Skip to main content

अवैध धंदयाना मिळते का पोलीसाचे पाठबळ? नागरीकांचा सवालतळणी : मंठा तालुक्यातील तळणी सह परिसरात सध्या अवैध धंदयानी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असुन तरुण या अवैध धंदया मुळे भरकटत असुन पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने या धंद्याना खत पाणी मिळत असल्याची चर्चा जनतात मोठ्या प्रमाणात आहे तळणी बस स्टँन्ड परिसर या सपूर्ण विळख्यात अडकले आहे अवैध देशी दारू गुटखा ऑनलाईन मटका अशा धंद्याना सुरवात झाली असल्याने तरूणाई या  पैश्याच्या मोहापाई यामध्ये अडकत आहे  यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो गेल्या दोन तीन वर्षापासुन बंद  असलेले हे धंदे हळहळू सुरु झाले असुन गावातील काही जागरूक तरुणांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून पोलीस प्रंशासनांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले पंरतू त्याकडे फारशे गंभीरतेने घेतले गेले नाही तळणी बस स्टँन्ड परिसरात तळीरामांचा येणाऱ्या जाणाऱ्याना त्रास हा नित्यांचाच झाला असुन त्यात आणखी नविन अवैध धंदयाची जोड मिळाली कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांची बदली होताच हळू हळू या धंदयानां पोलीस प्रशासना कडूनच पाडबळ मिळत असल्याने या व्यवसायावर कारवाईची टाळाटाळ होत आसल्याचे नागरीकांकडून बोले जात आहे दीवसा ढवळ्या अवैध देशी दारू ची विक्री होत असुन परवानाधारक देशी दारू विक्रेत्याकडूनच  दारूचा पूरवठा होत असल्याचे माहीत असताना सुद्धा त्यावर कारवाई का नाही असा प्रश्न नागरीक विचारत आहे अवैध दारु विक्रेत्यावर परवानाधारक दुकान मालकावर कारवाई करा अशा स्पष्ट सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यानी तळणी भेटी दरम्यान दिल्या होत्या तरि सुध्दा यावर कुठलीच कारवाई झाली नाही  परवानाधारक दुकानातून तळणी सह परीसरातील आजुबाजुच्या गावामध्ये मोठया प्रमाणात देशी दारुची विक्री केल्या जाते तसेच विदर्भातून येणाऱ्या गुटख्या विषयी कुठलीच कारवाई झालेली नसल्याचेही दिसून येत आहे 

चोऱ्याच्या प्रमाणात वाढ 
गेल्या दोन ते तीन महिन्यापासुन तळणी सह परिसरात चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असुन त्याचा शोध घेण्यास अद्याप पर्यन्त म्हणावे तसे यश पोलीसांना मिळाले नाही तर गावातील काही चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही  मोठी बाजारपेठ असल्या कारणाने व्यापाऱ्यात भितीचे वातावरण आहे 

 गेल्या दोन महिन्या पासुन अवैध व्यवसाय वाढत असुन यांचा सर्वसामान्य नागरीकांना त्रास होत आहे मटका दारु या विषयी पोलीस प्रशासनास वेळोवळी कल्पना देऊन सुध्दा कारवाई होत नाही 

अशोक रोठोड  ग्रामपंचायत सदस्य तळणी 


अवैध धंदयाना पाठीबा असणाऱ्या मंठा पोलीस निरीक्षक विलास निकम यांची बदली करण्याची मांगणी एस पी विनायक देशमुख व पालंकमंत्री राजेश टोपे यांच्या कडे करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे यांनी सांगीतले 

या विषयी मंठा पोलीस निरीक्षक विलास निकम यांना दुरध्वनीद्वारे या अवैध धंद्या विषयी विचारणा केली असता तुम्ही आँफीस ला या  आल्यावरच मी त्यावर प्रतिक्रीया देईल असे बोलून प्रतिक्रीया देण्याचे टाळले

Popular posts from this blog

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

मंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत

परतूर तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे          

मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...

परभणी, दि. 30 (प्रतिनिधी) ः नांदेडसह परभणी येथील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी आणखी दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिकंदराबाद - मुंबई (सीएसएमटी) ही देवगिरी एक्स्प्रेस पाच डिसेंबरपासून (शनिवार) तर नांदेड - मुंबई (सीएसएमटी) ही राज्यराणी एक्स्प्रेस तीन डिसेंबरपासून (गुरुवार) धावणार आहे. गुरुवारपासून (दि.तीन डिसेंबरपासून) नांदेड - मुंबई (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेस (क्र. 07611) ही नांदेड येथून रात्री दहा वाजता निघणार आहे. पूर्णा येथे दहा वाजून 28 मिनिटांनी पोचेल, परभणीत रात्री अकरा वाजता, मानवत येथे साडेअकरा, सेलूत 11 वाजून 55 मिनिटांना, परतूरमध्ये 12 वाजून 54 मिनिटांनी, जालनात एक वाजून 45 मिनिटांनी, औरंगाबादेत दोन वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे तीन वाजून 29 मिनिटांनी, रोटेगाव येथे चार वाजून 14 मिनिटांनी, मनमाडमध्ये सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी, नाशिकमध्ये सकाळी सहा वाजून 12 मिनिटांनी, इगतपुरी येथे सात वाजून 20 मिनिटांनी, कल्याण येथे आठ वाजून 53 मिनिटांनी, ठाण्यात नऊ वाजून 13 मिनिटांनी तर छत्रपती शिवाजी महाराज टरमिनस येथे सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी प