Posts

Showing posts from May, 2024

आनंद इंग्लिश स्कूल चा एस.एस सी परीक्षेत शंभर टक्के निकाल

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण परतूर येथील आनंद इंग्लिश स्कूलचा पहिल्याच बॅच चा निकाल शंभर टक्के लागला असून त्याचा विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये हर्ष उल्हास निर्माण झाला आहे.   आनंद इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल  शंभर टक्के लागला आहे. निकाला मध्ये वैष्णवी रामप्रसाद माने हिला (89.20%) गुण घेऊन सर्वप्रथम  ,  द्वितीय वैष्णवी भारत थिटे (83.80%) व तृतीय क्रमांक दिनेश गुलाबराव मिसाळ (83.20%) आलेली आहे     शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम, उपाध्यक्ष डॉ. भानुदास कदम, सचिव सुंदरराव कदम, प्राचार्य नारायण सागुते , विकास काळे, दिपाली वापटे, सचिन नंदिकोले , सचिन राठोड, शीतल खरे आदींनी सर्व उत्तर्णी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.

९०% च्या पुढे ४ तर विशेष प्राविण्यासह २३ विद्यार्थी उत्तीर्ण शास्त्री विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची दहावी निकालाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम असून नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ४ विद्यार्थ्यांनी ९०% च्या पुढे गुण मिळविले आहेत तर २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.     छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १० वी ) या विद्यालयातून एकूण २१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल ८८.६७ टक्के एवढा लागला असून विद्यालयाचे ४ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम आहे.    पृथ्वीराज कोरके, प्रीती बोबडे, जयश्री सोळुंके व रिंकल सवणे यांनी उज्वल यश मिळविले.       सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात, सचिव कपिल आकात, उपाध्यक्ष कुणाल आकात, मुख्याध्यापक एल. के. बिरादार, उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे,पर्यवेक्षक आर. टी. राऊत, टी. जी. घुगे यांच्यासह वि

आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्याने परतूर पोलिसांचा गौरव