Posts

Showing posts from May, 2023

तळणी पूर्णा नदीपाञातून बेसूमार वाळू ऊपसा पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद महसुल प्रशासनाची मुंक संमती ?

Image
तळणी : (रवि पाटील )तळणी परीसरातील पूर्णा नदीपाञातुन सध्या वाळू ऊपश्याचा राञीस खेळ चालू असल्याने शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुल ला चुना लावण्याचे काम होत असून गोर गरीब मानसांना सोन्याच्या भावात वाळू खरेदी करावी लागत आहे सद्यस्थितीत तळणी परीसरातील देवठाणा ऊस्वद कानडी सासखेडा टाकळखोपा वाघाळा भुवन वझर सरकटे केधळी पोखरी व अन्य ठिकाणावरून वाळू ची चोरी होत असल्याने वाळू माफीयांचे फावत आहे  वाळू उत्खननाच्या नविन धोरणात जास्त सहभाग लिलावधारकांनी घेतला नसल्याने परीणामी नविन धोरणानुसार वाळूचे लिलाव रखडले वाळूचे लिलाव म्हणजे महसुल व पोलीस यञणे सांठी दिवाळी दसराच असतो परतूं या वर्षी नवीन धोरणामुळे संगळ्याची फजिती झाल्याचे दिसून येते  सद्य |थितीत पूर्णा नदीकाठावरच्या गावातून वाळू उपसा सुरू आहे काही ठिकाणी जेसीबी यञांणे वाळू चे उत्खनन चालू आहे याची इंत्यंभूत माहीती महसूल व पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध असताना सुद्धा ठोस कारवाई होताना दिसत नाही सध्य |स्थितीत मंठा तहसील दार कैलास चंद्र वाघमारे हे अँक्शन मोड वर असलेले अचानक भूमीगत झाल्याने वाळू माफीयांचे फावत आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून पूर्णा नदीकाठ

परतूर शहरातील स्माशनभुमी करीता २५ लक्ष निधी च्या कामाचा शुभारंभ

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण परतूर शहरातील राजस्थानी स्मशानभूमी करिता शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नाने 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे . सदरील कामाचे भूमिपूजन शहरातील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, माजी नगराध्यक्ष प्रदीप कुमार लड्डा, माहेश्वरी समाजाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पोरवाल, जैन समाजाचे तालुकाध्यक्ष आनंद कोटेचा, अग्रवाल समाजाचे तालुकाध्यक्ष गोविंद  मोर, राजेंद्र झवर , राजेंद्र मंत्री, पप्पू  दायमा, दिनेश बगडिया , रोशन बगडिया, राजेश मुंदडा , लखन जोशी , प्रणय मोर, शुभम कटोरे ,सौरभ बगडिया, निहित सकलेचा, दिलीप  नहार , दीपक  अग्रवाल, राधेश्यामजी मुंदडा ,श्याम  सोनी , सोपान कातारे, मधुकर निलेवाड ,शिवाजी तरवटे, दत्ता अंभोरे , नितीन राठोड ,गफार मिस्त्री , राजेंद्र कोटेजा ,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. परतुर शहरातील विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणल्यचे मोहन अग्रवाल यांनी सांगीतल 

अवैध वाळू उपश्यावर कारवाई करा, मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे याच्या आशीर्वादाने वाळू उपसा जोरात महसूल व पोलीस प्रशासन कोमात नेमलेली पथके भूमीगत ,तळणी सरपंच सदावर्ते यांची मागणी

तळणी : रवी पाटील   तळणी परीसरातील पूर्णा नदी पाञातून चालू असलेल्या अवैध वाळू उपश्याची मंठा तहसीलदार यांना वारवार कल्पना देऊन सुध्दा त्यावर प्रतिबंध होत नसल्याने जिल्हाधिकार्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यानी सांगीतले सद्या सपूर्ण तळणी परीसरात अवैध वाळू रिचवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे मिळेल त्या ठिकाणी वाळू साठवण्याचा व विक्रीचा सपाटा लावला आहे या अवैध वाळू उपश्यास महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार असून अर्थ नितीच्या धोरणा मुळे या दोनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे गावामध्ये वाळू साठवताना सुसाट वाहने सुटत आहे तळणी बस स्टँन्ड परिसर व गावात येणारा एकमेव रस्ता असून या ठिकाणी नेहमी वर्दळ असते याच ठिकाणावरून वाळूचे वाहने सुसाट सुटत आहे दोनच दिवसा पूर्वी दोन पाळीव कुत्र्याच्या अंगावरून गाडी नेल्याचा प्रताप त्या रात्री घडला आहे राञीच्या वेळेत येणारी वाळूची वाहने ग्रामस्थासाठी ञासदायक ठरत आहे  तहसीलदार गेले चार दिवसापासून भूमीगत झाल्यापासून त्यानी नेमलेले पथके सुध्दा भूमीगत झाले आहे वाळू माफीयांना उत्खननाची सधी मिळावी म्हणून तहसीलदार तीन दिवसापासुन गायब आहे पोलीस प्रशासनाचा कुठलाच धाक माफी

जिल्हा व तालुक्यातील खेळाडूंनी मिळालेल्या चा संघी फायदा उचलावा : संतोष शर्मा

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      सध्या IPL मुळे क्रिकेट चे वेगळेच फिव्हर चालू आहे.  त्यातच  कडक उन्ह पडताना दिसून येत आहे उन्हाची तीव्रत जवळ जवळ 40 ते 44 डिग्री सेल्सीयस आहे तरी पण क्रिकेट खेळाडू वर याचा  काही परीणाम दिसून येत नाही खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना दिसत आहे   खेळाडू शहर स्तरावरील असो की गाव खेड्यातील तालूक्या स्तरावरील असो  त्याला फक्त गाठायचे म्हणजे आ-आपल्या राज्य स्तरावर म्हणजे ( रणजी) स्तर भारतीय स्तर ...आणि याची सुरवात होती ती म्हणजे जिल्हा स्तरावरून , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने MCA असोसिएशन हे इनवेटेशन लीग चे आयोजन करतात त्यात वयोगटची एक मर्यादा ठराविक असते त्यात अंडर १४, १६ व १९ चा समावेश असतो त्याची सर्व जवाबदारी जिल्हा क्रिकेट असोशियशन यांच्या कडे नेमली जाते त्यात सलेक्शन ट्रायल पासून तर त्यांच्या जिल्ह्याच्या अंतर गत उकृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने  खेळाडू आपले कौशल्य दाखवीत असतात  खेळाडू आपल्या सलेक्शन पूर्तते न खेळता राज्य स्तरावर  आपल्याला भेटलेल्या संधी चा फायदा उचलून खेळाडूनी सलेक्टर ला आपल्या उत्कृष्ट खेळाच

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत झाला पाहिजे - राजेश भालेराव, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांना मदत करण्यासाठी पुढे आली -- जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे

Image
  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, बळकटी करण्यासाठी ज्या मूल्यांवर, ज्या स्तंभावर लोकशाही उभी आहे ते सर्व स्तंभ मजबूत असायला हवेत. विशेषतः लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाणारी प्रसार माध्यमे अधिक बळकट व्हायला हवीत.    या माध्यमातून लोकशाही अधिक प्रभावीपणे रुजायला हवी असे मत व्हॉईस ऑफ मिडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष राजेश भालेराव यांनी व्यक्त केले आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने परतूर तालुक्यातील पत्रकारांना ५० लाख रुपयांच्या अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे वितरण शनिवारी परतूर येथे करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, जालना शहराध्यक्ष रवी दानम, जिल्हा कार्याध्यक्ष अहेमद नूर, परतूर तालुकाध्यक्ष भारत सवने आदींची उपस्थिती होती. सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रकारितेची मूल्य कमी झाली अशी ओरड वरकरणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडियावरील माहितीला कुठलाही आधार नसल्याने आजही सर्वसामान्य माणूस अधिकृत माहितीसाठी प्रसार माध्यमांवरच विसंबलेला पाहायला मिळतो. प्रसार म

नाल्यांच्या साफसफाई साठी स्वच्छता अभियान राबवा:-सचिन खरात

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्ठिने नगर पालिका प्रशासनाने परतुर शहरात नाल्यांची साफसफाई करून जंतू नाशक फवारणी करुण घ्यावी सोबत घाणीची विल्लेवाट लावण्यासाठी शहरात मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी *शिवसंग्राम संघटनेने तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे* शिवसंग्राम संघटनेने पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण शहरात वॉर्डासह मुख्य रस्तावर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सदर घाणीची विल्लेबाट लावणे आवश्यक आहे. जेणे करून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न उदभावणार नाही. मे महिना संपल्यानंतर मान्सून ची सुरुवात होणार आहे. आशा परिस्थितीत शहरातील नाल्यांची साफसफाई होणे ही तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा नेहमी प्रमाणे पहिल्या पावसातच नाल्यांचे पाणी रस्त्यावर येणार यात शंका नाही. वेळेत जर नाल्यांची साफसफाई केली तर पुढील मान्सून काळातील समस्यांचा सामना शहरवासियांना करावा लागणार नाही. मात्र नगर पालिका प्रशासन पावसाळ्याच्या तोंडावर थातूर मातूर स्वच्छता मोहीम राबविते. परिणामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी र

भूतलावरच्या या भक्ती भावाच्या काल्यात नाहुन निघा तरच सुख तुम्हाला मिळेल- हभप सेवाधारी पौळ बाबा महाराज

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील तळणी येथील श्री संत नेमिनाथ महाराज यांच्या 70 व्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज हरिभक्त हरिभक्त परायण सेवाधारी पौळ बाबायांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली  गोकूळीच्या सुता अंतपार नाही लेखा  या अंभगावर निरूपन केले भगवान श्रीकृष्णाने गोकुळात प्रवेश केल्यावर सर्व गोकुळ वासीयाना सुखाचे दिवस आले हे सुख गौळणी गोपीका गोपालाना गाई वासराला मिळाले दोनही दुथडया भरून यमुना वाहु लागली ती सुध्दा आंनंदी झाली भगवताच्या जन्मानंतर सुखाची वाट कैलासापर्यन्न गेली देवाच्या सहवासातील प्रत्येकाले मिळाले हेच सुख जर तुम्हा आम्हाला मिळवायचे असेल तर भूतलावरच्या या भक्ती भावाच्या काल्यात नाहुन निघा तरच ते सुख तुम्हाला मिळेल नाही तर नरक यातना भोगण्यासाठी तुम्ही स्वःत च जबाबदार राहाल असेल प्रतिपादन सेवाधारी पौळ बाबा यानी तळणी येथे केले    भगवताच्यां बालपणी माता यशोदा व अन्य गोपीकेने भगंवंतांची मनोभावे सेवा केली त्या सेवेमुळे त्याचा उध्दार झाला भगवताचा अवतार ज्याच्या साठी होता सुध्दा खुश होता ज्या वेळेस आकाशवाणी झाली त्याव

दैठना खुर्द येथे देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

परतूर --प्रतिनिधी कैलाश चव्हाण    तालुक्यातील दैठना खुर्द येथे फाट्यावर पत्राच्या शेडमध्ये अवैध देशी दारूची चोरटी विक्री करतांना आष्टी पोलिसांनी छापा मारून एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      संशयित हामद चाऊस अब्बु चाऊस रा. दैठना खुर्द याने दि 13 मे रोजी रात्री साडे नऊ वाजता दैठणा फाटा येथे टीनपत्र्याचेशेड मध्ये चार हजार आठशे रुपये किंमतीच्या देशी दारुच्या 48 बाटल्या संशयित आरोपीने विनापरवाना बेकायदेशिर रित्या प्रोव्हिएशन गुन्ह्याचा माल देशी दारू चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगतांना मिळुन आला. या प्रकरणी पोकॉ सज्जन काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनी भीमराव मुंढे हे करीत आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके माहिती देताना म्हणाले की आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. चोरटी देशी दारू विक्री होत असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.*

कोकाटे हादगाव तांडा येथे गावठी हातभट्टी दारुचा अड्डा उध्वस्त,आष्टीचे सपोनि सोमनाथ नरके यांची धडाकेबाज कारवाई

Image
परतूर -- प्रतिनिधी कैलाश चव्हाण परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव तांडा येथे आष्टी पोलिसांनी दि १४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता छापा मारून गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून दारू नष्ट करून एका विरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आष्टी पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंदे चालकाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोकाटे हदगाव तांडा येथे  एक इसम त्याच्या घरासमोरील पत्राच्या कुडामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करून विक्री करीत असल्याची माहिती आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांना  मिळाली तात्काळ पोलिसांचा फौजफाटा घेऊन कोकाटे हादगाव तांडा येथे खाजगी वाहनाने जावून गाड्या गावाच्या बाहेर उभ्या करुन लपतछपत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी हातभट्टीच्या अड्डावर छापा मारला असता याठिकाणी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळाचे रसायण सडवा बाळगुन, गावठी हातभट्टी दारु तयार करून तिची विना परवाना चोरटी विक्री करतांना भिमराव देवू राठोड, वय 47 वर्ष, रा. कोकाटे हादगाव याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अडीच हजार रुपये किमतीची दोन प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे पन्नास लीटर उ

