विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले मेसेज,प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात परतूर विधानसभा मतदार संघातून 5000 मेसेज


परतूर (हनूमंत दंवडे)
 काल दिनांक  09 रोजी 10000 पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर आज दिनांक 10  रोजी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री यांच्या नेतृत्वाखाली परतूर विधानसभा मतदार संघातून शिक्षण मंत्री उदय सामंत यांना 5000 मेसेजेस पाठवण्यात आले
 हे मेसेज पाठवण्याचे सुरुवात युवा मोर्चा प्रदेश महामंत्री यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी एकाच वेळी आपल्या मोबाईल वरून मंत्री उदय सामंत यांना मेसेजेस पाठवत पवित्र विद्यापीठांना तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवू नका विद्यापीठ सुधारणा विधेयक काळे विधेयक त्वरित मागे घ्या अशा प्रकारचा मेसेज प्रत्येकान पाठवला
=======================
*विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घेईपर्यंत आता माघार नाही*
 *राहुल लोणीकर*
=======================
कालच आम्ही महाविद्यालयीन परिसरामध्ये बॅनर लावून राज्य सरकारच्या विद्यापीठ सुधारणा विधेयका संदर्भात जनजागृती सुरू केली व मुख्यमंत्र्यांना 10000 पोस्टकार्ड पाठवत जोरदार निदर्शने केली असे यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की हे विधेयक मागे घेईपर्यंत आता आपण माघार घेणार नसून आज मतदार संघातून 5000 मेसेजेस शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवण्यात आलेले आहेत यापुढेही हा लढा टप्प्याटप्प्याने ठेऊ तीव्र करण्यात येणार असून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा या काळ्या कायद्याविरोधात आक्रोश असून सरकारला मात्र आपल्या तुंबड्या भरण्यासाठी विद्यापीठांना राजकारण्याच्या हातातील बटिक बनवायचे आहे असा संतप्त सवाल यावेळी राहुल लोणीकर यांनी उपस्थित केला
=======================
*पुढील दोन दिवस जिल्हाभरातून हजारोम मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठवणार*
=======================
येत्या पुढील  दोन दिवसांमध्ये जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठविण्यात येणार असून आज परतूर येथून 5000 मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती यावेळी राहुल लोणीकर यांनी दिली पुढे ते म्हणाले की युवा कार्यकर्ते विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मेसेजेस मंत्री उदय सामंत यांना पाठवावीत असे आवाहन यावेळी त्यांनी केले
पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत.विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे त्या मुळे आमचा या विधेयकाला विरोध असून सरकारने विधेयक मागे घ्यावे या साठी आता आपण आर पारची लढाई लढण्याची वेळ आली आहे असे त्यांनी या वेळी  सांगितले
यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण