण्यात आली होत्या. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठांच्या आदेशानंतर मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व तलाठी नितीन चिंचोले यांनी सासखेडा येथील संतोष जाधव यांच्या मालकीचा अवैध वाळू वाहतूकीचा टेम्पो पकडून मंठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले  मंडळ अधिकारी व तलाठी याच्या कडून कारवाया होताना दिसत नाही पावसाळ्याचे दिवस जस जसे जवळ येत असून अवैध वाळू चोरीची स्पर्धा तळ्णी परीसरात दिसत आहे  *अवैध वाळू चोराची गय केली जाणार नाही वाळू चोरांनी चोरीचा व्यवसाय बदला पाहीजे वाळू चोरावरं आणखी तीव्र करणार असल्याची प्रतिक्रीया तहसीलद...

घरपट्टी वाढ प्रकरणी आक्षेपास मुदतवाढ देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Image
परतूर: प्रतिनिधी हनुमंत दंवडे परतूर नगरपालिकेच्या वतीने सन 2022 ते 2026 साठी नुकत्याच शहरात मालमत्तेचे कर आकारणी साठी सर्वे करण्यात आल्यानंतर भरमसाठ आलेल्या घरपट्टी बाबत संपूर्ण शहरभरात सत्ताधारी विरुद्ध ओरड सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, व भाजप या विरोधकांनी याविरुद्ध आपला आवाज बुलंद केलेला आहे,  या जुलमी घरपट्टी विरोधात आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 5 मे पर्यंत होती, आक्षेप नोंदविण्यास मुबलक अवधी नाही, शिवाय अनेक नागरिकांना करआकारणी बाबतच्या नोटीसाच मिळालेल्या नाहीत, या काळात अनेक सण व सुट्ट्या आल्याने व नागरिकांपर्यंत कर आकारणी ची नोटीस पोचती न झाल्याने आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंतीवजा निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे देण्यात आले तसेच मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनाही या आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे, नगरसेवक अंकुशराव तेलगड, नगरसेवक अखिल काजी, माजी नगरसेवक आरिफ अली, विजय नाना राखे, माजी नगरसेवक कदिर कुरेशी, युवा नेते गोर...

तळ्यात केले तळे म्हणून सरपंचपद गेलेचित्तोडा येथील सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यानी केले अपात्र

Image
जालना (प्रतिनिधी) समाधान खरात   बदनापूर तालुक्यातील चित्तोडा येथील गट क्रमांक 16 मध्ये पाझर तलावासाठी जमीन संपादीत असून त्यात तलाव निर्माण असताना तेथील सरपंचाने याच ठिकाणी अतिक्रमण करून शेततळे घेतले होते. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सुभाष डिघे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दावा केला असता, जिल्हाधिकाऱ्यानी सुनावनी अंती सरपंच ज्ञानेश्वर डिघे यांना अपात्र ठरविले आहे. याबाबत थोडक्यात असे की. चित्तोडा ता. बदनापूर येथील गट क्रमांक 16 मध्ये पाझर तलाव नं. 4 साठी 67 आर शेत जमीन सन 2012-13 मध्ये संपादीत करण्यात आली होती. ज्याचा सी. आर. क्रमांक 80/8 असून अंतिम निवाडा 20 एप्रिल 2011 रोजी झालेला आहे. असे असताना सरपंच ज्ञानेश्वर तुळशीराम डिघे यांनी या संपादीत केलेल्या शेत जमिनीमध्ये स्वतः च्या फायद्यासाठी शेततळे केले, व ते शासनाच्या जमिनीवर केल्याचा दावा चित्तोडा येथील ग्रामपंचायत सदस्य सुभाष दौलतराव डिघे यांनी ऍड. आर. एस. वाघ व एस. पी. हुशे यांच्या मार्फत जिल्हा दंडा धिकाऱ्याकडे दाखल केला होता. त्यानुसार सरपंच ज्ञानेश्वर डिघे यांची कृती मुबंई ग्रामपंचायत अधिनियमांतील कलम 14 (ज 3) मधी...

वसुलीच्या नादात महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला,भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध,भाजपा नेते माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन

Image
प्रतिनिधी जिल्हा प्रतीनीधी समाधान खरात ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.वसुलीच्या नादात महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मात्र २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊन या समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी चे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईल. भाजपा निवडणुकीसाठी सदैव सज्ज असतो. आम्ही निवडणूक लढवू आणि त्यामध्ये भाजपाची उमेदवारी देताना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण जागांपैकी २७ टक्के जागांवर ओबीसींना तिकिटे देऊन भाजपातर्फे या समाजाला न्याय देऊ.मागील काही दिवसांपूर्वी सहा जिल्हा परिषदांच्या ओबीसी आरक्षित जागा रद्द होऊन पोटनिवडणुका झाल्या असता भाजपाने त्या खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर ओबीसींनाच तिकिट...

वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार

Image
परतूर –प्रतिनिधी हनुमंत दंवडे शहरात महावितरणमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर प्रकाशराव भामट यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार दि १ मे कामगार दिनी औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर प्रकाशराव भामट यांनी महावितरणाच्या परिमंडळात काम करीत असतांना सण २०२१-२२ मध्ये अविरत विनाअपघात सुरळीत वीजसेवा, रोहित्राची काळजी, अचानक उदभवणार्‍या तांत्रिक समस्येचे त्वरित निराकरण करणे, कामाच्या ठिकाणची देखभाल, इत्यादि क्षेत्रात कर्तव्य दक्षता, निष्ठा व श्रम दाखवून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मनसेचे सिध्देश्वर काकडे यांना पोलीसांची नोटीस'

जालना जिल्हा प्रतीनीधी समाधान खरात मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दिनांक १ मे २०२२ रोजी जाहीर सभा घेऊन ठाकरे शैलीत सरकारला दिनांक ४ मे पर्यंत मशीदीवरील भोंगे काढण्यासाठी मुदत दिली आहे. याच पाश्वर्भुमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता मशीदीवरील भोंगे काढण्यासाठी आक्रमक भुमीका घेण्यासाठी हालचाली सुरु आसतांना पोलीसांकडुन सक्रीय पदाधिकार्यांसह मुख्य पदाधिकारी यांना १४९ अन्वये नोटीस जारी करुन शांतता बाळगण्यासाठी आहवान करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारीणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांना देखील सेवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद ऊबाळे यांनी लेखी नोटीस देऊन शांतता बाळगण्याचे आहवान केले आहे. मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा ऊचलुन धरत राजकीय वातावरणात मनसेचं एक हिंदुत्ववादी स्थान निर्माण केल्याने मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दा आता राज्यासह देशभर गाजतांना दिसत आहे. ४ में पर्यंत मशीदीवरील भोंगे न काढल्यास मनसेच्या स्टाईलने सरकारला ऊत्तर देऊ असंही सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे.

अक्षय्य तृतिया व ईद पूर्वी कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळाले धनादेश,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 30 लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

Image
प्रतिनधी/ हनुमंत दवंडे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील परतूर तालुक्यातील लाभार्थ्यांना} रुपयांचे धनादेशाचे वितरण तहसील कार्यालय परतूर येथे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते अक्षयतृतीया व रमजान ईद च्या अगोदर दिनांक 30 एप्रिल रोजी करण्यात आल्याने लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे यावेळी माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी सांगितले की आपणास मिळणारी ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याचे आपणास जाणीव असून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही मदत आपणास दिली जात असून निश्चित पणाने आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवी घटना घडल्या आहेत मात्र आपण प्रत्येक बाबतीत आपल्या पाठीशी खंबीर असून आपणास आज अक्षय तृतीया व ईद पूर्वी ही मदत मिळत असल्याने आपण समाधानी असल्याचे आमदार लोणीकर यांनी यावेळी सांगितले यावेळी उपविभागीय अधिकारी श्री जाधव साहेब. तहसीलदार चित्रक मॅडम पद्माकर कवडे संबंधित विभागातील नायब तहसीलदार धुमाळ साहेब. कुलकर्णी साहेब. शिंगाडे साहेब. माजी सभापती रंगनाथ येवली. भगवानराव मोरे रमेशराव भापकर दया काटे ओम प्रकाश मोर तुकाराम सोळंके छत्रगुन कणसे कृष्णा अरगडे सिद्...

अखिल भारतीय गंधर्व मंडळच्या गायन परीक्षेतपरतूरच्या सप्तसुर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे अखिल भारतीय गांधर्व मंडळ तर्फे डिसेंबर 2021 या सत्रात घेण्यात आलेल्या प्रारंभिक ते संगीत विशारद गायन परीक्षेत परतूर येथील सप्तसुर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.  गतवर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये अर्जुन यादव (पखवाज वादन) रितेश पुरी, भक्ती सोमाणी, सानिका दडमल, गौरी हारकळ, आदित्री आकात, अपर्णा कादे, अनन्या जेवुघाले, सर्वज्ञ खरात,आर्या कुलकर्णी, अपूर्वा चिंचाने यांनी गायन विषयात विशेष योग्यता प्रविण्यासह तर योगिता माने, श्रुतिका जगताप, आज्ञा बाहेकर, आदित्य ढेरे, प्रणव काकडे, राजनंदिनी शिंदे, अथर्व लिंबूळकर, कल्याणी ढेरे हे गायन विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संचालक प्रा. सोपान सांगुळे सर, प्रा.अनंत मगर, डॉ एस जी बाहेकर, नगरसेवक संदीप दादा बाहेकर, प्रा डॉ प्रसाद चौधरी सर, विजयकुमार बांडगे, उद्धव माने, डॉ प्रमोद आकात, राजकुमार यादव, प्रा डॉ वामनराव वैद्य सर, सुनील खरात सर, रामेश्वर नरवडे, महादेव लालझरे व सर्व पालक यांनी अभिनंदन केले..

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्ता महामार्गाला जोडणारा - खासदार संजय जाधव

Image
   परतूर /( प्रतिनिधी) हनुमंत दवंडे  प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रोहीना ते वरफळ मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संजय जाधव रोहीणा येथे बोलत होते.        त्यांनी सांगितले की, मतदार संघातील ग्रामीण भाग असो वा शहरी प्रत्येक रस्ता हा मुख्य महामार्गाशी जोडला जाणार असून यासाठी शिवसेना सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र शासनाने चालू केलेली मातोश्री पांदन रस्ता योजने अंतर्गत मतदारसंघात विविध गावातील पांदण रस्ते मंजूर झाले असून कामे सुरूही झाले आहेत. शिवसेनेने कोरोना काळात विविध उपक्रम राबवलेले आहेत तसेच येणाऱ्या काळातील शिवसेना मतदार संघातील विकास कामाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही खासदार जाधव यांनी ठणकाहुन सांगितले. रोहीणा ते वरफळ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण लांबी ५.२० कीमी निविदा किमंत रु- ३०६.१५ , प्रजिमा -३६ शेलगाव अंगलगाव ते सातोना (खू) लांबी ४.२५ कीमी निविदा किमंत -२४८.६८ लक्ष रुपये व रामा २२३ येणोरा ते माव पाटोदा राममा -५४८ (c) लांबी -५ किमी निविदा किमंत रू.२४४.४० लक्ष रुपयाचे प्रधानमंत्...

वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर गायले गाणं युवकांनी अर्जुन महानवर यांचा आदर्श घ्यावा......

Image
बीड प्रतिनिधी हनुमंत दवंडे आज बीड मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन सभेच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने आज बीडमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा गायक अर्जुन संतोष महानवर या युवकाने राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती या महिन्यांमध्ये होत असून या जयंती निमित्त युवागायक अर्जुन महानवर याने अहिल्यादेवी होळकर यांच्या आधारित गाणं तयार करुन ते गायले आहे. आपण जर हे गाणं ऐकले तर अंगावर शहारे आणणारे हे गाणं आहे.     वयाच्या चौदाव्या वर्षी या युवा गायकाने हे गाणं तयार करून महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्या राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या आधारित हे गाणं तयार करून ते गायले असून युवागायक अर्जुन महानवर या मुलाचे राज्यभरातून कौतुक होत आहे कारण आज पर्यंत असे गाणं कोणी गायले नाही परंतु वय कमी असतानाही या मुलाने अहिल्यादेवी होळकर यांच्या आधारित गाणं गायले त्याबद्दल आज बीड येथे युवागायक अर्जुन संतोष महानवर त्याच्या या कामगिरी बद्दल माननीय प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज महाराष्ट्र राज्य, सुंदर...

महा आरोग्य शिबीर ग्रामीण रुग्णालय परतूर येथे संपन्न ...

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे   दिनांक 30/4/2022 रोजी वार शनिवार महा आरोग्य शिबीर ग्रा. रु .परतूर येथे आयोजित करण्यात आले . मा. बबनराव लोणीकर साहेब माजी मंत्री तथा विद्यमान आमदार परतुर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करणार आले,   माधवराव मामा कदम (शिवसेना जिल्हा उपप्रमुख),उपविभागीय अधिकारी  भाऊसाहेब जाधव, तहसीलदार श्रीमती. रूपा चित्रक, सामाजिक कार्यकर्ता दया काटे, भगवानराव मोरे,संपत टकले, शत्रूघन कणसे, सुनील शिवनगिरीकर, रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे, मधुकर पाईकराव, दत्ता सुरुम, अशोक आघाव, गणेश पवार, रामप्रसाद थोरात, नरेश कांबळे. महाआरोग्य शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर- एम डी मेडिसिन डॉ. प्रमोद आकात, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत अंभुरे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. सुनील दामनवाड, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संध्या मांटे, अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. कऱ्हाडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवल , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशालसिंग ठाकूर, प्रा आ केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक श्री तळेकर, व तसेच श्री तारे, श्री प्रधान, श्...

जोगेश्वरी भैरवनाथ यात्रेनिमित्त पाणपोईचे उद्घाटन..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे घनसांवगी तालुक्यातील पारडगाव येथील रविवार रोजी जोगेश्वरी भैरवनाथ च्या यात्रा निमित्त. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील.कै. सेनाजी शामराव भालेकर यांच्या समानार्थ. पाणपोईचे उद्घाटन धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वालेकर यांनी यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी तसेच बजाराला येणाऱ्या नागरिकासाठी थंड पाण्याची व्यवस्था केली आहे.अंकुश उद्घाटन राजनी चे सरपंच अमोल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शिवाजी भालेकर. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रकाश कोकणे. राष्ट्रवादीचे माजी सरपंच सुभाष झोरे. दिगंबर ढेरे. प्रभाकर ढेरे. उद्धव माकोडे. दिपक खरात. ज्ञानराज भालेकर. यांची उपस्थिती होती बाजारात येणाऱ्या नागरिकांनी थंड पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे समाधान व्यक्त केले.