सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

 परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतुर येथील  न्यू वंडर किड्स ईंग्लीश स्कुल मधे  शैक्षणिक वर्ष 2022/23 यावर्षी घेण्यात आलेल्या अॉलिंपियाड राज्यस्तरिय हस्ताक्षर स्पर्धेत  पहिली ते नववी मधिल तब्बल 45 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन  केले. 
      यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष  गणेश सोळंके  यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना प्रमाण पत्र आणि गोल्ड मेडल वितरित करण्यात आले. कार्याध्यक्ष .या प्रसंगी  सोंळके बोलताना  म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील प्रत्येक स्पर्धात्मक परिक्षेत भाग घ्यावा जेणे करुन विद्यार्थी भविष्यात सर्धा परिक्षेत  सहज यश संपादन करता येईल   
        यावेळी संस्थेच्या सचिव सौ छाया बागल मॅडम, प्रिन्सिपल साम वर्घिस सर  संपूर्ण शिक्षक वृंद  व वीद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत