Posts

Showing posts from September, 2023

अँड.किशनराव अंभुरे यांचे निधन

Image
परतूर: प्रतिनिधी कैलाश चव्हाण  येथील वैद्यकीय अधिकारी तथा सोमेश्वर बाल रुग्णालयाचे संचालक डॉक्टर प्रशांत अंभुरे व प्रकीर्ण अंभुरे यांचे वडील एडवोकेट किशनराव आप्पासाहेब अंभुरे यांचे शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुखद निधन झाले ते 79 वर्षाचे होते किशनराव अंभुरे हे खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन होते. त्यांच्या काळात खरेदी विक्री संघाचा भरभराट झाला होता त्यांच्या कार्यकाळाची आजही आठवण करण्यात येते, माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनदादा लोणीकर यांचे ते मेहुणे होते. छत्रपती संभाजीनगर येथे अल्प आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंड, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव श्रीष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गणमान्य व्यक्तींसह, लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, कामगार वर्ग व त्यांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समर्थ विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन.

Image
परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण पाटोदा [ माव ]. ता.परतुर. येथील श्रीसमर्थ माध्यमिक विद्यालयात वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या पाल्याकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष देवुन त्यांच्या ऊज्वल भविष्यासाठी शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी केले.      पुढे बोलतांना ते म्हणाले की , प्रत्येक विद्यार्थी हा कुटूंबाचे व राष्ट्राचे भविष्य घडवत असतो. कष्टाने व जिद्दीने अभ्यास करुन प्रत्येक परीक्षेत यश संपादन करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते.  मोबाईल - दुरचित्रवाहीण्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधे मोठा अडथळा निर्माण करीत आहेत म्हणुन पालकांनी आपल्या पाल्यास गरज असल्यासच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी असे आवाहन केले. आपल्या शाळेत शिकणारी सर्वच विद्यार्थी हे कष्टकरी शेतकर्यांची आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमधे खुप मोठी ऊर्जा असते त्या ऊर्जेला सकारात्मकतेकडे घेवुन जाण्याची प्रेरणा शाळेतुन शिक्षक मंडळी देत असतात. पलकांनिही वेळोवेळी शाळेत भेट देवुन आपल्या पाल्याची प्रगती तपासुन घेण्याचे आवाहन करण्यात आले. भारतमाते

परतुर येथे सकल धनगर समाजाचे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी एक दिवशीय जागरण गोंधळ आंदोलन..

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण  धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत वेळ काढून पणा करत दिशाभूल करणाऱ्या सत्ताधारी मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा निर्धार सकल धनगर समाजाने परतुर येथे सरकारला जागरण गोंधळ घालून केला आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणी सह तसेच चौंडी येथे उपोषणास बसलेल्या उपोषण कर्त यांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने परतुर येथे रेल्वे स्टेशन ते उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रमाता ,राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे झेंडे व प्रतिमा हातात घेऊन तरुणांनी एकच जल्लोष केला होता आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे असा सूर काढत शासनाच्या विरोधातही तरुणांनी घोषणा दिल्या तसेच आंदोलकाच्या हातामध्ये पिवळ्या पताका व गळ्यात पिवळा रुमाल व खांद्यावर घोंगडी असा देखावा मोर्चामध्ये करण्यात आला होता. येळकोट येळकोट जय मल्हार राजे यशवंतराव होळकर, राजे मल्हारराव होळकर यांचा जयघोष करण्यात आला आणि राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी या मोर्चाच

मंठा तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार

Image
 मंठा प्रतिनिधी रवी पाटील   क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा सन 2023 मध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये मंठा तालुक्यातील खेळाडू जिल्हा, विभाग, राज्य, व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकत असून खऱ्या अर्थाने मंठा तालुका खेळामध्ये आपली कात टाकून वेगळी ओळख निर्माण करत आहे यावर्षी स्वामी विवेकानंद विद्यालय मंठा येथील खेळाडू वैभव प्रकाश वाव्हूळे याने बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळून विभागात विभागीय स्पर्ध साठी पात्र झाला आहे तर जि प प्रशाला तळणी येथील श्रावण पांडुरंग जनकवार कुस्तीमध्ये 65 किलो वजनी गटात विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रमांक मिळून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता त्याचबरोबर विश्वनाथ विद्यालय तळणी येथील खेळाडूने कुस्तीमध्ये 80 किलो वजनी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे  वरील तिन्ही खेळाडू यांचे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व उपजिल्हाधिकारी डॉक्टर शशिकांत हातगल यांनी सत्कार केला व पुढी

समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे - ह भ प अविनाश महाराज भारती

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील      हे मस्तक पायावर आहे पण ते कोणत्या संतांच्या पायावर आहे तर ते वारकरी संतांच्या पायावर आहे वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर खूप टीका आहे कारण समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे या भोदूं संतांच्या पायावर डोके ठेवायचे का? तर ते नाही मग ते फक्त वारकरी सप्रदायाच्या विचारावार आणि वारकरी आचारावर जो नथमस्तक होतो अशा संतांच्या डोक्यावरच ठेवून आपल्या जीवनाचा उध्दार करून घ्यायचा असे प्रतिपादन ह भ प अविनाश महाराज भारती यानी देवठाणा येथे केले श्री संत तुकोबाराय गणेश मडळाच्या वतीने सुरू असलेल्या या गणेशोत्सवाच्या निमीत्य सुरू असलेल्या या किर्तन महोत्सवात त्यानी हे चौथ्या दिवशीचे किर्तन पूष्प गुंफले       श्री संत नामदेवराय याच्या देवराज आले मंचकी बैसोनी भक्तासी दिले अभयदान या अभंगावर निरूपण केले स्मशानातील भाषणात बोलणार्याला जशी किमत नाही जो गेलाय त्याला ही किमंत नाही आणि ऐकणार्याला ही किमंत नाही कारण स्मशानातले कोणी ऐकत नाही फक्त जगाच्या पाठीवर असे एकमेव व्यासपीठ आहे जेथे बोलणार्याला ही किमत आहे त्यापेक्षा एकणार्याला त्या पेक्षा

छत्रपती गणेश मंडळाच्या शिबीरात 35 जणांचे रक्तदान

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   जालना जिल्हात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गणेश उत्सव काळात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत परतूर शहरातील रेणुकानगर येथील छञपती गणेश मंडळाने सामाजिक बांधीलकी जपत रविवार 24 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्तिक बोराडे यांच्या पुढाकारातुन आयोजित रक्तदान शिबीराला उदंड प्रतिसाद देत तब्बल 35 गणेश भक्तांनी रक्तदान केले.तत्पुर्वी शिबीराचे उदघाटन डाॅ.सोमनाथ रेपे,डाॅ.योगेश कदम,डाॅ.हरिप्रसाद ढेरे,नगरसेवक राजेश भुजबळ,बाबुराव हिवाळे यांच्या हस्ते पार पडले.    यावेळी माजी सैनिक सोपान धुमाळ,डाॅ.स्वप्निल मंञी,विजय बोराडे,रामचंद्र धुमाळ,नामदेव काकडे,राजेश मस्के,सोमनाथ पांगरकर,दत्ता सुरूंग,राहुल कदम,राधेशाम तापडिया,आबासाहेब काकडे,गणेश कातारे, पुरुषोत्तम जेथलिया,अनिकेत कोंडावार,कृष्णा कातारे,बाळु काकडे,भागवत घडे,महेश नळगे,गणेश जगताप,साहिल सकलेचा,सुरज वैष्णव,रितेश शहाणे,दत्ता माळवदे,सिध्देश्वर बिल्हारे,कृष्णा धुमाळ जालना येथील जनकल्याण रक्तपेढीचे  डॉ,संदिप वाघमारे ,कृष्णा इंगळे

वाढोना येथे साखळी उपोषण, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार गावकऱ्याचा निर्धार

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण जालन्यातील  परतुर तालुक्यातील वाढोना या गावात सकल मराठा समाजाच्या वतीने  मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण दिनांक 14 /9/ 2023 पासून सुरू केले असून दिनांक 23 / 9/ 2023 उपोषणाचा दहावा दिवस असून 23रोजी उपोषणार्थी 1) अशोक तनपुरे 2 पुरुषोत्तम तनपुरे 3 रामदास तनपुरे 4 भास्कर तनपुरे 5 अर्जुन तनपुरे हे साखळी पद्धतीने उपोषण करीत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सकाळी उपोषण करण्याचा वाढोना ग्रामस्थाने निर्धार केला  येणाऱ्या काही दिवसात महिला देखील या साखळी उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे असे पत्रकाराशी बोलताना  अशोक तनपुरे ( जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना) यांनी सांगीतले आहे यावेळी गावातील ऋषिकेश तनपुरे अर्जुन शेळके राजेश शेळके नवनाथ शेळके बद्री तनपुरे अर्जुन तनपुरे श्रीरंग तनपुरे कालिदास तनपुरे अंकुश शेळके ज्ञानदेव तनपुरे नामदेव तनपुरे अशोक गोंडे आदी ग्रामस्थांनी पाठिंबा द

जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विष्णू कदम यांना जाहीर

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    शासनाच्या वतीने दिल्या जाणारा 2022/23 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जालना जिल्हा परिषदेच्या वतीने श्री विष्णू कदम यांना जाहीर झाला आहे शैक्षणिक आणि सामाजिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा परतूर यांच्या वतीने सदर निवड बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला    या निवडीबद्दल माजी मंत्री तथा विद्यमान आमदार श्री बबनराव लोणीकर साहेब, युवा भाजपा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष बाबुरावजी पवार सर, परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष भगवान जायभाये, जिल्हाध्यक्ष मंगेश जैवळ, तालुका अध्यक्ष दिलीप मगर,जिल्हा नेते कल्याण बागल,विष्णू तोटे,रंगनाथ रोकडे,रामेश्वर हातकडके,विष्णुपंत ढवळे,प्रकाशकाका ढवळे व राम सोळंके यासह सर्व शिक्षक बांधवांकडून अभिनंदन होत आहे

सण उत्सवाच्या च्या पार्श्वभूमीवर शहरात व परिसरामध्ये शांतता व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी परतूर पोलिसांनी केली २१० गुंड लोकांवर प्रतिबंध कारवाई.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतुर शहरात व परीसारामधे  येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण २१० लोकांवर परतूर पोलिसांनी  प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यामधे  १) सीसीआरपीसी कलम १४४(२) प्रमाणे -२१ इसमावर  २) मुंबई कायदा कलम ५६ प्रमाणे - ११ इसमाना २ वर्षा करिता जालना जिल्ह्यातून बाहेर हद्दपार करण्यासाठी  ३) सीआरपीसि कलम ११०(ई)(ग) प्रमाणे-२० लोकांवर धोकादायक आणि गुंड इसम  ४) सीआरपीसी १०७ प्रमाणे चांगली वर्तणूक ठेवणे साठी -४८ लोकांवर  ५) सरायत अवैध दारू विक्री करणारे -८ इसम यांचेवर कलम - ९३ मुंबई दारूबंदी कायदा प्रमाणे कारवाई केली आहे.  ६) सीआरपीसी कलम १५९ प्रमाणे  - १०७ लोकांवर  . अशा एकूण - २१० पैकी काहीचे प्रस्ताव पाठवीण्यात आले तर  काही वर  प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे  गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, वॉच टॉवर उभारून त्यावर व्हिडिओ कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे संपूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, प्रत्येक मंडळाचे तसेच लोकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार

परतूर येथे 40 जणांवर वीज चोरी प्रकरणी धडक कारवाई

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण     परतुर शहरात वीज चोरी करणाऱ्यांची शोध मोहीम सुरूच असून दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी परतुर शहरात महावितरणच्या पथकाने 40 जणांवर वीज चोरी प्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   थकबाकी वीज बिले न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केलेला असताना विजेच्या तारेवर आकडे टाकून वीज चोरी करताना परतुर शहरातील 40 जणांनी एकूण 45 हजार 248 युनिटची सात लाख रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. वीज चोरी करणाऱ्या चाळीस जणांविरुद्ध परतुर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत सुधारणा विधेयक नुसार कलम 135 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   सदरील कारवाई छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, जालना मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय सरग, जालना विभाग दोन चे कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती, परतुर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहराचे सहाय्यक अभियंता विकास दरेकर व त्यांच्या पथकातील कर्मचारी गोविंद सिंग चंदेल, विशाल येंदे, संभाजी शिंदे, रामेश्वर भामट ,शेख नदीम, शेख सोहेल ,प्रकाश ताठे यांनी ही कार्यवाही केली   वीज चोर

हस्तिनापूर गणेश मंडळची कार्यकारणी जाहीर,अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी, उपाध्यक्षपदी कृष्णा सुरसुरवाले तर सचिव पदी गणेश देवक

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतूर : येथील हस्तिनापूर गणेश मंडळची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीत अध्यक्षपदी अविनाश कुलकर्णी तसेच उपाध्यक्षपदी कृष्णा सुरसुरवाले तर सचिव पदी गणेश देवक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी गणेशोत्सव अति उत्सवात साजरा करण्यात येणार आहे.    परतूर येथील हस्तिनापूर गणेशोत्सव अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो. यावेळी पुढील कार्यकारणी - सहसचिव - गणेश सुरसुरवाले, कोषाध्यक्षपदी - शुभम सांगुळे, कार्याध्यक्षपदी - सत्यम ओझा, तर सदस्यपदी - सागर झंवर, सचिन नंदीकोल्हे, प्रफुल पवार, श्रीराम मुंदडा, आराध्य ओझा, भारत जोशी, कृष्णा मारोठे, अशोक राजपरोहित, आदित्य अंभुरे, अनमोल अग्रवाल, कपिल मारोठे, ऋषिकेश केशरखाने, सल्लागार पदी - प्रदीप लढा, जगदीश झंवर, राजू आण्णा सुरसुरवाले, प्रवीण मारोठे, शाम ओझा, रोहित अग्रवाल, मनोहर कुंटुर, राधेश्याम तापडिया, सागर काजळे, सुदर्शन पांगारकर, भारत सवणे, गोविंद बजाज, संजय मोर, गजानन चोरघडे, विकास अग्रवाल ( बबलू), प्रवीण कुलकर्णी, विकास पवार, अक्षय ओझा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात भाजपा युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न,पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात देशाची वाटचाल महासत्तेकडे - आमदार बबनराव लोणीकर

Image
जालना/प्रतिनिधी समाधान खरात पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत अवघ्या विश्वात देशाला आदराचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा आज वाढदिवस. त्यांनी देशाला खऱ्या अर्थाने जगभरात सन्मानाने उभे केले, सामान्य भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. या कर्तृत्ववान जागतिक नेत्यासाठी ‘जीवेत शरद: शतम्’ हीच भावना मनात दाटून आली आहे.    मोदींना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक वेगवान होवो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! करतो असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करीत हिंदूराष्ट्रला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्यासाठी संकल्पबद्ध असलेले राष्ट्रनायक, सशक्त भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्म दीना निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा जालना तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी या रक्

नळडोह येथे नवीन 33 के.व्ही वीज उपकेंद्र उभारणी करिता आग्रही मागणी करणार आमदार बबनराव लोणीकर, संत जनार्दन महाराजांच्या आश्रमात नवीन सभागृह मंजुरीसाठी प्रयत्न करणार - आमदार बबनराव लोणीकर

Image
 प्रतिनिधी कैलाश चव्हाण   उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून विनंती करून नळडोह येथे नवीन 33 के.व्ही वीज उपकेंद्र उभारणी करिता आग्रही मागणी करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते नळडोह तालुका मंठा येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात आयोजित भागवत सप्ताह निमित्त महाआरतीच्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते.  नळडोह तालुका मंठा जिल्हा जालना येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात सालाबादाप्रमाणे याही वर्षी भव्य भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाची उद्या सांगता होत असल्याने आज राज्याची माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या शुभहस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ कैलासरा

पिंप्रूळा येथील पुकारलेले उपोषण नितीन जेथलियांच्या उपस्तिथीत सोडले आरक्षण मिळेपर्यन्त साखळी पद्धतीने अंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार

Image
परतुर - प्रतिनीधी कैलाश चव्हाण  मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी करत गेल्या चार दिवसापांसुन तालुक्यातील पिप्रुंळा येथे पांडुरंग गाडगे, नाना आवटे, नंदकिशोर आवटे या मराठा युवकांनी पुकारलेले अमरण उपोषण काँग्रेसचे युवानेते नितीनकुमार जेथलिया यांच्या हस्ते आज दिनांक 14 सप्टेबंर रोजी सोडण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट , आष्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक नरके साहेब, बाबुरावजी हिवाळे, शाकेर भाई यांची प्रमुख उपस्तीथी होती.     मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासणानंतर सराटी अंतरवाली येथे आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पा.यांनी मागे घेण्याच्या निर्णयानंतर नितीनकुमार जेथलिया यांच्या मध्यस्तीने पिप्रुंळा येथील अन्नत्याग अंदोलन मागे घेत साखळी पद्धतीव्दारे अंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी नितीनकुमार जेथलिया यांनी म्हटले की उपोषण लक्ष वेधण्यासाठी असते हे खरे असले तरी स्वतःला त्रास देउन न्याय मागण्यापेक्षा लोकशाही पध्दतीने कडव्या अंदोलनातुन सरकारचे लक्ष वेधावे. तरूणानी आत्महत्या करू नये तर आपल्या न्

शिंदे सरकारचा गणेश उत्सव मंडळाना दिलासा, आता पाच वर्षानी एकदाच घ्यावा लागणार परवानगी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Image
मुंबई प्रतिनीधी  उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायकायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षांसाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुढील पाच वर्षाकरिता एकदाच परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मागणी करण्यात आली होती. यावेळी एका याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर विकास विभाग शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार यावर्षीच्या १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व

शत्रुघ्न कणसे यांची भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्षपदी निवड

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टीचे सभापती शत्रुघ्न कणसे यांची भाजपा तालुकाध्यक्ष पद्दी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या उपस्थितीत वाटुर तालुका परतुर येथे संपन्न झालेल्या बैठकीत नीवड  करण्यात आली यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे यांनी केलेले काम अतिशय चांगले असून पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असल्याचे यावेळी बोलताना लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की, संघटनेचे काम करत असताना कणसे यांनी केलेले काम अतिशय उत्तम असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे तालुकाध्यक्ष म्हणून निश्चितच शत्रुघन कणसे कम करतील अशी अपेक्षा यावेळी आमदार लोणीकर यांनी व्यक्त केले

मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी- लोणीकरांची महाराष्ट्र शासनाकडे मागणी,१५ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करावी लोणीकरांचे शेतकरी बांधवांना आवाहन,शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी विमा कंपनीच्या विरोधात हायकोर्टात जाऊ- लोणीकरांचा इशारा*

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार आणि पिक विमा कंपन्या यांचे साटे लोटे होते पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना केवळ लुटण्याचे काम केले असून विद्यमान शिंदे- फडणवीस- पवार या महायुतीच्या सरकारने पिक विमा कंपन्यांची मुजोरी मोडीत काढली असून शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून ५० टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी अशी मागणी यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले वाटुर फाटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री राहुल लोणीकर अधिकारी श्रीमती प्रतिभा गोरे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रोडगे मंठा तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक जालना तहसीलदार श्रीमती छाया पवार गटविकास अधिकारी श्री गगनबोने यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री रोडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की आघाडी सरकारच्या

स्व. महेश (भाऊ) सितारामजी आकात फाउंडेशन अंतर्गत रक्तदान शिबिराचे भव्य आयोज

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दि 08 सप्टेंबर 2023 शुक्रवार रोजी स्व. महेश (भाऊ) सितारामजी आकात फाउंडेशन अंतर्गत स्व.महेश (भाऊ) आकात  यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्व. दत्ता (आबा) आकात यांच्या स्मरणार्थ      'यश ग्रुप'चे अध्यक्ष श्री बालासाहेब सितारामजी आकात यांच्या अध्यक्षतेखाली   यश अर्बन समोर,बस स्टॅन्ड, सातोना खुर्द येथे *सर्व नागरिकांना पिण्यासाठी RO फिल्टर चे शुद्ध पाणी असलेल्या रोज 10 हजार लिटर क्षमतेच्या 'कायमस्वरूपी पाणपोई'चा लोकार्पण सोहळा* परमेश्वर नाना आकात  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.    याबरोबर  गतवर्षी प्रमाणे याही वर्षी फाउंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन  कारण्यात आले होते. नवल परसराम सोनी यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उदघाटन झाले.यात तब्बल  143  रक्तदात्यांनी रक्तदान केले.       'यश ग्रुप'चे अध्यक्ष श्री बालासाहेब आकात यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदाणामुळे व महेश (भाऊ) यांच्या विचाराचा वारसा पुढे अखंडितपणे चालू ठेवल्याने जि.प प्रशालेचे मुख्याध्यापक तुकाराम आकात सर, बाबर सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने त्यांचा सत्कार

जमावबंदी पाळत काँग्रेसच्या वतिने केवळ चार जनांच्या उपस्तिथीत दिले निवेदन..!परतुर-मंठा मतदारसंघातील शेतक-यांना पंन्नास हजारांची हेक्टरी मदत जाहिर करावी - नितीन जेथलिया

Image
परतुर - प्रतिनिधी कैलाश चव्हाण जिल्हयात जमांवबंदीचा मान राखत आज दिनांक 5 रोजी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतिने रेल्वे गेट ते उपविभागीय अधीकारी कार्यालया पर्यंत केवळ चार जनांच्या उपस्तिथीत एका ट्रकटर वर काँग्रेसचा नियोजीत मोर्चा काढण्यात आला. यात युवानेते नितीकुमार जेथलिया, काँग्रेसच्या तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट व शिवाजी बप्पा सवणे यांची उपस्तीथी होती.     दुष्काळ जाहिर करत शेतक-यांची तारांकीत प्रश्न तातडीने सोडवावा या प्रमुख मागणीचा काँग्रेसने जाहिर केलेला हा मोर्चा जिल्हात सध्या जमावबंदीचा आदेश असल्यामुळे कदाचीत रद्द होतो का? याकडे सर्वाचेेच लक्ष लागुन होते. मात्र जमावबंदी जरी असली तरी प्रशासनाने दिलेल्या निकशाप्रमाणे कुठलीही घोषणाबाजी न करता केवळ चार लोकांच्या उपस्थितीत उपविभागीय अधीकारी यांना निवेदन सादर करण्याचे ठरले यामुळे जेथलिया यांच्या कार्यालयात गोळा झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना परत घरी जाण्याचे आव्हान मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. व केवळ चार जणांनी ट्रक्टर वर जात निवेदन सादर केले. दरम्यान

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण आघाडी सरकार च्या नाकर्तेपणामुळे गमवावे लागले ही दुर्दैवी बाब - आमदार बबनराव लोणीकर,मराठा आरक्षणाची लढाई मनोज जरांगे यांची एकट्याची नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांच्या सोबत - आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी / जालना समाधान खरात  मराठा आरक्षण हा राजकीय प्रश्न नसून सामाजिक अस्मितेचा विषय आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले होते परंतु ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ते गमवावे लागले चाळीस वर्षे मराठ्यांचा मुख्यमंत्री असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही किंवा अत्यंत दुर्दैवी असो मनोज जरांगे यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा केवळ त्यांचा एकट्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील समाज त्यांच्या पाठीशी आहे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका असून त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज सराटे आंतरवाली तालुका अंबड येथे मराठा आरक्षण आंदोलनाच्या उपोषण स्थळी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केले.  अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन आज श्री लोणीकर यांनी उपोषण करते श्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला प्रसंगी त्यांच्या सोबत भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्

समर्थ विद्यालयाचे कुस्ती स्पर्धत यश.

Image
परतुर. प्रतिनीधी कैलाश चव्हाण  तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत कुस्ती या खेळ प्रकारात पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. आज दि. पाच सप्टेबर रोजी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धे अंतर्गत परतुर येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यत आले होते. या स्पर्धेत चौदा आणि सतरा वर्ष वयोगटात विद्यालयाचे विद्यार्थी  युवराज शिंदे व शेख रेहान  या खेळाडुंनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत अजिंक्यपद पटकावले.  या दोन ही खेळाडुंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यशस्वी खेळाडुंचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.बबनरावजी लोणीकर साहेब , ऊपाध्यक्ष तुळशिदासजी खवल, मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर , क्रिडा शिक्षक भास्कर कुळकर्णी , सर्व शिक्षक बांधव , पालक श्री संभाजी शिंदे , शेख लाला व गावकर्यांनी अभिनंदन करुन कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.