अवैध धंदयाना मिळते का पोलीसाचे पाठबळ? नागरीकांचा सवाल



तळणी : मंठा तालुक्यातील तळणी सह परिसरात सध्या अवैध धंदयानी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असुन तरुण या अवैध धंदया मुळे भरकटत असुन पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने या धंद्याना खत पाणी मिळत असल्याची चर्चा जनतात मोठ्या प्रमाणात आहे तळणी बस स्टँन्ड परिसर या सपूर्ण विळख्यात अडकले आहे अवैध देशी दारू गुटखा ऑनलाईन मटका अशा धंद्याना सुरवात झाली असल्याने तरूणाई या  पैश्याच्या मोहापाई यामध्ये अडकत आहे  यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो गेल्या दोन तीन वर्षापासुन बंद  असलेले हे धंदे हळहळू सुरु झाले असुन गावातील काही जागरूक तरुणांनी सोशल मिडीयाच्या माध्यमांतून पोलीस प्रंशासनांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले पंरतू त्याकडे फारशे गंभीरतेने घेतले गेले नाही तळणी बस स्टँन्ड परिसरात तळीरामांचा येणाऱ्या जाणाऱ्याना त्रास हा नित्यांचाच झाला असुन त्यात आणखी नविन अवैध धंदयाची जोड मिळाली कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांची बदली होताच हळू हळू या धंदयानां पोलीस प्रशासना कडूनच पाडबळ मिळत असल्याने या व्यवसायावर कारवाईची टाळाटाळ होत आसल्याचे नागरीकांकडून बोले जात आहे दीवसा ढवळ्या अवैध देशी दारू ची विक्री होत असुन परवानाधारक देशी दारू विक्रेत्याकडूनच  दारूचा पूरवठा होत असल्याचे माहीत असताना सुद्धा त्यावर कारवाई का नाही असा प्रश्न नागरीक विचारत आहे अवैध दारु विक्रेत्यावर परवानाधारक दुकान मालकावर कारवाई करा अशा स्पष्ट सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यानी तळणी भेटी दरम्यान दिल्या होत्या तरि सुध्दा यावर कुठलीच कारवाई झाली नाही  परवानाधारक दुकानातून तळणी सह परीसरातील आजुबाजुच्या गावामध्ये मोठया प्रमाणात देशी दारुची विक्री केल्या जाते तसेच विदर्भातून येणाऱ्या गुटख्या विषयी कुठलीच कारवाई झालेली नसल्याचेही दिसून येत आहे 

चोऱ्याच्या प्रमाणात वाढ 
गेल्या दोन ते तीन महिन्यापासुन तळणी सह परिसरात चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असुन त्याचा शोध घेण्यास अद्याप पर्यन्त म्हणावे तसे यश पोलीसांना मिळाले नाही तर गावातील काही चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही  मोठी बाजारपेठ असल्या कारणाने व्यापाऱ्यात भितीचे वातावरण आहे 

 गेल्या दोन महिन्या पासुन अवैध व्यवसाय वाढत असुन यांचा सर्वसामान्य नागरीकांना त्रास होत आहे मटका दारु या विषयी पोलीस प्रशासनास वेळोवळी कल्पना देऊन सुध्दा कारवाई होत नाही 

अशोक रोठोड  ग्रामपंचायत सदस्य तळणी 


अवैध धंदयाना पाठीबा असणाऱ्या मंठा पोलीस निरीक्षक विलास निकम यांची बदली करण्याची मांगणी एस पी विनायक देशमुख व पालंकमंत्री राजेश टोपे यांच्या कडे करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे यांनी सांगीतले 

या विषयी मंठा पोलीस निरीक्षक विलास निकम यांना दुरध्वनीद्वारे या अवैध धंद्या विषयी विचारणा केली असता तुम्ही आँफीस ला या  आल्यावरच मी त्यावर प्रतिक्रीया देईल असे बोलून प्रतिक्रीया देण्याचे टाळले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड