आनंद डेलिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरचे उदघाटन येत्या रवीवारी ना.राजेश टोपे यांच्या हस्ते
परतूर(प्रतीनीधी) परतूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची गरच लक्षात घेता शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाच्या सहभागातून आनंद शाळेच्या इमारतीत 'आनंद डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ' सुरू होत आहे . याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री मा. राजेश भैया टोपे साहेब यांच्या हस्ते दि. 02 मे 2021 रविवार रोजी सकाळी 10 वा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.प्रदीपदादा सोळंके उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सुरेशकुमार जेथलिया , मा. राहुल लोणीकर , मा.कपिल आकात, मा. अशोक आघाव उपस्थित राहणार आहेत. या रुग्णालयासाठी डॉ.प्रमोद आकात, डॉ.भानुदास कदम , डॉ.मुनीर कादरी, डॉ.गजानन केशरखाने , डॉ. कुणाल उढाण , डॉ.शरद पालवे रुग्ण सेवा देणार आहेत. या रुग्णालयात सुरुवातीला 24 ऑक्सिजन व 21नॉन ऑक्सिजन बेड राहणार आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार यात वाढ केली जाईल. तरी या रुग्णालयाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे