Posts

Showing posts from April, 2024

राजेंद्रप्रसाद अग्रवाल यांचे निधन

Image
 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   येथील व्यापारी राजेंद्रप्रसाद मोहनलाल अग्रवाल(६३) यांचे दीर्घ आजाराने जालना येथील खाजगी दवाखान्यात रविवारी दि.२८ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा होत.ते रा.स्व.संघाचे कार्यकर्ते मनिष अग्रवाल यांचे काका होत.   त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीत रविवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापारी,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील तसेच मित्र मंडळी उपस्थित होते.

समाज माध्यमातही होतोय मतदानाचा जागर

Image
परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण   दि.२१ - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाप्रमाणेच आता समाज माध्यमावरही जास्तीत जास्त मतदान करावे याबाबत आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मतदान करण्याबाबतचे संदेश समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात झळकू लागले आहेत.व्हॉटसऍपच्या स्टेटसवर मतदान करण्याचे संदेश ठेवले जात आहेत.     लोकसभा निव्वडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला आहे.दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. परभणी मतदारसंघात येणाऱ्या परतूर विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेली निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.    लोकसभा निववडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने आटोकात प्रयत्न केले जात आहेत. शहरातील प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी बॅनर लावून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ' स्विप ' कार्यक्रमांतर्गत बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या माध्यमातून

ओंकारेश्वर आश्रमात गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर अत्याधुनिक नुतन गोशाळा इमारतिचे अनावरण

Image
तळणी प्रतिनिधी ( रवि पाटील ) तळणी येथून जवळच असलेल्या  ओंकारेश्वर आश्रमात गुढीपाडव्याच्या शूभ मुहूर्तावर अत्याधुनिक नुतन गोशाळा इमारत अनावरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न. मंठा तालुक्यातील ओंकारेश्वर संन्यास आश्रम देवगाव खवणे या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून जालना जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी नियमितपणे या ठिकाणी येत असतात.गुरुवर्य परमश्रद्धेय श्री.महंत भागवत गिरीजी महाराज(मठाधिपती श्री क्षेत्र नांगरतास संन्यास आश्रम ) यांच्या प्रेरणेने व श्री. महंत बालक गिरीजी महाराज (अध्यक्ष सद्गुरू श्री सेवागिरीजी सेवा ट्रस्ट, संस्कार प्रबोधिनी गुरुकुल /विद्यालय )यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकारेश्वर आश्रमात समाज हित डोळ्यासमोर ठेऊन वेगवेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण व प्रेरणादायी, दिशादर्शक सामाजिक उपक्रम सेवेकरी भक्तांच्या सहकार्याने राबवले जातात. ओंकारेश्वर आश्रमात पूर्वीपासून गो पालन केले जाते परंतु या गायीसाठी गोशाळा अस्तिवात नव्हती. या ठिकाणी गोशाळा उभी राहावी अशी भागवत गिरीजी बाबाजीनी इच्छा व्यक्त केली तेंव्हा महंत बालक गिरीजी महाराज यांनी

परतूर शहरातील मलंग शाह चौक ते अंबा रोड दरम्यानचे अतिक्रमणावर हातोडा

Image
  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी अंबा व इतर ग्रामीण भागातील नागरिकांनी परतुर शहरात प्रवेश करताना आणि मलंग शाह चौकातील झालेल्या अतिक्रमणामुळे झालेली अडचण  प्रशासनासमोर मांडली आणि योग्य कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार करण्याचा इशारा दिला होता    याची गांभीर्याने दखल घेत नगरपालिका प्रशासनाने आज रोजी या रस्त्यावरील सर्व हातगाडे पान टपऱ्या रस्त्यावर साचलेले लोकांचे बांधकाम साहित्य सर्व हटवण्यात येऊन रस्ता मोकळा केला या कार्यवाहीमुळे मलंग शहा चौकाने आणि तेथील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला सदर कार्यवाही माननीय मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली या कामी नगरपरिषद कार्यालयाचे स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे अनिल पारीख,काशिनाथ जाधव ,सुदाम खंदारे,अशोक पावर इत्यादी स्वच्छता कर्मचारी यांनी पार पाडली

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतूर च्या वतीने गटवीकास अधीकाऱ्यांना निवेदन

Image
 परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण   येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद च्या वतीने दि. 18 एप्रील रोजी वीवीध मागण्याचे एक निवेदन देण्यात आले      शिक्षकांचे आनेक देयक बाकी असून त्या मधे शिक्षकांचे वैद्यकीय देयक व , थकीत देयक , आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त देयक बाकी असल्या मुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतूर चे तालूकाध्यक्ष दिलीप मगर यांच्या नेतृत्वखाली गटवीकास अधिकारी कार्यालयात एक निवेदन दिले दिलेल्या निवेदनावर कल्याण बागल पाटील,विष्णू कदम,विशाल ढवळकर,ए. एच.देशमुख,मोरे बी.आर.,बी.बी.आन्सारी,शे.ताहेर म.जफर, तोटे,पाईकराव, आढे,रामेश्वर हातकडे,कैलाश गाडगे,नदिम अन्सारी,म.इक्कबाल,भारसाकळे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

परतूरमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना ' होम वोटिंग ' प्रशिक्षण

Image
परतूर कैलाश चव्हाण  दि.१७ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदारांना स्वतःच्या घरून मतदान करता येणार आहे.हे मतदान कसे करावे याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.१७) प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार विजयमाला पुपलवाड, श्रीकांत गादेवाड यांची उपस्थिती होती.दरम्यान,२० एप्रिल रोजी प्रत्यक्ष घरी जाऊन निवडणूक विभागाचे कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत.     लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ८५ पेक्षा जास्त वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी यासाठी सूक्ष्म निरीक्षक,सेक्टर अधिकारी,पर्यवेक्षक,बीएलओ इतर निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. ----------------------------------------    यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वेगळे वैशिष्टय म्हणजे निवडण

सेवानिवृत्त कर्मचारीही करणार मतदान जनजागृती

Image
परतूर प्रतिनिधी  कैलाश चव्हाण    दि.१६ - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने कसोशीने प्रयत्न केले जात असून मंगळवारी (दि.१६) नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचे आवाहन करणार असल्याचा विश्वास यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवला.      यासंदर्भात निवडणूक नोडल अधिकारी प्रशांत रोहनकर म्हणाले की,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समाजात मानाचे स्थान असते. त्यांच्या शब्दाला किंमत असते.हा मुद्दा लक्षात घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याचे तसेच निवडणूक विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.   यावेळी विष्णुपंत खंडागळे, सुभाषराव बागल, शेख मोईन, सुनील स्वामी, रमाकांत बरीदे, सत्यनारायण सोमाणी, अशोक डिघोळे, खतीब, सुलताना बामुसा आदी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासह स्विप कक्षाचे सदस्य कल्याण बागल उपस्थ

निवडणूक निरीक्षकांची परतूरला भेट

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दि.१५ - लोकसभा निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी सोमवारी नवोदय विद्यालयात सुरु असलेल्या प्रशिक्षणास भेट दिली.     लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरु आहे. नियुक्त करण्यात आलेले कर्मचा-यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.दि.१५ व १६ एप्रिल असे दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी प्रशिक्षण सुरु असताना निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी प्रशिक्षण ठिकाणी भेट देऊन एकंदरीत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार विजयमाला पुपलवाड, चिंतामण मिरासे, विनोद भालेराव,संतोष पवार,रुस्तुम बोनगे, बाबासाहेब तरवटे यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

महामानव डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फराळा व रसनाचे वाटप

Image
परतुर प्रतीनीधी कैलाश चव्हाण    येथे शहरातील मोंढा भागात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रेल्वे स्टेशन व प्रबुद्ध नगर येथुन दिनांक 14 एप्रिल रोजी निघाली या जयंतीत आंबेडकर प्रेमी करीता शहरातील महादेव मंदीर चौक येथे(इंद्रजीत भाऊ हिवाळे युवा मंचच्या) वतीने व्हेज पुलाव ,रसना व पाणी वाटप करण्यात आले     यावेळी इंद्रजीत हिवाळे अखिल भारतीय मातंग संद्या चे तालुका अध्यक्ष, विजय वाणी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परतूर,दगडू घोडे बाबुराव कापसे ,अकबर शेख  दयासिंग भोंड , अशोक हिवाळे , रामा हिवाळे , दत्ता हिवाळे  राजेश पाटोळे , अरुण गायकवाड समीर सय्यद साई घोडे हे उपस्थित होते

मा.नगरसेवक ॲड गोपाळराव देशपांडे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण     येथील देशपांडे गल्लीतील माजी नगरसेवक ॲड गोपाळराव देशपांडे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी ऱ्हदय विकाराने निधन झाले     शहरातील जेष्ठ वीधीतज्ञ ॲड गोपळराव देशपांडे यांचे दि.14 एप्रील रोजी रात्रो 1.30 च्या दरम्यान ऱ्हदय क्रिया बंद पडल्याने निधन झाले ते 1975 ते1980 च्या दरम्यान परतूर नगर परिषचे नगरसेवक होते    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , दोन मुली नांतवड आस परिवार आहे परतूर येथे दि.14 एप्रील रोजी सांय 4.00 वाजता गाव भागातील वैकूठधाम येथे त्यांच्या अत्यंवीधी झाला

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्रीधर जवळा येथे साजरी

Image
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती  श्रीधर जवळा येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीने  साजरी करण्यात आली     या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमीचे पूजन करण्यात आले  यावेळी  जय शिवसंग्राम चे जिल्हा अध्यक्ष सचिन खरात सरपंच वसंत राजबिंडे, उपसरपंच रुस्तुम राजबिंडे सोसायटी चेअरमन भारत राजबिंडे, ग्रा.पं सदस्य प्रल्हाद राजबिंडे, शिवाजी लहाने,भारत राजबिंडे, प्रल्हाद राजबिंडे, भागवत काटे, शाश्वत लहाने,तुकाराम राजबिंडे, सिद्धेश्वर राजबिंडे, दत्ता लहाने, प्रकाश लहाने, नवनाथ राजबिंडे, पांडुरंग मगर, याच्या सह मोठ्या प्रमाणात  गावकरी उपस्थित होते

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

Image
   परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतुर तालुक्यातील रायगव्हाण येथे अति उत्साहात सांगता करण्यात आली. कथा प्रवक्त्या परमपूज्य गुरु माऊली संध्या दीदीजी यांनी तीन दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण , मनन, चिंतन अध्यासन , यावर सविस्तर मार्गदर्शन करून सर्व भाविक भक्तांना शिव महापुराण कथेचे महात्म्य आपल्या रसाळ वाणी मधून पटवून सांगितलेले आहे. तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य कमळाचे फुल बनवून परमपूज्य माऊलींचे आसन कमळाच्या गादीमध्ये केले होते.विशेष म्हणजे श्रीक्षेत्र तामिळनाडू येथील रामेश्वर मंदिराची रोषणाई करण्यात आली होती. सर्व कार्यक्रमाचे नियोजन माऊली सेवा समिती रायगव्हाण यांनी केले...माऊलींची रायगव्हाण येथील हनुमान मंदिर येथून भव्य दिव्य रथा मधून प्रतन करा माऊली सेवा समितीच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय श्रद्धा दीदी जी एडवोकेट सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली यांनी केली. यावेळी सिद्धेश्वर केकांन सह सर्व गावकऱ्यांची उपस्थित होती.

