लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

   जालना प्रतीनिधी समाधान खरात
  जालना तालुक्यातील कारला येथील नमुना नं आठ वर नाव घेणे व घरकुलची फाईल तयार करण्यासाठी कारला येथील ग्रामसेव श्रीनिवास आनंदराव घुगे यांना लाचलूचपत अधिकारी यांनी रंगेहाथ पकडले 
     जालना तालूक्यातील कारला येथील रहीवाशी यांच्या प्लाट नमुना नं आठ व घरकुलची फाईल तयार करण्यासाठी येथील ग्रामसेवक घुगे यांनी रहीवाशी यांना दहा हजाराची लाच मागीतली होती परंतू तडजोडीत पाच हजारा रू देण्याचे तय झाले कारला येथील रहीवाशी यांना लाच देण्याची इच्छा नव्हती त्या करणाने त्यांची लायलूचपत कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार ८ फेब्रू .वारी तक्रार दिली त्या अनूसंगान लाचलूचपत पोलीस उप अधीक्षक कीरण बीडवे यांनी दि.९ फेब्रू . वारी रोजी सापळा रचून कारला येथील ग्रामसेवक श्रीनिवास आनंदराव घुगे यांना पंचा समक्ष रंगेहाथ पकडले
   सदरची कामगीरी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर, मुंकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी व पथकातील अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, ज्ञानदेव जुंबड, आत्माराम डोईफोडे, शिवाजी जमधडे, अतिश तिडके, कृष्णा देठे, गजानन खरात, संदीप लहाने, गजानन कांबळे, शिवालिंग खुळे, भालचंद्र बिनोरकर यांनी केली आहे.

तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांचे कडुन आवाहन करण्यात येते कि, कोणी लोकसेवक स्वत अगर इतरांमार्फत शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खासगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास ०२४८२ - २२०२५२, तसेच टोल फ्री कं १०६४ वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं.९०१११२५५५३ व dysp.acbjalna@mahapolice.gov.in आणि dyspacbjalana@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन
  किरण एम. बिडवे पोलीस उप-अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी केले आहे

Popular posts from this blog

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड