जवळा येथील कृषीदूतांकडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
परतुर : येथुन जवळ असलेल्या जवळा येथील शेतकऱ्याना वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत सेलू येथील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी जवळा (ता.परतूर) येथील शेतकऱ्यांना शेतीविषयी विविध योजना, कामांची माहिती दिली . ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत योगेश राजबिंडे यांनी बिज प्रक्रिया, बिज उगवण क्षमता चाचणी, निंबोळी अर्क तयार करणे,कलम तयार करणे, तण व्यावस्थापन, आदी विविध विषयांवर प्रात्याक्षिकांसह माहिती दिली . यावेळी समस्त गावातील शेतकरी उपस्थित होते.