Posts

Showing posts from June, 2024

कत्तली साठी आणलेल्या जनावराना परतूर पोलिसांन मुळे मिळाले जीवदान.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण आज रोजी सकाळी पहाटे पोलिस स्टेशन परतूर येथील पोलिसांनी गवभागत तसेच कुरेशी मोहल्ला, लड्डा कॉलनी येथे कमिंग ऑपरेशन घेऊन गोवंश ची कत्तल होणार नाही या साठी मोठी कारवाई केली आहे, सर्वांचे घर झडती घेवुन पाहणी केली असता इसम नामे मुजीब जीलानी कुरेशी यांचे घरी कत्तली साठी आणलेले गोवंश जनावरे (वासरे) 43,000/-₹ ची मिळून आल्याने ती पोलिसाने ताब्यात घेऊन पुढील आदेश पर्यंत नगर पालिका परतूर यांचे ताब्यात कोंडवाडा येथे देऊन जनावरांचा कत्तल होनेपासून जीव वाचवला आहे, या कारवाई मुले परतूर पोलिसांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.  --- परतूर शहर किंवा परिसरात कोणीही जनावराची अवैध वाहतूक किंवा कत्तल करताना मिळून आल्यास त्यांची गय करणार नाही. आणि असे कोणीही मिळून आल्यास 2 वर्षासाठी त्यांना हद्दपार करण्यात येणार आहे. अशी माहिती पो. निरीक्षक, एम. टी. सुरवसे यांनी दिली आहे.  सदरची कारवाई मा. श्री. अजयकुमार बन्सल साहेब, पोलिस अधीक्षक जालना, मा.श्री. आयूष नोपणी साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक जालना, मा. श्री. सुरेश बुधवंत sdpo परतूर यांचे मार्गदर्शनाखाली  एम. टी. सुरवसे,

किर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर अनंतात विलिन,अंत्य दर्शनाला लोटला मोठा जनसमुदाय

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथील सुप्रसिध्द कीर्तनकेसरी भारतीदास हभप साहेबराव साबळे महाराज कोठाळकर हे अनंतात विलिन झाले आहे. हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 110 व्या वर्षी दि २६ जुन २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी प्राण ज्योत मालवली. त्याच्यावर दि २७ जुन रोजी सकाळी दहा वाजता मूळ गावी कोठाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगाच्या जयघोषात अंतिम संस्कार करण्यात आले. जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय भक्तगण अंत्य दर्शनाला उपस्थित होता. हभप रूपालीताई सवणे, बळीराम बाबा घोंसीकर, तुकाराम महाराज सांगवीकर दत्त संस्थान सावंगी, नामदेव महाराज फपाळ, बाळू महाराज गिरगावकर, चांगदेव महाराज काकडे, बळीराम महाराज आवटे, महादेव महाराज गिरी, राजेंद्र महाराज वाघमारे, राम महाराज काजळे, तुकाराम महाराज राठोड, पांडुरंग महाराज आनंदे, हभप लक्ष्मण महाराज आनंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, मनिषा टोपे, पंकज बोराडे, बळीराम कडपे, पंडित भुतेकर, लक्ष्मण वडले, तसेच परतूर, अंबड, कु.पिंपळगाव, घनसावंगी

स्वाभिमानी पक्षाची मराठवाड्यातील विधानसभेची पहिली उमेदवारी घोषित

Image
  जालना / प्रतिनिधी : समाधान खरात     येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या उमेदवारांची घोषणा आज जालना येथे कार्यकारणी बैठकीत करण्यात आली.भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी मयूर बोर्डे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.     स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ५० पेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार रोजी जालना येथे संपन्न झाली. याबैठकीत मराठवाड्यातील पहिल्या उमेदवाराची घोषणा आज जालन्यातून करण्यात आली.    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी बैठक जालना येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा. या मागण्यासाठी स्वाभिमानी

किर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांचे 110 व्या वर्षी निधन

Image
जिल्हा  प्रतिनिधी समाधान खरात घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथील सुप्रसिध्द कीर्तनकेसरी भारतीदास हभप साहेबराव आश्रोबा साबळे (कोठाळकर) महाराज यांचे वयाच्या 110 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि २६ जुन २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य तिन मुले, तिन मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्याच्यावर दि २७ जुन रोजी सकाळी दहा वाजता मूळ गावी कोठाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.         कीर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ग्रामीण शहरी भागात समाज प्रबोधन केले. संतांचे विचार आपल्या शब्दात मांडून समाज घडविण्याचे कार्य केले आहे. कीर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांच्या निधनाने संप्रदायात शोककळा पसरली आहे. जालना येथील प्रयाग हॉस्पिटलचे डॉ.रामेश्वर साबळे यांचे ते वडील होत.

श्री समर्थ विद्यालयात मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन याविषयी जनजागृती

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयत किशोर वयीन मुलींसाठी मासिक पाळी व आरोग्य व्यवस्थापण या विषयी  श्रीमती अमृता ठाकुर परतुर तालुका समन्वयक आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांनी उजास प्रकल्प अंतर्गत दिली.                        किशोर वयातील मुलींसाठी आरोग्य व शिक्षण या बद्दल जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यामध्ये उजास काम करत आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुका समन्वयक अमृता ठाकूर या आज आमच्या शाळेत भेट देऊन किशोरवयीन मुलींना मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन या विषयात मार्गदर्शन केले यात मासिक पाळी चक्र किशोर अवस्था, शारीरिक बदल मानसिक बदल आहार ,आरोग्य स्वच्छता ,व्यायाम व स्वच्छ मासिक पाळीतील साधनांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.        यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर , सहशिक्षक पाराजी रोकडे, उद्धव खवल , विद्यानंद सातपुते, भास्कर कुलकर्णी, धनंजय जोशी,सी,एन.खवल , पांडुरंग डवरे,शंकर खरात , गणेश वखरे आदींची उपस्थिती होती.

परतुर येथील विवेकानंद प्राथमिक व माध्य.शाळेमध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण परतुर येथील विवेकानंद इंग्रजी शाळेमध्ये 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग विषयीचे महत्त्व योगशिक्षक श्री गजानन वायाळ यांनी विशद केले. योगसाधनेचे मूळ उगम स्थान भारत देश आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना जर योगाच्या अभ्यास करण्यास गोडी लागली,योगाभ्यास जर करू लागले तर निश्चितपणे राग, द्वेष, चिडचिडपणा,नकारात्मक मानसिकता या बाबी विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणार नाहीत तेव्हा ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे.यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व हालचाली योगासने सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी सहभागी होऊन योग दिवस साजरा केला.यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष डॉ शेषराव  बाहेकर, मुख्याध्यापिका संगीता शिंदे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. दरम्यान विवेकानंद इंग्रजी शाळेमध्ये विविध व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी विविध कार्यक्रम ,ऍक्टिव्हिटी होत असतात त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस देखील अतिशय उत्साहामध्ये साजरा केला.दरम्यान भारताने जगाला दिलेली ही देन आहे, योगामुळे

नगर परिषद परतुरच्या 45 रोजंदारी कामगारांच्या सेवेत समावेशनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. , शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण नगर परिषद परतुर येथे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात जवळपास तीस वर्षापासून रोजंदारी वर काम करणार्‍या मजुरांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचे विविध धोरण येऊन देखील सेवेत समावेशन होऊ शकले नाही.  हताश होऊन या कर्मचाऱ्यांनी उपोषण,  आंदोलन करूनही या लोकांना कोणी न्याय दिला नाही. वर्ष 2022 मधे मा. एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्या नंतर शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी या रोजंदारी करणार्‍यांपैकी काही प्रतिनिधींना घेऊन थेट वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री साहेबांसमोर या कर्मचाऱ्यांना सर्व पुराव्यासह घेऊन गेल्यानंतर नोव्हेंबर 2022 मधे मा. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी फेर तपासणी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.   त्यानंतर विविध स्तरावरून सर्व बाबींच्या तपासणीअंती या 45 दुर्लक्षित रोजंदारी कर्मचार्‍यांना शासनाचे धोरणात्मक निर्णयाचा लाभ होऊन सेवेत समावेश होण्याच्या अनुषंगाने शासनाच्या अवर सचिव यानी जा. क्र. 365/नवि17 दि. 18 जून 2024 रोजी आयुक्त

श्री समर्थ विद्यालयास वर्ग 10 वी चे पुस्तक संच भेट

Image
परतूर प्रतीनिधी  कैलाश चव्हाण            परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना  सिटी हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ संध्याताई कराड यांनी पुस्तकांचे संच भेट दिले.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.  या विषयी  डॉ.कराड यांनी सांगितले की ग्रामीण भागामध्ये असे अनेक विद्यार्थी असतात की ते केवळ पुस्तकांचे संच विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात असे होऊ नये म्हणून समाजातील अनेक दानसुर व्यक्तीने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.       यावेळी परतुर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.संध्याताई कराड , अमित लॅबोरेटरीचे संचालक अंगद नवल ,पाराजी रोकडे,सी.एन.खवल , पांडुरंग डवरे यांची उपस्थिती होती.      या वेळी शाळेच्या वतीने डॉक्टर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    दि ६ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परतुर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण व शाळा परिसरात स्वच्छता अभियान चे आयोजन करण्यात आले.    यावेळी शाळेचे संचालक  संतोष चव्हाण , सुबोध चव्हाण , डॉ. भाग्यश्री चव्हाण ,शाळेचे प्राचार्य जयकुमार सर, प्रा. प्रदीप चव्हाण ,  गजानन कुकडे, श्री. रमेश कदम, श्रीमती मीनाक्षी शिनगारे,श्रीम. वंदना ककरीये, श्रीम. स्वाती काळे, श्रीम. मोनिका लहाने, श्रीम. त्रिवेणी गिरी , श्रीम. मनीषा लहाने, कोमल मोर ,श्रीम. निकिता कदम,  प्रदीप साळवे  विजय भापकर, धनंजय पावले सह इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.