जि.प.प्रा शा पाटोदा येथे बालिका दिन व सावीत्रीबाई फुले जंयती उत्साहात साजरी

परतूर (हनूमंत दंवडे)आज  दि 3 रोजी जि .प प्रा शा पाटोदा येथे बालिका दिन उत्साहात  साजरा करण्यात आला.  सावित्री बाई यांच्या ओव्या , भाषणे, आणि गीत गाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्री बाई च्या वेशभूषा धारण करूण क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांची  आत्मकथा मांडली .  
        या  प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक   गणेश अंभुरे यांनी स्त्री शिक्षण आणि सावित्री बाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन काटे सरांनी केले
             श्रीमती कुलकर्णी सुचिता यांनी सावित्री बाई वर स्वलिखित कविता व गीत सादर केले. 
         तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या  सदस्या सौ अनिता शाहूराव मुंढे यांनी सावित्री बाईवर एक प्रेरणागीत सादर केले.
           बालिका दिनाचा कार्यक्रमासाठी कैलास जाधव सर व श्रीमती स्वप्ना गोदबोले यांनी परीश्रम घेतले. 
             या कार्यक्रमा करीता अंगणवाडी कर्मचारी नलिनी कुलकर्णी, वृंदावणी देशमुख व कालिंदा गायकवाड व सर्व अंगणवाडी मदतनीस यांनी सहकार्य केले
       या जंयती साठी शाळेती सर्व शिक्षक वृंद व वीधार्थी उपस्थीत होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....