Posts

Showing posts from December, 2022

ग्राऊन्ड रिपोर्ट : तळणी प्राथमिक आरोग्य केद्रांचा कारभार राम भरोसे

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील तळणी " मंठा तालूक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या तळणी येथील प्राथमिक आरोग्य केद्रांचा कारभार हा राम भरोसे च आहे दोन मेडीकल अधिकारी व १५ कर्मचार्याची आरोग्य विषयक समस्याची सपूर्ण .जबाबदारी असताना सुध्दा आज प्रत्यक्ष्य पाहणीत सातच कर्मचारी उपस्थीत असल्याचे निदर्शनास आले यामध्ये यु एल कुटे मनिषा घनसांवंत सदीप गहीलोद आदेश घुले स्वाती सुरूसे नवनाथ सपाटे सचिन डोगरे हे कर्मचारी वेळेत उपस्थीत आढळून आले तर दोन वैद्यकीय अधिकारी असलेल्या केद्रात वेळेच्या आत दोनही वैद्यकीय अधिकारी गैरहजर दिसून आले एका कर्मचार्यानी वैद्यकीय अधिकारी एम आर चव्हाण यानां .सपर्क करून बोलावून घेतले  तळणी ग्रामस्थ ज्ञानेश्वर राठोड यानि जिल्हाधिकार्याला दिलेल्या निवेदनात सागीतले की तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांचे आरोग्य कर्मचारी वेळेवर उपस्थीत राहत नसून रुग्नाची हेळसांड होती ग्रामस्थ राठोड यानी स्वःत आरोग्य केद्रांची पाहणी केली असता उपस्थीती पटावरील १७ कर्मचार्या पैकी पाच कर्मचारी उपस्थीत होते तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांच्या अतर्गत दहा ते पंधरा गावे येत अ...

परतुर आरोग्य कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी संजय राऊत तर सचिव पदी अंकुश चव्हाण

Image
 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण         येथील पंचायत समिती सभागृह येथे दिनांक 28 रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली        या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल सिंग ठाकूर, आर आर तोटे आरोग्य पतसंस्था संचालक , साथरोग अधिकारी डॉक्टर नागदरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती       या बैठकीत आरोग्य कर्मचारी संघटनेची निवड करण्यात आली यामध्ये सर्वानुमते संजय राऊत यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिव म्हणून अंकुश चव्हाण यांची निवड करण्यात आली कोषाध्यक्ष अशोक आडे तालुका महिला कृती समिती अध्यक्ष श्रीमती सोनाबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी यांनी नवीन कार्यकारणी शुभेच्छा दिल्या

मराठवाडा- विदर्भाची वाटचाल अनुशेषाकडून कालबद्ध विकासाकडे,सरकारच्या विकास मोहिमेचे भाजपा कडून स्वागत,महाविकास आघाडीने सातत्याने अन्याय करून रोखलेल्या विकासाच्या वाटा आता मोकळ्या- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आजपर्यंत केवळ सरकारी उपेक्षेमुळे विकास, सिंचन आणि कृषी क्षेत्राच्या समस्यांनी ग्रासलेल्या विदर्भ, मराठवाडा या अनुशेषग्रस्त भागांना प्रथमच विकासाची चाहूल लागली असून शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या विविध योजनांमुळे या भागाच्या विकासास चालना मिळणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने सातत्याने अन्याय करून रोखलेल्या विकासाच्या वाटा आता मोकळ्या झाल्याने राज्यात खऱ्या अर्थाने विकासाभिमुख वाटचाल सुरू झाली आहे, अशी भावना माजी मंत्री आमदार श्री. बबनराव लोणीकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.        महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला होता , याची आठवणही माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी करून दिली आहे.    विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात घेण्यामागे या भागातील अनुशेषाच्या मुद्द्यांवर तोडगा काढून विकासास चालना द्यावी हाच उद्देश होता. पण आजवर केवळ राजकीय हेवेदावे आणि...

मराठवाडा वॉटर ग्रीड कार्यान्वित करा या मागणीसाठी मराठवाड्यातील भाजपा आमदारांचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन,आघाडी सरकारने बासनात गुंडाळलेली मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा सुरू करून मराठवाड्यातील पाण्याची दुर्भिक्ष संपवा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,इस्राईल येथील मेकोरेट कंपनीने, अभ्यासपूर्ण मांडणी करत केला होता प्रकल्प अहवाल( डी पी आर) सादर,निवेदनावर आ हरिभाऊ बागडे, आ बबनराव लोणीकर, आ अभिमन्यू पवार यांच्यासह मराठवाड्यातील 17 आमदारांच्या स्वाक्षऱ्या

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण   तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून संबोधली जाणारी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र व उद्योग धंद्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे काम पुन्हा सुरू करून योजना पूर्ण करून मराठवाड्याची दुष्काळ वाडा ही ओळख पुसून काढा अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देऊन केली      मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदरील निवेदन सादर करताना मराठवाड्यातील पाणी प्रश्नाची जाणीव करून देत आघाडी सरकारने बासनात गुंडाळलेली योजना कार्यान्वित करणे कसे गरजेचे आहे ही गोष्ट उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्यानात आणून दिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे क...

संगणक परिचालकांच्या मोर्चाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची भेट,संगणक परिचारकांचे मानधन मध्यस्थ कंपनीमार्फत न देता प्रत्यक्ष जिप आथवा ग्रामपंचायत मार्फत द्या या मागणीसाठी पाठपुरावा करणार,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे मोर्चात सहभागी संगणक परिचालकांना आश्वासन,मोर्चात सहभागी संगणक परिचालकांनी दिले माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना निवेदन

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  नागपूर येथील अधिवेशनादरम्यान राज्यातील संगणक परिचालकांनी टी एस टी व्ही टी या मध्यस्थ कंपनी मार्फत मानधन न देता केंद्र सरकार मार्फत ग्रामपंचायतला दिल्या जाणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतला वर्ग करून प्रत्यक्ष जि प अथवा ग्रामपंचायत इकडून मानधन द्या आयटी महामंडळामध्ये सामावून घ्या आदी मागण्यासाठी राज्यातील संगणक परिचालकांनी काढलेल्या मोर्चाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भेट देत संगणक परिचालकाच्या संदर्भामध्ये शासन गंभीर असून लवकरच आपल्या मागण्यांचा विचार करून त्या सोडवल्या जातील यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी मोर्चेकरयांना आश्वासन दिले यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की संगणक परिचालकांना दिले जाणारे मानधन ही केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगांमधून दिले जात असून हे मानधन वितरित करताना मध्यस्थ कंपनीमार्फत वितरित करण्यात येते त्यामुळे प्रत्यक्ष 12000 मानधन असताना व राज्य सरकारचे 1 हजार रुपये मानधन संगणक परिचालकांना असताना...

तळणी येथे दिनदर्शीकेचे प्रकाशन

Image
तळणी रवी पाटिल        येथील मंठा को ऑप बँकेचे चेअरमन नितीन सरकटे याच्या पूढाकाराने दिनदर्शीकेचे वितरण करण्यात आले नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प विष्णू महाराज बादाड याच्या शुभहस्ते या दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थीताना मार्गदर्शन करते वेळी बादाङ महाराज म्हणाले की ग्रामीन भागात आजही दिनदर्शी केला अनन्यसाधारण महत्व आहे नितीन सरकटे  विनामूल्य दिनदर्शीका सर्व तळणी ग्रामस्थाना उपलब्ध करून देत असून हा स्तू त्य उपक्रम असून सामाजीक बांधीलकी जोपासण्याचा हा एक छोटा प्रयत्न असून यापूढे ही असेच छोटे उपक्रम राबवणार असल्याचे नितीन सरकटे यानी सांगीतले        यावेळी सरपंच गौतम सदावर्त शरद पाटील गजानन देशमुख दारांसिग च०हाण विश्वनाथ दादा भगवान देशमूख नारायण सरकटे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सरकटे अरविद भावसार जगनाथ भावसार व सर्व व्यापारी ग्रामस्थ उपस्थीत होते

आष्टी परिसरात अन्न व उत्पादन शुल्क व पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे मोठ्या जोमात,आष्टी पोलिसा सह अन्न उत्पादक शुल्क अधिकाऱ्यांचे नियम धाब्यावर

  प्रतिनिधी कैलास चव्हाण  परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू व गुटखा मोठया प्रमाणात खुले आम पान टपरीवर धाब्यावर विक्री सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. मात्र अन्न व उत्पादन शुल्क अधिकार्या सह एलसीबी चे अधिकारी तसेच आष्टी पोलीसांची खुली परवानगी दिल्या प्रमाणे जाणीव पूर्वक पणे डोळे झाक करत आहे आष्टी सह परिसरात, देशी विदेशी दारू , गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची खुले आम विक्री हॉटेल,किराणा दुकान,पानटपरीवरून अवैध विक्री सुरू आहे. तर धाब्यावर मोठया प्रमाणात अवैद्य दारू विक्री होत आहे याकडे अन्न व उत्पादन शुल्क अधिकार्या सह आष्टी पोलीसांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.आष्टी शहरात बनावट दारू व गुटखा माफियांकडून आष्टी व परिसरात जवळील खेडे गावात बनावट दारू गुटखा पुरवठा केला जातोय. यातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे यामुळे मात्र अल्पवयीन तरुण व शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थी व्यसनाधीन होत आहे तर बनावट दारू ही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.या मुळे नागरिकांच्या आरोग्यासं मोठी हानी हिण्याची शक्यता आहे पण अन्न व उत्पा...

दैठणा खु ग्रामपंचायत राकॉ च्या ताब्यात,सरपंचासह सर्व उमेदवार विजयी

Image
       परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दैठना खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीकडे तालुक्यातील अनेक दिग्गजाचे लक्ष लागले होते. या अटीतटिच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच उमेदवारांचा सफाया करीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहे. दैठना खुर्द येथे भाजपचे प्रतिष्ठेचे पदाधिकारी असल्याने या ग्रामपंचायतीकडे तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागले होते.          निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र दैठना खुर्द येथे राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याने भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीने एका हाती सत्ता मिळविण्यात यश आले. ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दैठना खुर्द येथे राष्ट्रवादीने एका हाती सत्ता मिळाल्याने युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी विजयी सरपंच सदस्याचा सत्कार करून शुभेछा दिल्या.       दैठना खुर्द येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पॅनलच्या सर्व सदस्य व नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रचंड मतांनी निव...

परतूर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी योगेश बरीदे तर सचिव पदी सय्यद वाजेद

Image
परतुर,/प्रतिनिधी कैलाश चव्हाण परतूर मराठी पत्रकार संघाची गुरुवारी (दि.२२) रोजी शासकीय विश्रांम संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर (मुन्नाभाई) चितोडा याचा अध्यक्षेतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी योगेश बरीदे तर कार्याध्यक्ष पदी शामसुंदर चितोडा, सचिव पदी सय्यद वाजेद,उपाध्यक्षपदी कैलास चव्हाण,कोषाध्यक्ष पदी संजय देशमाने,सह सचिव शेख अथर याची सर्वानुमते बिनविरोधी निवड करण्यात आली.                                   यावेळी जेष्ठ पत्रकार शेषराव वायाळ, श्यामसुंदर चितोडा,सुरेश कवड़े,रशीद बागवान, प्रभाकर प्रधान, सागर काजळे,संतोष आखाडे,कैलास सोळंके,संतोष शर्मा , हनुमान दवंडे, राहुल मुजमुले,मुमताज अन्सारी,सय्यद जुनेद,सय्यद तय्याब,पांडुरंग शेजूळ,  कुलदीब बिनगे, शेख असेफ, दरम्यान,यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पद आधिकारी याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ------- फोटोओळी:परतूर:परतूर मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्...

यंदाचा परीट धोबी समाजाच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार नगरसेवक कृष्णा अरगडे यांना प्रदान,सदैव समाजाच्या ऋणात राहील समाजकार्यासाठी नियमितपणे हाक द्या मी साथ देईल- कृष्णा अरगडे

Image
जालना  प्रतिनिधी समाधान खरात  अतिशय मनाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा जालना जिल्हा समाज भूषण पुरस्कार धोबी परीट समाजाचे कार्यकर्ते परतूर येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कृष्ण आरगडे यांना जालना येथे प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना कृष्णा आरगडे यांनी आपल्यावर समाजाचे ऋण असून समाजाचे उत्तरदायित्व निभवण्यासाठी आपण सदैव समाजसेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले      पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजाच्या सेवेत सदैव असून समाजकार्य करण्यासाठी मला केव्हाही हाक द्या मी साथ देण्यासाठी तयार असल्याचे धोबी परीट समाजाचे युवा कार्यकर्ते कृष्णा आरगडे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले की संत गाडगेबाबांनी ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजात मला जन्म मिळाला याचा मला सार्थ अभिमान असून जगकल्यासाठी मला जे जे करता येईल त्यासाठी मी सदैव तत्पर असून कुठल्याही सामाजिक उपक्रम संदर्भामध्ये आपण पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची यावेळी बोलताना त्यांनी सांगितले माझ्या आईने केलेले संस्कार हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून तिच्या संस्क...

भवीष्यात आजून चांगल्या पद्धतीने सामने घेऊ -महेश नळगे

Image
 परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण शिवसेना जेष्ठ नेते रामेश्वर  नळगे यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर येथे  शारजा मैदानावर लीग पद्धतीचे टेनिस बॉल क्रिकेट चे सामने आयोजित करण्यात आले  होते     या प्रमियम लीग सामन्या मधे 8 संघाने भाग घेतला होता या सामन्याच्या        अंतिम सामाना एम एच 21 वीरूद्ध शिश ऐलेव्हन मधे खेळवण्यात आला होता हा सामना आटी तटीचा झाला या मधे   एम एच 21  संघाने सामना जिंकला          या सामन्या चे पारीतोषक वीतरन शिवसेना उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थीत युवा सेना जिल्हा समन्वयक  महेश नळगे , माजी सभापती आशोक आघाव, उपतालुका प्रमुख कांतराव सोंळके ,बाळू सोनवने होते   यावेळी बोलताना महेश नळगे यांनी सांगितले की   भविष्यात हि तरूणांनसाठी चांगले पद्धतीने व आधूनीक पद्धतीने सामने शिवसेने तर्फे आयोजित करू   पुढे बोलताने ते म्हणाले की युवकानी या खेळातून सांघीक भावना ही वाढीस लागावी व खेळा सोबत शारीरीक काळजी घ्यावी तसेच युवकांनी व्य...

शेवगा येथील सरपंच व सदस्यांचा सर्वपक्षीय गावकर्‍यांच्या वतीने सत्कार संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी तालुक्यातील शेवगा ग्रामपंचायतीची निवड प्रक्रिया हि बिनविरोध झाली निवड झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शेवगा येथील सर्वपक्षीय गावकर्‍यांच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर मंगळवार रोजी श्री हनुमान मंदिर येथे भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.      यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना सांगितले की मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असुन येणार्‍या काळात आपण सर्व गावकरी व सर्व पक्षीय मिळुन गावाचा विकास साधुयात.बिनविरोध निवडीबद्दल व सहकार्या बद्दल सरपंच व सदस्यांनी गावकर्‍यांचे व सर्वपक्षीयांचे यावेळी आभार व्यक्त केले.

परतुर शहरातील बालाजी नगर मध्ये घाणीचे साम्राज्य भर वस्तीमध्ये सांडपाण्याचे मोठे डबके साचल्याने नागरिकांना सहन करावा लागतो प्रचंड त्रास,साचलेल्या पाण्याच्या डब्याला वळसा घालून करावा लागतो जीवघेणा प्रवास,नागरिकांचे आरोग्य धोक्यात,बालाजी नगर च्या रहिवाशांनी नरेश कांबळे यांच्या समोर मांडल्या व्यथा*

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतूर शहरातील बालाजी नगर वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून सांडपाण्याची टपके आणि भर वस्तीमध्ये साचल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वस्ती मधून बाहेर पडताना नागरिकांना वळण रस्ता वापरावा लागत आहे या संदर्भामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते नरेश कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालिका प्रशासनाची उदासीनता या गोष्टीस कारणीभूत असून स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष या बाबीकडे होत असल्यामुळे येथे हे भले मोठे पाण्याचे डबके तलावाच्या स्वरूपात मध्यभागी असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या भागातील नागरिक नियमितपणे नगरपालिकेच्या संपर्कात राहून सदरील घाण पाण्याचे डबके स्वच्छ करा अशा प्रकारची मागणी करत असतानाही पालिकेतील स्वच्छता विभागाचे कर्मचारी मात्र उडवा उडीचे उत्तरे देऊन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचेही नरेश कांबळे यांनी पत्रकात नमूद केली आहे पुढे या पत्रकात म्हटले आहे की या भागामध्ये अनेक शिक्षक मंडळी,डॉक्टर मंडळी व समाजातील प्रतिष्ठित व्य...

परतुर मंठा मतदारसंघासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करत परतुर विधानसभा मतदारसंघासाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी खेचून आणून या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत मंठा येथील रेणुका देवी रोड च्या बहु प्रतीक्षित कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे हजारो भाविक भक्तांची देवीच्या दर्शनासाठी जाण्याची सोय होणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून नाबार्ड अंतर्गत लोणी खूप ते बानाची वाडी रस्ताही अनेक ठिकाणी खचून जात असतो त्यामुळे या रस्त्याला ज्या ठिकाणी रस्ता खचलेला असेल त्या ठिकाणी साईड वाल सह या रस्त्याचे सुधारणा करण्यात येणार असल्याचे आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले असून यासाठी 1.5 रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे पुढे माजी मंत्री आमदार बब नराव लोणीकर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सीआरआयएफ निधीमधून मंठा ते विडोळी पाटोदा रस्त्याची सुधारणा करण्याबरोबरच पाटोदा जवळील पुलाचे बांधकाम करण्यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पत्रका...

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत परतूर ब्राईट स्टार शाळेचे घवघवीत यश

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण        तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड जालना येथे दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलात युवराज गणेश लालझरे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर 17 वर्षाखालील मुलींमध्ये संतोषी गणेश लालझरे प्रथम तर जानवी राजेंद्र मस्के द्वितीय या विद्यार्थिनींनी क्रमांक मिळविले असून या तीनही मुलांची विभागीय क्रीडा संकुल गारखेडा औरंगाबाद येथे होणाऱ्या योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.     या औरंगाबाद क्रीडा विभाग निवड झाल्या बद्दल त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री गजानन कुकडे सर ,शाळेचे मुख्याध्यापक श्री खनके सर, श्री शब्बीर सर, भालेराव सर व सर्व शिक्षक, पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभस्व गोपीनाथराव मुंडे जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला करण्यात आली सुरुवात,रूरबन योजनेच्या माध्यमातून आष्टी शहराला 85 कोटी रुपयांचा निधी दिला ,आष्टी शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी केंद्र व राज्याचे मिळून 12 कोटी रुपयांचा निधी,आष्टी शहराला नगरपंचायत चा दर्जा देणार

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आष्टी सर्व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी पुरस्कार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते आष्टी येथे आष्टी ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की आपण मंत्री असताना आष्टीसह 16 गावांचा राष्ट्रीय रुरबन योजनेमध्ये समावेश करून घेतला व या 16 गावांचा समतोल विकास केला  आष्टी सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला नगरपंचायत मध्ये रूपांतरित करण्याचा आपला प्रयत्न असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निश्चितपणे आष्टीला नगरपंचायत चा दर्जा प्राप्त करून देण्याचा आपला प्रयत्न राहील असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आष्टी ही माझी कर्मभूमी असून या कर्मभूमीतच खऱ्या अर्थाने मी लहान चा मोठा झालो थेट मंत्री पदापर्यंत पोहोचलो त्यामुळे माझा येथील जनतेवर विश्वास असून निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलचे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते संपन्न होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाचा आनंदोत्सव माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर करणार साजरा,निधोना जि जालना येथे, सकाळी 10 वाजता करणार आनंद उत्सव साजरा

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  दिनांक 11 रोजी देशाचे लाडके पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते नागपूर ते मुंबई स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असून या लोकार्पणाचा आनंद उत्सव भाजपा आमदार बबनराव लोणीकर जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील निधोना येथे  साजरा करणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे पुढे या पत्रकात म्हटले आहे की स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना थेट नागपूर ते मुंबई हे अंतर काही तासात पार करता येणार असून यामुळे सर्वसामान्य बरोबरच व्यापारी शेतकरी यांना आपला माल  थेट काही तासातच मुंबई येथे पोहोचवता येणार आहे या माध्यमातून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागातील नागरिकांना अति जलद सुविधा उपलब्ध होणार असून यामुळे खऱ्या अर्थाने राज्याचा विकासाची नवी दिशा सापडणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या पत्रकात नमूद केली आहे  पुढे या पत्रकात म्हटले आहे की देशाच...

युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यात तीन तास राज्यातील विविध विषयावर चर्चा ,प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केलेल्या कामाचा कार्य अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी जी सुर्या यांच्याकडे सुपूर्द केला

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  दिल्ली येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह प्रदेश महामंत्री अनुप मोरे सुशील मेंगडे, शिवानीताई दाणी यांच्यात झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या पुढील रणनीती विषयी सुमारे तीन तास चर्चा झाली या चर्चेदरम्यान युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व महाराष्ट्र युवा मोर्चा यांनी केलेल्या धन्यवाद मोदीजी उपक्रमातील पाच लाख पत्र संकलित केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी विशेष कौतुक केले पुढे या चर्चेदरम्यान नव मतदार नोंदणी युवा वॉरियर्स शाखांचा विस्तार अदि बाबतीमध्ये विस्ताराने चर्चा करण्यात येऊन, येणाऱ्या काळामध्ये राज्यात युवावारीयर्स शाखा चा राज्यभरात मंडळ स्तरापर्यंत विस्तार करण्यासंदर्भात राहुल लोणीकर यांनी आपले मत व्यक्त करताना राज्याच्या कार्याकोपऱ्यामध्ये 18 ते 24 वयोगटातील युवा कार्यकर्त्यांना युवा वारीयर्स च्या माध्यमातून भाजपशी सलगरीत करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगतानाच नव मतदार नोंदणी अभियानाच्या माध्यम...

योगानंद विद्यालयाचा वयोगट 17 मुलांचा संघ जालनाजिल्ह्यात प्रथम

 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा जि.जालना येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे 17 वर्षे वयोगटातीvल मुलांचे क्रिकेट सामने पावसाळी क्रीडा स्पर्धा अंतर्गत ठेवण्यात आले होते त्यात वयोगट 17 मुलांच्या क्रिकेट मध्ये जिल्हा स्तरिय स्पर्धेत परतूर येथील श्री योगानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला पोदार शाळे सोबत अंतिम सामन्यात योगानंद शाळेच्या यश चव्हाण व कर्णधार वीरेन बागल यांनी नेत्रदीपक कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला.  सर्व खेळाडू व प्रशिक्षक परिमल पेडगावकर यांचे योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी मुख्यध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ रेखा परदेशी , प्रा. शेळके , तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड  , आकाश गोरे , विद्यालयाचा माजी विद्यार्थी शरीफ शेख, प्रशांत पवार यांनी अभिनंदन केले आहे व पुढील विभागीय स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत

सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम विभाग जालना यांच्यातर्फे 55 वंचित मजूरना सुरक्षा किट वाटप

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार मजुरांसाठी भरपूर काही अशा योजना राबवत आहेत या योजना गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ही बाब सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुर चे सनी गायकवाड यांच्या लक्षात येताच,तीन वर्षापासून सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुर चे सनी गायकवाड यांच्या वतीने वंचित घटकातील कामगार यांना त्यांच्या हक्काची योजना त्यांच्या परत पोहोचत नव्हती ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे तीन वर्षापासून सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक योजनेचा लाभ त्यांना देण्यात आला आहे आज पण तब्बल 50 कामगारांना कामगार ऑफिस जालना येथून सनी गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे त्या कामगारास पन्नास सुरक्षा किट च वितरण करण्यात आला तसेच किट मिळतात सर्व कामगारां न सनी गायकवाड यांचे मनापासून आभार मानले     सनी गायकवाड बोलताना असे म्हणाले की जालना जिल्ह्यातील जे कोणतीही शासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी जर गजवंत व वंचित लोकांचे काम होत नसतील तर सन ऑफ आंबेडकर ग्रुप च्या माध्यमातून आम्ही त्यांचे काम करून देऊ या अगोदरही सनी गायकवाड यांनी भरपूर असे ...

प्रा.सिध्दार्थ पानवाले यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  07 डिसेंबर. नाशिक येथील नामांकीत तेजस फाऊंडेशन ने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली.संस्थेच्या अध्यक्ष चित्रपट तथा नाट्य दिग्दर्शिका मेघा डोळस यांनी प्रसिध्दीपत्रक आणि निवडीच्या पत्राद्वारे जाहीर केले.      सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तींना हा पुरस्कार संस्था गेल्या 18 वर्षांपासुन जाहीर करत आलेली आहे. तेजस फाउंडेशन संस्थेने आजपर्यंत पुरस्कार दिलेल्या व्यक्तींपैकी सर्वांत तरुण वयाचे व्यक्ती आहेत. येत्या १३ डिसेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र,औरंगाबाद येथे हा पुरस्कार विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्वांच्या उपस्थितीत वितरीत केला जाणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्यापासुन निवृत्त IAS ई झेड खोब्रागडे,निवृत्त IAS उत्तमरव खोब्रागडे,निवृत्त IAS सुभाष हजारे म.स.शि.प्रसारक मंडळचे सचिव कपीलआकात,माजी सभापती बाळासाहेब अंभीरे,ला.ब.शा.महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.खंदारे,उपप्राचार्य रवी प्रधान,माजी नगरसेवक विजय राखे,सादेक खतीब,सिध्दार्थ बंड,डॉ.आबुज,डॉ.केशव बरकुले,ॲड.मस्के,ॲड.मुजाहीदकाजी,जालना नगरसेवक निखील पगारे,बौध्द महास...

रेल्वे स्टेशन परतुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...

Image
  परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      विश्वरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता परतुर रेल्वे स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आर.सी.सी.मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन केले होते,       यावेळी रेल्वे पोलीस दलाचे राजेश उबाळे, मेघराज पाटील व आर सी.सी.मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप (दादा) साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर,व पत्रकारअशोक ठोके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन सभेची सुरुवात केली यावेळी सर्वांनी सामुदायिक वंदना घेतली यावेळी बोलताना विकास वेडेकर म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राचे पालन केले पाहिजे तसेच समता,स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा देखील आपण जपला पाहिजे आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्य...

पाडळी ग्रामपंचायत सरपंच सदस्याची बिनविरोध निवड,राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व.....

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  तालुक्यातील पाडळी येथील ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच व सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. दि ७ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाच्या जागेवर एक उमेदवारी अर्ज आला तर सात सदस्य जागेवर सात उमेदवारी अर्ज राहिल्याने सर्वच सरपंच व सदस्य बिनविरोध निवड झाली आहे. पाडळी येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच व सदस्याची बिनविरोध निवड झाल्याने सत्कार करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात आदि.. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी यावेळी नवनिर्वाचित सरपंच प्रसाद नामदेव काकडे, सदस्य श्रीमती मीठाबाई शामराव काळे, श्रीमती सुष्मिता सचिन मस्के, श्रीमती योगिता अनंतराव मस्के, विष्णू भगवानराव बोराडे, श्रीमती महानंदा विष्णू कासार, श्रीमती राधाबाई शेषेराव मोटे, श्रीमती सावित्रा किसनराव काकडे या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पाडळी येथील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रत्येक तहसील ला सुरू करा:-सचिन खरात

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण         आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका नियोजनाद्वारे करण्यात आली आहे                       निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील गरीब-गरजु रुग्णांना आर्थिक आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी गरजू नागरिकांना मुंबईत मंत्रालयात खेटे मारावे लागतात. परिणामी यामध्ये गरजू नागरिकांचा वेळ जातो शिवाय त्यांना आर्थिक भुरदंड व प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे गरजू व्यक्तींना वेळेत मदतही मिळत नाही. अनेक नागरिक पैशाच्या अभावी मुंबई येथे मंत्रालयात येऊ शकत नसल्याने निधीसाठी प्रस्ताव देखील सादर करू शकत नाही. यामुळे आशा नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी पासून वंचित राहा...

स्व दत्तराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णा (बाई) लोणीकर यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम लोणी ता परतूर येथे संपन्न====================माता पित्याच्या सेवेतच खऱ्या अर्थाने ईश्वरप्राप्ती*_ ह भ प प्रकाश महाराज साठे==================आई-वडिलांच्या पुण्याई मुळेच मी इथ पर्यत पोहचलो*आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आई-वडिलांच्या चरणातच खऱ्या अर्थाने ईश्वरासून ईश्वराला भेटण्यासाठी आई-वडिलांची सेवा करा आई वडील हे जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ असून आई-वडिलांची सेवा करण्यात च खऱ्या अर्थाने सर्व जग सामावलेले असल्याचे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प प्रकाश महाराज साठे यांनी सांगितले ते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील स्व दतराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम प्रसंगी बोलत होते याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा या अभंगाचे निरूपण करताना ह भ प प्रकाश महाराज साठे पुढे म्हणाले की स्व दत्तराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर यांची आमदार बबनराव लोणीकर यांनी खऱ्या अर्थाने सेवा केल्यामुळेच त्यांना उत्तुंग झेप घेता आली माता पित्याच्या संस्कारात वाढलेल्या आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघासह राज्याचे नेतृत्व केले हे करीत असताना आई-वडिलांनी दिलेले संस्कार ते विसरले नाहीत सर्व सामान्य जनतेची सेवा करताना दिन दलित दुबळा पीडित यांच्या सेवेत गेली 40 वर्षे घातली अशीच आई-वडिलांची से...

शासनाकडून शेतकऱ्याला पन्नास हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान खात्यात जमा , परतूर : एसबीआय बँकेचा शेतकरी ठरला पहिला मानकरी

Image
      परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतुर तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी भास्कर मारोती धुमाळ या शेतकऱ्याने नियमित पीक कर्ज भरल्याने एसबीआय बँकेकडून या शेतकऱ्यास शासनाच्या योजनेचा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. परतुर शेवगा येथील शेतकरी भास्कर धुमाळ यांनी नियमित कर्ज भरल्याने पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मिळाल्याने सत्कार करतांना एसबीआयचे उपप्रबंधक मनोहर गावडे, कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, कर्मचारी सह शेतकरी. दिसत आहेत.  शासनाने शेतकर्‍यांना थकीत कर्जदार यांना महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर करून लाभ देण्यात आला. तर नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यात परतूर  भारतीय स्टेट बँकेचे नियमित कर्ज भरणारे शेतकरी भास्कर धुमाळ यांचा स्टेट बँकेचे उपप्रबंधक मनोहर गावडे यांच्या हस्ते  पन्नास हजार रुपये अनुदान खात्यात जमा करून शेतकर्‍यांचा गावात जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्टेट बँकेचे कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, कृषी सहाय्यक गणेश जाधव,...

परतूर शहरातील शाळेसमोरील भाजीपाला बिटमुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण       शहरातील बसस्थानक रोडवरील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयासमोर दररोज सकाळी भरणाऱ्या भाजीपाला बिटमुळे मोठा गोंगाट होत असून विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे बिट इतरत्र हलविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.      शहरातील गाव भागात बसस्थानक रस्त्यावर लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालय आहे.शहरासह ग्रामीण भागातील शेकडो मुली या विद्यालयात शिक्षणासाठी बसने ये-जा करतात.बसस्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे विद्यालय असल्याने ग्रामीण भागातील मुली या विद्यालयात प्राधान्याने प्रवेश घेतात.परंतु विद्यालयासमोरच दररोज सकाळी भाजीपाल्याच्या ठोक विक्रीचे बिट भरते.बिटामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने येतात तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी लहान-मोठे भाजीपाला विक्रेते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात.भाजीपाला वाहून नेण्यासाठी दुचाकी,सायकलरिक्षा,हातगाडी किंवा इतर वाहनांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात असतो.त्यामुळे एकच गर्दी होते. ही गर्दी शाळेसमोरच होत ...

जागतिक एड्स दिनानिमित्त परतूर येथे भव्य रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image
परतूर प्रतिनिधी  कैलाश चव्हाण           जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही.         यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. याविषयी जनजागृती व्हावी यासाठी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय परतुर व आय एस आर एस डी जालना यांच्यामार्फत जवाहर नवोदय विद्यालय अंबा व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंबा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना एच आय व्ही होण्याची कारणे व त्यावर करण्यात येणारे उपचार याविषयी डॉ. उनवणे व श्री.शिवहरी डोळे यांनी सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासन करण्यात आले.तसेच विद्यार्थीनीं...

स्वतंत्र नंतर प्रथमच आंबा या गावत पोहचली बस

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण           ता. 28 भारत स्वतंत्र झाल्या नंतर प्रथमच आंबा या गावतुन परतूर शहराकडे दि 28 रोजी मुलीच्या शिक्षणासाठी मानव विकास अंतर्गत परतूर आगाराच्या वतीने बस सेवा सुरू करण्यात आली. आगार प्रमुख दिगंबर जाधव व सहाय्यक आगार प्रमुख श्री बरसाले यांची प्रमुख उपस्थिती होती.        परतूर शहरापासून सात किलोमीटर च्या अंतरावर हे गाव आहे पण हे गाव मुख्य मार्गावर नसल्याने या गावाला बस सेवा नव्हती मागील काही दिवासापासून या ठिकाणाहून बस सेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली या मागणी घेत आगार प्रमुख यांनी ही मागणी मान्य करत याठिकाणी मानविकास अंतर्गत बस सुरू केली. या वेळी मुलीत मोठा उत्साह होता या वेळी मुख्यध्यापक संजय जाधव ,सह शिक्षक रामप्रसाद नवल, रामराव घुगे ,अनिल काळे, सुरेश मसलकर,सुभाष बरकुले,श्रीमती खवणे.चालक आर. आर. कुलकर्णी, वाहक जी. बी. पवार आदी चउपस्थित होते. प्रतिक्रिया कोमल कुरधने-(विद्यार्थी) मागील एक वर्षा पासून आम्ही आंबा ...