Posts

Showing posts from January, 2024

श्रीष्टी व सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता बारा कोटी रुपये निधी मंजूर,आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Image
परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण  महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाची विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत निधीची मागणी केल्याने  सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता आणी कर्मचारी निवासस्थानाचे इमारती करिता सहा कोटी रुपये निधी तर श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता आणि कर्मचारी निवासस्थानी इमारती करिता सहा कोटी रुपये असा एकूण सुमारे बारा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना पत्राद्वारे कळविले आहेत.   पन्नास वर्षांपूर्वीचे जुने बांधकाम असलेल्या या इमारती मोडकळीस आल्याने पावसाळ्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाळ्याची पाणी गळत होते. इमारतीच्या भिंती कधीही कोसळून पडतील अशी शक्यता

नवीन शैक्षणिक धोरणात सृजनशीलतेला महत्त्व : प्रा.डॉ. भालचंद्र वायकर

Image
  परतूर , प्रतिनिधी  कैलाश चव्हाण                     नवीन शैक्षणिक धोरण विदयार्थांच्या सर्वांगीण हिताचे असून , त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळया गुणांचा विकास करून आवडीच्या विषयात संधी व त्यांच्या मध्ये असलेल्या सृजनशीलतेला महत्त्व दिले गेले आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ. भालचंद्र वायकर अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विदयाशाखा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ छ. संभाजीनगर यांनी केले .              येथील लालबहादूर शास्त्री महाविदयालयात दि. 25 जानेवारी ला घेण्यात आलेल्या एक दिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चर्चासत्रात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारत खंदारे यांची उपस्थिती होती. या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा.डॉ. विलास खंदारे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ. दिलीप अर्जुने, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन,डॉ. कैलाश पाथ्रीकर , उपप्राचार्य डॉ.रवी प्रधान,प्रा. जालिदर इघारे,डॉ. शैलेंद्र शेलार , डॉ.राजेंद्र फासे ,प्रा. अनिल सोनपावले , कार्यालयीन अ

शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नामुळे परतूर शहरात विद्युत खांबासह पंच केबल जोडणी सुरू

Image
परतुर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतुर शहरातील अनेक भागा मध्ये गेल्या कीत्येक वर्षापासूनची नागरीकांची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली असता.    पालक मंञी आतूल सावे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ जिल्हा नियोजन व विकास मंडळा मार्फत निधी मंजुर करावा असे आदेश दिलेअसता अग्रवाल यांनी शिवसेनेचे विभागीय नेते अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन विद्युत खांब व बंच केबल साठी निधी उपलब्ध करून घेतला. परतुर शहरासाठी शंभर विद्युत खांब व बंच केबल शहरासाठी उपलब्ध करून दिले परतुर शहरातील राजे संभाजीनगर ,आदर्श कॉलनी, जय भद्रा नगर, शिवनेरी नगर, पंचशील नगर, वडारवाडी, बालाजी नगर ,व्यंकटेश नगर ,एसटी कॉलनी नागोबा मंदिर जवळ, मोरे यांचा मळा ,जगन्नाथ नगर व इंदिरानगर अशा परतूर शहरातील विविध भागात नागरिकांच्या विद्युत लाईट विषयी समस्या लक्षात घेता विद्युत खांबसह बंच केबल जोडणी करून देत आहेत. तीनशे चारशे फुटाच्या अंतरावरुन नागरिकांनी विद्युत कनेक्शन जोडणी केलेली पाहता येणाऱ्या काळा

ईटीएस मोजणीचा वाळू चोरानी घेतला धसका . महसूल प्रशासनाने आता त्याना दाखावा हिसका, खड्डे बुजण्यासाठी कोल्हापूरी बंधार्यात अडवलेले पाणी सोडण्या प्रयत्न असफल

Image
तळणी : प्रतिनिधी रवी पाटील    सपूर्ण पूर्णा नदी पाञातील अवैध वाळू उत्खननाची ईटीएस यञणेद्वारे मोजणी करुन वाळू चोरासहित परतूर उपविभागीय अधिकारी मंठा तहसीलदार संबंधीत मंडळ अधिकारी तलाठी पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई करा अन्यथा मंठा तहसील समोर २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा ईशारा ज्ञानेश्वर राठोड यानी दिल्यानंतरही मरगळ आलेल्या महसुल प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही हे विशेष     वाळू चोरी झालेल्या ठिकाणची ईटीएस द्वारे मोजणी करुन कारवाई करण्याची या निवेदनात केल्यानंतर जिल्ह्यावरून मोजणीचे पथक येणार असल्याचा संदेश वाळू चोरापर्यन्त बरोबर महसुल यञनेने दिल्या नंतर काही करा पण खडे साफ करा नाही तर कारवाई अटळ आहे व आत्मदहनाचे भूत मानगुटीवर ठाम असल्याने महसुल प्रशासन दबावात आहे . वाळू चोरी झाल्याचे खड्डे बुजवायचे कसे यावर वाळू चोरानी कमाली शक्कल लढवली खरी .परतू ती त्याच्या चांगलीचअंगलट आली .टाकळखोपा , वाघाळा या गावाच्या वरुन विदर्भातील गावाची सिमा लागते . पूर्णा नदीपाञातील विदर्भाच्या हद्दीतील वझर आघाव या बधार्याचे लावलले दरवाजे वाळू चोरांनी रात्रीच्या वेळेस का

प्रभू रामचंद्राचा सोहळा पाचशे वर्षा नंतर तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला आहे- ह भ प अर्जुन महाराज बादाड

Image
तळणी प्रतिनिधी रवि पाटील मनुष्याच्या जिवनामध्ये अनेक सोहळे आहेत तुमचे आमचे सोहळे जिवन मरणाचा सोहळा जिवाचा सोहळा आहे एक पदमीनीचा सोहळा एक सोहळा वारीचा आहे एक सोहळा नाम चितंनाचा आहे एक वैकृठ गमनाचा सोहळा आहे एक ज्ञानोबाच्या समाधीचा सोहळा आहे आणि एक प्रभू रामचद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे जो गेल्या पाचशे दशकाच्या नंतर तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला असल्याने आपण खरच भाग्यवान आहोत असे प्रतिपादन ह भ प अर्जुन महाराज बादाड यानी तळणी केले श्री संत ज्ञानेश्वर महाराज मदीर निर्माण वर्धापन दिनाचे औचित्य व प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्य तीन दिवसीय सप्ताह च्या दुसर्या दिवशीच्या किर्तन सेवेत बोलत होते  जगदगुरू संत तुकाराम महाराज याच्या स्वामीकाज गुरू भक्ती पितृवचन सेवाभक्ती या अंभगावर महाराजानी निरुपण केले . स्वामी भक्ती काय असावी याचे उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहे निस्वार्थ प्रभूरामचद्रांची सेवा करण्याचे परमभाग्य मारोतीरायांना मिळाले . स्वामी म्हणजे मालक .. आणि काज म्हणजे काम करणारे स्वामीची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण मारोतीराय आहे . गुरुवर किती निष्ठा ठेवावी या

शिवसेना महिला आघाडीच्या ललिताताई काळदाते यांची उपजिल्हा प्रमुखपदी निवड,शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या हस्ते दिले नियुक्ती पञ

Image
परतूर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण परतुर तालुक्यातील आंबा येथील कणखर महीला नेतृत्व असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ललिताताई काळदाते यांची नुकतीच शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी जिल्हा कार्यालय परतूर येथे नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.    दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की , हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर आणि जालना जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महीलाआघाडी जिल्हा प्रमुख यांच्याशी चर्चा करुन उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी पदी नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल असे शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्याला असा विश्वास आहे असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले विधानसभा संघटक विजयकुमार गिरी, शहर प्रमुख दी

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष परतूर मंठा विधानसभा कक्ष प्रमुखपदी कैलास चव्हाण यांची नियुक्ती

Image
परतूर प्रतिनिधी  राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मा. खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना विभागीय नेते अर्जुन भाऊ खोतकर सूचनेनुसार बंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या परतूर मंठा विधानसभा कक्ष प्रमुख या पदासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या शिफारस नुसार कैलास चव्हाण ची निवड करण्यात येत आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना च) शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे. गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिव

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला अभ्यास दौरा

Image
परतुर- प्रतिनिधी कैलाश चव्हाण    लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील 84 विद्यार्थ्यांनी जालना येथील कलश सीड्स, जालना व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे दिनांक 13 जानेवारी रोजी प्रत्यक्ष पीक पाहणी केली, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. प्रात्यक्षिकामध्ये (ओपन डे) टोमॅटो, कांदा, वांगी, मिरची, कोबी, पत्ताकोबी, गाजर, सिमला, मिरची, मुळा, यांच्या विविध गुणधर्म असलेल्या वाणाचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पिक निरीक्षण करता आले, तसेच या व्यतिरिक्त विदेशी भाजीपाल्यांची उभी पिके ही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. कंपनीच्या संशोधक तज्ञाकडून विद्यार्थ्यांना नवीन पिकाचे संकरित वाण कसे तयार केले जाते याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली, त्याबरोबरच सीड्स प्रक्रिया, सीड्स पॅकिंग इत्यादी विभागाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, या ही ठिकाणी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील फळबाग, भाजीपाला, फुलशेती, पशुव्यवस्थापन इत्यादींची माहिती घेतली. सदरील अभ्यास दौरा महाव

दुःख अडवायला उंबऱ्या सारखा...मित्र हवा गारव्यासारखा....!ll शास्त्री विद्यालयातील काव्य गायनाने रसिक मंत्रमुग्ध ! ll

Image
परतूर - प्रतिनिधी कैलाश चव्हाण    लालबहादूर शास्त्री विद्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कवी अनंत राऊत यांच्या काव्यगायन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कवी राऊत यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.      लालबहादूर शास्त्री विद्यालयात मंगळवारी स्नेहसंमेलनाला प्रारंभ झाला. संस्थेचे उपाध्यक्ष कुणाल दादा आकात यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.के.बिरादार हे होते तर प्राचार्य डॉ. भारत खंदारे,डॉ.सुधाकर जाधव,लेखक छबुराव भांडवलकर,माजी नगराध्यक्ष विजय राखे,अखिल काजी,गट कल्याण बागल,डॉ.अंजली कोळकर,संतोष चोपडे,देवर्षी देशमुख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.       कवी राऊत यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या.    दुःख अडवायला उंबऱ्या सारखा,मित्र हवा गारव्या सारखा या कवितेने प्रेक्षकांची मने जिंकली.   रडतोस काय वेड्या संकट कुणास नसते...काट्यात बांधलेले घरटे सुखात असते ही कविताही रसिकांची वाहवा मिळवून गेली.     सोबतच जीवनात आई-वडिलांचे,गुरूंचे महत्त्व विशद केले. मुलांना संस्काराची

जालना जिल्हा प्रवीण प्रशिक्षण समन्वयक संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री.समाधान खरात तर महिला आघाडीतून श्रीमती ज्योती आडेकर यांची निवड.

Image
जालना ‌प्रतीनीधी  आज अंजनीआई फाउंडेशन यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वानुमते श्रीमती ज्योती आडेकर यांची महिला समन्वयक पदी तर श्री समाधान खरात यांची पुरुष समन्वयकपदी निवड करण्यात आली. जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षकांचे विविध प्रश्न कसे मार्गी लागतील, प्रवीण प्रशिक्षकांना येणाऱ्या अडचणी, जिल्ह्यातील विविध प्रशिक्षणे दर्जेदार कसे होतील याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. राधेश्याम राजपूत सर यांची उपस्थिती होती. या बैठकीसाठी एम.डी.सरोदे, श्रीमती मोहिनी मानकर,  रवींद्र भालेराव,श्रीमती विद्या जाधव,  जि.एस.गव्हाने, संतोष जाधव, राजू गवई,श्रीमती ज्योती आडेकर, समाधान खरात,   भास्कर उघडे, बंडू नन्नवरे, पत्रकार   विनोद काळे , संतोष जाधव , आनंद म्हस्के , प्रदीप डील्पे ,संघपाल वाहुळकर,यांच्यासह अनेक प्रवीण प्रशिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपण ठेवलेल्या विश्वासला तडा जाऊ दिला जाणार नाही- शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल,मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण आपण ठेवलेल्या विश्वासाला कधीही तडा कधीही तडा दिला जाणार नाही व विविध विकास कामाच्या माध्यमातून आपला विभाग वआपले शहर सुंदर स्वच्छ करणार तसेच विविध नागरी सुविधा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडविण्याचे प्रयत्न करीत असून करोडो रुपयाचा निधी परतूर शहरासाठी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाही आपल्या दारी पोहोचवण्याचे काम शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून करणार व माझ्या शेवटच्या श्वासा पर्यंत सामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविणारअसे शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी परतुर शहरातील महाराणा प्रताप नगर जुना पोस्ट ऑफिस रोड येथे असंख्य कार्यकर्त्याच्या शिवसेना प्रवेश सोहळा प्रसंगी सांगितले. शहरातील महाराणा प्रताप नगर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, यामध्ये राजू ताजी, प्रताप काबरे ,यश महेर ,गणेश ताजी ,शंकर काबरे, युवराज ताजी ,कृष्णा ताजी, मुकुंद काबरे, सागर कांबरे, ओम राजू भारस्कर,

यश माध्यमिक विद्यालय व यश प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण  आज दि. 13 जानेवारी 2024 शनिवार रोजी यश प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदने ने करण्यात आली.कु.नेहा बिडवे, कु. संस्कृती , कु.सुनंदा दांगट आणि कु. वैष्णवी यांच्या आवाजातील जिजाऊ वंदना ऐकूण सर्वजण मंत्रमुग्ध झाले .    यावेळी अनेक विद्यार्थी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभुषा धारण करून शाळेत दाखल झाले.    या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य शामीर शेख हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास गोरे , दिव्या तांगडे ,राधिका आकात उपस्थित होत्या.     प्रारंभी मांसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.         यानंतर कु.काव्या सोळंके, आरुषी बर्डे, स्वानंदी आकात ,राजवीर सोळंके व दिव्यांका सुर्यवंशी,आरुषी लाटे, आरुषी बर्डे, समृद्धी होंडे व साक्षी सोनटक्के अशा अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली, तसेच स्वराली आकात व भक्ती देशमुख यांनी उन्हाळा आणि पावसाळा हे जिजामातेचे गीत गाऊन सर्वां

न्यू .वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानन्द यांची जयंती साजरी .

Image
 परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण दि १२/०१/२०२४ शुक्रवार रोजी न्यू . वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या वेळी संस्थेच अध्यक्ष  नारायणराव सोळंके , कार्याध्यक्ष  गणेशराव सोळंके , सचिव सौ छाया बागल मॅडम सौ अश्विनी मोरे मॅडम व  सुरेश मोठे  उपस्थीत होते     प्रमुख अतिथि म्हणून जाधव सर, भानूसे सर, निवृत्ती बिडवे सर आणि प्रिन्सिपल साम वर्घिस सर होते.          यावेळी राजमाता जिजाऊ बद्दल बोलताना मोरे मॅडम म्हणाल्या की, जिजामाता म्हणजे जगातील सर्व मातांसाठी एक आदर्श आहेत. त्या केवळ उत्कृष्ट माताच नाही तर उत्कृष्ट पत्नी, राजकारणी आणि अर्थतज्ञ सुध्दा होत्या. तसेच यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल बोलताना श्री मोठे सर म्हणाले कि, स्वामी विवेकानंद हे सर्व भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर होते स्वामीजींनी भारताच्या संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला पटवून दिली तसेच साता समुद्रापार भारताचे नावलौकिक केले. या कार्यक्रमाचा समारोप श्री निवृत्ती बिडवे सर यांनी जिजाऊ वंदना गाउन केला.     या कार्य

आंबा येथे जी. प. शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जंयती साजरी

Image
 परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण     येथून जवळच असलेले आंबा या गावात जिल्हा परिषद शाळेत राजमाता जीजाऊ व स्वामी वीवेकानंद जंयती साजरी करण्यात आली     या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताराव घुले तर प्रमुख अतिथी विलास डोईफोडे हे होते अध्यक्षानी आपल्या मनोगत मधे राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकनंद यांच्या जीवानावर प्रकाश टाकला                 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक पतंगराव सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप मगर दिनेश लाचुरे श्रीमती वनिता मेश्राम आदींची उपस्थिती होती

जालना डीईआयसी मध्ये बाळाचे अस्थि रोग पूर्व रोगनिदान शिबिर संपन्न ....

Image
जालना प्रतिनीधी समाधान खरात  दि 08 रोजी जिल्हा रुग्णालय,जालना येथील डीईआयसी विभागात बाळाचे अस्थीरोग पूर्व रोग निदान जिल्हा शल्यचिकित्सक मा डॉ राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले,    या शिबीरासाठी विशेष तज्ञ म्हणून SRCC हॉस्पिटल, मुंबई येथिल प्रसिद्ध बाळ अस्थीरोगतज्ञ डॉ अवि शहा होते, या शिबिरात बाळाच्या पायात हातातील बाक, पायची लांबी कमी अधिक, मणक्यातील समस्या, सेरेब्रल पालसी, आणि इतर अस्थी संबंधित बाळाची पूर्व तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी एकूण 51 बालकाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 16 बालकांना शस्त्रक्रिया साठी मुंबईतील SRCC हॉस्पिटलमध्ये विविध योजनेतून शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी DD विभागाचे डॉ कुलकर्णी सर, अति शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र गायके,डॉ सोनी , डॉ.नितीन शहा ,डॉ. संजय मेश्राम,डॉ अंबुरे, यांची उपस्थिती होती तर शिबिर यस्वावी करण्यासाठी, डीईआयसी विभागाचे व्यवस्थपक डॉ मीनल देवळे, बालरोगतज्ज्ञ डॉ अर्चना खंडागळे, डॉ अमितकुमार जैस्वाल, डॉ सागर झंवर, डॉ गजानन खरात, राजू खिल्लारे, अरुण सुर्वे,वर्षा निर्मळ, श्रीधर सरकटे,

महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही -काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख , विकासा साठी महावीकास आघाडी ची गरज -मा आ. सुरेशकुमार जेथलीया,अद्याप जेथलियाला विकत घेणारा पैदा झाला नाही - नितीन जेथलीया

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण   सामान्य जनतेच्या हिताच्या, अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या,आणि भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाही आणि मस्तवाल पनामुळे मतदार संघातील सुटलेल्या प्रगतीसाठी काँग्रेस पक्षा शिवाय, महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले. परतूर विधानसभा मतदारसंघातील, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संकल्प मेळाव्यात व्यासपीठावर मा. आ.सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, सुभाषराव मगरे, प्रभाकर मामा पवार, नितीन जेथलिया,किसनराव मोरे,बाळासाहेब (काका)आकात, आन्नासाहेब खंदारे, एकनाथ कदम, संतोष दिंडे, शमशोद्दीन शेख, आर.के. खतीब, दत्ता भाऊ बनसोडे, पांडुआबा कुरधने, माऊली वायाळ, संग्राम भैय्या लोणीकर,निळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, शबाब कुरेशी, वैजनाथ बागल,सुखलाल राठोड,भागवत उफाड,जयराम राठोड, मदनराव हजारे, सर्व मंठा, परतूर शहराचे नगरसेवक,शाम बाबा काळे, महिला आघाडी,बद्रीभाऊ खवणे हे उपस्तिथ होते. याप्रसंगी पुढे बोलताना राजाभाऊ देशमुख म्हनाले की,परतूर मतदारसंघात कंग्रेसची ताकद मोठी आहे. सत्ता न

परतूर शहरात कवी भिवराजी आढाव स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन

Image
१३ जानेवारीला रंगणार साहित्य मेळा  परतूर प्रतिनीधी  ने   येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने येत्या १३ जानेवारी रोजी कवी भिवराजी आढाव स्मृती २० व्या एक दिवसीय मराठवाडा स्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात स्व.अरुणराव बागल साहित्य नगरीत पार पाडणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर भूषविणार आहेत.     संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. प्रतिभा गोरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.बी. मठपती, चंद्रकांत खाडे, विजय रावणकर, प्रकाश यात्रीचे संपादक डॉ. शिवाजी तिकांडे, यश ग्रुपचे बालासाहेब आकात, लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, डॉ. गुलाबराव नजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, आर.एन. सोनत, दीपक माने, डॉ.गुलाबराव नजन, भाऊसाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महावितरणचे परतूर येथील उपकार्यकार

दैठणा बु येथे शालेय व्यवस्थापन समिती ची बिनविरोध निवड.

Image
परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण  परतुर तालुक्यातील दैठणा येथे सन 2023-25 साठी नवीन शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नवीन समिती ची निवड सरपंच श्री शत्रुघ्न कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  यामध्ये सर्वानुमते श्री पुंजाराम तुकाराम कणसे यांची अध्यक्ष म्हणून तर सौ. सीमा संतोष रेपे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य पदी श्री भगवान पवार, सौ मंजुश्री भगवान बे, श्री भागुराम कवडे, सौ सुनीता शिवाजी भदर्गे,श्री बबन मिसाळ, सौ रुक्मिणी गजानन कवडे, श्री गुलाब बापूराव कवडे, सौ यमुना भागवत कोकाटे, श्री गंगाराम पुंजाराम कोकाटे, हनुमान थोरे  यांची पालकांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. श्री गणेश दादाराव कणसे यांची ग्रामपंचायत मधून सदस्य पदी तर श्री अशोक गुलाबराव बेरगुडे यांची शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून तर श्री विशाल रमेश गोरे यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. समिती सचिव पदी श्री एम व्ही काळे, मुख्याध्यापक हे राहतील. सदर समिती निवड बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.तसेच शाळे

आजचे विद्यार्थी उद्याचा मजबुत भारत.-पो.नि.मच्छिंद्र सुरवसे

Image
       परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण  दि.०५ जानेवारी रोजी आनंद प्राथमिक विद्यालय व आनंद इंग्लिश स्कूल परतूर येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना परतूर पोलीस स्टेशनचा सुनियोजित कारभार दाखवण्यासाठी क्षेत्रभेट घेण्यात आली.          याप्रसंगी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत केले.पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याची पूर्ण माहिती त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना समजावून सांगीतली.      यावेळी विद्यार्थ्यांना मुद्देमाल कक्ष, गोपनीय कक्ष, पोलीस कोठडी, वायरलेस सेट, सीसीटीव्ही प्रणाली, गुन्हे प्रणाली, आँनलाईन एफ आय आर,बारनिशी कक्ष, क्राईम रायटर्स कक्ष,इ.बद्दल व्यवस्थित माहिती सांगितली. विद्यार्थी खुपचं मनापासून पोलीसांच्या कामकाजाचे निरीक्षण करत होते. पोलीसांच्या विविध शस्त्रांबद्दल माहिती देत ही शस्त्रे विद्यार्थ्यांना पाहायला देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.      याप्रसंगी बोलताना पो.नि.सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.        यावेळी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ कॉन्स्टेबल  हाडे,  पवार ,  जाधव  खाडे,महिला कॉन्स

यश प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

Image
   परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण दि. 3 जानेवारी रोजी सातोना (खु) येथिल यश प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्रिन्सिपल शामीर शेख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावरती जयराम चव्हाण तसेच सावित्रीच्या लेकी म्हणून सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.    सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत आलेल्या सर्व विद्यार्थिनींचा  उपस्थित महिला शिक्षकांचा संस्थेतर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.    कु.धनश्री बिडवे ,सुरज लिपणे, नेहा बिडवे, तन्वी पवार आणि समृद्धी होंडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत वक्त  केले तसेच अश्विनी कोळपे , राधिका आकात या शिक्षिकानी विद्यार्थ्यांना सावित्री बाई फुले यांच्या जीवनविषयक माहिती दिली.   अध्यक्षीय समारोपात शेख यांनी विद्यार्थ्यांना थोर लोकांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला.   या कार्यक्रमाचे सूत

दि जालना पीपल्स बँक निवडणूक ,सचिन सांबरे यांचा विकासकुमार बागडी यांना जाहीर पाठींबा

Image
जालना प्रतीनिधी समाधान खरात    जालना पीपल्स बँकेच्या निवडणुकीत आता कुठे रंगत येऊ लागली आहे. या निवडणूकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे. दरम्यान, अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार विकासकुमार बागडी यांना सचिन रुपचंद सांबरे यांनी जाहीर पाठींबा दर्शविला आहे.     यावेळी खाटीक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मनोज बागडे, भुषण सांबरे, पांडुरंग शिंदे, अनिल लष्कर, कैलास गायकवाड, रवि सांबरे आदींसह असंख्य लोक व मतदार उपस्थित होते.  सांबरे यांनी केवळ पाठींबाच दर्शविला नाही तर ते आता विकासकुमार बागडी यांचा प्रचार देखील करणार असून त्यांच्या विजयासाठी आपण आपल्या जीवाचे रान करु, अशी ग्वाही  सांबरे यांनी दिली आहे. जालना पीपल्स बँक ही व्यापार्‍यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांची कामे व्हायला पाहिजेत म्हणूनच आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे श्री. विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण     आज आनंद इंग्लीश स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गीतगायन स्पर्धा घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.    याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, एकनाथ कदम सर व प्राचार्य नारायण सागुते ,श्रीमती दिपाली हरजुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.             कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ कदम सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगातून सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करून दिली व त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेच असे सांगितले.तसेच प्राचार्य नारायण सागुते यांनी गाण्यातुन सावित्रीबाईच्या विचारावर प्रकाश टाकला.   विद्यार्थ्यांनी अनेक समाजसुधारकांच्या जीवन चरित्रावर, देशभक्तिपर गीते, कविता सादर केल्या,आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास काळे यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.