जीवनात वावरताना सर्वाच्या हिताच्या रक्षण करा मोठया माणसांचा आदर करा-अनिल महाराज चेके

तळणी : (रवी पाटील ) वाघाळा रामकथा ही परिवर्तनाची कथा आहे जोपर्यन्त माणसाच्या जीवनात परिवर्तन होत नाही तोपर्यन्न माणसाची प्रगती होणार नाही जीवनात वावरताना सर्वाच्या हिताच्या रक्षण करा मोठया माणसांचा आदर करा संस्कारीक जीवन बनवा मिळेल तेवढा वेळ नामस्मरणासाठी खर्च करा तरच या कलयुगात तुम्ही  सुखी जीवन जगू शकाल असे प्रतिपादन रामायणाचार्य आनील महाराज चेके यानी केले वाघाळा  येथे चालु असलेल्या श्रीराम कथेचा आजचा सांगतेच्या दिवस रामकथेचे निरुपण करताना महाराजांनी रामसीतेच्या आयुष्यातील  विविध प्रसंग सांगून मंञ मुग्ध केले प्रभू रामचद्रां सारख्या व्यक्तीमत्व आजच्या मानवी जीवनास एक उर्जा स्त्रोत असुन त्यापासून मनुष्याने आदर्श घेतला पाहीजे रामाची त्यागी प्रवृत्ती व आज्ञाधारक पणा मानवी जीवनामध्ये उपयोगी पडू शकतो तो फक्त आचरणात आणने गरजेचे आहे 


लक्ष्मणाचे बंधू प्रेम सर्वश्रूत आहे आजकालच्या भावंडाने ते अंगीकांरले पाहिजे तसे झाले तर प्रत्येक घरामध्ये एकोपा नांदेल  रामाला वनवासात पाठवून भरत कधीच राज गादीचा विचार करू शकत नाही मी तेव्हाच राज्य स्वीकारेल जेव्हा मी 
माझ्या रामाची भेट घेईल जे राज्य माझ्यासाठी माझ्या मातेने मागीतले ते राज्य माझ्या साठी गौण आहे तीच वृत्तीच भरताच्या बंधू प्रेमाचा दाखला देऊन जाते एरवी सत्ते साठी आजचे राजकारणी या रामकथेचा आदर्श घेतील का राम वनवासातून येई पर्यन्त आपण राज सिंहासनावर बसण्यास काय हरकत हा विचार जेव्हा समोर आला  तेव्हा नम्रपणे नकार देणार भाऊच एक जगासमोर आदर्श निर्माण केला तोच आदर्श आज प्रत्येक भावाने घेतला पाहीजे 
 निसर्गाकडे अजब जादू आहे. निसर्गात अहंकाराचा लवलेश नाही, म्हणूनच निसर्ग ईश्वराच्या नजीक आहे. त्याचमूळे आपण जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तेव्हां ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो. मायेचा भ्रम दूर होतो. वसंत असो वा वर्षा ऋतूच्या मार्गाने ईश्वरचं सृष्टीवर हात फिरवीत असतो, नजर ठेवून असतो. 
जीवनातही असाच प्रभूस्पर्श झाला, ' त्याचं ' हस्त फिरला की जीवनही चैतन्यदायी स्पर्शाने फुलवून निघते. भक्ती आणि शक्तीच्या सहयोगातून जीवन दृष्ठीही निसर्ग सृष्ठी सारखी बहरत जाते. देणारयाचे हात हजार हे निरंतर सत्य आहे. म्हणूनच न मागता 'तो' घेणाऱ्याच्या झोळीत प्रसाद टाकीत असतो. 
"नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी लाभली की ती सरस्वतीच्या रुपात स्वानंदला. उत्कर्षाला कारणीभूत होते." आपल्या मनातील श्रद्धा जर बलिष्ठ असेल तर त्याच्या आधारावर अशक्य ते शक्य करता येते. "श्रद्धावान लभते मोक्ष: 
"गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे शहाणपण,शहाणपण तेथे नारायण आणि नारायण तेथे सुख, शांती समाधान ." गुरु शिष्याला आपल्या सारखे करून टाकतात. ज्याला आपला शिष्य आपल्यापेक्षा 'बुद्धिवान' व्हावा असे वाटते, तोच खरा गुरु. दुसऱ्याला काहीही मोबदला न घेता 'गुरुत्व' बहाल करतो तोच खरा गुरु. हल्लीच्या युगात खरे गुरुत्व देणारे दुर्मिळच असतात राजाचा अधिकार असताना सुद्धा गुरु आज्ञेत राहणाऱ्या रामा समोर सपूर्ण भारत वर्ष व विश्व  आज रामा समोर नतमस्तक होत आहे 

  राजा राम जगासमोर एक आदर्श राजा आहे आजही भारत भूमीला रामाच्या नावाने ओळखतात चारीत्र्य काय असते ते कशे जपावे यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचद्र त्यांगाचा आदर्श काय असतो ते रामाकडून शिकावे वडीलांच्या  आज्ञेचा आदर हा रामाच्या संस्कांरातून दीसून येतो आज खऱ्या अर्थाने त्या संस्कांरांची गरज तरुण पीढीवर होणे गरजेचे आहे सध्याच्या तरुणांमध्ये न ऐकण्याची प्रवृती वाढत चालल्याने आई वडीलांना अनाथ आश्रमाची वाट धरावी लागते आहे खरे तर आपली भारतींयांची एकत्रीत कृटुंब संस्कृंती लयास गेल्याने प्रेम आपूलकी माणूसकी या गोष्टी आता क्कचीतच पाहावयास मीळत आहे या कलयुगात . तरूणांनी रामाचा आदर्श घेऊनच जगले पाहीजे तरच आपली येणारी पीढी नीतीवान चारीत्र्यवान बनेल असे रामायणाचार्य अनिल महाराज चेके यानी वाघाळा येथील रामकथेच्या सांगते प्रसंगी काढले

श्री भक्त प्रेम वेदांत गुरुवर्य किसन बाबा वाघाळेकर यांच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्य वाघाळा येथे संगीत रामायण संत तुकाराम महाराज चरिञ व किर्तन सोहळ्याचे मोठे आयोजन करण्यात आले होते ह भ प ज्ञानेश्वर माऊली वाघाळेकर यांच्या नेतूत्वा खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या ह भ प  उमेश महाराज दाशरथे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहची सांगता होणार आहे 

या सात दिवसात 
रामायणाचार्य अनिल महाराज चेके साथ शालिक्रम महाराज टेकाळे मारुती महाराज पवार गजानन महाराज आदरणीय माऊली महाराज वाघाळे कर व ग्रामस्थाची मोठी उपस्थीती होती

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश