Posts

Showing posts from December, 2020

परतूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड.बागल तर सचिवपदी जमीनदार

Image
परतूर प्रतिनिधी - परतूर वकील संघाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड.जगन्नाथ बागल  सचिवपदी ऍड.वसीम जमीनदार तर ग्रंथालय सचिवपदी ऍड.नितीन मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.   वकील संघाच्या सभागृहात ऍड. राजेश अंभुरे,व ऍड. राजेश पाईकराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष बैठकीत २०२१ या नव्या वर्षाची वकील संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.      यावेळी जेष्ठ वकील ऍड.झेड.ऐन.कादर,अनिल देशपांडे,राजेश अंभुरे,ऐ.जे.देशमुख, व्ही.व्ही.बेरगुडे,बी.बी.चिखले,दीपक डहाळे,ऐ. व्ही. दराडे,अभय जवळेकर,राहुल लिंबूळकर,ओमप्रकाश राऊत,पी.डी. चव्हाण,अविनाश चामणीकर,अनंतराव मस्क,राजेश पाईकराव, पुरी मॅडम,महेंद्र वेडेकर, सुनील देशपांडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलण्यात महापाप करू नये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा कारखाना प्रशासनाला इशारा,कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा लोणीकर यांचा चेअरमन शिवाजीराव जाधव यांना मैत्रीपूर्ण सल्ला, शिष्टमंडळासह घेतली

Image
परतूर(प्रतिनिधी) परतूर व मंठा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले शेत, कुटुंबाचे दागदागिने गहाण ठेवून, त्याकाळात व्याजाने पैसे घेऊन कारखाना उभारणी करताना शेअर्स घेतलेले आहे आज श्रद्धा एनर्जी प्रा.लि.  असणारा तत्कालीन बागेश्वरी सहकारी साखर कारखाना त्याचे संस्थापक चेअरमन कै.माजी आमदार वैजनाथराव आकात यांनी काही दिवस हा कारखाना चालवला त्यानंतर कारखान्यात शेतकरी हितापेक्षा राजकारणाचा जास्त विचार केला गेला आणि त्यामुळे पुढे हा कारखाना विक्री काढणे इतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले, उसाची लागवड देखील कमी झाली, परिणामी कारखाना बंद पडला परंतु निम्न दुधना प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे आता परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून शेतकऱ्याच्या घामाच्या पैशात

सर्वसमावेशक पत्रकार विकास समितीची सभासद नोंदणी सुरू,समितीची कार्यकारिणी होणार निश्‍चित; शनिवारी बैठक

जालना । प्रतिनिधी - जिल्ह्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी नव्याने उभा राहत असलेल्या सर्वसमावेशक पत्रकार विकास समितीच्या सभासद नोंदणीला मंगळवार (दि 29) पासून सुरुवात होत आहे. या समितीची कार्यकारिणीही लवकरच निश्‍चित होणार असून इच्छुकांनी सभासद नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समितीच्या वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी (दि 2) तिसर्‍या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.   जालना जिल्ह्यातील पत्रकारांच्या कल्याणासह उज्ज्वल भविष्यासाठी सर्वसमावशेक पत्रकार विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत संपादक ते वृत्तपत्र वितरकापर्यंत प्रत्येक सदस्याच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग निश्‍चित केला जाणार आहे. समितीची घटना संहिता निश्‍चित करण्यासाठी आजपर्यंत पत्रकारांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. शिवाय समितीची प्राथमिक कार्यकारिणीही आगामी काळात ठरविण्यात येणार आहे. या समितीचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच वृत्तपत्राच्या प्रत्येक घटकाला समितीचे सदस्यत्व मिळणार आहे. याचाच अर्थ संपादक, पत्रकार, डिटीपी ऑपरेटर, छायाचित्रकार

शिवसेना शाखाप्रमुख.महेश मल्लेकर व युवा सेना विभाग प्रमुख रोहित साळवे यांचाअंसख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश

Image
औरंगाबाद(प्रतीनीधी)     कोटला कॉलनी वार्ड क्रमांक 67 चे शिवसेना शाखाप्रमुख महेश मल्लेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे दुरदृष्टी असलेले विचार , संघटनात्मक ताकद व देशात सर्वात जास्त सभासद असलेला पक्ष अशा विविध विषयांना प्रेरीत होऊन खासदार डॉ भागवत कराड, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष . संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला.     शिवसेनेचे शाखाप्रमुख  महेश मल्लेकर यांच्या सह युवा सेना विभाग प्रमुख  रोहित साळवे, उपशाखा प्रमुख .अविनाश जगताप, उपशाखा .नितेश लांडगे, गटप्रमुख . साजन भद्रे, गटप्रमुख .शरद गवळी, गटप्रमुख .रुपेश खरे, गटप्रमुख .प्रवीण वाघमारे,गट प्रमुख .शैलेश धुपे, सह गटप्रमुख श्दीपक गोडसे, सहगट प्रमुख राहुल विश्वासू या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला.         याप्रसंगी खासदार डॉ भागवत कराड, शहराध्यक्ष .संजय केनेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मनोज पांगरकर, अनिल मकरीये, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष .एजाज देशमुख, शहर सरचिटणीस श्री.समिर राजूरकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.माधुरीताई अदवंत, शहर उपाध्यक्ष .दयाराम बसैये,

श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन

Image
श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते  या ख्यानाचे मुख्य वक्ते ह भ प दत्तात्रय महाराज पवार यानी राम भक्ताला मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर ह भ प ज्ञानेश्वर माऊली वाघाळेकर चरणदास महाराज जनकवार याची प्रमुख उपस्थीती होती अयोध्या येथे मोठया प्रमाणावर राममंदीर बांधकांम सुरु असुन निधी संग्रह व प्रत्येक कुटुबां पर्यन्त संपर्क करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यन्त संपर्क करून त्याना या अभियानात समाविष्ट करणार असुन  मंठा तालुक्यातील  बेचाळीस हजार कुटुंबा पर्यन्त पोहचण्याचे लक्ष असल्याचे अभियान प्रमुख बालासाहेब बोराडे यांनी सांगीतले  यावेळी उपस्थीताना मार्गदर्शन करताना यानी या अभियानाबद्दल माहीती दिली तसेच प्रभू रामचद्र यांच्या जीवनपद्धतीवर प्रकाश टाकला प्रभू राम हे त्यागाचे प्रतिक होते मर्यादा पुरुषोत्तम राम हे सपूर्ण विश्वाचे पालन कर्त आहेत जो राम नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते' आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुणमूर्ति न