परतूर येथ छत्रपती संभाजी महाराज यांची जंयती उत्साहात साजरी

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण    परतूर येथे मराठा क्रांती भवन मधे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती सभाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतीमेच पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला      या प्रसंगी अदर्श शिक्षक दिलीप मगर,उपप्राचार्य,संभाजीराव तीडके,विनायक भीसे,विष्णू शिंदे, उद्धव बोनगे,केशव वरकुले, प्रा. पांडूरंग बरकुले,अंभोरे, सचिन खरात, डाके यांच्या सह मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराज प्रमी उपस्थीत होते

भोलेनाथ विश्वासाचे प्रतीक आहेत- हभप महेश महाराज महाजन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील     मनुष्याने देवाला जाणले पाहीजे सतीच्या मनात सदेह होता म्हणून देवाने तीला परीक्षा घेण्याचे सांगीतले वटवृक्षाच्या झाडाखाली बसतो तु जोपर्चन्न परीक्षा घेऊन येत नाही तोपर्यन्त मी या वटवृक्षाच्या झाडाखाली बसतो हे ऐकल्यानंतर सती निघाली सतीच्या जिवनातील पहीली चुक ही झाली तीने भगवान भोलेनाथावर अविश्वास केला व जगाचा मालक असलेल्या भोलेनाथाचे तीने ऐकले नाही जे भोलेनाथ विश्वासाचे प्रतीक आहेत त्यांच सुध्दा सतीन ऐकले नाही भगवान रामाची देखील परीक्षा सतीने घेतली होती भंगवतांची परीक्षा घेत नसतात त्यांना जाणायचे असते वेदाने सुधा आपल्या आथातो जिद्द जिज्ञासा सागीतली आहे त्याचे अनुकरण मनुष्याला केले तर त्याचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही  तळणी येथील श्री संत नेमीनाथ महाराज यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्य चालू असलेल्या शिवमहापूराण कथेच्या पाचव्या दिवशी चे कथेचे निरूपण महेश महाराज महाजन यानी केले मनुष्याने भगवताची परीक्षा घेऊ नये त्याला मनातुन जर जाणले तर तो नक्कीच आपल्या पाठीशी उभा राहील जेव्हा भगवंत बाल गोपाला सोबत

मनुष्याच्या व्यवहारात बदल होण्यासाठी परमार्थाचा परिचय होणे आवश्यक-ह भ प महेश महाराज महाजन

Image
तळणी -प्रतिनिधी रवी पाटील    मनुष्याच्या व्यवहारात बदल होण्यासाठी परमार्थाचा परिचय होणे आवश्यक आहे देह जावो अथवा राहो ही भावना येणे म्हणजेच आपला परमार्थ योग्य दिशेने आहे ज्याचा त्याला परमार्थ करू द्या शेजारच्या ने एखादे व्रत केले तर ते आपण करावेच असे नाही आरसा आहे ते स्वरूप दाखवत असतो ज्या वेळी आपण आपल्या चेहर्याची स्थीती आरश्यात बघतो त्याच वेळी मनुष्याने आपल्या मनाची परिस्थीती काय आहे ते बघीतले पाहीजे आरसा जशी मनुष्याची परिस्थीती दाखवतो तशीच शिवकथा ही आपली स्थीती प्रत्येकाला दाखवतच असते ज्याला महादेवला प्रसन्न करायचे आहे त्याला श्रवण भक्ती करणे गरजेचे आहे श्रवणाचे तीन भाग आहेत मनन चितन आणि आचरण श्रवण भक्ती ही इतरांना सागीतली पाहीजे तळणी येथे श्री संत नेमीनाथ महाराज यांच्या ७० व्या पूण्यतिथी निमित्य चालू असलेल्या शिवमहापूराणाच्या तिसऱ्या दिवशीचे पुष्प ह भ प महेश महाराज महाजन यांनी गुंफले  चौकट [मनुष्याने अतकरणापासुन भक्ती केली पाहीजे श्रवण भक्ती मनुष्याच्या उध्दाराचे साधन आहे शिवाने सुधां सागितले जो माझे श्रवण करेल त्याला मि प्रसन्न होईल सर्व जो को

परतूर व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी निवेदन

Image
परतूर -प्रतिनिधी कैलाश चव्हाण      माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून परतूर पत्रकारांच्या वतीने धरणे आंदोलन करून मागण्यांकडे लक्ष वेधण्याची मागणी करण्यात आली आहे.  पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.  पत्रकारितेत पाच वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्या

जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्याने जालना शहराचा विकास अधिक तीव्र गतीने होईल - आमदार लोणीकर, जालना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता ठराव पास

Image
  जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत. याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या.    यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथापुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अनेकदा भेटून पत्राद्वारे याबाबतीत विनंती केली होती. त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. आमदार बबनराव लोणीकर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याचा ठराव पास केला होता.  त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जाल

महादेवाचा जगात कोणी शञू नाही प्रभू श्रीराम सुध्दा महादेवाचे पूजक होते आणि रावण सुध्दा महादेवाचा भक्त त्या महादेवा ला आपण शरण गेले तर तो नक्कीच प्रसाद मिळेल-ह भ प महेश महाराज महाजन

Image
तळणी  प्रतिनिधी रवी पाटील  साधू असे पर्यन्त त्या साधूची किमंत समाजाला समजत नाही साधू तत्व आहे म्हणून या पृथ्वीतलाचा सांभाळ आहे ज्या दिवशी साधूचा वरदहस्त नसेल त्या दिवशी पूथ्वीवर विनाश होईल मनुष्याला मनुष्यात बसवण्याचे काम हे साधूने केले आहे शिवमहापूराणाच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफताना ह भ प महेश महाराज यानी प्रातिपादन केले  शिवमहापूराण एक तत्व आहे मनश्चक्र जर शांत ठेवायचे असेल शिव महापूराणाशिवाय पर्याय नाही मनुष्याचे मंन खूप चंचल आहे ते सैरभैर आहे देवाला आपण फूल जरी अर्पण करत असू त्यापेक्षा देवाला आपण मन दिले तरी तर त्याला अन्य काही देण्याची गरज नाही ज्या दिवशी आपण भंगवंताला मन देऊत त्याच दिवशी आपले मनश्चक्र शांत झाल्याशिवाय राहणार शास्त्राच्या विरहीत ज्याच जिवन आहे ते जिवन होऊ शकत ज्याच्या वृत्तीत विकार आहे त्याने देवाला कितीही आळवले तरी त्याचा उपयोग नाही शास्त्राच्या आधारे वेदाच्या आधारे जो जीवन व्यथीत करतो तोच खरा धर्माभिमानी मनुष्य हा बाह्यअंगाने जरी सुंदर असला तो अंतररंगाने मात्र तो काळा आहे शबरीचे अंतकरण शुद्ध होते म्हणुन प्रभू राम तिच्या कडे गेले ज

मनुष्याचा व्यवहार हा त्याच्या आचरणावर ठरत असतो - ह भ प महेश महाराज महाजन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील     मनुष्याचा व्यवहार हा त्याच्या आचरणावर ठरत असतो आपण जर काही देवासाठी केले तर तो आपल्यासाठी करेल कलयुगात बिघडलेली संगंती सुधरवायची त्याला परमार्थीक सुंसगतीची खरी गरज आहे असल्याचे प्रतिपादन ह भ प महेश महाराज महाजन यानी केले तळणी येथे चालू असलेल्या शिव महापूराणाची आज सुरवात झाली श्री संत नेमीनाथ महाराज याच्या ७० व्या पुण्यतीथी निमित्य या सप्ताहचे आयोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले   देवासमोर जे प्रकट करतो तो माणूस असतो मनुष्याच्या अंतकाळापर्यन्त त्याला भगवतांचे नाव हे आलेच मनुष्याचे पाहीजे जीवन परीपूर्ण झाल्यावर त्याला परमार्थ आठवावा असे नाही मनुष्याला मुत्यू जटील का वाटतो कारण की देवाने दिलेला हा नरदेह जर शिव होईपर्यन्न जर त्याला नामस्मरण आठवत नसेल तर तो नरदेह काय कामाचा मनुष्याच्या सांसारीक आयुष्यात शिवसाधना खूप आवश्यक आहे शिव साधनेने मनुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहनार नाही     नेहमी संतांची संगत करावी. परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्याजवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही. चित्त शुद्ध नसेल त

कुरुक्षेत्र महादेव मंदिर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ,६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले

Image
परतूर  प्रतिनिधी  कैलाश चव्हाण     प्राचीन कुरुक्षेत्र महादेव मंदिर येथे दि. ८ मे रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जनकल्याण रक्तकेंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राचीन काळापासून कुरुक्षेत्र महादेव मंदिर अस्तित्वात आहे या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते.     या अनुषंगाने अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जन्मकल्याण रक्तकेंद्र जालना यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्साहात रक्तदान केले. तसेच या रक्तदान शिबिरात भाविकांनी आपले रक्तगट तपासून घेतले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, प्रल्हादपूर स्वच्छता प्रेमी, कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ व जनकल्याण रक्त केंद्र जालना व भाविकांनी यांनी सहकार्य केले.

किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल ला लागली भीषण आग. ,कार्यालय झाला जळून खाक कुठली ही जीवित हानी नाही.,नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तातपरतेने मोठा अनर्थ टळला

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  तारेख सिद्दीकी फ्रेंड्स सोशल क्लब परतूर द्वारा संचालित किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल ला  आज दुपारी ०१:०० वाजता अचानक आग लागली.  शाळेच्या कार्यालयातून आग लागल्यामुळे धुप्पन निघत असल्याचा शेजारच्या लोकांना कळतच त्यांनी तारेख भाई सिद्दीकी यांना फोन लावला, व आग लागल्याची माहिती दिली, त्यांचे शाळेत पोहोचण्यापूर्वी शेजारील लोकांनी शाळेतला बोर चालू करून पाणी टाकत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग खूप भीषण असल्यामुळे, तेथील काही युवकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील श्री पारीख यांना फोन केला, पारीख यांनी तात्परता दाखवत वेळेवर पोहचून आगीवर नियंत्रण आणला. या आगीत शाळेतील सर्व दस्तावेज, अल्माऱ्या, टेबल, खुर्च्या, सोफे, लेपटॉप, झेरॉक्स मशीन, मोबाईल फोन, टीव्ही, सी सी टीव्ही चे कॅमेरे आणि डीविआर, पंखा,  आणि विशेष करून कार्यालयातील सर्व दस्तावेज जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याची प्रार्थमिक माहिती संस्थेचे अध्यक्ष तारेख भाई सिद्दीकी यांनी दिली. शाळेला सुट्टी असल्यामुळे या घटनेत कुठली ही जीवित हानी झाली नसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 120 गावांच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 98 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता, माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश ,जल जीवन मिशन अंतर्गत सेवली गावासाठी 1 कोटी 61 लाख तर नेर गावासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध- लोणीकर

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  पाणी हेच जीवन असून त्यामुळेच शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रीड पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. जनतेच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही. श्वासात श्वास असेपर्यंत जनसेवा करत राहणार गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कधीही राजकारण केलं नसून विकास कामांना प्राधान्य देत काय नीतिमत्तेने राजकारण केलं अधिकाधिक जनतेची सेवा करून निधी उपलब्ध करून दिला. जल जीवन मिशन अंतर्गत सेवली गावासाठी 1 कोटी 61 लाख तर नेर गावासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रीड योजनेअंतर्गत परतूर (176 गावे) 234 कोटी, मंठा (95 गावे) 133 कोटी, परतूर शहर 56 कोटी, मंठा शहर 16 कोटी तर विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी 98 कोटी असे एकूण 537 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून यापुढे देखील गाव वाडी वस्ती तांडा यांच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी उपस्थित त्यांना शब्द

वाटुर येथे श्री देवीदास राठोड यांचा सत्कार...!

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण      हिंगोली दौऱ्यावर जात असताना वाटुर फाटा येथे शुभम आढे यांच्या घरी नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष मा.देविदास भाऊ राठोड यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.    यावेळी राजू वायाळ , माधवभैय्या जनकवार, .डाॅ.शरद पालवे, माणिकराव आढे,Adv.नागेश आढे,शुभम आढे गजानन जाधव नितीन चव्हाण, रवी जाध्व व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांनी पालकमंत्री अतुल सावे यांचा घोषणा देत केला निषेध

Image
जालना प्रतीनीधी समाधान खरात पत्रकारांच्या पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जालना जिल्हा प्रतिनिधी समाधान खरात जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगामाच्या तयारी संदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती.  जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक पार पडली.या बैठकीसाठी आलेल्या पत्रकारांना वार्तांकनासाठी बैठकीत बसू न दिल्यानं पत्रकारांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा जाहीर निषेध नोंदवला. यानंतर सावे यांनी पत्रकारांशी बोलण्याचा प्रयन्त केला मात्र पत्रकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यास नकार दिल्याने सावे यांना आल्या पावली त्यांना न बोलता काढता पाय घ्यावा लागला

युवा मोर्चाचा दणक्याने हातपंपाची दुरुस्ती , युवा नगरसेवक कूष्णा आरगडे यांनी दिला होता पालिकेला इशारा