निवडणूक विभागाने केली ' ईदगाह ' मध्ये मतदान जनजागृती, तयारी निवडणुकीची : रमजान ईदचे निमित्त

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    दि.११ - लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने पवित्र रमजान ईदचे औचित्य साधून ईदगाह मैदानावर मतदान जनजागृती करण्यात आली. दरम्यान, यावेळी सादर करण्यात आलेल्या बोलक्या बाहुल्याच्या प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली.     पवित्र रमजान ईद गुरुवारी आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. याच ठिकाणी मौलाना कदीर मुफ्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत ईदची नमाज अदा करण्यात आली.एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.   रमजान ईदचे औचित्य साधून निवडणुक विभागाने या ठिकाणी निवडणुकीत मतदान करणे का आवश्यक आहे ? जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती केली. ---------------------------------------     ईदगाह मैदानावर एक स्वतंत्र मंडप उभारून प्रारंभी गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत,तहसीलदार डॉ. प्रतिभा ग

2024 चा भिमरत्न पुरस्कार योगी प्रधान यांना

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतूर येथील रहिवाशी योगी प्रधान यांना यंदाचा 2024 चा भीमरत्न माजलगाव येथे एका कार्यक्रमातदेण्यात आला    योगी  प्रधान हे समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असून समाजातील शोषित पीडित घटकातील लोकांना नेहमीच मदत करत आसतात, वैद्यकीय, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक कॅम्प घेवून गोरगरिबांना मदत करीत राहतात नेहमीच परतूर येथिल समज घटकाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करीत असतात त्यामुळें योगी प्रधान यांचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे    समित्र कॉलनी येथील त्यांच्या चाहत्यानी  योगी प्रधानला  नगर सेवक करण्याचा निर्धार केला आहे  त्यांच्या ह्याच समाज हिताच्या कार्याची दखल घेऊन भिमरत्न पुरस्कार 2024माजलगाव येथे माजलगाव मतदारसंघाचे चे आमदार प्रकाश सोळंके  यांच्या हस्ते देण्यात आला त्याप्रसांगी परभणी चे स विठ्ठल कांगने सर, टायगर ग्रूप चे प्रदेश अध्यक्ष उमेश  पोखरकर, व‌ इतर मान्यवर उपस्थित होते

अवैध वाळू वाहतूक करणारऱ्या लिलाव धारकावर कारवाई, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Image
तळणी ( प्रतिनिधी ) रवी पाटिल     पूर्णा नदी पात्रातून अवैध रित्या वाळू वाहतुक करणार्या दोन हायवावर .स्थानिक गुन्हे शाखा व मंठा पोलीसांनी कारवाई करुन .८१ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करून ठेकेदार हायवाचालकासह राजेभाऊ तांबे याच्यावर ३७९ / ३४ कलम नुसार मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई शनिवारी रात्रीच्या वेळेस लोणार मंठा रोडवर सासखेडा गावानजीक ही कारवाई करण्यात आली . या दोन हायवामध्ये वीस ब्रास अवैध वाळू आढळून आली .सद्यस्थितीत तळणी परीसरात शासनाच्या डेपोवर सर्वसामान्याला वाळू मिळेना झाली अनेकांची कामे वाळू अभावी खोळंबंली असून ठेकेदार स्वःत अवैध विक्री करत असेल तर सर्वसामान्याला वाळू मिळणार कधी लिलाव धारकावर गुन्हा दाखल होण्याची घटना प्रथमच घडली आहे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू उत्खनन करणार्यावर पण लक्ष द्यावे अशी मागणी पूढे येत आहे या प्रकरणाचा तपास तळणी बीट चे रखमाजी मुंढे याच्याकडे दिला आहे  पुर्णा नदीकाढच्या तळणी - लोणारकडे तब्बल ३० मिनीटात २० वाळुचे टिप्पर धावतात. हे टिप्पर रायल्टी घेऊन की बिना रॉयल्टी वाहतूक करतात हे कळणार कसं ? याबाबत महसूल कडुन तपासणी कधी