परतूर पोलिसांनी 12 हजार 400 रुपयांचा गांजा पकडला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

परतुर प्रतिनिधी /सय्यद वाजेद परतूर पोलिसांनी मोटर सायकल वरून गांजा घेऊन जाणाऱ्यांना पकडून 12 हजार 400 रुपयांचा जप्त केला असून दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परतूरकडून सेलूकडे दोघेजण मोटरसायकलवरून गांजा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परतूर पोलिसांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास परतूर-सेलू रोडवर वरफळ येथे सापळा लावला. त्यावेळी शंकर रामदास पवार (वय 21 वर्षे) आणि रामचंद्र अंकुश घोडे (दोघे रा. सेलू जि. परभणी) हे मोटारसायकल क्रमांक (एम.एच. 16 एएफ 7070) वरून 1238 ग्रॅम वजनाचा 12400 रुपये किमतीचा अमलीपदार्थ गांजा ताब्यात व कब्जात बाळगून वाहतूक करत असताना मिळून आले. त्यावेळी सदर मोटारसायकल चालकाने पोलीस पथकास पाहून त्यांची मोटारसायकल जोरात पळवून मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंख्याचा खाली बराशीत घातली. तेव्हा ही मोटारसायकल बराशीत जावून पडली. मोटारसायकल चालक सोनू उर्फ रामचंद्र घोडे हा तेथून बाजूला असलेल्या तारेच्या कंपाउंडवरून उडी मारून पळून गेला. मा

ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

Image
1. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल 2. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल 3. जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल 4. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यांत द्यावी लागेल 5. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार 6. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे 7. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल 8. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार 9. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही 10. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल 11. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये 12. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये 13. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये 14. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 र

पुढच्या वर्षी ,रेल्वे प्रवाशांसाठी खास गिफ्ट 5 दिवसात तिकिटांबाबत मोठी घोषणा    

Image
नवी दिल्ली : रेल्वे मंत्री पीयूष गोयल पुढच्या 5 दिवसांमध्ये सर्व प्रवाश्यांसाठी खास गिफ्ट देणार आहेत. रेल्वे सीईओ वी. के यादव यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. शनिवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये प्रवाश्यांना रेल्वे तिकिट बुकिंग आणखी सोयीचं करण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड ट्यूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई-तिकिटींग वेबसाईट नवी सुविधेसह अपडेट करणार आहेत. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून काही दिवसांमध्ये रेल्वे मंत्री स्वत: यासंबंधी माहिती देणार आहेत. (indian railways train ticket booking railway minister to announce irctc website changes rules 2020) भारतीय रेल्वे नव्या सुविधेसह आयआरसीटीसी पुढच्या पिढीच्या ई-तिकीट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. याआधी शुक्रवारी रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, नवीन डिजिटल इंडिया अंतर्गत आता जास्तीत जास्त लोक प्लॅटफॉर्मच्या काउंटरवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्याला जास्त प्राधान्य देतील. म्हणूनच आIRCTC वेबसाइट आणखी सोयीची बनवण्य

मंठा येथे लोणिकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरू तुकोबारायांच्या १०८ गाथा प्रतीचे वितरण, मित्रमंडळ दिनदर्शिका विमोचन, तर आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला ११ हजार रुपयांची मदत

Image
मंठा(प्रतिनिधी) जनसेवा हीच ईश्वरसेवा असून सत्ता असो वा नसो कायम जनसेवेसाठी तत्पर राहण्याचं व्रत आणि बसा वडिलांच्या आणि संपूर्ण लोणीकर परिवाराच्या माध्यमातून मला मिळालेला आहे त्यामुळे सत्ता असेल अथवा नसेल परंतु मी मात्र जनसेवेसाठी कायम तत्पर असेल व  तुकोबांनी सांगितलेला जनसेवेचा वसा कायम जपणार अशी भावना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी मंठा येथे व्यक्त केले मंठा येथे प्रा सहदेव मोरे पाटील व अरुण खराबे पाटील यांच्यावतीने राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरु तुकोबारायांच्या 108 गाथा प्रतींची वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमाप्रसंगी राहुल लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेश राव खवणे राजेश मोरे सतीशराव निर्वळ प्रकाश टकले ह-भ-प कांगणे महाराज ह भ प रामेश्वर महाराज नालेगावकर  ह.भ.प. केदार महाराज ताठे ह भ प संतोष महाराज निर्वळ सुभाषराव राठोड नागेश घारे माऊली शेजुळ  जिंतूर भाजपा शहर अध्यक्ष राजेश वट्टमवार बाबासाहेब मोरे पाटील गजानन उफाड अशोक खलसे अशोक वायाळ विठ्ठल मामा काळे कैलास बोराडे राजेभाऊ खराबे बाळासाहेब तौर

भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन*

Image
मंठा(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून यामध्ये पक्ष म्हणजे  आपली खाजगी मालमत्ता असल्याची भावना कोणताही नेता बाळगू शकत नाही अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर हा पक्ष उभा असून नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले मंठा येथे आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अभ्यासवर्ग दरम्यान लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे सभापती संदीप गोरे उपसभापती नागेश घारे उपसभापती राजेश मोरे पंजाबराव बोराडे कैलास बोराडे जिजाबाई जाधव माऊली शेजुळ सुभाष राठोड नाथराव काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती जुन्या जनसंघमधून भारतीय जनता पार्टीचा जन्म झाल्यानंतर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय नानाजी देशमुख यांच्यापासून स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांनी पक्ष उभा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून तळागाळापर्यंत पक्ष पोहचविण्याचे काम पक्षाच्या प्रत्येक लहानथ