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण परतुर नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 सह शहरातील बरेच से हातपंप दुरूस्ती आभावी बंद होते  उन्हाळा चालू आसून पालिकेचे पाणी पाच दिवासाआड येते गावा भागात गचबच ल्याला भाग आहे घरोघरी बोर नाही आहे त्या मुळे नागरिकांची पाण्यासाठी दखदख होत होती हा विषय वेळोवेळी नगरसेवक कूष्णा आरगडे यांनी प्रमूखाने मांडला मुख्याधिकारी सह पाणीपुरवठा अभियंता घाटेकर याना धारेवर धरून हातपंप दुरूस्त ची साहित्य मागून घ्या लावले हे केले नसते तर युवा मोर्चा वतीने बेशरम च्या फुलाने स्वागत करून नगरपालिका ला बेसरम च्या तोरण बंधणार होते  आता शहरातील हातपंप दुरूस्त काम नगरपालिका ने हाती घेतलेला आहे त्या बद्दल मुख्य धिकारी व अभियंता घाटेकर याचे नगरसेवक कूषणा आरगडे यांनी आभार मानले 🙏🏾🙏🏾

तळणी येथे श्री संत नेमिनाथ महाराज याच्यां पूण्यतिथी निमित्य शिवमहापूराणाचे आयोजन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील     श्री . संत नेमिनाथ महाराज याच्यां पूण्यतिथी निमित्य शिवमहापूराणाचे आयोजन तळणी येथील प्रसिद्ध संत श्री नेमीनाथ महाराज याच्या ७० व्या पुण्यतिथी निमित्य उद्या वार मंगळवार पासून शिवमहापूराणाचे भव्य दिव्य नियोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवकथाकार ह भ प महेश महाराज महाजन आळंदी देवाची याच्या रसाळ वाणीतून या शिवमहापूराणाचा प्रारंभ मिती वै कृ वार मगळवार रोजी होणार असुन सांगता मिती वै कृ मगळवार रोजी होणार आहे      पंचक्रोशीतील ग्रामस्थानी या सप्ताह मधील धार्मीक कार्यक्रमाचा व शिवप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हाहन श्री संत नेमीनाथ महाराज संस्थांन व ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे या सप्ताह मध्ये काकडा भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापूराण हरी किर्तन व . यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तळणी परीसरातील खटकेश्वर बाबा म्हणून श्री संत नेमीनाथ महाराज प्रसिध्द आहेत सप्ताहच्या निमीत्याने तळणी येथे सात दिवस मांस विक्री बंद असते सप्ताह च्या निमीत्याने लेकी बाळी आवर्जुन या भडार्यासाठी येतात गावा

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची माजी विद्यार्थ्यांना हाक

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ परतुर संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांचे सवांद मेळाव्याचे आयोजन दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आलेले आहे. महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाचा ठसा उमटत आहे. न्यायाधिश, प्राध्यापक , शिक्षक , वकिल , अधिकारी, प्रगतशिल शेतकरी उद्योजक, पत्रकार , राजकिय नेते, BOS आणि विद्यापीठ स्तरावर chairmen आदि पदावर कार्यरत आहेत. यात महाविद्यालयाचा अभिमान आहे. बदलत्या काळात महाविद्यालयाच्या विकासात आणखी भर घालण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांना हाक दिलेली आहे. या हाकेला माजी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा. या माजी विद्यार्थीच्या सवांद मेळाव्यासाठी अनेक माजी विद्यार्थी , विद्या

परतुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा आणि वारंवार होणारे अपघात तसेच अवघड शस्रक्रियेत रुग्णांना लागणारे रक्त त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागणारी भटकंती यांची जाणीव ठेवुन सामाजिक संघटना,रक्तपेढी मार्फत वेळोवेळी रक्तदान शिबीर आयोजित केली जातात.याच सामाजिक जाणिवेतुन परतुर शहरात अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,प्रल्हादपुर स्वच्छता प्रेमी आणि कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ यांच्या तर्फ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.8/5/2023 रोज सोमवार सकाळी 8ते 3 या वेळेत करण्यात आले आहे.आपल्या दानाने आपण गरजुचे प्राण वाचवु शकतो अशी सामाजिक जाणीव ठेवुन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे अशी विनंती अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,स्वच्छता प्रेमी समुह तसेच श्री.कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळांनी केले आहे.स्थळःश्री.कुरुक्षेत्र महादेव मंदिर,रांजणी रोड,परतुर.वेळःसकाळी 8 ते दुपारी 3

दिपाली प्रशांत बोनगे यांचा दिलीप मगर सर यांच्याकडून सत्कार

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यामध्ये दिपाली प्रशांत बोनगे यांची जागा बिनविरोध निवडून आली होती आंबा येथील माजी सरपंच दिपाली प्रशांत बनगे यांचा मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष माहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालूकाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक दिलीप मगर सर व विष्णू कदम सर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिपाली प्रशांत बोनगे व प्रशांत बोनगे यांचा शाल श्रीफळ व भगवद्गीता देऊन सत्कार केला

११०० मुलींचे कन्यादान लग्न केले त्यातूनच मंगल कार्यालय उभारण्याची संकल्पना मिळाली - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,अन्नपूर्णा लॉन्स च्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच विवाह सोहळ्याचे पुण्य पदरात पडेल- लोणीकर

Image
प्रतिनिधी समाधान खरात माझ्या ३५-४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह गोरगरिबांच्या अकराशे पेक्षा अधिक मुलींचे कन्यादान लग्न केले असून या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातूनच मंगल कार्यालय उभारण्याची संकल्पना मनात आली व्यवसायाबरोबरच विवाह सोहळ्याचे पुण्य प्राप्त होईल असे मनात आले म्हणूनच इतर कोणताही व्यवसाय निवडण्यापेक्षा मंगल कार्यालय हा व्यवसाय निवडण्यात चा निर्णय आम्ही घेतला असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले परभणी येथे अन्नपूर्णा लॉन्स नावाने भव्य असे मंगल कार्यालय माजी मंत्री आमदार लोणीकर यांचा सहप्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वास्तुशांतीसह उद्घाटन सोहळा संपन्न झाला आमदार लोणीकर यांच्या आई अन्नपूर्णा दत्तात्रय नाना लोणीकर यांच्या नावाने अन्नपूर्णा लान्स असे नामकरण करत या मंगल कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे मंत्री पदाच्या कार्यकाळात दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी गोरगरिबांच्या अकराशे पेक्षा अधिक सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न करण्याचे भाग्य मला लागले असून हिंदू धर्म पद्धतीसह

परतूर नगरपालिकेतर्फे सफाई कामगारांचा सत्कार*

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     परतूर नगरपालिकेतर्फे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त कामगारांचा नगरपालिकेतर्फ सत्कार करण्यात आला.यात नगरपालिकेतील सफाई कामगार कैलास हिवाळे व संजय काळे ब-याच वर्षापासून इमाने इतबारे सफाईची कामे केल्याबद्दल त्यांचा सत्कार शालश्रीफळ व प्रत्येकी रु. ३१०१बक्षीस नगर पालीका प्रशासक तथा परतूर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते देउन सफाई कामगारांचा सत्कार सन्मान कामगार दिनाचेऔचित्य साधत नगर पालीकेत करण्यात आला.    यावेळी मुख्याधिकारी गंगाधर पेंटे ,बी एस चव्हाण , कार्यालयीन अधीक्षक चाऊस ,रामचंद्र पानवाले ,रवी देशपांडे, नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष रहेमु कुरेशी ,चंद्रकांत खनपटे, दरोगा खंदारे ,शिवदास चव्हाण व आदी परतूर नगर परिषदचे कर्मचारी उपस्थित होते.

पत्रकारांसाठीही स्वतंत्र मतदार संघ द्या!विकासकुमार बागडी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात      ज्याप्रमाणे शिक्षकांसाठी आणि पदवीधरांसाठी स्वतंत्र आमदार देण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी देखील स्वतंत्र आमदार देण्यात यावा. पत्रकारांना देखील संरक्षणाची गरज असून त्यांना विमा, कर्ज योजना, घरकुल, शासकीय जाहिरात, मुलांचे शिक्षण, प्रवास सवलत, पेनशेन, भविष्य निर्वाह निधी, प्रलंबीत जाहिरात बील, अधिस्वीकृतीचा लाभ आदी अनेक शासकीय योजनांचा लाभ हवा असतो. परंतू तो त्यांना मिळत नाही    तो त्यांना देखील मिळाला पाहिजे. आमदार- खासदार, मंत्री व शासकीय अधिकारी हे पत्रकारांच्या समस्यांची कधीच दखल घेत नाहीत. म्हणूनच पत्रकारांसाठी देखील शिक्षक आणि पदवीधरांप्रमाणे स्वतंत्र आमदार पाहिजे. जेणे करुन त्यांच्या समस्या मार्गी लागतील. महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग असून प्रत्येक विभागाला स्वतंत्र आमदार देण्यात यावा. तरी उपरोक्त समस्यांची मुख्यमंत्र्यांनी जातीने सोडवणूक करावी, अशी विनंतीही श्री. बागडी यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.