ह भ प तुकाराम महाराज मुंढे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली वाघाळा येथील अंखड हरीनाम सप्ताहची सांगता
तळणि(रवी पाटील) काकूलती येता हरी क्षणभरी निवडीता ॥१॥ तुमची मज लागली सवे ठायीचे नवे नव्हो गडी ॥ धृ ॥ या जगदगुरू तुकाराम महाराजाच्या काल्याच्या प्रकरणातील मांडणी करणाऱ्या अंभगावर सुंदर निरूपण केले भगवान पर त्माची उपासना करत असत असताना दोन प्रकार सागितले आहे एक परमात्मा सगून मानला आहे तर एक निर्गुन मानला आहे शास्त्र त्याला निर्गुन म्हणतय आणि संत त्याला संगून म्हणतात संत ज्ञानोबारायाना सुध्दा हा प्रश्न पडला होता तुज सगून म्हणू की निर्गुन रे पण संताच्या नंतर लक्षात आले सगून निर्गूनी गोविंदू रे ज्याला शास्र अव्यक्त म्हणतात त्यालाच संत व्यक्त म्हणतात व्यक्त आणि अव्यक्त तुचि एक निभ्रांत हे निळोबारायाचे प्रमाण सिद्ध आहे भक्ती साधना ही व्यक्त होणारी साधना साधना असावी योग साधना ही अव्यक्त साधनात होते तर भक्ती मार्गाने केलेली साधना ही व्यक्त साधनांना ने प्राप्त होईल संतांनी सागीतल्या प्रमाणे निर्गुण परमात्मा हा प्राप्तीचा विषय नसतो निर्गुण हा अनुभव याचा असतो आणि सगूण प्राप्त करून घ्यायचा असतो मनष्य जर निर्गुणाच्या अनूभुतीचा विचार करू लागला तर मनुष्य जीवनात साधना खडतर आहे