लोणिकरांचा वाढदिवस वीवीध उपक्रमाने साजरा,मान्यवरांनी पत्रांद्वारे,फोनद्वारे दिल्या शूभेच्छा

Image
परतूर (प्रतिनधी) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजल्यापासून मतदार संघा सह मराठवाड्यातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी परतूर येथील त्यांच्या निवासस्थानी आले होते    दुपारी 12 वाजता आर पी एल क्रिकेट स्पर्धाचे राहुल लोणीकर यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले त्या नंतर शहरातील विविध ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते त्यानंतर दुपारी एक वाजता आष्टी तालुका परतुर येथे ढोल-ताशांच्या गजरामध्ये भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या मोटर सायकल रॅली मध्ये 1000 च्या वर युवकांनी सहभाग नोंदवला येथील बस स्टँड परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर युवा नेते राहुल लोणीकर यांची लाडू तुला करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले त्यानंतर आष्टी येथील शिवराज क्रीडांगणावर आर एल पी एल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राहुल लोणीकर यांच्या शुभहस्ते करण

जुगार खेळताना पोलिसांनी मारला छापा

परतुर (प्रतिनिधी) शहरातील होलाणी दालमिल जवळ लिंबा च्या झाड़ा खाली काही इसम गोलकार  करून  पत्यावर पैसे लावून झन्नामन्ना नावा चा जुगार खेळ खेळत व खेळवित  होते यांची माहीतीपोलीसाना  खबऱ्या कडून माहिती मिळाली माहीत मिळताच  प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी गौहर हसन यांचा मार्गदर्शनाखलील सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र ठाकरे पोलिस उपनिरीक्षक के व्ही अं भुरे पो ना स्माईल शेख पो ना पउलबुध्दे पोलिस शिपाई गणेश शिंदे पोलिस शिपाई नितिन कोकने पोलिस शिपाई विकास घाडगे यांच्या सह 2.15 वाजता छापा मारला असता एकूण 70.50 रुपये रोख  जप्त करण्याती आली  आरोपी जॉन सिंग पटवा ला ताब्यात घेतले व त्यांचे सोबत इतर 6 इसम झन्नामन्ना नावाचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आले त्यांची अंगझडती घेतली असताना त्यांच्या कडे जुगार चे साहित्य व रोख रकम मिळून आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक के व्ही अंभुरे यांनी पत्रकारांना दिली

धर्माबाद ते मनमाड (मराठवाडा) एक्स्प्रेस गुरूवारीपासून धावणार...

Image
परभणी, दि. 22 (प्रतिनिधी) ः दक्षिण मध्य रेल्वेने बंद केलेली धर्माबाद - मनमाड - धर्माबाद (मराठवाडा एक्स्प्रेस) ही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गुरुवारपासून (दि. 24) पुन्हा धावणार आहे. दरम्यान, ऐनदिवाळीतच बंद केलेली मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे प्रवाशांसह संघटनांच्या जोरदार मागणीनंतर दक्षिण मध्य रेल्वेस सुरू करावी लागली.  सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदे़ड ते पनवेल या एक्स्प्रेस पाठोपाठ मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीकरिता धर्माबाद ते मनमाड व मनमाड ते धर्माबाद ही विशेष रेल्वे दिवाळीपुर्वी सुरू केली होती. मात्र, ऐन दिवाळीतच ती काही न सांगता प्रतिसाद नसल्याचे कारण देत अचानक बंद केली होती. मात्र, सर्वांच्याच पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनास ती पुन्हा सुरू करावी लागली. ही रेल्वे धर्माबादहून सकाळी चार वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर पाच वाजून 28 मिनिटांनी, पूर्णेत सहा वाजून तीन मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 38 मिनिटे, मानवतरोड सहा वाजून 57 मिनिटे, सेलूत सात वाजून 17 मिनिटे, परतूर सात वाजून 44 मिनिटे, रांजनी सात वाजून 54 मिनिटे, जालना आठ वाजून 48 मिनिट

महावीतरणचा प्रताप अधिकृत विज जोडणी नसताना सुध्दा आले बिल

तळणी (रवि पाटील ) सध्या सपूर्ण राज्यात लाँकडाऊन काळातील वाढीव विज बिला सदर्भात आंकडतांडव सुरु असतानाच ग्रामीण भागातील नांगरीकांनी सुध्दा या वाढीव बिलाचा मोठा आर्थीक भुर्दंड बसला असुन महावीतरणच्या अनेक अक्षम्य चुका समोर येतानाचे नित्याचे झाले आहे ज्या गावामध्ये हजारो आकडे असत तेच गाव आज नियमित बिलाचा भरणा करत आहे शेकडो ग्रांहकांनी अधिकृत विज जोडणी करून सुध्दा घेतली पंरतू ज्या ग्राहकाने विज वितरण कडे विज जोडणीची साधी मागणी केली नाही की कुठली कागदपञ सुध्दा दिली नाही घरात मिटर सुध्दा नाही तरि सुध्दा पत्नीच्या नावाने चक्क बिल आल्याचा प्रकार तळणी येथे घडला असुन याकडे महावीतरण फक्त वेळ काढू पणाचे धोरण अंवल बित्त असल्याने याचा नाहक ञास नागरीकाना होत आहे विशेष बाब म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने  बिल आले आहे त्या  नावाने कुठलीच  स्थावर प्राँपट्री . नाही तरि सुध्दा हा प्रकार समोर आला आहे आणखी एक विषेश गोष्ठ म्हणजे ज्या ग्राहकांने कधी विज बिलाचा भरणा केलाच नाही तरि सुध्दा त्या बिलावर सहाशे दहा रुपये भरल्याची नोद आहे  ज्या ग्राहकाकडे हे बिल आले त्यांने त्या नावाचे आणखी कोणी आहे का यांची शंहानीशा दो

या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचे पैसे

Image
नवी दिल्ली - PM किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. म्हणजेच ही रक्कम २५ डिसेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या रूपात जमा केली जाते. त्याचप्रमाणे Rft Signed by State Government असे लिहून आले असेल तर त्याचा अर्थ Request For Transfer म्हणजेच माहिती तपासण्यात आली आहे. तसेच ती पुढील प्रक्रियेसाठी ट्रान्सफर केली जाईल. याचा अर्थ काही काळाने तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. FTO चा पूर्ण अर्थ Fund Transfer Order अ

परतूर परीट समाजाच्या वतीने संत गाडगे बाबाना अभिवादन

Image
  परतूर (प्रतीनीधी) येथील परीट समाजाच्या वतीने गंज शाळाच्या प्रांगणात संत गाडगेबाबा यांची पुण्यतीथ निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले           परतूर येथील परीट समाज यांच्या पुढाकाराने येथील केद्रीय प्राथमिळ गंज शाळाच्या प्रारगंणात थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची पुण्यतीथी साजरी केल्या गेली या प्रंसगि कृउबासमितीचे सभापती कपिल आकात,शिवसेना तालूका प्रमुख आशोक आघाव, नगरसेवक कृष्णा आरगरडे,राजेश खंडेलवाल,भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र मुंदड़ा,माजी नगरसेवक वीजय राखे,पत्रकार संद्याचे माजी आध्यक्ष शामुसंदर चित्तोडा,शिवसंग्राम संघटनेचे वीघार्थी आघाडी तालूका प्रमुख सचिन खरात,सईनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष चव्हाण,मनसेचे श्रीरंग धुमाळ,श्रीराम मित्र मंडळाचे गजानन अंभुरे, यांनी संतगाडगे बाबा यांना अभिवादन केले    कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीट समाजाचे तालूकाध्यक्ष वीकास वाघमारे,सचिव उद्धव वाघमारे उपाध्यक्ष सचिन खैरे,मंगेश वाघमारे,गजानन वाघमारे,

अखेर दिशा ठरली... दुसर्‍या बैठकीला पत्रकारांचा उत्साही प्रतिसादनव्या संघटनेच्या घटनेला दुरुस्तीसह पत्रकारांची संमती

Image
जालना ( प्रतिनिधी-) जालना जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात येत असलेल्या पत्रकार संघटनेची घटना-संहिता ठरविण्याची दिशा अखेर निश्‍चित करण्यात आली आहे. यासंदर्भात नियोजनाची दुसरी बैठक रविवारी (दि. 20) पार पडली असून, या बैठकीत घटना-संहिता सर्वांसमोर मांडण्यात आली. तथापि, त्यात काहीजणांनी दुरुस्ती आणि सुचनावजा मुद्दे मांडले. तर काही दुरुस्तींसह संघटनेच्या घटनेला सर्व पत्रकारांनी हात उंचावून संमती दिली. या बैठकीला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. त्यामुळे घटना-संहिता निश्‍चितीसोबतच संघटना वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. येथील भोकरदन नाका परिसरातील आयएमए हॉलमध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दै. रामविचारचे कार्यकारी संपादक विजयकुमार सकलेचा यांची तर घटना-संहिता समितीचे अध्यक्ष दै. युवा आदर्शचे संपादक दिपक शेळके, दै. मराठवाडा लोकप्रश्‍नचे संपादक अभयकुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीच्या सुरुवातीला श्री. शेळके यांनी संघटनेसाठी बनविण्यात आलेली घटना संहिता सर्वांसमोर मांडली. त्यात प्रामुख्याने नव्याने अस्तित्वात येणारी संघटना ह

मतदार संघातील ग्रामपंचयती बहुतांश ग्राम पंचायती भा.ज.पा. ताब्यात घेणमतदार संघतील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 लाखाचा देणार निधी

Image
परतूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी हा विशाल  वटवृक्ष असून, हे विशाल काय वृक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले प्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी इत्यादी सारख्या महान विभूतींनी भारतीय जनता पार्टी नावाच रोप लावले या रोपाचे आज विशाल काय मोठ्या वृक्षात रूपांतर झाले असून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करत काम करावे असे प्रतिपादन केले माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले ते परतूर येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते  या वेळी व्यासपीठावर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर,मदनलाल सिंगी, भगवान मोरे, भा ज पा ता अध्यक्ष रमेश भापकर, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले ज्ञानेश्वर माऊली शेजुळ उपसभापती रामप्रसाद थोरात हरिराम माने विलासराव  आकात, प्रदीप ढवळे,दिगंबर मुजमुळे,दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती      पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी हे पक्षाचे ध्येय कार्यकर्त्यांनी न विसरता सतत कार्यमग्न राहण्याचा सल्ला दिला.   शेतकरी कायद्या व

रविवारी पत्रकारांची बैठक; शहरासह जिल्हाभरातील पत्रकारांनी उपस्थित राहावे,घटना-संहितेवर होणार चर्चा; पुढील दिशा ठरणार !

जालना ( प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात पत्रकारांच्या कल्याणार्थ नव्या संघटनेची पायाभरणी करण्यासंदर्भात जिल्ह्यातील पत्रकारांचे एकमत झाल्यानंतर घटना-संहिता समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने घटना-संहितेवर चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी पत्रकारांची रविवार (दि 20) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक औरंगाबाद रोडवरील संभाजीनगर कॉर्नर येथील आयएमए हॉल येथे दुपारी 12 होणार आहे. या बैठकीस जालना शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकारांच्यावतीने करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील पत्रकार संघटनांची झालेली गत लक्षात घेता पत्रकार आणि त्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्याहेतू जिल्ह्यातील पत्रकारांची एक सक्षम संघटना उभारण्याचा निर्णय गत रविवार (दि 13) रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आला होता. त्या बैठकीत झालेल्या चर्चा अंती घटना-संहिता समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत दीपक शेळके, अभयकुमार यादव, अच्युत मोरे, विनोद काळे, अमित कुलकर्णी यांची निवड करण्यात आली होती. या समितीला घटना-संहिता तयार करण्यासाठी आठवडाभराचा अवधी देण्यात

दिपक शिंदे यांची चर्मकार विकास संघाची युवा कार्याध्यक्ष पदी निवड

Image
परतुर प्रतिनिधी शहरातील सामाजिक कार्यकर्ता दिपक शिंदे यांना महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर यांनी एका प्रसिद्धि पत्रकद्वारे चर्मकार विकास संघाची युवा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे या निवड करते वेळीस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की अपन सामाजिक बाँधीलकीतुन चर्मकार समाजाच्या विकास सुख दुःख न्यायहकक व समान्याच्या सर्व स्तारावरकार्यरत आहात अपन केलेल्या सर्वगीन कार्याचा विचार करुण या पुढे चर्मकार विकास संघ युवा कार्याध्यक्ष परतुर या पदा वर पुढील आदेशापर्यंत नेमनुक करण्यात येत आहे आपणास नियुक्ति केलेल्या पदाची जबाबदारीपूर्वक संघटने च्या ध्येय धोरणा नुसार व समाज हिताच्या कामातून योग्य न्याय देऊन यशस्वी पणे कार्य कराल अशी सार्थ अपेक्षा केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देन्यात आली दिपक शिंदे यांची निवड बदल सर्व मित्रा नी पन शुभेच्छा व्यक्त केली

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत दर्शन शिंदे राज्यातून दुसरा

Image
   जालना (प्रतिनिधी)    बीड येथील प्रभास 24 न्यूज कडून १ ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. ४ ऑक्टोबर हा  माजी खासदार केशरकाकु क्षीरसागर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात उलेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा आणि महापुरुषांच्या विचारांची आवड विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी या उद्देशाने ही वत्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी आपापल्या वक्तृत्वाचे व्हिडीओ पाठवून सहभाग नोंदविला होता. सदरील स्पर्धेचा निकाल १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये *शालेय गटातून दर्शन एकनाथ शिंदे याचा दुसरा क्रमांक आला*. संस्कार प्रबोधिनी विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या दर्शन शिंदे याने *‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य’* या विषयावर स्पर्धेत मत प्रतिपादन केले होते. त्याच्या *व्हिडिओला एकूण ५४३ लाईक्स, ३०० कॉमेंट्स, आणि १५०० विवर्स मिळाले होते.* विजयी स्पर्धकांना महापुरुषाचे चरित्र ग्रंथ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पोस्टाने पाठवून गौरविणा

अयोध्येतील भव्य राममंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार - सावता काळे

Image
 ---- परतूर/प्रतिनिधी - अयोध्येतील भव्य राममंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार असल्याची माहिती श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समिती चे परतूर तालुका प्रमुख सावता काळे यांनी दिली.मंगळवारी ( दि.१५ ) शहरातील नवा मोंढा भागात श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी रा.स्व.संघाचे तालुका संघचालक शिवाजी पवार,ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष अंभुरे,सोपान जगताप,अशोक मसलकर उपस्थित होते.यावेळी मंदिर निर्माण अभियानाबद्दल अधिक माहिती देताना काळे म्हणाले की,परतूर तालुक्यातील ३ उपखंड,११ मंडलातून १११ गावातील समस्त हिंदू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत या मंदिर निर्माणाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.ऐतिहासिक अशा राममंदिर जन्मभूमीचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचावा यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे व आध्यात्मिक संस्थांचे कार्यकर्ते घराघरांत पोहचणार आहेत.या अभियानात प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असावा म्हणून १० रुपयांपासून ज्याच्या मनाला येईल ती रक्कम स्विकारली जाणार असून यामध्ये पारदर्शकता राहावी म्हणून निधी देणाऱ्या व्यक्तीला

अंबीया बाहरच्या वीमा च्या संदर्भात भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधीकारीना निवेदन

Image
जालना(प्रतीनीधी) सन 2019 चा मोसंबी आंबिया बहारचा विमा  जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भरला होता परंतु विमा व आघाडी सरकारने जालना जिल्ह्यातील 25 मंडळातील शेतकऱ्याना लाभापासून वंचित ठेऊन शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला तरी विमा कंपनी व प्रशासन यांनी 25मंडळातील शेतकऱ्यांना त्वरित विम्याचा लाभ द्यावा नसता भाजपा किसान मोर्चा च्या वतीने दिनांक 26/01/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदार घनसावंगी* यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना भाजपा अ.जा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश ढोणे,गणेश माधववाले,रामा पाटील खांडे,भाऊसाहेब देवडे,जयराम कोरडे,शुभम सपाटे,विलास चव्हाण व उपस्थित मोठ्या संख्येने शेतकरी व भाजप कार्यकर्ते

घनसावंगी तालुका भाजयु मोर्चा च्या सरचिटणीसपदी राम खांडे

Image
घनसावंगी( प्रतिनिधी ) घनसावंगी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा पक्षाच्या तालुका सरचिटणीसपदी  तालुक्यातील म चिचोली येथील पक्षाचे क्रियाशील व सक्रिय युवा कार्यकर्ते राम खांडे यांची निवड करण्यात आली . या निवडी बाबतचे पत्र  माजी मंत्री  तथा आमदार बबनराव लोणीकर, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शना खाली   युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुजित जोगस यांनी निवड केली या प्रसंगि  माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती सर्जेराव जाधव , यांनी शूभेच्छा दिल्या भाजपा  किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे , भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शिवराजभैया नारियलवाले , भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश तौर , भाजपा युवा मोर्चा जि.उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,भाजपा युवा मोर्चा चिटणीस रामेश्वर सोळंके , विनोद दळवी , रफिक  उपस्थित होते   खांडे यांनी निवडी योग्य ते न्याय मिळवून देऊ आसे आपले मत व्यक्त केले

वाहतुक शाखे चे पोलिस हेडकांस्टेबल हवळे यांचा प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी गौहर हसन यांच्या हस्ते सत्कार

Image
परतुर (प्रतिनिधी )नूकतेच अंबड येथून बदलून आलेले परतुर पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेले वाहतूक शाखे चे पोलिस हेडकोंस्टेबल संतोष हवळे यांनी वाहन कायदा प्रमाणे जास्तीत जास्त केस करुण वाहन धाराकस दंड वसूल करुण शासनास महसूल मिळून देत यशस्वी रित्या कर्तव्य पार पाडल्या बदल त्यांचे कामाची पावती म्हणून त्यांचा सत्कार प्रभारी पोलिस अधिक्षक गौहर हसन यांनी सत्कार केला या वेळी परतुर पोलिस ठाणे के सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र ठाकरे पोलिस उपनिरीक्षक के व्ही अंभुरे पोलिस उपनिरीक्षक सुनील बोडखे पोलिस कॉस्टेबल शेळके संजय वैध गणेश शिंदे इस्माईल शेख बाबासाहेब बनसोडे समाधान खाडे आदि पोलिस कर्मचारी उपस्थित होते

लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, ऐक्याची भावना वाढीस लावण्यासाठी खेळ हे सर्वात महत्त्वाचे माध्यम -- राहुल लोणीकर

Image
परतूर (प्रतिनिधी) युवा शक्ती ला विधायक मार्ग दाखवण्यात व ऐक्याची भावना वाढीस लावण्यास खेळ हे महत्वाचे मध्यम असल्याचे युवमोर्चा प्रदेशमहामंत्री  राहुल लोणीकर यांनी प्रतिपादन केले      ते कावजवळा तालुका परतुर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळीउपसभापती रामप्रसाद थोरात, मगर तात्या, पंचायत समिती सदस्य दिगांबर मुजमुले, संपत टकले, कृष्णा आरगडे, सरपंच सोमनाथ मगर, हनुमंतराव चिखले ,शंकरराव पाष्टे, श्रीपात तरासे यांची प्रमुख उपस्थिती होती          पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारणाच्या पटलावर आपला ठसा उमटवत तरुणांनी सामाजिक व्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करावे हिंदुस्तान ला विकसित आणि प्रगल्भ भारत बनवण्याची जवाबदारी युवकावर असून युवकांनी सुदृढ शरीर यष्टी बरोबरच आपल्या कौशल्याच्या जोरावर काम केल्यास निश्चितच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी आपली शक्ती योग्य ठिकाणी पणाला लावावी पुढे ते म्हणाले की व्यसनाधीनता ही एक कीड असून ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी युवा वर्गाने विविध क्रीडा प्रक

खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी -शिवसेना

Image
    परतुर प्रतिनीधी  :      केंद्राने डिझेल व पेट्रोल ची दरवाढ केल्याच्या निषर्थात व तसेच कृषि विधेयकाच्या विरोधात दिल्लीत  चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामाघे पाकिस्तान आणि चीन चा हात असल्याचे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या खळबळजनक वक्त्याव्यच्या  निषेधार्थ शिव सेने च्या     वतीने त्रीव शब्दात निषेत व्यत्त करत  महादेव मंदीर चौकात   आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी 'रावसाहेब दानवे यांणी माफी मागा' अशा घोषणा देण्यात आल्या व निदर्शने करण्यात आले व त्यांनतर उपविभीय कार्यलयात जाऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिव सेना   तालुका प्रमुख अशोक अघाव, उपजिल्हा प्रमुख माधवराव मामा कदम, शिव सेना शहर प्रमुख   दत्ता  पाटील सुंरूग राजकुमार भारूका अजय देसाई  दलीत आघाडी तालुका प्रमुख मधुकर पाईकराव भारत पंडीत रामचद्र  काळे आबा कदम विठ्ठल वटाने शुभम दिंडे बाबुराव बोरकर जगन टेकाळे ञ्रानेश्रर शेळके माऊली राजबिंडे तुकारम बोरकर कालीदास सांवत राहुल कदम गोपील माने अरून धुमाळ गोंवीद रसाळ अदी शेतकरी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्तीत होते

परतुर पोलिसांनी विविध कार्यवाई मंध्ये पकडलेल्या एकविस लाख तेरा हजार सहाशे तीस रूपये किंमतीच्या गुटख्याची लावली विल्हेवाट

Image
.............. परतुर प्रतिनिधी आज परतुर येथे वखार महामंडळ जवळ च्या ग्राउंड वर परतुर पोलिसांच्या वतीने अवैध गुटख्याचा साठ्याची विलेवाट लावण्यात आली. एकविस लाख तेरा हजार सहाशे तीस रुपये किंमतीचा अवैद्य गुटखा पोलिस प्रशासनाने आज शुक्रवारी  ता.11 नष्ट केला आहे. विविध कार्यवाही मंध्ये पकडलेला गुटखा दि. २४-९-२०१९ गोवा (१०००) ५२ पुडे असलेल्या १५० गोण्या ची किंमत पंधरा लाख साठ हजार रुपये, दि २५-०४-२०२० गोवा चे १८ पॉकेट किंमत सहा हजार रुपये, दि. ०२-०५-२०२० गोवा चे १०४ पॉकेट किंमत छत्तिस हजार चारशे रूपये व सुगंधित तंबाखु चे ९६ पॉकेट ची किंमत पंचपीस हजार दोनशे तीस रुपये, दि.०८-०७-२०२० गोवा ६० पॉकेट ची किंमत आठरा हजार रूपये, दि.०१-१०-२०२० रोजी च्या कार्यवाही मंध्ये पकडले गोवा गुटखा १८७२ पॉकेट व सुगंधित सुपारी नखराली च्या १५६० पॉकेट ची किंमत चार लाख आड़ूसष्ट हजार रुपये किमतीचा एकूण साठा अन्न सुरक्षा अधिकारी नि.सु. कुलकर्णी यांच्या समक्ष नष्ट करण्यात आला. यावेळी परतुर पोलिस स्टेशन चे शिकाऊ आय पी एस  गौहर हसन,सहाय्यक निरीक्षक श्री.रवींद्र ठाकरे ,उपनिरीक्षक के.व्ही अंभोरे,गोपनीय

परतूर तहसील कार्यालयात लोणीकर यांनी घेतली विकास कामांची आढावा बैठक

Image
परतूर(प्रतिनिधी) मागील काळात प्रचंड मेहनतीने विविध विकास कामांसाठी भरघोस असा निधी आपण खेचून आणला असून केवळ कामचुकार अधिकाऱ्यांच्या व बेजबाबदार कंत्राटदारांच्या चुकांमुळे ही विकास कामे पूर्ण होऊ शकली नाहीत अद्याप देखील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत वेळेत विकास काम पूर्ण न होणे तसेच अनेक विकासकामांना मुदतवाढ देऊन सुद्धा त्यात कोणत्याही प्रकारची प्रगती आढळून न येणे यासारख्या अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कामचुकार अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा तसेच कामात हलगर्जीपणा करत वेळेत काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराला निलंबन सह काळया यादीत टाकण्याबाबत प्रसंगी गुन्हे दाखल करण्याबाबत कारवाई करा अशा कडक शब्दात कामचुकार अधिकाऱ्यांना लोणीकर यांनी धारेवर धरलं परतूर येथे तहसील कार्यालयात आयोजित मंठा परतुर तालुक्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी भाजपा परतुर तालुका अध्यक्ष रमेश भापकर, मंठा भाजपा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, परतूर तहसीलदार रूपा चित्रक, मंठा तहसीलदार सुमन मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भो

ग्रामपंचायतीचे बीगूल वाजले

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी2021 ला मतदान होणार आसल्या चे निवडणूक आधीकाऱ्यानी जाहीर केले       निवणूक कार्यक्रमाची तारीख खालील प्रमाणे  नामनिर्दशनपत्रे भरविण्याची तारीख 23/12/2020 ते 30/12/2020 नामनिर्दशनपत्र छाननी 31/12/2020 नामनिर्दशनपत्र मागे घेण्याची तारीख 4/01/2021 मतदानाचा दिनांक 15/01/2021

जिल्हा पोलीस अधिक्षक यांची तळणी येथे भेट

तळणी : जालना जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यानी आज तळणी येथे विविध तीन ठिकाणी भेट देऊन पाहणी केली सुरवातीला तळणी पोलीस चौकी येथे दप्तर तपासणी करून गावामधील नव्याने बांधलेल्या पोलीस चौकीची नव्याने बांधण्यात आलेल्या ईमारतीची पाहणी करून ऐतिहासीक निजामकालीन गढीची पाहणी केली या ऐतिहासीक वास्तू ची पाहणी करते वेळी त्यानी उपस्थिताकडून या गढी  विषयी चा ईतिहास जाणून घेतला निजामकालीन तोफ दरवाजे व दरवाज्या वरिल नक्षीकामाचे कौतूक केले तसेच . या पाहणी दरम्यान विविध जिल्हा च्या सीमा व त्याची माहीती सुध्दा यावेळी त्यांनी घेतली  पोलिसांना सुचना  या पाहणी दरम्यान दिंडी मार्गावरील वाहतूक व अवैध दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्याच्या सुचना पोलीसांना दिल्या जर परवानाधारक देशी दारू विक्रेता  ठोक विक्री करत असेल तर दुकान मालकास सहआरोपी करण्या च्या सुचना सुध्दा त्यानी पोलीसांना दिल्या  यावेळी मंठा पोलीस निकम विलास निकम सह पोलीस निरीक्षक नित्तीन गटूवार तळणी बीट जमादार आर राठोड दिपक आढे गायके आदी पोलीस कर्मचारी उपस्थीत होते अवैध दारू विक्रेत्यावर कारवाईचे आदेश  चौकीची पाहणी : जिल्हा पोलिस अधिक्षकांची भे

तब्बल नऊ महीन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर फिरायलेत रसंवतीची चाके

Image
परतूर दि.09 प्रतिनिधी  तब्बल नऊ महिन्या नंतर फिरला रासावंतीचा चरखा लहान मुलांसह जेष्ठ नागरिक घेत आहे ऊस पिण्याचा आनंद.   कोरोना च्या पार्श्वभूमीवर  संपूर्ण देशात 22 मार्च पासून लॉक डाऊन झाल्याने  मागील वर्षी रसवंती चालक मोठे अडचणीत आले होते पण या वर्षी नवीन ऊस तयार होताच परिसरात रासावंतीचा चरखा फिरू लागला व जेष्ठ नागरिकांसाहित सर्वच स्तरातील माणसे रस पिण्याचा मोह अनावर झाला. परतूर वाटूर रोड वरील बरीदे रसवंती वर रसाचा आस्वाद घेताना शर्मा क्रिकेट अकॅडमी चे विद्यार्थी सोबत प्रशिक्षक संतोष शर्मा,भाऊसाहेब मुके                      आरती मुके(विध्याथी) मागील वर्षी कोरोना मुळे आम्हाला ऊसाचा रस पिण्यासाठी मिळाला नाही. पण या वर्षी लवकरच रसवंती चालू झाल्याने आम्ही रस पिण्याचा  आनंद घेत आहोत. शिवाजी मुझमुले-(रसवंती चालक) गत वर्षी कोरोना मुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. या पार्श्वभूमीवर या वर्षी लवकरच रसवंती गर्घ चालू करण्यात आले नागरिकांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकरी अनुदान वाटपाची गती आणखी वाढवा जिल्हा बँकेत शेतकर्याचे पैसे सुरक्षीत मुख्याध्यीकारी आशुतोष देशमुख यांचे आव्हाहन दोन कोटी बत्तीस लाख रुपयाचे अनुदान प्राप्त पाच हजाराच्या वर शेतकर्याना मिळनार लाभ

तळणी ः जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकर्याच्या अनुदान वाटप व प्रधान मत्री किसान सन्मान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याना त्याचे वाटप लवकरात लवकर करण्याचे आव्हाहन मुख्याधाकारी  देशमुख यानी केले कारण या वर्षीचा सपूर्ण खरीप हंगाम हा शेतकर्याचा वाया गेला आहे शासनाकडून प्राप्त झालेली मदत  ही शेतकर्यासाठी आधार असुन येणाऱ्या रब्बी हंगामासाठी थोडाफार हातभार या मदतीचा होऊ शकतो सपूर्ण जिल्हा भरातील शाखांना व्यवस्थीत आर्थीक पूरवठा होत असुन आर्थीक पूरय ठया सदर्भात कुठलीच अडचण सध्या नसल्याचे त्यानी सांगितले जिल्हाभरातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमधून रोज शेतकर्याना अनुदान मोठया प्रमाणात वाटप करण्यात येत आहे कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीत सुध्दा बँक कर्मचारी आवश्यक ती खबरदारी घेऊन वाटपाचे नियोजन स्थानिक स्तरावर करत आहे.                                           अशूतोष देशमुख - (जिल्हा बँके मध्ये जास्तीत जास्त ही शेतकर्याची खाती आहेत शेतकर्याच्या खात्यातील रक्कम ही जिल्हा बँकेत  सुरक्षीत असुन बँकेचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक असुन जास्तीत ठेवी शेतकर्यानी जिल्हा बँकेत ठेवण्याचे आव्हाह

राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेत्यांची धडपड, हा शेतकऱ्यांचा बंद नाही ,शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

प्रतिनिधी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या वतीने भारत बंदचे आव्हान करण्यात आले असून असे आवाहन करुन सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करणे चुकीचे आहे उद्याचा बंद हा शेतकऱ्यांचा नसून राजकीय पक्षांचा आहे काही नेत्यांना आपले राजकीय पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने पासून धडपड सुरू आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न देशातील विविध पक्षांकडून केला जात आहे अशा या भूलथापा उभारलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी सुधारणा कायदा 2020 अंतर्गत शेतीविषयक कायद्यांमध्ये शेतकरी हिताचे अमुलाग्र बदल केले असून मागील अनेक वर्षांपासून हे सर्व बदल होणे अपेक्षित होते परंतु संपूर्ण देशात सत्ता असतानादेखील काँग्रेस किंवा इतर पक्षांना शेतकरी हिताचे हे निर्णय घेता आले नाहीत दस्तुरखुद्द तत्कालीन कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांनी देखील ऑगस्ट 2010 आणि नोव्हेंबर 2011 मध्ये कृषी कायद्यामध

भारतीय क्रांती सेनेच्या वत्तीने महामान डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

Image
औरंगाबाद(प्रतीनीधी)भारतीय क्रांती सेनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त औरंगाबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले           यावेळेस भारतीय क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष वनिता चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यांच्या सह जिल्हा अध्यक्षा सौ संगीता हनवते, अमृता सावंत, शारदा खिल्लारे, सुशिलाबाई साळवे, शांताबाई साळवे, मनिषा बाविस्कर, भाग्यश्री दाभाडे आशा पाटील निर्मला तरटे  अंजना सुडके अंजली कव्हाळे, जयरसखुबाई खकाळ, मनिषा चिंतामणी, शारदा काळे ,सुरेखा डख ,पार्वती महाडिक, मंगल राऊत, उषा घोंगडे ,ज्योती सोनवणे, आलका तळपे, जयश्री जाधव, दिपाली कळसकर, शैला सुर्यवंशी,यांच्या सह  आदी महिला उपस्थित होत्या सर्वांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🇮🇳

स्वखर्चाने जगवली वनीकरण विभागाची झाडे, परतूर : शिक्षक योगेश बरीदे याचा उपक्रम.

Image
परतूर ,प्रतिनिधी स्व खर्चाने ठिबक सिंचन  करत सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली तब्बल पन्नास कडू लिंबाचे  झाडे जगविले.  परतूर चे शिक्षक  योगेश बरीदे यांनी राबविला उपक्रम.     परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात सह शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक योगेश बरीदे यांची परतूर वाटूर मुख्य रोडवर शेतजमीन आहे . त्यांच्या शेतीच्या कडीला सामाजिक वनीकरण च्या वतीने गत वर्षी जून महिन्यात कडू  लिंबाची  झाडे लावण्यात आली होती. गत वर्षी पाऊस काळ कमी होता या मुळे पाण्याची अडचण होती पण शिक्षक योगेश बरीदे  यांच्या विहिरीला मुबलक पाणी होते आणि याच कडुलिंबाच्या झाडांना खेटून त्यांची सीताफळाची बाग आहे. हे लावलेली झाडे आपल्या सर्वांसाठी फायद्याची आहे असे समजत त्यांनी या पण झाडांना ठिबक सिंचन केले आत्ता हि झाडे चार ते पाच फुटावर असून जिवंत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.,  असा उपक्रम ज्या ठिकाणी रोड च्या कडीला झाडे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन  शिक्षक बरीदे यांनी केले आहे.               प्रतीक्रीया *लाल बहादूर शाळेचे  शिक्षक योगेश बरीदे यांनी जो उ

मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...

Image
परभणी, दि. 30 (प्रतिनिधी) ः नांदेडसह परभणी येथील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी आणखी दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिकंदराबाद - मुंबई (सीएसएमटी) ही देवगिरी एक्स्प्रेस पाच डिसेंबरपासून (शनिवार) तर नांदेड - मुंबई (सीएसएमटी) ही राज्यराणी एक्स्प्रेस तीन डिसेंबरपासून (गुरुवार) धावणार आहे. गुरुवारपासून (दि.तीन डिसेंबरपासून) नांदेड - मुंबई (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेस (क्र. 07611) ही नांदेड येथून रात्री दहा वाजता निघणार आहे. पूर्णा येथे दहा वाजून 28 मिनिटांनी पोचेल, परभणीत रात्री अकरा वाजता, मानवत येथे साडेअकरा, सेलूत 11 वाजून 55 मिनिटांना, परतूरमध्ये 12 वाजून 54 मिनिटांनी, जालनात एक वाजून 45 मिनिटांनी, औरंगाबादेत दोन वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे तीन वाजून 29 मिनिटांनी, रोटेगाव येथे चार वाजून 14 मिनिटांनी, मनमाडमध्ये सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी, नाशिकमध्ये सकाळी सहा वाजून 12 मिनिटांनी, इगतपुरी येथे सात वाजून 20 मिनिटांनी, कल्याण येथे आठ वाजून 53 मिनिटांनी, ठाण्यात नऊ वाजून 13 मिनिटांनी तर छत्रपती शिवाजी महाराज टरमिनस येथे सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी प